#सीआयडी
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशभरातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत • संतोष देशमुख हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक; १८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी • नांदेड शहरातल्या बहुचर्चित स्फोट प्रकरणात सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे धडे आणि • बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात भारताचा दुसरा डाव १५७ धावांवर आटोपला, ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचं लक्ष्य
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं उद्घाटन केलं, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गेल्या दहा वर्षात कृषी कर्जाच्या रकमेत साडे तीन पटीनं वाढ झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले… पी एम किसान सम्मान निधी से किसानों को करीब तीन लाख करोड रूपये की आर्थिक मदत दी गई है। पिछले दस वर्षों में कृषी लोन की राशी साढे तीन गुना हो गई है। अब पशु पालकों और मत्स्य पालकों को भी किसान क्रेडीड कार्ड दिया जा रहा है। देश मे मौजुद नौ हजार से ज्यादा एफ पी ओ, किसान उत्पाद संघ उन्हें भी आर्थिक मदत दी जा रही है।
कृषी मालाच्या किंमतीतली तफावत दूर करण्यासाठी वाहतूक आणि साठवणूकीच्या किंमतीचा भार सरकार उचलणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. यावर्षी कृषी आणि संबंधित क्षेत्रातला वाढीचा दर साडेतीन ते चार टक्क्यांदरम्यान राहणं अपेक्षित असल्याचं चौहान यांनी सांगितलं.
देशाच्या विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं काल पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या होत्या. चिदंबरम यांना पद्मश्री तसंच पद्मविभूषण या नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
राज्यातल्या विविध नियोजन प्राधिकरणांचं सक्षमीकरण करुन त्यांचं कामकाज कंपनीच्या धर्तीवर करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ते काल नगरविकास विभागाच्या बैठकीत बोलत होते. महिला आणि बालविकास विभागाच्या पुढील १०० दिवसात करायच्या कामांचाही मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतला. राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागात विशेषत: मुंबई महानगरात झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांतले फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याना पुण्यातून तर सिध्दार्थ सोनवणे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींसह त्यांना सहकार्य करणारे डॉ.संभाजी वायबसे आणि त्यांची वकील पत्नी या दोघांना पोलिसांनी नांदेड इथून अटक केली होती, या सर्व आरोपींना केज न्यायालयात काल हजर करण्यात आलं, न्यायालयानं या सर्वांना १८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे… नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं दिवसाढवळ्या अपहरण, अमानुष मारहाण आणि हत्या केल्यापासून फरार असलेल्या सुदर्शन घुलेसह सर्व आरोपींना पुढील तपासासाठी सीआयडी आणि एसआयटी पथकाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यां��ी ही माहिती दिली. या प्रकरणात चर्चेत असलेले बहुतांश प्रमुख आरोपी पकडले गेले आहेत, त्यामुळे आता विशेष तपास पथक तसंच सीआयडीकडून तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी, बीड दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीत काल सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर यांच्यासह दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
