#बाबाराव-लोणीकर बातम्या
Explore tagged Tumblr posts
Text
जालना प्राचीन मूर्ती चोरी प्रकरण; भाजपा आमदाराचा पोलिसांना इशारा, म्हणाले, “मूर्ती सापडल्या नाही तर…. “
जालना प्राचीन मूर्ती चोरी प्रकरण; भाजपा आमदाराचा पोलिसांना इशारा, म्हणाले, “मूर्ती सापडल्या नाही तर…. “
जालन्यातील जांब समर्थ येथील राम मंदिरातील सात पंचधातूंच्या मूर्ती चोरी गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. श्री समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या पंचधातुच्या मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्या. मात्र, अद्याप चोरांचा तपास लागला नाही. यावरुनच भाजपा आमदार यांनी पोलिसांना इशारा दिला आहे. हेही वाचा- तासगावचा ऐतिहासिक…
View On WordPress
#bjp-mla-बाबाराव-लोणीकर ताज्या बातम्या#जालना जांब-राम-मंदिर-चोरी#बबनराव लोणीकर लेटेस्ट न्यूज#बाबाराव-लोणीकर बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 January 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १५ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** राज्य सरकारशी संबंधीत आर्थिक व्यवहारांसाठी यापुढे कायम खाते क्रमांक - 'पॅन' अनिवार्य ** दिल्लीतल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींची फाशी कायम ** डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन विविध उपक्रमांनी साजरा ** आज मकरसंक्रांत ** आणि ** सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान **** राज्य सरकारशी संबंधीत आर्थिक व्यवहारांसाठी यापुढे कायम खाते क्रमांक - पॅन अनिवार्य करण्यात आला आहे. महसूल चोरीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. ऑनलाईन लॉटरीद्वारे मोठ्या प्रमाणावर महसूल चोरी होत असल्यामुळे, ऑनलाईन लॉटरीवर बंदी घालून, फक्त कागदी तिकिटांची लॉटरी सुरु ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांनी काल सामाजिक न्याय विभागाचाही आढावा घेतला. अनुसूचित जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - बार्टीच्या माध्यमातून प्रत्येक महसुली विभागाच्या मुख्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावं, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. **** राज्यभरात येत्या एक मे पर्यंत कचरा विलगीकरणाची प्रक्रिया अवलंबवावी, असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत काल नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष देतांनाच राज्यस्तरीय बृहत प्रकल्प आराखडा तयार कराव��, घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राज्यस्तरावर नोडल अधिकारी नेमावा, राज्यातल्या तीर्थक्षेत्रा��च्या ठिकाणी स्वच्छता, पाणी, रस्ते, स्वच्छतागृहांसाठी आराखडा तयार करावा, असे निर्देशही शिंदे यांनी दिले. **** दिल्लीतल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या विनय आणि मुकेश या आरोपींनी दाखल केलेली क्युरेटीव्ह म्हणजेच दुरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा यांच्या नेतृत्वाखालच्या पाच सदस्यांच्या पीठानं हा निर्णय दिला. अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता इतर दोन दोषींनी मात्र दुरुस्ती याचिका दाखल केली नव्हती. ही याचिका फेटाळल्यामुळे चारही आरोपींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांना येत्या २२ तारखेला फाशी देण्यात येणार आहे. **** जम्मू काश्मीरमधल्या माछील विभागात लष्कराच्या तळावर हिमस्खलन होऊन झालेल्या अपघातामध्ये चार सैनिक तर कुपवाडा इथं एक सैनिकाचा मृत्यू झाला. अशाच दुर्घटनेत पाच नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. दरम्यान, काश्मीरमध्ये उधमपूर इथं केंद्रीय औद्योगिक ���ुरक्षा दलात कार्यरत संजय ठाकरे या सैनिकाने काल तीन सहकारी सैनिकांची गोळ्या झाडून हत्या केली, त्यानंतर आत्महत्ये प्रयत्न केला. हत्या झालेल्या या तीन सैनिकांमध्ये वाशिम जिल्ह्यातल्या लाड कारंजा इथले तस्लिम सलीम मुन्नीवाले याचा समावेश आहे. **** डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन काल विविध उपक्रमांनी साजरा झाला. विद्यापीठात काल यानिमित्त ज्येष्ठ विचारवंत महावीर जोंधळे यांचं `नामांतराच्या मुळाशी` या विषयावर व्याख्यान झालं. आयुष्यभर ज्ञानलालसा अंगी बाळगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला विचार आणि कार्य जागतिक पातळीवर पोहचवलं. बाबासाहेबांचा हा विचार आणि ज्ञानालालसेचा विस्तार करुन तरुणांनी हे काम जागतिक पातळीवर न्यावं, असं आवाहन जोंधळे यांनी केलं. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचं कुलगुरू म्हणाले. मान्यवरांच्या हस्ते विविध पारितोषिकांचं वितरण यावेळी करण्यात आलं. दरम्यान, काल दिवसभर विद्यापीठातल्या आणि प्रवेशद्वारावरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला तसंच नामांतर शहीद स्तंभाला सर्वसामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. नामविस्तार दिनानिमित्त राज्य शासनाच्या समाज कल्या�� विभागाची स्वायत्त संस्था `बार्टीच्या` वतीनं विद्यापीठ प्रवेशद्वारा नजिक अनुसूचित जातींसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. औरंगाबादमधल्या विवेकानंद महाविद्यालयातही नामविस्तार दिनानिमित्त डॉ. समिता जाधव यांचं `डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नामांतर चळवळ आणि प्रासंगिकता` विषयावर व्याख्यान झालं. काल सायंकाळी विविध राजकीय पक्ष तसंच संघटनांनी सभा घेऊन, उपस्थितांना मार्गदर्शन केलं. **** मकर संक्रांतीचा सण आज राज्यभरात साजरा होत आहे. महिला वर्गामध्ये विशेष आकर्षण असलेला हा सण पारंपरिक पद्धतीनं तसंच तीळगुळ वाटप करून साजरा केला जातो. काल दिवसभर ठिकठिकाणच्या बाजारपेठा संक्रांतीसाठी मातीचे सुघडे, आणि इतर साहित्याच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीनं गजबजल्या होत्या. आज आबालवृद्धांमधून पतंग उडवण्याचा आनंदही लुटला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे पतंग बाजारपेठेत दाखल झाले आहेत. पक्ष्यांना इजा होईल असा मांजा पतंग उडवण्यासाठी वापरू नये, असं आवाहन पक्षीमित्रांकडून करण्यात आलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** औरंगाबाद इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात सर्पदंशाच्या सात हजारावर रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉ. दिलीप पुंडे यांना डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नंदूरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यात शंभराहून अधिक गावातून पाच हजारावर महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याऱ्या सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा गावीत यांना डॉ.भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि २१ हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. **** विधानपरिषद निवडणुकीसाठी यवतमाळ इथं महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी तसंच भाजपचे सुमित बजोरिया यांनी काल अर्ज दाखल केले. शिवसेनेत बंडखोरी झाली असून माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. **** सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधान सभेवरील निवडीमुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतर्फे संजय दौंड यांनी काल अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्र्वादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, तसंच काँग्रेसचे मंत्री ��िजय वडेट्टीवार उपस्थित होते. विधान परिषदेसाठी भाजपा आणि मित्र पक्षाचे उमेदवार राजन तेली यांनीही आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला. **** औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं तीन, तर भारतीय जनता पक्षानं एक सभापतीपद मिळवलं. भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची महिला आणि बाल कल्याण सभापती म्हणून, तर शिवसेनेच्या मोनाली राठोड यांची समाज कल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे किशोर बलांडे आणि अविनाश गलांडे हे प्रत्येकी ६० मतं मिळवून विजयी झाले. त्यांना पुढच्या सभेत विषय समिती सभापती पद देण्यात येणार आहे. **** हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या रुपाली पाटील गोरेगावकर यांनी बिनविरोध निवड झाली आहे. समाज कल्याण सभापतीपदी शिवसेनेचे फकीरा मुंडे हे पस्तीस मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला चव्हाण आणि काँग्रेसचे बाबाराव जुमडे यांची विषय सभापतीपदी निवड झाली. **** माजी