#गर्दीमुळे
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
गर्दीमुळे महिलेने केला एसी लोकलच्या मोटरमन केबिनमधून प्रवास, पहा व्हायरल व्हिडिओ
गर्दीमुळे महिलेने केला एसी लोकलच्या मोटरमन केबिनमधून प्रवास, पहा व्हायरल व्हिडिओ
गर्दीमुळे महिलेने केला एसी लोकलच्या मोटरमन केबिनमधून प्रवास, पहा व्हायरल व्हिडिओ एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. वेर्स्टन लाईनवर एसी लोकलला चांगलीच डिमांड आहे. दिवसेंदिवस एसी लोकलमधील गर्दी देखील वाढत आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये महिला चक्क एसी लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये चढून प्रवास करायला लागली.   बोरिवली स्थानकावर सकाळी 8.30 च्या सुमारास ही महिला…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 05 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ मार���च २०२४ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर असून, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते अकोल्याहून छत्रपती संभाजीनगर इथं येतील. सव्वा सहा वाजता क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. रात्री आठ वाजेच्या सुमारास ते दिल्लीला रवाना होतील.
दरम्यान, अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सभेसाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे शहरात वाहतुकीमध्ये आज रात्री १२ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळीबाग चौक, आयटीआय ते खडकेश्वर टी पॉईंट, मिल कॉर्नर ते खडकेश्वरमार्गे महात्मा फुले चौक हे रस्ते बंद राहणार असून, संध्याकाळच्या सुमारास क्रांती चौकातली वाहतुकही तीन तास बंद असेल.
****
फोनद्वारे आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरोधात नागरीकांच्या मदतीसाठी, चक्षू या सुविधेचा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ केला. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट संचारसाथी डॉट जिओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर नागरीकांना आपली तक्रार नोंदवता येईल, असं त्यांनी सांगितलं. संचारसाथी अंतर्गत एक हजार कोटी रुपयांची रक्कम फसवणुकीतून वाचली आहे, तर एक कोटी सीमकार्ड ब्लॉक करण्यात आल्याचं ते म्हणाले.
****
वस्तु आणि सेवा कर विभागाच्या नवी मुंबई आयुक्तालयानं ८८ कोटी रुपयांच्या करचोरीप्रकरणी मुंबईतल्या एका कंपनीच्या प्रमुखाला अहमदाबाद इथून अटक केली आहे. मेसर्स फुडलिंक एफ ॲण्ड बी होल्डिंग्ज इंडिया प्रायवेट लिमिटेड या कंपनीच्या प्रमुखाने अंदाजे ४९२ कोटी रुपयांच्या पावत्या जारी केल्या नसल्याचं निदर्शनास आलं. या आरोपीला न्यायालयानं १२ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात कंपनीच्या वित्त नियंत्रकाला डिसेंबर २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती.
****
मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरका��ने सुरु केलेल्या "लेक लाडकी" योजनेअंतर्गत १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. याबाबत  जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय आणि तालुका स्तरावर शिबिरं आयोजित करुन, एक एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येत असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
काँग्रेसच्या सत्ताकाळात ६५ वर्षांमध्ये जे परिवर्तन झालं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षाच्या कारकिर्दीत झालं, असं भाजपाचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं आयोजित नमो युवा महासंमेलनात बोलत होते. युवा सन्मानानं जगू शकेल अशी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे, असं ते म्हणाले.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्य��त येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १२ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यु डॉट ॲडमिन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, अथवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर या पत्यावर पाठवावे.
****
वर्धा जिल्हयात काल झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमध्ये राज्य शासनासोबत विविध गुंतवणूकदारांकडून ३८ सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यात तीन हजार ३४ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाईल. यामधून साडेसात हजाराच्यावर रोजगार निर्मिती होणार असल्याचं, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कमलेशकुमार जैन यांनी सांगितलं. उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणं हा या परिषदेचा उद्देश आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात टपाल विभागाच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून महिला सन्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजनेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण योजनेची माहिती देणं, पात्र लाभार्थांना नवीन खाते उघड���न देणं आदी कामं करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातल्या सर्व महिलांनी या योजनांचा लाभ ��ेण्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
भारतीय पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघानं ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरत इतिहास रचला आहे. जागतिक क्रमवारीच्या निकषानुसार पहिल्यांदाच दोन्ही संघ यावर्षी पॅरिस इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. दोन संघांसोबतच या स्पर्धेत चार वैयक्तिक जागांसाठीही टेबल टेनिसपटू पात्र ठरले आहेत.
****
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रावर मोठं संकट; धक्कादायक माहिती समोर
Tumblr media
Photo Credit: Pixabay image मुंबई | दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घातलं. आता कुठे कोरोना आटोक्यात आला असं वाटत असताना सर्वांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोना नवा व्हेरिएंट सापडला आहे. महाराष्ट्रात कोव्हिडचा बी बी सब-व्हेरिएंट (XBB sub variant)चाही रुग्ण सापडला आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. दिवाळीच्या गर्दीमुळे दिवाळी आधी आणि नंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोव्हिड झालेल्यांच्या संख्येतील वाढ आणि घट गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. जोपर्यंत नवा व्हेरिएंट येत नाही. तोपर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग कमी राहील. कोरोनामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. पण सावध राहिलं पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावला पाहिजे. जर कुटुंबात कोणी आजारी असेल तर त्याला मास्क लावायला सांगा. कुणाची इम्युनिटी कमी असेल तरीही त्याला मास्क लावायला सांगा, असं कोव्हिड टास्क फोर्सचे माजी सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं. डॉ. पंडित यांनी आजतकशी संवाद साधला होता. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
2 जन्माष्टमीच्या गर्दीत मथुरा मंदिरात गुदमरून मृत्यू
2 जन्माष्टमीच्या गर्दीत मथुरा मंदिरात गुदमरून मृत्यू
बांके बिहारी मंदिरात मध्यरात्री उत्सव सुरू असताना ही घटना घडली. नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील मथुरा येथील एका मंदिरात जन्माष्टमी उत्सवादरम्यान झालेल्या गर्दीमुळे किमान दोन जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. बांके बिहारी मंदिरात मध्यरात्री उत्सवादरम्यान ही घटना घडली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. “जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर, भाविकांच्या संख्येत अचानक वाढ झाली. आरतीच्या वेळी…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
काबूल विमानतळावर 220 भारतीय अडकले
काबूल विमानतळावर 220 भारतीय अडकले
नवी दिल्ली -प्रतिनिधी अफगाणिस्तानचा तालिबानकडून पाडाव झाल्यानंतर तेथे अराजकतेची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. देश सोडून जाण्यासाठी अनेक नागरिकांची धडपड सुरु आहे. काबूल विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येत आहे. गर्दीमुळे भारतीयांना विमानतळात जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे काबूल विमानतळावर 220 भारतीय अडकले आहेत. तालिबानने भारताच्या वाणिज्य दूतावासात केला प्रवेश,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
भारताला बेवकूफ बनविण्यासाठी गेले होते, आता ड्रॅगन त्याच्या स्वत: च्या लोकांच्या नजरेत पडला, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
भारताला बेवकूफ बनविण्यासाठी गेले होते, आता ड्रॅगन त्याच्या स्वत: च्या लोकांच्या नजरेत पडला, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
अकरा जि��पिंग चीनमध्ये जन्मलेली कोरोना आता इतकी विशाल झाली आहे की संपूर्ण जगाचा नाश करण्याचा त्यांचा हेतू आहे. कालपर्यंत, या विषाणूमुळे लोकांच्या गर्दीमुळे गोंधळ होत असलेले रस्ते नष्ट झाले आहेत. कालपर्यंत ज्यांना हसू आले त्यांचे चेहरे कायम राहिले. आज तेच चेहरे शांत झाले आहेत. चीनमधील वुहान शहरातून जेव्हा कोरोना पहिल्यांदाच संपूर्ण जगावर विनाश करीत होती तेव्हा प्रत्येकजण थक्क झाला होता. त्या वेळी,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indialegal · 4 years ago
Text
Sanjay Rathod Pohradevi Rally: Sharad Pawar Upset Over Forest Minister Sanjay Rathod Rally At Pohradevi Fort - राठोड समर्थकांच्या गर्दीमुळे पवार नाराज | Maharashtra Times
Sanjay Rathod Pohradevi Rally: Sharad Pawar Upset Over Forest Minister Sanjay Rathod Rally At Pohradevi Fort – राठोड समर्थकांच्या गर्दीमुळे पवार नाराज | Maharashtra Times
म. टा. प्रतिनिधी, मुंबई पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाद आणि आरोपांचा सामना करणारे शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे चौफेर टीका आणि संताप व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मुंबई एअरपोर्टने नव्या गाइडलाइन्स जारी, विमानतळावर प्रवाशांनी साडेतीन तास अगोदर पोहोचा
मुंबई एअरपोर्टने नव्या गाइडलाइन्स जारी, विमानतळावर प्रवाशांनी साडेतीन तास अगोदर पोहोचा
मुंबई एअरपोर्टने नव्या गाइडलाइन्स जारी, विमानतळावर प्रवाशांनी साडेतीन तास अगोदर पोहोचा मुंबई एअरपोर्टने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर साडेतीन तास अगोदर पोहोचावे लागले, तर देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांना अडीच तास आधीच पोहोचावं लागणार आहे. विमान प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीमुळे मुंबई विमानतळ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विमानतळावर होणाऱ्या गर्दीचा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 05 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लाचखोर लोकप्रतिनिधींचं कायद्याचं संरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर दाखल;आज सायंकाळी जाहीर सभा
महाविकास आघाडीचं राज्यातल्या ४० जागांचं वाटप निश्चित-बाळासाहेब थोरात यांची माहिती
आणि
जालना ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस शुक्रवारपासून हिंगोलीतून सुटणार
****
लाचखोर लोकप्रितिनिधींचं कायद्याचं संरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्य���य संविधानपीठानं काल या संदर्भात १९९८ मधे दिलेला निवाडा रद्दबातल ठरवला. त्यामुळे आता संसद किंवा विधीमंडळात पैसे घेऊन मतदान करणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. यामुळे राजकारणातला भ्रष्टाचार निपटून काढायला मदत होईल, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी काल रात्री छत्रपती संभाजीनगर इथं दाखल झाले. आज सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून ते अकोल्याकडे रवाना होतील. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते पुन्हा छत्रपती संभाजीनगर इथं येतील. सव्वा सहा वाजता क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. रात्री आठ वाजेच्या सुमारास ते दिल्लीला रवाना होतील.
दरम्यान, अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सभेसाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे शहरात वाहतुकीमध्ये आज दुपारपासून रात्री १२ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळीबाग चौक, आयटीआय ते खडकेश्वर टी पॉईंट, मिल कॉर्नर ते खडकेश्वरमार्गे महात्मा फुले चौक हे रस्ते या काळात बंद राहणार आहेत. संध्याकाळच्या सुमारास क्रांती चौकातली वाहतुकही तीन तास बंद राहणार आहे. सभेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्यांसाठी स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांनी शहर परिसरात नो ड्रोन झोन प्रतिबंधक आदेशही लागू केले आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल अदिलाबादहून नांदेडमार्गे चेन्नईला रवाना झाले. नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळावर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार अजित गोपछडे यावेळी उपस्थित होते.
****
शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. वाशिम इथं बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्राचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. हे केंद्र स्थानिक शेतीमालाचं विपणन आणि मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यात विविध विकासकामांचं भूमिपूजनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटला आहे, जवळपास ४० जागांवरील वाटप निश्चित झालं असून, फक्त चार जागावाटपाचा प्रश्न राहीला असल्याची माहिती, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. ते काल नंदुरबार इथं बोलत होते. उर्वरित जागांसंदर्भात येत्या आठवड्यात उमेदवार जाहीर केले जातील, असं त्यांनी सांगितलं. निवडणुकीच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीसोबत बैठका आणि चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, येत्या १२ मार्च प��सून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. १२ तारखेला त्यांची राज्यातली पहिली सभा नंदुरबारमध्ये होणार आहे.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण काल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं. इगतपुरी इथं झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. या लोकार्पणामुळे एकूण ७०१ किलोमीटरपैकी, ६२५ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध झाला आहे.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. यावेळी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन चित्रपट, नाट्य लेखक - दिग्दर्शक प्रतिमा कुलकर्णी यांनी केलं आहे.
बाईट - प्रतिमा कुलकर्णी
छत्रपती संभाजीनगर इथली नवमतदार सानिका धर्माधिकारी हिने मतदान करण्याचा संकल्प केला,
बाईट - सानिका धर्माधिकारी
****
ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाच्या उपलब्धतेतून सक्षम देश उभारणीचा पाया घालणं आवश्यक असल्याचं, राज्याचे मृद संधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात विद्यार्थ्यांशी बोलत होते. नांदेड नजिक विष्णुपुरी इथल्या ग्रामीण टेक्नीकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस तसंच कंधार इथल्या तांत्रिक आणि कृषी महाविद्यालयाला राठोड यांनी काल भेट दिली.
****
जालना ते मुंबई धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस आता हिंगोली इथून धावणार आहे. हिंगोलीहून मुंबईला जाण्यासाठी या रेल्वेचा विस्तार केला जात असल्याची माहिती, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे येत्या आठ तारखेला हिंगोली रेल्वे स्थानकावरून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. या माध्यमातून हिंगोलीवासियांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे.
****
लातूर शहर महानगरपालिकेचा २०२४-२५ वर्षाचा २४ कोटी ८५ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी काल सादर केला. कोणत्याही स्वरूपाची करवाढ तसंच बोजा न टाकता हा अर्थसंकल्प सादर केल्याचं त्यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पात ५२ प्रकारचे प्रमाणपत्र ऑनलाईन देणं, कचरा व्यवस्थापनासाठी नवीन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया, रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी अत्याधुनिक अशा 'रोडपॅच' मशीन खरेदी करणं, वाहतूक सिग्नल व्यवस्था अत्याधुनिक करणं, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारणं, बायोगॅस पासून वीज निर्मिती आणि त्याद्वारे वाहन चार्जिंग सेंटर उभारणं आदी तरतुदी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १२ मार्चपर्यंत [email protected] या ईमेलवर, अथवा कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर या पत्यावर पाठवावे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या अपघाती मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगार, वाहतुक कामगार आणि मुकादम यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयाचे आर्थिक सहाय्याचे धनादेश काल वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी हे धनादेश वितरीत केले.
****
स्वतंत्र दहा टक्के आरक्षण ही मराठा समाजाची मागणी नसून, ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी ही मागणी असल्याचं, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं संवाद सभेत बोलत होते. ओबीसीतून आरक्षण ही मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जनमित्रांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या वतीनं काल लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जनमित्रांचा गौरव करण्याबरोबरच विद्युत सुरक्षेची शपथ देण्यात आली.
****
ग्रंथालय चळवळीचे प्रणेते डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या हस्ते काल लातूर इथं ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं. तत्पूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं. शालेय विद्यार्थी विविध वेषभूषेत या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.
****
धाराशिव जिल्ह्यात टपाल विभागाच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून महिला सन्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजनेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण योजनेची माहिती देणं, घरोघरी पोस्ट ऑफिस योजना पोहोचवणं, पात्र लाभार्थांना नवीन खाते उघडून देणं आदी कामं करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातल्या सर्व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पुण्यात मध्यवस्तीत गर्दीमुळे वाहतूक कोंडी ! पोलिसांनी नियोजन करूनही वाहनसंख्या अनावर
पुण्यात मध्यवस्तीत गर्दीमुळे वाहतूक कोंडी ! पोलिसांनी नियोजन करूनही वाहनसंख्या अनावर
पुण्यात मध्यवस्तीत गर्दीमुळे वाहतूक कोंडी ! पोलिसांनी नियोजन करूनही वाहनसंख्या अनावर   प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 -शहराच्या मध्यवस्तीत खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्‍यता गृहीत धरून वाहतूक पोलिसांकडून नियोजन करण्यात आले होते. तरीही, रविवारी मध्य वस्तीतील बाजारात वाहतूक कोंडी सहन करावी लागली. या परिसरातील महत्त्वाच्या चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रयत्न केले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मार्�� २०२४ सायंकाळी ६.१०
****
संसद किंवा विधीमंडळात पैसे घेऊन मतदान करणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळणार नाही - सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल होणार, उद्या जाहीर सभा
समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण
आणि
लातूर शहर महानगरपालिकेचा २०२४-२५ वर्षाचा अर्थसंकल्प सादर
****
संसद किंवा विधीमंडळात पैसे घेऊन मतदान करणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय संविधानपीठानं आज हा निर्णय दिला. या संदर्भात १९९८ मधे दिलेला निवाडा न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. संविधानाच्या कलम १०५ आणि १९४ नुसार, संसद किंवा विधीमंडळातल्या वक्तव्यांसाठी लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य कारवाईपासून संरक्षण मिळतं. मात्र प्रश्न विचारण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी लाचखोरी ही बाब सार्वजनिक जीवनातली प्रतिमा डागाळणारी असून, त्यामुळे कलम १०५ आणि १९४ मधली तरतूद यासंदर्भात लागू होत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. यामुळे राजकारणातला भ्रष्टाचार निपटून काढायला मदत होईल, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यांच्या विकासातूनच देशाचा विकास हा आपल्या सरकारचा मंत्र असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तेलंगणात आदिलाबाद इथं आज ५६ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. देशाच्या विकासाचे फायदे राज्यस्तरावर नागरिकांना मिळावे असा केंद्राचा प्रयत्न असल्याचं, त्यांनी सांगितलं. अंबारी-आदिलाबाद-पिंपलकुटी इथं नव्याने विद्युतीकरण करण्यात आलेल्या रेल्वे लाइनचं लोकार्पण, तसंच तेलंगणाला महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्यांशी जोडण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.
****
दरम्यान, पंतप्रधान अदिलाबादहून नांदेडमार्गे चेन्नईला रवाना झाले. नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार अजित गोपछडे यावेळी उपस्थित होते.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आज रात्री छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल होणार आहेत. उद्या सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून अकोला शहराकडे ते रवाना होतील. तेथून पुन्हा सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात येतील. सव्वासहा वाजता क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. रात्री आठ वाजेच्या सुमारास ते दिल्लीला रवाना होतील.
दरम्यान, अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सभेसाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे शहरात वाहतुकीमध्ये उद्या दुपारपासून रात्री १२ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तसंच शहरात पोलिस आयुक्तांनी नो ड्रोन झोन प्रतिबंधक आदेशही लागू केले आहेत.
****
शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. वाशिम इथं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्राचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. हे केंद्र स्थानिक शेतीमालाचं विपणन आणि मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सेंद्रिय शेतीमालाची विक्री करणाऱ्या रथाला यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटला आहे, जवळपास ४० जागांवरील वाटप निश्चित झालं असून, फक्त चार जागावाटपाचा प्रश्न राहीला असल्याची माहिती, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. ते आज नंदुरबार इथं बोलत होते. उर्वरित जागांसंदर्भात येत्या आठवड्यात उमेदवार जाहीर केले जातील, असं त्यांनी सांगितलं. निवडणुकीच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीसोबत बैठका आणि चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, येत्या १२ मार्च पासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. १२ तारखेला त्यांची राज्यातली पहिली सभा नंदुरबारमध्ये होणार आहे.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. यावेळी पहिल्यांदा मतदान करणार्या नवमतदारांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन चित्रपट, नाट्य लेखिका - दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी केलं आहे.
बाईट - प्रतिमा कुलकर्णी
छत्रपती संभाजीनगर इथली नवमतदार सानिका धर्माधिकारी हीने मतदान करण्याचा संकल्प केला.
बाईट - सानिका धर्माधिकारी
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं. इगतपुरी इथं झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. उद्योग क्षेत्राबरोब���च शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक करण्यासाठी समृद्धी महामार्ग अतिशय उपयुक्त ठरेल, असं भुजबळ यावेळी म्हणाले. या रस्त्यावरून चालताना चालक संमोहित होत असतात, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना चालकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं. या टप्प्याच्या लोकार्पणानंतर समृद्धी महामार्गा��रच्या ७०१ किलोमीटर मार्गापैकी, वाहतुकीसाठी उपलब्ध मार्ग ६२५ किलोमीटरचा झाला आहे.
****
ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाच्या उपलब्धतेतून सक्षम देश उभारणीचा पाया घालणं आवश्यक असल्याचं, राज्याचे मृद संधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. नांदेड नजिक विष्णुपुरी इथल्या ग्रामीण टेक्नीकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस आणि कंधार इथल्या तांत्रिक आणि कृषी महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर नांदेड इथं डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते आज बोलत होते. मृद आणि जलसंधारण विभागाच्या गेल्या काही दिवसातल्या उल्लेखनीय कामामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढत आहे, कोणत्याही गावात पाणीटंचाई राहणार नाही अशा पद्धतीची मृदसंधारणाची कामं आपल्या विभागानं हाती घेतली असल्याचं राठोड यांनी सांगितलं.
****
लातूर शहर महानगरपालिकेचा २०२४-२५ वर्षाचा २४ कोटी ८५ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आज सादर केला. आर्थिक परिस्थिती आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन कोणत्याही स्वरूपाची करवाढ तसंच बोजा न टाकता हा अर्थसंकल्प सादर केल्याचं त्यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पात ५२ प्रकारचे प्रमाणपत्र ऑनलाईन देणं, कचरा व्यवस्थापनासाठी नवीन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया, रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी अत्याधुनिक अशा 'रोडपॅच' मशीन खरेदी करणं, वाहतूक सिग्नल व्यवस्था अत्याधुनिक करणं, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारणं, बायोगॅस पासून वीज निर्मिती आणि त्याद्वारे वाहन चार्जिंग सेंटर उभारणं आदी तरतुदी आहेत.
दरम्यान, नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १२ मार्चपर्यंत [email protected] या ईमेलवर, अथवा कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर या पत्यावर पाठवावे.
****
0 notes
kokannow · 4 years ago
Text
पंढरीत लपून प्रवेश करणाऱ्यांवर ड्रोनद्वारे देखरेख
पंढरीत लपून प्रवेश करणाऱ्यांवर ड्रोनद्वारे देखरेख
पंढरपूर : आषाढी वारी आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना प्रवेशबंदी लागू केली आहे. छुप्या मार्गाने पंढरपुरात प्रवेश करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी दिली.
आषाढी वारीच्या यात्रेत गर्दीमुळे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष उपाययोजना…
View On WordPress
0 notes
indiatv360 · 5 years ago
Text
कोरोना वायरस" याने देवालाही सोडले नाही गांधी
कोरोना वायरस” याने देवालाही सोडले नाही गांधी
कोरोना वायरस” याने देवालाही सोडले नाही गांधी ————————————- नागपूर:-दि.१८मार्च(सविता कुलकर्णी):-नागपूरच्या मध्यस्थानी असलेले आराध्य दैवत समजले जाणारे गणपती बाप्पा ला देखील “कोरोना वायरस”ने चक्क सोडलेले नाही. “भक्ती न करोना” असे तर या “करोना वायरस” ला म्हणायचे तर नाही ना? वाढत्या गर्दीमुळे 18 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत सर्व भक्तांना दर्शनाकरिता प्रतिबंध लावण्यात आले आहे. कृपया भक्तांनी नोंद…
View On WordPress
0 notes
dnyanesh001 · 5 years ago
Link
नोव्हेंबर २०१५ मध्ये भावेश नकाते या तरुणाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2tqmClJ
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
लोकलमधून पडून एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू
लोकलमधून पडून एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू
वाशांच्या गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आज सकाळी डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान एका २६ वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिव वल्लभ कुमार असं या तरुणाचं नाव आहे.शिव वल्लभ कुमार हा २६ वर्षांचा तरुण डोंबिवलीत राहत होता. मशीद बंदर येथील एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे आज तो कामावर निघाला होता.
कर्ज…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 6 years ago
Photo
Tumblr media
नववर्ष 1 मार्च ऐवजी 1 जानेवारीलाच का साजरे केले जाते ? #HappyNewYear2019 भारतात ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार 1 जानेवारी या दिवशी सरकारी कार्यालये,व्यापार क्षेत्र परिवहन मंडळाच्या सुविधा उपलब्ध असतात.यादरम्यान मेट्रो सुरक्षा महत्वाची मानली जाते.कारण गर्दीमुळे अनेक दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते.नववर्षाच्या काळात गावासारख्या ठिकाणी जगभरातून विविध पर्यटक जात असतात.त्यामुळे अशा वेळी सुरक्षेची गरज असते. भारतात हिंदू संस्कृती परंपरेनुसार,नववर्ष १ मार्च ला गुढीपाडवा हा नववर्ष म्हणून साजरा केला जातो,परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने नववर्ष १ जानेवारीला हाच दिवस बहुतांश भारतीय निवडतात.पाश्चिमात्य संस्कृतीचा कल पाहता भारतात १ जानेवारी ला मह���्वपूर्ण सण म्हणून साजरा केला जातो यात ख्रिश्चन बांधवांचा मोठा वाटा आहे. एका वर्षात ३६५ दिवस असतात. परंतु सर्व दिवस कसे जातात याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाही.हे वर्षे काहींसाठी आनंददायी तर काहींसाठी दुखदायी ठरते.ज्यांना आनंदी दायी गेल ते हे ही वर्षे आनंदीदायी जावे अशी प्रार्थना करत असतात. तर ज्यांना दु:खदायी गेलंय ते हे येणार वर्षे आनंदी दायी जावं यासाठी प्रार्थना करत असतात. हा दिवस तो असतो ज्याची सुरुवात प्रत्येक जण नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असतो.ही तीच वेळ असते जेव्हा आपण वाईट परिस्थितीत उपाय शोधत असतो.ही तीच वेळ असते जेव्हा आपण सकारात्मक विचार करत असतो.
0 notes