#एकनाथ शिंदे भाजप सरकार
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
आदिवासी गौरव दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
राज्याच्या विकासासाठी महायुतीचं सरकार निवडून देण्याचं भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सोयाबीन खरेदी सात हजार रुपये प्रति क्विंटल दराने करणार असल्याचं काँग्रेसचं आश्वासन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार यांना जाहीर
मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम, बहुतांश ठिकाणी गृहमतदान सुरु
आणि
महिला आशिया हॉकी स्पर्धेत भारताचा सलग तिसरा विजय
****
देशाच्या परंपरेत आदिवासी समुहाचं योगदान महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. आदिवासी समाजाचं नेतृत्व केलेल्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती, आज आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा होत असून, या दिनाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्रपतींनी देशाला संबोधित केलं. आदिवासी समाज विकसित झाल्यास देशाचा विकास होईल, असं सांगून त्यांनी, आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचं नमूद केलं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं योगदान महत्त्वाचं असून, भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल, असं राष्ट्रपती म्हणाल्या. आदिवासी गौरव दिनानिमित्त आज बिहा��मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
****
शिख धर्माचे संस्थापक, पहिले गुरु गुरु नानक यांची ५५५ वी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त नांदेडच्या श्री सचखंड गुरुद्वारासह विविध गुरुद्वार्यांमध्ये भाजन, किर्तनासह धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्यातलं जलसंकट दूर झाल्याचं भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी चिकलठाणा इथं झालेल्या जाहीर सभेत ते काल बोलत होते. अनेक वर्षांपासून या भागात असलेला दुष्काळ दूर करण्यासाठी महायुती सरकारने ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केल्याचं मोदी यांनी सांगितलं. महायुतीचं सरकार पुन्हा आल्यास पुढील पाच वर्षात महाराष्ट्र विकासाची नवी क्षितीजं पादाक्रांत करेल, असं सांगून मोदी यांनी महायुती सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा यावेळी उल्लेख केला. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, यांच्यासह महायुतीचे इतर नेते आणि उमेदवार यावेळी उपस्थित होते.
यानंतर नवी मुंबईत खारघर इथं झालेल्या सभेत मोदी यांनी, महाराष्ट्राचा विकास हीच महायुतीची प्राथमिकता असून, विकसित महाराष्ट्र भारताचं ग्रोथ इंजिन होईल, असा विश्वास व्यक्त केला.
मुंबईत शिवाजी पार्क इथं या विधानसभा निवडणुकीतली पंतप्रधान मोदी यांची राज्यातली शेवटची प्रचारसभा काल पार पडली. सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणी पेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सोयाबीन खरेदी सात हजार रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. कांद्याच्या दरासंदर्भात एक समिती स्थापन करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
****
काँग्रेस नेते, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल नांदेड आणि नंदुरबार इथं प्रचारसभेला संबोधित केलं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिला आणि शेतकरी हिताला प्राधान्य दिलं जाईल, शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल, यासह विविध घोषणा गांधी यांनी यावेळी केल्या.
दरम्यान, सामान्य नागरिकांना भेटण्यासाठी राहुल गांधी यांनी अचानक नांदेड इथल्या मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली. अचानक निघालेल्या या ताफ्याने शहरवासीय तसंच सुरक्षा यंत्रणांचीही तारांबळ उडाली.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभेला संबोधित केलं. महा��ाष्ट्रावर प्रेम करणारे आणि महाराष्ट्राची लूट करणारे या मधली ही लढा�� असल्याचं, ते यावेळी म्हणाले. तत्पूर्वी ठाकरे यांनी काल अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा आणि नेवासे इथं जाहीर सभा घेतल्या.
****
भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथं तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. ही विधानसभा निवडणूक जनतेच्या भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जावेद कुरेशी यांच्या प्रचारार्थ पक्षाच्या नेत्या अंजली आंबेडकर यांची काल भीमनगर परिसरात सभा झाली.
****
येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथं एम ए प्रथम वर्षात शिकणारा दिव्यांग विद्यार्थी शैलेश देशमुख याने केलं आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सातारा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार यांना जाहीर झाला आहे. येत्या २५ नोव्हेंबरला मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. दोन लाख रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी मतदार जनजागृतीसाठी रॅलीसह विविध उपक्रम राबवण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात आयोजित मॅरेथॉन रॅलीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी सहभागी झाले होते. यावेळी ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’, ‘माझे मत माझा अभिमान’, ‘आपले अमूल्य मत-करेल लोकशाही मजबूत’ अशा घोषणा देण्यात आल्या.
