#अर्थकारण
Explore tagged Tumblr posts
Text
Ajit Doval : दहशतवादाचे अर्थकारण रोखण्याची गरज – अजित डोवाल
Ajit Doval : दहशतवादाचे अर्थकारण रोखण्याची गरज – अजित डोवाल
Ajit Doval : दहशतवादाचे अर्थकारण रोखण्याची गरज – अजित डोवाल नवी दिल्ली – दहशतवादाला रोखण्यासाठी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांचे अर्थसहाय्य रोखायला पाहिजे, या मुद्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भर दिला आहे. भारत आणि मध्य आशियातील देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सीमेपलिकडील…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
रेल्वे तिकिटांचं आरक्षण आता १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी करता येणार आहे. भारतीय रेल्वे विभागानं आजपासून, म्हणजेच १ नोव्हेंबरपासून हा बदल लागू केला आहे. काल ३१ ऑक्टोबरपर्यंत आरक्षित केलेल्या तिकिटांमध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात येणार नाही. विदेशी पर्यटकांना रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, अर्थात १ वर्ष आधी आरक्षित करावी लागतात. यातही कोणताच बदल करण्यात आलेला नाही. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, प्रवाशांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार, पद्मश्री विवेक देबरॉय यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांना हटवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर, देबरॉय यांनी सप्टेंबर महिन्यात कुलपतीपदाचा राजीनामा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्व होतं. अर्थकारण, इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविध विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाची ध्येयधोरणं ठरवण्यात ते पारंगत होते, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, हरयाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांचा आज स्थापना दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही राज्यातल्या नागरिकांना सामाजिक माध्यमांवरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२ रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. विमानाचं इंधन, म्हणजेच ATF च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतले माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं आज पुन्हा म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, अ���ं सरवणकर यांनी सांगितलं.
****
शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावं, त्यातलं आर्द्रतेचं प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची, तसंच ते सोयाबीन एफ-ए-क्यू दर्जाचं असल्याची खात्री करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केलं आहे. विक्रीकरिता आणलेलं सोयाबीन जास्त आर्द्रतेमुळे परत नेण्याची वेळ येऊ नये, यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमान्यता परिषद-नॅकच्या वतीनं काल अपेक्षित गुणनिकष पूर्ण केल्याबद्दल 'ए-प्लस' मानांकन जाहीर करण्यात आलं आहे. मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात असून, आगामी काळात देखील विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करू अशी भावना, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी व्यक्�� केली आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडीयमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत न्युझीलंडच्या तीन बाद १२५ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर हवामान कोरडं राहील, असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळी, तर सांगलीत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी आज सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे.
****
0 notes
Text
कार्यकर्ते कमी अन मनधरणी करणारेच झाले जास्त , नगरमध्ये काय चाललंय ?
निवडणुका जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या वेगवेगळ्या पक्षात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनाच अच्छे दिन आल्याचे नगर शहरात दिसून येत आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर या गटातून त्या गटात दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांची देखील संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे त्या पाठीमागे मोठे अर्थकारण असल्याची देखील शहरात चर्चा आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार…
0 notes
Text
छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन! शंभू राजांना राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्म, भाषा आदी विषयांचे ज्ञान होते. महापराक्रमी योद्धा, दूरदर्शी शासनकर्ते, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाच��� मुजरा
0 notes
Text
Article on Economy of Ganesh Festival in Maharashtra.
महाराष्ट्रातील गणेश उत्सवाचे अर्थकारण काय आहे? https://www.shirurvarta.in/?p=11250
#tumblr milestone#think about it#think for yourselves#writer things#1 year tumblrversary#desi things#girly things#stranger things#thinking#male thinspi
0 notes
Text
#कुठं_नेऊन_ठेवलाय
#महाराष्ट्र_माझा
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय ?
#राजकारण
#विकासकारण
#सत्ताकारण #अर्थकारण
काहीही घडत असलं तरी भरडला जातो सामान्य माणूसचं!!
#rajkaran #bjp #ncp #shivsena #mns #congress
0 notes
Text
'म्हणून' जात आहेत सहकारी संस्था रसातळाला...
महेश पवार : महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं प्रस्थ मोठं आहे, पण या क्षेत्रावर पूर्वी काँग्रेस आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा वरचष्मा आहे. आजही ग्रामीण भागात सहकार क्षेत्र महत्त्वाचं मानलं जातं. ग्रामीण भागातील राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण सहकार क्षेत्राभोवतीच फिरताना दिसतं. पूर्वी सर्वोच्च शिखरावर असलेल्या सहकार क्षेत्राचं चित्र गेल्या 15-20 वर्षांत बदलून गेलं. यात अनेक गैरव्यवहार…
View On WordPress
0 notes
Text
Dreamers And Doers
रोजच्या रहाटगाडग्यात पिसलेला तो एका बेसावध क्षणी जागो होतो. उघड्या डोळ्यांनी एक स्वप्न पाहतो. स्वप्नाला स्वप्न जोडत धाडसी स्वप्नाळूंची एक टोळी जमते आणि सुरु होतो स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा थरारक, रोमहर्षक प्रवास
ड्रीमर्स अॅन्ड डूअर्स वाचताना आपण लेखकासोबत गाडीवर मागे बसून या प्रवासाचे भागीदार होतो. येतील ती आव्हानं वरदान म्हणून झेलतो, पेलतो, समृद्ध होतो. सात देशांचा इतिहास, भुगोल, वर्तमान, निसर्ग, अर्थकारण, समाजकारण, अवस्था, व्यवस्था, राहणीमान, खानपान… याची देही याची डोळा अनुभवतो. आजूबाजूच्या जगण्याकडं डोळसपणे पाहत त्या त्या भागातील माणसांच माणूसपण काळजात साठवतो.
फिरण्याचा, जगण्याचा अन् जगाकडं पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन, नवी उर्मी, नवा आत्मविश्वास देणारं… स्वप्नपूर्तीची दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत करणारं आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मोहीमांचे स्वप्न पाहणारांना उत्तम मार्गदर्शन करणारं आवर्जून वाचावं असं पुस्तक !
Dreamers And Doers
Price: Rs 399
0 notes
Text
पोल्ट्री उद्योगाचे ' असे ' होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
पोल्ट्री उद्योगाचे ‘ असे ‘ होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
आषाढ महिन्याची सुरुवात झाली की नॉनव्हेज खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते कारण त्यानंतर येणारा श्रावण यामध्ये बहुतांश हिंदू बांधव नॉनव्हेज खात नाहीत. नॉन व्हेज खाणाऱ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चिकन त्यामुळे कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आषाढ महिन्यात असते. असे असले तरी या कोंबड्या जेथून येतात ते पोल्ट्री फार्म चालक मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. नोटबंदी आणि जीएसटी यामुळे मोठ्या…
View On WordPress
0 notes
Text
अर्थकारण : आव्हान रोजगार निर्मितीचे
https://bharatlive.news/?p=181084&wpwautoposter=1698552373 अर्थकारण : आव्हान रोजगार निर्मितीचे
विकसित राष्ट्र होण्याकडे भारताची ...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
केंद्र सरकारची महाराष्ट्रात किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता
स्थानिक भाषा संवर्धनासाठीच नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा आग्रह-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन
मुंबईतल्या केंद्रीय जीएसटी अधीक्षकासह तीन जणांना २० लाख रुपये लाच घेताना अटक
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे ९८ टक्के-नागरिकांना सतर्कतेचा इशारा
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा शानदार समारोप-२९ पदकांसह भारत पदकतालिकेत १६ व्या स्थानी
****
केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इत��ी निश्चित करण्यात आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असून, याचा मनापासून आनंद होत असल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेलं चार हजार २०० कोटी रुपये अनुदान येत्या दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर थेट जमा करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातल्या दहा जिल्ह्यात सुमारे आठ लाख ४८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. कापूस, सोयाबीन आणि ज्वारी आदी पिकांचं आणि कांदा तसंच भाजीपाल्याचंही नुकसान झाल्याचं कृषी विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.
****
स्थानिक भाषांचं संवर्धन गरजेचं असून, त्यासाठीच मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षणाचा आग्रह करणारं शैक्षणिक धोरण आणल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. मुंबई समाचार या गुजराती वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त काल मुंबईत एका लघुपटाचं शहा यांच्या हस्ते प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. कुटुंबीयांनी आपापसात मातृभाषेतच संवाद साधण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले...
‘‘नई जो शिक्षा नीती लेकर आए हैं प्राथमिक शिक्षा मातृभाषा मे कंप्लसरी करने का काम हमने किया है. मै आप सभी से अपील करना चाहता हूं, निवेदन करना चाहता हूं कि घर मे कम से कम अपनी भाषा मे बोलना शुरू करो, बच्चे भाषा को आगे ले जाएंगे.’’
दरम्यान, गृहमंत्री शाह आज लालबागचा राजा, त्यानंतर वांद्रे पश्चिमेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणपतीचंही ते दर्शन घेणार आहेत.
****
वारकरी पंथाचं आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान राजकीय अधिष्ठानापेक्षा मोठं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. देवाची आळंदी इथं झालेल्या वारकरी संतपूजन सोहळ्यात ते काल बोलत होते. आपल्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत घेतलेले ६०० निर्णय सर्व समाजघटकांसाठी होते, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. घरचं अर्थकारण सांभाळणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते, असं सांगून या योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मारुती महाराज कुरेकर यांना शांतिब्रह्म पुरस्कार, तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. योजनेची अधिक माहिती एम एस आय एन एस डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य आठ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आ���ी. मागणी केलेल्या रकमेपैकी ३० लाख रुपये हवाला मार्फत घेतल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे.
****
देशात मंकिपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. या आजाराचा प्रसार झालेल्या देशातून हा रुग्ण नुकताच परत भारतात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं काल सांगितलं. या रुग्णाला एका विशेष रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या रुग्णाची प्रकृती ठीक असून, अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी देश पूर्ण तयार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी येत्या २७ तारखेपर्यंत आपल्या सूचना १८०० - ११ - ७८०० हा टोल फ्री, क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जी ओ व्ही ओपन फोरमवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे ९८ टक्के झाला आहे. धरणात सध्या १५ हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून, उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक रा��ण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असून, विविध मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे बघण्यासाठी नागरीकांची झुंबड उडत आहे.
दरम्यान, दीड दिवसाच्या गणपतींच काल विसर्जन झालं. ठिकठिकाणी गणेश विर्सजनासाठी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली होती.
नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. नागरिकांनी या तलावात दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं.
****
श्रोते हो, विविध देशात कशारितीने गणेशोत्सव साजरा केला जातो हे आपण जाणून घेत आहोत. श्रीलंकेत कोलंबो मधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती सांगत आहेत, तिथे राहणार्या, मीनल रेणावीकर,
‘‘श्रीलंकेमध्ये यावर्षी आम्ही पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. इथेही हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहाय्य केलं. इथल्यां कारुगराकडून डाव्या सोंडेची सुंदर दोन फुटाची मूर्ती बनवून घेतली. येथील श्रीलंकन मुलांना आपल्या लेझिमचे प्रशिक्षण देऊन आणि सिंहली ढोल पथकांच्या सहाय्याने ढोल, ताशा, लेझिमच्या गजरात बाप्पाचं विसर्जन केलं. हा सोहळा इंडियन हाय कमिशनच्या स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर, कोलंबो, येथे दणक्यात साजरा झाला. या गणेशोत्सवाला भारतीय बांधव तर प्रचंड संख्येनी उपस्थित होतेच, पण श्रीलंकन, तमिळ, सिंहलीज आणि काही फ्रेंच नागरीकही उपस्थित होते.’’
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा काल शानदार सोहळ्यानं समारोप झाला. यावेळी पॅरिस प्रशासनाने पॅरालिम्पिक ध्वज आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष ॲण्ड्र्यू पार्सन यांच्याकडे सोपवण्यात आला, त्यांनी हा ध्वज लॉस एंजेलिस प्रशासनाकडे सोपवला. २०२८ च्या पॅरालिम्पिक स्पर्धा लॉस एंजेलिस मध्ये होणार आहेत. या समारोह सोहळ्यात सुवर्ण पदक विजेते तीरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल हे भारतीय पथकाचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्यपदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन पदकता��िकेत सोळावं स्थान पटकावलं. या स्पर्धेच्या इतिहासात ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.
****
राज्य शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, एक्वाडाम, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, व्हाय वेस्ट आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने युवा सहभाग जलप्रबंधन कार्यक्रम राज्यात राबवला जात आहे. या अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथल्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय महाराष्ट्र शासनाचं पुरस्कार नामांकन घोषित झालं आहे. या मोहिमेत वेगवेगळ्या पद्धती वापरून अंदाजे ४० दशलक्ष घनमीटर पाणी वाचण्याची संकल्पना आहे.
****
धाराशिव इथं अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीनं काल भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या जलभूमी व्यवस्थापन संस्थेचे माजी प्रमुख डॉक्टर रमेश पांडव यांचं यावेळी भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय या विषयावर भाषय झालं. सामाजिक न्याय - संविधानाच्या प्रकाशात बघण्याची गरज, त्यांनी व्यक्त केली.
****
अंबाजोगाई इथल्या नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानचा नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार प्राध्यापक डॉ. तसनीम पटेल यांना आज अंबाजोगाई इथं प्रदान केला जाणार आहे. २१ हजार रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनादूत उपक्रमासाठी परभणी जिल्ह्यातून एकूण ९७२ योजनादूतांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली.
****
0 notes
Text
पोल्ट्री उद्योगाचे ' असे ' होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
पोल्ट्री उद्योगाचे ‘ असे ‘ होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
आषाढ महिन्याची सुरुवात झाली की नॉनव्हेज खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते कारण त्यानंतर येणारा श्रावण यामध्ये बहुतांश हिंदू बांधव नॉनव्हेज खात नाहीत. नॉन व्हेज खाणाऱ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चिकन त्यामुळे कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आषाढ महिन्यात असते. असे असले तरी या कोंबड्या जेथून येतात ते पोल्ट्री फार्म चालक मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. नोटबंदी आणि जीएसटी यामुळे मोठ्या…
View On WordPress
0 notes
Text
पोल्ट्री उद्योगाचे ' असे ' होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
पोल्ट्री उद्योगाचे ‘ असे ‘ होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
आषाढ महिन्याची सुरुवात झाली की नॉनव्हेज खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते कारण त्यानंतर येणारा श्रावण यामध्ये बहुतांश हिंदू बांधव नॉनव्हेज खात नाहीत. नॉन व्हेज खाणाऱ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चिकन त्यामुळे कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आषाढ महिन्यात असते. असे असले तरी या कोंबड्या जेथून येतात ते पोल्ट्री फार्म चालक मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. नोटबंदी आणि जीएसटी यामुळे मोठ्या…
View On WordPress
0 notes
Text
पोल्ट्री उद्योगाचे ' असे ' होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
पोल्ट्री उद्योगाचे ‘ असे ‘ होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
आषाढ महिन्याची सुरुवात झाली की नॉनव्हेज खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते कारण त्यानंतर येणारा श्रावण यामध्ये बहुतांश हिंदू बांधव नॉनव्हेज खात नाहीत. नॉन व्हेज खाणाऱ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चिकन त्यामुळे कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आषाढ महिन्यात असते. असे असले तरी या कोंबड्या जेथून येतात ते पोल्ट्री फार्म चालक मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. नोटबंदी आणि जीएसटी यामुळे मोठ्या…
View On WordPress
0 notes
Text
पोल्ट्री उद्योगाचे ' असे ' होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
पोल्ट्री उद्योगाचे ‘ असे ‘ होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
आषाढ महिन्याची सुरुवात झाली की नॉनव्हेज खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते कारण त्यानंतर येणारा श्रावण यामध्ये बहुतांश हिंदू बांधव नॉनव्हेज खात नाहीत. नॉन व्हेज खाणाऱ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चिकन त्यामुळे कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आषाढ महिन्यात असते. असे असले तरी या कोंबड्या जेथून येतात ते पोल्ट्री फार्म चालक मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. नोटबंदी आणि जीएसटी यामुळे मोठ्या…
View On WordPress
0 notes
Text
पोल्ट्री उद्योगाचे ' असे ' होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
पोल्ट्री उद्योगाचे ‘ असे ‘ होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
आषाढ महिन्याची सुरुवात झाली की नॉनव्हेज खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते कारण त्यानंतर येणारा श्रावण यामध्ये बहुतांश हिंदू बांधव नॉनव्हे�� खात नाहीत. नॉन व्हेज खाणाऱ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चिकन त्यामुळे कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आषाढ महिन्यात असते. असे असले तरी या कोंबड्या जेथून येतात ते पोल्ट्री फार्म चालक मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. नोटबंदी आणि जीएसटी यामुळे मोठ्या…
View On WordPress
0 notes