#गुजरातला
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 1 month ago
Text
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला अन गुजरातची ईव्हीएम मशीन महाराष्ट्रात , पुन्हा प्रश्नचिन्ह ?
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला अन गुजरातची ईव्हीएम मशीन महाराष्ट्रात , पुन्हा प्रश्नचिन्ह ?
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरलेली असून सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून आश्चर्यकारकरीत्या भाजप समोर आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून आलेल्या असून भाजप , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांनी एकत्रितरित्या ही निवडणूक महाविकास आघाडीच्या विरोधात लढवलेली होती. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १० नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला वेग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड आणि अकोल्यात सभा • भाजप तसंच महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार • मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार • मराठवाडा सा��ित्य परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचा विजय • बीड आणि हिंगोली इथं गृह मतदानाला सुरुवात आणि • मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला आता वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद राज्यभरात होत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल अकोला आणि नांदेड इथं सभा झाल्या. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नऊ मतदार संघातले उमेदवार आणि लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोदी यांनी, मराठवाडयाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना तर विदर्भासाठी नदी जोड योजना महायुती सरकारच राबवू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. अकोला इथं झालेल्या सभेत त्यांनी, एक है तो सुरक्षित है, हा नारा पुन्हा एकदा दिला. राज्य आणि केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन मोदी यांनी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा, घराणेशाहीचा आरोप केला.
एक है तो सुरक्षित है आणि कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा देऊन भाजप फुटीरतावादी राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. ते काल नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरच्या मिहान मध्ये आलेला एअरबस चा प्रकल्प हा गुजरातला पळवण्यात आला, अशी टीका त्यांनी केली. अमरावतीच्या तिवसा इथं काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारसभेला, तसंच उत्तर नागपुरात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचारसभेला खरगे यांची संबोधित केलं.
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. त्यांच्या आज जळगाव, बुलडाणा आणि अमरावती याठिकाणी प्रचारसभा देखील होणार आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील आज मुंबईत महाविकास आघाडीचं घोषणापत्र जारी करणार आहेत. काँग्रेसचे सचिव के सी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यावेळी उपस्थित असतील.
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे, औरंगाबाद मध्यचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे संजय शिरसाठ यांच्या प्रचारार्थ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. मराठवाड्यातल्या पहिल्या पिढीने दुष्काळ पाहिला मात्र पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान, शिरसाट यांच्या प्रचारार्थ अभिनेते गोविंदा काल शहरात आले होते. यावेळी रॅली काढण्यात आली. परभणी इथले महायुतीचे शिवसेना उमेदवार आनंद भरोसे आणि जिंतूरच्या भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ परभणी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतली. युती सरकर दहा कलमी योजना राबवणार असून, राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात जास्त अधिकार लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि शेतकऱ्यांचा असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्रात यावेळी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची आणि उमेदवारांची संख्या जास्त असून त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. काल एका वृत्तवाहिनीला ते मुलाखत देत होते. शरद पवार यांनी हिंगोली इथं तसंच बीडमध्ये परळी आणि आष्टी इथल्या सभांनाही काल संबोधित केलं.
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, कंधार इथं शिवसेन��� उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल सभा घेतली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका त्यांनी केली. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं देखील ठाकरे यांनी जनसभेला संबोधित केलं. जालना इथं काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. त्यानंतर पटोले यांची छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व चे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ सभा झाली.
एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगाबाद मध्य आणि पूर्व मतदारसंघात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. हर्सूल परिसरात त्यांनी जनसभेला संबोधित केलं.
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून, मतदान करण्यासाठी, मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड, पारपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र आदींचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगानं क��वलं आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते विजय पाटकर यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
मराठवाडा साहित्य परिषद - मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचे सर्व २२ सदस्य बहुमतानं विजयी झाले. या पॅनलच्या विरोधात डॉ. सर्जेराव जिगे यांच्या परिवर्तन मंचाचे १५ उमेदवार उभे होते. काल छत्रपती संभाजीनगर इथं परिषदेच्या कार्यालयात मतमोजणी पार पडली. येत्या पंधरा दिवसांत कार्यकारी मंडळाची बैठक होवून पदाधिकारी निवडले जाणार आहेत. आपण सहाव्यांदा ही निवडणूक जिंकलो असून, आता मराठवाड्यातला वा.ड्मयीन इतिहास लिहून तो प्रकाशित करण्याच्या उपक्रमासह मराठवाड्यातल्या मराठी भाषेच्या शब्दकोष निर्मितीचं काम केलं जाणार असल्याचं प्राचार्य ठाले पाटील यांनी सांगितलं.
बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला काल सुरुवात झाली. ८५ वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण ३०७ नागरीक गृह मतदान करणार असून, आजपर्यंत हे मतदान चालेल. यासाठी एकूण २२ पथकं नेमण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान सुरु झालं असून, यासाठी १८ पथकं रवाना करण्यात आली आहेत.
नांदेड इथं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा काल श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, सर्व महिलांनी मतदान केलं पाहिजे, अशा आशयाचे संदेश या माध्यमातून देण्यात आले. त्याबरोबरच सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी उभारण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करत मतदानाची शपथ दिली.
लातूर ग्रामीणचे निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मतदान जनजागृतीच्या पथकाने गावात गृहभेटी देवून मतदार जागृतीस सुरुवात केली आहे. या अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करुन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जालना जिल्ह्यात ज्या गावांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती, अशा भागात, विशेष फेरी काढून, मतदान संकल्प पत्राचं वाचन कर���न मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. याअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे यांच्या मार्गदर्शनातून, अंतरवाली सराटी, नालेवाडी वाळकेश्वर, शहागड, महाकाळा अंकुशनगर कारखाना, वडीगोद्री, शहापूर आणि दाडेगाव या गावांमध्ये, शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीनं फेरी काढण्यात आली.
स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी परभणी येत्या १४ तारखेला जिल्हास्तरीय मॅरेथॉनचं, तर १७ तारखेला सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात एक हजार ५२३ मतदान केंद्रावर १४ लाख चार हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांव्यतिरिक्त सैन्य दलात कार्यरत असलेले जिल्ह्यातले दोन हजार ६१२ मतदार ऑनलाईन पद्धतीने मतदान करणार आहेत.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम २०२४-२५ साठी मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र हिंगोली जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. या केंद्रावर ७ जानेवारी पर्यंत मूग आणि उडीद तर १२ जानेवारी पर्यंत सोयाबीन खरेदी सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या केंद्रावर संपर्क करुन नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकार्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी मुग,उडीद आणि सोयाबीन केंद्रावर जावून नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकार्यांनी केलं आहे.
धाराशिव इथल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याची ३१ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. याठिकाणी ३०० तज्ञ डॉक्टर उपलब्ध असलेले सुसज्ज आणि सर्वात मोठे वैद्यकीय संकुल उभारण्याचं काम हाती घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
0 notes
news-34 · 3 months ago
Text
0 notes
automaticthinghoagiezine · 5 months ago
Video
youtube
जुन्नरचे बिबटे गुजरातला पाठवले अजित पवारांचा टोला
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
विट्यातील श्रीनाथाष्टमी उत्सवातील प्रसिद्ध गणेश हत्ती गुजरातला पाठवणार
https://bharatlive.news/?p=185873 विट्यातील श्रीनाथाष्टमी उत्सवातील प्रसिद्ध गणेश हत्ती गुजरातला ...
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
'... तर महाराष्ट्र पेटवू'; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
Tumblr media
रत्नागिरी | बारसू (Barsu) रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. सोलगावात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत असताना एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. वेळेला बारसू (Barsu) येथील प्रकल्प गुजरातला घेऊन जा आणि आमचा गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा आणून द्या असं आवाहन करत बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार नाही, अ���ा इशारा दिला.
