#कार्यकर्त्यांसह
Explore tagged Tumblr posts
news-34 · 2 months ago
Text
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 21.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर-मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश-भोकरमधून श्रीजया चव्हाण तर फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांना संधी 
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका
कळमनुरीचे आमदार संतोष लक्ष्‍मण बांगर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा
कृषी उत्पादनांचा भाव आणि किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार
आणि
महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड अजिंक्य-बंगळुरू कसोटीत��ी न्यूझीलंडचा आठ गडी राखून विजय
सविस्तर बातम��या
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट इथून भीमराव केराम, भोकर - श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव - राजेश पवार, तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून तुषार राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोली मतदारसंघातून तान्हाजी मुटकुळे,
जिंतूर - मेघना बोर्डीकर, परतूर - बबनराव लोणीकर, बदनापूर - नारायण कुचे, तर भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण,
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केज मतदारसंघातून नमिता मुंदडा,
 निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, औसा - अभिमन्यू पवार, आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील निवडणूक लढवणार आहेत.
याशिवाय नागपूर दक्षिण - पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस,
कामठी - चंद्रशेखर बावनकुळे, जामनेर - गिरीश महाजन, शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत मलबाद हिल मधून मंगलप्रभात लोढा, तर कुलाबामतदार संघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका जाहीर केली आहे. काल आंतरवाली सराटी इथं झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका विशद केली. ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार उभे करावेत, अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदार संघात मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या उमेदवाराला मतदान करावं आणि जिथे आपला उमेदवार उभा नसेल, तिथे जो उमेदवार बॉण्डपेपरवर आपल्या मागण्यांना समर्थन देईल, त्या उमेदवाराला मतदान करण्या��ा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काल मुंबईत बैठक झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भात होती असं ठाकरे यांनी भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल मुंबईत आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. बीड विधानसभेसाठी आपण पक्षाकडे प्रस्ताव दिला असून, संघटनेच्या सामाजिक कार्याला राजकीय जोड देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ज्योती मेटे यावेळी म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतरही अनेक पक्षांचे नेते पक्षांतर करत आहेत.
Byte…
माजी आमदार कपिल पाटील यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिल्ली इथं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. 
**
नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
**
वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. देवळे यांनी यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीतील आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
**
बीड इथले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काल भारतीय जंतापक्षातुन बाहेर पडत असल्याचं  काल जाहीर केलं. आपली पुढची राजकीय दिशा लवकरच स्‍पष्ट करु, असं मस्के यांनी सांगीतलं आहे.
****
बीड जिल्ह्यात सहाही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ��तदार संघात मतदान यंत्रांचं प्रथमस्तरीय संगणकीकृत सरमिसळ काल करण्यात आली. यावेळी दोन हजार ८९७ बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि तीन हजार १३८ व्हीव्हीपॅटचं वाटप विधानसभा मतदार संघांना करण्यात आलं.
****
लातूर इथंही काल ही प्रक्रिया पार पडली, जिल्ह्यात ६ विधानसभा मतदारसंघातील २ हजार १४२ मतदान केंद्रांसह एका सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष लक्ष्‍मण बांगर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  १८  ऑक्टोबर रोजी कळमनुरी इथं  कार्यकर्त्यांना संबोधित करताना मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुत्ते यांनी बांगर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून ‘कृषी चौपाल’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली.
****
दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर १०८ फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोचणार आहेत. दक्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेली, काझिपेट आणि बेंगळुरूसाठी ��४ फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघानं विजेतेपद पटकावलं आहे. काल दुबईमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद १५८ धावा केल्या, उत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ बाद १२६ धावाच करु शकला. न्यूझीलंडची अमेलिया कीर ही सामनावीर आणि मालिकावीर ठरली.
****
बंगळूरु कसोटीत न्यूझीलंडनं भारतावर आठ गडी राखून विजय मिळवत, तीन सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात अवघ्या ४६ धावा करणाऱ्या भारतीय संघानं, दुसऱ्या डावात उभारी घेत न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं होतं. मात्र, ३५६ धावांची पिछाडी भरून काढल्यावर भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. विजयासाठी ठेवलेलं १०७ धावांचं माफक आव्हान पाहुण्या संघानं केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं.
****
परभणी इथं कालपासून राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि महानगरपालिका आयुक��त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं.
१४ वर्षाखालील मुले मुली यांच्यातल्या या तीन दिवसीय स्पर्धेत एकूण २०० खेळाडू सहभागी झाल्याचं क्रीडा अधिकारी कविता लावंदे यांनी सांगितलं
****
लातूर जिल्ह्यात, सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाशांनी त्याची तक्रार करावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ई-मेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर येथील विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत  येणाऱ्या मंदिर अर्चक पुरोहित आसामच्या वतीने काल शहरातील धार्मिक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात शहरातील विविध संस्था,  संघटना तसंच उपासना मंडळाचे १६०० पदाधिकारी सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात अतिवृष्टीची नोंद झाली. काल ��काळी अप्पर मानार धारणाचे पाच तर विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला आहे. यंदा १०६ पूर्णांक ९३ टक्के पावसाची नोंद झाली असून, पावसानं सरसरी ओलांडल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
mhlivenews · 11 months ago
Text
ठाकरेंचा विश्वासू शिलेदार, आदिवासींचा चेहरा म्हणून ओळख; आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही ठाकरेंनी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार केलेला नेत्याने ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार आमश्या पाडवी यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदल्या दिवसापर्यंत आपण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 2 years ago
Text
टँकरचे पाणी ; 'एफडीए संचालकांनी हात वर केल्याने गोमंतकीयांनी सतर्क राहावे'
पणजी : गोमंतकीयांना स्वच्छ, प्रदूषित विरहीत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची नसल्याचे सदर खात्याच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी स्पष्ट केल्याने आता गोमंतकीय नागरिकांनी सतर्क राहून त्यांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता स्वत:च तपासण्याचे आवाहन काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केले आहे. काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांसह एफडीएच्या संचालकांना पिण्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
रोहित पवार यांना कोणत्याही क्षणी धक्का, प्रवीण घुलेंचा कार्यकर्त्यांसह निर्धार!! नगर जिल्ह्यात कोणत्या घडामोडी?
रोहित पवार यांना कोणत्याही क्षणी धक्का, प्रवीण घुलेंचा कार्यकर्त्यांसह निर्धार!! नगर जिल्ह्यात कोणत्या घडामोडी?
रोहित पवार यांना कोणत्याही क्षणी धक्का, प्रवीण घुलेंचा कार्यकर्त्यांसह निर्धार!! नगर जिल्ह्यात कोणत्या घडामोडी? अहमदनगरः अहमदनगरला कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) कोणत्याही क्षणी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले (Pravin Ghule) भाजपात (BJP) जाण्याच्या तयारीत आहेत. कर्जत शहरात कालच कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. तर सर्व…
View On WordPress
0 notes
marathitv9-blog · 6 years ago
Link
Dhairyasheel Mane meets Raju Shetti कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र मंत्रिमंडळाची चर्चा सुरु झाली आहे. कोणत्याही निवडणुकीत देशापेक्षा नेहमीच वेगळं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतं. राजकारणातील नवा कोल्हापुरीत पॅटर्न समोर आला आहे. शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी ज्यांचा पराभव केला त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रीचे आशीर्वाद घेतला.
खासदार धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांसह राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधलाच, शिवाय त्यांच्या मातोश्रीचे आशीर्वादही घेतले. यावेळी राजू शेट्टींच्या आईने धैर्यशील माने यांचं औक्षण केलं.  मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, तुमचा आशीर्वाद राहूदे सर्वकाही चांगलं होईल, असं धैर्यशील माने राजू शेट्टी यांच्या आईला म्हणाले.
1 note · View note
nandedlive · 2 years ago
Text
जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाचा दणका!