****
धाराशिव जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्या वतीनं काल घेण्यात आलेल्या रन फॉर वोट मध्ये धाराशिव शहरातल्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता.
दरम्यान, तुळजापूर इथं काल स्वीप अंतर्गत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, कुलस्वामिनी माध्यमिक विद्यालय आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून मतदान जनजागृती केली. यावेळी मनोरंजनातून प्रबोधन करत प्रत्येक मतदारानं आपला हक्क बजावावा, असं आवाहन करत, उदयसिंह पाटील यांचा बोलक्या बाहुल्याचा कार्यक्रम झाला.
****
हिंगोली जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी काल दुचाकी रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातलं मतदानाचं प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा पुढं नेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केलं.
****
परभणी शहरातही काल शनिवार बाजार ते राजगोपालाचारी उद्यान रन फॉर वोट ही दौड काढण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह पोलीस तसंच निवडणूक अधिकाऱ्यांनी या दौडला हिरवा झेंडा दाखवला. तत्पूर्वी जिल्हाधिकार्यांनी सर्वांना मतदानाची शपथ दिली.
****
नांदेड नजिक विष्णूपुरी इथल्या श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेमध्ये स्वीप पथक आणि संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने मतदान जनजागृती कार्यक्रम काल घेण्यात आला. यावेळी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं.
****
जलान्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी काल भोकरदन विधानसभा मतदारसंघात मतमोजणी केंद्र आणि मतदान केंद्राना भेट देवून पाहणी केली. यावेळी पांचाळ यांनी भोकरदन नगर परिषदेच्या मंगल कार्यालयातल्या मतमोजणी केंद्राना प्रत्यक्ष भेट देवून मतदान यंत्रं सज्ज करण्याच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या नावांची तपासणी करुन एका मशीनवर 'मॉकपोल' करून व्हीव्हीपॅटद्वारे दिसणाऱ्या चिठ्ठीचीही खात्री करुन घेतली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड विधानसभा मतदारसंघात गृहमतदान सुरु असून, काल कन्नड शहरातल्या शांतीनगर इथल्या रहिवासी शकुंतला अनवडे या ८६ वर्षीय आजींनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांचं मतदान नोंदवण्यासाठी स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी त्यांच्या घरी हजर होते. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे देखील काल गृह मतदानात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघात कालपासून गृह मतदान सुरु झालं.
****
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल हिंगोली इथं विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचार्यांनी काळजीपूर्वक काम करावं, जिल्ह्यात येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रणेने विशेष प्रयत्न करावेत आदी सूचना त्यांनी दिल्या.
****
बिहारमधे सुरु असलेल्या, महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत काल भारताने थायलंडवर १३ - शून्य असा विजय मिळवला. भारतातर्फे दिपीकानं चमकदार कामगिरी करत पाच गोल नोंदवले. प्रिती दुबे, लालरेम सियामी आणि मनिषा चौहान या तिघींनी प्रत्येकी दोन गोल केले. या स्पर्धेतला भारताचा हा ��लग तिसरा विजय आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणातून गेल्या २४ सप्टेंबर पासून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आज पूर्णपणे थांबवण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात धरणात सुमारे तीन हजार १४५ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली, तर धरणातून प्रथम ९ ते १३ सप्टेंबर आणि त्यानंतर २४ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या काळात सुमारे ८६३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आलं.
