#कणकवली.
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 11 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर-राहुल गांधी यांची नांदेड इथं प्रचारसभा-प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा सरकारला अधिकार नाही-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
कोचिंग संस्थांनी अभ्यासक्रम तसंच विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर करण्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश
तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ११ धावांनी विजय
आणि
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात काल संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के
****
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी चिकलठाणा इथं सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आज नवी मुंबई आणि मुंबईतही सभा होणार आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी नंदूरबार इथं आणि त्यानंतर नांदेडमध्ये प्रचारसभेला संबोधित करतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महा��िकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही छत्रपती संभाजीनगरसह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, आणि अन्य पदाधिकारी आज शहरात दाखल होत आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर नेण्याचं काम फक्त महायुतीचं सरकार करू शकतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहा यांनी काल राज्यात जळगाव, तसंच दोंडाईचा इथंही सभा घेतल्या. उद्या ते हिंगोलीत प्रचार सभा घेणार आहेत.
****
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पालघर इथे राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काल वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं प्रचार सभा झाली. यावेळी योगी यांच्या उपस्थितीत पोहरादेवी इथले महंत सुनील महाराज राठोड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतले भाजपा - महायुतीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेसाठीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल भोकर इथं सभा घेतली, तर भाजप नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल लातूर इथं भाजप उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल बीड इथं प्रचार सभा घेतली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची काल लातूर इथं प्रचार सभा झाली. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर बोलतांना, भाजपानं मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी केळापूरचे मविआ उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी इथे सभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथं जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात राहता तसंच राहुरी विधानसभा मतदारसंघात वांबोरी इथं प्रचार सभा घेतल्या.
****
विधानसभेची निवडणुकीच्या तयारीच्या अनुष��गानं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात विशेष मुलाखतींचं प्रसारण होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. काल सकाळी प्रसारित झालेल्यामुलाखतीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर पूर्णपणे सुरक्षित असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं.
‘‘आपल्या देशातली सर्वोच्च न्यायव्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. त्यांच्याकडे ई व्ही एम बद्दल च्या चाळीस केसेस आत्तापर्यंत झालेल्या आणि वेगळ्या वेगळ्या पैलूंवरती त्या केसेस होत्या. सुप्रीम कोर्टाने तांत्रिक तज्ञांच्या मदतीने आणि कायद्याच्या मदतीने या केसेसचा निकाल दिलेला आहे. आणि या चाळीसही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ई व्ही एम टँपर करता येत नाही. त्याचा वापर योग्य आहे. आणि झालेलं मतदान ते योग्य पद्धतीने दाखवतं. त्यामुळे सर्वोच्च न्याय व्यवस्थेनं प्रशस्तीपत्र दिलेलं आहे. मतदारांनी स्वीकारलेलं आहे. त्याच ई व्ही एम चा वापर आपण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत.’’
दरम्यान, या सदरात येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज स��ध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणेनं केलेल्या तयारीची माहिती दिली तसंच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं, ते म्हणाले…
‘‘लोकशाहीच्या या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी प्रशासन तयार असून, आपल्याला बाहेरून चार कंपनीज्‍ आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ मिळालेलं आहे. निष्पक्षपणे मतदान करता यावं यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. आपल्याला आपला अधिकार निष्पक्षतेने, निर्भयतेने बजावता यावा यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण सुद्धा आपल्या अधिकाराचा वापर करावा.’’
****
देशाचे पहिले पंतप्रधान ��ंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज बालदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त पंडित नेहरु यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची छायाचित्रं तसंच चित्रफिती न वापरण्याच्या सूचना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कायकर्त्यांना देण्यात याव्यात, असं न्यायालयानं काल सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी पुढच्या आठवडयात होणार आहे.
****
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरकारकडून अशा प्रकारे मालमत्ता पाडल्या जाण्याबाबत न्यायालयानं मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. पाडकाम करण्याआधी आरोपीला कारणे दाखवा नोटीस बजवावी, असं न्यायालयानं म्हटलं असून, या नोटीशीवर आरोपीनं पंधरा दिवसांच्या आत किंवा स्थानिक प्रशासनानं घालून दिलेल्या कालमर्यादेत उत्तर देणं अपेक्षित आहे. कायदेशीर प्रक्रियेशिवाय अशी कारवाई केल्यास ती सरकारची मनमानी समजली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
सर्व कोचिंग संस्थांनी आपले अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर केली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. कोचिंग संस्थांच्या भ्रामक किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात या प्राधिकरणाच्या सचिव निधी खरे यांनी काल नियमावली जारी केली. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी राष्ट्रीय ग्राहक मदतवाहिनी सुरू केल्यापासून अशा संस्थांकडून विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून जास्त रक्कम परत मिळाल्याचंही खरे यांनी सांगितलं.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल तिलक वर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं यजमान संघाचा ११ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं, भारतानं निर्धारित षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला यजमान संघ सात गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावाच करू शकला. नाबाद १०७ धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला चौथा सामना उद्या होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या अनेक भागात काल संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी सात वाजून २२ मिनिटांनी कुरुंदा, पांगरा, कवठा, डोणवाडा, आंबा, कोठारी, वर्ताळा आदींसह इतर गावांना लागोपाठ दोन भूकंपाचे सौम्य धक्के बसले. वसमत तालुका प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
****
निवडणूक आचारसंहिता काळात विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्यांना स्थानिक विकास निधी नव्याने दिला जाणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं नसेल, अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम करण्यात यावं, पण, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झालं असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईल, असंही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर ग्रामीण मतदारसंघात सोमवारी पार पडलेल्या गृहमतदानाच्या ��हिल्या फेरीत ९४ टक्के मतदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात आज गृह मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे तर, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघात उद्या, १५ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरू होईल.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
आरक्षणाच्या मागणीसाठी कणकवलीत मराठा बांधव एकवटले
https://bharatlive.news/?p=183957 आरक्षणाच्या मागणीसाठी कणकवलीत मराठा बांधव एकवटले
कणकवली; पुढारी ...
0 notes
marathibatmi11 · 2 years ago
Text
.. तर मी एक रुपयाही निधी देणार नाही, नितेश राणेंची धमकी
.. तर मी एक रुपयाही निधी देणार नाही, नितेश राणेंची धमकी
ग्रामपंचायत निवडणूकीत माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एक रुपयाही निधी देणार नाही असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांना एक प्रकारे धमकीच दिली आहे. नितेश राणे यांनी वैभववाडी तालुका कार्यकर्ता आढावा बैठकीत, ‘ ज्या गावात भाजपची बिनविरोध ग्रामपंचायत येईल त्या गावाला 50 लाखाचा निधी मात्र जर आपल्या विचारांचा सरपंच झाला नाही तर तिथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago

sakshimarathiblog · 2 years ago

harishmarathiblog · 2 years ago

chimnayjoshiblogs · 2 years ago

rajendrasomani · 2 years ago

kokannow · 2 years ago
Text
परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव २६ नोव्हेंबरपासून
परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव २६ नोव्हेंबरपासून
धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पुण्यतिथी सोहळ्याचा लाभ घेण्याचे भालचंद्र संस्थानकडून आवाहन कणकवली : येथील श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४५ वा पुण्यतिथी महोत्सव २६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे . आश्रमात २६ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ४ वाजता कीर्तन महोत्सव होणार आहे.भाविकांसाठी ही एक मोठी पर्वणीच आहे.२६ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दररोज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
• सिडको महामंडळाचे भूखंड कब्जेहक्काने रुपांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
• जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग तसंच लातूर जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांनाही मंजुरी
• छत्रपती संभाजीनगर इथं जेएसडब्ल्यू कंपनीला वाहन निर्मिती उद्योगासाठी भूखंडाचं देकारपत्र
• ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणि
• ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ
****
सिडको महामंडळाचे भूखंड कब्जेहक्काने रुपांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे अनेक गृहनिर्माण संस्था या जागेच्या मालक होणार असून, त्यांना नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता राहणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने हे भूखंड एकरकमी विहीत शुल्क आकारून भाडेपट्ट्यांऐवजी कब्जे हक्काने वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करून त्यासाठी पद मंजूर करण्यास कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पा��्या दुरूस्तीला काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यासाठी ११३ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि औसा तालुक्यातील शेतकऱ्यांसह धाराशिव शहरालाही या निर्णयाचा लाभ होणार आहे.
शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळ स्थापन करणं तसंच राज्यात सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तसंच विकास करण्यासाठी नागनाथ आण्णा नायकवडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन तसंच विकास महामंडळ स्थापन करण्यास काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्यासंदर्भात नॉन-क्रीमीलेअरच्या उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख रुपये करण्याची शिफारस केंद्र शासनास करण्याचा निर्णयही काल राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
मंत्रिमंडळाने काल घेतलेल्या इतर निर्णयांचा हा संक्षिप्त आढावा...
‘‘केंद्राची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या योजनेंतर्गत माहिती निर्मिती कक्ष, शेतकरी माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच आणि भूसंदर्भाकिंत भूभाग असणारे 'गाव नकाशे माहिती संच' महसूल विभाग तयार करेल. पिकांच्या माहिती संचासाठी वार्षिक सुमारे ८१ कोटी ८३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
राज्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोलीसह एकूण २१ जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या प्रारूपास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा अध्यादेश विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येईल.
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पासाठी केंद्रचालकांना ग्रामरोजगार सेवकांच्या धर्तीवर दरमहा दहा हजार रुपये मानधन ग्रामपंचायीतमार्फत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी ७०९ कोटी २७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
नागपूर मुंबई समृध्दी महामार्गाला जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
लातूर जिल्ह्यासह राज्यात सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर इथल्या विविध जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
राज्यातील पत्रकार तसंच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळं स्थापन करणं, राज्यातील रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालय, स्नानगृह संकुल तसंच निवास सुविधा उपलब्ध करून देणं, अंगणवाड्यांमध्ये ३४५ पाळणाघरं सुरु करणं, तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता, नवीन महाविद्यालयं-नवीन अभ्यासक्रम तसंच अतिरिक्त तुकड्यांसाठी अर्ज करण्याला येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा, मराठवाड्यातील शाळांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत निधी वाटप, शाळांना २० टक्के वाढीव अनु��ानाचा टप्पा, मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ, मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा, आदी निर्णयांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.’’
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीत ६३६ एकर जागेचं जेएसडब्लु ग्रीन मोबीलिटी कंपनीला देकार पत्र देण्यात आलं आहे. या जागेवर २७ हजार २०० कोटी रुपये गुंतवणुकीतून सुमारे साडे पाचशे एकर क्षेत्रावर इलेक्ट्रिक कार तर ९० एकर क्षेत्रावर व्यावसायिक वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. यातून प्रत्यक्ष पाच हजार तर अप्रत्यक्ष १५ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाला मुंबईत वरळी इथल्या विद्युत दाहिनीत अखेरचा निरोप देण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी केंद्र सरकारच्या वतीनं टाटा यांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टाटा मोटर्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन् यांच्यासह उद्योग, चित्रपट, आणि राजकारणासह समाजाच्या सर्वच क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई पोलिस दलाच्या वतीनं यावेळी शोकधून वाजवून तसंच हवेत बंदुकीच्या फैरी झाडत रतन टाटा यांना मानवंदना देण्यात आली.
रतन टाटा यांचं परवा रात्री मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते.
****
रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राज्यात काल दुखवटा पाळण्यात आला, त्यामुळे नांदेड इथला महिला सक्षमीकरणाचा कालचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतले कालचे नियोजित कार्यक्रमही स्थगित झाले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात खर्डा-चौसाळा-लोखंडी सावरगांव या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे.
****
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी साडे चार वाजता ते शासकीय विश्रामगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेऊन सायंकाळी मुंबईला प्रयाण करतील.
****
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तं नागपुरात दीक्षाभूमी इथं कालपासून धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, आर्य भदंत सुरई ससाई यांच्या उपस्थितीत अनेक उपासक आणि श्रामणेर यांना धम्मदीक्षा देण्यात आली. हा धम्मदीक्षा सोहळा उद्यापर्यंत चालणार आहे. दीक्षा घेण्यासाठी अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दक्षिण मध्य रेल्वेने नागपूर मार्गे नांदेड- अमला- नांदेड विशेष गाडी ची एक फेरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी नांदेड इथून आज रात्री ११ वाजता सुटणार आहे.
****
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आज धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. काल देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी तुळजाभवानी मातेने भवानी तलवार दिल्याची, आख्यायिका यामागे सांगितली जाते.
****
आंतरराष्ट्रीय बालिका दिवस आज पाळण्यात येत आहे. मुलींची भविष्याबाबत संकल्पदृष्टी ही यंदाच्या बालिका दिनाची संकल्पना आहे. मुलींना लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या समान संधी याचं महत्त्व पटवून देणं हा या दिवसाचा उद्देश आहे.
दरम्यान लैंगिक शोषणाविरुद्ध शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सतर्क राहून एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्‍यकता अहिल्यानगरच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं शालेय विद्यार्थिनी सुरक्षेबाबत काल घेण्यात आलेल्या एका कार्यशाळेत त्या बोलत होत्या. संवाद हा फक्त बोलण्यातून नव्हे तर वागण्यातून आणि हावभावातून जाणवत असल्याकडे न्यायाधीश शेंडे यांनी लक्ष वेधलं.
****
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर काल बीड तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. प्रलंबित कामं तातडीने मार्गी लावणं तसंच नागरिकांच्या विविध प्रश्नांवर योग्य कार्यवाही करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रसिद्ध तारा पान सेंटरचे संचालक शरफोद्दीन सिद्दिकी उर्फ शरफूभाई यांचं काल निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
परभणी इथं विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभ���मीवर स्वीप कक्षाची काल बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध मतदार गटांमध्ये जागरूकता वाढवून मतदान टक्केवारीत वाढ कशी करता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
****
स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने व्यावसायिक टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये होणारी डेविस चषक स्पर्धा आपली अखेरची स्पर्धा असेल, असं नदालने साामजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आपल्या सुमारे २४ वर्षांच्या कारकिर्दीत नदालने २२ ग्रँड स्लॅम्स पटकावले आहेत, मानाची सर्व चार एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपदं आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो एकमेव टेनिसपटू आहे.
****
हवामान
राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
****
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सिडको महामंडळाला दिलेले भूखंड कब्जेहक्काने रुपांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग तसंच लातूर जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांनाही मंजुरी
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणि
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ
****
सिडको महामंडळाला दिलेले भूखंड कब्जेहक्काने रुपांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे अनेक गृहनिर्माण संस्था या जागेच्या मालक होणार असून, त्यांना नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता राहणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने हे भूखंड एकरकमी विहीत शुल्क आकारून भाडेपट्ट्यांऐवजी कब्जे हक्काने वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्राची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या योजनेंतर्गत माहिती निर्मिती कक्ष, शेतकरी माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच आणि भूसंदर्भाकिंत भूभाग असणारे 'गाव नकाशे माहिती संच' महसूल विभाग तयार करेल. यासाठी सुकाणू समिती, अंमलबजावणी समिती, क्षेत्रीय स्तरावर विभागस्तरीय, जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात येतील. पिकांच्या माहिती संचासाठी वार्षिक सुमारे ८१ कोटी ८३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
राज्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोलीसह एकूण २१ जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. यासाठी अंदाजित सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या प्रारूपास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा अध्यादेश विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येईल. या आयोगासाठी मंजूर असलेली अधिकारी, कर्मचाऱ्यांची २७ पदं आयोगाच्या आस्थापनेवर हस्तांतरीत करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पासाठी केंद्रचालकांना ग्रामरोजगार सेवकांच्या धर्तीवर दरमहा दहा हजार रुपये मानधन ग्रामपंचायीतमार्फत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी ७०९ कोटी २७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या केंद्रासाठी मंजूर अतिरीक्त निधी टप्पेनिहाय वितरीत करण्यात येणार आहे.
नागपूर मुंबई समृध्दी महामार्गाला जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 
लातूर जिल्ह्यासह राज्यात सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर इथल्या विविध जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
राज्यातील पत्रकार तसंच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळं स्थापन करणं, राज्यातील रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालय, स्नानगृह संकुल तसंच निवास सुविधा उपलब्ध करून देणं, अंगणवाड्यांमध्ये ३४५ पाळणाघरं सुरु करणं, तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता, नवीन महाविद्यालयं-नवीन अभ्यासक्रम तसंच अतिरिक्त तुकड्यांसाठी अर्ज करण्याला येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा, मराठवाड्यातील शाळांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत निधी वाटप, शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा, मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ, मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा, आदी निर्णयांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाला वरळी इथल्या विद्युत दाहिनीत अखेरचा निरोप देण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी केंद्र सरकारच्या वतीनं टाटा यांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टाटा मोटर्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन् यांच्यासह उद्योग, चित्रपट, आणि राजकारणासह समाजाच्या सर्वच क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई पोलिस दलाच्या वतीनं यावेळी शोकधून वाजवून तसंच हवेत बंदुकीच्या फैरी झाडत रतन टाटा यांना मानवंदना देण्यात आली.
त्यापूर्वी टाटा यांचा पार्थिव देह आज सकाळपासून मुंबईत सांस्कृतिक कला केंद्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. टाटा समूहाच्या विविध कंपन्यांचे कर्मचारी, राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती यांच्यासह मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांनी रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
रतन टाटा यांचं काल रात्री मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते.
****
रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राज्यात आज एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला, त्यामुळे नांदेड इथं होणारा राज्य सरकारचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने पुढे ढकलला आहे. या कार्यक्रमाबाबत नवीन तारीख, वेळ, स्थळ लवकरच जाहीर केलं जाईल, असं नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळवलं आहे.
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या कुंभारी पिंपळगाव इथं एका अन्नप्रक्रिया उद्योगाच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन आणि शेतकरी मेळावा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रमही स्थगित झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात खर्डा-चौसाळा-लोखंडी सावरगांव या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या सकाळी दूरदृष्य प्रणालीद्‌वारे होणार आहे.
****
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात दीक्षाभूमी इथं आजपासून धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ झाला. हा धम्मदीक्षा सोहळा तीन दिवस चालणार आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, आर्य भदंत सुरई ससाई यांच्या उपस्थितीत अनेक उपासक आणि श्रामणेर यांना धम्मदीक्षा देण्यात आली. दीक्षा घेणाऱ्या नागरिकांना बुद्ध वंदना, २१ प्रतिज्ञांचं पालन पठण करुन धम्मदीक्षा विधी पार पडला. दीक्षा घेण्यासाठी देशभरातून अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत. 
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दक्षिण मध्य रेल्वेने नागपूर मार्गे नांदेड- अमला- नांदेड  विशेष  गाडी ची एक फेरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी नांदेड इथून उद्या शुक्रवारी ११ ��क्टोबर रोजी रात्री ११ वाजता सुटेल आणि भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद, पिंपळकुटी, नागपूर मार्गे अमला इथं श���िवारी सकाळी ११ वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी शनिवारी रात्री ८ वाजता अमला इथून  सुटेल आणि आलेल्या मार्गे नांदेड इथं रविवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल, असं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
आपली संस्कृती, मूल्य, मापदंड युवा पिढीसाठी वाचवायचे आहेत, त्यासाठी देशाचे सांस्कृतिक दूत होण्याचं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी केलं आहे. मुंबई इथं आज डी.वाय.पाटील विद्यापीठात झालेल्या विकसित भारतासाठी युवा शक्ती या कार्यक्रमात ते बोलत होते. युवा पिढीने कोणत्याही क्षेत्रात काम केलं तरीही त्यांना देशाच्या प्रगतीचा धागा बनता आला पाहिजे, असं काम करण्याचं आवाहन शेखावत यांनी केलं.
****
लैंगिक शोषणाविरुद्ध शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सतर्क राहून एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्‍यकता अहिल्यानगरच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने झालेल्या एका कार्यशाळेत त्या आज बोलत होत्या. संवाद हा फक्त बोलण्यातून नव्हे तर वागण्यातून आणि हावभावातून जाणवत असल्याकडे न्यायाधीश शेंडे यांनी लक्ष वेधलं.
****
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आज आठव्या माळेला धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला, अशी आख्यायिका यामागे सांगितली जाते. दरम्यान, उद्या ११ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर परिमंडलातल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी झालेल्या चार  हजार ३३४ घरगुती ग्राहकांचं मासिक वीजबिल शून्य होणार आहे. घराच्या छतावर एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे  १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळू शकते. या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीज ग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यातील महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही शासकीय वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सानुग्रह अनुदान जाहीर  करा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेनं केली आहे.
****
बीड जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने  सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी मोफत विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुकांनी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या गोताणे तालुक्यातल्या चार पाझर तलावांची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली आहे. या पाझर तलावांमुळे गोताणे, उडाणे, आनंदखेडे इथल्या शेतकऱ्यांच्या सुमारे ६५० एकर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे. आज आमदार कु��ाल पाटील यांच्या हस्ते या तलावाचं जलपूजन करण्यात आलं.
****
येत्या २४ तासात राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, धाराशिव जिल्ह्यातही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं, हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः समाजातल्या वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचना देखील त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी आठ मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विद्यापीठाचे कुलपती शां.ब.मुजुमदार यावेळी उपस्थित होते.
****
दरम्यान, आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या ��ताब्दी वर्षाच्या समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.
****
‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेला आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध पुस्तिका आणि प्रबंधांचं प्रकाशन यावेळी करण्यात ���लं.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
धुळे विभागातल्या नऊ आगारात कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. वाशिम आगारातून सकाळपासून बससेवा पूर्णपणे बंद असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावरुन परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी च्या संपामुळे चाकरमानी, तसंच शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद असून, कणकवली सह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातही पोळ्याचा पाडवा म्हणजे मारबत उत्सवावर एसटी बंदचा परिणाम दिसून आला. दर वर्षी गोंदिया आगारातून जादा बस सोडल्या जातात, मात्र आज सकाळपासून बस बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात मात्र बससेवा सुरळीत सुरू आहे. मारबत उत्सवामुळे ठराविक वेळेवर एस टी बसेस सोडल्या जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोड��गाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयात पाण्याची आवक सुरु आहे. हे जलाशय १२ फूट इतका भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम - नांदेड तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस आणि नांदेड - विशाखापट्टणम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय युवा परिषद आणि नांदेड इथल्या पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या नांदेड इथं एक दिवसीय प्रादेशिक भाषा आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे आणि प्रा.डॉ.अविनाश कदम मार्गदर्शन करणार आहेत. “मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाची आव्हाने” हा परिषदेचा विषय आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 04 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं आतापर्यंतची सर्वात मोठी जनजागृती मोहिम हाती घेतल्याचं आयोगानं काल सांगितलं. विविध सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या संस्थांनी या जनजागृती मोहिमेसाठी आयोगाला सहकार्य केलं आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६ पूर्णांक १४ टक्के, तर तर दुसर्या टप्प्यात ६६ पूर्णांक ७१ टक्के इतकं विक्रमी मतदान झालं आहे, मात्र हे प्रमाण २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानापेक्षा कमी आहे, असंही निवडणूक आयोगानं सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दाखल अर्जांची आज छाननी होत आहे. या टप्यात राज्यातल्या १३ मतदारसंघांमध्ये ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले आहेत.
****
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार उद्या संपणार आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्ह्यातल्या वाई इथं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाटण इथं, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सातारा इथं प्रचारसभा घेणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा होणार आहे.
****
कांद्याच्या निर्यातीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली आहे. परराष्ट्र व्यापार संचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा आदेश त्वरित लागू होणार असून, त्यासाठी किमान ५५० प्रति मेट्रिक टन निर्यात किंमत असणं गरजेचं आहे. गेल्याच महिन्यात केंद्रानं सहा देश��ंना ९९ हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली होती.
****
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते.
गाडे यांनी दलित अत्याचार स्कॉलरशीप गायरान हक्कांसाठी लढा दिला. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जवळपास ४७ दलित वसाहती त्यांनी वसवल्या. १९७७ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे जनरल सेक्रेटरी असताना त्यांनी विद्यापीठाच्या ���ामांतराचा पहिला ठराव मांडला. काँग्रेसच्या कार्यकाळात गाडे यांनी परिवहन राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यांच्या पार्थिवावर उद्या छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातल्या साखरीनाटे गावातल्या डोंगरी बंदरावर काल मतदान जनजागृतीसाठी नौका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात २० नौका सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी केलं.
****
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी मतदारसंघामधे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत शाहीर आणि तमाशा कलावंतांच्या माध्यमातून मतदार जनजागृती कार्यक्रम काल राबवण्यात आला. यावेळी मनोरंजन कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं. श्रीरामपूर प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.
****
सांगली इथं लोकसभा  निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्याचं आवाहन केलं. सांगली जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली. लातूर लोकसभा मतदारसंघातल्या 27 उमेदवारांनी यावेळी आपला खर्च तपासणीसाठी सादर केला.
****
परभणी इथलं जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबीर भरवण्यात येत आहे. सहा मे पासून १५ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबीरात खो-खो, बास्केटबॉल, रग्बी तसंच ॲथलेटीक्सच्या विविध प्रकारांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. जास्तीत जास्त खेळाडू तसंच शाळांनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स ��ंघादरम्यान सामना होणार आहे. बंगळुरु इथल्या एम चिन्नास्वामी मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 04 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं आतापर्यंतची सर्वात मोठी जनजागृती मोहिम हाती घेतल्याचं आयोगानं काल सांगितलं. विविध सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या संस्थांनी या जनजागृती मोहिमेसाठी आयोगाला सहकार्य केलं आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६ पूर्णांक १४ टक्के, तर तर दुसर्या टप्प्यात ६६ पूर्णांक ७१ टक्के इतकं विक्रमी मतदान झालं आहे, मात्र हे प्रमाण २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानापेक्षा कमी आहे, असंही निवडणूक आयोगानं सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दाखल अर्जांची आज छाननी होत आहे. या टप्यात राज्यातल्या १३ मतदारसंघांमध्ये ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले आहेत.
****
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार उद्या संपणार आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्ह्यातल्या वाई इथं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाटण इथं, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सातारा इथं प्रचारसभा घेणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा होणार आहे.
****
कांद्याच्या निर्यातीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली आहे. परराष्ट्र व्यापार संचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा आदेश त्वरित लागू होणार असून, त्यासाठी किमान ५५० प्रति मेट्रिक टन निर्यात किंमत असणं गरजेचं आहे. गेल्याच महिन्यात केंद्रानं सहा देशांना ९९ हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली होती.
****
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते.
गाडे यांनी दलित अत्याचार स्कॉलरशीप गायरान हक्कांसाठी लढा दिला. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जवळपास ४७ दलित वसाहती त्यांनी वसवल्या. १९७७ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे जनरल सेक्रेटरी असताना त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराचा पहिला ठराव मांडला. काँग्रेसच्या कार्यकाळात गाडे यांनी परिवहन राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यांच्या पार्थिवावर उद्या छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातल्या साखरीनाटे गावातल्या डोंगरी बंदरावर काल मतदान जनजागृतीसाठी नौका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात २० नौका सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासह अन्य अधिकार�� यावेळी उपस्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी केलं.
****
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी मतदारसंघामधे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत शाहीर आणि तमाशा कलावंतांच्या माध्यमातून मतदार जनजागृती कार्यक्रम काल राबवण्यात आला. यावेळी मनोरंजन कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं. श्रीरामपूर प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.
****
सांगली इथं लोकसभा  निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्याचं आवाहन केलं. सांगली जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली. लातूर लोकसभा मतदारसंघातल्या 27 उमेदवारांनी यावेळी आपला खर्च तपासणीसाठी सादर केला.
****
परभणी इथलं जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबीर भरवण्यात येत आहे. सहा मे पासून १५ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबीरात खो-खो, बास्केटबॉल, रग्बी तसंच ॲथलेटीक्सच्या विविध प्रकारांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. जास्तीत जास्त खेळाडू तसंच शाळांनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स संघादरम्यान सामना होणार आहे. बंगळुरु इथल्या एम चिन्नास्वामी मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत संपली-उद्या छाननी
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक - प्रचाराला वेग
बनावट प्रचार साहित्य प्रसारित केल्यास संबधितांवर कारवाईच्या पोलिस विभागाला सूचना
आणि
अकोला जिल्ह्यात दोन कारच्या अपघातात पाच जण ठार
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात राज्यातल्या १३ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पालघर लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सवरा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर याच जागेसाठी बहुजन विकास आघाडी कडून आमदार राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ठाण्यातून टेंभी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
उत्तर मध्य मुंबई भाजप महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम आणि उत्तर पश्चिम मुंबई शिवसेना महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी वांद्रे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.
धुळे लोकसभा मतदार संघातून दिनेश मोतीलाल बच्छाव यांनी कॉंग्रेसचे पर्यायी उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला, या मतदार संघातून कॉंग्रेसच्या डॉ.शोभा दिनेश बच्छाव यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. याच मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुर रहमान यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं.
या सर्व मतदार संघात उद्या अर्जांची छाननी होणार असून, परवा सोमवारी सहा मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात मतदान २० मे रोजी होणार आहे.
****
काँग्रेसनं उत्तरप्रदेश मधल्या रायबरेली मतदार संघातून राहुल गांधी यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. तर अमेठीतून काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा निवडणूक लढवणार आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातली १० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या एकूण ९६ जागांसाठी एक हजार ७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या ११ लोकसभा मतदार संघातल्या २९८ उमेदवारांचा समावेश आहे. या टप्प्यासाठी येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
****
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचारासाठी आता अखेरचे जवळपास दोन दिवस शिल्लक आहेत. यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रचार सभा, प्रचार फेऱ्या तसंच इतर पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वच उमेदवार, अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं प्रचारसभा घेणार आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज प्रचारसभा घेतली. आपल्या भाषणात अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने १० वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांचा आढावा घेतानाच अमित शहांनी विरोधकांवर, प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात जन्म घेतला असला, तरी बाळासाहेबांचा खरा वारसा नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्याकडे आला असल्याचं अमित शहा यांनी नमूद केलं. दरम्यान, शहा यांनी आज सांगलीत महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. भाजप संविधान बदलणार असल्याची टीका करणाऱ्या काँग्रेसनेच देशाचं संविधान ८० वेळा तोडल्याचा आरोप गडकरी यांनी यावेळी केला. देशावर आणीबाणी लादून काँग्रेसने संविधानाची ऐशी-तैशी केल्याची टीकाही गडकरी यांनी केली. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह भाजप नेत्यांची उपस्थिती होती.
****
गंभीर आरोप असलेले नेते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना चालतात का असा सवाल काँग्रेस नेते तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज लातूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे, त्यावर बोलताना, उद्धव ठाकरेंनी भाजपसाठी आपल्या पक्षाच्या खिडक्या-दरवाजे कायमचे बंद केले असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीदरम्यान बनावट प्रचार साहित्य - डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाज माध्यमं तसंच डिजिटल माध्यमांवरून प्रसारित केल्यास संबधितांवर कारवाईच्या सूचना पोलीस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत. फोटोशॉप, मशीन लर्निंग किंवा ��र्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून असे प्रकार घडत आहेत. निवडणुकीत असे प्रकार घडणे चिंतेचा विषय आहे. याला आळा घालण्यासाठी तसंच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीनं 'डीप फेक' कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाज कंटकांवर ही कारवाई करण्यात येणार आहे.
****
अकोला जिल्ह्यात आज दोन कारच्या समोरासमोर झालेल्या रस्ते अपघातात शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातले पाच जण ठार झाले. सरनाईक यांचे कुटुंबीय हे वाशिमला जात असताना, पातूर घाटात दोन वाहनं समोरासमोर धडकून हा अपघात झाला. मृतांमध्ये एका महिलेचा आणि तिच्या नऊ महिन्यांच्या बालिकेचा समावेश आहे. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पातूर पोलीस करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात बारसेवाडा इथं जादुटोण्याच्या संशयावरुन काही नागरिकांनी एका महिलेसह दोघांना जिवंत जाळल्याची घटना १ मे रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. जादुटोणा करत असल्याच्या संशयावरुन नागरिकांनी या दोघांना मारहाण केली आणि गावाबाहेर नेऊन त्यांना पेटवून दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात ४१ गावांमध्ये गृहमतदानाची प्रकिया नुकतीच राबवण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुक्यातील ८५ वर्षे वयापेक्षा जास्त आणि दिव्यांग अशा १६३ मतदारांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला. यात १५३ ज्येष्ठ नागरिक आणि १० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. यासाठी ८ पथकं स्थापन करण्यात आली होती. यामध्ये एकूण ५६ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, बारामती तालुक्यातल्या खुटवड गाव इथल्या ८९ वर्षाच्या महिला मतदारानं काल प्रथमच घरून मतदान केलं. रत्नागिरी शहरातल्या आरोग्य मंदिर परिसरातल्या ८७ वर्षांच्या महिला मतदारांनीही घरून मतदान केलं आणि या सुविधेबद्दल आभार मानले. लातूर तसंच उस्मानाबाद मतदारसंघातही गृह मतदान सुरु आहे.
****
लोकसभा निवडणूक प्रचार खर्चात विसंगती आढळल्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्वीवेदी यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच��या उमेदवार सुनेत्रा पवार यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. येत्या दोन दिवसात या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचं या नोटीसीत म्हटलं आहे.
****
तिसऱ्या टप्प्यात सात तारखेला होणाऱ्या मतदान प्रक्रियेत लातूर तसंच उस्मानाबाद मतदार संघाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभा मतदार संघाचा लातूर लोकसभा मतदार संघात समावेश आहे. या मतदार संघात निवडणूक ड्यूटी लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी परवा पाच तारखेला नांदेड जिल्हा प्रशासनाकडून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. सात मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही या कर्मचाऱ्यांना परतण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
बीड लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार असून यात महिलांनी स्वविवेकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. त्या आज बीड इथं बोलत होत्या. बीड लोकसभा मतदारसंघात ५५ महिला मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्राच्या ठिकाणी महिला अधिकारी कर्मचारी असणार आहेत. महिलांचा मतदानात सक्रिय सहभाग असावा यासाठी मतदान केंद्रावर तात्पुरत्या अंगणवाड्या उभारण्यात येत आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत संपली-उद्या छाननी
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक - प्रचाराला वेग
बनावट प्रचार साहित्य प्रसारित केल्यास संबधितांवर कारवाईच्या पोलिस विभागाला सूचना
आणि
अकोला जिल्ह्यात दोन कारच्या अपघातात पाच जण ठार
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात राज्यातल्या १३ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पालघर लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सवरा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर याच जागेसाठी बहुजन विकास आघाडी कडून आमदार राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ठाण्यातून टेंभी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
उत्तर मध्य मुंबई भाजप महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम आणि उत्तर पश्चिम मुंबई शिवसेना महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी वांद्रे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.