Tumblr media
एकूणच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बारसू (Barsu) येथील रिफायनरीला विरोध कायम असून ग्रामस्थांच्या भूमिकेला सरकारचा पाठिंबा असल्याचं जाहीर करत कुठल्याही परिस्थिती हा प्रकल्प होऊ देणार नाही. येथील शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे नुकसान होऊ देणार नाही अन्यथा पेटवून टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपण मुख्यमंत्री असताना दिलेल्या पत्राच्या संदर्भातही माहिती देत शिवसेना कोकण वासियांच्या बरोबर असल्याचं म्हटलं आहे. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
महाराष्ट्रातले घरकुल गुजरातला पळवले : आ.नाना पटोले | नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार
महाराष्ट्रातले घरकुल गुजरातला पळवले : आ.नाना पटोले | नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार
अर्जुनी-मोरगाव : भाजपमध्ये अंधार आहे, तो पुढे येत नाही. इंग्रजांनी जे राज्य केलं तसे काम भाजप करत आहे. देशात कोणीच सुखी नाही. बेरोजगार देशोधडीला लागले आहेत. शेतकरी आत्महत्या होत आहेत. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. नोकरीचे गाजर दाखवले जाते, पण नोकरी मिळत नाही. ओबीसींचे प्रश्न जैसे थे आहेत. जातीनिहाय जनगणना झालीच नाही. महाराष्ट्रातले घरकुल गुजरातला पाठवले जातात, असे आरोप महाराष्ट्र प्रदेश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
अल्पवयीन मुलीसोबत फरार आरोपीला गुजरातला जाऊन उचलले
अल्पवयीन मुलीसोबत फरार आरोपीला गुजरातला जाऊन उचलले
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या एका आरोपीला मिरजगाव पोलिसांनी गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, वैभव प���शुराम सातपुते ( राहणार कोकणगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर ) याने परिसरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते त्यानंतर त्याने तिला घेऊन पलायन केले आणि पोलिसात तक्रार दाखल झाली. पोलीस तपास सुरू असताना आरोपी या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
अल्पवयीन मुलीसोबत फरार आरोपीला गुजरातला जाऊन उचलले
अल्पवयीन मुलीसोबत फरार आरोपीला गुजरातला जाऊन उचलले
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या एका आरोपीला मिरजगाव पोलिसांनी गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, वैभव परशुराम सातपुते ( राहणार कोकणगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर ) याने परिसरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते त्यानंतर त्याने तिला घेऊन पलायन केले आणि पोलिसात तक्रार दाखल झाली. पोलीस तपास सुरू असताना आरोपी या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
अल्पवयीन मुलीसोबत फरार आरोपीला गुजरातला जाऊन उचलले
अल्पवयीन मुलीसोबत फरार आरोपीला गुजरातला जाऊन उचलले
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या एका आरोपीला मिरजगाव पोलिसांनी गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, वैभव परशुराम सातपुते ( राहणार कोकणगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर ) याने परिसरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते त्यानंतर त्याने तिला घेऊन पलायन केले आणि पोलिसात तक्रार दाखल झाली. पोलीस तपास सुरू असताना आरोपी या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
तर अरबी समुद्राला देखील हे अडाणीचे नाव देतील , कोणी केली खरमरीत टीका ? 
महायुतीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेले रिपोर्ट कार्ड हे रिपोर्ट कार्ड नाही तर सर्वकाही गुजरातला पाठवल्याचे डीपोर्ट कार्ड आहे अशी खरमरीत टीका शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे.  पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सत्तेत आली तर आधीच्या सगळ्या योजना बंद होतील अशी भीती व्यक्त केलेली होती मात्र आदित्य ठाकरे यांनी केवळ भ्रष्टाचारासाठी काढण्यात आलेल्या…
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
• विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड आणि अकोल्यात सभा, मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना महायुतीचं सरकारच आणेल असा विश्वास • भाजप फुटीरतावादी राजकारण करत असल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप • मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार • सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या अधिकृतपणे निवृत्त होणार, न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार पदभार आणि • बीड, हिंगोली तसंच नाशिक इथं गृह मतदानाला सुरुवात
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून, विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद आज राज्यभरात होत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज राज्यात अकोला आणि नांदेड इथं सभा झाल्या. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नऊ मतदार संघातले उमेदवार आणि लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोदी यांनी, मराठवाडयाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना तर विदर्भासाठी नदी जोड योजना महायुती सरकारचं राबवू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. अकोला इथं झालेल्या सभेत त्यांनी, एक है तो सुरक्षित है, हा नारा पुन्हा एकदा दिला. महाराष्ट्रानं २०१४ ते २०२४ अशी दहा वर्षं भाजपला सातत्यानं संधी दिली, महाराष्ट्रवासीयांची देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी यातून दिसते, असं ते म्हणाले. राज्य आणि केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन मोदी यांनी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा, घराणेशाहीचा आरोप केला.
****
एक है तो सुरक्षित है आणि कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा देऊन भाजप फुटीरतावादी राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरच्या मिहान मध्ये आलेला एअरबस चा प्रकल्प हा गुजरातला पळवण्यात आला, अशी टीका त्यांनी केली. तत्पूर्वी, खरगे यांनी नागपुरातल्या दीक्षाभूमीला भेट देऊन, डॉ. आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला आदरांजली वाहिली. अमरावतीच्या तिवसा इथं काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारसभेला त्यांनी संबोधित केलं, उत्तर नागपुरात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या प्राचारार्थ खरगे यांची आज सभा होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे, औरंगाबाद मध्यचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा शहराच्या बजरंग चौकात होत आहे. परभणी इथले महायुतीचे शिवसेना उमेदवार आनंद भरोसे आणि जिंतूरच्या भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ परभणी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतली. युती सरकार दहा कलमी योजना राबवणार असून, राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात जास्त अधिकार लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि शेतकऱ्यांचा असल्याचं ते म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, कंधार इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका त्यांनी केली. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं देखील ठाकरे यांनी जनसभेला संबोधित केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड इथं परळी विधानसभा मतदारसंघातले महाविकास आगाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. जालना इथं काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. त्यानंतर पटोले यांची छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्वचे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ सभा झाली.
****
एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज औरंगाबाद मध्य आणि पूर्व मतदारसंघात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. हर्सूल परिसरात ओवैसी जनसभेला संबोधित करणार आहेत.
****
सत्याला नेहमीच असत्याशी सामना करावा लागतो, महाराष्ट्राप्रमाणेच हिमाचल प्रदेशनेही ऑपरेशन कमळचा सामना केला पण जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली, अशी माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यावेळी उपस्थित होते. काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेश��त जाहीर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत, अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातल्या जनतेची दिशाभूल केली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
नाशिक- चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघातले भाजपचे बंडखोर केदा आहेर आणि आत्माराम कुंभार्डे या दोघांची पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपाने मालेगाव बाह्य मधले बंडखोर कुणाल सूर्यवंशी, बागलाणमधले आकाश साळुंखे आणि जयश्री गरुड या तिघांची हकलपट्टी केली होती.
****
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून, मतदान करण्यासाठी, मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड, पारपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र आदींचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे.
****
राज्यात येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते विजय गोखले यांनी केलं आहे. बाईट – विजय गोखले
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या रविवारी अधिकृतपणे निवृत्त होणार आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा काल न्यायालयात शेवटचा दिवस होता. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या निकालांमध्ये अयोध्या जमीन वाद, दोन प्रौढांनी सहमतीने ठेवलेल्या समलिंगी संबंधांना मान्यता आणि अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार यांचा समावेश आहे. त्यांचे हे निर्णय समाज आणि राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे होते.
****
देशभरात आज राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा केला जात आहे. नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी, आणि समाजातल्या वंचित घटकांसह सर्व नागरिकांना न्याय प्रक्रियेचा लाभ मिळावा, हा यामागचा उद्देश आहे. नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत शिक्षण देण्यासाठी तसंच विविध प्रकल्प आणि योजनांच्या माध्यमातून विवाद निवारण यंत्रणा मजबूत करुन अधिकन्याय्य समाजाची निर्मिती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
****
बीड विधानसभा मतदारसंघात आजपासून गृह मतदानाला सुरुवात झाली. ८५ वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण ३०७ नागरिक गृह मतदान करणार असून, उद्यापर्यंत हेमतदान चालेल. यासाठी एकूण २२ पथकं नेमण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान सुरु झालं असून, यासाठी १८ पथकं रवाना करण्यात आली आहेत. नाशिक विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान होत असून, आज पहिल्या दिवशी सुमारे शंभराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केलं.
****
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात नवडणे शिवारातल्या एका शेतात धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीवरुन केलेल्या कारवाईत ६७ लाख २० हजार रुपये किमतीचा मद्यसाठा पकडला ��हे.
****
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
अल्पवयीन मुलीसोबत फरार आरोपीला गुजरातला जाऊन उचलले
अल्पवयीन मुलीसोबत फरार आरोपीला गुजरातला जाऊन उचलले
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या एका आरोपीला मिरजगाव पोलिसांनी गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, वैभव परशुराम सातपुते ( राहणार कोकणगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर ) याने परिसरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते त्यानंतर त्याने तिला घेऊन पलायन केले आणि पोलिसात तक्रार दाखल झाली. पोलीस तपास सुरू असताना आरोपी या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 2 years ago
Video
youtube
Aaditya Thackeray : गुजरातचं नशिब बघा, केंद्राकडून गुजरातला सगळं मिळतंय ...
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
जपान सोडा गुजरातला गेलेले उद्योगआधी परत आणा; उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर खोचक टिका
https://bharatlive.news/?p=128692 जपान सोडा गुजरातला गेलेले उद्योगआधी परत आणा; उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर ...
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
अल्पवयीन मुलीसोबत फरार आरोपीला गुजरातला जाऊन उचलले
अल्पवयीन मुलीसोबत फरार आरोपीला गुजरातला जाऊन उचलले
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या एका आरोपीला मिरजगाव पोलिसांनी गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, वैभव परशुराम सातपुते ( राहणार कोकणगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर ) याने परिसरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते त्यानंतर त्याने तिला घेऊन पलायन केले आणि पोलिसात तक्रार दाखल झाली. पोलीस तपास सुरू असताना आरोपी या…
Tumblr media
View On WordPress
0 notes