#सेवानिवृत्ती
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
होमगार्ड, कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांना मानधन वाढ, देशी गाईला राज्यमाता दर्जा देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
२०२३ च्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला सुरुवात
विशेष शिक्षकांच्या पावणे पाच हजारांहून अधिक पदांची निर्मिती, तसंच परळी तालुक्यात तीस हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट उभारण्यात येणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात
आणि
भारत-बांगलादेश कानपूर कसोटी रंगतदार वळणावर 
****
राज्यातले होमगार्ड, कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांना मानधन वाढ, तसंच विशेष शिक्षकांच्या पावणे पाच हजारांहून अधिक पदांची निर्मिती आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचे निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली.
होमगार्डला मिळणारा कर्तव्य भत्ता ५७० रुपयांवरुन एक हजार ८३ रुपये होईल. कोतवालांना मानधनात १० टक्के वाढ आणि अनुकंपा धोरण, तर ग्राम रोजगार सेवकांना आता सात हजार रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. याशिवाय विशेष शिक्षकांच्या ४ हजार ८६० पदांची निर्मिती, तसंच राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीचं सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख होणार आहे.
****
देशी गाईला राज्यमाता हा दर्जा देण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. गोशाळांना देशी वंशाच्या गायीसाठी प्रति गाय- प्रति दिन ५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सदर योजना कायमस्वरूपी असून या योजनेमुळे गोशाळांवरचा आर्थिकभार कमी होईल, असा विश्वास पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
**
२०२३ च्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला काल या बैठकीतून प्रारंभ करण्यात आला. पाच हजार रुपये प्रति हेक्टर, याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.
यामध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या तीन लाख ७१ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, ई-पीक पाहणी न केलेले आणि सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद नसलेले साधारणपणे पाच टक्के शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत, त्यांनाही अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.
**
लातूर जिल्ह्यातल्या हासाळा, उंबडगा, पेठ आणि कव्हा, इथल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामाला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात तीस हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट तर नाशिक जिल्ह्यात मालेगाव जवळ सुमारे सहा हेक्टर क्षेत्रात डाळिंब इस्टेट उभारण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी ९८ कोटी रुपये निधीची तरतूद केल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं काल स्वीकारला.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. २६ सप्टेंबरला सुमारे ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींच्या खात्यात एकूण पाच हजार ८४८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अन्य योजनांचा आनंद सोहळा येत्या सात ऑक्टोबरला नांदेडमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी पवार यांच्या हस्ते उदगीर शहरातल्या विविध शासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून घेतल्या जाणार आहेत. या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. हे नेते एक ते आठ ऑक्टोबरपर्यंत आपल्या��ा नेमून दिलेल्या जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील आणि १० ऑक्टोबरपर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करणार आहेत.
****
शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देणार्या ‘हर घर दुर्गा’ अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाला. देशातल्या तरुणींमध्ये दुर्गासारखी शक्ती आणि सामर्थ्य येवुन अन्याय आणि अत्याचाराला प्रतिकार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे अभियान नक्कीच मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास बिर्ला यांनी व्यक्त केला. कौशल्य विकास मंत्री मंलग प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचं शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला.
****
भारत-बांगलादेश कसोटी रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे. पहिल्या सुमारे तीन दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर, काल चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. भारतीय संघानं जलद धावा करत ३५ षटकांत ९ बाद २८५ धावांवर डाव घोषीत केला. यशस्वी जयस्वालनं ७२, तर के एल राहुलनं ६८ धावा केल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशच्या दुसऱ्या डावात दोन बाद २६ धावा झाल्या होत्या. बांगलादेश अजूनही २६ धावांनी पिछाडीवर आहे.
****
जागतिक तीरंदाजी महासंघातर्फे चायनीज तैपेई इथं घेण्यात आलेल्या आशियाई तीरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचा धनुर्धर रैयान सिद्दिकी यानं सुवर्ण पदक जिंकलं आहे. यामुळे तो आशियाई धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारा मराठवाड्यातला पहिला धनुर्धर ठरला आहे. काल ज्युनियर रिकर्व्ह प्रकाराच्या अंतिम सामन्यात यजमान चायनीज तैपेई संघाला नमवत भारतीय संघानं विजेतेपद पटकावलं.
****
जालना इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दुसऱ्या सुनावणीत चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करता १०० जागेची मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय कला जारी करण्यात आला. जालना जिल्ह्यातल्या सर्वांसाठी आरोग्य सेवेतली महत्वाची बाब म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मैलाचा दगड ठरेल, असं मत जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केलं आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागातल्या नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्याच्या निवडणूक नोडल अधिकारी आणि प्रशिक्षण अधिकाऱ्यांची कार्यशाळा काल नांदेडमध्ये घेण्यात आली. मतदानाची टक्केवारी वाढवणं हे निवडणूक ��योगाचं पहिलं उद्दीष्ट असल्याचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याकार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात किल्लारी इथल्या भूकंपाला काल ३० वर्ष पूर्ण झाली. धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या सास्तूर चौरस्ता इथं काल या भूकंपात प्राण गमावलेल्या नागरीकांना सामुहिक आदरांजली अर्पण करण्यात आली. आमदार ज्ञानराज चौगुले यांची यावेळी प्रमुख उपस्थित होती.
****
तारांगण, ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याला या वर्षी शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं जागतिक स्तरावर ‘शंभर तास खगोलशास्त्र-तारांगणाची शंभर वर्षं‘ हा उपक्रम आयोजित केला आहे. यात जगभरातल्या चार हजार तारांगणांचा सहभाग राहणार असून, यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशनच्या डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम खगोल अंतराळविज्ञान केंद्राचा समावेश आहे. या उपक्रमानिमित्त या केंद्रात येत्या दोन ते सहा ऑक्टोबर या कालावधीत अंतराळ विज्ञान विषयक माहितीपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर, हिमायतनगर आणि धर्माबाद इथं आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या तालुक्यांमधल्या पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यांना उपस्थित रहावं, असं आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केलं आहे.
****
0 notes
gajananjogdand45 · 8 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/patals-ramdasi-poem-shamla-election-conundrum/
0 notes
sajagbharat · 1 year ago
Text
शिरुरचे पोलीस उपनिरीक्षक श्री.डुकले साहेब  यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार कार्यक्रम संपन्न  ! https://www.shirurvarta.in/?p=11787
Tumblr media
0 notes
secretofmoney · 1 year ago
Text
0 notes
loksutra · 3 years ago
Text
ऍशलेघ बार्टीची निवृत्ती: श्वास किंवा तणाव जाणवणे
ऍशलेघ बार्टीची निवृत्ती: श्वास किंवा तणाव जाणवणे
मनीषकुमार जोशी सुनील गावसकर जेव्हा निवृत्त झाले होते, तेव्हा असे म्हटले जात होते की खेळाडू जेव्हा त्याच्या शीर्षस्थानी असतो तेव्हा त्याने खेळाचा निरोप घ्यावा. त्यांच्या निवृत्तीनंतर लोक त्यांना परत येण्याची विनंती करतील. जेव्हा एखाद्या खेळाडूने गेममधून माघार घ्यावी तेव्हा ही परिस्थिती असते. क्रिकेट हे व्यावसायिक नसताना गावस्कर यांनी हे विधान केले होते. आज क्रिकेटपटू वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years ago
Photo
Tumblr media
सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांना निरोप सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयातर्फे त्यांना निरोप देण्यात आला.
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
राजू काकडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार
राजू काकडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार
अर्जुनी-मोरगाव : स्थानिक सरस्वती विद्यालयाचे गणित शिक्षक राजू विष्णुपंत काकडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल मंत्री होते. या वेळी प्रामुख्याने संस्थाध्यक्ष डॉ.वल्लभदास भुतडा, जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वीणा नानोटी, शाळेच्या पर्यवेक्षिका छाया घाटे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
ग्रंथपालांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यास मान्यता
ग्रंथपालांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यास मान्यता
राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत असलेल्या सर्व शासन व शासन अनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि रसायन तंत्रज्ञान संस्थेतील ग्रंथपालांच्या सेवानिवृत्तीचे वय 1 जानेवारी 2006 पासून पूर्वलक्षी प्रभावाने 58 वरुन 60 वर्षे करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
ग्रंथपालांचे सेवानिवृत्तीचे वय 1…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 14 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दि��ांक – १४ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना संप मागं घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
'मागेल त्याला शेततळे' योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार - कृषी मंत्री धनंजय मुंडे
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं यासाठी राज्य सरकार शिफारस करेल- मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत माहिती
आणि
केंद्र सरकारच्या दुष्काळ मूल्यांकन पथकाकडून जालना, बीड जिल्ह्यात पाहणी
****
जुन्या सेवानिवृत्ती योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पुकारलेला संप मागं घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर इथं हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत एका निवेदनाद्वारे केलं. जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या सुबोधकुमार समितीच्या शिफारसी विचारात घेतल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले -
निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मुळ तत्वावर शासन ठाम आहे. प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल. सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अहवालात घेण्यात येईल. मी सदनास ग्वाही देवू इच्छितो की संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे. त्यामुळे संघटनेने सुरू केलेला संप त्वरीत मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करत आहे. धन्यवाद.
****
जुन्या सेवानिवृत्ती योजनेबाबत शासन सकारात्मक असून विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज विधानपरिषदेत दिली. जुन्या सेवानिवृत्ती योजनेबाबत समितीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यावर संघटनांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरात बातमीदारांना सांगितलं. सरकारी कर्मचाऱ्यांनी या मागण्यांसाठी पुकारलेला संप मागं घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. सायबर गुन्हांना आळा घालण्यासाठी राज्यात पोलीस दलातल्या एक हजार तज्ज्ञांचा ई-फोर्स तयार केला जाईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिली.
