#गुढीपाडव्याचा
Explore tagged Tumblr posts
bhavsrujanarpita · 7 months ago
Text
गुढी पाडवा 2024
आंब्याचे तोरण लावले दारी
सजली अंगणी सुंदर रांगोळी ही न्यारी.
जपूनी मराठी अस्मिता, परंपरा व रूढी
भरजरी वस्त्र अलंकार लेवूनी दिमाखात उभी ही गुढी.
दरवळला सुगंध आंब्याच्या मोहरचा
कोकिळेच्या मधुर स्वराने संकेत दिला वसंत ऋतूच्या आगमनाचा.
चैत्रपालवीच्या ताजगीने प्रफुल्लित पहाट ही प्रतिपदेची
संकल्प करण्या सांगते जणू नव्या आकांक्षांची.
जल्लोष करुनी नवंवर्षाचा, हिंदू संस्कृतीचा
साजरा करूया सण हा गुढीपाडव्याचा.
*नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*
0 notes
adbanaoapp-india · 8 months ago
Text
मराठी मनाचा, मराठी माणसाचा, महोत्सव मराठी नव-वर्षाचा, साजरा करा AdBanaoसह.
Tumblr media
चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच प्रतिपदा, आपण गुढी पाडवा सण साजरा करतो. हा दिवस मराठी नववर्षाचा प्रारंभ आहे.
देशभरात ठिकठिकाणी गुढीपाडवा साजरा केला जातो. हा सण देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. त्याविषयी जाणून घेऊया.
गोवा आणि केरळमधील कोकणी समाज गुढी पाडव्याला संवत्सर पडवो म्हणून साजरा करतात.
कर्नाटकात गुढीपाडव्याचा हा सण युगाडी म्हणून ओळखला जातो.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गुढी पाडवा उगादी म्हणून साजरा केला जातो.
काश्मिरी हिंदू हा दिवस नवरेह म्हणून साजरा करतात.
Tumblr media
गुढी पाडवा: नव्या वर्षाची सुरुवात AdBanao अ‍ॅपसोबत
गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील नववर्षाचा सण आहे. या दिवशी, प्रत्येक मराठी माणूस नवीन उमेदीने आणि आनंदाने वर्षाची सुरुवात करतो. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, जी विजयाचे प्रतीक मानली जाते. गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या रांगोळी, तोरण, फुलांच्या सजावटीतून आपल्या घरात सकारात्मकता आणि समृद्धी येते.
AdBanao अ‍ॅपच्या मदतीने आपण या सणाच्या उत्सवाला अधिक भव्य आणि आकर्षक बनवू शकता. या अ‍ॅपच्या मदतीने आपण स्वतःचे पोस्टर्स, बॅनर्स, व्हिडिओज तयार कर���न आपल्या व्यवसायाचा, उत्पादनांचा किंवा सेवांचा प्रचार करू शकता. यामुळे आपल्या ग्राहकांपर्यंत आपल्या ब्रँडची ओळख पोहोचवण्यास मदत होईल.
Download AdBanao app for Business branding and festival posters.
Read the full blog on website https://www.adbanao.com/blog-details/celebrate-gudipadva-with-adbanao-app
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ मार्च २०२३ सायंकाळी ���.१०
****
छत्रपती संभाजीनगर इथं सीजीएचएस - केंद्र सरकारी आरोग्य केंद्राचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन.
अवकाळी पावसानं आतापर्यत एक लाख एकोणचाळीस हजार हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान.
तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर २७० धावांचं लक्ष्य.
आणि
गुढीपाडव्याचा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा.
****
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सीजीएचएस - केंद्र सरकारी आरोग्य केंद्राचं उद्धाटन मांडवीय यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. सी जी एच एसद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा वाढवण्यासाठी आरोग्य मंत्रालय सतत प्रयत्नरत असल्याचं मांडवीय यावेळी म्हणाले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, खासदार इम्तियाज जलील आणि सहकारमंत्री अतुल सावे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. देशातल्या सर्व सीजीएचएसचं डिजिटायझेशन करुन ही केंद्रं कागदविरहित करण्याचं काम आरोग्य मंत्रालय करत आहे. छत्रपती संभाजीनगरातल्या या केंद्रासह देशात आता ॲलोपॅथिक सीजीएचएसची संख्या ३३६ झाली असल्याची माहिती भारती पवार यांनी यावेळी दिली. या आरोग्य केंद्रात छत्रपती संभाजीनगरसह आसपासच्या जिल्ह्यातल्या केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी आणि माजी संसद सदस्यांना विविध प्रकारच्या आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहेत.
****
कर्तारपूर कॉरिडॉरच्या धर्तीवर पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ भारतीयांसाठी खुलं करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ शारदा मंदिराचं लोकार्पण केलं, त्यावेळी ते बोलत होते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी शारदा मंदिराचं लोकार्पण हे शारदा संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाकडे टाकलेलं पाऊल असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. काश्मीरात सध्या विविध १२३ प्रार्थना स्थळांचा जीर्णोद्धार सुरू असून, यासाठी ६५ कोटी रुपये निधी देण्यात आल्याची माहितीही शहा यांनी दिली.
****
अवकाळी पावसानं यावर्षी राज्यात आतापर्यत एक लाख एकोणचाळीस हजार हेक्टर जमिनीवरच्या पिकाचं नुकसान झाल्याचा आकडा समोर आला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातल्या गारपीटग्रस्त ठाणेपाडा आणि आष्टे भागाचा दौरा करत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले – (कृषी मंत्री अब्दुल सत्तार)
ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तो शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही. चालू अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदय हे दोघंही दोन्ही सभागृहामध्ये नुकसाना भरपाईच्या बाबतीत घोषणा करतील. कोणत्या पिकाला किती नुकसान द्यायचं, कशा पद्‌धतीने, एन डी आर एफ चे नियम काय आहेत? याच्या पेक्षा अजून काही अधिकचं देऊ शकतो का?
सत्तार यांनी आज धुळे जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाचीही पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकारकडून आणि वीजमंडळाकडून असलेल्या अपेक्षांबद्दल कृषीमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करू असा इशारा सत्तार यांनी यावेळी दिला.
****
ई मेल किंवा संकेतस्थळाचा पत्ता आता प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. प्रगत संगणन विकास केंद्र -सी-डॅकने त्यासाठी पुढाकार घेतला असून, सुरुवातीला ५० सरकारी संकेतस्थळांचे पत्ते देवनागरीमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. सी-डॅकचे कार्यकारी संचालक कर्नल ए. के. नाथ यांनी ही माहिती दिली. सुरुवातीला पन्नास सरकारी संकेतस्थळांचे पत्ते देवनागरीमध्ये करण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य भाषांचा विचार करण्यात येईल, असं नाथ यांनी सांगितलं. सध्या ई मेल तसंच संकेतस्थळांचे पत्ते फक्त इंग्रजीत आहेत. मात्र देशभरात विविध भाषा वापरात असल्याने इंटरनेट हे बहुभाषिक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या दृष्टीने युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स क्लॉज अंतर्गत देशभरात सरकारी संकेतस्थळांचे पत्ते प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत.
****
भारतीय सैन्यदलाने सैनिकांना दिल्या जाणाऱ्या शिध्यामध्ये भरड धान्याचा समावेश केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे तब्बल पन्नास वर्षांनंतर, सैनिकांना देशी आणि पारंपारिक धान्यांचा पुरवठा सुनिश्चित होईल.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चेन्नई इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर २७० धावांचं लक्ष्य दिलं आहे. ऑस्ट्रेलियानं आज नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मिशेल मार्शच्या ४७ धावा वगळता, पाहुण्या संघाचा अन्य एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही, मात्र शेवटच्या फलंदाजापर्यंत सर्वांनी चिवट खेळ केल्यानं, पाहुणा संघ ४९ षटका��त सर्वबाद दोनशे एकोणसत्तर धावा करू शकला. हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन बळी घेतले.
****
गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे, त्यानुसार आजपासून पुढचा महिनाभर हा शिधा वितरित करण्यात येणार आहे. राज्यातल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधा पत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. लातूर जिल्ह्यात औसा इथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत आज ‘आनंदाचा शिधा’ वितरणाला सुरुवात झाली.
****
गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होत असलेल्या नववर्षाचं आज राज्यभरात उत्साहात आणि विविध संकल्पनांच्या माध्यमातून स्वागत झालं. ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरापासून निघालेल्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. या शोभायात्रेत महिला आणि तरुणांचा जोषपूर्ण सहभाग लक्षवेधी होता.
छत्रपती संभाजीनगर मध्ये नागरिकांनी पारंपरिक पद्धतीनं तसंच विविध प्रकारच्या गुढ्या उभारून सण साजरा केला. यामध्ये एक्कावन्न फुटांची गुढी, तिरंगा गुढी, सर्वधर्म समभाव दर्शवणारी गुढी, आरोग्याची गुढी, शेतकऱ्याची गुढी आणि खेळाची गुढी यांचा समावेश दिसून आला.
छत्रपती संभाजीनगर इथं जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीनं आज हिंदू नववर्ष स्वागत यात्राही काढण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचं पूजन करुन स्वागत यात्रेला सुरुवात केली.
नाशिक मध्येही स्वागतयात्रा काढून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. गोदावरीकाठी ढोल ताशांचं महावादन, महारांगोळी आणि ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, शस्र प्रात्यक्षिकं असे विविध कार्यक्रम झाले. नाशिकच्या सर्वात जुन्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं पुस्तकांची भव्य गुढी उभारण्यात आली आणि तिचं पूजन करण्यात आलं.
