#हिसकावून
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.09.2024  रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
देशभरात यंदा ११ कोटी चार लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी चार कोटी १३ लाख हेक्टर क्षेत्र भाताच्या पिकाखाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यंदा एक कोटी २८ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, एक कोटी ९२ लाख हेक्टरवर तृणधान्य, तर १ कोटी ९३ लाख हेक्टरवर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. ५७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसाची लागण झाली आहे.
****
राज्यातल्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्री समितीची बैठक झाली; त्यावेळी ते बोलत होते.
****
बदलापूरच्या खासगी शाळेतल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला वआरोपी अक्षय शिंदे काल पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. त्याला काल तळोजा कारागृहातून चौकशीसाठी ठाण्यात नेलं जात असताना, मुंब्रा बायपास इथं त्याने अचानक एका पोलिस अधिकाऱ्याचं रिव्हॉल्वर हिसकावून त्याच्यावर गोळीबार केला. यावेळी अन्य एका अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे. शिंदे याने दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याच्याविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते.
****
सर्वोच्च न्यायालयानं एका ऐतिहासिक खटल्यात लहान मुलांचं अश्लील साहित्य डाउनलोड करणं, पाहणं आणि साठवणं हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा असल्याच�� निर्णय दिला आहे. केवळ चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड करणे आणि पाहणे हा पॉक्सो कायदा आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा नसल्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत, सरन्यायाधीश डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील, खंडपीठानं हा निकाल दिला. यासोबतच संसदेला ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’ या शब्दाच्या जागी, ‘चाइल्ड सेक्शुअल एक्स्प्लो-इनटेटिव्ह अँड अब्यूज मटेरियल’ असा अध्यादेश आणण्याची सूचना देखील,  सर्वोच्च न्यायालयानं  केली आहे.
****
राज्यभरात राष्ट्रीय पोषण माह राबवला जात आहे. राज्यातल्या नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात एक लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्रांद्वारे यासंबंधी जनजागृती आणि अंमलबजावणी सुरू आहे. बालकं, गरोदर आणि स्तनदा महिलांपर्यंत लाभ पोहोचवला जात आहे. दररोज वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या सूचना राज्यातल्या अंगणवाडी केंद्रांना देण्यात आल्या आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे ही माहिती दिली.
****
येत्या दहा नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी, अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी अंतिम मुदत येत्या ३० तारखेपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती दिली. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, इतर तपशील राज्य परीक्षा परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
****
एमपीएससीच्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्य शासनाच्या कृषि सेवेतल्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या काल नवी मुंबईत बेलापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विविध संवर्गांच्या एकूण २७४ रिक्त पदांकरता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ ची जाहिरात गेल्या डिसेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर कृषी विभागतल्या २५८ पदांसाठीची मागणी आयोगाला मिळाली. शासनाच्या विनंतीनुसार या पदांचा समावेश त्याच परीक्षेत करण्यात आला असून आता येत्या एक डिसेंबरला पूर्व परीक्षा होणार आहे.
****
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काल आंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. सरकारने अद्यापही मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतला नसल्याचं सांगून त्यांनी सरकारवर टीका केली.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ��मदार बाबासाहेब पाटील यांनी, जरांगे यांच्या उपोषणाची दखल ��ेऊन तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
****
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसह विविध ग्राहकोपयोगी योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा यासाठी महावितरणद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.  महावितरणच्या परिमंडल कार्यालयात काल कर्मचाऱ्यांच्या वतीने पथनाट्याचा शुभारंभाचा प्रयोग करण्यात आला. या माध्यमातून योजना, योजनेमुळे ग्राहकांचा होणारा लाभ आणि योजनेत सहभाग घेतल्यास मिळणाऱ्या  अनुदानाची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात टिप्पर उलटून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे मजूर खामगाव तालुक्यातल्या वाडी इथले रहिवासी होते.