मंत्री आणि परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या मातोश्री अन्नपूर्णाबाई लोणीकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ७८ वर्षांच्या होत्या. **** हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या तेलगाव पाटी जवळ काल एक बस उलटून झालेल्या अपघातात दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही बस माजलगावकडून नांदेडला जात होती. **** रेशीम उद्योग हा ऊसाला पर्याय ठरू शकतो, यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळावं, असं आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केलं आहे. ते काल लातूर जिल्ह्यात औसा इथं तुती लागवड आढावा बैठकीत बोलत होते. राज्यात औसा तालुक्याला रेशीम उद्योगाचे केंद्रबिंदू बनवायचे आहे. शेतकऱ्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ही योजना राबवण्यात येत असल्याचं आमदार पवार यांनी सांगितलं. **** नांदेड इथल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची प्रलंबित कामं वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. काल मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत चव्हाण बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी या बैठकीला उपस्थित होते. जिल्हा नियोजन तसंच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे याबाबतचे प्रस्ताव पाठवावेत आणि ही कामं पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले. **** मूल्यवर्धन संकल्पनेमुळे शिक्षक तसंच विद्यार्थ्यांत चांगले बदल होत असल्याचं, मूल्यवर्धन संकल्पना मांडणारे शिक्षण तज्ज्ञ शांतिलाल मुथा यांनी म्हटलं आहे, ते काल लातूर इथं बोलत होते. राज्यभरात ६७ हजारांहून अधिक शाळांमध्ये हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या राबवण्यात येत असून, ४४ लाख विद्यार्थी मूल्यवर्धित कृती करतात, असं मुथा यांनी नमूद केलं. **** इंटरइंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्टस असोसिएशनच्या वतीनं हिंगोली इथं आयोजित मुलींच्या मराठवाडा विभागीय क्रीडा स्पर्धेचं काल उद्घाटन झालं. या स्पर्धेत हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या तंत्रशिक्षण संस्थेतल्या जवळपास चार हजारावर विद्यार्थीनींनी सहभाग घेतला आहे. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 January 2020 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४ जानेवारी २०२० सायंकाळी ६.०० ****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामिवस्तार दिन आज विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. विद्यापीठातील तसंच प्रवेशद्वारासमोरील बाबासाहेबांचा पुतळा आणि नामांतर शहीद स्तंभानजिक विविध पक्ष, संघटनांकडून अभिवादनपर कार्यक्रम सुरू आहेत. केंद्रीय ��माज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले या��ची बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभा होणार आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नावलौकीक जागतिक पातळीवर पोहचवण्याचं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार महावीर जोंधळे यांनी केलं आहे. आयुष्यभर ज्ञानलालसा अंगी बाळगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला विचार आणि कार्य जागतिक पातळीवर पोहचवलं. बाबासाहेबांचा हा विचार, ज्ञानालालसा याचा विस्तार करुन तरुणांनी हे काम जागतिक पातळीवर न्यावं, असं ते यावेळी म्हणाले. विद्यापीठाच्या सहव्वीसाव्या नामविस्तार दिनानिमित्त ‘नामांतराच्या मुळाशी’ या विषयावर व्याख्यान देताना जोंधळे बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर विविध ठिकाणी शैक्षणिक, सामाजिक विचार मांडले आणि या विचारांना पुढं नेण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचं कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी यावेळी म्हटलं. विविध परीक्षांतील पंचवीस पारितोषिकांचं वितरण यावेळी करण्यात आलं.
****
औरंगाबादमधील विवेकानंद महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त देवगिरी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.समिता जाधव यांचं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नामांतर चळवळ आणि प्रासंगिकता’ विषयावर व्याख्यान झालं.