Tumblr media
Photo Credit-Facebook/Jitendra Awhad पुणे | ठाण्यातल्या (Thane News) विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावताच जितेंद्र आव्हाडांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. आव्हाडांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु असतानाच जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात प्रवेश केला होता. त्यावेळी चित्रपटगृहात गोंधळ झाला. त्यावेळी कार्यकर्ते आणि प्रेक्षकांमध्ये राडा झाला. हेच प्रकरण आव्हाडांना भोवलं. विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Read the full article
0 notes
kokannow · 2 years ago
Text
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे कणकवली जल्लोषात स्वागत
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे कणकवली जल्लोषात स्वागत
शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांसह, सैनिक फेडरेशन महाराष्ट्रचे पदाधिकारी उपस्थित दिगंबर वालावलकर । कणकवली : माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांचे पहिल्यांदाच कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे जल्लोषात स्वागत करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी कणकवली छत्रपती शिवाजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ .मोरे यांचा भाजपा मध्ये प्रवेश
नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ .मोरे यांचा भाजपा मध्ये प्रवेश
नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ.विक्रांत मोरे, नगरसेविका शोभाताई मोरे, नगरसेवक अर्जुन मराठे, नगरसेवक मिलिंद बाफना यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. याच वेळी पलूस (जि. सांगली ) येथील उद्योजक आणि सुमार��� १०० काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचाराचे अवघे तीन दिवस शिल्लक - सभा आणि पदयात्रांना वेग
विधान परिषदेच्या चार जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर-१० जूनला मतदान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करणार
छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव नामांतराविरोधातल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या
आणि
हिंगोली जिल्ह्यात खासगी शेती पीक उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्याकडून हरभरा विक्रीत १३ लाखांचा अपहार
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचाराचे अवघे तीन दिवस राहिले असल्यानं, प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक सभा, बैठका, रोड शो, पदयात्रा आदींच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल जालना इथं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या ८० कोटी गरिबांचा जीवनस्तर उंचावल्याचा दावा शहा यांनी केला. घरकुल, पेयजल, गॅस जोडणी, आयुष्मान भारत, कलम ३७०, अयोध्येतील राम मंदिर, तीन तलाक, दहशतवादाचा बिमोड, आदीच्या माध्यमातून केलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. इंडिया आघा��ीकडे नीती, नियत आणि नेता नसल्याची टीका त्यांनी केली. रावसाहेब दानवे यांच्याकडे येत्या काळात मोठी जबाबदारी देण्याचे संकेतही शहा यांनी या भाषणातून दिले.
****
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत राहिले. त्यांच्यासमोर मुख्यमंत्रिपद नगण्य असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल नाशिक इथं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला, त्यांचं स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातल्या मोदी सरकारचं धोरण शेतकरी हिताचं नसल्याची टीका केली आहे. अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ काल श्रीगोंदा इथं प्रचार सभेत ते बोलत होते.
दरम्यान, बीड मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची आज संध्याकाळी अंबाजोगाई इथं सभा होणार आहे.
****
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ मेळावा घेतला. अहमगनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची काल धेवगाव तालुक्यातल्या बोधेगाव इथं सभा झाली.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं विवेकानंद महाविद्यालयात चर्चासत्र घेतलं.
जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी काल पिंप्रि राजा परिसरात सभा घेतली.
****
विधान परिषदेच्या जुलै महिन्यात रिक्त होणाऱ्या चार जागांचा निवडणूक कार्यक्रम, निवडणूक आयोगानं काल जारी केला. या चार जागा���मधे मुंबई आणि कोकण विभागातल्या पदवीधर तसंच मुंबई आणि नाशिक विभागातल्या शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदार संघाचे निरंजन डावखरे, मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचे अनुक्रमे किशोर दराडे आणि कपिल पाटील हे सदस्य येत्या सात जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या निवडणुकीसाठी १५ मे पासून २२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २४ मे रोजी अर्जांची छाननी होईल तर २७ मे रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. १० जून रोजी मतदान होणार असून, १३ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या आधी २२ एप्रिलला राष्ट्रपतींनी तीन पद्मविभुषण, आठ पद्मभूषण तसंच ५५ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते.
****
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशा नामांतराच्या शासनाच्या निर्णयावरोधात दाखल केलेल्या याचिका, मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून ��ावल्या. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती अरीफ डॉक्टर यांनी हा निर्णय देताना, सरकारच्या नामांतराच्या निर्णयात बेकायदेशीर असं काही नसल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचं स्वागत करत, उच्च न्यायालयाचे आभार व्यक्त केले. काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलतांना, बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं असून, संभाजीनगर हे नाव सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनीच दिलं होतं, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं.
