#​गुलाबराव
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Gulabrao Patil Qawwali : गुलाबराव पाटलांनी मंचावरून गायली कव्वाली; श्रोत्यांनीही दिली भरभरून दाद
Gulabrao Patil Qawwali : गुलाबराव पाटलांनी मंचावरून गायली कव्वाली; श्रोत्यांनीही दिली भरभरून दाद
Gulabrao Patil Qawwali : गुलाबराव पाटलांनी मंचावरून गायली कव्वाली; श्रोत्यांनीही दिली भरभरून दाद Gulabrao Patil Qawwali Video : शेरोशायरीसाठी प्रसिद्ध असलेल्या मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावात मंचावरून कव्वाली गायला सुरुवात केल्यानं उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. Gulabrao Patil Qawwali Video : शेरोशायरीसाठी प्रसिद्ध असलेल्या मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावात मंचावरून कव्वाली गायला सुरुवात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळेच देशभरात विविध क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर-परंडा इथं महिला सशक्तीकरण अभियानात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन  
राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थांमधल्या संविधान मंदिराचं उद्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन-राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची येत्या शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते स्थापना 
कलाकारांनी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावं-अभिनेते सचिन पिळगावकर यांचा सल्ला
आणि
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी मोहीम कायम
****
जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळेच देशभरात विविध क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात परंडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला सशक्तीकरण अभियानात मुख्यमंत्री आज बोलत होते. देशभरातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
आज एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे. आपलं राज्य नंबर एकला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर गेलं होतं. मला अभिमान आहे, तुमच्या शुभेच्छांमुळे, आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर एकला आलं. आज जीडीपी असेल, परदेशी गुंतवणूक असेल, उद्योग असेल या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आहे.
महिलांनी शक्ती दिल्यास, या योजनेतल्या रकमेत दुप्पट वाढ करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या ठिकाणी जमलेल्या भगिनींचा उत्साह पाहून, आपण घेतलेला निर्णय सार्थकी लागल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील, एकही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
या कार्यक्रमापूर्वी धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी तुळजाभवानी मातेची कवड्यांची माळ तसंच सन्मानचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख यांच्या हस्ते पांडुरंगाची मूर्ती, वीणा आणि घोंगडी देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून राख्या बांधल्या.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचं मुंबईहून विमानानं लातूर इथं आज सकाळी आगमन झालं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लातूरहून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री परंडा इथं दाखल झाले. सायंकाळी मुख्यमंत्री लातूर मार्गे मुंबईकडे रवाना झाले.
****
युवकांच्या हाताला काम देऊन त्यांना प्रशिक्षित करून नवा आत्मविश्वास पेरण्य��साठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त ठरणार असल्याचं, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज धरणगाव इथं ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत नियुक्ती पत्र वाटप आणि रोजगार मेळाव्यात बोलत होते. यावेळी २७४ प्रशिक्षणार्थीना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी येत्या १७ सप्टेंबरपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी महायोजनादूत डॉट ओआरजी या संकेतस्थळावर अर्ज करावा, असं आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं केलं आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं उद्या धनखड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचंही धनखड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणीसह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्र शासनाच्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेतून कुशल कारागिरांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून या योजनेचा वर्षपूर्ती सोहळा येत्या २० सप्टेंबर रोजी वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. अमरावती इथल्या पीएम मेगा टेक्सटाईल पार्कची पायाभरणीही यावेळी आभासी पद्धतीनं होणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नियोजित सभास्थळाची पाहणी करून संपूर्�� तयारीचा आढावा घेतला.
पंतप्रधानांच्या या दौऱ्यात राज्यातल्या एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’ची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांचा समावेश आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी ही माहिती दिली.
****
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पारसी समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. पारसी समुदायाची लोकसंख्या ५० हजाराच्या खाली येऊ नये, यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, ‘भगवान बुद्ध यांच्या मध्यम मार्गाद्वारे भविष्यातील जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शन’ या विषयावरच्या एक दिवसीय संमेलनाला रिजिजू यांनी संबोधित केलं. भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चाललं तर जगाचं नेतृत्व करणं सोपं होईल, असा विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला.
****
कलाकारांनी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी दिला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन च्या सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सचिन सुप्रिया यांनी दिलखुलास उत्तरं दिली. सचिन यांच्या गाण्यानं कार्यक्रमाचा समारोप झाला.
****
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतानं पाकिस्तानवर २-१ अशी मात करत, या स्पर्धेतलं आपलं विजयी अभियान अबाधित ठेवलं. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज भारतीय संघाचे दोन्हीही गोल कर्णधार हरमनप्रितसिंहने केले. यंदाच्या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला भारत याआधीच उपांत्य फेरीत दाखल झालेला आहे. परवा १६ सप्टेंबरला उपांत्य सामने तर अंतिम सामना मंगळवारी १७ तारखेला होणार आहे. या स्पर्धेत यापूर्वी भारत चार वेळा अजिंक्य ठरला आहे.
****
खाद्यतेलाच्या आयातीवर २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादकांना अधिक किंमत मिळेल, असं पटेल यांनी म्हटलं आहे. रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर आयात शुल्क साडे बारा टक्क्यांवरून साडे ३२ टक्के करण्याच्या निर्णयाचंही पटेल यांनी स्वागत केलं आहे.
****
कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवल्यानं तसंच निर्यात शुल्क निम्म्यानं कमी केल्यामुळे आज नाशिक जिल्ह्यातील घा��क बाजारात प्रति क्विंटलचे दर ४०० ते ५०० रुपयांनी वधारले. आज लासलगाव बाजारात चांगल्या प्रतिच्या कांद्याला सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लोकशाही अधिक बळकट, सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्येकानं मतदान करण्याचं आवाहन अहमदनगरचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केलं आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात बेलगाव इथं ‘युवा संवाद’ कार्यक्रमात बोलत होते.
****
नांदेड पोलिसांनी आज नवीन नांदेड भागात दोघा जणांकडून तीन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसं जप्त केले. या कारवाईत ६४ हजाराचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. या प्रकरणात बलबीरसिंघ प्रतापसिंघ जाधव आणि शेख आदिल शेख शकील या दोघांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून येता २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्तानं येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा अभियान” राबवण्यात येणार असल्याची माहिती परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी दिली आहे. यावर्षीच्या अभियानासाठी “स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता” ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा बीड इथं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आलं.
****
0 notes
darshanpolicetime1 · 10 months ago
Text
चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर;पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
जळगाव,दि.16 (जिमाका वृत्तसेवा)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील , अतिरिक्त पोलीस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 1 year ago
Link
#स्वच्छता #ही #सेवा #मुख्यमंत्री #एकनाथ #शिंदे #यांनी #साधला #हिंगोली #जिल्ह्यातील #सरपंचांशी #संवाद #news #marmikmaharashtra
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
Maharashtra Cabinet Portfolio | ब्रेकिंग! अखेर खातेवाटप जाहीर; पाहा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कोणत्या मंत्र्याला मिळालं कोणतं खातं…
Tumblr media
Maharashtra Cabinet Portfolio | राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवा���पाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप (Maharashtra Cabinet Portfolio) जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर 26 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
- छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण - दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार •राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास - सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय - हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य - चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य - विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास - गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन - गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता - दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) - ��ंजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण - धनंजय पंडितराव मुंडे – कृषि - सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन - उदय रविंद्र सामंत- उद्योग - प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण - रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) - अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन - दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा - धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन - अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण - शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क - कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास - संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे - मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता - अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशनमधून पूर्ण करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, दि. 21 : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील शिरढोण (ता. पनवेल) येथील नळपाणीपुरवठा योजनेस सन 2017 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोरोना काळात ही योजना रखडली. आता ‘जलजीवन’मध्ये ही योजना समाविष्ट करण्यात आली असल्याची माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविणाऱ्यांना जलदूत पुरस्कारांनी सन्मानित करणार - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविणाऱ्यांना जलदूत पुरस्कारांनी सन्मानित करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
नंदुरबार, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा): राज्यातील सर्व गावांमधील पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, व अभियंत्यांना जलदूत पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज केले. नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या पाणीपुरवठा योजनांचा ई-भूमीपूजन सोहळा श्री.पाटील यांच्या हस्ते  येथील…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"...म्हणून शिवाजी पार्कवर भाषण करण्यास गुलाबराव पाटलांवर बंदी घातली" एकनाथ शिंदेंचा खुलासा, म्हणाले... | gulabrao patil ban to give speech on shivaji park cm eknath shinde statement in jalgaon rmm 97
“…म्हणून शिवाजी पार्कवर भाषण करण्यास गुलाबराव पाटलांवर बंदी घातली” एकनाथ शिंदेंचा खुलासा, म्हणाले… | gulabrao patil ban to give speech on shivaji park cm eknath shinde statement in jalgaon rmm 97
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावातील एका कार्यक्रमातून जोरदार टोलेबाजी केली आहे. दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. शिवसेना पक्षात असताना पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाय कसे ओढले जात होते, याचा खुलासाही त्यांनी केला आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना शिवाजी पार्कवरून भाषण करण्यास बंदी घातली होती, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' शब्द पूर्ण करणार ' रोहित पवारांनी घेतली गुलाबराव पाटलांची भेट
‘ शब्द पूर्ण करणार ‘ रोहित पवारांनी घेतली गुलाबराव पाटलांची भेट
राज्यात सत्ता बदल झाला असला तरी विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी यासाठी आपण सतत प्रयत्न करणार आहोत असे आमदार रोहित पवार यांनी याआधीच सांगितले असून कर्जत जामखेड तालुक्याच्या 177 गावांसाठी 225 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून 55 गावांमध्ये प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झालेली आहे. आमदार रोहित पवार यांनी उर्वरित गावातील कामांना वेग देण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
' शब्द पूर्ण करणार ' रोहित पवारांनी घेतली गुलाबराव पाटलांची भेट
‘ शब्द पूर्ण करणार ‘ रोहित पवारांनी घेतली गुलाबराव पाटलांची भेट
राज्यात सत्ता बदल झाला असला तरी विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी यासाठी आपण सतत प्रयत्न करणार आहोत असे आमदार रोहित पवार यांनी याआधीच सांगितले असून कर्जत जामखेड तालुक्याच्या 177 गावांसाठी 225 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून 55 गावांमध्ये प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झालेली आहे. आमदार रोहित पवार यांनी उर्वरित गावातील कामांना वेग देण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
चढता सुरज धिरे धिरे…! जेव्हा गुलाबराव पाटील कव्वाली गातात; सर्वांनाच केले मंत्रमुग्ध
चढता सुरज धिरे धिरे…! जेव्हा गुलाबराव पाटील कव्वाली गातात; सर्वांनाच केले मंत्रमुग्ध
चढता सुरज धिरे धिरे…! जेव्हा गुलाबराव पाटील कव्वाली गातात; सर्वांनाच केले मंत्रमुग्ध मुंबई – कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणारे ‘गुलाबराव पाटील’ हे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आहेत. गुलाबराव पाटील राज्यात जेव्हा पासून बंड झाले आहे तेव्हापासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत आहेत. आक्रमकपणा आणि धडाकेबाज वक्तव्य यांच्यामुळे त्यांची एक स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यातच आता त्यांचा एक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला आहे. दहा लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी केजरीवाल यांना कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करता येणार नाही तसंच कार्यालयात जाऊन कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर स्वाक्षरी करता येणार नाही या अटींवर जामीन मंजूर करण्यात आल्याचं न्यायालयानं दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम असल्याची बाब स्पष्ट झाली असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे.
****
काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भरतीय जनता पक्षातर्��े आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात चेंबूर इथं मूक आंदोलन तसंच, अकोल्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या  उपक्रमासाठी  आतापर्यंत एक लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार असून, या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी  www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातल्या जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी, कोल्हापूरच्या सीमा बायोटेक, आणि भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर, या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
****
लातूर जिल्ह्यात उद्यापासून दोन ऑक्टोबरपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. या अभियानाच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रभात फेरी काढून स्वच्छतेबाबत जनजागृती करावी असं आवाहनही घुगे यांनी केलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात जलसंधारणाच्या उकृष्ट कामगिरीबद्दल मोताळा तालुक्यातल्या शेलगाव ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा अटल भूजल योजनेंतर्गत सुरु असलेल्या भूजल ग्रामसमृद्ध स्पर्धेत बक्षिस मिळालं आहे. काल नाशिक इथं झालेल्या कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शेलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी हे बक्षिस स्वीकारलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नगरपालिकेतर्फे यावर्षी गणेश विसर्जनासाठी शहरात तीन कृत्र���म हौद तयार करण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी ही माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यात “एक पेड मां के नाम” या अभियानांतर्गत येत्या मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्याचे छायाचित्र मेरी लाईफ पोर्टलच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहन शासनातर्फे करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत राज्यात मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट आहे.
****
मनमाड - काचिगुडा अजिंठा एक्सप्रेस आता मनमाड स्थानकावरून दररोज रात्री आठ वाजून ४० मिनिटांनी म्हणजेच सध्याच्या वेळेपेक्षा दहा मिनिटं लवकर सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विविध कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. येत्या ११ नोव्हेंबर पर्यंत ही बंदी लागू असेल, असे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केले आहेत.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी दोन दरवाजे आज बंद करण्यात आले असून, विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या चार दरवाजातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 11 months ago
Text
विधानपरिषद लक्षवेधी 
आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकर देण्यास शासन सकारात्मक – मंत्री गुलाबराव पाटील नागपूर, दि. १५ : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती निवासी, अनिवासी आश्रमशाळांच्या शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकरच देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती…
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
' शब्द पूर्ण करणार ' रोहित पवारांनी घेतली गुलाबराव पाटलांची भेट
‘ शब्द पूर्ण करणार ‘ रोहित पवारांनी घेतली गुलाबराव पाटलांची भेट
राज्यात सत्ता बदल झाला असला तरी विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी यासाठी आपण सतत प्रयत्न करणार आहोत असे आमदार रोहित पवार यांनी याआधीच सांगितले असून कर्जत जामखेड तालुक्याच्या 177 गावांसाठी 225 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून 55 गावांमध्ये प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झालेली आहे. आमदार रोहित पवार यांनी उर्वरित गावातील कामांना वेग देण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
' शब्द पूर्ण करणार ' रोहित पवारांनी घेतली गुलाबराव पाटलांची भेट
‘ शब्द पूर्ण करणार ‘ रोहित पवारांनी घेतली गुलाबराव पाटलांची भेट
राज्यात सत्ता बदल झाला असला तरी विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी यासाठी आपण सतत प्रयत्न करणार आहोत असे आमदार रोहित पवार यांनी याआधीच सांगितले असून कर्जत जामखेड तालुक्याच्या 177 गावांसाठी 225 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून 55 गावांमध्ये प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झालेली आहे. आमदार रोहित पवार यांनी उर्वरित गावातील कामांना वेग देण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार
मुंबई :  शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत केले. या निर्णयामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes