#मंदिरातील
Explore tagged Tumblr posts
Text
Tipu Sultan च्या काळातल्या मंदिरातील “सलाम आरतीचं” नाव बदललं, BJP सरकारने सांगितलं कारण
Tipu Sultan च्या काळातल्या मंदिरातील “सलाम आरतीचं” नाव बदललं, BJP सरकारने सांगितलं कारण
Tipu Sultan च्या काळातल्या मंदिरातील “सलाम आरतीचं” नाव बदललं, BJP सरकारने सांगितलं कारण कर्नाटक सरकारने 18 व्या शतकातील राजा टिपू सुलतानच्या काळातील मंदिरांमधील आरतींची नावं बदलण्याचा निर्णय घेतलाय. सलाम आरती, सलाम मंगल आरती आणि दीवतिगे सलाम आरतींची नावं बदलण्याचा हा निर्णय आहे. या प्रथांची नावं बदलून त्याला स्थानिक नावं देण्यात येणार आहे, असा निर्णय भाजप सरकारने घेतलाय. आपण ही नावं नेमकी का…
View On WordPress
#“सलाम#bjp#sultan#tipu#आरतीचं”#आहे#कारण&8230;#काळातल्या#गंभीर#च्या#नाव#बदललं#मंदिरातील#मुद्दा#सरकारने#सांगितलं
0 notes
Text
"जगातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा कबीर साहेबांनी उघड केला, तो अद्यापही बंद होत नाही उलट दिवसेंदिवस वाढतच आहे."
लेखक-D.K.Gutte.Parbhani-MH-22
“लाडू लावन लापसी , पूजा चढ़े अपार
पूजी पुजारी ले गया, मूरत के मुह छार !!”
– कबीर
✍🏻
देव प्रसन्न करुन घेण्यासाठी लोक मंदिरातील देवा पुढे नैवेद्य, पूजेचे साहित्य जसे की तांदूळ बदाम काजू, दूध तूप मध, इत्यादी खाद्य पदार्थ ठेवले जाते. देव कधीच हे पदार्थ खात नाही व मागतही नाही.मग हे सर्व साहित्य पूजा आटोपताच पूजारी किंवा भट घेउन जातो. वास्तविकता ही आहे की लोकांना माहीत असूनही लोक तिथे खाद्य पदार्थ ठेवतात.
यापुढेही लोक देवाच्या मूर्ती समोर पैसे चांदी सोने अर्पण करतात हे सुद्धा पूजारी घेउन जातो. या वस्तू सुद्धा देवा पर्यंत पोचत नाहीत. लोक लाखो करोडो रुपये देवाच्या मूर्ती समोरच्या दान पेट्यात टाकतात. शतकानु शतके लोक मंदिरात जातात व करोडो रुपये टाकतात व त्यात किती भ्रष्टाचार व घोटाळे होतात ते देव जाणे.
आज जगातील सर्वात मोठा घोटाळा म्हणजे मंदिर, प्रार्थना स्थळे, मठ, आश्रम, देवाच्या नावावर चालणाऱ्या संस्थातून होतो. विशेषतः हे घोटाळे अब्जावधी संपत्ती जमा करणारे साधू संत करतात. लोकांना धडडीत दिसते तरी लोक तिथं जाउन पैसा सोन चांदी अर्पण करतात ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
याचाच भाग म्हणून परदेशी लोकांनी पण आपल्या देशात येउन इस्काॕन सारखे मंदिर बांधून दान देणग्याच्या नावाखाली भरपूर माया जमा केली व करता��ेत.
देवाच्या नावाखाली भारतात फार पूर्वी पासून पाखंडी धर्म गुरु व पूजारी अमर्याद घोटाळे करत होते. सन १३९८ सालात कबीर साहेब स्वतः प्रकट होउन भारतातील मंदिरातील घोटाळे उघड करुन लोकांना समजावून सांगितले होते की आशा प्रकारच्या पूजेचे साहित्य व पैसा हा देवाला जरुरी नसतो तो पूजारी व नकली/पाखंडी धर्म गुरु जमा करुन मजा मारतात. मंदिरातील मूर्तीच्या समोर पूजारी पाखंडी ढोंगी साधू खुलेआम भ्रष्टाचार व आर्थिक घोटाळे करत आहे आणि हा देश उघड्या डोळ्यांनी पहातोय पण बोलू शकत नाही एकार्थाने संविधानाने दिलेल्या धार्मिक हक्काची पायमल्लीच होते यात तिळमात्र शंका नाही.
"बोला कबीर भगवंताचा जयजयकार असो !!
🙏🏻
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 May 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या तर राज्यातल्या अखेरच्या टप्प्यातल्या प्रचाराची सांगता
राज्यभरात १३ मतदार संघातल्या २६४ उमेदवारांसाठी उद्या मतदान-प्रशासकीय यंत्रणा सज्ज
येत्या दोन जूनपासून पंढरपुरात विठ्ठलाचं थेट पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू
बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश प्रकरणी ४२ जणांविरोधात गुन्हे दाखल
आणि
थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीची पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या प्रचाराची काल सांगता झाली. देशभरात सात टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा हा पाचवा आणि महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यात राज्यातल्या उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या १३ लोकसभा मतदारसंघात उद्या २० मे रोजी मतदान होत आहे. या सर्व १३ मतदारसंघांत एकूण २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, २४ हजार ५७९ मतदान केंद्रांवर दोन कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ मतदार, आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
****
धुळे लोकसभा मतदार संघातले महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचाराची काल मालेगाव इथं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेनं सांगता झाली. महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांनी काल पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं प्रचार सभेला संबोधित केलं.
****
महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ही निवडणूक जनतेची असून, जनताच ती लढत असल्याचं खर्गे म्हणाले. उद्धव ठाकरे तसंच शरद पवार यांनीही, विविध मुद्यांवरुन केंद्र सरकारवर टीका केली.
****
दरम्यान, शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे निवडणुकीनंतर भाजपा सोबत गेल्याशिवाय राहणार नाहीत, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल भिवंडी इथं अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.
****
देशाचा मतदार काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री भाजप नेते मोहन यादव यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सत्ता असताना १०० वेळा घटनेत दुरुस्त्या करणाऱ्या काँग्रेसला आता संविधान धोक्यात असल्याचा साक्षात्कार होत असल्याची टीका यादव यांनी केली.
****
दरम्यान या निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचं, शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल प्रचाराची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दादर इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं, त्यानंतर ते बोलत होते.
****
मतदानाचं प्रमाण वाढावं, यासाठी मॅजेस्टिक बुक डेपोने मतदारांसाठी विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. मतदान केल्याची निशाणी, मतदानाची शाई लावल्याचे बोट दाखवून पुस्तक खरेदीवर २० टक्के सवलत मिळणार आहे. मॅजेस्टिकच्या गिरगाव, दादर, ठाणे इथल्या तिन्ही शाखांसह विलेपार्ले इथलं दीनानाथ नाट्यगृह तसंच बोरिवलीत प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात असलेल्या मॅजेस्टिकच्या बुक स्टॉल्सवरही २० मे ते २५ मे या कालावधीसाठी ही सवलत उपलब्ध असणार आहे.
****
पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'सनफ्लावर्स वेयर फर्स्ट वन्स टू नो' हा चित्रपट सध्या कान महोत्सवात यंदा सहभागी झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया आणि एकूण अनुभवाबद्दल चित्रपटाचे नेपथ्यकार प्रणव खोत यांनी अधिक माहिती दिली...
****
पंढरपूर इथं येत्या दोन जून पासून विठ्ठलाचं थेट पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीनं हा निर्णय घेतल्याचं, समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं. मंदिरातील गाभाऱ्याच्या संवर्धन कामासाठी १५ मार्चपासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद आहे. येत्या सात जुलै पासून विठ्ठलाचे आषाढीसाठी २४ तास दर्शन सुरू असणार अशी माहिती मंदिर व्यवस्थापन समितीने दिली आहे.
