Tumgik
#अण्णा हजारे अरविंद केजरीवाल
marathinewslive · 2 years
Text
"तुम्ही सत्तेच्या नशेत आहात": अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरणाच्या वादावर
“तुम्ही सत्तेच्या नशेत आहात”: अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरणाच्या वादावर
अण्णा हजारे हे 2011 च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा चेहरा होते, ज्यातून ‘आप’चा उदय झाला. (फाइल फोटो) नवी दिल्ली: “दारूप्रमाणेच सत्तेचीही नशा आहे. तुम्ही सत्तेच्या नशेत आहात, असे दिसते.” सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी त्यांच्या सरकारी मद्य परवाना धोरणाबाबत त्यांचे माजी मंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रातील ही एक घृणास्पद ओळी आहे, जी भ्रष्टाचाराच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
इस्रोच्या 'आर. एल. व्ही. पुष्पक' उपग्रह प्रक्षेपक वाहनाचं यशस्वीपणे भू अवतरण
जागतिक जल दिन आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा
यापुढं कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पुनरुच्चार
आणि
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ महसूल मंडळात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज, 'आर. एल. व्ही. पुष्पक' हे पुनर्वापर करण्याजोगं उपग्रह प्रक्षेपक वाहन यशस्वीपणे जमिनीवर उतरवलं. कर्नाटकातल्या चित्रदुर्ग चाचणी केंद्रावर ही मोहीम पार पडली. संपूर्णपणे स्वयंचलित पद्धतीनं अंतराळ यानाचं संचालन, लँडिंग आणि इंधन व्यवस्थापन केल्याबद्दल, इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी या अभियानाच्या चमूचं अभिनंदन केलं आहे. इस्रोच्या आजच्या यशस्वी मोहिमेमुळे देशांतर्गत विकसित तंत्रज्ञानाची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. अंतराळातून परतणाऱ्या उपग्रह प्रक्षेपक वाहनाच्या अतिवेगवान स्वयंचलित लँडिंगसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे. आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर दाखल झाले. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांनी थिंपू इथे झालेल्या समारंभात, भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान, 'द ऑर्डर ऑफ द ड्रूक ग्यालपो' देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला. हा पुरस्कार म्हणजे एका व्यक्तीचा गौरव नसून भारत देशाचा आणि भारतातल्या जनतेचा गौरव असल्याची भावना व्यक्त करत, आपण भारतीय जनतेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारतो, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणात अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीसंदर्भातला निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात आज हजर करण्यात आलं. यावेळी युक्तिवाद करताना सक्तवसुली संचालनालयानं, केजरीवाल हेच या मद्य धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करत, मद्य धोरणातून मिळालेला पैसा गोवा निवडणुकीत वापरल्याचा आरोपही केला आणि केजरीवाल यांना दहा दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली.
दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आज आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आज दिल्ली आणि इतरत्र निषेधाची निदर्शनं केली. या पक्षाच्या नेत्या आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह अन्य नेत्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं.
केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पक्षाच्या वतीनं निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. टायर जाळत रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. या कार्यकर्त्यांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं.
धुळे इथेही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.
जालना इथंही आप कार्यकर्त्यांनी आज निषेध आंदोलन केलं. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.
****
दरम्यान, केजरीवाल यांना त्यांच्या कर्मांमुळेच अटक झाल्याची परखड प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिली आहे. ते आज अहमदनगर इथे पत्रकारांशी बोलत होते. आपल्यासोबत काम करणारे, मद्याच्या विरोधात असलेले केजरीवाल आता मद्य धोरणं तयार करत असल्याचं पाहून आपल्याला त्रास झाल्याची भावनाही हजारे यांनी व्यक्त केली.
****
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून दूर करावं, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरजित सिंह यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे.
****
दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणातच अटक झालेल्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या नेत्या के.कविता यांनी केलेला जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं दाखल करून घेण्यास नकार देत, जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगितलं आहे. राजकीय व्यक्ती असल्याच्या कारणावरून कोणालाही जामिनासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची परवानगी देता येणार नाही, सर्वांना नियमानुसार प्रक्रियाच पाळावी लागेल, अशी टिपणी न्यायालयानं केली. हा निकाल आल्यानंतर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली.
दरम्यान, के.कविता यांनी दाखल केलेल्या, पीएमएलएच्या तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयानं सक्त वसुली संचालनालयाकडून सहा आठवड्यात उत्तर मागितलं आहे.
