#रेणुका सिंग
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 20 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० मे  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा रिजर्व्ह बँकेचा निर्णय;३० सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेत जमा करण्याचं आवाहन
शाश्वत इंधनाचा वापर करून देशातल्या पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वी उड्डाण
राज्याचं प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी होण्यासाठी सुशासन नियमावलीला मान्यता
कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाईची काँग्रेस पक्षाची मागणी
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं सिट्रस इस्टेटच्या विविध कामांचं भूमिपूजन
माहूर इथं रेणुका देवी मंदिर परिसरात लिफ्टसह स्कायवॉक बांधकामाची आज पायाभरणी
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा पंजाब किंग्जवर चार गडी राखून विजय
आणि
नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानात दाखल
सविस्तर बातम्या
भारतीय रिजर्व्ह बँकेनं दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही नोट व्यवहारांसाठी वैध असेल. मात्र नागरिकांनी २३ मे पासून ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडील नोटा बँकेत जमा कराव्यात, असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. नागरिकांना आपल्या बँक खात्यातून एका वेळी दोन हजाराच्या दहा नोटा बदलून घेता येतील. रिजर्व्ह बँकेच्या १९ प्रादेशिक शाखांमधूनही या नोटा बदलता येणार आहेत.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी यासंदर्भात बोलताना, देशात डिजिटल व्यवहार मो��्या प्रमाणात वाढले असून, तसंच दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी पुरेसा वेळ रिजर्व्ह बँकेनं दिला असल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
Byte…
हा निर्णय रिजर्व्ह बँक ऑफ इंडियानी घेतलेला आहे.चलनामध्ये दोन हजाराच्या नोटा  फार कमी आलेल्या आहेत. त्याही पेक्षा डिजीटल ट्रान्झॅक्शन भारत देशामधे खूप चांगलं चालू आहे. QR Code हे सर्वसामान्याना माहीत झालं आहे. सामान्य नागरीकांना मी एवढं सांगू इच्छितो की, आपल्याकडे जर दोन हजाराच्या नोट असतील तर ते तुम्ही बँकेच्या कुठल्याही ब्रांच मध्ये जाऊन बदलू शकता
****
देशात विकसित केलेल्या सॅफ अर्थात शाश्वत इंधनाचा वापर करून देशातल्या पहिल्या व्यावसायिक विमानानं काल प्रवास केला. एअर एशियाच्या या विमानानं पुणे ते दिल्ली असा प्रवास केला. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं एका खाजगी कंपनीच्या मदतीनं हे इंधन तयार केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्ली विमानतळावर या विमानाचं स्वागत केलं. २०७० पर्यत शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारतात होत असलेल्या प्रयत्नांत हा मैलाचा दगड ठरल्याचं, त्यांनी सांगितलं. सॅफ इंधन हे पारंपरिक इंधनाप्रमाणे तयार न करता ते कृषी कचरा, घनकचरा आणि वन अवशेषांपासून तयार केल्याची माहिती पुरी यांनी दिली.
****
देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी काल दोन नवीन न्यायमूर्तींना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती कलापती व्यंकटरमण विश्वनाथन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयांतल्या न्यायाधीशांची संख्या आता ३४ झाली आहे. विश्वनाथन यांची निवड थेट बार कौन्सिलवरून सर्वोच्च न्यायालयाच्या पीठावर झाली आहे. अशी निवड होणारे ते फक्त दहावे वकील आहेत.
****
राज्याचं प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी होण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुशासन नियमावली २०२३ ला काल मान्यता दिली. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही मान्यता प्रदान केली. सुशासन नियमावली तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात दिल्या होत्या. यासाठी निवृत्त तत्कालीन उपलोकायुक्त सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीनं तयार केलेली देशातली अशा स्वरूपाची ही पहिलीच नियमावली असून, यामध्ये २०० हून अधिक सूचना देण्यात आल्या आहेत. सुशासन नियमावली २०२३ मध्ये नागरिकांना सुलभरीत्या सेवा मिळण्यावर भर देण्यात आला आहे. यात वातावरण��य बदलाच्या परिणामावरील कार्यवाहीसाठी स्वतंत्र कक्षाच्या निर्मितीचा देखील अंतर्भाव असेल. यामध्ये विभागनिहाय १६१ निर्देशांक तयार करण्यात आले असून अगदी जिल्हा पातळीपर्यंत या निर्देशांकाच्या आधारे सुशासनाची कामगिरी तपासली जाईल.
****
अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग-एन सी बी चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग -सी बी आय नं केलेल्या कारवाईच्या विरोधात वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं त्यांना दिलासा देत, सोमवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, वानखेडे यांनी यासंदर्भात या याचिकेत अनेक खुलासे केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडनं मुंबई मेट्रोच्या खांबांवर छोटे आणि मायक्रोसेल टेलिकॉम टॉवर्स बसवून प्रवाशांना दळणवळण सेवा देण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या उपक्रमांतर्गत पहिले १२ खांब ‘इंडस टॉवर्स’ या आघाडीच्या दूरसंचार कंपनीला देण्यात आले आहेत. ‘इंडस टॉवर्स’ कंपनीला आज याबाबतचं पत्र सुपूर्द करण्यात आलं. महा मुंबई मेट्रो विविध इच्छुक एजन्सींसाठी मेट्रोच्या खांबांवर टेलिकॉम टॉवर्सच्या स्थापनेचा परवाना लवकरच देईल. याअंतर्गत महामुंबई मेट्रोला तिकिटाव्यतिरिक्त येत्या १० वर्षात सुमारे १२० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
****
नाशिक इथं इलेक्ट्रॉनिक क्लस्टर विकसित करण्यासाठी जागा निश्चित करण्याचं आवाहन, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. नाशिक इथं उद्योजक संघटनांच्या निमा पॉवर २०२३ या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. मुख्यमंत्री उद्योग रोजगार निर्मिती योजनेतून मागील सहा महिन्यात १२ हजार ३६० उद्योजक तयार झाले असल्याचं ते म्हणाले. दिंडोरी, घोटी याठिकाणी सुद्धा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम.आय.डी.सीच्या विस्तारीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं.
****
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होत असून, ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. राज्य मंडळाखेरीज अन्य शिक्षण मंडळांचे इयत्ता दहावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. लवकरच राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया सुरू केली जात आहे. राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रात, अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. हे ऑनलाइन प्रवेश क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात अकरावी प्रवेश प्रक्रिया प्रचलित पारंपरिक पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करण्यात येणार असल्याचं, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं स्पष्ट केलं आहे.
****
केंद्र शासनानं महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांची व्यसनमुक्तीसाठी निवड केली आहे. यामध्ये सोलापूर, ठाणे, जळगांव, कोल्हापूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. “व्यसनमुक्त ग्राम”या शीर्षाखाली जिल्ह्यात पाच तसंच दहा हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायती निवडून, या गावांमध्ये व्यापक स्वरूपात मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेसाठी ब्रॅन्ड अॅम्बेसिडर निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
****
राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानं, अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची काल भेट घेत या मागणीचं निवेदन दिलं. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, शेवगाव, अहमदनगर आणि त्र्यंबकेश्वर इथं जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्यात आल्याचा आरोप केला. भडकाऊ भाषणं आणि वक्तव्य करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही, राज्यात मात्र या आदेशाचं पालन होताना दिसत नसल्याची टीका पटोले यांनी केली.
