#“बेगडी’
Explore tagged Tumblr posts
Text
भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम “बेगडी’ – सुषमा अंधारे
भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम “बेगडी’ – सुषमा अंधारे
भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम “बेगडी’ – सुषमा अंधारे पुणे – शाई फेकण्यापेक्षा ती शाई साठवून महापुरुषांचा अवमान करणारी विचारधारा मतदानातून पराभूत करू, असे आवाहन शिवसेनाच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. तसेच भविष्यात महापुरुषांचा अवमान झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही अंधारे यांनी दिला. भगतसिंग कोश्यारी यांना आपण राज्यपाल असल्याचा विसर पडला असून ते…
View On WordPress
0 notes
Video
उध्दव ठाकरे यांचं भाषण सुरू असताना लोकं चक्क निघून चाललीत ... ढोंगी आणि बेगडी हिंदुत्वाला छत्रपती संभाजीनगरवासीयांनी नाकारलं
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 October 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरच्या दाव्याबाबत आपलं म्हणणं पुराव्यानिशी मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज दुपारपर्यंत मुदत
जून २०२३ पर्यंत दोन हजार इलेक्ट्रिक बसगाड्यांचा एसटीच्या ताफ्यात समावेश
सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण २०३० पर्यंत पूर्ण करून, येत्या ८ वर्षात कार्बन उत्सर्जन बंद करण्याचा रेल्वेचा प्रयत्न
मुंबई मराठी साहित्य संघाचा 'वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार' नांदेडचे दत्ता डांगे यांना जाहीर
औरंगाबाद पाणी पुरवठा योजनेचं काम २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
आणि
नाशिक इथं लक्झरी बसचा भीषण अपघात
****
धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरच्या दाव्याबाबत आपलं म्हणणं पुराव्यानिशी मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना, आज दुपारपर्यंत मुदत दिली आहे. मुंबईतल्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी १४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या निवडणुकीत 'धनुष्यबाण' हे चिन्ह वापरण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज शिवसेनेच्या शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यावर ठाकरे गटाने आज दुपारी २ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडावं, असं आयोगानं म्हटलं आहे.
****
दिशा सालियान अत्याचार आणि मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध असल्यामुळेच त्या प्रकरणाची चौकशी केली नाही, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राणे काल पत्रकार परिषदेत बोलत होते. दसरा मेळाव्यात शुभेच्छा देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी अशुभ भाषण केलं, ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी असून, शिवसेना उभी करण्यात उद्धव ठाकरेचं काहीही योगदान नाही, असंही राणे यांनी म्हटलं आहे. कोविड काळात इतर उद्योगधंदे ठप्प असताना, ठाकरे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपला काळा पैसा वैध करून घेतल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाचा ठाकरे यांनी भाषणात उल्लेख केल्याबद्दलही राणे यांनी ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.
****
मुख्यमंत्री शिंदे यांच्या नातवाबद्दल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिप्पणी बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ते काल अकोला इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. ही अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी असून, उद्धव ठाकरे यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
दरम्यान, राज्यातल्या प्रत्येक मतदार संघात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे. काल नागपूर इथं मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
जून २०२३ पर्यंत दोन हजार इलेक्ट्रिक बसगाड्यांचा राज्य परिवहन महामंडळ - एसटीच्या ताफ्यात समावेश होणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. एसटी महामंडळ आणि परिवहन आयुक्तालयाच्या आढावा बैठकी ते काल बोलत होते. सध्या ५०० नवीन डिझेल बसगाड्यांची खरेदी केली जाणार आहे. मात्र महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. एस.टी. महामंडळाच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा व्यावसायिक आणि निवासी वापराच्या दृष्टीनं विकसित करा, तसंच अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एसटीच्या संप काळात बडतर्फ केलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्रयांनी यावेळी दिले.
****
राज्यातल्या बारावीच्या १५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण तसंच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसोबत राज्यशासनाने नुकताच सामंजस्य करार केला. संस्थेच्या ‘स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन’ या विभागाद्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार, पदविका तसंच पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वावर कोणत्या��ी शाखेचा विद्यार्थी इयत्ता बारावीनंतर प्रवेश घेऊ शकेल. या संस्थेने अभ्यासक्रमसाठी तीन हजार ७५० उद्योगांसोबत करार केला असून, विद्यार्थ्यांना स्थानिकस्तरावर त्यांच्या आवडीनुसार विषय अथवा काम निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे.
****
सर्व रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण २०३० पर्यंत पूर्ण करून, येत्या आठ वर्षात कार्बन उत्सर्जन बंद करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. आगामी २०३० पर्यंत मिशन-मोडवर कार्बन उत्सर्जन प्रक्रिया नियंत्रित केली जाणार असून, जलसंधारण, वनीकरण, जल व्यवस्थापन आणि हरित प्रमाणपत्र यांसारख्या काही उल्लेखनीय उपक्रमांचा यासाठी अवलंब केला जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, खानापूर ते लातूर रोड या लोहमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. दक्षिण मध्य रेल्वेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती देण्यात आली. विद्युतीकरण योजनेतला हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे आता विकाराबाद ते परळी या २०४ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं असल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे.
****
देशात भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या सत्ताकाळात अर्थव्यवस्थेचा पाया कमकुवत झाला असल्याची टीका, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केली आहे. ते काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी राहुल गांधी किंवा गांधी परिवारातील कुणीही इच्छुक नाही, असं सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाची निवडणूक आपण लढवत असल्याचं खर्गे यांनी स्पष्ट केलं.
****
राज्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा महाविकास आघाडीच्या काळात देशात सर्वाधिक असल्याची टीका भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढल्याबद्दल चिंता व्यक्त करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना, हा आकडा आपल्या सत्ताकाळातलाच असल्याचा विसर पडला असल्याचं बागडे यांनी याबाबत जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३६६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २३ हजार ८१९ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५७४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ७३ हजार १५४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन हजार ३१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत परिपत्रक जारी केलं असून, ते राज्यशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
साता��ा जिल्ह्यात कास पठारावर आयोजित कास महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. कास पठारावर पर्यटनाला चालना मिळावी म्हणून पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं या महोत्सवाचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव उद्या ९ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे.
****
मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं देण्यात येणारा यावर्षीचा 'वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार' नांदेड इथल्या ईसाप प्रकाशन संस्थेचे संचालक आणि प्रकाशक दत्ता डांगे यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या या पुरस्काराचं स्वरूप आहे. २९ ऑक्टोबर रोजी मुंबई मराठी साहित्य संघाच्या वर्धापनदिन सोहळ्यात डांगे यांना हा पुरस्कार नामवंत शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
****
४२वं मराठवाडा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथं होणार असून, काल या संमेलनाच्या बोधचिन्हाचं आणि कार्यालयाचं उद्घाटन, प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्या हस्ते झालं. माजी आमदार शिवाजी चौथे यांची संस्था असलेल्या संत रामदास महाविद्यालयाला यंदा साहित्य संमेलनाचं यजमानपद मिळालं आहे.
****
औरंगा���ाद शहरासाठी सुरू असलेलं पाणी पुरवठा योजनेचं काम २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत बोलत होते. नवीन पाणी पुरवठा योजना, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, पथदिवे, आरोग्य, उद्यान विभाग, नगररचना या विभागांचा यावेळी आढावा घेण्यात आला. शहरातील गुंठेवारी नियमितीकरण झाल्याशिवाय नवीन बांधकाम परवानगी देऊ नये, तसंच शहरातली अनधिकृत बांधकामं थांबवण्याचे आदेशही भुमरे यांनी यावेळी दिले.
****
नाशिक इथं आज पहाटे चिंतामणी ट्रॅव्हलची लक्झरी बस आणि टँकर यांच्यात अपघात होऊन बसने पेट घेतला. शहरात औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर झालेल्या या अपघातात बस मधले काही प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रवाशांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बस मधून हलवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला.
****
गुजरातमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र २६ सुवर्ण, २५ रौप्य आणि ४७ कांस्य पदकांसह एकूण ९८ पदकं जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. ४१ सुवर्ण पदकांसह सैन्य दल पदक तालिकेत पहिल्या आणि २९ सुवर्ण पदकांसह हरियाणा दुसऱ्या स्थानी आहे.
काल या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मेधाली रेडकरनं डायव्हिंगमध्ये एक सुवर्णपदक, तर ऋतिका श्रीरामनं कांस्यपदक पटका��लं. एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात मेधालीनं लवचिकता आणि आकर्षक रचना यांचा सुरेख समन्वय दाखवत सुवर्णपदक जिंकलं. राष्ट्रीय स्तरावरचं तिचं हे पहिलंच सुवर्णपदक आहे.
ऋतिका श्रीरामनं पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तिनं याआधी या स्पर्धेत तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड, आणि हाय बोर्ड प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे.
महाराष्ट्राच्या खो-खो संघानं पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात सुवर्णपदकांची कमाई केली.
****
बांग्लादेशात सुरू असलेल्या आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल पाकिस्ताननं भारताचा १३ धावांनी पराभव केला. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत, वीस षटकात सहा बाद करत १३७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला भारतीय संघ १९ षटकं चार चेंडूत १२४ धावांवर सर्वबाद झाला. या स्पर्धेत तीन सामने जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या तर पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
****
नांदेड इथले बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणी उत्तरप्रदेशातल्या एका शार्प शूटरला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. दिव्यांशू असं या आरोपीचं नाव आहे. बियाणी यांची पाच एप्रिल २०२२ रोजी राहत्या घरासमोर दोन शार्प शूटरनी गोळ्या झाडून हत्या केली होती, दिव्यांशू हा त्या दोघांपैकी एक असून, घटनेच्या वेळी वाहनही तोच चालवत होता, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी १३ जणांना या पूर्वीच अटक केली आहे.
****
औरंगाबाद इथं एका ड्रग्स विक्रेत्याला अंमलीपदार्थ विरोधी पथकाने अटक केली. युनूस खान असं या आरोपीचं नाव आहे. शहरातल्या एका हॉटेलमध्ये ड्रग्स पार्टी सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून नशेखोरांची चौकशी केली, त्यानंतर ही कारवाई केली. आरोपीकडून ९५ हजार रुपयांचे अंमलीपदार्थही जप्त करण्यात आले आहेत.
****
नाशिक इथल्या एका इडली व्यावसायिकाकडून मुंबई पोलिसांनी तब्बल पाच लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका यात्रोत्सवात गर्दीचा फायदा घेत या बनावट नोटा चलनात आणण्याचा या व्यावसायिकाचा प्रयत्न होता.
****
महसूल विभागाने नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी सूचना, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वाळू उपसा, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण रोखण्याबरोबरच भाडेपट्ट्यावरील जमिनीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्याकडे जास्त लक्ष द्यावं, असंही केंद्रेकर यांनी यावेळी सांगितलं.
****
बीड इथं महारा��्ट्र स्टार्ट अप सप्ताहांतर्गत १४ आणि १५ तारखेला घेण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यासंदर्भात काल जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आढावा बैठक घेतली. स्थानिक नवउद्योजकांना नोंदणीसाठी प्रोत्साहन द्यावं, मेळाव्यासाठी जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त नवउद्योजकांनी नोंदणी करावी, यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शर्मा यांनी यावेळी दिले.
****
लातूर शहरात काल थर्माकोलच्या थाळ्या वापरल्यामुळे एका नागरिकाला प्लॅस्टिक आणि थर्माकोल बंदी अधिनियमानुसार पाच हजार रुपयांचा तात्काळ दंड ठोठावण्यात आला. लातूर महानगरपालिकेतर्फे शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. त्यानुसार सह आयुक्त रामदास कोकरे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांनी कचरा संकलनाची पाहणी केली. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली. सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियानला सहकार्य करावं असं आवाहन लातूर शहर महानगपालिकेनं केलं आहे.
****
लातूर शहरात शासनातर्फे १० तारखेला राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबवण्यात येणार आहे. १ ते १९ वर्ष वयोगटातल्या सर्व मुला-मुलींना शाळा, महाविद्यालयांमधून जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. उर्वरीत मुला मुलींना १७ तारखेला जंतनाशक गोळया देण्यासाठी मॉपअप दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शाळा बाहय विद्यार्थ्यांना आशा कार्यकर्त्यांमार्फत घरोघरी जाऊन गोळया खाऊ घालण्यात येणार असून त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. या मोहिमेत शहरातल्या १ लाख चार हजार ८८७ मुला-मुलींना गोळया खाऊ घालण्याचं उद्दीष्ट आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही भागात काल सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पैठण तालुक्यातल्या पाचोड, टाकळी अंबड इथं ढगफुटी सदृश पाऊस पडला. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला तर शेतात पिकांचं पाणी साचल्यानं शेतमालाचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, पैठण इथल्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, धरणाचे सहा दरवाजे दीड फूट उंचीवर स्थिर करुन २३ हजार ५६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
0 notes
Text
दिपकभाईना झालय तरी काय ?
दिपकभाईना झालय तरी काय ?
शरद पवारांवरचे बेछूट आरोप थाबवा, नाहीतर…. अर्चना घारे परब यांची केसरकर याच्यावर टीका रामचंद्र कुडाळकर । सावंतवाडी : मी शाळेत असल्यापासून दीपकभाई यांचे राजकारण पाहते आहे. शांत, संयमी, सहनशील आणि सुसंस्कृत अशी त्यांनी स्वतःची ओळख पद्धतशीरपणे तयार केली. आणि म्हणुनच ते तीन वेळा लोकांच्या भावनांशी खेळून सावंतवाडी विधानसभा मतदार संघात निवडून देखील आले. परंतु त्यांची बेगडी सहनशीलता संपली आणि उसना संयम…
View On WordPress
0 notes
Text
loksatta editorial over salman khurshid book controversy hinduism zws 70
loksatta editorial over salman khurshid book controversy hinduism zws 70
दुर्दैवाने राजीव गांधी यांच्याच बेसावध अयोध्या कृतीने धर्म हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. काँग्रेस राजकीयदृष्टय़ा जेव्हा अजेय होती तेव्हा ज्याप्रमाणे बेगडी सेक्युलरांचे पेव फुटले होते त्याप्रमाणे भाजपच्या विद्यमान यशामुळे नवहिंदूंची लाट आली आहे. सलमान खुर्शीद उच्चविद्याविभूषित आहेत. काँग्रेसच्या काही नेमस्त नेत्यांत त्यांची गणना होते. आक्रस्ताळी भाषा वा नेतृत्व यासाठी ते ओळखले जातात असेही…
View On WordPress
0 notes
Text
कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या पोस्टरला फासले काळे , भीम ब्रिगेडच्यावतीने शासनाविरूद्ध जोरदार नारेबाजी
कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या पोस्टरला फासले काळे , भीम ब्रिगेडच्यावतीने शासनाविरूद्ध जोरदार नारेबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुकुंज (मोझरी) येथून गुरूवारी महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली. महाजनादेश यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी लावण्यात आलेल्या होर्डिंग्ज, पोस्टरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा वगळून अन्य महामानवांची प्रतिमा अंकित आहे. त्या��ुळे भाजपची डॉ. बाबासाहेबांप्रती असलेली आस्था ही बेगडी असल्याचा आरोप राजेश वानखडे यांनी केला.
महाजनादेश यात्रे निमित्ताने जिल्हाभरात पोस्टर,…
View On WordPress
0 notes
Photo
@raja_shivaji_maharaj_ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ छायाचित्रकार - शिवप्रेमी ओंकार गुजर (@mr_lucky____) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ महाराजांची मुद्रा आणि काही मार्गदर्शक तत्वे! हल्ली अनेक ठिकाणी महाराजांची मुद्रा दिसते. कुणाच्या गाडीवर, नंबर प्लेटवर, शर्टवर, अंगठीवर! सर्रास या राजमुद्रेचा वापर होत असलेला दिसून येतो. काही हे अर्थातच महाराजांप्रती असलेल्या प्रेम, श्रध्देपोटी करतात पण काहीसाठी ही 'स्टाइल' असते! (आपण कशात आहोत, हे ज्याचे त्याने ठरवावे) पण काहीही असले तरी अशी मुद्रा वापरणे हा एकप्रकारचा 'स्वराज्यद्रोह' आहे. खुद्द राजश्री महाराज शिवछत्रपती सोडून ही मुद्रा कुणालाही वापरण्याचा अधिकार नाही! अगदी महाराजांचे चिटणीस, पेशवे हे सुध्दा महाराजांची मुद्रा वापरत नव्हते. महाराजांचे पहिले पेशवे शामराजपंत यांपासून शेवटचे पेशवे दूसरे बाजीराव यांच्या स्वतःच्या मुद्रा होत��या! इतकच नव्हे तर महाराजांचे चिरंजीव संभाजी महाराज छत्रपती यांची सुध्दा मुद्रा स्वतंत्र होती! चिटणीस महाराजांची पत्रे लिहीत मात्र जेव्हा 'शिक्कामोर्तब' करायची वेळ येई, तेव्हा महाराज स्वतः मुद्रा शिक्काकरीत असत! महाराजांच्या अनुपस्थितीत पेशव्यांच्या मुद्रा शिक्कामोर्तब होत असत! पण महाराजांची मुद्रा दुसऱ्याकडून वापरली जात नसे! मग आपण असे कोण लागून गेलो आहोत की सर्रास आपण या मुद्रेचा वापर करत आहोत?? 'मुद्रा चिकटवली की आपण शिवप्रेमी' असाच आपला समज आहे का?? शिवप्रेमी आपण सगळेच आहोत पण आंधळे शिवप्रेम हे बेगडी असते. 'राजमुद्रा' ही सध्या शासकीय पुरस्कार किंवा राजघराण्याने (सातारा भोसले गादी) दिलेला सन्मान म्हणून वापरता येते! इतर 'स्टाईल'साठी वापरली जाणारी राजमुद्रा हा 'स्वराज्यद्रोह'च आहे, जो यापुढे आपल्याकडून होणार नाही याची काळजी ज्यानेत्याने शिवछत्रपतींच्या प्रती असणाऱ्या आपापल्या भक्तीनुसार घ्यायची आहे! बहुत काय लिहणे! मर्यादेयं विराजते! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at शिवाजी पार्क)
#mountain#like#raja_shivaji_maharaj_#insta_maharashtra#maharashtra#chatrapati_shivaji_maharaj_#mr_lucky____#shivajimaharaj#follow#incredibleindia#sahyadri#instagram#maharashtra_desha#juee512
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०७ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरच्या दाव्याबाबत आपलं म्हणणं पुराव्यानिशी मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्या दुपारपर्यंत मुदत.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सहकार्यातून राज्यातल्या बारावीच्या १५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण तसंच रोजगाराच्या नवीन संधी.
सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण २०३० पर्यंत पूर्ण करून, येत्या ८ वर्षात कार्बन उत्सर्जन बंद करण्याचा रेल्वेचा प्रयत्न.
आणि
औरंगाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसाची सलग दुसऱ्या दिवशी हजेरी; जायकवाडी धरणातून पुन्हा विसर्ग सुरू.
****
धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरच्या दाव्याबाबत आपलं म्हणणं पुराव्यानिशी मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्यापर्यंत मुदत दिली आहे. मुंबईतल्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी १४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या निवडणुकीत ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह वापरण्याची परवानगी द्यावी असा अर्ज शिवसेनेच्या शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यावर ठाकरे गटाने उद्या दुपारी २ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडावं, असं आयोगानं म्हटलं आहे.
****
दिशा सालियान अत्याचार आणि मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध असल्यामुळेच त्या प्रकरणाची चौकशी केली नाही, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राणे आज पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले –
तुम्ही मुख्यमंत्री असतांना झाला दिशा सालीयानचा खून. दिशा सालीयनवर अत्याचार करुन खून करुन टाकण्यात आलं तिला. का नाही तिथल्या आरोपीला अटक झाली? त्यात प्रमुख कोण होते? कोण मंत्री होता? का वाचवलं त्यानं? लोकं चर्चा करतात आदित्य ठाकरे त्या केस मध्ये आहे. त्या अत्याचारामध्ये आहे. आतापर्यंत नाव घेत नाही पण चर्चा सर्वत्र चालू आहे की आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहे. आणि म्हणून केस लपवालपवी आणि वाझेनं सगळ मॅनेज केलंय.
शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात शुभेच्छा देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी अशुभ भाषण केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या नातवाचा ठाकरे यांनी भाषणात उल्लेख केला, याबद्दलही राणे यांनी कडाडून टीका केली. ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी असून, शिवसेना उभी करण्यात उद्धव ठाकरेचं काहीही योगदान नाही, असंही राणे यांनी म्हटलं आहे. कोविड काळात इतर उद्योगधंदे ठप्प असताना, ठाकरे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपला काळा पैसा वैध करून घेतल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाबद्दल उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टिप्पणी बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ते आज अकोला इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. ही अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी असून, उध्दव ठाकरे यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
****
मुंबई इथं वन्यजीव सप्ताह निमित्त वन विभागातर्फे त्रिमूर्ती प्रांगणात वन्य जीवांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. या प्रदर्शनात वन्य जीवांची छायाचित्रं आणि प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. ‘जंगलातील छोटे शिलेदार वाघांइतकेच महत्वाचे’ या संकल्पनेवर आधारीत या प्रदर्शनात छोटे पशू-पक्षी, सरपटणारे वन्यजीव, निसर्गाची विविध रुपं उलगडून दाखवणारी छायाचित्रं तसेच सांबर, चितळ, भेकर, साळींदर अशा वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींसोबतच ताडोबा अभयारण्यातल्या वाघाची कायमस्वरुपी प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
****
राज्यातल्या बारावीच्या १५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण तसंच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस – टाटा सामाजिक विज्ञान संस्था सोबत राज्य शासनाने नुकताच सामंजस्य करार केला आहे. संस्थेच्या ‘स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन’ या विभागाद्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार पदविका तसंच पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वावर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी इयत्ता बारावीनंतर प्रवेश घेऊ शकेल. या संस्थेने अभ्यासक्रमसाठी ३ हजार ७५० उद्योगांसोबत करार केला असून, विद्यार्थ्यांना स्थानिकस्तरावर त्यांच्या आवडीनुसार विषय अथवा काम निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षानंतर डिप्लोमा कोर्स, दुसऱ्या वर्षानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स तर तिसऱ्या वर्षानंतर बॅचलर इन व्होकेशनल एज्युकेशन हे प्रमाणपत्र मिळेल.
****
सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण २०३० पर्यंत पूर्ण करून, येत्या ८ वर्षात कार्बन उत्सर्जन बंद करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. रेल्वे मंडळाने हरित पर्यावरणासाठी आता एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारला असून, अक्षय ऊर्जेचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. आगामी २०३० पर्यंत मिशन-मोडवर कार्बन उत्सर्जन प्रक्रिया नियंत्रित केली जाणार असून, डिझेलमध्ये पाच टक्के जैवइंधनाचा वापर केला जाईल. जलसंधारण, वनीकरण, जल व्यवस्थापन आणि हरित प्रमाणपत्र यांसारख्या काही उल्लेखनीय उपक्रमांचा यासाठी अवलंब केला जाणार असल्याचं, याबाबतच्या चृत्तात म्हटलं आहे.
****
सातारा जिल्ह्यात कास पठारावर आयोजित कास महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. इथल्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव ९ तारखेपर्यंत सुरू राहणार असून यात कास परिसरातील गावांची तसंच जैव आणि वन्यप्राणी विविधतेची माहिती देण्यात येणार आहे.
****
हिंदू - मुस्लिम एकतेचं प्रतिक असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद इथल्या हजरत ख्वाजा मुन्तजबद्दीन जर जरी बक्ष यांच्या ऊर्सला आज सर्वधर्मीय भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मंगळवारपासून या ऊर्सला सुरुवात झाली असून प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात पोलिस बंदेाबस्त आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. उद्या ईद-ए-मिलादुन्नबीला इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा पोशाख आणि केस दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही भागात आज सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पैठण तालुक्यातील पाचोड, टाकळी अंबड इथं ढगफुटी सदृश पाऊस पडला. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला तर शेतात पिकांचं पाणी साचल्यानं शेतमालाचं नुकसान झालं आहे. वाळूज, सोयगाव, खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातील नागद इथंही जोरदार पाऊस पडला. दरम्यान, पैठण इथल्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून धरणाचे सहा द्वार अध्याफुटावरुन एक फुट उंचीवर स्थिर करुन बारा हजार ५७६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
नाशिक इथल्या एका इडली व्यावसायिकाकडून मुंबई पोलिसांनी तब्बल पाच लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका यात्रोत्सवात गर्दीचा फायदा घेत या बनावट नोटा चलनात आणण्याचा या व्यावसायिकाचा प्रयत्न होता. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. मलायारसन मदस��य असं या आरोपीचं नाव असून, तो तमिळनाडू इथला रहिवासी आहे.
****
शासनाचा एक प्रमुख घटक म्हणून आपली जबाबदारी ओळखून महसूल विभागाने नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महसूल विभागाच्या कामकाजात ‘ई’ फेरफार, ई-पीक पाहणी, सातबारा, शासकीय जमिनीचे अभिलेखे आणि नोंदीमध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देशही केंद्रेकर यांनी यावेळी विभागाला दिले. वाळू उपसा, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण रोखण्याबरोबरच भाडेपट्ट्यावरील जमिनीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्याकडे जास्त लक्ष द्यावं, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
****
जिल्ह्यांतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर स्थलांतर थांबेल, असं मत बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताहांतर्गत १४ आणि १५ तारखेला घेण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते आज बोलत होते.
****
0 notes
Text
रडगाणे बंद करा, आणि पेट्रोलवरील जिझिया रद्द करा!
रडगाणे बंद करा, आणि पेट्रोलवरील जिझिया रद्द करा!
आमदार नितेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका कणकवली : बाबरी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची पळपुटी आणि बेगडी भूमिका उघड झाल्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी पक्षाची लाज आणखी चव्हाट्यावर न आणता राज्यासमोरील प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे आणि पेट्रोल डिझेलवरील राज्याचा अबकारी कर कमी करून नागरिकांना दिलासा कधी देणार ते सांगावे, असे आव्हान भाजपचे आमदार…
View On WordPress
0 notes
Text
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाजूच्या गटारावर स्थलांतरित होताना कानडे कुठे होते
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाजूच्या गटारावर स्थलांतरित होताना कानडे कुठे होते
संतोष कानडेनी शिवजयंतीची जागा आणि मंडप डोळे उघडुन दिवसा पहावी कणकवली : शिवसेनेच्या परंपरेनुसार तिथीप्रमाणे शिवजयंती दरवर्षी शिवसेना शाखेच्या वतीने उत्साहात व जल्लोषात जाहीरप्रमाणे करण्यात येते. यावर्षीही शिवजयंती शाखेच्या समोर ट्राफिकला अडथळा होऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला फुटपाथच्या बाजूला आकर्षक मंडप घालुन करण्यात आली .परंतु शिवरायांवर बेगडी प्रेम असलेल्या संतोष कानडे यांनी शिवजयंती गटारावर…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
· कृषी क्षेत्रात सुधारणांमुळे शेतकऱ्यांसमोर अधिक चांगले पर्याय उपलब्ध- पंतप्रधानांचं प्रतिपादन.
· ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वर्ग.
· रेल्वे गाड्यांमधून पालेभाज्या तसंच फळ वाहतुकीला सरसकट पन्नास टक्के सवलत.
· आत्मनिर्भर भारताचं धेय साकारण्यासाठी टिळकांच्या कर्मयोगाची आवश्यक��ा – राज्यपाल.
· भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस ‘सुशासन दिन’ विविध कार्यक्रमांनी साजरा.
· राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९४ टक्क्यांवर; मराठवाड्यात नव्या २३१ रुग्णांची नोंद.
· उस्मानाबाद इथल्या लोकसेवा समितीचे मराठवाडा विभागीय लोकसेवा पुरस्कार प्रदान.
आणि
· भारत - ऑस्ट्रेलियादरम्यान दुसऱ्या क्र��केट कसोटीला मेलबर्न इथं सुरुवात.
****
कृषी क्षेत्रात सुधारणा केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अधिक चांगले पर्याय उपलब्ध झाल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल सुशासन दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत आहे, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करत केंद्र सरकारनं शेतमालाला किमान हमीभावापेक्षा दीडपट भाव मिळवून दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या सुमारे एक हजार बाजार समित्या ऑनलाईन पद्धतीनं जोडल्या गेल्या असून, दहा हजारापेक्षा अधिक शेतकरी उत्पादक गट स्थापन करणं आणि आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी काम सुरू असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये या प्रमाणे १८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वर्ग करण्यात आला.