****
केंद्रीय लोकसेवा आयोग -यूपीएससी मार्फत घेतलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस-आय.एफ.एस परीक्षेत, लातूरच्या प्रतिक्षा काळे यांनी महाराष्ट्रात पहिला तर देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. सध्या त्या मेळघाटात वन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा येत्या सहा जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातल्या एकूण ५२४ पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव इथल्या एका खासगी शेती पीक उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्याने, ११ शेतकऱ्यांचा २३२ क्विंटल हरभरा परस्पर विक्री करत, १३ लाखांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सुरज प्रताप मोरे असं या अधिकाऱ्याचं नाव असून, १६ मे ते ११ सप्टेंबर २०२३ या कालावधीत नाफेडने या कंपनीमार्फत खरेदी केलेला हरभरा नाफेडकडे पोहोचवण्याऐवजी मोरे यानं त्याची परस्पर विक्री केली, त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड लोकसभा मतदार संघातल्या निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं आजपासून १२ मे पर्यंत टपाली मतदान घेण्यात येणार आहे. या मतदार संघात घरोघरी मतदार चिट्ठी वाटपाची कार्यवाही देखील सुरू झाली आहे.
****
बीड, जालना आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे.
‘‘आपण सगळ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, तसेच निर्भयपणे आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे. सर्व मतदारांना मी आवाहन करतो, की मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये जास्तीत जास्त मतदान आपण यावेळेस करावं.’’
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या मतदान केंद्रावर पाळणाघरांची सुविधा देण्यात येत आहे. त्यासाठी म���िला आणि बालविकास विभाग सज्ज झाला असून, या पाळणाघरांसाठी पाळणे, खेळणी, बेबी फूड आदी साहित्य संकलित करणं सुरु झालं आहे.
दरम्यान, सर्व कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विविध आस्थापनांनी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी द्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथले कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांनी केलं आहे.
****
लातूर लोकसभा मतदार संघात सर्व सहा विधानसभा क्षेत्रातली मतदान यंत्रं लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतन इथल्या सुरक्षा कक्षात आणण्यात आले. निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार तसंच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, यांच्या उपस्थितीत या कक्षांना सील करण्यात आलं.
दरम्यान, लातूर तसंच उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात परवा झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी आली आहे. लातूर इथं ६२ पूर्णांक ५९ शतांश टक्के तर उस्मानाबाद इथं ६३ पूर्णांक ८८ शतांश टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात कमी पाऊस पडल्यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावं, तसंच जनावरांना देखील पाणी, चारा उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी वैजापूर पंचायत समितीचे उपसभापती मनसुख झांबड यांनी केली आहे. या मागणीबाबत त्यांनी नुकतच जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
****
नांदेड शहरात कुठेही पाणी टंचाई नसून फक्त जलवाहिनीच्‍या तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा काही दिवस विस्कळीत झाला होता. आगामी काळात नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी आरक्षित असून नागरिकांनी पाणीटंचाई बाबत कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात काल सायंकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. अहमदपूर-चाकूर तालुक्यासह जिल्ह्यात इतरही काही भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.
****
0 notes
mhlivenews · 11 months ago
Text
विधानसभेला दोनदा पराभव, तरीही ठाकरेंकडून संधी, आमदारकी दिली; तोच नेता शिंदे गटात जाणार?
नंदूरबार: लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही ठाकरेंनी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार केलेला नेता ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आदल्या दिवसापर्यंत आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगणारे आमदार आमश्या पाडवी रात्री त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्ष प्रवेशासाठी रवाना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
सर्वसामान्य, वंचित, पीडित सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सरकार करेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
सर्वसामान्य, वंचित, पीडित सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सरकार करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरात जोरदार स्वागत ठाणे, दि. ४ (जिमाका): मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज  ठाणे शहरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह वरूणराजानेही जोरदार हजेरी लावली. ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर चेक नाका येथे जोरदार स्वागतानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे शक्तीस्थळ आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे भेट देऊन आनंद…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र: खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल, रात्री 10 नंतर 14 कार्यकर्त्यांसह भजन वाजवले आणि लाऊडस्पीकरवर नियम मोडले
महाराष्ट्र: खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल, रात्री 10 नंतर 14 कार्यकर्त्यांसह भजन वाजवले आणि लाऊडस्पीकरवर नियम मोडले
नवनीत राणा आणि रवी राणा (फाइल फोटो) प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर वाजवणे, अटींचे उल्लंघन करून रॅली काढणे, गर्दी जमवणे या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत राणा, खासदार अमरावती, महाराष्ट्रनवनीत राणा) पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. राणा दाम्पत्यासह 14 कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री 10 नंतर यावरील लाऊडस्पीकर (लाउडस्पीकर पंक्तीखेळणे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
वसंत मोरे-राज ठाकरेंची भेट:राज ठाकरेंच्या भेटीसाठी वसंत मोरे मोजक्या कार्यकर्त्यांसह पुण्याहून रवाना, भेटीत काय भूमिका घेणार याकडे लक्ष
वसंत मोरे-राज ठाकरेंची भेट:राज ठाकरेंच्या भेटीसाठी वसंत मोरे मोजक्या कार्यकर्त्यांसह पुण्याहून रवाना, भेटीत काय भूमिका घेणार याकडे लक्ष
वसंत मोरे-राज ठाकरेंची भेट:राज ठाकरेंच्या भेटीसाठी वसंत मोरे मोजक्या कार्यकर्त्यांसह पुण्याहून रवाना, भेटीत काय भूमिका घेणार याकडे लक्ष Go to Source
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
युवा फोरमकडून महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना ३० जूनपर्यंतचा अल्टिमेटम
युवा फोरमकडून महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना ३० जूनपर्यंतचा अल्टिमेटम
महामार्गावरील समस्या दूर करण्याची केली मागणी कुडाळ : युवा फोरमच्या सदस्यांनी तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला भेट देऊन आपल्या मागण्या पत्राद्वारे सुपूर्द केल्यात. रस्त्यावरील तुंबणारे पाणी आणि त्यामुळे होणारे अपघात यावर त्वरीत योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कधीही कार्यरत नसलेले पथदिवे तातडीने दुरुस्त करावेत. युवा फोरमने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचाराचे अवघे तीन दिवस शिल्लक-सभा आणि पदयात्रांना वेग
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज जालन्यात सभा तर श्रीगोंद्यात शरद पवार यांचा मतदारांशी संवाद
विधान परिषदेच्या चार जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर-१० जूनला मतदान
आणि
छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव नामांतराविरोधातल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या-मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचाराचे अवघे तीन दिवस राहिले असल्यानं, प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक सभा, बैठका, रोड शो, पदयात्रा आदींच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना इथं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. शहरातल्या डॉ. फ्रेजर बॉय हायस्कूल मैदानात आज संध्याकाळी ही सभा होत आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत राहिले. त्यांच्यासमोर मुख्यमंत्रीपद नगण्य असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज नाशिक इथं, विजय करंजकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला, त्यांचं स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. बाळासाहेबांचे वारस असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मनात मात्र अनेक वर्षांपासून मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा होती, अशी टीकाही शिंदे यांनी यावेळी केली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारचे धोरण शेतकरी हिताचे नसल्याची टीका केली आहे. अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा इथं प्रचार सभेत पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार माजी आमदार राहुल जगताप उपस्थित होते.
दरम्यान, बीड मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची उद्या गुरुवारी संध्याकाळी अंबाजोगाई इथं सभा होणार आहे.
****
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ मेळावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोर्दीच्या काळात देशातील सर्वच घटकांसाठी ��ल्याणकारी योजना राबवल्या जात असून 'सबका साथ, सबका विकास' साधला जात आहे, असं फडणवीस म्हणाले. विरोधकांकडे मुद्देच उरलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी संविधान बदलण्यासंदर्भातला खोटा प्रचार सुरु केल्याची टीका फडणवीस यांनी केली.
****
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज धुळे इथं वार्ताहर परिषद घेत, केंद्र सरकारवर टीका केली. मोदी सरकारने महागाई वाढवली, नोकरशाही या सरकारला वैतागली असल्याचं, पटोले यांनी म्हटल्याचं वृत्त आहे.
****
विधान परिषदेच्या जुलै महिन्यात रिक्त होणाऱ्या ४ जागांच्या निवडणुकीबाबतच वेळापत्रक आज निवडणूक आयोगाने जारी केलं. या चार जागांमधे मुंबई आणि कोकण विभागातील पदवीधर तसंच मुंबई आणि नाशिक विभागातील शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदार संघाचे निरंजन डावखरे, मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचे अनुक्रमे किशोर दराडे आणि कपिल पाटील हे सदस्य येत्या ७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या निवडणुकीसाठी १५ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, २२ मे ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे. २४ मे रोजी अर्जांची छाननी होईल तर २७ मे रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. १० जून रोजी मतदान होणार असून, १३ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण नाशिक आणि दिंडोरी या दोन लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशा नामांतराच्या शासनाच्या निर्णयावरोधात दाखल केलेल्या याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचं स्वागत करत, उच्च न्यायालयाचे अभार व्यक्त केले आहेत. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं असून, संभाजीनगर हे नाव सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनीच दिलं होतं, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं. हा जनभावनेचा विजय असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. मात्र या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणारे याचिकाकर्ते महाविकास आघाडीचे समर्थक असून, महाविकास आघाडीचा खरा चेहरा समोर आल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.
****
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथल्या एका खासगी शेती पीक उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्याने ११ शेतकऱ्यांचा २३२ क्विंटल हरभरा परस्पर विक्री करत १३ लाखांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सुरज प्रताप मोरे असं या अधिकाऱ्याचं नाव असून १६ मे ते ११ सप्टेंबर २०२३ या कालावधीत कंपनीमार्फत शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केला होता, या कंपनीकडे नाफेडचे खरेदी केंद्र आहे. मात्र कंपनीने खरेदी केलेला हरभरा नाफेडकडे पोहोचवण्याऐवजी मोरे याने त्याची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे लोकसभा मतदार संघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक पूर्ण चंद्र किशन यांनी आज धुळे जिल्ह्यातल्या मालेगाव मध्य, बाह्य आणि बागलाण या तीन विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. जास्त मतदान केंद्र असणाऱ्या ठिकाणी मतदारास सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, मतदानाच्या दिवसापूर्वी शेवटच्या ७२ आणि ४८ तासांत करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना किशन यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
****
निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावं यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात, मतदार सुलभता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे, या मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ��ाळासाहेब कोळेकर यांनी ही माहिती दिली आहे. हे मतदान सुलभता केंद्र ९ मे आणि १० मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.
****
बीड लोकसभा मतदार संघातल्या निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं उद्या ९ मे पासून १२ मे पर्यंत टपाली मतदान घेण्यात येणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कविता जाधव यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, बीड लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार असून घरोघरी मतदार चिट्ठी वाटपाची कार्यवाही सुरू झालेली आहे. या अंतर्गत आज यादी भाग क्रमांक १९४ चे बी. एल. ओ. विलास वामन वीर आणि बीड तहसील कार्यालयातील कर्मचारी अनिल विद्यागर यांनी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांना त्यांच्या घरी जाऊन मतदार माहिती चिठ्ठी सुपूर्द केली.
****
नंदुरबारमध्ये आजपासून ८५ वर्षावरील तसंच दिव्यांग नागरिकांच्या गृह मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. यासाठी २६९ दिव्यांग आणि ८५ वर्षावरील एक हजार १५४ नागरीकांनी नोंदणी केली आहे.
****
नांदेड इथल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या अनुसया शासकीय महिला वसतिगृह ही संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत आणि अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. वय वर्ष १८ वर्षांपुढील गरजू महिलांना तसच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी पुनर्वसनाच्या दृष्टीने संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. गरजू महिलांनी संस्थेचा लाभ घ्यावा, असं आवाहन शासकीय महिला राज्यगृहच्या अधीक्षक एस. एम. पुजलवार यांनी केले आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात कमी पाऊस पडल्यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावं, तसंच जनावरांना देखील पाणी, चारा उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी वैजापूर पंचायत समितीचे उपसभापती मनसुख झांबड यांनी केली आहे. या मागणीबाबत त्यांनी नुकतच जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. तालुक्यातल्या शेतकऱ्यांना खरिप हंगामातला उर्वरित पीकविमा तसंच रब्बी हंगामातला पीकविमा लवकर देण्यात यावा असंही या निवेदनात म्हटलं आहे.
****
नांदेड इथून सुटणारी नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज तिची नियोजित वेळ सकाळी साडेनऊ ऐवजी सायंकाळी पाच वाजता सुटली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंटस्‌ यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजेपासून हा सामना खेळवला जाणार आहे.
****
0 notes