नांदेड शहरातल्या बहुचर्चित स्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. नांदेड शहरात पाटबंधारे नगरातल्या एका घरात सहा एप्रिल २००६ रोजी झालेल्या या स्फोट प्रकरणात काल तब्बल १८ वर्षांनंतर न्यायालयानं निकाल सुनावला. या प्रकरणातल्या १२ आरोपींपैकी दोन आरोपींचा स्फोटातच मृत्यू झाला होता. केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने या प्रकरण दोन हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं, मात्र हा बॉम्बस्फोट असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही. त्यामुळे हा फटाक्यांचा स्फोट असल्याचं ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी आता जर्मन भाषेत एबीसीडीचे धडे गिरवत आहेत. महापालिकेच्या प्रियदर्शनी शाळेने, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या वर्षात हा उपक्रम सुरू केला आहे. जागतिक पातळीवर उच्च माध्यमिक शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने विद्यार्थी घडवणं हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं, शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी आकाशवाणीला सांगितलं. ते म्हणाले.. जर आपल्या विद्यार्थ्यांना तिथे स्कोप पाहिजे असेल, तर त्यांना जर्मन भाषा येणं गरजेचं आहे. बेसिक जर्मन भाषा जर आपण मुलांना शिकवली तर मुलांना त्याच्यात आवड निर्माण होईल. आणि आवड निर्माण झाल्यानंतर ती मुलं निश्चित उच्च शिक्षण जर्मन भाषेतून घेतील म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी मागील तीन महिन्यांपूर्वी आमच्या शिक्षण विभागाकडून एक लिंक आली होती. जर जर्मन भाषा काही शिक्षकांना शिकायची असेल, तर ऑनलाईन ही शिकता येणार आहे. तर यासाठी जर्मनीमध्ये असलेले मिस्टर दावोस ऑनलाईन ट्रेनिंग घेतात. आमचे शिक्षक गेल्या तीन महिन्यांपासून ती भाषा शिकत आहेत. तेच शिक्षक आता शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
क्रिकेट बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचा दुसरा डाव केवळ १५७ धावांवर आटोपला. या ��ावात ॠषभ पंतच्या ६० धावा वगळता कुणालाही मोठी धावसंख्या करता आली नाही. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या उपाहारापर्यंत तीन बाद ७१ धावा झाल्या होत्या..
लातूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाच्या एकोणसाठाव्या तीन दिवसीय अधिवेशनाचा काल समारोप झाला. या अधिवेशनात शैक्षणिक सद्यस्थिती, सामाजिक सद्यस्थिती, स्वयंरोजगार आणि रोजगार निर्मिती तसंच उद्योजकता विकासाकडे युवकांची ओढ निर्माण करण्यासाठी सरकारने धोरण आखावं, असे प्रस्ताव संमत करण्यात आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' या विषयावर शिक्षण तज्ञ अनिल राव यांनी मार्गदर्शन केलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांची या सत्रास प्रमुख उपस्थिती होती.
भोपाळ इथं होत असलेल्या राष्ट्रीय विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे खेळाडू काल रवाना झाले. या स्पर्धा आजपासून सुरु होत आहेत. शारिरीक शिक्षण विभागाचे संचालक भास्कर माने आणि नांदेड जिल्हा मल्लखांब संघाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी संघाला शुभेच्छा दिल्या.
नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेतल्या शासकीय कार्यक्रमांचा आज समारोप होत आहे. या यात्रेत कुस्त्यांची दंगल आज होणार असून, आठवडाभरात झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळाही होणार आहे. काल या स्पर्धेत नागरिकांनी शंकरपटाचा थरार अनुभवला. ५८ बैलजोड्यांनी या शर्यतीत भाग घेतला होता. त्यापैकी हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यात पिंपळदरी इथले महादू कोंडिबा रिटे यांच्या बैलजोडीने निर्धारित अंतर अवघ्या साडे चार सेकंदात पार करत पहिला क्रमांक पटकावला. परिसरातल्या गोरगरीब कुटुंबांमध्ये प्रसिद्ध असलेला जुन्या कपड्यांचा बाजार काल या यात्रेत आकर्षणाचं केंद्र होता.
वाहतूक नियमांचं पालन केल्यास अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात, असं नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी म्हटलं आहे. ते काल हिंगोली इथं रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी बोलताना, रस्ता सुरक्षा अभियानाशी निगडीत विविध कार्यशाळा, दुचाकी फेरी, नेत्र तपासणी शिबीरं तसंच, शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगितलं.
लातूर शहरात एका खा��गी रुग्णालयातले दिवंगत कर्मचारी बाळू डोंगरे यांच्या दोन्ही मुलांचा लातूर इथल्या केशवराज विद्यालयाने शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारलं आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी याबाबतचं पत्र विद्यालयाला दिलं होतं.