****
जागतिक जल दिन आज सर्वत्र पाळला जात आहे. पाण्याच्या बचतीसाठी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९९२ मध्ये झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा दिवस जल दिन म्हणून घोषित केला होता. शांततेसाठी पाणी ही यंदाच्या जल दिनाची संकल्पना आहे.    
जागतिक जल दिनाच्या निमित्ताने आज छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जलसाक्षरता फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये नागरिक तसंच सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
धाराशीव इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं आज जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राधिकरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जल प्रतिज्ञा घेतली. जलजागृतीसाठी शहरातून जलदिंडी काढण्यात आली. यावेळी दैनंदिन जीवनातली पाणी वापरण्याची पद्धत, काटकसर आणि स्वच्छता या विषयावर व्याख्यान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर महायुतीच्या अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. निवडणूक संचालन समितीची बैठकही इथे पार पडली. भारतीय जनता पक्षानं आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली असून, आता उर्वरित २८ जागांसाठी महायुतीमध्ये जागावाटप होणं बाकी आहे.
****
भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे येत्या बुधवारी, २७ मार्चला, लोकसभेच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.त्या दिवशी सकाळी ९ वाजता नागपूरच्या संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह रॅली काढून ते अर्ज भरणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचा पुनरुच्चार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. बारामतीमध्ये आज ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीतल्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या कारवाईवर पवार यांनी टीका केली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १४ तर सोयगाव तालुक्यात ४ अशा १८ महसूल मंडळात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील ५० महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृष परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. अशा गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना व सवलती लागू करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत.
****
परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी आज जिल्ह्यातल्या पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेतली. पाणी टंचाई कृती आराखड्यातल्या प्रस्तावित उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. सध्या जिल्ह्यामध्ये दहा खाजगी विहिरी अधिग्रहित करून त्यातून पाणीपुरवठा सुरू आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात सध्या बारा गावात २१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर एकशे चाळीस गावात २७० विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणी पुरवलं जात आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती आणि नगर परिषद हद्दीतल्या सगळ्या यात्रा आणि धार्मिक स्थळी प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास तसंच धार्मिकतेच्या नावावर पशुबळी देण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. अशा पशुहत्या थांबवण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, यात्रा समिती सदस्य, देवस्थान विश्वस्त आणि समविचारी संस्था या सर्वांनी प्रयत्न करावेत, असंही या आदेशात म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यात निवडणूक काळात जात, धर्म आणि भाषाविषयक शिबिरांचं आयोजन न करण्याबाबतचा आदेश आज बीडच्या जिल्हा दंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी रद्द केला. याबाबतचा आदेश आज जारी करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता १६ मार्च पासून लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया दिनांक चार जून रोजी पूर्ण होणार आहे. या कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही, असं जिल्��ाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Arvind Kejriwal: अण्णांचा बोलविता धनी भाजप; केजरीवाल यांचे 'एक तीर दो निशाणे'
Arvind Kejriwal: अण्णांचा बोलविता धनी भाजप; केजरीवाल यांचे ‘एक तीर दो निशाणे’
Arvind Kejriwal: अण्णांचा बोलविता धनी भाजप; केजरीवाल यांचे ‘एक तीर दो निशाणे’ Arvind Kejriwal on Anna Hazare Letter: समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली सरकारवर पत्राद्वारे केलेल्या टीकेला अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलं आहे.  Arvind Kejriwal on Anna Hazare Letter: समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली सरकारवर पत्राद्वारे केलेल्या टीकेला अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलं आहे.  Go to Source
View On WordPress
0 notes
darshaknews · 4 years
Text
#Ahmednagar #AnnaHajare कोणताही पक्ष किंवा पार्टी सत्तेत असली तरी व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही : अण्णा हजारे