****
राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी, शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचारी आजपासून ��ेमुदत संपावर आहेत. जुनं सेवा निवृत्तीवेतन योजना लागू करावी या मुख्य मागणीसह अनेक मागण्यांसाठी हा संप आहे. संपाचा ठिकठिकाणच्या कामकाजावर परिणाम झाला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं पुकारलेल्या या संपाला पाठिंबा देण्यासाठी आज शासकीय अधिकारी महासंघानंही एकदिवसीय रजा घेवून काम बंद आंदोलन केलं.
****
'मागेल त्याला शेततळे' या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली. या योजनेतल्या प्रलंबित आणि रद्द झालेल्या अर्जांबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीनं मराठवाडा, विदर्भासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याचं मंत्री मुंडे यांनी सांगितलं.
****
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं यासाठी राज्य सरकार शिफारस करेल, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत सांगितलं. याबाबत सदस्य सुनील कांबळे, मोहनराव हंबर्डे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी पाटील बोलत होते. मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन करण्यात आला होता. या आयोगाच्या ६८ शिफारशींची शासनाकडून अंमलबजावणी सुरू असल्याचं मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध निर्णय, कायदे, विधेयकांवर पक्ष विरहित वैचारिक चर्चा घडवून आणण्यात राज्य विधीमंडळ हे संसदीय परंपरेत उच्चस्थानी असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. त्यांनी आज नागपूर इथं 'द्वी सभागृह पद्धतीमध्ये परस्परातील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचं महत्त्वपूर्ण योगदान' या विषयावर राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात मार्गदर्शन केलं, त्यावेळी दानवे बोलत होते.
****
विरोधी पक्षांचे लोकसभेतले चौदा खासदार आणि राज्यसभेतल्या एका खासदाराचं आज सभागृहातल्या बेशिस्त वर्तनासाठी हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं. दुपारच्या सत्रात प्रारंभी लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसच्या पाच खासदारांना त्यांच्या वागणुकीनं सभागृहाची अवहेलना केल्याबद्दल निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. निलंबित करण्याचा प्रस्ताव आवाजी मतदानानं स्वीकारण्यात आला. त्यानंतर दिवसभरात आणखी नऊ खासदारांना त्यांच्या बेशिस्त वर्तनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. राज्यसभेत तृणमुल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ'ब्रायन यांना त्यांच्या बेशिस्त वर्तनासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीपर्��ंत निलंबित करण्यात आलं.
****
पुण्यातल्या एसपी महाविद्यालयात आज झालेल्या सर्वात मोठ्या वाचन उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. या उपक्रमांतर्गत ३०६६ पालक कथाकथनाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी पाल्यांसह या वाचन उपक्रमात सहभागी झाले होते. नॅशनल बूक ट्रस्टनं या उपक्रमाचं आयोजन केलं होतं.
****
केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकानं आज जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या डावरगाव, वलखेडा, पांगरखेडा, ताडहादगाव तसंच मंठा तालुक्यातल्या काही गावांमध्ये पाहणी केली. यावेळी पथकानं कपाशी, तूर पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. खडकेश्वर तलावातल्या पाणी स्थितीचीही पथकानं पाहणी केली. बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहिर झाला असून त्या अनुषंगानंही, केंद्राचं दुष्काळ मूल्यांकन पथकं आज बीड जिल्ह्यातील १३ गावांना भेट देऊन पाहणी करत आहे.
****
ठिकठिकाणी सुरू विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आज नांदेड तालुक्यातल्या गंगाबेट इथं ग्रामस्थांनी यात्रेचं उत्साहात स्वागत केलं. नांदेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. बी. कांबळे यांनी यावेळी योजनांची माहिती दिली. विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर मधल्या सिडको परिसरात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. नागरिकांनी यावेळी आत्मनिर्भर योजना, आरोग्य योजना, घरकुल योजना, टपालाच्या योजना जाणून घेतल्या. विकसित भारत संकल्प यात्रा आज लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जनजागृती करत आहे. या उपक्रमाच्या उपयुक्ततेसदर्भात लाभार्थ्यांनी आकाशवाणीकडे आपली मतं नोंदवली.
बाईट - उषा भोसले, लातूर आणि सोनल रामणे, रत्नागिरी
****
छत्तीसगडमधल्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यातल्या बोधीटोला गावाजवळ झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी आज दोन नक्षलवाद्यांना ठार केलं. यातल्या एका नक्षलवाद्याचं नाव दुर्गेश वट्टी असं असून तो कसनसूर दलमचा उपप्रमुख होता.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू विविध उपक्रमांची आज सांगता झाली. त्यानिमित्त संत एकनाथ रंगमंदिर इथं सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कनिष्ठ अभियंता पूजा भोगे यांनी भरतनाट्यम् सादर केलं तर महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांनी समहू नृत्य, एक पात्री प्रयोग, लावणी सादर करुन उपस्थितांची मनं जिंकली.