पुण्यातही नववर्षदिन आणि गुढी पाडव्यानिमित्त भारतीय क्रांतीकारक आणि महापुरुषांच्या रथांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
नागपूरला C20 परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांनी आज पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली तेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि नंतर गुढीचं पूजन केलं. यावेळी या मान्यवर पाहुण्यांनीही गुढीची पूजा केली.
राजधानी दिल्लीतही महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
****
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं येत्या २४ ते २६ मार्च दरम्यान शिर्डी इथे राष्ट्रीय स्तरावरचं सगळ्यात मोठं महापशुधन एक्स्पो आयोजित करण्यात आलं आहे. देशातल्या तेरा ��ाज्यांतले पशुपक्षीपालक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. शास्त्रोक्त पध्दतीनं पशुपालनासाठी आवश्यक असलेली यंत्रं आणि उपकरणं तसंच पशुसंवर्धनाशी निगडीत बाबींसाठीच्या उत्पादनांचे स्टॉल्स या महाएक्स्पोमध्ये असतील. तर पासष्ट प्रकाराच्या विविध पशुपक्षांचे स्टॉल्सही यात असणार आहेत.
****
यवतमाळ इथे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं गोवंश तस्करी करणारी सहा वाहनं ताब्यात घेतली आहेत. या कारवाईत कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या पासष्टहून जास्त गोवंशीय पशूंची सुटका करण्यात आली तर चार पशूंचा या वाहनांमध्ये मृत्यू झाला. राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा असतानाही मोठ्या प्रमाणात यवतमाळमार्गे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात गो तस्करी होत असल्याबद्दल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Gudi Padwa 2022: ‘या’ दिवशी साजरा होणार गुढीपाडव्याचा सण, जाणून घ्या तिथी आणि धार्मिक महत्त्व
Gudi Padwa 2022: ‘या’ दिवशी साजरा होणार गुढीपाडव्याचा सण, जाणून घ्या तिथी आणि धार्मिक महत्त्व
Gudi Padwa 2022: ‘या’ दिवशी साजरा होणार गुढीपाडव्याचा सण, जाणून घ्या तिथी आणि धार्मिक महत्त्व आपल्या देशात अनेक प्रकारचे धार्मिक सण, उत्सव साजरे केले जातात. यापैकी एक सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा असाच एक सण आहे, ज्याच्या सुरुवातीस सनातन धर्माच्या अनेक कथा जोडलेल्या आहेत. तिथीनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढी पाडवा साजरा केला जातो. चैत्र नवरात्रीलाही या दिवसापासून…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
तेजस्वी प्रकाशने करण कुंद्रासोबत लग्न केल्याबद्दल उघड उघड, स्यास 'त्याला मार्चमध्ये लग्न करायचे होते'
तेजस्वी प्रकाशने करण कुंद्रासोबत लग्न केल्याबद्दल उघड उघड, स्यास ‘त्याला मार्चमध्ये लग्न करायचे होते’
तेजस्वी प्रकाश-करण कुंद्रा विवाह: तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा इंडस्ट्रीतील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक. आदल्या दिवशी, तेजस्वी प्रकाशने त्याचे कुटुंब आणि प्रियकर करण कुंद्रासोबत गुढीपाडव्याचा सण साजरा केला. करण आणि तेजस्वी यांना त्यांचे चाहते तेजरान या नावाने ओळखतात. दोघांची भेट सलमान खानच्या शो ‘बिग बॉस 15’ च्या घरात झाली होती आणि दोघेही याच घरात एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या घरातून बाहेर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
मराठी नववर्ष सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून गुढीपाडवा शुभेच्छा - महासंवाद
मराठी नववर्ष सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून गुढीपाडवा शुभेच्छा – महासंवाद
            अमरावती, दि. २ : मराठी नववर्ष व गुढीपाडव्याचा सण यंदा कोरोनामु��्तीची पहाट घेऊन आला आहे. कोरोना रूग्णांमध्ये व पॉझिटिव्हिटी दरात लक्षणीय घट झाल्याने सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. हे नववर्ष सर्वांना निरामय आरोग्य, सुखसमृद्धी देवो,  अशा शब्दांत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या…
View On WordPress
0 notes
yugandhale · 5 years ago
Photo
Tumblr media
🙏हिंदू नव वर्षाच्या व गुढीपाडव्याचा खूप खूप शुभेच्छा💐💐💐मी #yugandhale ✌️#amolandhale 😍 (at Narayangaon) https://www.instagram.com/p/B-I1mrCFcJd/?igshid=dqegl8bj6cqm
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
आज राज ठाकरेंची मुंबईत तर नरेंद्र मोदींची नांदेडममध्ये सभा
आज राज ठाकरेंची मुंबईत तर नरेंद्र मोदींची नांदेडममध्ये सभा
आज गुढीपाडव्याचा मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा मुंबईच्या शिवाजी पार्क येथे होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नांदेडमध्ये प्रचार सभा घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यापुर्वी महाराष्ट्रात झालेल्या दोन सभेत त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. तर राज ठाकरे यांनी देखील भाजपच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.  त्यामुळे आज…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 April 2021 Time 7.10AM to 7.25AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १४ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
·      राज्यात आज रात्री आठ वाजेपासून १ मे पर्यंत संचारबंदी; गरीबांची आबाळ होऊ नये म्हणून पाच हजार चारशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य.
·      अन्न सुरक्षा योजनेच्या सात कोटी लाभार्थींना महिनाभरासाठी प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत, शिवभोजन थाळीही मिळणार फुकट.
·      संचारबंदीच्या काळात सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार, उपाहारगृहांसोबतच रस्त्यावर खाद्य पदार्थ विकणारेही पार्सल सुविधा देऊ शकणार.
·      राज्यात ६० हजार २१२ कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ९३ जणांचा मृत्यू तर आठ हजार १९८ बाधित.
·      रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात; गुढीपाडव्याचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा.
·      भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र आदरांजली.
आणि
·      मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पाऊस.
****
राज्यात आज रात्री आठ वाजेपासून पंधरा दिवसांच्या ���ंचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. येत्या एक मे पर्यंत राज्यात कलम १४४ अन्वये ही संचारबंदी लागू असेल. काल सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले –
आज संध्याकाळपासून ब्रेक दी चेन म्हणजे ही श्रृंखला तोडायची आपल्याला. तोडावीच लागेल आणि ती तोडण्यासाठी आपण राज्यात १४४ कलम लागू करतो आहोत. म्हणजेच आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं, कधी रात्री जमावबंदी करत होतो. आता मात्र आपल्याला पुढचे किमान १५ दिवस राज्यामधे संचारबंदी लागू करावी लागत आहे. सकाळी सात ते रात्री आठ या काळामधे आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या आपण चालू ठेवणार आहोत.
 संचारबंदीच्या काळात कोणाचीही आबाळ होऊ देणार नाही, असं सांगत, गरजूंसाठी मुख्यमंत्र्यांनी पाच हजार चारशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर केलं. या अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या सात कोटी लाभार्थींना, पुढच्या महिन्यासाठी प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. शिवभोजन थाळी पुढचा महिनाभर गरजूंसाठी मोफत दिली जाणार आहे. दारिद्र्य रेषेखालील, गोरगरीब तसंच निराधार नागरिकांसाठीच्या विविध पाच योजनांमधल्या लाभार्थींना, दोन महिन्याचं मानधन आगाऊ दिलं जाणार आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगार, नोंदणीकृत घरेलु कामगार, अधिकृत फेरीवाले, तसंच परवानाधारक रिक्षाचालकांना, दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
जिल्हा प्रशासनाला कोविड उपचारासाठी तीन हजार तीनशे कोटी रुपये राखीव ठेवले जात असल्याची माहितीही, मुख्यमंत्र्यांनी दिली.
 संचारबंदीच्या या काळात रुग्णालयं, औषधी दुकानं, यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. उपाहारगृहांसोबतच रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेतेही, पार्सल सुविधा देऊ शकणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या काळात सुरू राहणाऱ्या इतर आस्थापनांबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले –
या काळामधे आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या आपण चालू ठेवणार आहोत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही आहोत. बस सेवा बंद करत नाही आहोत. मात्र, त्या केवळ आणि केवळ आवश्यक अतीआवश्यक कामासाठीच वापरल्या जातील. रुग्णालये आहेत, दवाखाने आहेत, वैद्यकीय, विमा, औषधी कंपन्या, औषधी दुकाने, वैद्यकीय सेवा देणारे, काही डिलर्स आहेत, वाहतूक सप्लाय चेन आहे, लस उत्पादक व वाहतूक करणारे, दूरसंचार सेवा व त्यांच्याशी संबंधित, देखभाल व दुरूस्त‍ी करणारे, पेट्रोलपंप चालू राहतील. पेट्रोलियम उत्पादनं आहेत. कार्गो सेवा, डेटा सेंटर, आयटी सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा मंडळं या सगळ्या गोष्टी या आपण चालू ठेवतो आहोत.
 दरम्यान, राज्यात कोविड रुग्णांसाठी लागणाऱ्या वाढीव प्राणवायूचा पुरवठा हवाई मार्गाने करण्याची विनंती के��द्र सरकारकडे करणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागरिकांनी या सर्व नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं.
****
कोविड लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं, परदेशात विकसित लसींच्या आपात्कालीन वापराला परवानगी देण्याच्या प्रक्रियेला, गती दिली आहे. कोविड लसीकरणासंदर्भात स्थापन विशेषज्ञांच्या राष्ट्रीय समूहानं, या लसींचा वापर करण्याची शिफारस केली आहे. जागतिक आरोग्य संघटना - डब्ल्यू एच ओ नं या लसींचा, त्यांच्या आपत्कालीन वापराच्या लसींच्या यादीत समावेश केलेला आहे. भारतात सर्वप्रथम या लसी शंभर जणांच्या समूहाला देण्यात याव्यात, त्या सर्वांवर आठवडाभर निगराणी ठेवावी, त्यानंतरच देशात सर्वत्र या लसी देण्यात याव्यात, असं या समूहानं म्हटलं आहे.
****
राज्यात काल ६० हजार २१२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३५ लाख १९ हजार २०८ झाली आहे. काल २८१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५८ हजार ५२६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६६ शतांश टक्के झाला आहे. काल ३१ हजार ६२४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २८ लाख ६६ हजार ९७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक ४४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच लाख ९३ हजार ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या आठ हजार १९८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९३ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २१, नांदेड जिल्ह्यातल्या २७, परभणी १५, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी आठ, तर जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी सात रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३५२ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ६६४, लातूर एक हजार ९१६, बीड एक हजार २८, जालना ८६४, उस्मानाबाद ५९०, परभणी ५३२, तर हिंगोली जिल्ह्यात २५२ नवे रुग्ण आढळून आले.
****
औरंगाबाद शहरातल्या सर्व ११५ प्रभागात काल कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु होती. आजही यासर्व ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना केाविड लस देण्यात यावी, यासाठी महापालिकेच्या वतीनं जम्बो कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु केलेली आहे.
****
राज्यातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड उपचार केंद्र सुरू केल्यास, प्रत्येक जिल्ह्यात कोविड रूग्णांना तीन हजार खाटा उपलब्ध होतील, अशी सूचना नांदेड इथले सामाजिक कार्यकर्ते दिपक मोरताळे यांनी केली. मोरताळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला, ही सूचना ई-मेलव्दारे पाठवली आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य विभागाचे सरासरी एक हजार आरोग्य कर्मचारी ��पलब्ध असल्याचंही, त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या या सूचनेची दखल घेतली आहे. चांगली सूचना केल्याचं पंतप्रधान कार्यालयानं मोरताळे यांना पाठवलेल्या ई मेलमध्ये म्हटलं आहे.
****
कोविड उपचारासाठी वापरात येणारे रेमडीसिवीर औषध काळ्या बाजारात विकणाऱ्या तीन जणांना, काल धुळे इथं अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून ही कारवाई केली. ही टोळी ग्राहकांना सोळा हजार रुपयांना एक, याप्रमाणे या औषधाची विक्री करत होती. रेमडीसीवीर औषध, रोख रक्कम, एक मोबाईल, असा एकूण ३८ हजार ८९९ रूपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.
****
मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिलांकरता म्हाडाच्या वतीने वसतीगृह उभारलं जाणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली. ताडदेव इथं एम पी मिल कंपाउंड परिसरात म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर, हे वसतीगृह उभारलं जाणार आहे. ४५० खोल्याचं हे वसतीगृह येत्या दीड ते दोन वर्षांत उभारलं जाईल, यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचं, आव्हाड यांनी सांगितलं.
****
रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात होत आहे. दिल्लीच्या जामा मशिदचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी आणि चाँद दिदार समितीनं ही घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राज्यात गुढीपाडव्याचा सण काल शांततेत आणि उत्साहात साजरा झाला. नागरिकांनी आपापल्या घरी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, सर्वांनी नियमांच पालन करत सण पारंपरिक पद्धतीनं, मात्र साधेपणानं साजरा केला. औरंगाबाद जिल्ह्यात श्री क्षेत्र पैठण इथं मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत, तीर्थस्तंभ परिसरात नगराध्यक्ष शेखर पाटील यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरीकांनी आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन सुदृढ आणि समृद्ध भारताच्या निर्माणात योगदान द्यावं, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या उदारमतवादी विचारांचं, मानवतावादी शिकवणींचं पालन करुन, देश हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण, त्यांची जयंती आपापल्या घरीच साजरी करु या, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
इतर मागास बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, डॉ. आंबेडकर यांची जयंती गर्दी न करता, शांतत��� आणि संयम ठेवून आपापल्या घरातच साजरी करावी, असं आवाहन केलं आहे.
****
नागपूरच्या दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांची जयंती साधेपणानं साजरी केली जाणार असल्याची माहिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ सुधीर फुलझेले यांनी दिली. आज सकाळी नऊ वाजता समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्धांना माल्यार्पण करून, बुद्ध वंदना होईल. या कार्यक्रमाला मोजक्या संख्येत भिक्खुसंघ आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं, फुलझेले यांनी सांगितलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या मुख्य प्रशासकीय इमारतीत, आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्णाकृती तैलचित्र लावण्यात येणार आहे. विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तथा ज्येष्ठ चित्रकार प्राध्यापक दिलीप बडे यांनी हे तैलचित्र रेखाटलं आहे. शाहीर वामन दादा कर्डक यांनी रचलेल्या गीतांच्या ‘गीत भीमायन’ या ध्वनिफितीचं विमोचनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या माळशेंद्रा इथं जिल्हा प्रशासनातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल रक्तदान शिबीर घेण्यात आलं, या शिबिरात ६० जणांनी रक्तदान केलं
 परभणी जिल्ह्यात आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करून, प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचं आश्वासन, जयंती समिती अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे.
****
नांदेड शहरातल्या नंदीग्राम गृहनिर्माण सोसायटीतून जिल्हा पोलिस गुन्हे शाखेच्या पथकानं, काल एक गावठी पिस्तूल आणि चार काडतूसं जप्त केली. या सोसायटीत राहणाऱ्या गोविंदसिंघ हरिसिंघ पुजारी याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई करत, त्याला अटक केली.
****
परभणी येथील शेकहँड फाऊंडेशन ही समाजातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांना उदरनिर्वाहाची साधनं उपलब्ध करून देतात. तसेच त्यांच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरवतात. वर्षभरात येणारे सण आणि महापुरूषांच्या जयंतीचे औचित्याने हा उपक्रम राबवला जातो. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे परभणीचे वार्ताहर –
रविवारी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणी तालुक्यातील आशाताई माने यांना दाळ बनवण्याची गिरणी देण्यात आली. यासंदर्भात फाऊंडेशनचे कार्यवाहक शरद बोहत म्हणाले “शेकहँड फाऊंडेशन हे विधवा ताईंसाठी काम करणारे फाऊंडेशन असून या फाऊंडेशन मार्फत प्रत्येक सण तसेच महापुरूंषांच्या जयंतीनिमित्त विधवा ताईंना उदरनिर्वाहाच�� साधन दिले जाते. आजपर्यंत १०० च्या वर महिलांना ही साधनं देण्यात आलेली आहेत. विविध जिल्ह्यांमधे याचं काम चालतं.” शेकहँड फाऊंडेशनचे कार्य समाजासाठी निश्चितच समाधानकारक होय.
आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर
****
जालना-मुंबई जनशताब्दी विशेष रेल्वे आज रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
****
मराठवाड्याच्या काही भागात कालही अवकाळी पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि परिसरात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात नायगाव तसंच मांजरम भागात, लातूर जिल्ह्याच्या कासार शिरशीसह परिसरात, हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तसंच औंढा तालुक्यात तर परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात काही भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे. नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या सायाळ इथले शेतकरी तुकाराम मोरताटे यांच्या अंगावर वीज पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या पावसामुळे आंबा तसंच ज्वारीवर परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांचीही काल पावसामुळे तारांबळ उडाली.
****
देशाचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील चंद्रा यांनी काल पदभार स्वीकारला. गेल्या वर्षी चंद्रा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती.
****
परभणी जिल्ह्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक उत्पादन विभागाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. विद्यापीठ निर्मित ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाचा खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा विश्वास कुलगुरू ढवण यांनी व्यक्त केला.
****
0 notes
webmaharashtra-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
स्पंदन' एक फ्रेश लव्हस्टोरी.. वेब महाराष्ट्र टीम : ती येते, ती रागावते, ती पाहते, ती दिसते, ती लाजते, ती खुणावते अन् इशाऱ्यातून होकारही देते. अशा मराठमोळ्या चेहऱ्याची लव्हस्टोरी असलेलं 'स्पंदन' हे मराठी गाणं नुकतंच नववर्षाच्या मुहूर्तावर यु ट्यूबवर रिलीज करण्यात आलंय. 'एसकेबी' युट्युब चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या या गाण्याला अल्पावधीतच हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात एक फ्रेश लव्हस्टोरी बघायला मिळतेय. गौरव घाटणेकर आणि ब्रिजेश्वरी शर्मा यांच्या प्रमुख भूमिकेत हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. गुढीपाडव्याचा सण आणि मराठी चाळीत राहणारे ते दोघे, त्यांची नजरा- नजर, ते इशारे तिला साडीत पाहून हरवलेला गौरव आणि त्यांचं इशाऱ्यातून जुळलेलं प्रेम ��शी सुरेख कथा दिग्दर्शित केली आहे, स्वप्नील भिसेकर यांनी.. ओंमकार पुंड यांचे छायांकन, विकास परदेशी यांचे स्वर, राहुल दुरगुंडे यांची संकल्पना, तर महेश मोंडे आणि प्रांजल शेवडे यांनी त्यांच्या स्वरांनी 'स्पंदन' प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे. गौरव आणि ब्रीजेश्वरीची ही फ्रेश लव्ह स्टोरी तुम्हालाही तुमच्या आयुष्यात असलेल्या 'तिची' किंवा 'त्याची' आठवण नक्कीच करून देईल.. तुम्हीही यांची फ्रेश लव्हस्टोरी नक्की पाहा..
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Vegetables Price Hike : पुण्यात भाज्यांचे दर वाढले; टोमॅटो, बटाटा, फ्लॉवर, शेवगा महाग
Vegetables Price Hike : पुण्यात भाज्यांचे दर वाढले; टोमॅटो, बटाटा, फ्लॉवर, शेवगा महाग
Vegetables Price Hike : पुण्यात भाज्यांचे दर वाढले; टोमॅटो, बटाटा, फ्लॉवर, शेवगा महाग एकीकडे करोनाचं संकट कमी झालं असलं तरी महागाईने डोकं वर काढल्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री आहे. अशात आता भाज्याही महाग झाल्या आहेत. काल गुढीपाडव्याचा सण झाल्याने मार्केट यार्डात शेतमालाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे आज भाज्यांचे भाव वधारले आहेत. एकीकडे करोनाचं संकट कमी झालं असलं तरी महागाईने डोकं वर…
View On WordPress
0 notes
kolambkar11 · 8 years ago
Photo
Tumblr media
#Repost @shubh_kadam with @repostapp ・・・ चैत्र हा मराठी नववर्षातील पहिला महिना. त्या महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. आज तुम्हाला ठीक ठिकाणी अनेक ढोल ताशा पथक दिसतील. हातात टिपरु, कमरेला ढोल, ताशाची तर्री आणि हतोडीला टोल. एक झिंग, एक बेभानपणा, एक वेगळाच जल्लोष. ह्याच गुढीपाडव्याचा शुभमुहूर्तावर रुद्रभैरव प्रतिष्ठानात सभासद नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. हाच जल्लोष, हेच वेड तुम्हाला अनुभवायचे असेल तर लवकरच खाली दिलेल्या क्रमांकांवर संपर्क करा. शुभम कदम - ८२६८४२५८३४ सर्वेश चेंदुरकर - ८६५५०४४६६२ #rudrabhairav #dholtasha #dhol #tasha #marathiculture #toll #vadak #dholtashapathak #faktdholtasha #naaddholtasha
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
मोदींकडून पाडव्याच्या मराठीत शुभेच्छा
मोदींकडून पाडव्याच्या मराठीत शुभेच्छा
मोदींकडून पाडव्याच्या मराठीत शुभेच्छा PM Modi Gudi Padwa Wishes : राज्य भरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान 2 वर्षांनंतर जल्लोषात यावर्षी गुढीपाडवा साजरा केला जात आहे, त्यामुळे आजचा दिवस खास असून आहे कारण यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मात्र, यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने…
View On WordPress
0 notes
yugandhale · 5 years ago
Photo
Tumblr media
🙏हिंदू नव वर्षाच्या व गुढीपाडव्याचा खूप खूप शुभेच्छा💐💐💐मी #yugandhale ✌️#amolandhale 😍 (at Narayangaon) https://www.instagram.com/p/B-I1ZjrFlWs/?igshid=129jv5gxsblj1
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 March 2020 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २५ मार्च २०२० दुपारी १.०० वा. **** जीवनावश्यक वस्तू तसंच पशूखाद्याचा पुरेसा साठा राज्यात उपलब्ध असल्याने, नागरिकांनी काळजी करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमातून जनतेशी बोलत होते. हातावर पोट असलेल्या किमान कर्मचाऱ्यांचं वेतन उद्योजक तसंच व्यावसायिकांनी थांबवू नये, असं मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं. शेतीची कामं तसंच जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकानं बंद राहणार नाहीत, मात्र नागरिकांनी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी एकट्याने जावे, गर्दी करू नये, या आवाहनाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या संकटावर मात करून विजयाचा संकल्प करूया, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. **** केंद्रीय गृह मंत्रालयाने खासगी सुरक्षा रक्षकांच्या संस्थांना कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत सुरक्षा रक्षकांचे पगार कापू नये असे सांगितले आहे. दुकाने, ���ॉल आणि इतर आस्थापना बंद पडल्यामुळे खासगी सुरक्षा संस्थांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. खासगी सुरक्षा उद्योगाला मानवी दृष्टिकोनातून बघावे. त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्यावे असंही त्यात म्हटलं आहे. **** दरम्यान, महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता एकशे बारा झाली आहे. काल इस्लामपूर इथं पाच नवीन रूग्ण आढळले. पुण्यातल्या दोन कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे आज सुटी देण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक गावांनी ग्रामपंचायतीमध्ये गावबंदीचा निर्णय घेतला आहे. गावाच्या वेशीवरच रस्ता बंद करण्यात आला असून गावातला माणूस बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा माणूस गावात येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे . दरम्यान या परिस्थितीत नागरिकांच्या वैद्यकीय किंवा वैयक्तिक आपत्कालीन ��वश्यकतेसाठी हिंगोली जिल्हा पोलिसांनी आपत्कालीन कक्षाची स्थापना केली आहे. अपरिहार्य कारणास्तव स्वाक्षरीकृत आणि शिक्का मारलेला परवानगी फॉर्म व्हॉट्सअॅ पवर पाठवण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली आहे. **** सोशल डिस्टन्सिंग अर्थात समाजाशी सुरक्षित अंतर राखण्याचा नियम आज बहुतांश ठिकाणी काटेकोरपणे पाळला जात असल्याचं दिसून येत आहे. अनेक शहरांमध्ये दैनंदिन गरजेचं वाणसामान तसंच भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना दुकानदारांनी दुकानासमोर आखून दिलेल्या वर्तुळांमध्ये उभं राहून खरेदी करावी लागली. औरंगाबाद शहरात अनेक छोट्या दुकानांसमोरही ग्राहकांसाठी वर्तुळं आखून ठेवली आहेत. सोयगाव तालुक्यातल्या फर्दापूर इथं पोलिसांनी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर गर्दी वाढू नये म्हणून दुकांनाबाहेर विशिष्ट अंतरावर वर्तुळ आखून नियोजन आहे. सिल्लोड तालुक्यातल्या शिवना इथं भरलेला आठवडी बाजार पोलिसांनी बंद केला. नांदेड शहरात भाजीविक्रेत्यांनीही अशाच प्रकारे आखून दिलेल्या चौकटीत उभं राहून ग्राहकांनी भाजीपाला खरेदी केला. परभणी इथं भाजीपाला तसंच गुढीपाडव्यानिमित्त आवश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी तुरळक गर्दी केली होती. लातूर इथं किराणा, भाजीपाला, फळ, दूध, बेकरी, मांस, आदी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांनी ग्राहकांना घरपोहोच सेवा देण्याचं आवाहन लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे. यासाठी दुकानदारांना ओळखपत्र दिलं जाईल, तसंच त्यांच्या वाहनांना वाहतुकीची विशेष परवानगी दिली जाईल, असं महापौरांनी सांगितलं आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. नागरिकांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केलं आहे. **** सांगली जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही विनाकारण गर्दी करणाऱ्या नागरिकांवर बळाचा वापर केला होता. मात्र यानंतर जिल्ह्यातल्या नागरिकांनी शिस्तीचं पालन करत रांगेत उभं राहून भाजी खरेदी केली आहे. सांगली महापालिकेच्या क्षेत्रात सोळा भाजी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. **** चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण आज सर्वत्र साजरा होतो आहे. हिंदू कालगणनेनुसार आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. नागरिकांनी आज आपल्या घरावर गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं. कोरोना प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू असल्याने, साधेपणानं सण साजरा होत आहे. **** गुढीपाडव्यानिमित्त धुळ्यातल्या ग्रामदैवत श्री एकवीरा देवी माता मंदिरात पारंपारिक रितीरिवाजानुसार ��ेवीचे पूजन आणि इतर धार्मिक विधी पुजाऱ्यांकडून करून घेण्यात आले. तसंच गुढी उभारून मंदिरावर नवीन ध्वजही चढवण्यात आला. कोरोना प्रतिबंधक उपायांमुळे लॉक डाऊन सुरू असल्यानं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २५ मार्च २०२० सकाळी ११.०५ वाजता
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण आज सर्वत्र साजरा होतो आहे. हिंदू कालगणनेनुसार आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. नागरिकांनी आज आपल्या घरावर गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं. कोरोना प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू असल्याने, साधेपणानं सण साजरा होत आहे. पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास चाफा, गुलाब, तुळशी आणि मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि चा��गले आरोग्य घेउन येईल. अशी भावना त्यानी व्यक्त केली. तसंच कोविड -१९ सारख्या संकट काळात जनता हा उत्सव साजरा करत आहे. या उत्सवात पारंपारिक उत्साह जरी दिसत नसला तरी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा संकल्प नक्कीच दृढ होईल. जनतेनं एकत्र येऊन कोरोनाविरूद्ध हा लढा असाच सुरू ठेवावा अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यातील रजापूर गावात गुडीपाडव्याच्या दिवशी नवसाच्या बारागाड्या ओढण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांकडून ही प्रथा आज रद्द करण्यात आली. तसंच गावात बाहेर गावच्या लोकांना प्रवेश बंद केला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक गावांनी ग्रामपंचायतीमध्ये गावबंदीचा निर्णय घेतला आहे. गावाच्या वेशीवरच रस्ता बंद करण्यात आला असून गावातला माणूस बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा माणूस गावात येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. दरम्यान या परिस्थितीत नागरिकांच्या वैद्यकीय किंवा वैयक्तिक आपत्कालीन आवश्यकतेसाठी हिंगोली जिल्हा पोलिसांनी आपत्कालीन कक्षाची स्थापना केली आहे. अपरिहार्य कारणास्तव स्वाक्षरीकृत आणि शिक्का मारलेला परवानगी फॉर्म व्हॉट्सअॅ पवर पाठवण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली आहे. **** बाळापूर पोलिसांनी आज सकाळी नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या आखाडा बाळापूर सीमेवर ��थसंचलन करून जमलेली गर्दी आटोक्यात आणली. मात्र, यानंतर कोणी रस्त्यावर येण्याचा प्रयत्न केल्यास बळाचा वापर करण्याचा इशाराही पोलिसांतर्फे देण्यात आला आहे. ****
0 notes