#Ahmednagar #AnnaHajare कोणताही पक्ष किंवा पार्टी सत्तेत असली तरी व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही : अण्णा हजारे
Tumblr media Tumblr media
अहमदनगर: भारतीय जनता पक्षाचे दिल्ली क्षेत्र अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात लोकपाल चळवळी सारखे आंदोलन उभारण्याचे आवाहन प्रसिद्धी माध्यमांतून केले होते. या आव���हानाला आज  हजारे यांनी प्रतिउत्तर दिले असून पैसा नाही, संपत्ती नाही, सत्ता नाही अशा माझ्यासारख्या माणसाला दिल्लीत कशाला बोलावता असा प्रश्न केला आहे.हजारे यांनी प्रसिद्धीसाठी…
View On WordPress
0 notes
khabarbharat · 4 years
Text
केजरीवालांविरुद्ध भाजपची मोठी खेळी; आता लक्ष अण्णांकडे
केजरीवालांविरुद्ध भाजपची मोठी खेळी; आता लक्ष अण्णांकडे
Tumblr media
दिल्लीत भाजपला नामोहरम करणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपनं आता मोठा राजकीय डाव टाकला आहे. (BJP invites Anna Hazare to join protest against Arvind Kejriwal) अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून पुढे आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालहे हजारे यांच्यासाठी कायमच दुखरी नस बनून राहिले आहेत. एकेकाळी हजारेंचे शिष्य म्हणविल्या जाणाऱ्या…
View On WordPress
0 notes
dendy · 7 years
Photo
Tumblr media
अण्णा केजरीनिना सगळी यशस्वी आंदोलने एकसारखीच यशस्वी होतात, पण प्रत्येक अयशस्वी आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने अयशस्वी होते! लिओ तोल्स्तोयने 'अॅना कॅरेनिना' ऐवजी राजकीय कादंबरी लिहिली असती, तर तिची सुरूवात अशी झाली असती.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अण्णा हजारेंनी मद्यधोरणावरून खरमरीत पत्र लिहिल्यानंतर केजरीवाल यांचं मोठं विधान, म्हणाले…
अण्णा हजारेंनी मद्यधोरणावरून खरमरीत पत्र लिहिल्यानंतर केजरीवाल यांचं मोठं विधान, म्हणाले…
अण्णा हजारेंनी मद्यधोरणावरून खरमरीत पत्र लिहिल्यानंतर केजरीवाल यांचं मोठं विधान, म्हणाले… Arvind Kejriwal Reply Anna Hazare : दिल्लीतील मद्य धोरणावरुन अण्णा हजारेंनी आपले जुने सहकारी अरविंद केजरीवाल यांनी पत्र लिहून खडसावलं होते. त्यावर आता अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहलं…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 August 2022 Time 07.10 AM to 07.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      दहा दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात, कोविड निर्बंध हटल्यामुळे भक्तांमध्ये उत्साह
·      मुंबईत कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर मेट्रो ३ प्रकल्पाची पहिली चाचणी
·      राज्य परीवहन महामंडळाच्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात
·      उस्मानाबादचे शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड शिंदे गटात सहभागी
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ४४४ रुग्ण, मराठवाड्यात २३ बाधित
·      कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील बारा शिक्षकांकडे शिक्षक पात्रता परिक्षेचे बनावट प्रमाणपत्र आढळल्याचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांचा आरोप  
·      जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांचं दीर्घ आजारानं निधन
आणि
·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा हाँगकाँग विरुद्ध सामना
 सविस्तर बातम्या
दहा दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून सुरवात होत आहे. कोविड काळातल्या दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा गणेशोत्सव धामधुमीनं साजरा करण्याचा उत्साह राज्यभरात दिसून येत आहे. कोविड प्रसाराला बऱ्यापैकी आळा बसल्यानं उत्सवावर गेली दोन वर्षं घातलेले निर्बंध राज्य सरकारनं यंदा हटवले आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मोठ्या गणेशमूर्ती मंडपात आणल्या असून आज त्यांची विधीवत प्रतिस्थापना करण्यात येईल. गणेशमूर्ती, आकर्षक मखरं, पूजा, रोषणाई तसंच सजावटीचं सामान, इत्यादी साहित्याची बाजारपेठेत रेलचेल दिसून येत आहे. घरगुती तसंच सार्वजनिक गणपतीच्या पूजा साहित्यासह इतर खरेदीसाठी गणेश भक्तांच्या गर्दीनं बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गणपतीपाठोपाठ येणाऱ्या महालक्ष्मी अर्थात गौरीपूजनाची तयारी करण्यासाठी महिलावर्गाची बाजारपेठांमधून गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे.
 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गणपतीला विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती मानलं जातं, असं सांगून  राष्ट्रपतींनी, लोकांना सौहार्द राखण्यासाठी भगवान गणेशाकडे प्रार्थना करायला सांगितलं आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही जनतेला गणेश चतुर्थीच्या  शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपतींनी सर्व देशवासियांच्या उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करू या. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया,’ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव जोरदार साजरा करताना सामाजिक दायित्वाचं पालन करावं पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.
****
मुंबईत कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर मेट्रो ३ या प्रकल्पाची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिली चाचणी घेण्यात आली. राज्य सरकार सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना प्राधान्य देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. येत्या सहा महिन्यात या मार्गावरच्या चाचण्या वेगानं पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चाचणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हा प्रकल्प म्हणजे मुंबईतल्या वाहतुक कोंडीवरचा रामबाण उपाय आहे. आता या प्रकल्पात कोणतंही विघ्न येणार नाही असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्याच्या विकासकामात कोणीही अडथळे आणू नयेत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
****
मागास भागांत रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग वाढीकरिता आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. इंडो रामा कंपनीच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. इंडोरामा कंपनी मार्फत राज्यात नव्यानं साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या माध्यमातून सुमारे चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथं वस्त्रोद्योगाशी निगडीत व्यवसायात नवी गुंतवणूक प्रस्तावित आहे. आगामी तीन ते चार वर्षांत टप्प्या-टप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार आहे.
****
मद्य विक्रीच्या दुकानांना अनुकूल अबकारी धोरण बनवल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली राज्य सरकारवर टीका केली आहे. याबाबत अण्णांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यावेळी आपण आमच्या आंदोलनाशी निगडीत होतात, त्यावेळी आपली भूमिका दारुच्या व्यसनाविरोधात होती, असं हजारे यांनी या पत्रात म्हटलं आहे. याबाबत अण्णांनी या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली...
Byte…
त्याने दारुबंदीची जी पॉलिसी केलीय, ती पॉलिसी अत्यंत चुकीची आहे. म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये दारुचं दुकान उघडायचं. आणि दारू पिण्याऱ्यांना २५ वर्ष वय होतं, दारू पिण्याऱ्यांचं ते २१ वरती आणलं. म्हणजे तुम्ही दारुला प्रोत्साहन देताय. अरे ती बरबाद होतील ना. म्हणून मला ते फील झालं. आणि पहिल्यांदा मी अरविंदच्या विरोधात अशा प्रकारची नोट काढली.
****
राज्य परीवहन -एसटी महामंडळाकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. ही सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपुरतीच आहे. पात्र  नागरिकांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र, राज्य परिवहन महामंडळाद्वारे देण्यात येणारी स्मार्ट कार्ड, डीजी लॉकर, मोबाईल-आधारकार्ड यापैकी कोणतंही ओळखपत्रं दाखवून या सेवेचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन एसटी महामंडळाने केलं आहे.
२६ ते २९ ऑगस्ट या गेल्या चार दिवसांत राज्यभरातून सुमारे १ लाख ५१ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी ही माहिती दिली.
****
राज्यात मतदानाविषयी अधिक जनजागृती निर्माण व्हावी आणि मतदारांनी आपल्या मतदानाच्या कर्तव्याचं चोख पालन करावं  यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ ही गणेशात्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. या विषयी उत्कृष्ट देखावा, सजावट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीसं दिली जाणार आहेत. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यंदाच्या स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव सजावटी सोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानाही या स्‍पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्‍ती, प्रसार-प्रचार करावा असं आयोगातर्फे सांगण्यात आलं.
