#चेंगराचेंगरी
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 12 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
बिहारच्या जहानाबाद इथल्या बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी होऊन तीन महिलांसह सात भाविकांचा मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर गया इथल्या रुग्णलयात उपचार सुरु आहेत. स्थानिक विक्रेते आणि भाविकांमध्ये काही कारणाने वाद झाल्याने मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली, मंदिर परिसर अतिशय अरुंद असल्याने चेंगराचेंगरीमुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याचं, पोलिस अधिक्षक अरविंद प्रताप सिंह यांनी सांगितलं.
****
बडतर्फ प्रशिक्षक प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. नागरी सेवा परीक्षा फसवणूक करून उत्तीर्ण झाल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जामिन अर्जावर न्यायालयानं दिल्ली पोलिस आणि केंद्रीय लोकसवा आयोगाकडून उत्तर मागवलं आहे.
****
महसूल गुप्तचर संचालनालयानं काल नागपूर इथं मेफेड्रोन कारखान्यावर छापा टाकून सुमारे ७८ कोटी रुपये किमतीचे ५२ किलो मेफेड्रोन द्रव स्वरूपात जप्त केले. यासोबत कच्चा माल आणि उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत. शहरातल्या एका निर्माणाधीन इमारतीत मेफेड्रोनचं उत्पादन सुरू असल्याची माहित मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
****
महसूल पंधरवड्यानिमित्त नांदेड इथं काल एक धाव सुरक्षेची ही मिनी म��रेथॉन स्पर्धा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथं हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात केली. विविध आपत्ती संदर्भात युवकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे या हेतूने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातल्या अनेक शाळा - महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.
****
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे लाभार्थी असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम २० ऑगस्ट पर्यंत जमा केली जाणार आहे. आतापर्यंत ११९ कोटी रुपये जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नसेल, त्यांनी २० ऑगस्टनंतर तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
****
राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरी विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रांमध्येही चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या विदर्भातल्या सहा मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या उर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा, नागपूर जिल्ह्यातल्या पेंच तोतलाडोह, गोंदिया जिल्ह्यातल्या इटियाडोह, भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द, आणि वर्धा जिल्ह्यातल्या निम्न वर्धा प्रकल्पांचा समावेश आहे. वैनगंगा, वर्धा आणि बेंबळा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूर विभागातल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये ७४ पूर्णांक ११ टक्के, तर अमरावती विभागातल्या प्रकल्पांमध्ये ६० पूर्णांक १२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणाची पाणी पातळी वाढल्यानं आज धरणातून दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
पुढील महिन्यात हरियाणा इथ महिलांसाठी पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा होणार असून, त्याला वैश्विक प्रवासी महिला कबड्डी लीग असं नाव देण्यात आल आहे. त्यामध्ये १५ देशातले महिला संघ सहभागी होणार आहेत. जागतिक स्तरावर कबड्डी खेळाला महत्व प्राप्त व्हावं, या खेळाचा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समावेश व्हावा आणि २०३६ मध्ये भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्याच्या दृष्टीने भारताच्या दावे��ारीला बळ प्राप्त व्हाव, या उद्देशाने भारतात हरियाणामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. इंग्लंड, पोलँड, अरजेंटिना, इटली आदी देशांच्या संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ‌देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ११३ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या २३ तारखेपर्यंत 1800-11-7800 या नि:शुल्क क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप वर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
ठाकरेंच्या काळात ��ेंगराचेंगरी झाली, मात्र आम्ही राजकारण केले नव्हते; बावनकुळेंचे प्रत्युत्तर
https://bharatlive.news/?p=104512 ठाकरेंच्या काळात चेंगराचेंगरी झाली, मात्र आम्ही राजकारण केले नव्हते; ...
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
राजस्थानच्या खातू श्याम मंदिरात चेंगराचेंगरीत ३ ठार, २ जखमी
राजस्थानच्या खातू श्याम मंदिरात चेंगराचेंगरीत ३ ठार, २ जखमी
पहाटे पाचच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. नवी दिल्ली: राजस्थानमधील सीकर येथील खातू श्यामजी मंदिरात सोमवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना उपचारासाठी जयपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाली. आज चांद्र कॅलेंडरचा 11 वा दिवस शुभ मानला जातो दर्शन खातू श्याम जी यांचे…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी; अनेकजण जखमी
मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी; अनेकजण जखमी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी कंबर कसली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये पोहोचले. या सभेला तुफान गर्दी झाली होती. पण मोदींचं भाषण सुरु असतानाच अचानक पळापळ सुरु झाली आणि चेंगराचेंगरीत अनेक महिला जखमी झाल्या आहेत. यानंतर मोदींनी अवघ्या १४ मिनिटात भाषण आटोपतं घेतलं.