0 notes
Text
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचा मोठा निर्णय
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू असून वाल्मीक कराड या हा पुण्यात सीआयडीच्या ताब्यात आला आहे. न्यायालयाने त्याला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. मस्साजोगचे संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर…
0 notes
Text
जस्टिन बीबरच्या चेहऱ्याच्या अर्धांगवायूची खिल्ली उडवल्याबद्दल लॉक अप विजेता मुनावर फारुकी ट्रोल झाला.
जस्टिन बीबरच्या चेहऱ्याच्या अर्धांगवायूची खिल्ली उडवल्याबद्दल लॉक अप विजेता मुनावर फारुकी ट्रोल झाला.
टुडे टीव्ही न्यूज: छोट्या पडद्यावर रोजच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून खळबळ उडाली आहे. या ना त्या कारणाने टीव्ही स्टार्स प्रसिद्धीच्या झोतात राहतात. अशीच परिस्थिती आजही पाहायला मिळत आहे. खतरों के खिलाडी 12 चे स्टार्स खूप चर्चेत आहेत. तर दुसरीकडे राखी सावंतने तिच्या एक्समुळे पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले आहे. मुनव्वर सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. दररोज प्रमाणे आजही आपण 5 मोठ्या टीव्ही बातम्या…
View On WordPress
#आज टीव्ही बातम्या#आजच्या टीव्ही बातम्या#खतरों के खिलाडी १२#जस्टीन Bieber#टीव्ही#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही गॉसिप#टीव्ही बातम्या#टीव्ही मालिका गप्पाटप्पा#तुषार कालिया#दिवसाच्या टीव्ही बातम्या#दिवसातील शीर्ष 5 टीव्ही बातम्या#मनोरंजन बातम्या#मुनव्वर फारुकी#मुनावर फारुकी#राखी सावंत#रितेश#लॉक अप#शीर्ष 5 टीव्ही बातम्या#सीआयडी#हृषीकेश पांडे
0 notes
Text
प्रत्युत्तर:‘पेनड्राइव्ह’ प्रकरणाचा होणार सीआयडी तपास; फडणवीसांनी विधानसभेत दिला दुसरा पेनड्राइव्ह
प्रत्युत्तर:‘पेनड्राइव्ह’ प्रकरणाचा होणार सीआयडी तपास; फडणवीसांनी विधानसभेत दिला दुसरा पेनड्राइव्ह
प्रत्युत्तर:‘पेनड्राइव्ह’ प्रकरणाचा होणार सीआयडी तपास; फडणवीसांनी विधानसभेत दिला दुसरा पेनड्राइव्ह Go to Source
View On WordPress
#तपास#दिला#दुसरा#पेनड्राइव्ह#प्रकरणाचा#प्रत्युत्तर:‘पेनड्राइव्ह’#फडणवीसांनी#बातम्या#विधानसभेत#सीआयडी#होणार
0 notes
Text
Palghar Lynching Case: बापरे! पालघर साधू हत्याकांडात २५० हून जास्त आरोपी
Palghar Lynching Case: बापरे! पालघर साधू हत्याकांडात २५० हून जास्त आरोपी
[ad_1]
पालघर: य���थील गडचिंचलेगावात झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेनं १२ हजार पानांची दोन वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली आहेत. यात २५० हून अधिक जणांना आरोपी करण्यात आलं आहे. ‘लोक अफवेला बळी पडल्यामुळं हा प्रकार घडला होता. साधूंची हत्या हा कुठल्याही कटाचा भाग नसून या घटनेचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही, असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. (No religious angle in Palghar lynchings,…
View On WordPress
#Gadchinchle#Palghar Case Chargesheet#palghar lynching case#palghar sadhu killing#गडचिंचले#पालघर हत्याकांड#पालघर हत्याकांड आरोपपत्र#सीआयडी
0 notes
Text
लुटीचा ' वेगळाच ' प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..
लुटीचा ‘ वेगळाच ‘ प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..
महाराष्ट्रात गुन्हेगारीचा एक वेगळाच पॅटर्न सध्या सुरू असून कधी तोंडाला मास्क नाही तर कधी इतर तपासणीच्या नावाखाली सीआयडी असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या एका भामट्याला 9 एप्रिल रोजी गेवराई पोलिसांच्या बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, आजम खान अफजल खान पठाण ( वय 56 राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा ) असे आरोपीचे नाव असून नामदेव…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशभरातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक;१८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे धडे
आणि
बॉर्डर-गावस्कर कसोटी क��रिकेट मालिकेच्या पाचव्या सामन्यात भारताला १४५ धावांची आघाडी
****
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं उद्घाटन केलं, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. गेल्या दहा वर्षात कृषी कर्जाच्या रकमेत साडे तीन पटीनं वाढ झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
पी एम किसान सम्मान निधी से किसानों को करीब तीन लाख करोड रूपये की आर्थिक मदत दी गई है। पिछले दस वर्षों में कृषी लोन की राशी साढे तीन गुना हो गई है। अब पशु पालकों और मत्स्य पालकों को भी किसान क्रेडीड कार्ड दिया जा रहा है। देश मे मौजुद नौ हजार से ज्यादा एफ पी ओ, किसान उत्पाद संघ उन्हें भी आर्थिक मदत दी जा रही है।
****
देशाच्या विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं आज पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या होत्या. चिदंबरम यांना पद्मश्री तसंच पद्मविभूषण या नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन त्यांचं कामकाज कंपनीच्या धर्तीवर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ते आज नगरविकास विभागाच्या बैठकीत बोलत होते. शहरातील पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागणार आहे, हा निधी उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांतील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याना पुण्यातून तर सिध्दार्थ सोनवणे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींसह त्यांना सहकार्य करणारे डॉ.संभाजी वायबसे आणि त्यांची वकील पत्नी या दोघांना पोलिसांनी नांदेड इथून अटक केली होती, या सर्व आरोपींना केज न्यायालयात आज हजर करण्यात आलं, न्यायालयानं या सर्वांना १८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे –
नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं दिवसाढवळ्या अपहरण, अमानुष मारहाण आणि हत्या केल्यापासून फरार असलेल्या सुदर्शन घुलेसह सर्व आरोपींना पुढील तपासासाठी सीआयडी आणि एसआयटी पथकाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात चर्चेत असलेले बहुतांश प्रमुख आरोपी पकडले गेले आहेत, त्यामुळे आता विशेष तपास पथक तसंच सीआयडीकडून तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.
रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी, बीड
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीत आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले.
****
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी करायच्या कारवाईबाबत पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. पोलिस अधिकारी जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांना वेगळी वागणूक देत असून याबाबतचं प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा कोकाटे यांनी दिला आहे.