धुळे लोकसभा मतदार संघातून दिनेश मोतीलाल बच्छाव यांनी कॉंग्रेसचे पर्यायी उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला, या मतदार संघातून कॉंग्रेसच्या डॉ.शोभा दिनेश बच्छाव यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. याच मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुर रहमान यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं.
या सर्व मतदार संघात उद्या अर्जांची छाननी होणार असून, परवा सोमवारी सहा मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात मतदान २० मे रोजी होणार आहे.
****
काँग्रेसनं उत्तरप्रदेश मधल्या रायबरेली मतदार संघातून राहुल गांधी यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. तर अमेठीतून काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा निवडणूक लढवणार आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातली १० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या एकूण ९६ जागांसाठी एक हजार ७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या ११ लोकसभा मतदार संघातल्या २९८ उमेदवारांचा समावेश आहे. या टप्प्यासाठी येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
****
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचारासाठी आता अखेरचे जवळपास दोन दिवस शिल्लक आहेत. यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रचार सभा, प्रचार फेऱ्या तसंच इतर पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वच उमेदवार, अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं प्रचारसभा घेणार आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज प्रचारसभा घेतली. आपल्या भाषणात अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने १० वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांचा आढावा घेतानाच अमित शहांनी विरोधकांवर, प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात जन्म घेतला असला, तरी बाळासाहेबांचा खरा वारसा नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्याकडे आला असल्याचं अमित शहा यांनी नमूद केलं. दरम्यान, शहा यांनी आज सांगलीत महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. भाजप संविधान बदलणार असल्याची टीका करणाऱ्या काँग्रेसनेच देशाचं संविधान ८० वेळा तोडल्याचा आरोप गडकरी यांनी यावेळी केला. देशावर आणीबाणी लादून काँग्रेसने संविधानाची ऐशी-तैशी केल्याची टीकाही गडकरी यांनी केली. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह भाजप नेत्यांची उपस्थिती होती.
****
गंभीर आरोप असलेले नेते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना चालतात का असा सवाल काँग्रेस नेते तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज लातूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे, त्यावर बोलताना, उद्धव ठाकरेंनी भाजपसाठी आपल्या पक्षाच्या खिडक्या-दरवाजे कायमचे बंद केले असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीदरम्यान बनावट प्रचार साहित्य - डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाज माध्यमं तसंच डिजिटल माध्यमांवरून प्रसारित केल्यास संबधितांवर कारवाईच्या सूचना पोलीस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत. फोटोशॉप, मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून असे प्रकार घडत आहेत. निवडणुकीत असे प्रकार घडणे चिंतेचा विषय आहे. याला आळा घालण्यासाठी तसंच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीनं 'डीप फेक' कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाज कंटकांवर ही कारवाई करण्यात येणार आहे.
****
अकोला जिल्ह्यात आज दोन कारच्या समोरासमोर झालेल्या रस्ते अपघातात शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातले पाच जण ठार झाले. सरनाईक यांचे कुटुंबीय हे वाशिमला जात असताना, पातूर घाटात दोन वाहनं समोरासमोर धडकून हा अपघात झाला. मृतांमध्ये एका महिलेचा आणि तिच्या नऊ महिन्यांच्या बालिकेचा समावेश आहे. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पातूर पोलीस करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात बारसेवाडा इथं जादुटोण्याच्या संशयावरुन काही नागरिकांनी एका महिलेसह दोघांना जिवंत जाळल्याची घटना १ मे रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. जादुटोणा करत असल्याच्या संशयावरुन नागरिकांनी या दोघांना मारहाण केली आणि गावाबाहेर नेऊन त्यांना पेटवून दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात ४१ गा���ांमध्ये गृहमतदानाची प्रकिया नुकतीच राबवण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुक्यातील ८५ वर्षे वयापेक्षा जास्त आणि दिव्यांग अशा १६३ मतदारांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला. यात १५३ ज्येष्ठ नागरिक आणि १० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. यासाठी ८ पथकं स्थापन करण्यात आली होती. यामध्ये एकूण ५६ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, बारामती तालुक्यातल्या खुटवड गाव इथल्या ८९ वर्षाच्या महिला मतदारानं काल प्रथमच घरून मतदान केलं. रत्नागिरी शहरातल्या आरोग्य मंदिर परिसरातल्या ८७ वर्षांच्या महिला मतदारांनीही घरून मतदान केलं आणि या सुविधेबद्दल आभार मानले. लातूर तसंच उस्मानाबाद मतदारसंघातही गृह मतदान सुरु आहे.
****
लोकसभा निवडणूक प्रचार खर्चात विसंगती आढळल्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्वीवेदी यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. येत्या दोन दिवसात या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचं या नोटीसीत म्हटलं आहे.