****
प्रेमविवाह करणाऱ्या मुलीच्या हत्याप्रकरणी, मुलीची आई आणि भावाला वैजापूर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात लाडगाव शिवारात पाच डिसेंबर २०२१ रोजी ही घटना घडली होती. शोभा मोटे असं शिक्षा झालेल्या महिलेचं नावं आहे.
****
मुंबईत घाटकोपर जाहिरात फलक अपघाताच्या पार्श्वभूमीवर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी जिल्ह्यातील सहा नगर पालिका आणि पाच नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना शहरातल्या लोखंडी ढाचा वापरुन उभालेले फलक काढण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांनी बीड शहरातील ४७ ठिकाणचे लोखंडी ढाचे तात्काळ काढण्यासाठी २४ तासाची मुदत दिली आहे. जे मालक हे ढाचे काढणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हे ढाचे काढण्यासाठी उद्या सोमवारपासून शहरात पालिकेच्या सहा पथकांकडून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
लातूर इथं कालही तीन फलक निष्कासित करण्यात आले. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
नांदेड पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं जिल्ह्यातून गहाळ झालेल्या ११८ मोबाईलचा तपास लावला आहे. एकूण १८ लाख ८५ हजार रुपयांचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते ६० मोबाईलचं मूळ मालकांना वाटप करण्यात आलं. उर्वरित मोबाईलच्या ईएमइआय क्रमांकाची माहिती ट्विटर वर देण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यात सामाजिक संपर्क माध्यमांवर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करुन समाजातील सलोखा आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४२ समाज कंटकांविरोधात, जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी ही माहिती दिली. सामाजिक संपर्क माध्यमांवरील हा आक्षेपार्ह मजकूरही हटवण्यात आला असल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं.
****
भारतीय बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांच्या जोडीने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल बँकॉक इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सात्विक चिराग जोडीने तैवानी जोडीचा २१-११, २१-१२ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. आज तैवान आणि चिनी बॅडमिंटनपटूंच्या जोडीसोबत त्यांचा विजेतेपदासाठीचा सामना होणार आहे.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल बंगळुरु इथं चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं चेन्नई सुपर किंग्सवर २७ धावा��नी विजय मिळवला. ��ा विजयासोबत बंगळुरुच्या संघानं प्ले ऑफ मधील आपलं स्थान निश्चित केलं आहे.
दरम्यान, या स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना पंजाब किंग्स आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात तर दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल.
****
परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त, काल खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. राज्याचे मृद आणि जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उदघाटन झालं. विद्यापीठाने भविष्यात पाण्याचा ताण सहन करणारी, खोलवर मुळ्या जाणारी कोरडवाहू शेतीस पूरक वाणं विकसित करावीत, तसंच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून गुणात्मक दर्जाची शेती करून प्रगती साधावी, असं आवाहन चव्हाण यांनी यावेळी केलं. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्यासह उपस्थित तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्रांसह ड्रोनचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी यंदा लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. ‘माझा जिल्हा, हरित जिल्हा या राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. याअंतर्गत गाव आणि शहरी पातळीवर वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणं, वृक्षांच्या बिया संकलित करून रोपं तयार करणं, शालेय मुलांच्या हस्ते वृक्षारोपण, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या मोहिमेत विशेष कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, तसंच नागरिकांचाही गौरव करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड- हडपसर-नांदेड विशेष गाडीच्या १२ फेऱ्या मंजूर केल्या आहेत. ही गाडी २२ मे ते २६ जून पर्यंत दर बुधवारी नांदेड इथून रात्री नऊ वाजता तर २३ मे ते २७ जून पर्यंत दर गुरुवारी हडपसर इथून दुपारी सव्वा तीन वाजता सुटणार आहे.
दरम्यान, नांदेड इथून सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
****
0 notes
Text
भव्यदिव्य मंदिरातील रामदरबारासाठी व्हिएतनाममधून खास मागवले उच्च प्रतीचे मार्बल
करमाड : श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य असा श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. त्याच धर्तीवर करमाड येथील सर्वधर्मीयांनी एकत्र येत याच मुहूर्तावर गावात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्याचा निश्चय केला आहे. श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून जिल्ह्यात दैदीप्यमान सोहळा व्हावा यासाठी करमाडकर कामाला लागले आहेत.करमाड मधील जुन्या गावात…
View On WordPress
0 notes
Text
भारतीय संविधान
आता खरच निसर्गालाच माणूस नकोसा झाला अस वाटतय.