****
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात तेलगाव पाटी जवळ एक बस उलटून झालेल्या अपघातात आज दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातग्रस्त बसमध्ये तेवीस प्रवासी होते आणि ही बस माजलगावकडून नांदेडला जात होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी नांदेड, परभणीकडे उपचारांसाठी रवाना झाले आहेत. अपघात झाला त्या ठिकाणी कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे. त्यामुळे बसचा वेग कमी होता. समोरून येणाऱ्या वाहनाला जागा करून देताना ही बस रस्त्याच्या खाली उतरून उलटली.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या रुपाली पाटील गोरेगावकर यांनी बिनविरोध निवड झाली आहे. समाज कल्याण सभापतीपदी शिवसेनेचे फकीरा मुडें हे पस्तीस मतांनी विजय झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला चव्हाण आणि काँग्रेसचे बाबाराव जुमडे यांची विषय सभापतीपदी निवड झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठीही आज निवडणूक झाली. यामध्ये चार विषय समित्यांपैकी तीन सभापतीपदं शिवसेनेनं जिंकली आहेत. एका सभापतीपदी भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. शिवसेनेचे किशोर बलांडे आणि अविनाश गलांडे हे प्रत्येकी ६० मतं घेवून विजयी झाले आहेत. त्यांना पुढील सभेत विषय समिती सभापती पद देण्यात येणार आहे. भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची महिला आणि बाल कल्याण सभापती म्हणून तर शिवसेनेच्या मोनाली राठोड यांची समाज कल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
****
निर्भया अत्याचार प्रकरणातील दोन आरोपी, मुकेश आणि विनय यांनी दाखल केलेली सुधार याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. यामुळे या प्रकरणातील चारही आरोपींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चारही आरोपींना येत्या बावीस तारखेला फाशी दिली जाणार आहे.
****
विधानपरिषद निवडणुकीसाठी यवतमाळमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी तसंच भाजपचे सुमित बजोरिया यांनी आज अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करताना गृहमंत्री अनिल देशमुख, वनमंत्री संजय राठोड, उर्जा मंत्री नितीन राऊत, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. शिवसेनेत बंडखोरी झाली असून माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
****
माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या मातोश्री अन्नपूर्णाबाई दत्तराव लोणीकर यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ७८ वर्षांच्या होत्या.
****
भारतानं ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात २५६ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियानं मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरू या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारताना भारताच्या संघाला पाच चेंडू शिल्लक असताना ���५५ धावांमध्ये बाद केलं. सलामीवीर शिखऱ धवननं एक्क्याण्णव चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या तर के. एल. राहूलनं ४७ आणि ऋषभ पंतनं २८ धावा केल्या. मिचेल स्टार्कनं ५६ धावांत तीन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू झाला असून दोन षटकांत बिनबाद आठ धावा झाल्या आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 SEP. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १६ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
**** ** स्वच्छता हीच सेवा या मोहिमेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रारंभ ** महाराष्ट्र मिशन एक मिलीयन या फुटबॉल महोत्सवात २५ लाखावर विद्यार्थ्यांचा सहभाग ** नाशिक बालमृत्यू ��्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी ** सरकारचं नियोजन कोलमडल्याची अजित पवार यांची टीका आणि ** मराठवाड्यात काल सलग तिसऱ्या दिवशी अनेक जिल्हयात मुसळधार पाऊस **** स्वच्छता राखण्याची जबाबदारी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांची नव्हे तर आपणा सगळ्यांची असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचा उत्तर प्रदेशात कानपूर इथं राष्ट्रपतींच्या हस्ते काल शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. अस्वच्छता हा समाजासाठी अभिशाप असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. येत्या दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला या अभियानाचा समारोप होणार आहे. स्वच्छता अभियानाच्या निमित्तानं कचरा न करण्याचा तसंच आपलं शहर स्वच्छ करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचा काल मुंबई इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात सर्वत्र या मोहिमेला कालपासून प्रारंभ झाला. औरंगाबाद इथं जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. नांदेड इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, बीड इथं जिल्हाधिकारी एम डी सिंह, नगराध्यक्ष भारत भुषण क्षीरसागर, हिंगोली नगरप पालिकेत नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याहस्ते या मोहिमेचं उद्घाटन झालं. **** "महाराष्ट्र मिशन एक मिलीयन" या फुटबॉल खेळ महोत्सवाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई इथं प्रारंभ केला. पुढच्या महिन्यात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या फुटबॉल खेळ महोत्सवाअंतर्गत राज्यात दहा लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात २५ लाख ६२ हजार ३५३ विद्यार्थी फुटबॉल खेळले असल्याचं, क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं विभागीय क्रीडा संकुलावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत या मोहिमेला प्रारंभ झाला. अनेक शाळांचे सुमारे पाच हजारावर विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. लातूर शहरात यानिमित्त विद्यार्थ्यांची संदेशफेरी काढण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुलावर शालेय विद्यार्थ्यांच्या ४० संघात फुटबॉल सामने खेळवले गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड इथं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी तर उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी फुटबॉल मिशन रॅलीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं. या ��नुषंगानं उस्मानाबाद जिल्ह्यात आयोजित संदेश फेरीमध्ये सुमारे ४७ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर, हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे, तर बीड इथं जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी यांच्या उपस्थितीत या फुटबॉल खेळ महोत्सवाला सुरूवात झाली. **** पेट्रोलची मूळ किंमत ३० रुपये प्रतिलीटर असताना, ८१ रुपये का वसूल केले जातात, असा सवाल, भाजपचे गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. ते गोंदिया इथं बोलत होते. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करणार असून, वेळ पडल्यास लोकसभेत देखील हा मुद्दा उचलणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. **** नाशिक जिल्हा रुग्णालयात झालेले ५५ बालमृत्यू हे राज्य सरकारचं अपयश असून, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आरोग्य, महिला आणि बाल कल्याण तसंच आदिवासी विकास या तीन खात्यांच्या मंत्र्यांवर सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप होत असूनही मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली. **** सरकारचं नियोजन कोलमडलं असून मंत्र्यांची आपल्या खात्यावर पकड नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली आहे. काल औरंगाबाद इथं डॉक्टर उल्हास उढाण यांनी लिहिलेल्या ‘यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्राचा आशय’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी कर्जमाफीची केवळ आश्वासनं, वीज भारनियमन, विद्यापीठाचे रखडलेले निकाल, आदी मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं. रेल्वे फलाटांची उंची वाढवण्याचा प्रश्न जैसे थे असताना, बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवण्यात सरकार गुंग असल्याचं पवार म्हणाले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या १७ सप्टेंबरला साजरा होत असून, औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभाजवळ सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल. बीड इथं जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यापूर्वी प्रियदर्शनी उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. **** मराठवाड्यात कालही अनेक जिल्हयात मुसळधार पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि परिसरात दुपारनंतर सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात तसंच अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं, वाहनधारकांची तारां��ळ उडाली. औरंगाबाद नजिक चिकलठाणा इथं घराचं छत कोसळून दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर परवा पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह काल सापडला. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात काल दुपारच्या सुमारास दोन तास भीज पाऊस झाला, कपाशीसाठी हा पाऊस लाभदायक असल्याचं, शेतकरी वर्गातून बोललं जात आहे. या पावसामुळे भूजलाचा स्तर वाढण्यास मदत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला. यामुळे नदीकाठाच्या काही गावांचा संपर्क तुटला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जांब मंडळात अतिवृष्टी झाली तर उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसात तेर नदीला आलेल्या पुरात एक जण वाहून गेला. वाशिम जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीवरच्या बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याची शक्यता असल्यानं हिंगोली जिल्ह्यातल्या भगवती, तपोवन, कण्हेरगाव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातून ७० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. चंद्रभागेनदीतही उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून पंढरपूर इथं नदीकाठावरची अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. **** बीड जिल्ह्यातल्या आष्टी मेहकरी या रस्त्यावर बस सेवा बंद करण्यात आली आहे. हा रस्ता दुरुस्त करुन बस सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. **** परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात एका ग्रामसेवकाला एक हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. सतीश देशपांडे असं या त्याचं नाव असून, प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेच्या लाभार्थ्याकडून त्यानं लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं त्याला अटक करून, सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. **** जालना जिल्ह्यातल्या २३२ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी कालपासून ऑनलाइनं पद्धतीनं अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सरपंच आणि सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवारांना २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार असून सात ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. **** लातूर शहरात औद्योगिक वसाहतीतल्या हरित पट्ट्यावर असलेली अष्टविनायक प्रतिष्ठानच्या इंग्रजी शाळेची अनधिकृत इमारत रिकामी करून दिवाळी सुटीपर्यंत महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत. ****
0 notes