****
लाडकी बहिण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी अथवा पडताळणी करण्याचे शासनाचे निर्देश नाही, त्यामुळे धुळे जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी करण्यात करण्यात आलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यीची रक्कम परत घेतल्याचं वृत्त प्रसार माध्यमातून पसरलं होतं, त्यासंदर्भात पापळकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ही बाब स्पष्ट केली.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामाचा राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज आढावा घेतला, महाजन यांनी पांडूरंगाचं सहकुटूंब दर्शन घेतलं, यावेळी मंदिर समितीच्या वतीने महाजन यांचा शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. पुरातत्त्व विभाग आणि संबधित कंत्राटदारानी संबंधित कामास गती देऊन वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करावीत, अशा सूचना महाजन यांनी दिल्या. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम राज कुमार यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी आता जर्मन भाषेत एबीसीडीचे धडे गिरवत आहेत. महापालिकेच्या प्रियदर्शनी शाळेने मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या वर्षात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर उच्च माध्यमिक शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने विद्यार्थी घडवणं हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचं, शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी आकाशवाणीला सांगितलं. ते म्हणाले –
जर आपल्या विद्यार्थ्यांना तिथे स्कोप पाहिजे असेल, तर त्यांना जर्मन भाषा येणं गरजेचं आहे. बेसिक जर्मन भाषा जर आपण मुलांना शिकवली तर मुलांना त्याच्यात आवड निर्माण होईल. आणि आवड निर्माण झाल्यानंतर ती मुलं निश्चित उच्च शिक्षण जर्मन भाषेतून घेतील म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी मागील तीन महिन्यांपूर्वी आमच्या शिक्षण विभागाकडून एक लिंक आली होती. जर जर्मन भाषा काही शिक्षकांना शिकायची असेल, तर ऑनलाईन ही शिकता येणार आहे. तर यासाठी जर्मनीमध्ये असलेले मिस्टर दावोस ऑनलाईन ट्रेनिंग घेतात. आमचे शिक्षक गेल्या तीन महिन्यांपासून ती भाषा शिकत आहेत. तेच शिक्षक आता शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आज संपला. तत्पूर्वी पहिल्या डावात भारतीय संघानं १८५ धावा केल्या तर ऑस्ट्रेलिया संघ १८१ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डावात दिवसाअखेर सहा गडी बाद १४१ धावा केल्या आहेत. भारताला आतापर्यंत १४५ धावांची आघाडी मिळाली ��हे.
****
भोपाळ इथं होत असलेल्या राष्ट्रीय विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे मल्लखांब खेळाडू आज रवाना झाले. या स्पर्धा उद्या ५ जानेवारी पासून सुरु होणार आहेत. शारिरीक शिक्षण विभागाचे संचालक भास्कर माने सर आणि नांदेड जिल्हा मल्लखांब संघाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी संघाला शुभेच्छा दिल्या.
****
सोलापूर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा २०वा दीक्षांत समारंभ येत्या १० जानेवारीला होणार आहे. यावेळी एकूण १५ हजार २९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे, असं या��ाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वाहतूक नियमांचं पालन केल्यास अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात, असं नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी म्हटलं आहे. ते आज हिंगोली इथं रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. अल्पवयीन तसंच कुणीही विनपरवाना वाहन चालवू नये, असं आवाहन उमाप यांनी केलं आहे.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी बोलतांना रस्ता सुरक्षा अभियानाशी निगडीत विविध कार्यशाळा, दुचाकी फेरी, नेत्र तपासणी शिबीरं तसंच, शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगितलं.
****
लातूर शहरात एका खाजगी रुग्णालयातले दिवंगत कर्मचारी बाळू डोंगरे यांच्या दोन्ही मुलांचं लातूर इथल्या केशवराज विद्यालयाने शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारलं आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी याबाबतचं पत्र विद्यालयाला दिलं होतं, त्यानुसार केशवराज विद्यालयाने दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बाळू डोंगरे यांची ते काम करत असलेल्या रुग्णालयातच हत्या झाली होती.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत आज जुन्या कपड्यांचा आकर्षक बाजार भरवण्यात आला होता. परिसरातल्या गोरगरीब कुटुंबांसाठी हा बाजार वर्षभर पुरणाऱ्या कपड्यांची खरेदी करण्याचं ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. दरम्यान, माळेगाव यात्रेनिमित्त पशु प्रदर्शन, दुग्ध स्पर्धा, तसंच कृषी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आज माळेगाव यात्रेत बक्षीस वितरण करण्यात आलं. उद्या कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
****
0 notes
Text
सीआयडी कोठडीत गेलं की प्रकृती बिघडतेच , वाल्मीक कराडला ऑक्सिजन मास्क
सीआयडी कोठडीत गेलं की प्रकृती बिघडतेच , वाल्मीक कराडला ऑक्सिजन मास्क
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू असून वाल्मीक कराड या हा पुण्यात सीआयडीच्या ताब्यात आला आहे. तो स्वतःहून शरण आला असून त्याने एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करत आपण दोषी नसल्याचा दावा केलेला असला तरी…
0 notes
Text
लुटीचा ' वेगळाच ' प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..
लुटीचा ‘ वेगळाच ‘ प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..
महाराष्ट्रात गुन्हेगारीचा एक वेगळाच पॅटर्न सध्या सुरू असून कधी तोंडाला मास्क नाही तर कधी इतर तपासणीच्या नावाखाली सीआयडी असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या एका भामट्याला 9 एप्रिल रोजी गेवराई पोलिसांच्या बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, आजम खान अफजल खान पठाण ( वय 56 राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा ) असे आरोपीचे नाव असून नामदेव…
View On WordPress
0 notes
Text
लुटीचा ' वेगळाच ' प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..
लुटीचा ‘ वेगळाच ‘ प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..
महाराष्ट्रात गुन्हेगारीचा एक वेगळाच पॅटर्न सध्या सुरू असून कधी तोंडाला मास्क नाही तर कधी इतर तपासणीच्या नावाखाली सीआयडी असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या एका भामट्याला 9 एप्रिल रोजी गेवराई पोलिसांच्या बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, आजम खान अफजल खान पठाण ( वय 56 राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा ) असे आरोपीचे नाव असून नामदेव…
View On WordPress
0 notes
Text
आज टीव्ही बातम्या 23 जून पलक तिवारी डेटिंग वेदांग रैना करिश्मा तन्ना पूल फोटो व्��ायरल
आज टीव्ही बातम्या 23 जून पलक तिवारी डेटिंग वेदांग रैना करिश्मा तन्ना पूल फोटो व्हायरल
आज टीव्ही बातम्या: टीव्ही विश्वातील गोंधळ आजही नेहमीप्रमाणे सुरूच होता. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या डेटिंग लाइफचा खुलासा झाला असताना, करिश्मा तन्ना हिने निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पूलमध्ये डुबकी मारली. त्याचा यासंबंधीचा फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दुसरीकडे, सर्वांची आवडती मालिका सीआयडी पुनरागमन करत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही मजेशीर आणि मजेशीर बातम्या घेऊन आलो…
View On WordPress
#cid#अन्नू कपूर#आज टीव्ही बातम्या#आजच्या टीव्ही बातम्या#इब्राहिम अली खान#करिश्म तन्ना पूल फोटो#करिश्मा तन्ना#करिश्मा तन्ना पूल फोटो#करिश्मा तन्नासोबत वरुण बंगेरा#टीव्ही आजची बातमी#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही बातम्या#पलक तिवारी#पलक तिवारी डेटिंग लाइफ#पलक तिवारी बॉयफ्रेंड#पलक तिवारी वेदांग रैना#पलक तिवारी वेदांग रैनासोबत#बिग बॉस १६#मनोरंजन गप्पाटप्पा#मनोरंजन बातम्या#वरुण बंगेरा
0 notes
Text
हिंगोली:पातोंडा येथील मारहाण प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी करणार- बाळासाहेब आंबेडकर
हिंगोली:पातोंडा येथील मारहाण प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी करणार- बाळासाहेब आंबेडकर
हिंगोली:पातोंडा येथील मारहाण प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी करणार- बाळासाहेब आंबेडकर https://divyamarathi.bhaskar.com/rss-v1–category-5492.xml
View On WordPress
0 notes
Text
वाढदिवसाच्या दिवशीच जिथं राहतो तोच बंगला पाडण्याची वेळ गुरुदत्तवर आली होती….
वाढदिवसाच्या दिवशीच जिथं राहतो तोच बंगला पाडण्याची वेळ गुरुदत्तवर आली होती….
गुरुदत्त हा तसा बऱ्याच दर्दी लोकांच्या काळजाचा विषय आहे. गुरुदत्त हा भारतीय सिनेमात सगळ्यात महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. लोकांचं मन जिंकून घेण्याची ताकद गुरुदत्तच्या सिनेमात होती आणि अजूनही आहे त्यात काही वाद नाही. तसं तर गुरुदत्त हा कल्ट सिनेमा दिग्दर्शक म्हणून फेमस आहे, प्यासा, कागज के फूल, भरोसा, साहिब बिवी और गुलाम, चौदहवी का चांद, सीआयडी हे सिनेमे केवळ अप्रतिम आहेत. देख ली जमाने…
View On WordPress
0 notes
Text
आयसीजेएस प्रणालीत महाराष्ट्र पोलिसांना देशात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त
आयसीजेएस प्रणालीत महाराष्ट्र पोलिसांना देशात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालय व राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभाग (एनसीआरबी) यांच्यावतीने दिल्ली येथे झालेल्या इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टीस सिस्टम (आयसीजेएस) या विभागातील “पोलिस सर्च’ वर्गवारीमध्ये महाराष्ट्र पोलिसांना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक अर्चना कदम, पोलिस कर्मचारी संदिप शिंदे व प्रियांका शितोळे या पोलिस…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. • संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीस सरकार अनुकूल. • जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर सकारात्मक परिणाम, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. • शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरु��ीसंपन्न समाज घडवावा-ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचं आवाहन. आणि • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत रोहित शर्माला विश्रांती, जसप्रीत बुमराह संघाचा कर्णधार.
प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. राज्यातले सर्व सामाजिक विकास महामंडळं एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा, तसंच मंत्रालयात येणाऱ्या तक्रारी जिल्हास्तरावर सोडवण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना या निर्णयांबाबत माहिती दिली.. सामान्यांकरता देखील युनिक आयडी तयार करण्यास आम्ही निर्णय घेतलाय. त्यातनं या या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन देखील करता येईल. दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे, की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळं आपण तयार केलेली आहेत, यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं, त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील. जेणेकरून सगळी महामंडळ योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील मंत्रालयामध्ये येणारे ७०% तक्रारी या जिल्हास्तरावर सुटण्यासारख्या असतात. त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबेस्ट ग्रीव्हन रीड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो आहोत, की जेणेकरून जिल्हास्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी सरकारजमा झालेल्या सुमारे चार हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाचं कामकाज 'ई ऑफिस'च्या धर्तीवर 'ई-कॅबिनेट' स्वरुपात करण्याचं सूतोवाच या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलं.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले… मी माननीय उज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितले की मला एक दोन दिवस द्या. कारण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे. त्यानुसार मी निर्णय ��ेणार आहे. मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला, तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र, हा खटलाच बीड जिल्ह्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी चालवावा अशी मागणी केली. छत्रपती संभाजीनगर इथं काल पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले, हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून इतरत्र चालवला पाहिजे. अजून एक मोबाईल जप्त केला या मोबाईलमध्ये काय काय आहे, कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचा सीडीआर रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी सीआयडीला जाहीर केलेलं नाही. मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आपल्या मंत्रिपदी राहण्यामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचं, अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फासावर चढवण्याची मागणी मुंडे यांनी केली, एक तर पोलीस प्रशासन, सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करतंय. आमच्या दृष्टीने दिवंगत संतोष देशमुखची ज्यांनी हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन, राहिलेले जे काही आरोपी त्यात लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्याकारांना फाशीची शिक्षा मिळावी. हा तपास न्यायलीन पण होणार आहे. त्यामुळे त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊच शकत नाही.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी स्थापन विशेष तपास पथक - एसआयटी आणि सीआयडीच्या अधिकार्यांनी बीड जिल्ह्यात तपासाला सुरुवात केली आहे. या पथकांनी काल दोन बैठका घेऊन तसंच बीड, केज, मस्साजोग अशा विविध ठिकाणी भेट देऊन संबंधितांची चौकशी केली.
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. या निमित्तानं शैक्षणिक संस्थांसह विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाला कालपासून पुणे इथं सुरूवात झाली. यात देशभरातून ६०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार सहभागी झाले आहेत.
जम्मू काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० हे दहशतवादाला खतपाणी घालत होतं, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत 'जम्मू काश्मीर ॲण्ड लद्दाख-थ्रू द एजेस' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. कलम ३७० रद्द केल्या���ंतर काश्मीरात दगडफेकीच्या घटना थांबल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले… धारा 370 समात्प होने के बाद आतंकवादी घटनाओं मे सत्तर प्रतिशत से ज्यादा कमी हुई है। वो ये सिद्ध करता है कि धारा 370 आतंकवाद की पोषक थी। 2018 में २१०० घटनाये पथराव की हुई थी 2024 मे एक भी घटना पथराव की नही हुई हैं।
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. बुद्धिबळपटू डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा ॲथलीट प्रविणकुमार आणि नेमबाज मनू भाकर या चौघांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कोल्हापूरचा नेमबाज स्वनिल कुसाळे आणि सांगलीचा पॅरा ॲथलीट सचिन खिल्लारीसह ३२ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. नेमबाजीच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांच्यासह तीन जणांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला असून, दिव्यांग जलतरणपटू पद्मश्री मुरलीकांत पेटकर आणि ॲथलीट सूचा सिंग यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. १७ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी सर्व पुरस्कार विजेत्याचं अभिनंदन करत आगामी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पारंपारिक शेतीकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळण्याचं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. ते काल अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातल्या बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी परिसंवादात बोलत होते. या परिसरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन चौहान यांच्या हस्ते करण्यात आलं.
शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा, असं आवाहन ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी केलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत रसाळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहित्याबाबत अभिरुची निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले.. लहानपणापासून मुलांना जर वाचायची सवय लावली, विद्यार्थ्याला, त्याचे अभिरुची जर शाळेच्या अभ्यासक्रमातून घडवली, तर चांगला अभिरुची संपन्न असा एक शिक्षित समाज आपण घडवू शकतो. दुर्दैवानं मराठी शिक्षण पद्धतीमध्ये हे फारसं होताना दिसत नाही. प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक या वर्गांमध्ये भाषिक शिक्षण दिलं जावं. पण माध्यमिक स्तरावर म्हणजे आठवीपासून शालांत परीक्षेपर्यंत जी पाठ्यपुस्तकं आहेत, ��्यामध्ये निवड ही अभिरुची वाढेल या दृष्टीने करावी.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे निवृत्त उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी डॉ रसाळ यांची घेतलेली ही मुलाखत आकाशवाणीवरून आज आणि उद्या अशा दोन भागात सकाळी साडे अकरा वाजता, प्रसारित केली जाणार आहे.
बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला अखेरचा सामना आजपासून ऑस्ट्रेलियात सिडनी इथं खेळवला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा तीन बाद ५७ धावा झाल्या होत्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देऊन जसप्रीत बुमराहकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे वार्षिक सामाजिक पुरस्कार काल जाहीर झाले. जळगाव जिल्ह्यात चोपडा इथल्या मानव सेवा तीर्थ संस्थेचे नरेंद्र पाटील यांना, "डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार" तर बीड जिल्ह्यातल्या संत मीराबाई आईसाहेब संस्थानच्या मठाधिपती हरी भक्त परायण राधाताई सानप यांना "डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार" जाहीर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं उद्या चार तारखेला हे पुरस्कार प्रदान केले जातील.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्वत सभेचा आज समारोप होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित केलेल्या या विद्वत सभेचं श्रीमंत अमरजीत राजे बारगळ यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाच्या एकोणसाठाव्या अधिवेशनाचं काल लातूर इथं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. बागडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात वि��िध विषयांवर मार्गदर्शन केलं. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात आज शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे.
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल ‘विद्यापीठ वाचत आहे’ हा उपक्रम राबवण्यात आला.
0 notes