****
भारत आणि दक्षिण अ��्रिका यांच्यातील तीन टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळवला जाणार आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघाला यात विजय मिळवणं आवश्यक आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे आठ वाजता हा सामना सुरू होईल.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा
मुंबई, दि. 17 :��� जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना रुपांतरीत नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने अधिसंख्य पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतन/भत्ते व सेवानिवृत्ती वेतनासाठी जिल्हा परिषदांना अनुदान उपलब्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा
मुंबई, दि. 17 :– जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना रुपांतरीत नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने अधिसंख्य पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतन/भत्ते व सेवानिवृत्ती वेतनासाठी जिल्हा परिषदांना अनुदान उपलब्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील…
View On WordPress
0 notes
uttarakhandtodaysblog · 3 years ago
Text
सीनियर चीफ इंजीनियर अयाज अहमद को मिली बड़ी जिम्मेदारी, आदेश जारी...
सीनियर चीफ इंजीनियर अयाज अहमद को मिली बड़ी जिम्मेदारी, आदेश जारी…
देहरादून: राज्य में विकास के पैरामीटर सेट करने वाली सबसे बड़ी कार्यदाई संस्था लोक निर्माण विभाग (PWD) में नए विभागाध्यक्ष यानी HOD की नियुक्ति के आदेश जारी कर दिए गए है।  सीनियर चीफ इंजीनियर अयाज अहमद को ये जिम्मेदारी सौंपी गई है। राज्यपाल की स्वीकृति के बाद जिसके आदेश जारी किए गए है। मीडिया रिपोर्टस के अनुसार लोक निर्माण विभाग में विभागाध्यक्ष का पद संभाल रहे इंजीनियर हरिओम शर्मा की सेवानिवृत्ती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
ऍशलेघ बार्टी जागतिक नंबर 1 टेनिस स्टार सानिया मिर्झाने अचानक निवृत्ती जाहीर केली पोस्टवर प्रतिक्रिया असं सानिया मिर्झाने सांगितलं
ऍशलेघ बार्टी जागतिक नंबर 1 टेनिस स्टार सानिया मिर्झाने अचानक निवृत्ती जाहीर केली पोस्टवर प्रतिक्रिया असं सानिया मिर्झाने सांगितलं
जगातील अव्वल क्रमांकाची महिला टेनिसपटू Ashleigh Barty हिने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूने बुधवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि जड अंतःकरणाने टेनिसला अलविदा केला. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झानेही त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हा निर्णय धक्कादायक आहे कारण यावेळी अॅशलेग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
EPFO ची केंद्रीय प्रणाली; एकाच वेळी लाखो पेन्शनधारकांना फायदा, जाणून घ्या सविस्तर
EPFO ची केंद्रीय प्रणाली; एकाच वेळी लाखो पेन्शनधारकांना फायदा, जाणून घ्या सविस्तर
EPFO ची केंद्रीय प्रणाली; एकाच वेळी लाखो पेन्शनधारकांना फायदा, जाणून घ्या सविस्तर EPFO Update: सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) २९ आणि ३० जुलै रोजी होणार्‍या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करेल आणि मंजूर करेल, ज्यामुळे भारतभर ७३ लाखांहून अधिक पेन्शनधारकांच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळी लाभ जमा करण्याचा मार्ग मोकळा…
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years ago
Photo
Tumblr media
सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांना निरोप सिंधुदुर्गनगरी : जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर हे नियत वयोमानाने दिनांक ३१ जुलै २०१९ रोजी निवृत्त होत आहेत.
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
तालुक्याचा खरा कोरोना योद्धा वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम; सेवानिवृत्ती कार्यक्रमात आ.विजय रहांगडाले यांचे प्रतिपादन
तालुक्याचा खरा कोरोना योद्धा वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम; सेवानिवृत्ती कार्यक्रमात आ.विजय रहांगडाले यांचे प्रतिपादन
तिरोडा : दोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाने मोठा कहर केला होता. त्यावेळी लोकांचे कसे हाल झाले होते, हे सर्वांना माहीत आहे. तिरोडा तालुक्यालाही कोरोनाने ग्रासले होते. अशा कठीण परिस्थितीत आरोग्य सुविधा राबविण्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम यांनी खूप परिश्रम घेतले. कोविड परिस्थितीशी झुंज देण्यासाठी त्यांनी अत्यंत आधुनिकरित्या तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला अद्यावत करून घेतले. खाटांची व्यवस्था…
Tumblr media
View On WordPress
0 notes