#आयसीसी महिला
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
निरंतर प्रयत्नांमुळेच स्वच्छ भारताचं उद्दीष्ट पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
स्वच्छता अभियानाची सांगता, रस्ते, बसस्थानकं, यासह विविध सार्वजनिक ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार
नवव्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात
आणि
शारदीय नवरात्रोत्वाला प्रारंभ, घटस्थापनेची विविध मंदीरांमध्ये तयारी पूर्ण
****
निरंतर प्रयत्नांमुळेच स्वच्छ भारताचं उद्दीष्ट पूर्ण झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त काल नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचं स्वरुप आलं असून, यामध्ये सहभाग घेतलेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी आभार मानले.
आजपासून एक हजार वर्षांनंतर जेव्हा २१ व्या शतकातील भारताविषयी अभ्यास केला जाईल, तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल. या शतकात, स्वच्छ भारत हा जगातला सर्वात मोठा आणि लोकांच्या नेतृत्वाखालील लोकांचा संकल्प असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
‘‘आज से एक हजार साल बाद भी जब इकसवी सदी के भारत का अध्ययन होगा, तो उ��में स्वच्छ भारत अभियान को जरूर याद किया जायेगा। स्वच्छ भारत इस सदी में दुनिया का सबसे बडा और सबसे सफल जन भागीदारी वाला जन नेतृत्व वाला जन आंदोलन है।’’
यावेळी पंतप्रधानांनी स्वच्छतेशी संबंधित नऊ हजार सहाशे कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचा प्रारंभ केला. यात अमृत प्रकल्प स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान आणि गोबरधन योजनेअंतर्गत १५ बायोगॅस प्रकल्पांचा समावेश आहे.
अमृत-दोन योजनेंतर्गत सातारा पालिकेच्‍या स्वयंचलित पाणीपुरवठा प्रकल्‍पाचं, नळजोडण्‍यांना अद्ययावत मीटर बसवण्‍याच्‍या कामाचं, तसंच लातूर इथल्या हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र आणि औसा इथल्या शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचा यात समावेश आहे.
स्वच्छ भारत अभियानामुळे पाच लाख ५४ हजार गावं उघड्यावर शौचापासून मुक्त ठरली आहेत. या अभियानात ११ कोटी ६५ लाख घरगुती शौचालयं बांधण्यात आली. परिणामी अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश आल्याचं, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे.
****
दरम्यान, देशभरात कालही स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. रस्ते, बसस्थानकं, यासह विविध सार्वजनिक ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिली, ते काल नागपूर महापालिकेच्या श्रमदान कार्यक्रमात बोलत होते.
**
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी अभिवादन केलं. शहरात शहागंज इथल्या गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं सामुहिक सूतकताई करण्यात आली. अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होत विविध प्रकारच्या चरख्यांवर सूतकताई केली. या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झाली आहे.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छतेचे कार्य हे केवळ एक तास किंवा एक दिवसा पुरता न ठेवता कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचं आवाहन कुलगुरू ��ॉ. इंद्रमणी यांनी यावेळी केलं.
लातूर जिल्हा परिषद परिसरात श्रमदान कार्यक्रम घेण्यात आला. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी असं प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी  केलं.
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्‍यातल्या पिंपळगाव येवला इथं जिल्हा प्रशासनातर्फे काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
****
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातले फरारी आरोपी तसंच संबंधित शाळा संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं काल कर्जत परिसरातून अटक केली. या दोघांचाही ताबा राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडे दिला जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या बाजार सावंगी या प्राथमिक आरोग्य केंद्राला २०२३-२४ या वर्षासाठीचा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. जिल्ह्यातली १२ प्राथमिक आरोग्य केंद्रं तसंच २६ आरोग्यवर्धिनी केंद्रांनाही कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. आरोग्य केंद्रातल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कौतुक केलं आहे.
****
नवव्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना उद्या चार तारखेला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार आहे.
****
पेरु देशात लिमा इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं चौथ्या दिवशी पाच सुवर्ण पदकांची कमाई केली. पुरुषांच्या ५० मीटर रायफल सांघिक स्पर्धेत शौर्य सैनी, वेदांत आणि परीक्षित सिंग यांच्या संघाने सुवर्ण पदक पटकावलं. सध्या या स्पर्धेत भारत १४ पदकांसह पदकतालिकेत आघाडीवर आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं येत्या सोमवारपासून खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल यासंदर्भात झालेल्या बै��कीत ही माहिती दिली. या स्पर्धेत १० जिल्ह्यातल्या ४०० खेळाडूंचा सहभाग असेल. या स्पर्धा ५७ ते १२५ किलो पुरुष वजनी गटात तर ५७ ते ७७ किलो महिला वजनी गटात खेळवल्या जाणार आहेत.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूर, धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, अंबाजोगाई इथं योगेश्वरी तसंच अंबड इथं मत्स्योदरी देवस्थानसह आदिशक्तीच्या सर्वच मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी दिसून येत आहे.
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची आज पहाटे मंचकी निद्रा सं��ून देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या नवरात्र महोत्सवात विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार असून, यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आज दुपारी बारा वाजता तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होणार आहे.
माहूर इथं नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव कालावधीत ११० बस ��ाहतूक सेवेसाठी उपलब्ध राहणार असून, तीन आरोग्य पथकंही नियुक्त करण्यात आले आहेत.
अंबाजोगाई इथं आज सकाळी आठ वाजता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते सपत्निक वर्णी देऊन घटस्थापना तसंच योगेश्वरी देवीची महापूजा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरात कर्णपुरा इथल्या तुळजाभवानी देवीच्या यात्रेला आजपासून सुरवात झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल या स्थळाची पाहणी करून भाविकांसाठी केलेल्या सुविधा तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या जल आणि व्यवस्थापन संस्था - वाल्मीतील प्रशिक्षणार्थी अभियंत्यांनी शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याचं आवाहन, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी केलं आहे. वाल्मीच्या पंचेचाळीसाव्या स्थापना दिन कार्यक्रमात ते काल बोलत होते. या निमित्तानं वाल्मी परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथले शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं काल पुण्यात निधन झालं, ते ५९ वर्षांचे होते. पाटील यांनी दोन वेळा परंडा विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज परंडा इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
आगामी वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयकडून नव्या कर्णधाराची नियुक्ती, वाचा कोणाला मिळाली संधी
आगामी वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयकडून नव्या कर्णधाराची नियुक्ती, वाचा कोणाला मिळाली संधी
आगामी वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयकडून नव्या कर्णधाराची नियुक्ती, वाचा कोणाला मिळाली संधी येत्या वर्षात दक्षिण आफ्रिकेच्या यजमानपदाखाली होणाऱ्या आयसीसी महिला अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कर्णधार म्हणून कोणाला संधी मिळाली आहे, पाहूया. येत्या वर्षात दक्षिण आफ्रिकेच्या यजमानपदाखाली होणाऱ्या आयसीसी महिला अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
ICC महिला विश्वचषक फायनल: मेगन शुटने "अ‍ॅबसोल्युट रिपर" सह डॅनी व्याटचे स्टंप उडवत पाठवले. पहा | क्रिकेट बातम्या
ICC महिला विश्वचषक फायनल: मेगन शुटने “अ‍ॅबसोल्यु��� रिपर” सह डॅनी व्याटचे स्टंप उडवत पाठवले. पहा | क्रिकेट बातम्या
ICC महिला विश्वचषक फायनल: मेगन शुटने रिपर गोलंदाजी करत डॅनी व्याटला बाद केले© एएफपी ऑस्ट्रेलियाने रविवारी इतिहास रचला कारण मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाने सातव्या ५० षटकांच्या महिला विश्वचषक विजेतेपदाची नोंद केली. या संघाने अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करण्यासाठी अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन केले आणि शेवटी, त्यांनी 71 धावांनी सर्वसमावेशक विजय नोंदवला. एलिसा हिलीच्या 170 धावांच्या धडाकेबाज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
आयसीसीने टीम इंडियाच्या मिताली राजसह महिला खेळाडूंची क्रमवारी जाहीर केल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले
आयसीसीने टीम इंडियाच्या मिताली राजसह महिला खेळाडूंची क्रमवारी जाहीर केल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले
खराब फॉर्मशी झगडत असलेली भारताची कर्णधार मिताली राजची आयसीसी वनडे क्रमवारीत तीन स्थानांनी घसरण होऊन सातव्या स्थानावर घसरण झाली आहे, तर सलामीवीर स्मृती मानधना 11व्या स्थानी घसरली आहे. गेल्या आठवड्यात दोन स्थानांनी घसरलेली मिताली वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ 31 आणि पाच धावा करू शकली. तो ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर रॅचेल हेन्ससह संयुक्त सातव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, वेस्ट…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
INDW vs SLW: स्मृती मानधना-शफाली वर्माची ताकद: भारताने 9व्यांदा एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला, श्रीलंकेचा 146 चेंडूत पराभव करण्यापूर्वी प्रथम श्रीलंकेचा 146 चेंडूत पराभव केला
INDW vs SLW: स्मृती मानधना-शफाली वर्माची ताकद: भारताने 9व्यांदा एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला, श्रीलंकेचा 146 चेंडूत पराभव करण्यापूर्वी प्रथम श्रीलंकेचा 146 चेंडूत पराभव केला
हरमप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय एकदिवसीय संघाने 4 जुलै 2022 रोजी 10 ताकद दाखवली. भारतीय महिला संघाने पल्लिकेल येथील पल्लिकेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघाचा 10 गडी राखून पराभव केला. महिलांच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 10 विकेट्सने हा 9वा विजय आहे. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध पाचव्यांदा १० विकेट्सने विजय मिळवला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
महिला वर्ल्डकप २०२२, भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह अपडेट- टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
महिला वर्ल्डकप २०२२, भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह अपडेट- टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
माउंट माउंगानुई: आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan Cricket Match)यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या या सामन्याचे लाईव्ह अडपेट महाराष्ट्र टाईम्स सोबत…भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह अपडेट (India vs Pakistan Cricket Match) >> >> भारताला विजयासाठी एका विकेटची गरज >> राजेश्वरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mukulbhasin84-blog · 5 years ago
Photo
Tumblr media
💥 75 रन्स 💥 39 बॉल्स 💥 7 चौके 💥 5 छक्के 2020 महिला T20 वर्ल्डकप में एलिसा हीली के द्वारा 30 गेंद में बनायीं गयी फिफ्टी आयसीसी इवेंट के फाइनल में किसी भी फॉर्मेट में सबसे तेज़ है | (at Kanpur - कानपुर, UP, India) https://www.instagram.com/p/B-2WIS-AXsY/?igshid=blzxqqw2q99x
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय महिला अव्वल स्थानावर
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय महिला अव्वल स्थानावर
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधनाने फलंदाजीमध्ये व झुलन गोस्वामीने गोलंदाजीमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. सात वर्षांनी एकाच वेळेस गोलंदाजी व फलंदाजीमध्ये भारतीय खेळाडूंनी अव्वल स्थान पटकावले आहे. 2012 मध्ये मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अव्वल स्थान मिळवले होते.
इंग्लडविरूध्द झालेल्या मालिकेत झूलन गोस्वामी चांगले प्रदर्शन केले होते.
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years ago
Text
आयसीसी महिला टी -२० मध्ये हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद
आयसीसी महिला टी -२० मध्ये हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद
नवी दिल्ली : आयसीसी महिला टी -२० वर्ल्ड कपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया येथे सुरू होणार्‍या महिला टी -२० विश्वचषकात हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. बंगालची फलंदाज रिचा घोष संघात एकमेव नवीन चेहरा आहे.
संघात आणखी कोणतेही नवीन चेहरा नाही. हरियाणाची १५ वर्षाची शेफाली वर्मा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही चांगल्या कामगिरीनंतर तिची…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 June 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जून २०२३ सकाळी ७.१० मि.****
नव्या भारतासाठी सरकार आव्हानांचं संधींमध्ये रुपांतर करत राहणार-पंतप्रधानांचं प्रतिपादन
आगामी पाच वर्षात पेट्रोल डिझेलचा वापर कमी-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान;कथित लाठीमाराचा विरोधकांकडून निषेध तर न घडलेल्या घटनेचं राजकारण करू नये-सरकारचं आवाहन
नैऋत्य मोसमी पाऊस काल राज्यात दाखल
भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने पटकावलं आयसीसी क्रिकेट कसोटी अजिंक्यपद
आणि
महिला कनिष्ठ हॉकी संघानं दक्षिण कोरियावर मात करत जिंकला आशिया चषक
****
नव्या भारतासाठी सरकार आव्हानांचं संधींमध्ये रुपांतर करत राहील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते काल झालं. त्याअनुषंगानं एका ट्विट संदेशात त्यांनी या परिषदेबाबत बोलताना, राष्ट्रीय प्रशिक्षण परिषद ही अधिक चांगलं शिकवण्यासाठी आणि सेवा देण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचं सांगितलं.
देशभरातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची पायाभूत सुविधा मजबूत करणं, हा या परिषदेचा उद्देश आहे. या दोन दिवसीय परिषदेत केंद्रीय प्रशिक्षण संस्था, राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, प्रादेशिक आणि विभागीय प्रशिक्षण संस्था आणि संशोधन संस्थांसह विविध प्रशिक्षण संस्थांमधले, दीड हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. प्रशिक्षण प्रभाव म��ल्यांकन आणि सामग्रीचे डिजिटायझेशन, अशा मुद्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.
****
जम्मू इथल्या श्रीनगर इथं महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना केली आहे. मुख्यमंत्री काश्मीर दौऱ्यावर असून, त्यांनी काल सिन्हा यांची भेट घेतली. पर्यटनाचं महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढवणं आणि पर्यायाने आर्थिक विकास करणं, यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. श्रीनगर इथलं हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारं राहणार नाही, तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृद्ध कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल, असं त्यांनी एक पत्रकात म्हटलं आहे.
****
इलेक्ट्रिक वाहनं, इथेनॉल, सीएनजी आदींचा वापर वाढवून आगामी पाच वर्षात पेट्रोल डिझेलचा वापर कमी होईल, असं केंद्रीय रस्ते वहातूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं औरंगाबाद - पैठण राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामासाठी तोडलेल्या ५१ वटवृक्षांच्या यशस्वी पुनर्लागवडीची काल गडकरी यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. देशात विविध महामार्गावर आतापर्यंत महामार्ग प्राधिकरणानं तीन कोटी ५० लाख झाडं लावली असून, ६१ हजार झाडांची पुनर्लागवड केली, पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात जनतेचा सहभाग महत्वाचा असून, वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी जनतेने पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं. औरंगाबाद - पुणे द्रुतगती मार्गास लवकरच मंजुरी मिळेल, तसंच महामार्गावरच्या वाढत्या गतीसंदर्भात दोन दिवसात परिपत्रक निघणार असून, गती वाढवून दिली असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
दरम्यान, औरंगाबाद ते चाळीसगाव मार्गावर औट्रम घाटातील बोगदा तसंच रस्त्याबाबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. रस्त्याच्या प्रलंबीत मागण्या तसंच औट्रम घाटातील बोगदा होण्यासाठी सकारात्मक पावलं उचलू, असं आश्वासन गडकरी यांनी दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
**
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर बोराळा इथल्या पूर्णा नदीच्या खारपाण पट्ट्यातल्या खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात रुपांतर करण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाची, काल गडकरी यांनी पाहणी केली. या प्रयोगाला शासनाकडून प्रायोगिक तत्वावर, दीड कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं असून, यामुळे अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या ९५० गावांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पामुळे जमिनीपासून केवळ काही फुटांवर गोड पाणी उपलब्ध होऊ शकेल, तसंच, खारपाण पट्यातले शेतकरी वर्षांला दोन ते तीन पिकं घेऊ शकतील. खाऱ्या पाण्यातल्या झिंग्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असून, याठिकाणी शेतकऱ्यांनी झिंग्याच्या शेतीवर भर दिल्यास, एकरी ५० लाख रुपयाचं उत्पादन होणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
**
बुलडाणा जिल्ह्यात शेळद ते नांदुरा या रस्त्याचं लोकार्पणही गडकरी यांच्या हस्ते काल झालं. शासनाच्या विविध विकासकामांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता, त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा, तसंच तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं, ते म्हणाले.
****
विद्यापीठांनी जागतिक दर्जाच्या आरोग्य शिक्षणासाठी प्रयत्न करावेत, तसंच वैद्यकीय आणि निमवैद्यकीय शाखांमध्ये संशोधनाला मोठ्या प्रमाणात वाव असल्यानं त्यावरही विद्यापीठांनी भर द्यावा, अशी सूचना, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे. त्या काल नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या सांगता समारंभात बोलत होत्या. आरोग्य विद्यापीठाच्या वतीनं कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती, यावेळी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा वणीकर, आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सचिव अश्विनी जोशी यांनी दिली. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर, माजी कुलगुरू डॉ. मधुरा फडके, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
मुंबईत वसतीगृहात एका मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी, तसंच राज्यभरातल्या सर्व मुलींच्या वसतिगृहांच्या सुरक्षेचं ऑडीट करावं, अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यांनी काल या वसतीगृहाला भेट देवून माहिती घेतली. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाला राज्य शासनानं मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाख रुपयांची तातडीची सांत्वनपर मदत द्यावी, असंही आठवले यांनी सांगितलं आहे. त्यांनी पीडितेच्या पालकांची भेट घेवून त्यांचं सांत्वन केलं.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. रात्रीच्या मुक्कामासाठी काल पालखी सोहोळा समाधी मंदिराशेजारील आजोळघरी विसावला. आज सकाळी हा पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होत असून सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल.
दरम्यान, आळंदी इथं वारकऱ्यांवर कथित लाठीमाराचा विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निषेध केला आहे. प्रशासनाने मात्र लाठीमार झाल्याचा इन्कार केला आहे. बॅरिकेड्स ओलांडून मंदिरात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिकांना रोखताना, किरकोळ झटापट झाल्याचं, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बोलताना, न घडलेल्या घटनेचं राजकारण करू नये, असं आवाहन केलं आहे. ते काल नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. गेल्या वर्षी आळंदी इथं चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचं प्रथम प्राध्यान्य होतं, माध्यमांनी तसंच राजकीय पक्षांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. वारकऱ्यांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असल्याचं, फडणवीस यांनी नमूद केलं.
****
शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीमार्गात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे काही बदल करण्यात आले आहेत. मात्र, काल सकाळी पैठण तालुक्यातल्या दादेगाव मधल्या ग्रामस्थांनी ही पालखी परंपरेप्रमाणे आपल्याच गावातून न्यावी, अशी आग्रही मागणी करत, पालखीसोहळा रोखून धरला. त्यामुळे पालखी दादेगावमार्गे नेण्यात आली. शेवगाव इथं काल पालखी मुक्कामी होती. पालखीचं पहिलं रिंगण मंगळवारी मिडसावंगी इथं पार पडणार असल्याचं पालखी प्रमुख रघुनाथबुवा गोसावी यांनी सांगितलं आहे.
****
पुणे इथल्या केंद्रीय संचार ब्यूरो प्रादेशिक कार्यालयच्या वतीनं आयोजित, फिरत्या बहुमाध्यम वाहन प्रदर्शनाचं उद्घाटन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारचं नऊ वर्षातलं कार्य आणि प्रमुख योजनांची माहिती देण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्र सरकारनं अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी नशामुक्त भारत हा संकल्प निश्चित केला असून, त्याचं पालन करण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं आजपासून ते २६ जून या कालावधीत, "नशा मुक्त भारत पंधरवडा" जाहीर केला आहे. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणं, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी काल दूरदृष्यप्रणालीद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. हा पंधरवडा पाळण्याच्या दृष्टीनं त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. 
****
मुंब्रा धर्मांतर प���रकरणातला फरार आरोपी शाहनवाज मकसूद खान याला मुंब्रा पोलिसांनी, रायगड जिल्ह्यातून अटक केली आहे. उत्तरप्रदेशातल्या गाजियाबाद इथले पोलिस, धर्मांतर प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून शाहनवाज याचा शोध घेत होते.
****
पुण्यात आजपासून आयोजित करण्यात आलेल्या जी ट्वेंटी डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी विविध देशांच्या सुमारे ५० प्रतिनिधींचं काल लोहगाव विमानतळावर आगमन झालं. यामध्ये ऑस्ट्रेलिया, केनिया, श्रीलंका, ओमान, नायजेरिया, सिंगापूर, इंडोनेशिया, रशिया, मॉरीशस, इंग्लंड, लाओस या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीनं सर्व प्रतिनिधीचं पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं.
****
आर्टिफिशियल इंटेलिजन्स- कृत्रिम बुद्धीमत्तेच्या रूपाने झालेली ही पाचवी औद्योगिक क्रांती नि:शब्द करणारी आहे, असं सुप्रसिद्ध वक्ते आणि सिद्धेश इन्फोटेकचे संचालक संतोष बिरारी यांनी म्हटलं आहे. काल जळगाव इथं सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या जळगाव शाखेमार्फत आयोजित, चॅट जीपीटीचा व्यवसायावर होणारा परिणाम, या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते. ए आय चा नोकऱ्यांवर फार परिणाम होणार नसून, उलट नवीन संधी उपलब्ध होतील, मात्र, त्यासाठी आता केवळ एका पदवीने भवितव्य घडवणं शक्य नसून, त्यासोबत सृजनशीलता देखील गरजेची आहे, असं बिरारी यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं गेल्या नऊ वर्षांत सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अनेक जन कल्याणकारी योजना राबवल्याचं, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. मागासवर्गीयांसाठी घटनात्मक आयोग स्थापन केला असून, आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्यांना, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाअंतर्गत दहा टक्के आरक्षणाची तरतूद केल्याचं, यादव यांनी सांगितलं. जी-ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानं या वर्षात देशातली ५६ शहरं आपण जगासमोर ठेवली असून, विकासाच्या शक्यता फक्त दिल्ली-मुंबईतच नाहीत, हे जगाला दाखवून देण्यात भारत यशस्वी झाल्याचं, ते म्हणाले. औरंगाबाद तसंच नाशिक इथं राज्य कामगार विमा रुग्णालय सुरु करण्याची परवानगी दिली आहे, यामुळे कामगारांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलल असल्याचं यादव यांनी नमूद केलं. राज्यातलं शिवसेना आणि भाजप सरकार राज्याच्या विकासासाठी ��क्कमपणे काम करत आहे, असंही ते म्हणाले.
****
नैऋत्य मोसमी पाऊस काल राज्यात दाखल झाला. हवामान विभागानं ही माहिती दिली आहे. काल रत्नागिरी इथं मोसमी पाऊस दाखल झाला असून, कोल्हापूर परिसरातही पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस सात जून रोजी दाखल होतो. मात्र यंदा केरळमध्ये मोसमी पाऊस उशिरानं दाखल झाला होता. आगामी वाटचालीस पोषक हवामान असल्याचं, हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.
****
ऑस्ट्रेलियानं आयसीसी क्रिकेट कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. लंडन इथं झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा २०९ धावांनी पराभव केला. सामन्याच्या काल शेवटच्या दिवशी चारशे चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करणारा भारतीय संघ, केवळ २३४ धावाच करु शकला. भारताकडून अजिंक्य राहणे यानं सर्वाधिक ८९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं प्रथमच ही अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे.
****
भारताच्या महिला कनिष्ठ हॉकी संघानं चार वेळा विजेता ठरलेल्या दक्षिण कोरियाच्या संघाला दोन - एक अशा फरकानं हरवून, आशिया चषक जिंकला आहे. जपानमधल्या काकामिगाहारा इथं झालेल्या या सामन्यात, २२ व्या मिनिटाला अनुच्���ा पेनल्टी कॉर्नरच्या गोलमुळे, भारताची परिस्थिती बदलली. मात्र त्यानंतर तीन मिनिटांनी दक्षिण कोरियाच्या पार्क से ओननं गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर पुढे ४१ व्या मिनिटाला नीलमनं गोल करत सामन्यात आघाडी घेतली. भारताच्या बचाव फळीनं ही आघाडी टिकवून ठेवत आशिया चषकाला गवसणी घातली.
****
ज्योतिषांनी सकारात्मक आशा निर्माण करण्याचं काम करावं, असं आवाहन, ज्येष्ठ उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांनी केलं आहे. पुणे इथं, ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या ३१ ज्योतिष संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. दोन दिवसीय या अधिवेशनात विविध विषयांवर संवाद आणि विचारांची देवाणघेवाण होणार असून, ज्योतिष विषयक मान्यवरांच्या व्याख्यानासह विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात येईल. अधिवेशनाचं हे तिसरं वर्ष आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासे इथं काल आणि टेम्पोच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावर नेवासे तालुक्यातल्या वडाळा बहिरोबा गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला. शनिशिंगणापूर इथून देवदर्शन करुन निघालेल्या भाविकांच्या कारनं दुभाजकाला धडकून दुसर्या लेनवरुन जाणार्या आयशर टेम्पोला धडक दिली. मृतांमधले तीन जण मध्य प्रदेशातले तर एक जण नेवासे तालुक्यातला आहे.
****
��स्मानाबाद इथलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातलं महत्त्वपूर्ण विकासतीर्थ असून, एक आदर्श संस्था म्हणून विकसित करणार असल्याचं, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारच्या नऊ वर्षपूर्तिनिमित्त, विकास तीर्थभेट, या कार्यक��रमांतर्गत त्यांनी काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. उस्मानाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानं जिल्ह्यातल्या नागरिकांना चांगल्या आणि अद्ययावत आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार असून, सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेता येणं शक्य झाल्याची माहिती पाटील यांनी दिली.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Women’s World Cup: बांगलादेशला पराभूत केल्यानंतर भारतासमोर उपांत्य पोहोचण्यासाठी कोणता अडसर? जाणून घ्या
Women’s World Cup: बांगलादेशला पराभूत केल्यानंतर भारतासमोर उपांत्य पोहोचण्यासाठी कोणता अडसर? जाणून घ्या
Women’s World Cup: बांगलादेशला पराभूत केल्यानंतर भारतासमोर उपांत्य पोहोचण्यासाठी कोणता अडसर? जाणून घ्या महिला विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्य फेरीची लढत रंगतदार वळणावर आली आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात प्रत्येक संघाचे साखळी फेरीत सात सामने होणार आहेत. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ६ सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. मात्र इतर तीन संघांबाबत संभ्रम कायम…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
ICC महिला क्रिकेट विश्वचषक फायनल: अॅश्ले गार्डनरने 2020 T20 विश्वचषक फायनल विरुद्ध इंग्लंडमधील पराक्रमाची पुनरावृत्ती केली. पहा | क्रिकेट बातम्या
ICC महिला क्रिकेट विश्वचषक फायनल: अॅश्ले गार्डनरने 2020 T20 विश्वचषक फायनल विरुद्ध इंग्लंडमधील पराक्रमाची पुनरावृत्ती केली. पहा | क्रिकेट बातम्या
महिला विश्वचषक फायनलमध्ये अ‍ॅशले गार्डनरने टी-२० विश्वचषक फायनलमधून अशाच कामगिरीची पुनरावृत्ती केली.© Instagram इंग्लंड विरुद्ध आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये तिचे खराब फलंदाजीचे प्रदर्शन असूनही, ऑस्ट्रेलियाची अॅशले गार्डनर पु��्हा एकदा तिच्यासाठी निर्णायक ठरली कारण तिने टेलेंडर अन्या श्रबसोलेला बाद करण्यासाठी विजयाची मोहर पकडली. 2020 च्या T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये गार्डनरने अशाच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
हरमनप्रीत आणि स्मृती मानधना यांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा १५५ धावांनी पराभव केला.
हरमनप्रीत आणि स्मृती मानधना यांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा १५५ धावांनी पराभव केला.
आयसीसी महिला विश्वचषक २०२२: आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील तिसऱ्या साखळी सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार पुनरागमन करत वेस्ट इंडिज महिला संघाचा १५५ धावांनी पराभव केला. हॅमिल्टन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताची सलामीवीर यस्तिका भाटियासह स्मृती मानधनाने भारताला चांगली सुरुवात करून…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
BCCI ने स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स यांना दुबईतील T20 स्पर्धेत खेळण्याची परवानगी नाकारली.
BCCI ने स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स यांना दुबईतील T20 स्पर्धेत खेळण्याची परवानगी नाकारली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 1 ते 15 मे 2022 या कालावधीत दुबई येथे होणाऱ्या जागतिक महिला T20 आमंत्रण स्पर्धेत खेळण्यासाठी त्यांच्या पाच शीर्ष महिला क्रिकेटपटूंना परवानगी नाकारली आहे. ग्लोबल जेंडर इक्वॅलिटी इनिशिएटिव्हचा एक भाग म्हणून क्रिकेट हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियाच्या फ्रेरेब्रेक ग्लोबलद्वारे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. BCCI च्या पहिल्या पाच महिला क्रिकेटपटूंना स्पर्धेत भाग घेऊ न…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
खारपाण पट्ट्यातल्या पाण्याचं गोड्या पाण्यात रुपांतर करण्यासाठी शासनाकडून प्रायोगिक तत्वावर दीड कोटी रुपये अर्थसहाय्य.
विद्यापीठांनी जागतिक दर्जाच्या आरोग्य शिक्षणासाठी प्रयत्न करावेत-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार.
नैऋत्य मोसमी पाऊस आज राज्यात दाखल.
आणि
भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने पटकावलं आयसीसी क्रिकेट कसोटी अजिंक्यपद.
****
पूर्णा नदीच्या खारपाण पट्ट्यातील खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात रुपांतर करण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पाहणी केली. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर बोराळा इथल्या या प्रयोगाला शासनाकडून प्रायोगिक तत्वावर दीड कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं असल्याची माहिती, गडकरी यांनी दिली. या प्रयोगामुळे अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या ९५० गावांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पामुळे जमिनीपासून केवळ काही फुटांवर गोड पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. या प्रकल्पामुळे खारपाण पट्यातले शेतकरी वर्षांला २ ते ३ पिकं घेऊ शकणार आहेत. खाऱ्या पाण्यातल्या झिंग्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असून, याठिकाणी शेतकऱ्यांनी झिंग्याच्या शेतीवर भर दिल्यास, एकरी ५० लाख रुपयाचं उत्पादन होणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
****
दरम्यान, शासनाच्या विविध विकासकामांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेळद ते नांदुरा या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते आज बोलत होते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा, तसंच तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं, गडकरी म्हणाले. खामगाव तालुक्यात ८१६ कोटी रुपये खर्चाच्या अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या शेलाड ते नांदुरा या टप्प्याच्या कामाचं गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
****
विद्यापीठांनी जागतिक दर्जाच्या आरोग्य शिक्षणासाठी प्रयत्न करावेत तसंच वैद्यकीय आणि निमवैद्यकीय शाखांमध्ये संशोधनाला मोठ्या प्रमाणात वाव असल्यानं त्यावरही विद्यापीठांनी भर द्यावा अशी सूचना, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे. त्या आज नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या सांगता समारंभात बोलत होत्या. आरोग्य विद्यापीठाच्या वतीने कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा वणीकर आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सचिव अश्विनी जोशी यांनी दिली. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर, माजी कुलगुरू डॉ. मधुरा फडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
केंद्र सरकारनं गेल्या ९ वर्षांत सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अनेक जन कल्याणकारी योजना राबवल्याचं, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. मागासवर्गीयांसाठी घटनात्मक आयोग स्थापन केला असून, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गांतर्गत १० टक्के आरक्षणाची तरतूद केल्याचं यादव यांनी सांगितलं. जी-ट्वेंटी परिषदेच्या निमित्ताने या वर्षात देशातली ५६ शहरं आपण जगासमोर ठेवली असून, विकासाच्या शक्यता फक्त दिल्ली-मुंबईतच नाहीत, हे जगाला दाखवून देण्यात भारत यशस्वी झाल्याचं यादव यांनी सांगितलं. औरंगाबाद तसंच नाशिक इथं राज्य कामगार विमा रुग्णालय सुरु करण्याची परवानगी दिली आहे, यामुळे कामगारांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं असल्याचं यादव यांनी नमूद केलं. राज्यातलं शिवसेना आणि भाजप सरकार राज्याच्या विकासासाठी भक्कमपणे काम करत आहे, असंही यादव यांनी नमूद केलं.
****
विटाळ म्हणून दुर्लक्षित केलेली मासिक पाळी ही स्त्रीत्वाचा जन्म असतो, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. राज्य महिला आयोग आणि पुणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी कालावधीमध्ये वारकरी महिलांना सुरक्षा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्यवारी अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी आज त्या बोलत होत्या. आषाढी पायी वारी करणाऱ्या महिलांच्या मासिक पाळी आणि आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, अस चाकणकर म्हणाल्या.
****
मुंब्रा धर्मांतर प्रकरणातला फरार आरोपी शाहनवाज मकसू�� खान याला मुंब्रा पोलिसांनी रायगड जिल्ह्यातून अटक केली आहे. उत्तरप्रदेशातल्या गाजियाबाद इथले पोलिस धर्मांतर प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून शाहनवाज याचा शोध घेत होते.
****
केंद्र सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी नशामुक्त भारत हा संकल्प निश्चित केला असून, त्याचं पालन करण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने १२ ते २६ जून या कालावधीत “नशा मुक्त भारत पंधरवडा” जाहीर केला आहे. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. हा पंधरवडा पाळण्याच्या दृष्टीने त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.
****
जम्मू इथल्या श्रीनगर इथं महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना केली आहे. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून त्यांनी आज सिन्हा यांची भेट घेतली. पर्यटनाचं महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढवणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे, यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. ��्रीनगर इथलं हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारं राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृद्ध कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल, असं शिंदे यांनी एक पत्रकात म्हटलं आहे.
****
नैऋत्य मोसमी पाऊस आज राज्यात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. आज रत्नागिरी इथं मोसमी पाऊस दाखल झाला असून, पावसाच्या हलक्या सरीही सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस सात जून रोजी दाखल होतो. पण, यंदा केरळमध्ये मोसमी पाऊस उशिराने दाखल झाला होता. आगामी वाटचालीस पोषक हवामान असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
आयसीसी क्रिकेट कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा २०९ धावांनी पराभव करत, ऑस्ट्रेलियानं अजिंक्यपद पटकावलं आहे. आज शेवटच्या दिवशी चारशे चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करणारा भारतीय संघ केवळ २३४ धावाच करु शकला. भारताकडून अजिंक्य राहणे याने सर्वाधिक ८९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने प्रथमच ही अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे.
****
शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीमार्गात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे काही बदल करण्यात आले आहेत. मात्र, आज सकाळी पैठण तालुक्यातल्या दादेगाव मधील ग्रामस्थांनी ही पालखी परंपरेप्रमाणे आपल्याच गावातून न्यावी, अशी आग्रही मागणी करत, पालखीसोहळा रोखून धरला. त्यामुळे पालखी दादेगावमार्गे नेण्यात आली. आज शेवगाव इथं पालखी मुक्कामी राहणार असून, पालखीचं पहिलं रिंगण मंगळवारी मिडसावंगी इथं पार पडणार असल्याचं पालखी प्रमुख रघुनाथबुवा गोसावी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं आज आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केलं.
****
ज्योतिषांनी सकारात्मक आशा निर्माण करण्याचं काम करावं असं आवाहन ज्येष्ठ उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांनी केलं आहे. पुणे इथं, ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातील ३१ ज्योतिष संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. दोन दिवसीय या अधिवेशनात विविध विषयांवर संवाद आणि विचारांची देवाणघेवाण होणार असून, ज्योतिष विषयक मान्यवरांच्या व्याख्यानासह विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात येईल. अधिवेशनाचे हे तिसरे वर्ष आहे.
****
बाबाराव मुसळे हे केवळ वाशिम जिल्ह्याचे भूषण नव्हे तर हे मराठी भाषा आणि साहित्याचं भूषण आहेत, असे गौरवोद्गार कवी इंद्रजीत भालेराव यांनी काढले आहेत. वाशिम इथं ज्येष्ठ लेखक बाबाराव मुसळे यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त विदर्भ साहित्य संघ आणि बाबाराव मुसळे अमृतमहोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भालेराव काल बोलत होते. गेली पन्नास वर्ष सातत्यानं मुसळे हे लेखन करत असल्याचं भालेराव यांनी सांगितलं.
****
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
पहा: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील महिला विश्वचषक फायनलमध्ये हा खेळ बदलत होता का? | क्रिकेट बातम्या
पहा: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील महिला विश्वचषक फायनलमध्ये हा खेळ बदलत होता का? | क्रिकेट बातम्या
आयसीसी महिला विश्वचषक फायनल: खराब क्षेत्ररक्षणामुळे इंग्लंडला ऑस्ट्रेलियाने 356/5 धावा केल्या.© एएफपी ऑस्ट्रेलियाने रविवारी इंग्लंडविरुद्ध ICC महिला विश्वचषक फायनलमध्ये 365/5 पोस्ट केल्यामुळे त्यांचा A सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर आणला. अ‍ॅलिसा हिलीने 170 धावांची नोंद केली कारण इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला बॅटिंगमध्ये पाठवल्यानंतर 50 षटकांच्या संपूर्ण कालावधीसाठी लेदरचा पाठलाग करणे बाकी होते.…
Tumblr media
View On WordPress
0 notes