#ईडीसमोर
Explore tagged Tumblr posts
Text
विजय देवरकोंडा ईडीसमोर झाला हजर; करण जोहरच्या सिनेमामुळे फसला अभिनेता?
विजय देवरकोंडा ईडीसमोर झाला हजर; करण जोहरच्या सिनेमामुळे फसला अभिनेता?
विजय देवरकोंडा ईडीसमोर झाला हजर; करण जोहरच्या सिनेमामुळे फसला अभिनेता? Vijay Deverakonda Appeared Before ED: अभिनेता विजय देवरकोंडा लायगर सिनेमा केल्यानंतर अडचणीत आला आहे. हैदराबादमध्ये त्याला ईडीसमोर हजर राहावे लागले आहे. वाचा काय आहे कारण Vijay Deverakonda Appeared Before ED: अभिनेता विजय देवरकोंडा लायगर सिनेमा केल्यानंतर अडचणीत आला आहे. हैदराबादमध्ये त्याला ईडीसमोर हजर राहावे लागले आहे. वाचा…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 July 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि. ****
· राज्यात अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु, आगामी काही दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
· मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात पाऊस सक्रीय, मात्र खरीपासाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा
· एकनाथ शिंदे यांना मुख्य��ंत्री करण्याचा आपला प्रस्ताव पक्षश्रेष्ठींनी मान्य केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे तीन हजार ९८ रुग्ण, मराठवाड्यात १५९ बाधित, औरंगाबादमध्ये एका रुग्णाचा मृत्यू
· जिल्हा नियोजन समित्यांच्या कामांना राज्य सरकारची स्थगिती
· औरंगाबाद शहराच्या नामांतरा विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा सर्वपक्षीय नेत्यांचा ठराव
आणि
· भारताविरुद्धचा पाचवा कसोटी क्रिकेट सामना इंग्लंडनं सात गडी राखून जिंकला. मालिका बरोबरीत सुटली
****
राज्यात अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आठ जुलैपर्यंत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा तसंच जालना जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संपूर्ण कोकणसह अमरावती विभागातल्या काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल -एन डी आर एफ आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दल - एस डी आर एफ ची ११ पथकं तैनात करण्यात आली आहेत. तसंच एनडीआरएफची ९ आणि एसडीआरएफची ४ अशी एकूण १३ पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. काल त्यांनी कोकणातल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला, आणि आवश्यक सूचना केल्या.
पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात कुलाबा इथं ११७ मिलीमीटर, तर सांताक्रूझ इथं १२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसंच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरचा परशुराम घाट वाहतुकीकरता बंद करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्याच्या ��िवसा तालुक्यातल्या चांदूरबाजार आणि मोर्शी इथं पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. गाव��तल्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम सुरु असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक बचाव पथकं कार्यरत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात काल सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सुमारे २२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या सुमारे साडे बावीस टक्के इतकं आहे.
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात पाऊस सक्रीय झाला असला तरी खरीपासाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. येत्या तीन दिवसात परभणीसह मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान विभागानं वर्तवला आहे. हा पाऊस जोरदार असला तरी तो तुरळक ठिकाणीच पडू शकेल, असा अंदाज आहे.
****
आपण आग्रह धरला असता, तर मुख्यमंत्रिपद सहज मिळालं असतं, पण सत्ता मिळवणं हे आपलं ध्येय नाही, त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा माझा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींनी मान्य केल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करून आपण उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, आपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां��ा पूर्ण पाठिंबा असेल, असं त्यांनी सांगितलं. वैधानिक विकास मंडळ तसंच औद्योगिक वीज अनुदानाचा विषय, विदर्भ-मराठवाड्यातल्या मागास क्षेत्राचा विकास आणि संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वंकष विकास करण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असं फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
****
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे काल सक्तवसुली संचालनालय - ईडीसमोर हजर झाले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. संजय पांडे हे ३० जूनला निवृत्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार ९८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ८९ हजार ९०९ झाली आहे. काल या संसर्गानं सहा रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ९४९ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल चार हजार २०७ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख २१ हजार १४० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २० हजार ८२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १५९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात ७७, जालना ३७, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १४, बीड नऊ, नांदेड सात, तर परभणी जिल्ह्यात एका नव्या रुग्णाची नोंद झाली.
****
जिल्हा नियोजन समित्यांच्या कामांना एकनाथ शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. या कामांचं आणि निधीचं वाटप महाविकास आघाडी सरकारनं केलं होतं. आता कामांचा आढावा घेऊन नव्याने वाटप केलं जाईल, कंत्राटदार, राजकीय कार्यकर्ते, नेते आधीच्या सत्ता पक्षातल्या आमदारांना लाभ पोहोचवण्याच्या उद्देशानं वाटलेली कामं रद्द करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीनं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, त्यांना आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या महापूजेचं निमंत्रण देण्यात आलं. समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, यांच्यासह मंदिर समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.
****
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं. नीरा नदी ओलांडून पालखी सकाळी माळशिरस तालुक्यात अकलूज इथं पोहोचली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखीचं स्वागत करून अकलूज इथल्या गांधी चौकापर्यंत पालखीच्या रथाचं सारथ्यही केलं. दरम्यान, तुकाराम महाराज पालखीचं सोलापूर जिल्ह्यातलं पहिलं गोल रिंगण अकलूज इथल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालं. प्रथम पताका, हंडे-तुळशी, विणेकरी, मृदंग आणि टाळकरी यांचं रिंगण झालं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन झाल्यावर अश्व रिंगणात धावले. लाखों वारकरी आणि ग्रामस्थांनी हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
****
औरंगाबाद शहराच्या नामांतर विरोधासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा ठराव, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत काल घेण्यात आला. भाजप शिवसेना वगळून शहरातल्या अन्य पक्षांची बैठक काल खासदार इम्तियाज जलिल यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.
****
जम्मू काश्मीरमधल्या अनेक भागात पाऊस सुरु असल्यामुळे अमरनाथ यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात पुढील २४ ते ३६ तास पावसाचा इशारा देण्यात आला असून, पहलगाम आणि बालटाल भागात दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या ३० जून रोजी यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४० हजार २३३ भाविकांनी इथं भेट दिली आहे.
****
राज्यातल्या सत्तांतरानंतर शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे बंडखोर आमदार रमेश बोरनारे, पैठणचे संदीपान भुमरे आणि औरंगाबादचे प्रदीप जैस्वाल काल, मतदारसंघात परतले. यावेळी बोरनारे यांच्या समर्थकांनी ढोल-ताशाच्या गजरात आणि आतिषबाजी करत त्यांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना बोरनारे यांनी, शिंदे गटात जाण्याचा निर्णय आपण फक्त तालुक्याच्या विकासासाठी घेतला. एकाच वेळी ४० आमदार एक भूमिका घेत असतील तर ही समजण्यासारखी गोष्ट असल्याचं त्यानीं नमूद केलं. आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दोष देत नाही, मात्र त्यांच्या बाजूला असलेल्या चार बडव्यांना दोष देऊ, कारण याच लोकांनी आम्हाला बाजूला करण्याचं काम केलं. त्यामुळे आम्ही हा उठाव केल्याची प्रतिक्रिया आमदार बोरनारे यांनी दिली.
****
हिंगोलीतले शिवसेनेचे एकमेव आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोलीतल्या पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. संपर्कप्रमुख आनंद जाधव या बैठकीला उपस्थित होते.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगघम इथं झालेला पाचवा कसोटी क्रिकेट सामना इंग्लंडने सात गडी राखून जिंकला. इंग्लंडच्या जो रूट्स आणि जॉनी बेस्ट्रो या दोघांनी अनुक्रमे १४२ आणि ११४ धावांची तडाखेबंद खेळी केली, त्यामुळे, इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या या विजयामुळे ही पाच कसोटी सामन्यांची मालिका दोन - दोन अशी बरोबरीत सुटली. जॉनी बेस्ट्रो याला सामनावीर तर जो रूट याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गेल्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात आलेल्या या मालिकेतला पाचवा सामना कोविड प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला होता.
****
औरंगाबादच्या करमाड परिसरात दरोडा आणि जबरी चोरीचे गुन्हे करणारी जालना शहरातली टोळी औरंगाबाद गुन्हे शाखेनं जेरबंद केली. या टोळीनं नंदकिशोर जैस्वाल यांना आणि त्यांच्या साथिदाराला करमाड परिसरात अडवून त्यांच्याकडील दोन लाख २५ हजार रुपयांची रक्कम लुबाडली होती. या टोळीतल्या सात जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील तीन लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात एक जुलै ते १५ जुलै या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवला जात आहे. दर वर्षी होणाऱ्या एकूण बालमृत्यूच्या सात टक्के बालमृत्यू अतिसारामुळे होत असतात. पावसाळ्यात याचं प्रमाण वाढत असतं, हे विचारात घेऊन आरोग्य विभागाच्या वतीनं, आशाताई आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन ओ आर एस ची पाकिटं वाटत आहेत. अतिसार असलेल्या बालकांना १४ दिवसांसाठी झिंकची गोळी दिली जात आहे. या काळात बालकांना आणि पालकांना स्वच्छतेचं महत्त्व कळावं यासाठी स्वच्छ हात धुण्याची प्रात्यक्षिकही घरोघरी करून दाखवली जात आहेत. त्यामुळे बालकां��्या आरोग्य आणि स्वच्छता सुधारण्यासाठी याचा उपयोग होत आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसायाच्या प्रशिक्षणाचं आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. जालना इथं काल आत्म नियामक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. प्रकल्प संचालक शितल चव्हाण यांनी आत्माच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी पिक प्रात्यक्षिकं, राज्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण तसंच शेतीशाळांचं आयोजन करण्यात आल्याचं सांगून शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ झाला असल्याची माहिती दिली.
****
औरंगाबाद चिकलठाणा पोलिस ठाण्याचा सहाय्यक फौजदार दिनकर थोरे याला एक हजार रुपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. जप्त केलेलं पेट्रोल टँकर सोडवण्यासाठी थोरे यानं ही लाच मागितली होती.
****
0 notes
Text
महाराष्ट्र : शिवसेनेचे सरकार आले की गेले? संजय राऊत यांनी काय उत्तर दिले, जाणून घ्या आज ईडीसमोर हजर
महाराष्ट्र : शिवसेनेचे सरकार आले की गेले? संजय राऊत यांनी काय उत्तर दिले, जाणून घ्या आज ईडीसमोर हजर
संजय राऊत (फाइल फोटो) जय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार आल्यापासून ते सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण आम्ही ते करणार नाही. मुंबई पत्रव्यवहार घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतसंजय राऊत) यांना अंमलबजावणी संचालनालयाने बोलावून चौकशीसाठी बोलावले आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) संजय राऊत आज (1 जुलै, शुक्रवार) दुपारी 12 वाजता चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांनीच आज सकाळी…
View On WordPress
0 notes
Text
#sonia gandhi carona positive#sonia gandhi#congress chintan shivir#priyanka gandhi#congress news#rahul gandhi#politics hindi news
0 notes
Photo
वर्षा राऊत यांची एक दिवस आधीच ईडीसमोर हजेरी वर्षा राऊत यांनी सगळ्यांना धक्का दिला | #VarshaRaut #ED #Office https://www.headlinemarathi.com/maharashtra-news/ed-notice-varsha-raut-wife-of-sanjay-raut-present-in-ed-office/?feed_id=41202&_unique_id=5ff2f2fc310c1
0 notes
Text
ED Summon आणि कोरोनाची लक्षणे | एकनाथ खडसे 14 दिवसांनी ईडीसमोर हजर होणार!
ED Summon आणि कोरोनाची लक्षणे | एकनाथ खडसे 14 दिवसांनी ईडीसमोर हजर होणार!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आज चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात हजर राहणार नाही. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेणार असून त्यानंतर चौकशीसाठी हजर होण्यासाठी ईडीकडून संमती मिळाली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनीच पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, ईडी चौकशीच्या निमित्ताने एकनाथ खडसे कालच मुंबईत दाखल झाले आहेत. भोसरी एमआयडीसी भूखंड…
View On WordPress
0 notes
Text
#rautsanjay61 #Mumbai वर्षा राऊत यांना ईडीच्या नोटीशीनंतर संजय राऊत यांचे ट्विट 'आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके कदम रखना मेरे साथिया'
#rautsanjay61 #Mumbai वर्षा राऊत यांना ईडीच्या नोटीशीनंतर संजय राऊत यांचे ट्विट ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके कदम रखना मेरे साथिया’
मुंबई दि २८ डिसेंबर २०२० : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस धाडण्यात आली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी २९ डिसेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.वर्षा राऊत यांना मुंबईतील कार्यालयात (Enforcement Directorate) हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना दोनवेळा नोटीस धाडण्यात आली होती. तथापि, त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव ईडीसमोर हजर…
View On WordPress
0 notes
Text
भाजपा सरकार ‘रावण’, राहुल आमचे ‘राम’; ईडीसमोर हजर होण्यापूर्वीच काँग्रेस नेते उतरले रस्त्यावर
भाजपा सरकार ‘रावण’, राहुल आमचे ‘राम’; ईडीसमोर हजर होण्यापूर्वीच काँग्रेस नेते उतरले रस्त्यावर
भाजपा सरकार ‘रावण’, राहुल आमचे ‘राम’; ईडीसमोर हजर होण्यापूर्वीच काँग्रेस नेते उतरले रस्त्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होणार आहेत. तत्पूर्वी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. यानंतर दिल्ली पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पक्षाचे नेते आणि समर्थक मोठ्या…
View On WordPress
#‘रावण’#“राम#आजच्या घडामोडी#आमचे#ईडीसमोर#उतरले#काँग्रेस#ठळक बातम्या#ताजी बातमी#नेते#बातमी#बातमी विशेष#बातम्या#भाजपा#भारत लाइव्ह#भारत लाईव्ह न्यूज#भारत लाईव्ह मीडिया#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्राची बातमी#रस्त्यावर#राहुल#सरकार#हजर#होण्यापूर्वीच
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 June 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २९ जून २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
· राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्याची भारतीय जनता पक्षाची राज्यपालांकडे मागणी
· गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना पक्षात पुन्ह��� परत येण्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आवाहन
· १४ दिवसांची मुदत नाकारत एक जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे सक्तवसुली संचालनालयाचे शिवसेना नेते संजय राऊत यां��ा आदेश
· औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चर्चा होण्याची शक्यता
· पोलिसांची सात हजार २३१ रिक्त पदं भरण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
· मुंबईत इमारत दुर्घटनेत १९ जणांचा तर हेलिकॉप्टर दुर्घटनेत चौघांचा मृत्यू
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे तीन हजार ४८२ रुग्ण, मराठवाड्यात ५८ बाधित
आणि
· लेबल केलेलं दही, लस्सी, पफ केलेला तांदूळ आणि गव्हाच्या पीठावर पाच टक्के कर आकारण्यास वस्तु आणि सेवा कर परिषदेची मंजुरी
****
सविस्तर बातम्या
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्यानं सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षानं राज्यपाल भततसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन रात्री मुंबईत परतले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं रात्री राज्यपालांची भेट घेऊन या मागणीचं पत्र दिलं. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकारमध्ये राहण्यास नकार दिला आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणाले,
Byte…
शिवसेनेचे ३९ आमदार हे बाहेर आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्हाला राहायचं नाही असा पवित्रा त्यंनी घेतलेला आहे. अशा या सगळ्या परीस्थिती मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत शिल्लक राहीलेलं नाही त्यामुळे त्यांना बहुमत सिध्द करायला सांगावं, अशा प्रकारची विनंती करणारं पत्र हे आज आम्ही राज्यपालांना दीलं आहे. आता त्या संर्दभात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे विविध निर्णय जे आहेत त्या निर्णयाचा काही उल्लेख आम्ही केलेला आहे. आणि त्याचा आधारावर माननीय राज्यपाल उचित निर्णय घेतील आणि मेजोरेटी सिद्ध करण्याकरता येग्य तो निर्णय देतील अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे.
.भारतीय जनता पक्षानं आपल्या सर्व आमदारांना पुढील दोन दिवस मुंबईतच राहण्याचे आदेश दिले आहेत.
****
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटी इथं गेलेल्या बंडखोर शिवसेना आमदारांना परतण्याचं आवाहन केलं आहे. एकत्र बसून यातून मार्ग काढू, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर कर�� या, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, असं सांगून पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
****
एकनाथ शिंदे गटातले २० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा, शिवसेना नेते अनिल देसाई यांनी केला आहे. दरम्यान, आमच्यापैकी कुणीही मुंबईच्या संपर्कात नाही, असा दावा कोणी करत असेल तर त्यांनी त्या आमदारांची नावं सांगावीत असं आव्हान शिंदे यांनी दिलं आहे.
****
सक्तवसुली संचालनालयासमोर उपस्थित राहण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी मागितलेली १४ दिवसांची मुदत ईडीनं फेटाळली असून, त्यांना एक जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. राऊत यांना काल ईडी कार्यालयात हजर होण्यास सांगितलं होतं, मात्र त्यांच्या वकिलांनी ईडीसमोर काही दस्तऐवज सादर करत चौकशीसाठी मुदतवाढ मागितली होती.
****
औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चर्चा होण्याची शक्यता आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब यांनी, औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करण्याचा मुद्दा उपस्थित केला. काही महत्त्वाच्या विषयावर आज पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यावेळी या विषयावर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
दरम्यान, राज्य शासनानं वर्ष २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातले सात हजार २३१ रिक्त पदं भरायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. शासनानं पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून, पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतल्या उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे.
****
मुंबईत कुर्ला इथं मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्यांची संख्या १९ झाली आहे, तर १४ जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकानं ही माहिती दिली. जखमींपैकी ९ जणांना उपचारानंतर घरी सोडलं.
मृतांच्या कुटूंबाला राज्य सरकारनं प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली असल्याचं, नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. जखमींवर मोफत उपचार केले जातील, दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.
शिवसेनेच्या बंडखोर आमदार गटाने या दुर्घटनेतल्या मृत नागरिकांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या वतीनं ही मदत करण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबईजवळच्या ��मुद्रात ओएनजीसी कंपनीच्या हेलिकॉप्टरला काल झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर ५ जणांना वाचवण्यात यश आलं. ओएनजीसी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला काल अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. हेलिकॉप्टरच्या तरंगण्याच्या क्षमतेनुसार ते काही मिनिटं पाण्यावर तरंगत राहीलं, त्यानंतर मात्र ते समुद्रात बुडालं. तटरक्षक दल, नौदल आणि ओएनजीसीच्या जहाजांनी बचाव कार्य करत काही पाच जणांना वाचवलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार ४८२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ६८ हजार ५१७ झाली आहे. काल या संसर्गानं पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ९१५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल तीन हजार ५६६ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ९५ हजार १२१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २५ हजार ४८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, राज्यात काल आढळलेल्या कोविड रुग्णांपैकी ९ रुग्ण बीए ५ आणि बीए ४ या व्हेरियंटचे आहेत. यामधले चौघे पालघर, तिघं रायगड तर दोन रुग्ण ठाणे इथले आहेत. राज्यात आढळलेल्या या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या आता ६३ झाली आहे.
****
मराठवाड्यात काल ५८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६, लातूर १२, उस्मानाबाद दहा, नांदेड सहा, बीड तीन तर जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
वस्तु आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची दोन दिव��ीय बैठक काल चंदीगढ इथं सुरु झाली. या बैठकीत काही वस्तु आणि सेवांवरील कर दरांमध्ये बंदलांना मंजुरी देण्यात आली आहे. प्री पॅकेज केलेले आणि लेबल केलेले दही, लस्सी, पफ केलेला तांदूळ आणि गव्हाचं पीठ यावर पाच टक्के कर आकारण्यात येणार आहे. राज्यांच्या महसुलामध्ये वाढ करण्याच्या मागणीवर आज या बैठकीत चर्चा होणार आहे.
****
येत्या पाच वर्षात राज्यात ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती करण्यासाठी अदानी उद्योग समुहाशी काल राज्य सरकारनं सामंजस्य करार केला आहे. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत आणि ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्र आणि हरित ऊर्जा क्षेत्रात उंच भरारी घेणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया, राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी चार ते पाच वर्षात अदानी समुह सुमारे ६० हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पांमध्ये करणार आहे.
****
औरंगाबाद शहराच्या जुन्या पाणी पुरवठा योजनेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीनं १९३ कोटी रुपये निधीचा एकत्रित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प अहवाल राज्य शासनाला निधी उपलब्धतेसाठी सादर करण्यात आला ��सल्याची माहिती, महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली. यामध्ये ४० किलोमीटर लांबीची ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलून ती ९०० मिलीमीटर व्यासाची टाकण्यात येणार आहे. तसंच जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती, उच्च पातळीवरील संतुलन जलकुंभ, अस्तित्वातील पंप आणि त्यांची दुरुस्ती आदि कामं करण्यात येणार आहेत.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. मंदाताई देशमुख स्मृती कथा लेखक पुरस्कार अमर हबीब यांना, प्राचार्य डॉ. शैलाताई लोहिया स्मृती लेखिका पुरस्कार प्रा. डॉ. अलका सरोदे - वालचाळे यांना, तर प्राचार्य डॉ. संतोष मुळावकर शिक्षक साहित्य पुरस्कार, प्राध्यापक देविदास खोडेवाड यांना जाहीर झाला आहे. हे पुरस्कार अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे दिवंगत संमेलनाध्यक्ष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जातात. येत्या ऑगस्ट महिन्यात १० व्या साहित्य संमेलनात हे पुरस्कार वितरित केले जातील.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात आणि सेनेच्या बंडखोर आमदारांचा निषेध करण्यासाठी, काल जालना इथं शिवसेनेच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजीमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात मामा चौक ते गांधी चमन चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणूक २०२२ साठी पदवीधर मतदार नोंदणी मोहीम सुरू असून, ३० जून पर्यंत नोंदणी करता येणार आहे. सध्या विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परिक्षा सुरू असल्यानं मतदार नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी, विद्यापीठ विकास मंच च्या वतीनं कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात शाळा व्यवस्थापनांकडून पालकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप, आम आदमी पक्षानं केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात, काल औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत एक निवेदन देण्यात आलं. शाळांनी शालेय शुल्कात भरमसाट वाढ केली तसंच शाळेने ठरवलेल्या दुकानातूनच पुस्तकं आणि गणवेश खरेदी करण्याची जबरदस्ती शाळांकडून केली जात असल्याचं, आम आदमी पक्षानं म्हटलं आहे. अशा तक्रारींची दखल घेऊन कठोर उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
****
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान - पीएम-कुसूम योजनेला रा��्यात गती देण्याचा निर्णय ��ाज्य शासनानं घेतला आहे. ही योजना राज्यातल्या ३४ ग्रामीण जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. पीएम-कुसूम योजनेअंतर्गत सद्य:स्थितीत ५२ हजार ७५० लाभार्थी निश्चित झाले असून, यापैकी पात्र ३५ हजार ५७८ लाभार्थ्याना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेश पाठवण्यात आले आहेत.
****
0 notes
Text
संजय राऊत ईडीसमोर हजर होणार नाहीत, म्हणाले- आज माझी मीटिंग आहे, मी मान कापली तरी पळून लढणार नाही
संजय राऊत ईडीसमोर हजर होणार नाहीत, म्हणाले- आज माझी मीटिंग आहे, मी मान कापली तरी पळून लढणार नाही
शिवसेना खासदार संजय राऊत. (फाइल फोटो) इमेज क्रेडिट स्रोत: ANI पत्रा चाळ मुंबईतील गोरेगाव परिसरात आहे, जिथे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्रा चाळ जमीन ��्रकरणात सुमारे 1,034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. महाराष्ट्राच्या राजकीय गदारोळात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला ईडीची नोटीस मिळाली आहे. राऊत आज सकाळी ११ वाजता ईडीच्या…
View On WordPress
0 notes
Text
संचयनी घोटाळ्याची 'ईडी' मार्फत होणार चौकशी !
संचयनी घोटाळ्याची ‘ईडी’ मार्फत होणार चौकशी !
सिंधुदुर्ग : संचयनी सारखी आर्थिक फसवणुकीची प्रकरणे समोर येत असतात. पोलीस गुन्हे दाखल करतात. मात्र, ठेवीदारांना पैसे परत मिळत नाहीत. संचयनी घोटाळा प्रकरणी विशेष लक्ष घालून, पुरावे योग्य पद्धतीने ईडीसमोर मांडून पैसे परत मिळवून देणार असल्याचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी सांगितले आहे.
संचयनी घोटाळा आणि त्याची व्याप्ती पाहता तपास योग्य दिशेने व्हावा आणि तथ्य समोर यावे यासाठी अंमलबजावणी…
View On WordPress
0 notes
Text
देशात नाहीत राहुल गांधी, आज ईडीसमोर होणार नाहीत हजर
देशात नाहीत राहुल गांधी, आज ईडीसमोर होणार नाहीत हजर
देशात नाहीत राहुल गांधी, आज ईडीसमोर होणार नाहीत हजर नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहू शकणार नाहीत. … देशात नाहीत राहुल गांधी, आज ईडीसमोर होणार नाहीत हजर आणखी वाचा The post देशात नाहीत राहुल गांधी, आज ईडीसमोर होणार नाहीत हजर appeared first on Majha Paper. नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात…
View On WordPress
#“आज#आजची खबर#आजच्या घडामोडी#ईडीसमोर#गांधी#ठळक बातम्या#देशात#नाहीत#बातम्या#भारत लाईव्ह#भारत लाईव्ह मीडिया#मराठी बातमी#मराठी समाचार#राहुल#हजर#होणार
0 notes
Text
“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”
“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”
“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…” ईडीच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं समोर आलंय. दाऊदचा भाचा आणि हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने ईडीसमोर ही कबुली दिलीय. ईडी मनी लाँडरिंग प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अलीशाह पारकरचाही जबाब नोंदवण्यात आला…
View On WordPress
#“दाऊदच्या#अंडरवर्ल्ड#आजच्या घडामोडी#ईडीसमोर#कबुली;#कराचीत#कुख्यात#ठळक बातम्या#डॉन#ताजी बातमी#दाऊद#बातमी#बातमी विशेष#बातम्या#बायकोने…#भाच्याची#भारत लाइव्ह#भारत लाईव्ह न्यूज#भारत लाईव्ह मीडिया#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्राची बातमी#म्हणाला…
0 notes
Text
“प्रियंका गांधींचं २ कोटींचं पेटिंग खरेदी करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला आणि…”, येस बँकेच्या सहसंस्थापकाचा ईडीसमोर गंभीर आरोप
“प्रियंका गांधींचं २ कोटींचं पेटिंग खरेदी करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला आणि…”, येस बँकेच्या सहसंस्थापकाचा ईडीसमोर गंभीर आरोप
“प्रियंका गांधींचं २ कोटींचं पेटिंग खरेदी करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला आणि…”, येस बँकेच्या सहसंस्थापकाचा ईडीसमोर गंभीर आरोप येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर गंभीर आरोप केलाय. प्रियंका गांधी यांच्याकडील चित्रकार एम. एफ. हुसेन यांची २ कोटी रुपयांची पेटिंग खरेदी करण्यासाठी माझ्यावर दबाव आला होता, असा आरोप राण कपूर यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबात…
View On WordPress
#२’#आणला#आणि#आरोप#ईडीसमोर#करण्यासाठी….#”#कोटींच#खरेदी#गंभीर#गांधींचं#दबाव#पेटिंग#प्रियंका#बँकेच्या#बातम्या#माझ्यावर#येस#सहसंस्थापकाचा
0 notes
Text
“आता ईडीसमोर बोला, तुमच्या हातात…”; नवाब मलिकांवरील कारवाईनंतर नारायण राणेंची प्रतिक्रया
“आता ईडीसमोर बोला, तुमच्या हातात…”; नवाब मलिकांवरील कारवाईनंतर नार���यण राणेंची प्रतिक्रया
“आता ईडीसमोर बोला, तुमच्या हातात…”; नवाब मलिकांवरील कारवाईनंतर नारायण राणेंची प्रतिक्रया महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. बुधवारी सकाळी ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर काही कागदपत्रे घेऊन अधिकाऱ्यांनी मलिक यांनी ईडीच्या कार्यालयात नेले. त्यांनर नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आली. हे प्रकरण अंडरवर्डशीही संबंधित…
View On WordPress
0 notes
Text
Sanjay Raut यांना ईडीकडून अटक, राऊतांच्या घरातून 11 लाख 50 हजार जप्त
Sanjay Raut यांना ईडीकडून अटक, राऊतांच्या घरातून 11 लाख 50 हजार जप्त
Sanjay Raut यांना ईडीकडून अटक, राऊतांच्या घरातून 11 लाख 50 हजार जप्त पत्रा चाळ जमिनीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 1 जुलै रोजी संजय राऊत मुंबईत ईडीसमोर हजर झाले होते. यानंतर एजन्सीने त्यांना दोनदा समन्स पाठवले होते, मात्र चालू संसदेच्या अधिवेशनात व्यस्त असल्याने ते दिसले नाहीत. महाराष्ट्रातील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे.…
View On WordPress
#raut#sanjay#अटक#आजची बातमी#आताची बातमी#ईडीकडून#घरातून#जप्त#ठळक बातमी#ताजी बातमी#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#यांना#राऊतांच्या#राजकारण#लाख#हजार
0 notes