मोदींची सभा…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
चल भाऊ जेवायला... ऐकताच मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली, तुम्ही पण पहा हा मजेशीर व्हिडिओ
चल भाऊ जेवायला… ऐकताच मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली, तुम्ही पण पहा हा मजेशीर व्हिडिओ
मिरवणुकीत जेवणासाठी चेंगराचेंगरी झाली प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram लग्नाचा व्हिडिओ: सोशल मीडियावर दावा केला जात आहे की हा व्��िडिओ पाकिस्तानचा आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, बाराटी कसे खायला एकत्र धावतात आणि तिथे चेंगराचेंगरी होते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. लग्नसमारंभात बनवलेले स्वादिष्ट पदार्थ (लग्नाचे जेवण) आनंद घेण्यासारखे काहीतरी आहे. तुमच्या लक्षात आले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
blogkatta · 7 years ago
Text
चेंगराचेंगरी आणि आपण
नवीन लेख : माझी मावशी परळला राहायची. तिला जाऊन आता��ा महिना झाला. मी यंदा काही अचानक आलेल्या घरगुती कामामुळे मुंबईला गेले तेव्हा ती मुलाकडे पुण्याला होती त्यामुळे आमची भेट फक्त फोनवर झाली. अगं पुढच्यावेळी येशील तेव्हा माझ्याकडे राहायला घेऊन येईन या माझ्या शब्दांना आता काहीच अर्थ नाही. या मावशीकडे मी असंख्य वेळा गेले आहे. रुपारेलला असताना तर तशी संधीही होती. त्यावेळेस आम्ही वेस्टर्नवाले सोप्पं पडतं म्हणून http://majhiyamana.blogspot.com/2017/09/blog-post.html?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ माझिया मना
0 notes
jsonawane008-blog · 7 years ago
Video
मध्य रेल्वेचं परळ स्टेशन आणि पश्चिम रेल्वेचं एलफिन्स्टन स्टेशन यांना जोडणाऱ्या पुलावर आज सकाळी चेंगराचेंगरी होऊन २२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत २० ते २५ जण जखमी झाले असून बऱ्याच प्रवाशांना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सकाळी साडेदहाच्या सुमारास मध्य मुंबईत पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक प्रवासी पुलावरच थांबले होते. अशातच, परळ आणि एलफिन्स्टन दोन्ही स्टेशनांवर एकापाठोपाठ एक लोकल ट्रेन येत होत्या आणि पुलावरची गर्दी वाढतच होती. अशातच, पुलाचा पत्रा तुटल्याचा मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. पुलाचा एक भाग कोसळत असल्याची अफवा पसरली आणि जो-तो बाहेर पडण्यासाठी धावत सुटला. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाली, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. पावसामुळे निसरड्या झालेल्या पुलावर धावता धावता काही जण खाली पडले. त्यांच्या अंगावर काही प्रवासी पडले, तर अनेक जण त्यांच्या अंगावर पाय देऊन स्वतःला वाचवण्यासाठी धावत सुटले. काहींनी पुलावरून उड्याही मारल्या. त्यात अनेक प्रवासी जखमी झाले, तर मृतांचा आकडाही २२ पर्यंत पोहोचला आहे. तो आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतेय. रेल्वेमंत्री मुंबईत परळ-एलफिन्स्टन पुलावरील गर्दीचा विषय अनेक वर्षं चर्चेत आहे. सकाळी आणि संध्याकाळी या पुलावर पोलीस तैनात करावे लागतात, इतकी गर्दी इथे होते. परळ टर्मिनस करण्याची चर्चा अनेकदा झाली, पण ठोस कृती काहीच झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विषय तापणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आज मुंबईत आहेत. त्यामुळे ते याबाबत काय घोषणा करतात, हे पाहावं लागेल. (at Parel railway station)
0 notes
webmaharashtra-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
एल्फिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरी, तिघांचा मृत्यू मुंबई / प्रतिनिधी : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी होवून तिघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर या दुर्घटनेत 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ब्रिज पडत असल्याच��या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांचा एकच हलकल्लोळ माजला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत सहा प्रवासी जखमी झाले आहेत.मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील एल्फिस्टन स्टेशन आणि मध्य रेल्वेवरील परेल स्टेशनला जोडणा-या या पुलावर नेहमी गर्दी होते. अग्निशमन दल आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा ब्रिज तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ब्रिज पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
रमजानच्या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी, 85 ठार, शेकडो जखमी
https://bharatlive.news/?p=89905 रमजानच्या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी, 85 ठार, शेकडो जखमी
गुरुवारी ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
येमेन : रमजानच्या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी, 78 जण ठार
https://bharatlive.news/?p=89756 येमेन : रमजानच्या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी, 78 जण ठार
येमेनची ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
निपचित पडलेल्या महिला, प्रचंड चेंगराचेंगरी, गर्दीत अडकलेली ॲम्ब्युलन्स; आव्हाडांच्या त्या व्हिडिओने खळबळ
https://bharatlive.news/?p=89072 निपचित पडलेल्या महिला, प्रचंड चेंगराचेंगरी, गर्दीत अडकलेली ॲम्ब्युलन्स; ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पाकिस्तान : पिठासाठी रोजच चेंगराचेंगरी, संकट ओढवलं तरी कुणामुळे? नेते, लष्कर की कोर्ट?
https://bharatlive.news/?p=80346 पाकिस्तान : पिठासाठी रोजच चेंगराचेंगरी, संकट ओढवलं तरी कुणामुळे? नेते, ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Pakistan: कराचीमध्ये गव्हाच्या पीठासाठी चेंगराचेंगरी, 12 ठार
https://bharatlive.news/?p=78985 Pakistan: कराचीमध्ये गव्हाच्या पीठासाठी चेंगराचेंगरी, 12 ठार
पाकिस्तानची ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Pakistan Karachi Stampede: पाकिस्तानमध्ये रेशन वितरणादरम्यान चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
https://bharatlive.news/?p=78825 Pakistan Karachi Stampede: पाकिस्तानमध्ये रेशन वितरणादरम्यान चेंगराचेंगरी, 11 जणांचा ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मथुरा मंदिरात आरतीवेळी चेंगराचेंगरी; दोन भाविकांचा गुदमरून मृत्यू
मथुरा मंदिरात आरतीवेळी चेंगराचेंगरी; दोन भाविकांचा गुदमरून मृत्यू
मथुरा मंदिरात आरतीवेळी चेंगराचेंगरी; दोन भाविकांचा गुदमरून मृत्यू मथुरा – शनिवारी पहाटे जन्माष्टमी उत्सवादरम्यान मथुरेतील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण होऊन त्यात दोन भाविकांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले आहेत. मंदिरात मंगलाआरतीच्यावेळी प्रचंड गर्दीमुळे गुदमरल्यासारखे झाल्याने ही घटना घडली अशी माहिती जिल्हाधिकारी नवनीतसिंग चहल यांनी दिली. या घटनेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
धक्कादायक ! मंदि���ातील तुफान गर्दीमुळे चेंगराचेंगरी, श्वास गुदमरल्याने अनेक जण बेशुद्ध,२ भक्तांचा मृत्यू
धक्कादायक ! मंदिरातील तुफान गर्दीमुळे चेंगराचेंगरी, श्वास गुदमरल्याने अनेक जण बेशुद्ध,२ भक्तांचा मृत्यू
धक्कादायक ! मंदिरातील तुफान गर्दीमुळे चेंगराचेंगरी, श्वास गुदमरल्याने अनेक जण बेशुद्ध,२ भक्तांचा मृत्यू   दिल्ली – मथुरेतील बांके बिहारी मंदिरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील या मंदिरात हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.मात्र आज सकाळी आरतीच्या दरम्यान या मंदिरात भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले. या चेंगराचेंगरीमध्ये अनेक भक्त जखमी झाले आहेत. दर्शनासाठी मंदिरात…
Tumblr media
View On WordPress
0 notes