कारण,आपल्याला घरात बसवून निसर्ग स्वतःला दुरूस्त करून घेत आहे.
सगळीकडे नद्या स्वच्छ होत आहेत.
हवा शुद्ध वहात आहे.
पक्षांचा कलकलकलाट,गाई वासरांचे हंबरणे ऐकु येत आहे.
कुठे मंदिरातील घंटा आता वाजत नाही.
मस्जीद मधील अजाण नाही.
चर्च मधिल सामुहिक प्रार्थना नाही.
कुठलेही धार्मिक कार्यक्रम नाही.
कुणाला आता मंगळ नाही.
कुणाला आता शनिचीसाडेसाती नाही.
स्मशानात कुठलेही विधी नाही.
पिंडदान नाही.
कावळ्याला आपल्या त्या पिंडाची अपेक्षा नाही.
आता कालसर्पाची पुजा बंद आहे.
नवग्रहाची शांती बंद आहे..
आता कोणी शुभ मुहूर्त पहात नाही..
तरी सगळ कस शांततेत सुरू आहे.
निसर्ग हसतो आहे आता आपल्यावर व आपल्या भोंदूगिरीवर... कारण त्याला तुमच्या वरील कोणत्याही गोष्टीची अजिबात आवश्यकता नाही,कारण वरील कोणतीही गोष्ट त्याने बनवली नाही...
तो आता एकच म्हणतो... नैसर्गिक पणे राहा...
माणूसकीने वागा...
बघा जमतय का ?
-वैभव वैद्य....
0 notes
Text
Good morning messages in Marathi : शुभसकाळ शुभेच्छा
Good Morning Messages in Marathi
नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका कारणपाणी कितीही घाण असले तरी तेतहान नाही पण आग विझवू शकते|| देव माझा सांगुन गेला पोटा पुरतेच कमव |||| जिवाभावाचे मित्र मात्र खुप सारे जमव ||माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजेलोकांच काय ,लोक तरदेवात पण चुका काढतात शुभ सकाळ
Good Morning Images Marathi
मुखी साखरेचा, गोडवा असावामनी कुणाचा, कधी द्वेष नसावाजोडावी माणसे, जपावी नाते विसरून व्यवहारी, फायदे तोटेक्षणांचे मणी, अलगद ओवावे आनंदी सुरांनी, मनास छेडावे शुभ सकाळ
Good Morning Quotes Marathi
मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाहीकवितेला चाल नाहीजोपर्यंत तुम्ही ती गात नाहीत्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाहीजो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीमन वळु नये,अशी श्रध्दा हवीनिष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवीसामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवीकधी विसरु नये,अशी नाती हवी
Thanks For Reading
Read Full Post Here : गुड मॉर्निंग मेसेज मराठी
2 notes
·
View notes
Video
instagram
#अदभुत #दक्षिणेकडील #गणपती #मंदिरातील #गजराज #आरती #बाप्पाचेरुप #हत्ती #गणेशा अदभुत दक्षिणेकडील गणपती मंदिरातील गजराज आरती बाप्पाचेरुप हत्ती गणेशा https://www.instagram.com/p/CEyIFPUgZiT/?igshid=1fc2obcu6fmyw
0 notes
Text
मंदिरातील दानपेटी फोडताना चोरट्याला पहाटे रंगेहाथ पकडले
मंदिरातील दानपेटी फोडताना चोरट्याला पहाटे रंगेहाथ पकडले
कणकवलीतील नागरिकांची सतर्कता दान पेटीसह पान टपऱ्यांवर देखील चोरट्याचा डल्ला कणकवली: कणकवली शहरात पहाटे 6 वा. च्या सुमारास भालचंद्र महाराज संस्थानकडील बालगोपाळ हनुमान मंदिर मधील दानपेटी फोडून रक्कम लंपास करणाऱ्या एका चोरट्याला कणकवलीतील सतर्क नागरिकांनी रंगेहाथ पकडले. बुधवारी सकाळी ही घटना घडली. कणकवलीतील बालगोपाळ हनुमान मंदिर ची दाना पेटी फोडत असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सामाजिक…
View On WordPress
0 notes
Video
तामिळनाडू येथील एका मंदिरातील मूर्तीला हार घालताना पुजारी पडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. . . . #Tamilnadu #Temple #God #Mural #Garland #Breathtaking #Accident #Collapsed #Felldown #Horror #InstaView #Viral #SocialMedia #worship #MaharashtraToday https://www.instagram.com/p/BtOFJMHhKVF/?utm_source=ig_tumblr_share&igshid=p429pwyseglu
#tamilnadu#temple#god#mural#garland#breathtaking#accident#collapsed#felldown#horror#instaview#viral#socialmedia#worship#maharashtratoday
1 note
·
View note
Text
समाजकंटकांनी देवतांची विटंबना करत पुजाऱ्याला केली मारहाण !
समाजकंटकांनी देवतांची विटंबना करत पुजाऱ्याला केली मारहाण !
नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार नगर, ता. ५ : ४ सप्टेंबर रोजी नगर जिल्ह्यातील पोखर्डी शेंडी गावातील लक्ष्मी माता मंदिरामध्ये गणपती बाप्पांची आरती सुरू असताना काही समाजकंटक (ख्रिश्चन)अहिंदू लोकांनी ४० ते ५० लोकांच्या जमावाने मंदिरावर दगडफेक करत गणपती मूर्तीची विटंबना केली. मंदिरातील पुजारी यांना गंभीर प्रकारची मारहाण केली. यामध्ये दोन पुजारी जखमी असून यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले…
View On WordPress
0 notes
Text
भीमाशंकर मंदिरातील पुजार्यांची पगारी तत्त्वावर नेमणूक करा
https://bharatlive.news/?p=171816 भीमाशंकर मंदिरातील पुजार्यांची पगारी तत्त्वावर नेमणूक करा
मंचर : ...
0 notes
Text
जालना प्राचीन मूर्ती चोरी प्रकरण; भाजपा आमदाराचा पोलिसांना इशारा, म्हणाले, “मूर्ती सापडल्या नाही तर…. “
जालना प्राचीन मूर्ती चोरी प्रकरण; भाजपा आमदाराचा पोलिसांना इशारा, म्हणाले, “मूर्ती सापडल्या नाही तर…. “
जालन्यातील जांब समर्थ येथील राम मंदिरातील सात पंचधातूंच्या ��ूर्ती चोरी गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. श्री समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या पंचधातुच्या मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्या. मात्र, अद्याप चोरांचा तपास लागला नाही. यावरुनच भ���जपा आमदार यांनी पोलिसांना इशारा दिला आहे. हेही वाचा- तासगावचा ऐतिहासिक…
View On WordPress
#bjp-mla-बाबाराव-लोणीकर ताज्या बातम्या#जालना जांब-राम-मंदिर-चोरी#बबनराव लोणीकर लेटेस्ट न्यूज#बाबाराव-लोणीकर बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
सबका साथ-सबका विकासाची प्रेरणा रामाराज्यातून-सोलापूर इथं घरकुल लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
विकसित भारत संकल्प यात्रेत पाच कोटींहून अधिक नागरिकांना मोफत आरोग्यसेवांचा लाभ
आणि
देशाच्या विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची आवश्यकता डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडून व्यक्त
****
सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या चतु:सूत्रीची प्रेरणा रामाराज्यातूनच घेतली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी इथं असंघटित कामगारांसाठी बांधण्यात येत असलेल्या तीस हजार घरापैकी पहिल्या टप्यातील १५ हजार २४ घरांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. या योजनेच्या लाभार्थी रिझवाना मकानदार यांना पंतप्रधानांच्या हस्ते घराची किल्ली मिळाली, त्यांनी आपल्या भावना या व्यक्त केल्या.