0 notes
Text
शिंदे सरकारच्या दोन महिन्यातील कारभाराबद्दल विचारलं असता पवारांचा CM शिंदेंना शाब्दिक चिमटा; म्हणाले, "कारभार दिसला नाही पण..." | Sharad Pawar Comment on Eknath Shinde BJP Government work in 2 months scsg 91
शिंदे सरकारच्या दोन महिन्यातील कारभाराबद्दल विचारलं असता पवारांचा CM शिंदेंना शाब्दिक चिमटा; म्हणाले, “कारभार दिसला नाही पण…” | Sharad Pawar Comment on Eknath Shinde BJP Government work in 2 months scsg 91
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या शिंदे गट आणि बी जे पी सरकारला लक्ष्य केलं आहे. शरद पवार यांना पुण्यामधील पत्रकार परिषदेत शिंदे सरकारच्या कारभाराविषयी प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये ��त्तर दिलं. नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना भाजपासंदर्भात सूचक इशारा; म्हणाले,…
View On WordPress
#eknath shinde#MVA सरकार#Sharad Pawar Comment on Eknath Shinde#एकनाथ शिंदे#एकनाथ शिंदे भाजप सरकार#गुजरात सरकार#गुजरात सरकार मुख्यमंत्री#देवेंद्र फडणवीस#नरेंद्र मोदी#पंतप्रधान#पंतप्रधान नरेंद्र मोदी#महाराष्ट्र राज्य संकट#महाराष्ट्र वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प#महाराष्ट्र सरकार#महाराष्ट्राचे मुख्यमंत्री#महाराष्ट्राचे राजकारण#महाराष्ट्रातील राजकीय संकट जिवंत#वेदांत गुजरातला का शिफ्ट झाला#वेदांत फॉक्सकॉन#वेदांत फॉक्सकॉन गुजरातला शिफ्ट#वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित#वेदांत फॉक्सकॉन बातम्या#वेदांत फॉक्सकॉन मराठी बातम्या#वेदांत फॉक्सकॉन राजकरण#वेदांत फॉक्सकॉन राजकारण#वेदान्त फॉक्सकॉन गुजरातला#वेदान्त फॉक्सकॉन बातम्या#शरद पवार
0 notes
Text
सत्ता मिळूनही बंगला बदलला नाही, शिंदे सरकार अजित पवारांवर मेहरबान झाले
सत्ता मिळूनही बंगला बदलला नाही, शिंदे सरकार अजित पवारांवर मेहरबान झाले
महाराष्ट्र सरकारने अजित पवारांना तोच देवगिरी बंगला दिला आहे ज्यात ते उपमुख्यमंत्री म्हणून राहत होते आणि विरोधी पक्षनेते झाल्यानंतरही त्यात राहायचे होते. अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचे सरकार गेले, सत्ता बदलली. अजित पवार त्याचा दर्जा आणि स्थान बदलले. पण त्याचा बंगला बदलणार नाही. त्यांचे देवगिरी बंगला प्रबळ होईल. महाराष्ट्र सरकार ज्या बंगल्यात ते उपमुख्यमंत्री…
View On WordPress
0 notes
Text
..तेव���हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रता���णा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर-राहुल गांधी यांची नांदेड इथं प्रचारसभा-प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा सरकारला अधिकार नाही-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
���ोचिंग संस्थांनी अभ्यासक्रम तसंच विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर करण्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश
तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ११ धावांनी विजय
आणि
हिंगोली जिल्ह्याच्या वसम�� तालुक्यात काल संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के
****
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी चिकलठाणा इथं सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आज नवी मुंबई आणि मुंबईतही सभा होणार आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी नंदूरबार इथं आणि त्यानंतर नांदेडमध्ये प्रचारसभेला संबोधित करतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही छत्रपती संभाजीनगरसह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, आणि अन्य पदाधिकारी आज शहरात दाखल होत आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर नेण्याचं काम फक्त महायुतीचं सरकार करू शकतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहा यांनी काल राज्यात जळगाव, तसंच दोंडाईचा इथंही सभा घेतल्या. उद्या ते हिंगोलीत प्रचार सभा घेणार आहेत.
****
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पालघर इथे राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काल वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं प्रचार सभा झाली. यावेळी योगी यांच्या उपस्थितीत पोहरादेवी इथले महंत सुनील महाराज राठोड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतले भाजपा - महायुतीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेसाठीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल भोकर इथं सभा घेतली, तर भाजप नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल लातूर इथं भाजप उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल बीड इथं प्रचार सभा घेतली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची काल लातूर इथं प्रचार सभा झाली. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर बोलतांना, भाजपानं मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण केल�� नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी केळापूरचे मविआ उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी इथे सभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथं जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात राहता तसंच राहुरी विधानसभा मतदारसंघात वांबोरी इथं प्रचार सभा घेतल्या.
****
विधानसभेची निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात विशेष मुलाखतींचं प्रसारण होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. काल सकाळी प्रसारित झालेल्यामुलाखतीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर पूर्णपणे सुरक्षित असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं.