****
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
sanjay-ronghe-things · 2 years ago
Text
सासू सुनेची आई
कशी होईल सासूतिच्या सुनेची हो आई ।मधे दोघींच्या तर आहेखोल किती ती खाई । आई मायेची पाखरगोड किती ती साखर ।सासू कडू लिंबाचे पानकशी भासते ती प्रखर । भांडे सासा सूना दोघीलोक आजूबाजूचे बघी ।होई शब्दा शब्दात वादनाते नसेल असे जगी । भाव आईचा कसा बघानेला हिसकावून पोरगा ।प्रेम किती तिच्या अंतरातवाटे केला सूनेनेच दगा । सून कशी ती बिचारीजीव लावते नवऱ्यावरी ।गोंधळ होतो हो आईचाप्रेम तिचे मुलावर भारी ।Sanjay…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचं थैमान; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Tumblr media
मुंबई | राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, बदलापूरसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गहू, हरभरा, मका हे पीक जमीनदोस्त झाले असून, सोंगणीला आलेल्या या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास पुन्हा अस्मानी संकटाने हिसकावून घेतला आहे. जिल्ह्यामध्ये सर्व दूर काल सायंकाळ पासून काही ठिकाणी जोराचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतात असलेल्या गहू, चना, संत्रा, आंबा पिकाचं नुकसान झालं आहे. तसेच उकाड्यापासून त्रस्त शहरातील नागरिकांना पावसाने दिलासा, असं चित्रही पाहायला मिळालं. जळगाव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. रब्बी पिकांचं नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. महत्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
काँग्रेसचा ऐतिहासिक विजय | कसब्यात 28 वर्षांनी घडला नवा इतिहास; भाजपचा बालेकिल्ला ढासळला
भाजपचा पारंपरिक मतदारसंघ काँग्रेसनं घेतला हिसकावून कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय पुणे: पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलेल्या आणि चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
प्रेमी युगलाचे प्रवासात बिनसले; प्रेयसीने गाठले ठाणे, पोलीसाची बंदूक हिसकावून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
प्रेमी युगलाचे प्रवासात बिनसले; प्रेयसीने गाठले ठाणे, पोलीसाची बंदूक हिसकावून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
प्रेमी युगलाचे प्रवासात बिनसले; प्रेयसीने गाठले ठाणे, पोलीसाची बंदूक हिसकावून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न Agra News : बिहार येथील युवकाचे पश्��िमी बंगाल येथील युवतीशी मैत्री झाली. काही दिवसांनी मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवले. दोघेही बंगाल येतून पळून अहमदाबाद येथे जात होते. मात्र, या प्रवासात दोघांमध्ये वाद झाला. Agra News : बिहार येथील युवकाचे पश्चिमी…
View On WordPress
0 notes
wegwannews · 3 years ago
Text
Breking News : नाशिकच्या महाराष्ट्र बँकेबाहेरुन महिलेच्या हातातून बॅग हिसकावून चोर पसार ! तब्बल एवढ्या लाखांची चोरी...
Breking News : नाशिकच्या महाराष्ट्र बँकेबाहेरुन महिलेच्या हातातून बॅग हिसकावून चोर पसार ! तब्बल एवढ्या लाखांची चोरी…
नाशिक l नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारीने हैदोस घातलेला मागील चोरीची घटना ताजी असतांनाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेहरू गार्डन परिसरात 50 वर्षीय महिलेच्या हातातून पैशांनी भरलेली बॅग हिसकावून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सविस्तर वृत्त असे की, 50 वर्षीय महिला नेहरू गार्डन जवळ असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून पेन्शनचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
मॉर्निग वॉक करणाऱ्या वृध्द महिलेचा गळा दाबून मंगळसूत्र लंपास
मॉर्निग वॉक करणाऱ्या वृध्द महिलेचा गळा दाबून मंगळसूत्र लंपास
डोंबिवली : पश्चिमेकडील देवी चौक परिसरात काल सकाळच्या सुमारास एक 85 वर्षीय वृद्ध महिला मॉर्निंग वॉक करत होती . यादरम्यान एक चोरटा तिचा पाठलाग करत काही अंतरावरच एकांत असल्याचे संधी साधत या वृद्ध महिलेचे तोंड व गळा दाबून जमिनीवर पाडून तिच्या गळ्यातील 40 हजार किमतीचा मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता . या घटनेत जखमी झालेल्या वृद्ध महिलाने याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकरणात दिल्लीतील राज्यकर्त्यांच्या इच्छेपुढे नतमस्तक झाले जयंत पाटल यांचा msr 87
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकरणात दिल्लीतील राज्यकर्त्यांच्या इच्छेपुढे नतमस्तक झाले जयंत पाटल यांचा msr 87
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “नुकताच सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या हातातून हिसकावून घेतला गेला. फॉक्सकॉन’चा प्रोजेक्ट जर महाराष्ट्रात आला असता, तर इतर कंपन्यांनीही प्रोत्साहित होऊन त्यांचे प्रोजेक्ट आपल्या राज्यात आणण्यासाठी इच्छा व्यक्त केली असती. परंतु मुख्यमंत्री हे दिल्ली��्वरांच्या इच्छेपुढे नमले.” असं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
VIDEO: Live News...आणि कुत्रा महिला रिपोर्टरच्या हातातून माइक हिसकावून पळून गेला
VIDEO: Live News…आणि कुत्रा महिला रिपोर्टरच्या हातातून माइक हिसकावून पळून गेला
ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मजेदार बातमीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 10 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 7.5 दशलक्षाहून अधिक म्हणजेच 75 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 81 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. लाईव्ह न्यूजमध्ये महिला रिपोर्टरच्या हातातील माईक हिसकावून कुत्रा पळाला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter सामाजिक माध्यमे पण रोज हजारो प्रकार व्हिडिओ व्हायरल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
पोलिसाच्या डोक्यात दगड घालून फरार झालेले ' तिन्ही ' जण धरले , सीसीटीव्हीमध्ये झाले होते कैद
पोलिसाच्या डोक्यात दगड घालून फरार झालेले ‘ तिन्ही ‘ जण धरले , सीसीटीव्हीमध्ये झाले होते कैद
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात मुलींची छेड काढून त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेऊन त्यांना मदत करण्यासाठी म्हणून गेलेल्या पोलिसाला दमदाटी करत मारहाण करण्याचा प्रकार गोगाबाबा टेकडी परिसरात उघडकीला आला होता . बेगमपुरा पोलिसांनी कारवाई करत या घटनेतील मारहाण करणाऱ्या तिन्ही जणांची ओळख पटली असून त्यांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. उपलब्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
“हनुमानाने उद्धव ठाकरेंना शाप दिला म्हणूनच धनुष्यबाण गोठवण्यात आलं”
Tumblr media Tumblr media
मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरलं होतं. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा अट्टहास केल्यानंतर राणा दांपत्याला अटक देखील झाली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण गोठवल्यानंतर रवी राणांनी हनुमान चालिसाचा संदर्भ देत टीका केली आहे. आम्हाला 14 दिवस तुरूंगात टाकलं. आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, असं रवी राणा म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला. त्यामुळे प्रभू श्रीरामांनी उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावून घेतला, असा खोचक टोला रवी राणांनी लगावला आहे. दरम्यान, हनुमानाने उद्धव ठाकरेंना हा शाप दिलाय. म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलंय. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेला विरोध केला त्याचीच त्यांना सजा मिळाली, असंही रवी राणा म्हणाले आहेत. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
तिरोडा बुद्ध विहाराजवळ मोबाइल हिसकावून पळून गेलेला आरोपी अटकेत
तिरोडा बुद्ध विहाराजवळ मोबाइल हिसकावून पळून गेलेला आरोपी अटकेत
तिरोडा, दि.28 : फिर्यादी आपल्या मित्रासह नाश्ता करण्यासाठी तिरोडा-खैरलांजी रोडवरील बुद्ध विहाराकडे पायी जात होता. त्यावेळी अचानक आरोपी आपल्या मित्रासोबत मोटार सायकलवर आला व फिर्यादीचा मोबाइल हिसकावून पळून गेला. ही घटना सोमवार, 27 सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणातील आरोपीला तिरोडा पोलिसांनी आज अटक केली आहे. सविस्तर असे की, फिर्यादी साहिल तुकाराम सोनेवाने (वय 17) रा. महात्मा फुले वॉर्ड तिरोडा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
LSG vs KKR : ९ मॅचनंतर संधी मिळालेल्या एव्हिन लुईसनचा झेल ठरला ‘टर्निंग पॉइंट’; केकेआरकडून सामना घेतला हिसकावून
LSG vs KKR : ९ मॅचनंतर संधी मिळालेल्या एव्हिन लुईसनचा झेल ठरला ‘टर्निंग पॉइंट’; केकेआरकडून सामना घेतला हिसकावून
LSG vs KKR : ९ मॅचनंतर संधी मिळालेल्या एव्हिन लुईसनचा झेल ठरला ‘टर्निंग पॉइंट’; केकेआरकडून सामना घेतला हिसकावून बुधवारी रात्री केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा २ धावांनी पराभव केला. या विजयासह लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला. लखनऊच्या या विजयात रिंकू सिंह संघासाठी अडसर ठरत होता. पण एव्हिन लुईसने आपल्या शानदार क्षेत्ररक्षणातून त्याला…
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
पोलिसाच्या डोक्यात दगड घालून फरार झालेले ' तिन्ही ' जण धरले , सीसीटीव्हीमध्ये झाले होते कैद
पोलिसाच्या डोक्यात दगड घालून फरार झालेले ‘ तिन्ही ‘ जण धरले , सीसीटीव्हीमध्ये झाले होते कैद
काही दि��सांपूर्वी औरंगाबाद शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात मुलींची छेड काढून त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेऊन त्यांना मदत करण्यासाठी म्हणून गेलेल्या पोलिसाला दमदाटी करत मारहाण करण्याचा प्रकार गोगाबाबा टेकडी परिसरात उघडकीला आला होता . बेगमपुरा पोलिसांनी कारवाई करत या घटनेतील मारहाण करणाऱ्या तिन्ही जणांची ओळख पटली असून त्यांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. उपलब्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
पोलिसाच्या डोक्यात दगड घालून फरार झालेले ' तिन्ही ' जण धरले , सीसीटीव्हीमध्ये झाले होते कैद
पोलिसाच्या डोक्यात दगड घालून फरार झालेले ‘ तिन्ही ‘ जण धरले , सीसीटीव्हीमध्ये झाले होते कैद
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात मुलींची छेड काढून त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेऊन त्यांना मदत करण्यासाठी म्हणून गेलेल्या पोलिसाला दमदाटी करत मारहाण करण्याचा प्रकार गोगाबाबा टेकडी परिसरात उघडकीला आला होता . बेगमपुरा पोलिसांनी कारवाई करत या घटनेतील मारहाण करणाऱ्या तिन्ही जणांची ओळख पटली असून त्यांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. उपलब्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes