#सॅटेलाईट
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर
India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर
India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 28 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:27.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख घटक पक्षांसह भाजपकडूनही दुसरी उमेदवार यादी जाहीर
राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये ९१५ शॅडो मतदान केंद्र उ��ारण्याचा निवडणूक विभागाचा निर्णय
मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपक्रम
नांदेडच्या ५२ महाराष्ट्र बटालियन अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेना प्रशिक्षण शिबीर
आणि
पुणे क्रिकेट कसोटीत भारताचा ११३ धावांनी पराभव करत न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी
सविस्तर बातम्या
महाविकास आघाडीतल्या तीनही प्रमुख घटक पक्षांनी काल उमेदवारांची पुढची यादी जाहीर केली. काँग्रेसनं २३ उमेदवारांची दुसरी, तर १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये जालना मतदारसंघातून कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून मधुकर देशमुख, निलंगा - अभयकुमार पाटील, नांदेड दक्षिण - मोहनराव हंबर्डे, देगलूर  - निवृत्ती कांबळे, मुखेड - हणमंतराव बेटमोगरेकर तर तुळजापूर मतदारसंघातून कुलदीप पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १५ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत हिंगोली मतदारसंघातून रुपाली पाटील तर परतूर मतदारसंघातून आसाराम बोराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काल जाहीर केलेल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथून सतीश चव्हाण, बीड मधून संदीप क्षीरसागर धाराशिव जिल्ह्यात परांडा इथून राहुल मोटे, येवला - माणिकराव शिंदे, तर अहिल्यानगर शहर मतदार संघातून-अभिषेक कळमकर यांचा समावेश आहे.
****
भाजपनेही काल २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये नाशिक मध्य मतदार संघातून देवयानी फरांदे, जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर, वरोरा इथून करण संजय देवतळे, धुळे ग्रामीण - राम भदाणे, लातूर ग्रामीण - रमेश कराड तर पंढरपूर मतदार संघातून समाधान औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सनेनं काल पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये गंगाखेड मतदारसंघातून रुपेश देशमुख, फुलंब्री  - बाळासाहेब पाथ्रीकर, उस्मानाबाद - देवदत्त मोरे, परांडा - राजेंद्र गपाट तर बीड मतदारसंघातून सोमेश्वर कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
****
अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादूल मुसलिमिन - ए आय एम आय एम नं विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार काल जाहीर केले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून माजी खासदार इम्तियाज जलिल, तर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून नासेर सिद्दीकी निवडणूक लढवणार आहेत.
****
प्रहार जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं स्वागत करत, त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. गावंडे यांचे सहकारी आमदार प्रकाश डहाके आणि यांच्या पत्नी सई डहाके यांनीही यावेळी भाजपत प्रवेश केला.
****
विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार देण्याऐवजी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नोंदणीकृत पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करावेत, असा प्रस्ताव स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याकडे मांडला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं जरांगे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
दरम्यान, शिवसेना नेते उदय सामंत यांनीही काल मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाररथाला काल पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. राष्ट्रवादीने आपल्या प्रचारासाठी तयार केलेल्या या विशेष एलईडी व्हॅनच्या माध्यमातून, महायुतीच्या काळात राबवलेल्या विविध योजना मतदारांना दाखवण्यात येणार आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक विभागामार्फत राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र, तर सांगलीत एक शॅडो मतदान केंद्र असणार आहेत. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ, बीड इथं बावीस आणि नांदेड इथं बारा शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याचं विभागामार्फत सांगण्यात आलं. मतदानाच्या दिवशी विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्ही एच एफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर या विशेष सेवा शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय बी एस एन एल मार्फत पर्यायी संदेश वहनाची यंत्रणाही कार्यरत असेल.
****
विधानसभेसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व मतदारांनी या दिवशी मतदान करण्याचं आवाहन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता ��ौनिक यांनी केलं आहे.
बाईट
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रायगड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पाचवा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल.
****
मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून, हिंगोली इथं स्वीप समितीमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात येत आहेत. या संकल्प पत्रातून विद्यार्थी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आग्रह करत आहेत. या पत्रातला मजकूर विद्यार्थ्यांनी वाचून दाखवला... 
बाईट
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक दोन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना एस एम एस तसंच व्हाट्सअप वर संदेश पाठवून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. गटशिक्षणाधिकारी मेहरुबा इनामदार आणि मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांच्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांनी हे संदेश पाठवले आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी इथल्या श्री सच्चिदानंद बंडोबा महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे ‘से येस टू वोट’ हा संदेश तयार केला. ३०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शाळेत रांगोळी, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धांही घेण्यात आल्या.
****
मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या कौठा इथं झालेल्या पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते. या प्रशिक्षणात ८८४ मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. या मतदार संघातल्या हैदरबाग परिसरात काल मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात, ५७ पैकी ३३ महसूल मंडळात सततच्या पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर झालाआहे. मात्र, यासोबतच उर्वरित ���४ महसूल मंडळातल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनाही नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याच्या मदत, पुनर्वसन आणिव आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रधान सचिवांना पत्र लिहून, सध्याच्या आचारसंहिता काळात राज्य निवडणूक आयुक्तांच्या अनुमतीने भरपाई देण्याची मागणी केली आहे.
****
परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेनेचं प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात ड्रिल, फायरिंग, शस्त्र ओळख तसंच प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, गस्त घालणं, घात लावणं आदींचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शिबीरात ४६९ एन.सी.सी. कॅडेट्स सहभागी झाले असल्याची माहिती कर्नल एम. रंगा राव यांनी दिली.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना न्यूझीलंड ���ंघानं ११३ धावांनी जिंकला. काल तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला. न्यूझीलंडनं पहिल्या डावातल्या १०३ धावांच्या आघाडीसह भारताला विजयासाठी ३५९ धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडच्या संघानं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतला अखेरचा तिसरा सामना मुंबईत येत्या एक नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे.
****
लातूर इथं कालपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेत राज्यभरातून ३३६ खेळाडू सहभागी झाले.
****
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे राज्याचा बहुआयामी संदर्भमूल्य कोष शक्य - उपमुख्यमंत्री 
सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे राज्याचा बहुआयामी संदर्भमूल्य कोष शक्य – उपमुख्यमंत्री 
मुंबई दि २- सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे विविध क्षेत्रांत उपयोगिता वाढविताना राज्याचा स्वत:चा असा एक बहुआयामी आणि बहुउपयोगी दर्जेदार संदर्भमूल्य असलेला कोष तयार करता येऊ शकतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे विविध क्षेत्रातील संनियंत्रणाच्या उपयोगितेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे राज्याचा बहुआयामी संदर्भमूल्य कोष शक्य - उपमुख्यमंत्री 
सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे राज्याचा बहुआयामी संदर्भमूल्य कोष शक्य – उपमुख्यमंत्री 
मुंबई दि २- सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे विविध क्षेत्रांत उपयोगिता वाढविताना राज्याचा स्वत:चा असा एक बहुआयामी आणि बहुउपयोगी दर्जेदार संदर्भमूल्य असलेला कोष तयार करता येऊ शकतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे विविध क्षेत्रातील संनियंत्रणाच्या उपयोगितेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newsyaari · 4 years ago
Photo
Tumblr media
Privatisation Of Isro Says K Sivan – ‘इस्रो’ खासगीकरणाच्या जोरदार चर्चा; अध्यक्ष के सिवन यांचं स्पष्टीकरण नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी 'इस्रोचं खासगीकरण होणार नाही, ही गोष्ट सगळ्यांच्याच डोक्यात खूप स्पष्ट आहे' असं म्हणत देशाला आश्वासन दिलंय.
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
गोसेचे सॅटेलाईट सर्व्हेक्षण पूर्ण | पाणीपातळी पुन्हा होणार कमी
गोसेचे सॅटेलाईट सर्व्हेक्षण पूर्ण | पाणीपातळी पुन्हा होणार कमी
भंडारा,दि.02 : राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाने आपली अंतिम पाणीपातळी गाठल्यानंतर सॅटेलाईट सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. आता सॅटेलाईट सर्व्हेक्षण पूर्णत्वास आले आहे. या धरणाचे पाणी पुढे वापरण्याच्या अनुषंगाने आजपासून (ता.२) सोडले जाणार आहे. त्यामुळे गोसे धरणाची पाण्याची पातळी पुन्हा कमी होणार आहे. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात (इंदिरा सागर) पूर्ण क्षमतेने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Photo
Tumblr media
आदित्य ठाकरेंनी सीआरझेड जनसुनावणीच्या माध्यमातून जनतेची चेष्टा बंद करावी ​मालवण : राज्य सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या माध्यमातून सागरी किनारा आराखड्या संदर्भात सुनावणी सुरू आहे. २०११ पर्यंतचा डाटा��ेस व या कालावधी मधील सॅटेलाईट नकाशा विचारात घेऊन २०२० मध्ये हे आराखडे विचारात घेतले जात आहेत.
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
उदगाव-गोकुळच्या सॅटेलाईट सेंटरमध्ये आंदोलक-पोलिसांत झटापट
https://bharatlive.news/?p=168565 उदगाव-गोकुळच्या सॅटेलाईट सेंटरमध्ये आंदोलक-पोलिसांत झटापट
सरकारने ...
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ११ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पाकिस्तानी सैन्याने आज जम्मू जिल्ह्यातील अखनूर सीमेवरील भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला आणि युद्धविराम कराराचे उल्लंघन केले. या गोळीबारास बीएसएफच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. सीमा सुरक्षा दलाचा एक जवान या बेछूट गोळीबारात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, सैनिक हाय अलर्टवर आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमा तसच नियंत्रण रेषेवर कडक ��जर ठेवत आहेत.
****
राज्यातले शेतकरी फळ लागवडीस मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत असून भौगोलिक मानांकनं प्राप्त फळांच्या लागवडीस विशेष चालना देण्याच्या दृष्टीने विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना फलोत्पादन मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत काल मंत्री भुसे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना फळांवरील प्रक्रियेच्या माध्यमातून अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने विभागानं नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. डाळिंबाच्या फळापासून रस निर्मितीच्या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषी विद्यापीठांनीही या संदर्भात संशोधनाचे पूरक तपशील नवीन उपक्रमासाठी घ्यावं, शेतकऱ्यांना सोयीचं ठरणारं कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्याचं नियोजन करावं, त्या-त्या तालुक्यातील फलोत्पादन पद्धतीनुसार फळ लागवड करण्यास प्रोत्साहन द्यावं, अशा सूचना दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या.
****
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत ३० कोटी रुपये निधी वितरित करण्यास कृषी विभागाने मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये केलेल्या तरतुदीतून ३० कोटी रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
****
ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम असलेल्या खाजगी वाहनांना राष्ट्रीय महामार्ग तसंच एक्स्प्रेस वे वर दररोज २० किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. २००८ मधील राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमात दुरुस्ती करुन रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं हा आदेश जारी केला आहे. जीएनएसएस प्रणाली असलेल्या वाहनांनाच २० किलोमीटर इतक्या अंतराच्या प्रवासासाठी ही सवलत असेल. २० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना पूर्ण अंतराचं शुल्क द्यावं लागेल.
****
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या समारंभाची पूर्वतयारी बैठक बीड इथे निवासी उप जिल्हाधिकारी शिवकुमार स्वा��ी यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार आणि संबधित विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासंबधी सर्व संबंधित विभागास कार्यक्रमाच्या पुर्वतयारीसाठी सूचना दिल्या.
****
एकपात्री, नाट्य, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून गेली पन्नासहून अधिक वर्षे रसिकांचं मनोरंजन करणारे जेष्ठ रंगकर्मी, हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांचं काल पुण्यात हृदयविकारानं निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. बंपर लाफ्टर, नजराणा हास्याचा या कार्यक्रमातून त्यांनी रसिकांची मनं जिंकली. एकपात्री कलाकार परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने नांदेड तसंच हिंगोलीसह अनेक ठिकाणी 'स्वच्छता ही सेवा' ही मोहीम १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबवण्यात येणार आहे.
****
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
ड्रायपोर्ट, सॅटेलाईट पोर्ट, एअरपोर्टमुळे सांगलीचा चौफेर विकास होणार -  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ‍नितीन गडकरी
ड्रायपोर्ट, सॅटेलाईट पोर्ट, एअरपोर्टमुळे सांगलीचा चौफेर विकास होणार –  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ‍नितीन गडकरी
सांगली, दि. 26 :   सांगली जिल्ह्याची द्राक्षे, उद्योगातून तयार होणार माल, हळद, साखर थेट परदेशात निर्यात होऊ लागल्यास सांगलीची आर्थिक स्थिती बदलेल व सांगली हा महाराष्ट्रातील समृध्द व संपन्न जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यामध्ये पाण्याची, रस्त्यांची, ऊर्जेची सोय झाली. आता ड्रायपोर्ट सॅटेलाईट पोर्टही येणार आहे. त्या ठिकाणी एअरपोर्टही येईल, त्यामुळे सांगलीचा चौफेर विकास होईल, असा विश्वास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
yook786-blog · 6 years ago
Photo
Tumblr media
हे काय झाडे लावून हिरवा झाला नाही हे फक्त मोबाइल स्पेक्टरमच जाळ आहे. अजून हयात एफएम सॅटेलाईट टीव्ही अजून बाकीची काही उपकरण बाकी आहेत
0 notes
thebusinesstimes · 4 years ago
Text
'जेईई', 'एनईईटी'साठी ऑनलाईन उपक्रम
‘जेईई’, ‘एनईईटी’साठी ऑनलाईन उपक्रम
मुंबई : आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडच्यावतीने ‘आकाश प्राईमक्लास’ या एकमेव अशा विस्तारीत वर्ग अभ्यासक्रमाद्वारे इयत्ता VIII ते इयत्ता XII आणि XII उत्तीर्णांकरिता दीर्घकालीन अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली.  पद्धतीत न्यू एज सॅटेलाईट टेक्नोलॉजीचा अवलंब करण्यात आला आहे. इयत्ता VIII ते इयत्ता X च्या विद्यार्थ्यांसाठी एक ते दोन वर्षांचे फाउंडेशन कोर्स उपलब्ध करून देण्यात आले असून डॉक्टर आणि…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
एअर स्ट्राइकनंतर देखील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचा मदरसा तसाच ?
एअर स्ट्राइकनंतर देखील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचा मदरसा तसाच ?
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारतीय हवाई दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून, बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदची तळ उद्धवस्त केल्याचा दावा केला होता. मात्र आता वृत्तसंस्था राॅयटर्सच्या एका वृत्ताने एअर स्ट्राइकवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राॅयटर्सने दिलेल्या वृत्ता बालाकोटमध्ये जेथे एअर स्ट्राइक करण्यात आला होता. तेथील नवीन सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये जैश-ए-मोहम्मद���्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०१ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोनं आज एक्स रे पोलारिमीटर सॅटेलाईट एक्सपोसॅटचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रात पीएसएलव्ही सी ५८ या उपग्रहाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. या उपग्रहाद्वारे अवकाशात होणारा किरणोत्सर्ग, कृष्ण विवर तसंच न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास केला जाणार आहे. या उपग्रहासोबतच १० अन्य पॅलोड्सचंही प्रक्षेपण करण्यात आलं. ही कामगिरी करणारा भारत जगातील दुसरा देश ठरला आहे. या कामगिरीबद्दल केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी इस्त्रोचं अभिनंदन केलं आहे.  
****
केंद्र शासनाच्या नवीन वाहन कायद्याच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्ह्यात मनमाड जवळील पानेवाडी इथं पेट्रोल-डिझेल टँकर चालकांनी आंदोलन स���रू केलं आहे. या ठिकाणी आज एकाही टँकरमध्ये इंधन भरू न दिल्यामुळं, सध्या पाचशे ते सहाशे टँकर इथं उभे आहेत. आज दुपारपर्यंत टँकर न भरू दिल्यास नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि काही भागात पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवू शकते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****
नववर्ष २०२४ चं देशभरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल रमेश बैस यांनी देशातल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी काल रात्री ठाणे इथं रक्तदान करुन नवीन वर्षाचं स्वागत केलं.
****
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं भेट देवून विजय स्तंभाला अभिवादन केलं. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे.
****
प्रतिभावंत भारतीय खेळाडू अनहत सिंह हिनं एडिनबर्ग इथं झालेल्या मुलींच्या १९ वर्षांखालील स्कॉटिश कनिष्ठ खुल्या स्क्वॉश स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
ढगफुटी, भूगर्भातील माहितीसाठी सॅटेलाईट लाँच करणार : अनिल पाटील
https://bharatlive.news/?p=152643 ढगफुटी, भूगर्भातील माहितीसाठी सॅटेलाईट लाँच करणार : अनिल पाटील
नागपूर; ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पाठीवर सॅटेलाईट टॅग लावून फिरणाऱ्या कासवाशी संपर्क तुटला, २,७०० किलोमीटरनंतर...
पाठीवर सॅटेलाईट टॅग लावून फिरणाऱ्या कासवाशी संपर्क तुटला, २,७०० किलोमीटरनंतर…
पाठीवर सॅटेलाईट टॅग लावून फिरणाऱ्या कासवाशी संपर्क तुटला, २,७०० किलोमीटरनंतर… prathama olive ridley sea turtle: ऑलिव्ह रिडेल समुद्री कासवांची जीवनशैली समजून घेण्यासाठी त्यांच्या पाठीवर सॅटेलाईट टॅग लावण्यात आलेल्या प्रथमा या मादी कासवाशी संपर्क तुटल्याचे समोर आलय. prathama olive ridley sea turtle: ऑलिव्ह रिडेल समुद्री कासवांची जीवनशैली समजून घेण्यासाठी त्यांच्या पाठीवर सॅटेलाईट टॅग लावण्यात…
View On WordPress
0 notes