****
शिवसेनेचे उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. गायकवाड यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. गायकवाड यांच्या शिंदे गटात प्रवेश करण्यात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या शिष्टाईची महत्त्वाची भूमिका असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आमदार चौगुले यांनी गुवाहाटी इथं असतांना, याबाबतचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी गायकवाड यांना पक्षकार्य करत राहण्याची सूचना केली असून, त्यांना सन्मान पूर्वक वागणूक मिळेल अशी ग्वाही दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबादच्या महिला कला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा साहित्यिक डॉ. रामकिशन दहिफळे यांना पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स प्रकाशन पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरुप’ या ग्रंथासाठी डॉ. दहिफळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे इथं एस.एम जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन सभागृहात १२ सप्टेंबरला हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातल्या जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातल्या पंचधातूच्या एैतिहासिक मूर्ती चोरी प्रकरणाचा दहा दिवस उलटूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी काल मुख्य रस्त्यावर दोन तास ठिय्या आंदोलन केलं. समर्थ रामदासांचे अकरावे वंशज भूषण महारूद्र स्वामी यांनीही आंदोलनात सहभाग घेत समर्थ स्वत: पूजा करत असलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमंतांच्या मूर्तींची चोरी करणाऱ्यांचा पोलिसांनी तातडीनं शोध घेण्याची मागणी केली. यावेळी पोलीस अधिक्षकांनी आंदोलकांशी संवाद साधून मूर्ती चोर लवकरच पकडले जातील, असं सांगितलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ४४४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ९८ हजार ७३८ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार २३७ झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल दोन हजार सहा रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ३९ हजार ५९४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १० हजार ९०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या सहा, लातूर चार, उस्मानाबाद- नांदेड- बीड- जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, आणि हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील बारा शिक्षकांकडे शिक्षक पात्रता परिक्षा- टीईटीचे बनावट प्रमाणपत्र आढळल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये काल पत्रकारांशी बोलतांना त्यांनी मंत्री सत्तार यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली. या प्रकरणात मंत्री सत्तार यांच्या मुलींची नावे देखील आहेत तसंच त्यांच्या वेतनाची कागदपत्रं आपल्याकडे असल्याचा दावा आमदार दानवे यांनी केला असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
****
जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अंबडचे माजी नगराध्यक्ष भवानीदास उर्फ बाबूराव भालचंद्र कुलकर्णी यांचं काल सायंकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत काँग्रेस पक्षात विविध पदांवर काम केलं, अंबड नगरपरिषदेचे अनेक वर्ष ते अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाबद्दल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतला भारतीय संघाचा हा दुसरा आणि अखेरचा साखळी सामना असेल. संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.
दरम्यान, काल अफगाणिस्तान संघानं बांग्लादेश संघावर ७ गडी राखत विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तान संघानं सुपर ४ फेरीत प्रवेश केला आहे.  
****
केंद्र शासनाच्या वतीने सप्टेंबर महिना हा “राष्ट्रीय पोषण महिना”म्हणून साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी विविध कार्यक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करण्याच्या सूचना नांदेडचे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय पोषण महिना या विषयावर काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अरविंद केजरीवालांनी अण्णा हजारेंच्या पत्राला दिले उत्तर, म्हणाले, “त्यांना भाजपने..”
अरविंद केजरीवालांनी अण्णा हजारेंच्या पत्राला दिले उत्तर, म्हणाले, “त्यांना भाजपने..”
अरविंद केजरीवालांनी अण्णा हजारेंच्या पत्राला दिले उत्तर, म्हणाले, “त्यांना भाजपने..” नवी दिल्ली – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवून त्यांच्यावर टीका केली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी आज केजरीवाल यांना विचारणा केली असता त्यांनी अण्णांचे नावही घेतले नाही. मात्र त्यांना भाजपने पुढे केले असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की जेव्हा हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 August 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      मुंबई मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी पूर्ण; सहा महिन्यात चाचण���या वेगानं पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास.
·      ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत एसटी प्रवास योजनेच्या अंमलबजावणीला सुरवात.
·      उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाची सगळीकडे जय्यत तयारी;बाजारपेठा फुलल्या.
आणि
·      जांबसमर्थ इथल्या मूर्ती चोरी प्रकरणी तपासातल्या दिरंगाईविरोधात ग्रामस्थांचं आंदोलन.
****
मुंबईत कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर मेट्रो ३ या प्रकल्पाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिली चाचणी घेण्यात आली. राज्य सरकार सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना प्राधान्य देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. येत्या सहा महिन्यात या मार्गावरच्या चाचण्या वेगानं पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चाचणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हा प्रकल्प म्हणजे मुंबईतल्या वाहतुक कोंडीवरचा रामबाण उपाय आहे. आता या प्रकल्पात कोणतंही विघ्न येणार नाही असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्याच्या विकासकामात कोणीही अडथळे आणू नयेत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
****
मागास भागांत रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग वाढीकरिता आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. इंडोरामा कंपनीच्या शिष्टमंडळाने आज  मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. इंडोरामा कंपनी मार्फत राज्यात नव्याने साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या माध्यमातून सुमारे चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. इंडोरामा कंपनीचा सध्या नागपूर इथं वस्त्रोद्योग असून सुमारे दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल आहे. आता नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथं वस्त्रोद्योगाशी निगडीत व्यवसायात नवी गुंतवणूक प्रस्तावित आहे. आगामी तीन ते चार वर्षांत टप्प्या-टप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार आहे.
****
मद्यविक्रीच्या दुकानांना अनुकूल अबकारी धोरण बनवल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली राज्य सरकारवर टीका केली आहे. याबाबत अण्णांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यावेळी आपण आमच्या आंदोलनाशी निगडीत होतात, त्यावेळी आपली भूमिका दारुच्या व्यसनाविरोधात होती, असं हजारे यांनी या पत्रात म्हटलं आहे. याबाबत अण्णांनी या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली –
 त्याने दारुबंदीची जी पॉलिसी केलीय, ती पॉलिसी अत्यंत चुकीची आहे. म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये दारुचं दुकान उघडायचं. आणि दारू पिण्याऱ्यांना २५ वर्ष वय होतं, दारू पिण्याऱ्यांचं ते २१ वरती आणलं. म्हणजे तुम्ही दारुला प्रोत्साहन देताय. अरे ती बरबाद होतील ना. म्हणून मला ते फील झालं. आणि पहिल्यांदा मी अरविंदच्या विरोधात अशा प्रकारची नोट काढली.
****
एसटी महामंडळाकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. ही सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपुरतीच आहे. पात्र नागरिकांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र, राज्य परिवहन महामंडळाद्वारे देण्यात येणारी स्मार्ट कार्ड, डीजी लॉकर, मोबाईल-आधारकार्ड यापैकी कोणतंही ओळखपत्रं दाखवून या सेवेचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन एसटी महामंडळाने केलं आहे.
****
उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करू या. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करू या, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव जोरदार साजरा करताना सामाजिक दायित्वाचं पालन करावं, पर्यावरणाची हानी होऊ नये याची काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.
दरम्यान, कोविड काळातल्या दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा गणेशोत्सव धामधुमीने साजरा करण्याचा उत्साह राज्यभरात दिसून येत आहे. कोविड प्रसाराला बऱ्यापैकी आळा बसल्यानं उत्सवावर गेली दोन वर्षं घातलेले निर्बंध राज्य सरकारने यंदा हटवले आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मोठ्या गणेशमूर्ती मंडपात आणल्या असून उद्या विधीवत त्यांची प्रतिस्थापना करण्यात येईल. गणेशमूर्ती, आकर्षक मखरं, पूजा, रोषणाई तसंच सजावटीचं सामान, इत्यादी साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत.
घरगुती तसंच सार्वजनिक गणपतीच्या पूजा साहित्यासह इतर खरेदीसाठी गणेश भक्तांच्या गर्दीनं बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गणपतीपाठोपाठ येणाऱ्या महालक्ष्मी अर्थात गौरीपूजनाची तयारी करण्यासाठी महिलावर्गाची बाजारपेठांमधून गर्दी होत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथं पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज शहरातल्या विसर्जन विहीरींची पाहणी केली.
पैठण इथं गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागच्या वतीनं आज पथ संचलन करण्यात आलं.
****
समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातल्या जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातल्या पंचधातूच्या एैतिहासिक मूर्ती चोरी प्रकरणाचा दहा दिव�� उलटूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आज मुख्य रस्त्यावर दोन तास ठिय्या आंदोलन केलं. समर्थ रामदासांचे अकरावे वंशज भूषण महारूद्र स्वामी यांनीही आंदोलनात सहभाग घेत, सातशे वर्षांपूर्वी समर्थ स्वत: पूजा करत असलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमंतांच्या मूर्तींची चोरी करणाऱ्यांचा पोलिसांनी तातडीनं शोध घेण्याची मागणी केली. यावेळी पोलीस अधीक्षकांनी आंदोलकांशी संवाद साधून मूर्ती चोरांना लवकरच पकडले जाईल, असं सांगितलं.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१२ कोटी २६ लाखांच्या वर गेली आहे. त्यात १५ कोटी ५५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे. आज ६ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची मात्रा घेतली.
राज्यात आज सकाळपासून १९ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ५८ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८२ लाख ४३ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
****
कीटकजन्य आजाराबाबत अद्यापही मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचं मत, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात लिम्फेटीक फायलेरीया अर्थात हत्तीपाय रोग कार्यशाळेत स्वामी बोलत होते. कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग रुग्णशोध मोहीम, रुग्णांची यादी तयार करणे, हत्तीरोगाबाबत जनजागृती करणं ��ावर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. प्रशिक्षण, तपासणी आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर या कार्यशाळेत भर देण्यात आला. सोलापूर जिल्हा हत्तीरोग निर्मुलनाच्या टप्प्यावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
औरंगाबादच्या महिला कला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा साहित्यिक डॉ.रामकिशन दहिफळे यांना पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स प्रकाशन पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरुप’ या ग्रंथासाठी डॉ.दहिफळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे इथं एस.एम.जोशी सोशलिस्ट फांडेशन सभागृहात १२ सप्टेंबरला हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“तुम्ही सत्तेच्या नशेत…” दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून अण्णा हजारेंची केजरीवालांवर बोचरी टीका
“तुम्ही सत्तेच्या नशेत…” दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून अण्णा हजारेंची केजरीवालांवर बोचरी टीका
“तुम्ही सत्तेच्या नशेत…” दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून अण्णा हजारेंची केजरीवालांवर बोचरी टीका ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी एक पत्र लिहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. Anna Hazare letter to Arvind Kejriwal : मद्य धोरणात कथित घोटाळा झाल्याचे आरोप दिल्ली सरकारवर करण्यात आले आहेत. याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. असं असताना आता…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अण्णा हजारेंची टीका,'”तुम्ही सत्तेच्या नशेत आहात असे दिसते…”
अण्णा हजारेंची टीका,’”तुम्ही सत्तेच्या नशेत आहात असे दिसते…”
अण्णा हजारेंची टीका,’”तुम्ही सत्तेच्या नशेत आहात असे दिसते…” नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरणवर भाजप रोज आपवर हल्लाबोल करत आहे. त्याचवेळी समाजसेवक अण्णा हजारे यांनीही दारू धोरणावर नाराज होऊन दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात अण्णांनी दिल्लीतील दारूची दुकाने बंद करण्यास सांगितले आहे. अण्णा हजारे यांनी पत्रात लिहिले,’स्वराज नावाच्या या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
महाराष्ट्र: ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडी व बीजेपी या दोघांनीही विजय मिळविण्याचा दावा केला - महाराष्ट्र: महापिकास आघाडी आणि भाजप या दोघांनीही ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा दावा केला.
महाराष्ट्र: ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडी व बीजेपी या दोघांनीही विजय मिळविण्याचा दावा केला – महाराष्ट्र: महापिकास आघाडी आणि भाजप या दोघांनीही ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा दावा केला.
टोकन फोटो – फोटो: अमर उजाला अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूकीत मिनी विधानसभा निवडणुका म्हटल्या जाणा BJP्या भाजप आणि महाविकस आघाडी या तीन पक्षांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे. भाजपचे म्हणणे आहे की 6000 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच निवडले जातील, तर शिवसेना, कॉंग्रेस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 January 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि. ****  कार्टोसॅट द्वितीय मालिकेतल्या सातव्या उपग्रहासह एकूण ३१ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण  सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसल्याचं, केंद्र सरकारकडून स्पष्ट  कन्या माझी ‘भाग्यश्री’ योजना घराघरात पोहोचवणार - महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि  राजमाता जिजाऊ तसंच स्वामी विवेकानंद यांना काल सर्वत्र अभिवादन **** भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्त्रोनं काल आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून कार्टोसॅट द्वितीय मालिकेतल्या उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. पी एस एल व्ही सी ४० या अग्निबाणाच्या साहाय्यानं एकूण ३१ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. यामध्ये तीन भारतीय आणि २८ परदेशी उपग्रहांचा समावेश आहे. यात कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. पाच वर्षांच्या मोहिमेवर पाठ��ण्यात आलेला कार्टोसॅट-दोन हा भारताचा सातवा रिमोट सेन्सिंग उपग्रह असून, भारताचं हे शंभरावं उपग्रह प्रक्षेपण ठरलं आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. **** सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी उपस्थित केलेल्या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसल्याचं, केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय कायदे राज्यमंत्री पी पी चौधरी यांनी काल यासंदर्भात बोलताना, जगभरात नावाजलेली भारतीय न्यायव्यवस्था स्वतंत्र असून, आपले अंतर्गत प्रश्न सोडवण्यास सक्षम असल्याचं, स्पष्ट केलं. या मुद्यावरून राजकारण केलं जाऊ नये, असंही सरकारनं म्हटलं आहे. न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकूर, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषद घेऊन न्यायालयातल्या प्रशासकीय कामकाजावर नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं पक्षाच्या ट्विटर अकाऊंटवरुन, लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी, याबद्दल चिंता व्यक्त करत, न्यायमूर्तींनी मांडलेल्या मुद्यांची नि:पक्ष आणि तातडीनं चौकशी व्हावी, असं मत व्यक्त केलं. ***** सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्यायमूर्ती बी एच लोया यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला १५ जानेवारी पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई वकील संघानं मात्र हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू असल्यानं, सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवर सुनावणी घेऊ नये, अशी विनंती केली, मात्र हा आक्षेप विचारात घेऊन, येत्या सोमवारी १५ तारखेला या प्रकरणी सुनावणी घेणार असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती लोया यांचा उत्तरीय तपासणी अहवालही न्यायालयानं मागवला आहे. **** ई-नाम पोर्टलच्या माध्यमातून शेतमालासाठी राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय कृषी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. राज्यातल्या सर्व बाजार समित्यांनी मध्यस्थांची भूमिका बजावून देशात उत्तम बाजारपेठ तयार करण्यास मदत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं. **** कन्या माझी ‘भाग्यश्री’ ही योजना घराघरात पोहोचवणार असल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. काल बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कन्या माझी भाग्यश्री योजनेच्या जाणीव जागृती रथयात्रेचा प्रारंभ केल्यानंतर त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यावेळी उपस्थित होते. सिंदखेडराजा इथून प्रारंभ झालेल्या या रथयात्रेचा सातारा जिल्ह्यात नायगाव इथं समारोप होणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या वाढीव मानधनाची रक्कम एक एप्रिल २०१८ पासून त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार, महिला सक्षमीकरणासाठी बचतगटांना शून्य टक्के दरानं कर्जपुरवठा करणार, तसंच योजनेच्या माध्यमातून एका मुलीवर कुटुंब नियोजन करणाऱ्या कुटूंबाला ५० हजार रूपये दीर्घ मुदत ठेव दिली जाणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं. **** मुंबईतल्या कमला मिल अग्निकांडप्रकरणी आरोपी असलेला मोजोस बिस्तो पबचा मालक युग तुली याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबईच्या न्यायालयानं फेटाळला आहे. अग्निकांड झाल्यानंतर फरार झालेला युग तुली परवा हैदराबादमध्येही पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना काल सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. जिजाऊ यांच्या जन्मस्थानी, बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याच्या महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी जिजाऊंना अभिवादन केलं. यावेळी केलेल्या भाषणात केजरीवाल यांनी, महाराष्ट्रात उद्भवणाऱ्या जातीय ताणतणावांना भाजप तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जिजाऊ आणि विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी बी एम कांबळे यांनी जिजाऊ आणि विवेकानंदांना आदरांजली वाहिली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा इथं काल स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नेहरु युवा केंद्राच्या वतीनं आयोजित युवा सप्ताहाचं उद्घाटन झालं. उद्घाटन कार्यक्रमात कौशल्य विकास, अवयवदान, रोजगार आणि स्वयंरोजगार याबद्दल युवकांना मार्गदर्शन करण्यात आलं. लातूर शहरात विविध संस्था, संघटनांच्यावतीनं रक्तदान शिबिर, फळ वाटप अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जिजाऊ तसंच विवेकानंदांना आदरांजली वाहण्यात आली. मराठवाड्यात सर्वत्र विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जिजाऊ तसंच विवेकानंदांना अभिवादन करण्यात आलं ***** अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष तथा योगेश्वरी देवल समितीचे विश्वस्त बालासाहेब लोमटे यांचं काल सकाळी लातूर इथं निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना गुरुवारी लातूर इथं खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं होतं, काल सकाळी उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर काल अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. **** ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. श्रीराम गुंदेकर यांचं काल पहाटे लातूर इथं ह्रदयविकाराच्या तीव्र धक्यानं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. गुंदेकर हे सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. लातूरच्या राजर्षि शाहू महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. **** हिंगोली जिल्ह्यात वसमत नांदेड रस्त्यावर उसाच्या ट्रक वर कार आदळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री हा अपघात झाला. हे तिघे जिंतूर तालुक्यातल्या आसेगाव इथले रहिवासी होते. **** अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी वसंत कराड याला सात वर्ष सक्त मजुरी तसंच पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये ही घटना घडली होती. **** हिंगोली पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक श्रीरंग मार्कंड याला अडीच हजार रूपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ पकडलं. रमाई घरकुल योजनेतील अनुदानाचा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी मार्कंड याने ही लाच मागितली होती. **** लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्थानिक संस्था कर - एलबीटीचे दर पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. शासनानं १ नोव्हेंबर २०१२ पासून लागू झालेले कराचे दर कमी करा���ेत अशी विनंती व्यापारी महासंघाच्यावतीनं करण्यात आली होती. महानगरपालिकेनं त्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. *****
0 notes