‘‘आपल्या देशातली सर्वोच्च न्यायव्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. त्यांच्याकडे ई व्ही एम बद्दल च्या चाळीस केसेस आत्तापर्यंत झालेल्या आणि वेगळ्या वेगळ्या पैलूंवरती त्या केसेस होत्या. सुप्रीम कोर्टाने तांत्रिक तज्ञांच्या मदतीने आणि कायद्याच्या मदतीने या केसेसचा निकाल दिलेला आहे. आणि या चाळीसही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ई व्ही एम टँपर करता येत नाही. त्याचा वापर योग्य आहे. आणि झालेलं मतदान ते योग्य पद्धतीने दाखवतं. त्यामुळे सर्वोच्च न्याय व्यवस्थेनं प्रशस्तीपत्र दिलेलं आहे. मतदारांनी स्वीकारलेलं आहे. त्याच ई व्ही एम चा वापर आपण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत.’’
दरम्यान, या सदरात येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणेनं केलेल्या तयारीची माहिती दिली तसंच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं, ते म्हणाले…
‘‘लोकशाहीच्या या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी प्रशासन तयार असून, आपल्याला बाहेरून चार कंपनीज्�� आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ मिळालेलं आहे. निष्पक्षपणे मतदान करता यावं यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. आपल्याला आपला अधिकार निष्पक्षतेने, निर्भयतेने बजावता यावा यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण सुद्धा आपल्या अधिकाराचा वापर करावा.’’
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज बालदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त पंडित नेहरु यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची छायाचित्रं तसंच चित्रफिती न वापरण्याच���या सूचना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कायकर्त्यांना देण्यात याव्यात, असं न्यायालयानं काल सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी पुढच्या आठवडयात होणार आहे.
****
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरकारकडून अशा प्रकारे मालमत्ता पाडल्या जाण्याबाबत न्यायालयानं मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. पाडकाम करण्याआधी आरोपीला कारणे दाखवा नोटीस बजवावी, असं न्यायालयानं म्हटलं असून, या नोटीशीवर आरोपीनं पंधरा दिवसांच्या आत किंवा स्थानिक प्रशासनानं घालून दिलेल्या कालमर्यादेत उत्तर देणं अपेक्षित आहे. कायदेशीर प्रक्रियेशिवाय अशी कारवाई केल्यास ती सरकारची मनमानी समजली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
सर्व कोचिंग संस्थांनी आपले अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर केली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. कोचिंग संस्थांच्या भ्रामक किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात या प्राधिकरणाच्या सचिव निधी खरे यांनी काल नियमावली जारी केली. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी राष्ट्रीय ग्राहक मदतवाहिनी सुरू केल्यापासून अशा संस्थांकडून विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून जास्त रक्कम परत मिळाल्याचंही खरे यांनी सांगितलं.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल तिलक वर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं यजमान संघाचा ११ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं, भारतानं निर्धारित षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला यजमान संघ सात गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावाच करू शकला. नाबाद १०७ धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला चौथा सामना उद्या होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या अनेक भागात काल सं��्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी सात वाजून २२ मिनिटांनी कुरुंदा, पांगरा, कवठा, डोणवाडा, आंबा, कोठारी, वर्ताळा आदींसह इतर गावांना लागोपाठ दोन भूकंपाचे सौम्य धक्के बसले. वसमत तालुका प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
****
निवडणूक आचारसंहिता काळात विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्यांना स्थानिक विकास निधी नव्याने दिला जाणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं नसेल, अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम करण्यात यावं, पण, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झालं असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईल, असंही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर ग्रामीण मतदारसंघात सोमवारी पार पडलेल्या गृहमतदानाच्या पहिल्या फेरीत ९४ टक्के मतदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात आज गृह मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे तर, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघात उद्या, १५ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरू होईल.
****
0 notes
Text
"...तर एकनाथ शिंदेंना त्यांची चूक कळेल" जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य भाजप सरकार स्थापन करणार | राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर आर.एम.एम
“…तर एकनाथ शिंदेंना त्यांची चूक कळेल” जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य भाजप सरकार स्थापन करणार | राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर आर.एम.एम
वेदान्त-प्रकल्प गुजरातला वळवल्यावरून महाराष्ट्रातील तापलेलं राजकीय वातावरण आता शांत होताना दिसत आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातच संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. भारतीय जनता पार्टी लवकरच नवीन सरकार पाडेल, अशा आशयाचं विधान जयंत पाटलांनी…
View On WordPress
0 notes
Text
त्यागी बनून देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंकडे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली, जनता म्हणाली- #एकनाथशिंदे सत्तेत येतात, समजत नाही...'