देशातल्या सर्वात मोठ्या असंघटीत १५ हजार कामगारांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असताना आपल्याला अत्यंत आनंद होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. पीएम स्वनिधी योजनेच्या तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज मंजुरीचं पत्रही यावेळी प्रदान करण्यात आलं.
केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात भिवंडी-निजामपूर, सांगली, उल्हासनगर तसंच कल्याण डोंबिवली या महापालिका तर शेगाव, सातारा आणि भद्रावती या नगरपालिकेत मंजूर असलेल्या एक हजार २०१ कोटी रुपयांच्या खर्चाच्या पाणी पुरवठा तसंच मलनिस्सारण व्यवस्थापन विकास कामांचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं करण्यात आलं.
येत्या २२ तारखेला प्रज्वलित होणारी रामज्योत सर्वांच्या जीवनातून गरीबीचा अंध:कार दूर करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले -
22 जनवरी को जो रामज्योती आप जलायेंगे, वो आप सभी के जीवन से गरीबी का अंधेरा दूर करने की प्रेरणा बनेगी। आपका जीवन खुशीयों से भरा रहे, यही प्रभू राम से मेरी प्रार्थना है। ये राम राज्य ही है, जिसने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास की प्रेरणा दी है।
पंतप्रधानांनी आज बंगळुरू इथं बोईंग इंडिया इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटरच्या नवीन परिसराचं उद्घाटन केलं. गरीब कुटुंबातील मुलींना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताचे प्रशिक्षण देणाऱ्या बोईंग सुकन्या योजनेला यावेळी सुरूवात करण्यात आली. चेन्नई इथल्या सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आकाशवाणीच्या नियोजित केंद्राची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून होणार आहे. शहरात चणई परिसरात उभारलं जाणारं हे एफएम प्रसारण केंद्र १० किलोवॅट क्षमतेचं असेल.
****
अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येत सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. जगभरातून अयोध्येत येणाऱ्या निमंत्रित पाहुण्यांना राहण्यासाठी टेंट सिटी उभारण्यात आली आहे. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी देव प्रबोधन, औषधी अधिवास, ग्रहता अधिवास, कुंड पूजन आणि अग्निकुंड स्थापना यासारखे अनेक विधी सध्या सुरू आहेत. गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या देखरेखीखाली २१ तारखेपर्यंत हे विधी चालणार आहेत. उद्यापासून २२ तारखेपर्यंत तात्पुरत्या मंदिरातील श्रीरामाचं दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ तारखेला १९ विशेष मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करणार आहेत. या मुलांची कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, समाजसेवा आणि क्रीडा या प्रकारात असामान्य कामगिरी केल्याबद्दल निवड करण्यात आली आहे. यात ९ मुलं आणि १० मुलींचा समावेश आहे. ५ ते १८ वयोगटातल्या मुलांना हे पुरस्कार देण्यात येतात. प��तप्रधान नरेंद्र मोदी २३ तारखेला राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.
****
गृह मंत्रालयानं आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कागदाचे तिरंगा ध्वज वापरण्यासंबंधी निर्देश जारी केले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम तसंच क्रीडा स्पर्धेदरम्यान वापरलेल्या कागदाच्या ध्वजांची खाजगीरित्या विल्हेवाट लावावी, तसंच या संदर्भात जनजागृती करण्याची आणि जाहिरातींच्या माध्यमातून प्रचार करण्याची सूचना मंत्रालयानं राज्य सरकारांना केली आहे.
****
राज्यात आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे आणि भाजीपाला लागवडीची योजना राबवण्यासाठी तीन लाख त्रेसष्ट हजार रूपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. यात मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यासह राज्यातल्या १३ जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत पाच कोटींहून अधिक नागरिकांना मोफत आरोग्यसेवांचा लाभ झाला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आतापर्यंत २ लाखांहून अधिक आरोग्य सेवा शिबीरं आयोजित करण्यात आली असून २ कोटी ६१ लाखांहून अधिक आयुष्मान भारत कार्डे वितरित झाली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
या यात्रेनं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती केली. ही यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरात ज्योती नगर, उस्मानपुरा परिसरात पोहोचली आहे.
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. नांदेड इथले राजाराम मडावी यांनी आपला अनुभव शब्दांत कथन केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या मंदिरातील सामुहिक स्वच्छता अभियानाअंतर्गत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांनी आज जालना जिल्ह्यातल्या राजूर इथल्या गणपती मंदिरात स्वच्छता केली. भाजपा पदाधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सहभागी होत मंदिर परिसर झाडून पुसून स्वच्छ केला.
****
अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी आज डोंगरगण इथल्या रामेश्वर मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी मंदीर व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांसह विद्यार्थी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
****
लातूर इथल्या सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिर तसंच तीर्थकुंड परिसरात २१ जानेवारीला सकाळी आठ वाजता स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी राम सीता वृक्षवाटिका साकारण्यालाही प्रारंभ होणार आहे.
****
विरोधी प���्षनेते अंबादास दानवे यांचा जनता दरबार कार्यक्रम आज छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं पार पडला. दानवे यांनी यावेळी नागरिकांच्या विविध विषयांवरील समस्या जाणून घेतल्या.
****
0 notes
Text
भव्यदिव्य मंदिरातील रामदरबारासाठी व्हिएतनाममधून खास मागवले उच्च प्रतीचे मार्बल
करमाड : श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य असा श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. त्याच धर्तीवर करमाड येथील सर्वधर्मीयांनी एकत्र येत याच मुहूर्तावर गावात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्याचा निश्चय केला आहे. श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून जिल्ह्यात दैदीप्यमान सोहळा व्हावा यासाठी करमाडकर कामाला लागले आहेत. करमाड मधील जुन्या गावात…
View On WordPress
0 notes
Text
भारतीय संविधान
आता खरच निसर्गालाच माणूस नकोसा झाला अस वाटतय.
कारण,आपल्याला घरात बसवून निसर्ग स्वतःला दुरूस्त करून घेत आहे.
सगळीकडे नद्या स्वच्छ होत आहेत.
हवा शुद्ध वहात आहे.
पक्षांचा कलकलकलाट,गाई वासरांचे हंबरणे ऐकु येत आहे.
कुठे मंदिरातील घंटा आता वाजत नाही.
मस्जीद मधील अजाण नाही.
चर्च मधिल सामुहिक प्रार्थना नाही.
कुठलेही धार्मिक कार्यक्रम नाही.
कुणाला आता मंगळ नाही.
कुणाला आता शनिचीसाडेसाती नाही.
स्मशानात कुठलेही विधी नाही.
पिंडदान नाही.
कावळ्याला आपल्या त्या पिंडाची अपेक्षा नाही.
आता कालसर्पाची पुजा बंद आहे.
नवग्रहाची शांती बंद आहे..
आता कोणी शुभ मुहूर्त पहात नाही..
तरी सगळ कस शांततेत सुरू आहे.
निसर्ग हसतो आहे आता आपल्यावर व आपल्या भोंदूगिरीवर... कारण त्याला तुमच्या वरील कोणत्याही गोष्टीची अजिबात आवश्यकता नाही,कारण वरील कोणतीही गोष्ट त्याने बनवली नाही...
तो आता एकच म्हणतो... नैसर्गिक पणे राहा...
माणूसकीने वागा...
बघा जमतय का ?
-वैभव वैद्य....
0 notes
Text
गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री 24 तोळे सोन्याचा कलश चोरीला, सोलापुरातील मशरूम गणपती मंदिरातील घटना
गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री 24 तोळे सोन्याचा कलश चोरीला, सोलापुरातील मशरूम गणपती मंदिरातील घटना
2016 मध्येही मुसळधार पाऊस आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने कलश चोरीला गेला होता. हा प्रकार दुसऱ्यांदा घडल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मशरूम गणेश मंदिर सोलापूर महाराष्ट्र गणेश चतुर्थीच्या अगदी आधी मध्यरात्री महाराष्ट्रात सोलापूर प्रसिद्ध गणेश मंदिरातील सोन्याचा कलश चोरीला गेला आहे. सोलापूरचा मशरूम गणेश मंदिर हा कलश 24 तोळे सोन्याचा होता. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा गावात…
View On WordPress
0 notes