पंतप्रधानांनी यावेळी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधून केंद्र सरकारच्या योजनांपासून झालेल्या लाभाबाबत त्यांचे अनुभव जाणून घेतले. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातले शेतकरी गणेश भोसले यांनीही पंतप्रधानांशी संवाद साधत, प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या माध्यमातून ५४ हजार रुपये मिळाल्याचं सांगितलं. आपल्या या अनुभवाबद्दल भोसले यांनी या शब्दांत भावना व्यक्त केल्या –
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत इन्शुरन्स कंपनीकडून ५४३१५ रूपये माझ्या खात्यामधे जमा झाले. आणि मला असं बोलायचं होतं की आपण शासनाच्या स्कीममधे जर शेतकऱ्यांनी राहिलं तर आपला निश्चित फायदा होणार आहे. कारण सगळ्याच स्कीम शेतकऱ्यांसाठीच काढलेल्या आहेत. माझ्यासाठी खूप मोठा दिवस होता की १० मिनिट आपल्या पंतप्रधांसोबत मला चर्चा करण्याची संधी मिळाली. आणि मी महाराष्ट्रातून एकमेव शेतकरी होतो की मला हा चान्स मिळाला. माझ्यापेक्षा जास्त आनंद गावातील लोकांनाचा आणि इतरांना झाला.
****
केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करणारे असून, राजकीय स्वार्थासाठी या कायद्याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरो��, माजी मुख्यमंत्री तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काल पुण्यात मांजरी इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कंत्राटी शेतीबाबतचा कायदा २००६ पासून महाराष्ट्रात लागू आहे. त्यावेळी हा कायदा करणारे आज मात्र त्याच कायद्यांना विरोध करत आहेत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं.
****
किसान रेल्वेसह देशभरात वाहतुकीसाठी धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये पालेभाज्या तसंच फळांना सरसकट पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला, द्राक्ष, ॲपल बोरसह सर्वच प्रकारच्या फळांच्या उत्पादकांना लाभ होणार आहे. या निर्णयाचा फायदा नाशिक जिल्ह्यातील दहा हजार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होईल असा प्राथमिक अंदाज आहे. द्राक्ष, बोर तसंच काही भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर पन्नास टक्के सबसिडी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. सर्वच प्रकारची फळं आणि भाजीपाला वाहतुकीवर पन्नास टक्के अनुदान मिळावं यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.
****
नागपूर इथल्या विधान भवनातलं विधानमंडळ सचिवालय आता वर्षभर सुरू राहणार आहे. पूर्वी हे सचिवालय फक्त नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळातच सुरू राहत असे. वर्षभर सुरू राहणाऱ्या या कक्षाचं येत्या ४ जानेवारीला उद्धाटन होणार आहे.
****
आत्मनिर्भर भारताचं धेय साकारण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या कर्मयोगाची आवश्यकता असल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत लोकमान्यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त ‘राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासा’च्या वतीनं गीता जयंती कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
गीता हा जगाकडे तसंच जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत दृष्टी देणारा ग्रंथ असल्याचं राज्यपाल म्हणाले. दिनकर स्मृती न्यास संस्थेचं कार्य निरंतरपणे चालू राहावं, अशा शुभेच्छा देत राज्यपाल कोश्यारी यांनी संस्थेला पाच लाख रुपये देणगी जाहीर केली.
राज्यपालांनी काल बोरीवली इथं अटल ��्मृती उद्यानात वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. अटल स्मृती उद्यान परिसरालाही राज्यपालांनी भेट दिली.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी केलं आहे.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त काल सुशासन दिनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रम राबवण्यात आले. पुण्यात भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मोफत जन धन खाते उघडण्याचा उपक्रम राबवण्यात आला. नूतन मराठी वि��्यालयाच्या मैदानावर रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यात सुमारे ५५० दात्यांनी रक्तदान केलं.
****
शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कृषी कायद्यांसह अनेक चांगल्या योजना सुरू केल्या असल्याचं, भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काल रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातल्या पोयनाड इथं शेतकरी संवाद अभियानात त्या बोलत होत्या. काँग्रेसची सत्ता असताना शेतीसंदर्भात कायदे झाले. काही लोकांनी असे कायदे करण्याच्या लेखी सूचना केल्या, आता मात्र नवीन कायद्यांना विरोध होत असल्याची टीका मुंडे यांनी केली.
****
लातूर जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांतून वाजपेयींना अभिवादन करण्यात आलं. खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी मार्केट यार्ड परिसरात अटलजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. यानिमित्तानं झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना श्रृंगारे यांनी, काँग्रेसचं शेतकरी प्रेम बेगडी असल्याची टीका केली. नवीन कृषी कायदे हे शेती आणि शेतकऱ्यांसाठी भविष्यात लाभदायी ठरणार असल्याचं श्रृंगारे म्हणाले.
भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनीही, अटलजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी, औसा शहरात स्वच्छता मोहीम राबवून अटलजींना आदरांजली वाहिली. वाजपेयी यांच्या प्रतिमेचं पूजन करून या स्वच्छता मोहिमेची सांगता करण्यात आली.
औरंगाबाद इथं भाजप कार्यालयात शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या हस्ते, वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
****
परभणी शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. परभणी इथं मराठवाडा हायस्कूलमध्ये अभिवादन सभा घेण्यात आली.
****
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात “माहितीचा अधिकार अधिनियम आणि सेवा हमी कायदा” या विषयावर काल सुशासन दिनानिमित्त ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. उच्च शिक्षण विभागाचे लेखाधिकारी निळकंठ पांचगे, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाचे उपअभियंता भीमराव हाटकर यांनी या वेबिनारमध्ये मार्गदर्शन केलं
****
राज्यात काल तीन हजार ४३१ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख तेरा हजार ३८२ झाली आहे. काल ७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४९ हजार १२९ झाली असून, मृत्यू दर दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. काल एक हजार ४२७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख सहा हजार २९८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ४ दशांश टक्के इतका झाला आहे. ��ध्या राज्यात ५६ हजार ८२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २३१ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात तीन, नांदेड जिल्ह्यात दोन तर जालना जिल्ह्यात एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ८९ नवे रुग्ण आढळले, यामध्ये इंग्लंडहून आलेल्या एका महिलेचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात ३३, जालना ३१, बीड आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी २८, उस्मानाबाद ११, परभणी नऊ, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले दोन नवीन रुग्ण आढळले.
****
लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या धनेगाव इथले रहिवासी स्वातंत्र्य सैनिक व्यंकोबा पिराजी बिरादार यांचं काल निधन झालं, ते १०४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
नाताळ तसंच सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दररोज चार हजार अतिरिक्त दर्शन पास जारी केले जाणार आहेत. तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही माहिती दिली. पूर्वी दररोज सकाळी पाच ते दुपारी चार या वेळेत आठ हजार दर्शन पास देण्याची सोय केली होती, कालपासून दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत आणखी चार हजार दर्शन पास दिले जात आहेत. तुळजापूर मंदिर समितीच्या, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्री तुळजाभवानी डॉट ओआरजी, या संकेतस्थळावरून दर्शन पास उपलब्ध करून दिले जात आहेत.
****
उस्मानाबाद इथल्या लोकसेवा समितीच्यावतीने सातत्यपूर्ण समाजसेवा करणाऱ्या सेवाव्रतींना मराठवाडा विभागीय लोकसेवा पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
१०८ या शासकीय रुग्णवाहिकेतून जीवाची पर्वा न करता निर्धारानं संयमपूर्व, सातत्यपूर्ण मानवसेवा करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील वाहनचालक श्री निवृत्ती सौदागर साठे, उस्मानाबाद नगर पालिकेत लिपिकाची नोकरी करत असतानाही केवळ कर्तव्य भावनेने, अंत्यसंस्काराचे कार्य करून मानवता आणि कर्तव्यनिष्ठता पार पाडणारे श्री विलास सावळाराम गोरे आणि औरंगाबाद महानगरात सातत्यपूर्ण समाजसेवा करणाऱ्या मालती मनोहर करंदीकर यांना ‘लोकसेवा’ हे पुरस्कार नगराध्यक्ष श्री मकरंद राजे निंबाळकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. श्रीमती करंदीकर यांनी पुरस्काराची पूर्ण रक्कम रा.स्व.संघ विद्याभारतीचे पश्चिम क्षेत्रमंत्री श्री शेषाद्री डांगे यांच्याकडे सुपूर्द केली.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.
****
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल शहरात सुरु असलेल्या वि��िध रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून, कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना केल्या. रस्त्यांच्या बाजूचे पदपथ व्यवस्थित करणे, वाहनतळांची व्यवस्था करणे, रिक्षा चालकांना रिक्षा उभे करण्यासाठी जागा नेमणे, रस्त्यातील दुभाजकांचे सौंदर्यीकरण करणे, तसंच झाडांना आवश्यक कुंपण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देश दिले.
****
लातूर शहरातल्या विविध विकास प्रकल्पांची काल पालकमंत्री अमित देशमुख यांनी पाहणी केली. महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते. विकास कामांमध्ये आवश्यक सुधारणांबाबत देशमुख यांनी सूचना केल्या.
****
राज्यमंत्री संजय बनस���डे यांनी काल जहिराबाद - औराद शहाजनी -लातूर या रस्त्याच्या कामाची अचानक पाहणी केली. यावेळी संबंधितांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार काम करण्याच्या सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी दिल्या.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूर इथले प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ विठ्ठल लहाने यांनी केलं आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासू्न मेलबर्न इथं सुरु झाला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या तीन बाद ६५ धावा झाल्या होत्या. जसप्रित बुमराहनं एक तर रविचंद्रन अश्विननं दोन गडी बाद केले. चार सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलिया मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 March 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १४ मार्च २०२० सकाळी ७.१० मि. **** मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- अर्थमंत्री अजित पवार यांची ग्वाही राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९; संसर्गजन्य प्रतिबंधक कायदा लागू; अनेक आयोजनं रद्द राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या सात जागांवरून आठ उमेदवारांचे अर्ज दाखल आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ **** मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते काल विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. सरकार सर्वांसाठी काम करत असताना, मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप निराधार असल्याचं पवार म्हणाले. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातून जाणाऱ्या मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गातली वित्तीय जोखीम कमी करण्यात आपलं सरकार यशस्वी झाल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी प्राथमिक टप्प्यात दोनशे कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे, निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर आवश्यकतेनुसार निधी पुरवला जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. औरंगाबाद कर्करोग रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणाची सुविधी दिली जाईल, तसंच तिथे जागा वाढवून दिल्या जाणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. सिल्लोड इथल्या सिद्धेश्वर मंदिरासाठी दोन कोटी रुपये तरतूद तसंच पैठण इथल्या नाथसागरानजिकच्या ज्ञानेश्वर उद्यानाचा, शेगावच्या आनंदसागर उद्यानाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र, अर्थमंत्र्यांच्या उत्तरातल्या अनेक मुद्यांवर आक्षेप घेत, हे उत्तर असमाधानकारक असल्याचं सांगत सर्व विरोधी सदस्यांसह सभात्याग केला. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. **** औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं ना��ांतर करण्याचा ठराव विधानसभेनं काल एकमतानं मंजूर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा ठराव मांडला. विधान परिषदेच्या मंजुरीनंतर हा ठराव केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव न आणल्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका बेगडी असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी यावेळी केला. **** राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९ वर पोचली आहे. मध्यरात्रीपासून राज्यात संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी, त्यांच्यातली लक्षणं सौम्य आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं सर्व पातळ्यांवर उपाययोजना सुरु केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. **** कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. त्या म्हणाल्या. कोरोना व्हायरस हा काही वेगळा आजार नाही आहे, तेव्हा जिल्ह्याच्या शासकिय रूग्णालयामध्ये जाल तेव्हा तुमची ट्रायव्हल हिस्ट्री सांगणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या बाधीत क्षेत्र आहे तेथून आले असेल तरच आपल्या कडे शासकीय रूग्णालयातून टेस्टींगसाठी पाठवले जाईल. एक कॉमन सूचना सर्वं नागरीकांना असा आहे की, रिपेटेडली आपले हात स्वच्छ धूणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, फळ-भाजी खातांना ते स्वच्छ धुवून त्याचे सेवन करणे. प्रशासन तत्परतेने काम करत आहे. आणि सर्व लोकांनी कोरोनासाठी घाबरण्याची काही गरज नाही. गर्दीच्या ठिकाणी टाळावे हे आव्हान माझे सर्वांना राहिल. **** औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनीही कोरोना विषाणूबाबत जनतेनं अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता आणि उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. **** परभणीचे जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांनी परदेश प्रवासाहून आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला देण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्यातल्या सर्व यात्रा, महोत्सव तसंच धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. **** नांदेड जिल्हा आणि शहरात सॅनेटायझर आणि मास्कची साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी अन्न औषध प्रशासनाला दिले आहेत. **** लातूर इथं विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत काल एकाच कुटूंबातल्या सात संशयितसंना तपासणीसाठी आणलं होतं. प्राथमिक चाचणीत यापैकी कुणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं दिसून आलं आहे, या सर्वांचे नमुने प���ण्याच्या राष्ट्रीय विषाणू परीक्षण संस्थेत पाठवण्यात आले आहेत. **** जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल संशयिताला कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पुण्याच्या विषाणू परीक्षण प्रयोग शाळेकडून या रुग्णाच्या तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली. या रुग्णावर सध्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबाद इथल्या संशयिताचा अहव��लही नकारात्मक आला आहे. **** अहमदनगर इथं कोरोनाचा ��क रूग्ण आढळला आहे, दुबईहून आलेल्या चार संशयितांपैकी एकाचा तपासणी अहवाल सकारात्मक आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. या रुग्णावर सध्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. **** कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च ते १४ जून या कालावधीतलं प्रस्तावित शंभरावं अखिल भारतीय नाट्यसंमेलन तसंच नांदेड जिल्ह्यातलं देगलूरचं २८ आणि २९ मार्चला होणारं ४१वं मराठवाडा साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे. नांदेड इथं उद्या होणारा प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं उद्यापासूनचा नियोजित हजरत सिद्धीकीशाह पहेलवान बाबा यांचा ऊर्सही स्थगित करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातला उमरीचा यात्रा महोत्सव तसंच बंजारा समाजाचं तीर्थस्थळ असलेल्या पोहरादेवीची रामनवमीची यात्राही रद्द करण्यात आली आहे. इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तर भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान लखनऊ आणि कोलकाता इथं होणारे दोन एकदिवसीय क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान केंद्र सरकारनं कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चेहऱ्यावर बांधायचे मास्क तसंच सॅनिटायझरचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे. मास्क तसंच सॅनिटायझरचा काळाबाजार रोखण्यासाठी तसंच या दोन्ही वस्तू बाजारात उपलब्ध असाव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या सात जागांवरून आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काल भारतीय जनता पक्षाकडून औरंगाबादचे माजी महापौर डॉ भागवत कराड, काँग्रेसचे नेते राजीव सातव, शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्री फौजिया खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केले आहेत. या आठ जणांपैकी भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे चार, अशा सात जणांची बिनविरोध निवड निश्चित आहे. येत्या अठरा तारखेला याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आठव्या उमेदवाराचा अर्ज अ���ूर्ण असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विलास आठवले यांनी दिली. त्यामुळे छाननीत हा अर्ज अवैध ठरण्याची शक्यता आहे. या उमेदवाराचं नाव सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. **** केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्त्याचे हे वाढीव दर १ जानेवारीपासून लागू होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येस बँकेच्या पुनर्गठनाला केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली. **** इतर मागास प्रवर्ग - ओबीसीची जनगणना करावी, तसंच ओबीसी कल्याणासाठी अर्थसंकल्पीय निधीची तरतूद वाढवावी, अशी मागणी बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी केली आहे. त्या काल लोकसभेत सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरच्या चर्चेत बोलत होत्या. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी यावेळी बोलताना, अनुसूचित जाती जमातीच्या उत्थानासाठी निधीची तरतूद करण्याबरोबरच सामजिक मानसिकता बदलणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. **** औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘नॅक’ मूल्यांकनाच्या नावाखाली झालेल्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या उपसचिवांच्या अध्यक्षेतेखाली चौकशी समिती नेमण्यात येईल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. ‘नॅक’ मूल्यांकनाच्या नावाखाली विद्यापीठानं कोट्यावधी रूपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केला, त्यावर सामंत उत्तर देत होते. ही समिती ३० दिवसात आपला अहवाल सादर करणार असून, या दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सामंत यांनी दिला. **** रंगपंचमीचा सण काल अनेक भागात साजरा झाला. लातूर इथं या निमितानं फुलांच्या पाकळ्या उधळून पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यात आली. लातूर वृक्ष संघटनेच्या सदस्यांसोबत जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्यासह अनेकजण यात सहभागी झाले. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 March 2020 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १३ मार्च २०२० दुपारी १.०० वा. **** मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. सरकार सर्वांसाठी काम करत असताना, मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप निराधार असल्याचं पवार म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागावर अन्याय होऊ देणार नसल्याचं सांगतानाच, एसटी महामंडळासाठी नवीन सोळाशे बस खरेदी, सौर कृषी पंप योजना, नवीन रुग्णवाहिका खरेदी, नवीन ७५ डायलिसीस केंद्र, ग्रामीण तसंच नागरी सडक योजना, आदी योजना संपूर्ण राज्यभरात राबवल्या जाणार असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गातली वित्तीय जोखीम कमी करण्यात आपलं सरकार यशस्वी झाल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी प्राथमिक टप्प्यात दोनशे कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे, निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर आवश्यकतेनुसार निधी पुरवला जाईल, असं आश्वासन देतानाच, मराठवाड्यात गोदावरीनदीवर नाथसागरपासून बाभळीपर्यंतचे बंधारे काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात बांधले गेलेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. औरंगाबाद कर्करोग रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणाची सुविधी दिली जाईल, तसंच तिथे जागा वाढवून दिल्या जाणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. सिल्लोड इथल्या सिद्धेश्वर मंदिरासाठी दोन कोटी रुपये तरतूद अर्थमंत्र्यांनी यावेळी जाहीर केली. पैठण इथल्या ���ाथसागरानजिकच्या ज्ञानेश्वर उद्यानाचा, शेगावच्या आनंदसागर उद्यानाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं सांगतानाच, माजी सैनिक आणि सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या घरांचा कर माफ करण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला. आमदारांच्या तीस लाख रुपयांपर्यंतच्या वाहन कर्जावरच्या व्याजाची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णयही अर्थमंत्र्यांनी जाहीर केला, वाहनचालकांना पंधरा हजार रुपये मासिक वेतन देण्याचा निर्णयही सदनानं घेतला असल्याचं, पवार यांनी सांगितलं. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र, अर्थमंत्र्यांचं हे उत्तर असमाधानकारक असल्याचं सांगत सर्व विरोधी सदस्यांसह सभात्याग केला. दरम्यान, अर्थसंकल्पातल्या विविध बारा विभागातल्या मुद्यांवर सध्या विधानसभेत चर्चा सुरू आहे. **** कोरोना प्रतिबंधासाठी राज्याचा आरोग्य विभाग सज्ज असल्याची खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर सर्व ��मदार तसंच मंत्र्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात परतल्यानंतर कोरोना प्रादुर्भावाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घ्यावा, तसंच योग्य खबरदारी बाळगावी, असं आवाहन केलं. **** औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामांतर करण्याचा ठराव आज विधानसभेनं एकमतानं मंजूर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा ठराव मांडला. विधान परिषदेच्या मंजुरीनंतर हा ठराव केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव न आणल्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका बेगडी असल्याचा आरोप भाजपचे आशिष शेलार यांनी यावेळी केला. **** आगामी पावसाळी अधिवेशनात स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या देणारं विधेयक आणलं जाईल, अशी घोषणा आज उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत केली. कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून परप्रांतीयांना नोकरी देण्याची पळवाट या विधेयकातू रोखली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केली. राज्यातले अनेक उद्योग बंद पडत चालल्यामुळे बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी यासंबंधी राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्योगमंत्री बोलंत होते. **** उत्तरप्रदेशातल्या उन्नाव लैंगिक अत्याचार प्रकरणातला दोषी कुलदीप सेंगर याला दिल्ली न्यायालयानं १० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली असून पीडीतेच्या कुटूंबियांना २० लाख रुपयाची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत, पीडीतेच्या वडिलांच्या हत्येच्या गुन्ह्यात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. कुलदीप सेंगर आणि त्याचा भाऊ अतुल सेंगर या दोघांनी मिळून २० लाख रुपये द्यावेत असं जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी ही शिक्षा सुनावली आहे. **** भारतीय बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधू हिनं बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत, महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधुनं दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्यून हिचा २१-१९, २१-१५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना चौथ्या मानांकित नोझोमी ओकुहारा हिच्यासोबत होणार आहे. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 February 2018 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि. ****
