#एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 March 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ मार्च २०२३ सकाळी ७.१० मि.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 March 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ मार्च २०२३ सकाळी ७.१० मि.
****
सविस्तर बातम्या
अवयव दान हे एखाद्याला जीवन देण्याचं एक सशक्त माध्यम असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या `मन की बात` मालिकेतल्या नव्व्याण्णवाव्या भागातून देशवासियांशी संवाद साधत होते. अवयव प्रत्यारोपणासंदर्भात राज्यांच्या अधिवासाची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे आता रुग्ण देशाच्या कोणत्याही राज्यात जाऊन, अवयव मिळवण्यासाठी नोंदणी करू शकतील, असं त्यांनी सांगितलं. पुण्यामधल्या एम एस आर-ऑलिव्ह गृहसंकुलात पाण्याची मोटर, लिफ्ट आणि विजेचे दिवे सौर उर्जेवर चालवले जातात, याबद्दल त्यांनी कौतुक केलं. यातून दरमहा अंदाजे चाळीस हजार रुपयांची बचत होत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. एप्रिलच्या महिन्यात आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो आहोत. या दोन्ही महापुरुषांनी समाजातले भेदभाव दूर करण्यासाठी अभूतपूर्व योगदान दिलं, या शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचं स्मरण केलं. सध्या काही ठिकाणी कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकानं सुरक्षेची तशीच स्वच्छतेचीही काळजी घ्यावी, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड, इन्फ्लूएन्झा, गंभीर श्वसन रोग यावर बारकाईनं लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. कोविड आणि इन्फ्लुएंझा या दोन्ही आजारांमध्ये संसर्गाची माध्यमं, अधिक लोकसंख्येला संसर्गाची असणारी जोखीम, चिकित्साविषयक लक्षणं याबाबत समानता आहे. गर्दीची आणि कोंदट ठिकाणं टाळणं, खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणं, सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं, हात वारंवार धुणं यासारख्या साध्या उपायांनीसुद्धा हे आजार टाळता येऊ शकतात, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजे, या महत्त्वाच्या अजेंड्यासाठी हे सरकार काम करत असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिर्डी इथल्या ‘महापशुधन एक्स्पो-२०२३ चा काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी हा आपला केंद्रबिंदू असून, शेतकरी आदर्श मानूनच शासन काम करत असल्याचं, त्यांनी सांगितलं. पशुधन लम्पीमुक्त करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांनी विभागाचं कौतुक केलं. शिर्डी इथं थीम पार्क उभारण्यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असून, २०२४ मध्ये हेच सरकार सत्तेवर आलं, तर ती शेवटची निवडणूक असेल, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मालेगाव इथं जाहीर सभेत बोलत होते. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेससोबत एकत्र आलो आहोत, मात्र सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असं त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्पष्ट सांगितलं ते म्हणाले…
Byte…
मी राहूल गांधीना सांगतोय की, आपण एकत्र आलो आहोत जरुर, या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आलो आहोत. पण आता जर वेळ चुकली, तर आपला देश हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. ही लढाई जी आहे. ती लोकशाहीची लढाई आहे. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार. अजिबात करणार नाही. सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही. सावकरांनी जे काही केलेलं आहे, ते सर्वसामान्याचं एड्या गबाळ्याचं काम नाही.
शेतकऱ्यांच्या बांधावर जायला मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याची टीका ठाकरे यांनी केली. नैसर्गिक संकटात महाविकास आघाडीने तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई दिल्याचं सांगताना, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ��ीका केली.
Byte…
मी दिवाळीच्या वेळेला पाहिलं होतं, तुम्ही पण पाहिलं असेल टी व्ही वरती मुख्यमंत्री रमले शेतीत. यांच्या शेतीमध्ये दोन दोन हेलिपॅड. मुख्यमंत्री हेलिकॉप्टर ने शेतात जातो. माझा शेतकरी रात्री अपरात्री वीज आल्यानंतर शेतात जातो कधी साप चावतो कधी विंचू डसतो. इथं वीजेचा पत्ता नाही. शेतमालाला भाव नाही. घरची लग्नकार्य अडकलेली आहेत. आणि मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमतात. पण या शेतकऱ्यांच्या बांधावरती यायला तुम्हाला वेळ नाही?
सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेत असल्याची टीका ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षनावाच्या निर्णयावरूनही ठाकरे यांनी टीका केली, आपल्या पक्षाला आपण शिवसेनाच म्हणणार याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची येत्या दोन एप्रिलला छत्रपती संभाजीनगर इथं सभा होणार आहे. या सभेसाठी काल महविकास आघाडीचा मेळावा झाला, त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुढच्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेचा काल पदाधिकारी मेळावा घेण्यात आला, त्यात पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी ही माहिती दिली.
****
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती करावी, असं आवाहन केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. काल जालना इथं जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या पिकाचं अधिक उत्पादन होतं, याचा अभ्यास करुन केंद्र शासनानं त्या पिकाच्या वाढीसाठी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन मिळावं यास���ठी जिल्हानिहाय पिकांची निवड केली आहे. जालना जिल्ह्यात मोसंबीचं जास्त उत्पादन होतं, मोसंबीवर आधारित प्रक्रिया उद्योग करण्यासाठी अनुदानही उलपब्ध करुन देण्यात येणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं. येत्या ३० मार्चपर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवात शासकीय दालन, शेतीशी संबंधित कंपन्यांचे स्टॉल्स, बचत गटाचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे स्टॉल्स, यांचा समावेश आहे.
दरम्यान, दानवे आणि पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत काल जिल्ह्यात आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातल्या तीन लाख ४५ हजार ६६२ कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे.
****
शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा राज्य सरकार जाहिरातबाजी करत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. जालना जिल्ह्यात तीर्थपुरी इथल्या अंकुशराव टोपे सागर सहकारी साखर कारखान्याच्या ६० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन काल पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ��े बोलत होते. अवकाळी पाऊस, गरपीट यासारख्या संकटामुळे शेतकरी अडचण��त सापडला असून, सरकार मदतीचं फक्त आश्वासन देत आहे, मात्र प्रत्यक्षात मदत करतच नाही, असा आरोप पवार यांनी केला.
****
भारत राष्ट्र समिती पक्षाने महाराष्ट्रात तांत्रिक मान्यता घेतली असून, तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात विकासकामे केली जातील, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री, बीआरएसचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथं जाहीर सभेत बोलत होते. बीआरएस महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून पाय घट्ट रोवेल, असा विश्वासही चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केला.
****
अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचं प्रशिक्षणोत्तर पथसंचलन उद्या मुंबईत आय एन एस चिल्का इथं होणार आहे. सुमारे दोन हजार ६०० अग्निवीरांनी चिल्का इथं सुरु असलेलं प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं. या अग्निवीरांमधे २७३ महिला अग्निवीरांचाही समावेश आहे. नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार या समारंभाचे मुख्य अतिथी असतील. यशस्वी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या पुढच्या सागरी प्रशिक्षणासाठी किनाऱ्यावर असलेल्या युद्धनौकांवर तैनात केलं जाणार आहे.
****
राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधात काल काँग्रेस पक्षाच्या वतीनं देशभर संकल्प सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. मुंबईत काँग्रेसतर्फे केलेल्या या आंदोलनात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई जगताप यात सहभागी झाले होते. नागपूर इथंही संविधान चौकात काँग्रेस पक्षातर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं.
लातूर इथं जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी चौकात सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहात आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्यासह जिल्हाभरातील काँगेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
****
मराठवाड्यातल्या २०५ ग्रंथालयांची शासन मान्यता रद्द करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथले सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी काल ही माहिती दिली. ते छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते. राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या वतीनं राज्यातल्या अकार्यक्षम ग्रंथालयांना नोटीस पाठवण्यात आली होती, मात्र या ग्रंथालयांनी खुलासे सादर न केल्यानं ग्रंथालय संचालनालयानं ही कारवाई केली आहे. या ग्रंथालयांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या २०, जालना २९, नांदेड आणि बीड प्रत्येकी ३८, धाराशीव १९, परभणी १६, लातूर ३० तर हिंगोली जिल्ह्यातल्या १५ ग्रंथालयांचा समावेश आहे. जिल्हा ग्रंथालयांना ६० टक्के वाढीव अनुदानाची रक्कम येत्या चार ते पाच दिवसात मिळणार असल्याचंही हुसे यांनी सांगितलं.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभाग���ने परिघाबाहेरचे कलावंत घडवल्याचे गौरवोद्घार प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काढले आहेत. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं विद्यापीठाच्या नाट्य महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
Byte…
संधी मिळाली तर खूप लोकं काहीही करू शकतात, सगळ्यात टॅलेंट आहे. आपल्या सीमा ठरल्या आहेत, पण त्या परिघाबाहेर पण टॅलेंट असतं. मला नॅशनल अवॉर्ड मिळाले डिरेक्टर म्हणून. असंही शक्य आहे. तर माझं मत आहे की, पुणे, मुंबई सोडून औरंगाबाद जगाच्या कानाकोपऱ्यात चंद्रपूर कुठल्याही कोपऱ्यात महाराष्ट्राच्या जगाच्या भारताच्या टॅलेंट भरलेलं आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे, नवीन चेहरे आले पाहिजे.
दाक्षिणात्य रसिकांच्या तुलनेत कलेवरची आपली श्रद्धा कुठेतरी कमी पडते, याचा विचार मराठी माणसांनी करावा, असं आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी यावेळी केलं. मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीला अनेक मोठे कलावंत देणाऱ्या नाट्यशास्त्र विभागाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, या वर्षात संस्मरणीय कार्यक्रम घेऊन विभागानं राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर कलावंत घडवावेत, अशी अपेक्षा कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी यावेळी व्यक्त केली.
****
लातूर इथं काल पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यावेळी उपस्थित होते. लातूर परिसरातल्या गुणवत्तेला कला क्षेत्रातही वाव मिळावा म्हणून हा महोत्सव महत्त्वाचा असल्याचा विश्वास जब्बार पटेल यांनी व्यक्त केला. स्वीडिश दिग्दर्शक तारीक सालेह यांचा 'बॉय फ्रॉम हेवन' हा चित्रपट दाखवून या महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. कविता दातीर आणि अमित सोनावणे दिग्दर्शित 'गिरकी', मयूर करंबळीकर दिग्दर्शित 'डायरी ऑफ विनायक पंडित' आणि अनिल साळवे दिग्दर्शित 'ग्लोबल आडगाव'हे तीन मराठी चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.
****
बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्विस खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं सुवर्ण पदक पटकवलं आहे. त्यांनी काल बासेल इथं अंतिम सामन्यात चिनच्या रेंन झियांग यू आणि टॅन क्विंग यांचा २१-१९, २४-२२ असा सरळ गेम्समध्ये सहज पराभव केला.
****
जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत चार सुवर्णपदकं जिंकत भारतानं या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. काल भारताच्या निखत जरीन आणि लवलिना बोर्गोहेन यांनी सुवर्णपदक पटकावलं. निखतने ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात. व्हिएतनामच्या गुयेन थी टॅम हिचा पराभव केला, तर लवलिनानं ७५ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या केटलिन पार्कर हिचा पराभव केला. या स्पर्धेत भारताच्या नीतू घंसास आणि स्वीटी बुरा या दोघींनीही सुवर्ण पदक पटकावलं आहे.
****
मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या महिला प्रिमियर लीग स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. नवी मुंबईत काल झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सात खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत दिल्लीच्या संघाने दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य मुंबई इंडियन्सने १९व्या षटकात तीन खेळाडू गमावत पूर्ण केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तीन आशा स्वयंसेवकाची सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कारासाठी निवड करण्यात झाली आहे. सर्���ोत्कृष्ट अशा सेविका पुरस्कार, सिल्लोड तालुक्यात उंडणगाव प्राथमिक केंद्रात कार्यरत सरला दौलत वाघ यांना, द्वितीय पुरस्कार संगीता त्रिंबक घुले यांना, तर तृतीय उत्कृष्ट आशा पुरस्कार, दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत मिरा रूपचंद तीरच्छे यांना जाहीर झाला आहे. अनुक्रमे २५, १५ आणि ५ हजार रुपये या पुरस्कारांचं स्वरुप आहे. या आशा स्वयंसेविकांप्रमाणे इतर स्वयंसेविकांनीही काम करावं, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केलं आहे.
****
ग्रामीण भागातल्या सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजनेंतर्गत, लातूर जिल्ह्यात ९३५ गावात ८९९ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. ५७२ कोटी २७ लाख रुपयांच्या या सर्व कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, आतापर्यंत ६४ कामे पूर्ण झाली आहेत.
****
चालू आठवड्यात आकाशात एक अद्भुत खगोलीय घटना पहायला मिळणार आहे. बुध, शुक्र, गुरू, मंगळ आणि युरेनस हे पाच ग्रह सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर एकाच वेळी पाहता येणार आहेत. उद्या मंगळवारी सायंकाळी हे दृश्य अधिक छान दिसेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 December 2019 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती ** महापरीक्षा पोर्टलमधल्या त्रुटी दूर होईपर्यंत राज्य सरकारची सर्व परीक्षांना स्थगिती ** कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा “छत्रपती शिवाजी ��हाराज विद्यापीठ” असा नामविस्तार करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना आणि ** १६ डिसेंबर पासून ऑनलाईन बँकींग व्यवहार २४ तास करता येणार **** महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी या खटल्यातल्या सर्व वकिलांची बैठक घेण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल मुंबईत मंत्रालयात सीमाप्रश्नासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. या प्रकरणी एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मुख्यमंत्री स्वत: यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** महापरीक्षा पोर्टलमधल्या त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने प्राप्त निवदनं आणि तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल माहिती-तंत्रज्ञान विभागाचा आढावा घेतला, त्यावेळी हे निर्देश दिले. पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातल्या पशुसंवर्धन पर्यवेक्षक, आणि परिचर पदांसाठीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईन घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा पद्धतीबाबतच्या तक्रारी आणि समस्यांबाबत तक्रारदारांसोबत आठवडाभरात बैठक घेतलीं जाईल आणि त्या अनुषंगान सर्व उपाययोजना करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरक्षा प्रणालीच्या केंद्राचं उद्धाटन झालं. राज्य शासनाच्या डाटा सेंटरच्या सर्व्हरमध्ये सर्व शासकीय संकेतस्थळावरचा डाटा ठेवलेला असतो हा डाटा तसंच क्लाऊडवरील शासनाचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही बाह्य तसंच सायबर हल्ल्यापासून ही माहिती वाचवण्यासाठी हे सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. **** कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यांचं कर्तृत्व फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतियांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. त्यामुळे महाराजांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करावा, असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं आहे. **** राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आपल्याकडे सत्ता स्थापनेचा दावा घेऊन आले होते, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. तीन पक्षांचं एकत्रित सरकार टिकू शकणार नाही आणि पक्षातल्या काही आमदारांना काँग्रेससोबत जायचं नसून ते भाजपसोबत येण्यास तयार आहेत, आपण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यांशी बोललो आहोत, असं अजित पवारांनी आपल्याला सांगितल्याचं फडणवीस म्हणाले. या दरम्यान, आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांशीही बोलल्याचं ते म्हणाले. त्यानंतरच आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र नंतर काय झाले हे अजित पवारच सांगू शकतील, असं ते म्हणाले. दरम्यान, आमचा तो प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचं फडणवीस यांनी मान्य केलं. **** पुण्यात आयोजित पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या परिषदेला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. आंतरिक सुरक्षेसंदर्भात विविध मुद्यांवर काल दिवसभर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील या परिषदेला उपस्थित आहेत. या तीन दिवसीय परिषदेचा आज समारोप होत आहे. दरम्यान, राज्य सैनिक कल्याण विभागाच्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधानांच्या हस्ते काल पुण्यात राजभवन इथं शुभारंभ करण्यात आला. मुंबईतही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन, हे एक मोठं देशकार्य असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. औरंगाबाद इथं सशस्त्र सेना ध्वज दिन २०१९ निधी संकलनाचा काल जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी वीरपत्नी, वीरमाता, शौर्य पदकधारक आणि दिव्यांग सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सैनिक कल्याण विभागाचे विशेष गौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. **** भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या पराभवासाठी जबाबदार नेत्यांचे पुरावे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले असल्याचं म्हटलं आहे. ते काल जळगाव इथं भाजपच्या उत्तर महाराष्ट्र गाभा समितीच्या बैठकीत बोलत होते. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून पराभव झाला आहे. पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी, पराभवास जबाबदारांची नावं उघड करण्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना, खडसे यांनी प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिली तर हे पुरावे आपण जनतेसमोर मांडू असंही नमूद केलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** येत्या १६ डिसेंबर पासून ऑनलाईन बँकींग व्यवहार २४ तास करता येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही माहिती दिली. डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन बँकींग व्यवहारांची ही सुविधा आता वर्षाचे ३६५ दिवस, सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सुरु राहील, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. **** परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातल्या दोन आणि पूर्णा इथल्या एका रेल्वे उड्डाण पुलांच्या कामाचा शुभारंभ काल खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. सेलू, परभणी, पूर्णा इथल्या उड्डाणपुलांचं काम लवकरच सुरु करण्यात येईल, असं खासदार जाधव यांनी यावेळी सांगितलं. येत्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिंगोली इथं सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नविन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन आढावा बैठक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. शिंगोली या गावची मोजणी झाली असून चार गावची मोजणी बाकी असल्याचं रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. उर्वरीत काम २३ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना खासदार निंबाळकर यांनी दिल्या. **** लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख यांनी काल मतदारसंघातल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर सर्व यंत्रणांमध्ये योग्य समन्वय ठेवावा आणि शासनाच्या योजना तसंच सुविधा समाजघटकांपर्यंत पोहचवाव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आगामी काळात मुलींच्या शिक्षणांतील गळती थांबविण्यासाठी प्रयत्न करू, असेही आमदार देशमुख यांनी सांगितलं. **** औरंगाबाद इथं आज सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं राज्यस्तरीय कविता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसिध्द कवयित्री आणि लेखिका नीरजा या महोत्सवाच्या अध्यक्ष असून कवी आमदार लहू कानडे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना.गो. नांदापूरकर सभागृहात सकाळी साडे दहा वाजता सुरूवात होणाऱ्या या महोत्सवात परिसंवाद, प्रकट मुलाखत आणि निमंत्रित कवींचे कविसंमेलन होणार आहे. **** नांदेड जिल्ह्य़ाच्या लोहा तालुक्यातल्या लिंबोटी धरणातून यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दि २५ डिसेंबर ते २६ एप्रिल, या कालावधीत सहा पाणी पाळ्या देण्यात येणार आहेत. आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी काल ही माहिती दिली. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल लिंबोटी कालवा समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. **** बीड जिल्हा क्रीडा संकुलात स्वच्छता मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत काल चित्र रंगवा उपक्रम घेण्यात आला. क्रीडा संकुलामध्ये नियमित सरावाला येणाऱ्या विविध खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी, तसंच कामगारांनी या उपक्रमात सहभागी होत, क्रीडा संकुलाच्या भिंतीवर विविध चित्रं रंगवली. क्रीडा संकुलाच्या परिपूर्ण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केल्याचं जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी यावेळी सांगितलं. **** औरंगाबाद इथं नवजीवन सोसायटी या मानसिक दृष्ट्या अकार्यक्षम मुलांच्या क्षेत्रात कार्यरत संस्थेच्या वतीनं ‘दिव्यांग शक्ती दौड’ घेण्यात येत आहे. शहरातल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावरून ही साडे तीन किलोमीटर अंतराची दौड आज सकाळी सुरू झाली. **** नांदेड जिल्ह्यात मुदखेड इथल्या केंद्रीय राखीव पोलिस दल प्रशिक्षण महाविद्यालयानं मुदखेड इथं स्वच्छता अभियान राबवलं. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिस जवानांनी मुदखेड शहर आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या घायगावच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत हरकती, सूचना ११ डिसेंबरपर्यंत दाखल करता येतील, असं जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवलं आहे. **** भारत वेस्ट इंडिज टी ट्वेंटी मालिकेतला दुसरा सामना आज तिरूवअनंतपुरम इथं खेळला जाणार आहे. तीन सामन्याच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 August 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -०९ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या युगाला सुरुवात - पंतप्रधान नरेंद्र मोदी ** कोयना आणि राधानगरी धरणातून सोडण्यात येणार पाणी कमी करण्यात आलं; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूर स्थितीत सुधारणा ** सांगली जिल्ह्यात नाव उलटून ९ जणांचा मृत्यू ** आणि ** विधानसभा निवडणुकीत, काँग्रेससोबत आघाडी होण्याची शक्यता नाही - वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर **** जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या युगाला सुरुवात झाल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला संबोधित केलं. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं सांगत जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या मार्गातला अडथळा दूर झाल्याचं ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वोत्तम पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता आहे. चित्रपट सृष्टीनं तसंच अन्य कंपन्यांनी काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा, तंत्रज्ञानामुळे काश्मिरी जनतेचं जीवन अधिक सुसह्य होईल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. काश्मीरमधली परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर पुन्हा जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नव्या व्यवस्थेत पोलिसांसह राज्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना अन्य राज्यांसारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, त्याचबरोबर काश्मीर आणि लडाखमधली सर्व रिक्तपदं भरण्याची प्रक्रिया तत्काळ सुरु केली जाईल, यामुळे युवकांना रोजगार मिळेल, असं ते म्हणाले. **** पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूर स्थितीत सुधारणा होत आहे. काल सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून सोडण्यात येणार पाणी कमी करण्यात आलं, तसंच राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातला पाऊस कमी झाल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे कोल्हापूर शहरातला पूर काहीसा कमी झाला. सांगली जिल्ह्यातही पूरामध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यातल्या चार तालुक्यांना पुराचा मोठा फटका बसला असून ३५ हजारांपेक्षा जास्त लोक या संकटाचा सामना करत आहेत. जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यात बचाव कार्य करणारी नाव काल सकाळी उलटून ९ जणांचा मृत्यू झाला. तर ४ जण बेपत्ता आहेत. ब्रह्मनाळ इथून तीस लोकांना घेऊन खटावकडे जाणारी ही नाव झाडाला अडकून उलटल्यानं ही दुर्घटना घडली. पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोल्हापूर, सांगली तसंच सातारा जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार छत्रपती संभाजीराजे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंजाब, ओडिसा, गुजरातमधून आपत्ती प्रतिसाद दलाची अनेक पथकं पूरग्रस्त भागात दाखल झाली आहेत. बचाव कार्यासाठीच्या बोटी वाढवण्यात आल्या असून, आवश्यकता भासल्यास, हवाई मार्गानं नागरिकांच्या बचावाची तयारी शासनाची आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी चर्चा करून, अलमाट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत त्यांना सूचना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानुसार अलमाट्टी धरणातून पाच लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. पडझड झालेली घरं, तसंच अन्नधान्यासाठी सरकार मदत करणार असून, नागरिकांनी घाबरून न जाता, धीर राखण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. **** राज्यात उद्भवलेली पूरस्थिती अभूतपूर्व असून, आपत्ती निवारणात प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. काल पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. पूरग्रस्त भागात शंभर टक्के कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सामाजिक तसंच स्वयंसेवी संघटनांनी पूरग्रस्तांना सहकार्य करण्याचं आवाहन पवार यांनी केलं. पूरग्रस्तांना सहकार्य म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी एका महिन्याचं वेतन देणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. **** बुलडाणा जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे येळगाव आणि करडी धरण शंभर टक्के भरलं आहे. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. संग्रामपूर तालुक्यातल्या पाच गावाचा संपर्क तुटला आहे. **** जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे सर्व एक्केचाळीस दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. धरणातून सध्या सुमारे दीड लाख दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत असून, जिल्हा प्रशासनानं तापी नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे एक मी��रनं उघडण्यात आले आहेत. **** अहमदनगर जिल्ह्यातलं मुळा धरण ९० टक्के भरलं आहे. धरणाच्या अकरा दरवाजांमधून काल नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ६८ टक्क्यांहून अधिक भरलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून आवक सुरु असल्यामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान, मराठवाड्यात लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. औरंगाबाद, हिगोली, जालना परभणी जिल्ह्यांमध्ये काल दिवसभर रिमझिम पाऊस होता, तर नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. **** हवामान : येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात कोकण अणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, तर पश्चिम किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशाराही विभागानं दिला आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे. **** आगामी विधानसभा निवडणुकीत, काँग्रेससोबत आघाडी होण्याची शक्यता नाही असं वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसनं आमच्या पक्षावर भारतीय जनता पक्षाची ‘ब’ संघ असल्याचा आरोप केल्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याचं ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचा मुख्य लढा भाजपशी आहे, आणि काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. एमआयएमसोबतच ही निवडणूक लढली जाईल, असंही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. **** आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमनं वंचित बहुजन आघाडीकडे ८० जागांचा प्रस्ताव दिला असल्याचं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या ८० जागांवर सर्व जाती धर्मातल्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल, असं ते म्हणाले. औरंगाबादहून विविध ठिकाणांसाठी विमानसेवेसाठी आणि रेल्वे संदर्भातल्या विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. **** मराठवाडा विभागात आजपासून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबादचे महसूल उपायुक्त सतीश खडके यांनी दिली आहे. कृत्रिम पावसासंबंधी शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांची कार्यशाळा औरंगाबाद इथं काल घेण्यात आली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यासंबंधीचं डॉप्लर रडार विभागीय आयुक्त कार्यालयात बसवण्यात आलं असून सी-१९ हे विमानही दाखल झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. **** पूरपरिस्थितीमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ द्या अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. या परिक्षांसाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र अजुनही काही ठिकाणी पूरपरिस्थिती कायम असल्यामुळे आणखी मुदतवाढ द्यावी असं चव्हाण यांनी निवेदनाद्वारे म्हटलं आहे. **** कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवका��ंदर्भातल्या केलेल्या एका वक्तव्यावरुन नांदेड महानगरपा��िकेच्या सर्वसाधारण सभेत काल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली. या गदारोळामुळे महापौर दीक्षा धाबले यांनी भाजपचे नगरसेवक दीपक रावत यांना एक दिवसासाठी निलंबित केले. या निर्णयाविरुद्ध भाजपनं सभागृहात निदर्शनं केली. **** स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या मागास प्रवर्ग- ओबीसीचं आरक्षण पूर्ववत ठेवावं या मागणीसाठी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल औरंगाबाद इथं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोर आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी बागडे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातलं निवेदन दिलं. *** भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना काल पावसामुळे रद्द करण्यात आला. ***
0 notes