****
राजपूत भामटा जातीतून भामटा हा शब्द हटवण्यात येऊ नये, अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे. काल चंद्रपूर इथं या समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. भामटा शब्द या जातीतून वगळल्यास, विमुक्त जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक लाभ सवर्ण राजपूत घेतील आणि या प्रवर्गात मोडणाऱ्या १४ विमुक्त जातींवर अन्याय होईल, त्यामुळे भामटा शब्द वगळू नये, अन्यथा विमुक्त जाती प्रवर्गातील सर्वजातींना सोबत घेऊन राज्यभरात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
****
विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत निर्धारित ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवावी, असं आवाहन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं वंदे मातरम सभागृहात, काल छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती उद्योजकता शिबीराचं उद्धाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था - सिपेटच्या विद्यार्थी क्षमतेत दुप्पट वाढ करुन, एक हजार विद्यार्थी क्षमता करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात इसारवाडी इथं जागतिक दर्जाचे सिट्रस इस्टेट हा प्रकल्प नावारुपास येणार असल्याचं, पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी म्हटलं आहे. सिट्रस इस्टेटच्या विविध कामांचं काल भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. या प्रकल्पात मोसंबीची दर्जेदार आणि जातीवंत रोप तयार करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी या प्रकल्पात प्रशिक्षण घेऊन मोसंबी लागवडीमध्ये नवीन प्रयोग करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. 
दरम्यान, पैठण इथल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास कामांचं भूमिपूजनही काल भुमरे यांच्या हस्ते झालं. या उद्यानाच्या विकास कामांसाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या माध्यमातून सध्या रस्ते, पार्किंग, पाईपलाईन, संगीतकारंजे, ही कामं होणार असून, दिवाळीपूर्वी हे उद्यान पर्यटकांसाठी खुलं करण्यात येईल असं भुमरे यांनी यावेळी सांगितलं.
****
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यात माहूरगड इथं, श्री रेणुका देवी मंदिर परिसरात आज लिफ्टसह स्कायवॉकच्या बांधकामाचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
****
तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिरात पोषाखासंदर्भातल्या नियमावलीच्या फलकाबाबत, मंदिर प्रशासनानं, संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. दरम्यान, मंदिर समितीनं भाविकांसाठी कोणतेही पोषाख संकेत जाहीर केले नसल्याचं याआधीच स्पष्ट केलं आहे. तसंच भाविकांना मंदिरात प्रवेशासाठी कोणतेही निर्बंध घातले नसल्याचं प्रशासनानं जारी केलेल्या प्रत्रकात म्हटलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात १८७ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सनं सहा गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं.
या स्पर्धेत आज दिल्ली इथं दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नइ सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे.
****
नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, द��्षिण अंदमान समुद्र तसंच निकोबार बेटांच्या परिसरात मोसमी पाऊस सक्रीय ��ाला आहे. परिणामी देशाच्या नैऋत्य भागात २३ ते २५ मे दरम्यान काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या जवळा पांचाळ इथं बस स्थानकाजवळ असलेल्या ऑटोमोबाईलच्या दुकानाला अचानक आग लागली, या आगीत एक हॉटेल आणि एक घर खाक झालं. काल संध्याकाळी ऑटोमोबाईलच्या दुकानात गरम पॅच पंक्चर जोडताना आग लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दरम्यान, हिंगोली शहरात पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात काल संध्याकाळी एका धावत्या एसटी बसला अचानक आग लागली. चालकाच्या सतर्कतेनं मोठी दुर्घटना टळल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यात दोन बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. शिरुरकासार तालुक्यात जाटवड इथं तसंच पाटोदा तालुक्यात कारेगाव इथं हे विवाह होणार होते. हे दोन्ही बालविवाह रोखल्यानंतर बालसंरक्षण समितीनं या दोन्ही कुटुंबांचं प्रबोधन करून बालविवाह करणार नसल्याचं लिहून घेतलं.
****
परभणी जिल्ह्यात येत्या ३१ मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
****
२८ मे हा दिवस जागतिक पातळीवर मासिक पाळी दिवस म्हणून पाळला जातो. या दिनाचं औचित्य साधून नांदेड जिल्ह्यात २२ ते २८ मे या कालावधीत, मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबवण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी ही माहिती दिली. या सप्ताहात जनजागृती फेरी, चर्चासत्रे, प्रशिक्षण, प्रबोधन आदी व्यापक स्वरूपात उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
****
सारथी संस्थेमार्फत शाळा-महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्ती, स्वयंरोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा तसंच शेती संदर्भात मार्गदर्शन करण्यात येतं. या सर्व उपक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन सारथीचे लातूर इथले उपव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार ढगे यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी राज्य सरकार कडून एकूण तीनशे ८३ कोटी रुपये विकास निधी मंजूर झाला आहे. आमदार राणाजगजिंतसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यानं मंजूर झालेल्या या निधीत, उस्मानाबादसाठी एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये, तुळजापूर साठी एकशे एकोणचाळीस आणि नळदुर्गसाठी सत्त्याण्णव कोटी रुपयांचा समावेश आहे.
****
लातूर जिल्ह्यात जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत एकशे दोन या रुग्णवाहिकेतून मोफत सेवा पुरवली जात आहे. इतर कोणत्याही रुग्णांकरता एकशे दोन या रुग्णवाहिकेतून सेवा पुरवण्यासाठी शासनानं ठरवून दिलेला प्रति किलोमीटर दर आकारून रुग्णवाहिका पुरवण्यात येते.
****
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
रेणुका शहाणे यांनी दिग्दर्शित केलेला 'त्रिभंग'
रेणुका शहाणे यांनी दिग्दर्शित केलेला 'त्रिभंग'
अभिषेक खुले लेखक जे लिहितो अन् दिग्दर्शकाला जे सांगायचं असतं, ते तेवढ्याच ताकदीनं रसिकांच्या मनात पोहोचविण्याचं कसब अभिनेत्याच्या अंगी असावं लागतं. यात कलावंत यशस्वी ठरला तरच त्या पात्राचं अन् सामूहिक मेहनतीचं, कलाकृतीचं चीज होतं. ‘त्रिभंग’च्या बाबतीत हे घडलंय. नयनतारा आपटे या प्रसिद्ध लेखिकेच्या भूमिकेतील जेव्हा म्हणते, ‘इतना प्यार हैं मेरे बच्चों में, और इतनी बडी खाई उनके और मेरे बीच में. कभी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lehrennetworks-blog · 7 years ago
Link
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 October 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १३ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
हिजाब बंदीच्या खटल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता झाल्यानं हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवण्यात आलं आहे. कर्नाटक सरकारनं शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीचा लागू केलेला निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं मान्य केल्यानंतर, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या प्रकरणी दाखल विविध याचिकांवरच्या सुनावणीनंतर, न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल अवैध ठरवला. तर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी, हिजाब बंदीचा निर्णय योग्य ठरवला. त्यामुळे आता हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणीसाठी पाठवण्यात आलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल पाच लाख ६९ हजार नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१९ कोटी १५ लाख ३८ हजार ५७२ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार ७८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार ५५७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २६ हजार ५०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नेट परिक्षेच्या इतिहास विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याबद्दल समाज माध्यमांवर फिरत असलेला मजकूर बनावट असून, अशा मजकूर किवा व्हिडिओपासून सावध राहण्याचा सल्ला राष्ट्रीय चाचणी संस्थेनं दिला आहे.
****
महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेअंतर्गत स्टार्टअप्ससाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्रांना आजपासून प्रारंभ झाला. उद्यापर्यंत हे प्रशिक्षण तसंच सादरीकरण चालणार आहे. या उपक्रमाअंतर्गत उत्तम संकल्पना सादर करणाऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंतची पारितोषिकं दिली जाणार असून, विजेत्यांना येत्या १७ ऑक्टोबरला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
****
राज्या��ल्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी आणि सहायक प्राध्यापकांच्या प्रलंबित नियुक्त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. या प्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. काल सुनावणीवेळी जलील यांनी स्वतः खंडपीठात युक्तिवाद केला. न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने, या जनहित याचिकेमुळे महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाले असल्याची भावना व्यक्त केली. तसंच न्यायालयानं आदेशात नमुद मुद्यांवर शासनानं पुढील तारखेच्या आत प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
****
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची रक्कम आणि आठवडी सुट्टी देण्यात यावी, या मागणीसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीनं काल घाटी रुग्णालय ते सहायक कामगार आयुक्त कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आली. घाटीच्या अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे यांनी जवळपास साडेबारा लाख रुपये कपात करून ठेवले आहेत तसंच आठवडी सुटीही रद्द केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
****
महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट इनोव्हेशन सोसायटी’ने ‘ध्यास नाविन्याचा शोध नवउद्योजकांचा’ या उपक्रमातंर्गत काढलेली स्टार्टअप यात्रा, उद्या औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येणार आहे. अटल इन्क्युबूशन सेंटरचे संचालक डॉ.सचिन देशमुख यांनी ही माहिती दिली. राज्यातले नव उद्योजक तसंच तरुणांच्या नवसंकल्पनाला मूर्त रुप देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. या अंतर्गत ‘एआयटी-बापू फांऊडेशन’च्यावतीने उद्या सकाळी १० वाजता सिफार्ट सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यता आलं असून, विद्यार्थी नव उद्योजकांची प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे.
****
भारतीय महिला क्रिकेट संघानं बांग्लादेशात सुरु असलेल्या आशिया चषक महिला टी ट्टेंटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिला संघानं थायलंडचा ७४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी साठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकात सहा बाद १४८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल थायलंडचा संघ २० षटकात नऊ बाद ७४ धावाच करु शकला. दिप्ती शर्मानं तीन, राज��श्वरी गायकवाडनं दोन, तर रेणुका सिंग, स्नेहा राणा आणि शेफाली वर्मा��ं प्रत्येकी एक खेळाडु बाद केला. या स्पर्धेचा दुसरा उपान्त्य फेरीचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका संघादरम्यान सुरु झाला आहे.
//**********//
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
ICC महिला T20I रँकिंग: रेणुका सिंग गोलंदाजांमध्ये 13व्या स्थानावर, दीप्ती शर्मा 7व्या स्थानावर | क्रिकेट बातम्या
ICC महिला T20I रँकिंग: रेणुका सिंग गोलंदाजांमध्ये 13व्या स्थानावर, दीप्ती शर्मा 7व्या स्थानावर | क्रिकेट बातम्या
रेणुका सिंह यांचा फाइल फोटो.© एएफपी भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग हिने पाच स्थानांनी झे�� घेत फिरकीपटूंमध्ये 13व्या स्थानावर झेप घेतली आहे दीप्ती शर्मा मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या ICC महिला T20I क्रमवारीत तिचे सातवे स्थान कायम राखले आहे. गेल्या आठवड्यात चेस्टर-ले-स्ट्रीट येथे झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध नऊ विकेट्सने गमावलेल्या चार षटकांत केवळ 23 धावा देत किफायतशीर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
ICC महिला T20I खेळाडू रँकिंग: उत्कृष्ट CWG 2022 मोहिमेनंतर रेणुका सिंग करिअर-सर्वोत्तम 18 व्या स्थानावर क्रिकेट बातम्या
ICC महिला T20I खेळाडू रँकिंग: उत्कृष्ट CWG 2022 मोहिमेनंतर रेणुका सिंग करिअर-सर्वोत्तम 18 व्या स्थानावर क्रिकेट बातम्या
भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अव्वल विकेट घेणारी गोलंदाज म्हणून ICC महिला T20I क्रमवारीत 18 व्या स्थानावर प्रवेश केला आहे. रेणुकाच्या 11 विकेट्समुळे तिला प्रथमच शीर्ष 20 मध्ये प्रवेश मिळाला आहे. या कामगिरीनंतर तिने 10 स्पॉट्सची चढाई केली. तसेच, ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनीने तिच्या कर्णधाराला गमावल्यानंतर ICC महिला T20I खेळाडू क्रमवारीत फलंदाजांमध्ये…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार: रेणुका सिंग जुलैसाठी नामांकित व्यक्तींमध्ये | राष्ट्रकुल खेळ बातम्या
ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार: रेणुका सिंग जुलैसाठी नामांकित व्यक्तींमध्ये | राष्ट्रकुल खेळ बातम्या
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) इंग्लंडची घोषणा केली जॉनी बेअरस्टोश्रीलंकेची फिरकी सनसनाटी प्रभात जयसूर्या आणि पुरुष क्रिकेट आणि इंग्लंडचा फ्रान्सचा विक्रमी स्टार गुस्ताव मॅककीन नॅट सायव्हर आणि एम्मा कोकरू आणि ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराच्या जुलै आवृत्तीसाठी नामांकित म्हणून महिला क्रिकेटमधील भारताची रेणुका सिंग. इंग्लंडसाठी क्रीजवर उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर जून महिन्याचा ICC पुरुष खेळाडू,…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
CWG 2022 भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला - लाइव्ह स्कोअर अपडेट्स: पाकिस्तानने भारताविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, सामना 18 षटकांचा एक बाजूने कमी केला | राष्ट्रकुल खेळ बातम्या
CWG 2022 भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला – लाइव्ह स्कोअर अपडेट्स: पाकिस्तानने भारताविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, सामना 18 षटकांचा एक बाजूने कमी केला | राष्ट्रकुल खेळ बातम्या
भारत विरुद्ध पाकिस्तान: ही आहेत पथके – भारतीय महिला: स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (प.), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (क), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग, रेणुका सिंग, स्नेह राणा, सभिनेनी मेघना, पूजा तानाकर, पूजा वस्त्रकर. पाकिस्तानी महिला: इरम जावेद, मुनीबा अली (w), ओमामा सोहेल, बिस्माह मारूफ (c), निदा दार, आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​फातिमा…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
CWG 2022 भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला - लाइव्ह स्कोअर अपडेट्स: पाकिस्तानने भारताविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला | राष्ट्रकुल खेळ बातम्या
CWG 2022 भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला – लाइव्ह स्कोअर अपडेट्स: पाकिस्तानने भारताविरुद्ध ��लंदाजी करण्याचा निर्णय घेतला | राष्ट्रकुल खेळ बातम्या
भारत विरुद्ध पाकिस्तान: ही आहेत पथके – भारतीय महिला: स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (प.), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (क), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग, रेणुका सिंग, स्नेह राणा, सभिनेनी मेघना, पूजा तानाकर, पूजा वस्त्रकर. पाकिस्तानी महिला: इरम जावेद, मुनीबा अली (w), ओमामा सोहेल, बिस्माह मारूफ (c), निदा दार, आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​फातिमा…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
कॉमनवेल्थ गेम्समध्ये रेणुका सिंग ठाकूरची ताहलिया मॅकग्राला न खेळता येणारी इनस्विंगर. पहा | राष्ट्रकुल खेळ बातम्या
कॉमनवेल्थ गेम्समध्ये रेणुका सिंग ठाकूरची ताहलिया मॅकग्राला न खेळता येणारी इनस्विंगर. पहा | राष्ट्रकुल खेळ बातम्या
सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अ गटातील लढतीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध हृदयद्रावक पराभव झाला आहे. रेणुका सिंग ठाकूरने पाच षटकांत चार विकेट घेतल्याने भारताने १५४ धावांपर्यंत मजल मारण्याच्या प्रयत्नात शानदार सुरुवात केली होती, तथापि, अॅशलेग गार्डनरने स्वत:च्या हाताला धरून ऑस्ट्रेलियाला तीन विकेट्स आणि एक षटक शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग करण्यास मदत केली.…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१  मे २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** नरेंद्र मोदी यांनी घेतली सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ; कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून प्रत्येकी २४ तर नऊ जण स्वतंत्र खात्याचे राज्यमंत्री
** राज्यातल्या सात जणांना मंत्रीपदं; मराठवाड्यातून जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांना संधी
** पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी आर्थिक मागास प्रवर्गासाठीचं १० टक्के आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
आणि
** विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर १०४ धावांनी विजय मिळवत यजमान इंग्लंडची विजयी सलामी
****
नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना एका शानदार सोहळ्यात पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मोदी यांच्याबरोबरच २४ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून, नऊ जणांनी स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री म्हणून तर २४ जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यामध्ये ४५ जण लोकसभेचे तर १३ जण राज्यसभेचे सदस्य आहेत. महाराष्ट्रातल्या सात खासदारांना मंत्रीमंडळात स्थान मिळालं असून यामध्ये चार कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत, अकोल्याचे संजय धोत्रे यांचा नव्याने मंत्रीमंडळात समावेश झाला आहे, तर मराठवाड्यातून जालन्याचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना संधी मिळाली आहे.  
मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काल राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, डी. व्ही. सदानंद गौडा, निर्मला सीतारमण, रामविलास पासवान, नरेंद्र सिंग तोमर, रवीशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, थावरचंद गेहलोत, माजी परराष्ट्र सचिव सुब्रह्मण्यम जयशंकर, डॉ. रमेश पोखरियाल निशंक, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियुष ��ोयल, धर्मेंद्र प्रधान, मुक्तार अब्बास नक्वी, प्रल्हाद जोशी, डॉ. महेंद्रनाथ पांडे, अरविंद सावंत, गिरीराज सिंह, गजेंद्रसिंग शेखावत या २४ जणांनी शपथ घेतली.  
स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री म्हणून संतोषकुमार गंगवार, राव इंद्रजित सिंग, श्रीपाद नाईक, डॉ. जितेंद्रसिंग, किरण रिजीजू, प्रल्हादसिंग पटेल, आर. के. सिंग, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडवीय यांनी शपथ घेतली. तर राज्यमंत्री म्हणून फग्गनसिंह कुलस्ते, अश्विनीकुमार चौबे, अर्जुन राम मेघवाल, व्ही. के. सिंग, कृष्णपाल गुर्जर, रावसाहेब दानवे, गंगापूरम किशन रेड्डी, पुरूषोत्तम रूपाला, रामदास आठवले, साध्वी निरंजन ज्योती, बाबूल सुप्रियो, संजिवकुमार बलियान, संजय धोत्रे, अनुरागसिंग ठाकूर, अंगाडी सुरेश चन्नबसप्पा, नित्यानंद राय, रतनलाल कटारिया, व्ही. मुरलीधरन, रेणुका सिंग सरूता, सोम प्रकाश, रामेश्वर तेली, प्रतापचंद्र सारंगी, कैलास चौधरी आणि देबश्री चौधरी यांनी शपथ घेतली.
****
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी आर्थिक मागास प्रवर्गासाठीचं १० टक्के आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वैद्यकीय परिषदेनं अधिकच्या जागा निर्माण केल्या नसून, आहे त्या जागेत १० टक्के खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती अनिरूद्ध बोस यांच्या पीठानं म्हटलं आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही नोव्हेंबर २०१८ साली सुरू झाली असून, दहा टक्के आर्थिक मागास आरक्षणासंदर्भातील घटना दुरूस्ती ही जानेवारी २०१९ मध्ये झाली आहे, त्यामुळे हे आरक्षण लागू करता येणार नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
चालू वर्षात आरक्षण लागू करण्यासाठी अतिरिक्त जागा वाढवण्याची गरज आहे. जो पर्यंत भारतीय वैद्यकिय परिषद जागा निर्माण करत नाही, तो पर्यत सध्याच्या उपलब्ध जागांसाठी आरक्षण देता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सद्य राजकीय परिस्थितीवर सुमारे एक तास चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा राहूल गांधींचा निश्चय असल्याच्या पार्श्र्वभूमीवर त्यांनी या पदावर कायम राहावं, असं पवार यांनी त्यांना सूचवल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे. पवार यांची भेट घेतल्यानंतर गांधी यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
दरम्यान, कोणत्याही वृत्तवाहिनीवर चर्चा किंवा वादविवाद कार्यक्रमासाठी आपल�� प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एका संदेशात ही माहिती दिली.
****
लोकसभा निवडणुकीतल्या अपयशाची कारणं शोधण्यासाठी काँग्रेसनं दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून तिचा अहवाल प्राप्त झाल्यावर काँग्रेसच्या सर्व पातळ्यांवर मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचं पक्ष सूत्रांनी काल दिल्लीत सांगितलं. येत्या १० दिवसात समिती अहवाल सादर करेल असं समितीचे सदस्य योगानंद शास्त्री यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तडवी कुटुंबीयांनी काल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यानं दिली आहे.
****
तंबाखुमुक्त शाळा अभियानात नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा असं आवाहन, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केलं आहे. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन संयुक्तरित्या सुदृढ महाराष्ट्र बनविण्याचं कार्य करत असल्याची माहिती बडोले यांनी दिली. शाळांच्या परिसरात मिळणारा पेन हुक्का बंद करण्याचे काम राज्य शासन करीत असून, भविष्यात संपूर्ण शाळा या तंबाखूमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या ज्या कर्मचाऱ्यांना नवीन राष्ट्रीय आणि परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन  योजना लागू आहे, त्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकित रक्कम येत्या पाच वर्षात समान हप्त्यात देण्याचा शासन आदेश काल जारी करण्यात आला. येत्या एक जुलैला या थकबाकीचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे.
****
क्रिकेट -
इंग्लंडमध्ये सुरु झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कालचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला सामना १०४ धावांनी जिंकत यजमान इंग्लंडनं विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडनं निर्धारित ५० षटकात आठ बाद ३११ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ चा��ीसाव्या षटकात सर्वबाद झाला. हा संघ केवळ २०७ धावाच करु शकला. ७९ चेंडूत ८९ धावा करणाऱ्या इंग्लंडच्या बेन स्टोन्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
या स्पर्धेत आज नॉटिंगहॅम इथं वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे.
****
बीड जिल्ह्यात पाणी पुरवठा करण्यासाठी बारामतीच्या ॲग्रीकल्चरल ट्रस्टनं २१ टँकर्स उपलब्ध करून दिले आहेत, या टँकर्सचं लोकार्पण विधानसभेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते काल झालं. या टँकर्सद्वारे जिल्ह्यातल्या १०० गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातल्या पाणी टंचाई निवारणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यानुसार हे टँकर्स पुरवण्यात आले असून आणखी नऊ टँकर्स लवकरच उपल्ब्ध करुन दिले जाणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या रेणुका साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची  २०१८-१९ या वर्षाच्या रास्त आणि किफायतशीर दराची चारशे एकोणपन्नास लाख रुपयांहून अधिक थकबाकी असल्यानं, कारखान्याच्या दोन गोदामांना काल टाळं ठोकण्यात आलं. या थकबाकीसंदर्भात कारखान्याला चार मे रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, या नोटिसला कारखान्याकडून प्रतिसाद न आल्यामुळे उपविभागीय अधिकारी व्ही.एल. कोळी यांनी काल ही कारवाई केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वाळूज पोलिस ठाण्यातला जमादार अशोक जगधने याला पाच हजार रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी वैजापूर इथल्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं दोन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अपघाताचा गुन्हा दाखल न करता जप्त वाहन परत करण्यासाठी वाहनधारकाकडून जगधने यानं ही लाच मागितली होती. ३१ जानेवारी २०११ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून जगधने याला अटक केली होती.  
//**********//
0 notes