• २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प सादर; शिक्षण-कृषी-आरोग्य आणि रेल्वे विकासावर भर • नोकरदारांसाठी आयकर संरचनेत बदल नाही; ४० हजार रुपये मानक वजावट प्रस्तावित • आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये खाद्य तेल, लॅपटॉप, लक्झरी कार, मोबाईल तसंच दूरचित्रवाणी संच महागणार; सोलार पॅनल, सीएनजी संच, सुकामेवा आणि पादत्राणे स्वस्त होणार आणि • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची विजयी सलामी **** केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल आगामी आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. शिक्षण, कृषी, आरोग्य तसंच पायाभूत सुविधा विकास या मुद्यांवर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात नोकरदारांसाठीच्या आयकर संरचनेत कोणताही बदल प्रस्तावित नाही, मात्र स्टँडर्ड डिडक्शन - अर्थात मानक वजावटची रक्कम ४० हजार रुपये करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँका तसंच टपाल खात्यातल्या विविध बचत योजनांवर व्याजातून मिळणारं ५० हजार रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. वार्षिक २५० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या छोट्या उद्योगांना २५ टक्के तर त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेल्या उद्योगांना ३० टक्के उद्योग कर प्रस्तावित आहे. उद्योगांसाठी स्वतंत्र विशेष ओळख क्रमांकाची व्यवस्था प्रस्तावित असून, निर्गुंतवणुकीच्या उद्दीष्टात सात हजार कोटी रुपयांनी वाढ करून हे उद्दीष्ट ८० हजार कोटी रुपये निर्धारित करण्यात आलं आहे. सर्व प्रकारच्या शेतमालाची किमान आधारभूत किंमत दीडपट करण्याचा प्रस्ताव असून, बाव���स हजार ग्रामीण बाजारांचं कृषी बाजारांमध्ये रुपांतर प्रस्तावित करण्यात आलं आहे. कृषी बाजार आणि संरचना कोष स्थापन करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये, ४२ मेगा फूड प्रकल्पांची उभारणी, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १४०० कोटी रुपये, तर बांबू मिशन स्थापन करण्यासाठी १२९० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात आधारभूत सुविधांसाठी राईज योजना प्रस्तावित करण्यात आली असून, यासाठी एक लाख कोटी रुपये तरतूदीचा प्रस्ताव आहे. शिक्षकांसाठी एकीकृत बी एड कार्यक्रम, शिक्षण पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये डिजिटल फळा प्रस्तावित करण्यात आला आहे. ७० लाख नवीन नोकऱ्यांची संधी या आर्थिक वर्षात उपलब्ध होणार आहे. अनुसूचित जाती कल्याणासाठी ५६ हजार ६१९ कोटी रुपये तर अनुसूचित जमाती कल्याणासाठी ३९ हजार १३५ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकलव्य शाळा उभारणी प्रस्तावित आहे. राष्ट्रीय प्रशिक्षण योजनेअंतर्गत २०२० पर्यंत ५० लाख युवकांना शिष्यवृत्तीही प्रस्तावित आहे. आयुष्यमान भारत ही नवी आरोग्य ��ोजना जाहीर करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत दरवर्षी दहा कोटी गरीब कुटुंबांना वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये तरतुदीचा प्रस्ताव आहे. देशभरात २४ नवी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये उभारली जाणार असून, आरोग्य केंद्रांसाठी १२०० कोटी रुपये तरतुदीचा प्रस्ताव आहे. क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दरमहा पाचशे रुपये भत्ता देण्यासाठी सहाशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व खात्याअंतर्गत शंभर आदर्श स्मारकांमध्ये पर्यटन सुविधांमध्ये वाढ करणार असल्याचं, जेटली यांनी सांगितलं. रेल्वे विकासासाठी एक लाख ४८ हजार ५२८ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. आगामी वित्तीय वर्षात ३६०० किलोमीटर लांबीचे लोहमार्ग उभारणं प्रस्तावित असून, ६०० रेल्वे स्थानकं वायफाय तसंच सीसीटीव्ही सह अत्याधुनिक करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मुंबई उपनगरी रेल्वे सेवेत ९० किलोमीटर मार्गाचं दुहेरीकरण केलं जाणार असून, यासाठी अकरा हजार कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. उडान योजनेअंतर्गत ५६ नवी विमानतळं आणि ३१ हेलीपॅड हवाई वाहतुक सेवेशी जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी १४ पूर्णांक ३४ लाख कोटी रुपये तरतूद प्रस्तावित असून, उज्ज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी गरीब महिलांना मोफत घरगुती गॅस जोडणी, सौभाग्य योजनेअंतर्गत चार कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज जोडणी, तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात आगामी वर्षात ५१ लाख घर उभारणीचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दोन कोटी शौचालय उभारणीचं उद्दीष्टही निर्धारित करण्यात आलं आहे. देशभरात पाच लाख वाय फाय स्पॉट उभारले जाणार असून, एकूण डिजिटल इंडिया योजनेसाठी तीन हजार ७३ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. सर्व पथकर नाक्यांवर ई टोल प्रणाली प्रस्तावित आहे. फाईव्ह जी तंत्रज्ञानासाठी चेन्नई इथं फाईव्ह जी टेस्टबेड उभारण्यात येणार आहे. या वर्षी राष्ट्रपिता महात्मा गा��धी यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती साजरी होत आहे, यासाठी दीडशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रपतींचं वेतन पाच लाख रुपये, उपराष्ट्रपतींचं वेतन चार लाख रुपये तर राज्यपालांचं वेतन साडे तीन लाख रुपये, प्रस्तावित असून, खासदारांच्या वेतनाचा दर पाच वर्षांनी आढावा घेण्यासंदर्भात एक एप्रिल २०१८ पासून नवं धोरण लागू करण्याचा मुद्दाही प्रस्तावित करण्यात आला आहे. आरोग्य तसंच शिक्षण सेवे��रचा अधिभार एक टक्क्यानं वाढवून चार टक्के प्रस्तावित आहे. काही वस्तूंवरचं सीमा शुल्क पाच टक्क्यांनी वाढवून २० टक्के प्रस्तावित करण्यात आलं आहे, त्यामुळे आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये खाद्य तेल, सिगारेटस्, लॅपटॉप, आरामदायी चारचाकी गाड्या, मोबाईल तसंच दूरचित्रवाणी संच, इमिटेशन अर्थात बेगडी दागिने, फर्निचर, घड्याळं, क्रीडा साहित्य, खेळणी, सौंदर्य प्रसाधनं, रेशमी कपडे, आदींच्या दरात वाढ, तर सोलर पॅनेल, पादत्राणं, सुका मेवा आणि वाहनांसाठीचा सीएनजी संच, इत्यादी वस्तूंच्या दरात कपात होणार आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** विद्यमान केंद्र सरकारचा चालू कार्यकाळातला हा अखेरचा संपूर्ण अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही हा अर्थसंकल्प सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पातून नवभारताच्या निर्मितीचा संकल्प करत, शेतकरी आणि गरीबांसह समाजातल्या विविध घटकांना न्याय देण्यात आल्याचं सांगितलं, तर या अर्थसंकल्पातून ग्रामीण आणि शहरी भागाच्या समतोल विकासाला प्राधान्य दिलं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. **** दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र हा अर्थसंकल्प निराशाजनक आणि दिशाहीन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी काहीही विशेष तरतूद नसल्याचं म्हटलं आहे. या अर्थसंकल्पाचा वास्तविकतेशी काहीही संबंध नसल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली आहे. बिजू जनता दलाचे नेते भर्तृहरी महताब यांनी प्रतिक्रया देताना, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि युवकांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला असल्याचं मत व्यक्त केलं. **** क्रिकेट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना सहा गडी राखून जिंकत, भारतानं, सहा सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करून दिलेल्या २७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं केल��ल्या १८९ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारतानं ४६ व्या षटकात विजय मिळवला. ११२ धावा करणारा विराट कोहली, सामनावीर ठरला. मालिकेतला पुढचा सामना रविवारी होणार आहे. **** सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमुर्तींना खटल्यांचं वाटप करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय, रोस्टर पध्दत अवलंबणार आहे. यापुढं सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जनहित याचिका संबंधीची प्रकरणं हाताळतील. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. **** नांदेड जिल्ह्यातल्या येत्या मार्च ते मे या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्यानं स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं काल जाहीर केला. जिल्ह्यात १८६ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार असून उमेदवारांना येत्या पाच तारखेपासून १० तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येणार आहेत. या अर्जांची छाननी १२ फेब्रुवारीला होईल तर उमेदवारांना १५ तारखेपर्यंत आपले अर्ज मागे घेता येतील. २५ फेब्रुवारीला मतदान, २६ तारखेला मतमोजणी तर निवडणुकांचे निकाल २७ फेब्रुवारी ला जाहीर होतील. //**********//
0 notes