त्यागी बनून देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंकडे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली, जनता म्हणाली- #एकनाथशिंदे सत्तेत येतात, समजत नाही…’
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना पाठिंबा देऊन महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले. फडणवीसांच्या या निर्णयामुळे ��ाजकीय पंडितांनाही धक्का बसला आहे. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या…
View On WordPress
0 notes
Text
शिवसेनेनंतर एकनाथ शिंदेंचा भाजपलाच जोर का झटका!
Picture Credit/Facebook/Eknath shinde मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेला खिंडार पाडलं. शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि वेगवेगळ्या शहरांमधल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं. आता मुंबईमधल्या 100 पेक्षा जास्त महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. दहिसरमध्ये शिंदे गटाने भाजपला गळती लावली आहे. शिवसेनेनंतर एकनाथ शिंदेंनी भाजपलाच जोर का झटका दिला आहे. शिंदे गटाने भाजपमधले पदाधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा हा सोहळा पार पडला. प्रकाश सुर्वे यांचा मतदारसंघ असलेल्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले पण आता याच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिंदेंनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आहे. Read the full article
0 notes
Text
उद्धव ठाकरेंना धडा शिकवावा लागेल अमित शहांचा घणाघात
उद्धव ठाकरेंना धडा शिकवावा लागेल अमित शहांचा घणाघात
उद्धव ठाकरेंना धडा शिकवावा लागेल अमित शहांचा घणाघात अमित शहा यांनी आज मुंबई दौऱ्यावर असताना शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचावर घणाघात केलं आहे. एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करून उद्धव ठाकरेंना दणका देणारा भाजप अजूनही आपला प्रचार थांबवण्याच्या मनस्थितीत नाही.दोन्ही दिवशी मुंबईत … अमित शहा यांनी आज मुंबई दौऱ्यावर असताना शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचावर घणाघात केलं आहे. एकनाथ…
View On WordPress
#अमित#आजची अपडेट#आताची मोठी बातमी#उद्धव#गुन्हेगारी बातम्या#घणाघात#ट्रेंडिंग बातम्या#ठळक बातम्या#ठाकरेंना#ताज्या बातम्या#दैनिक मराठी#धडा#न्यूज अपडेट मराठी#न्यूज फ्लॅश#बातम्या#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी भाषिक बातम्या#मराठी समाचार#महत्वाची बातमी#महाराष्ट्र बातमी#मोठ्या बातम्या#राजकीय बातम्या#राज्यस्तरीय बातम्या#लागेल#वायरल बातम्या#शहांचा#शासकीय बातम्या#शिकवावा
0 notes
Text
करंजीतील ' त्या ' अकोलकर कुटुंबियांच्या घरी मोनिकाताई पोहचल्या , म्हणाल्या की ..
करंजीतील ‘ त्या ‘ अकोलकर कुटुंबियांच्या घरी मोनिकाताई पोहचल्या , म्हणाल्या की ..
महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार आले त्याबद्दल भाजप आमदार मोनिकाताई राजळे यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होते त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी देण्याबाबत टाळाटाळ केला केली जात होती मात्र आता अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा भाजपचे सहकारी सरकार आलेले असल्याने मतदारसंघातील जनतेचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील, असा…
View On WordPress
0 notes
Text
करंजीतील ' त्या ' अकोलकर कुटुंबियांच्या घरी मोनिकाताई पोहचल्या , म्हणाल्या की ..
करंजीतील ‘ त्या ‘ अकोलकर कुटुंबियांच्या घरी मोनिकाताई पोहचल्या , म्हणाल्या की ..
महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार आले त्याबद्दल भाजप आमदार मोनिकाताई राजळे यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होते त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी देण्याबाबत टाळाटाळ केला केली जात होती मात्र आता अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा भाजपचे सहकारी सरकार आलेले असल्याने मतदारसंघातील जनतेचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील, असा…
View On WordPress
0 notes