#सिल्व्हर ओक
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून सर्व सहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल
खोट्या बातमीसंदर्भात खासगी वृत्तवाहिनीवर कारवाईचा आमदार पंकजा मुंडे यांचा इशारा
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरात २१ जुलैपर्यंत आंदोलनं
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद
आणि
देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम-राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे
****
संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अमोल शिंदे याच्यासह मनोरंजन डी, ललित झा, महेश कुमावत, सागर शर्मा आणि नीलम आझाद या सर्व सहा आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. या सर्व आरोपींना दोन ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून सुनावणी होणार आहे. या सर्वांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेत घुसखोरी केली, तसंच लोकसभेचं कामकाज चालू असतांना प्रेक्षकदीर्घेतून दालनात उतरत, धुराचे डबे फोडले होते.
****
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांनी आपल्याबाबत खोटी बातमी चालवणाऱ्या खासगी वृत्तवाहिनीवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांच्याबद्दल बातमी प्रसारित केली होती, या बातमीत काहीही तथ्य नसल्याचं सांगत, संबंधित वृत्तवहिनीविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं मुंडे यांनी ट्��िट संदेशात म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या या बैठकीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. भुजबळ यांनी मात्र, ही भेट ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती पवार यांना केल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणण्यामागे, शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. सरकार अध्यादेशाद्वारे हा कायदा आणत असून, सर्व विरोधी पक्षांचा या विधेयकाला पूर्णपणे विरोध आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूरारात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. येत्या २१ जुलै रोजी राज्यातल्या भाजपाच्या पाच हजार पदाधिकाऱ्यांचं पुण्यात अधिवेशन होणार असून या अधिवेशनात संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसंच तारीख ठरणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
दुधाला प्रतिलीटर ४० रुपये भाव तसंच रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपी देण्याच्या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरात आजपासून २१ जुलै पर्यंत तीव्र आंदोलनं करण्यात येणार आहे. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांनी ही माहिती दिली. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात आज आंदोलनाच्या दहाव्या दिवशी कोतुळ इथं आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूध हंडी फोडण्यात आली.
****
राज्य सहकारी पणन महासंघ तसंच नाफेड कार्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मका, तूर, चणा, मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी नाफेड कार्यालयाने ई समृध्दी पोर्टल तयार केलं आहे. शेतकऱ्यांनी या पोर्टलवर खरेदी पूर्व नोंदणी करावी, असं आवाहन पणन महासंघामार्फत आवाहन करण्यात आलं आहे. नोंदणीसाठी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला क्यूआर कोड स्कॅन करावा, अथवा संकेतस्थळाला भेट द्यावी, असं याबाबतच्या व���त्तात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे निकष आता अधिक सोपे करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन ही योजना आता खूप सोप्पी केली आहे. त्यांच्या साठी २१ ते ६५ वयोगटातील महिला, विवाहीत महिला, विधवा, घटस्फोटीत, परित्यकर्त्या आणि निराधार महिलांना त्याच बरोबर एखाद्या कुटूंबातील अविवाहित महिला तिला ही हा हक्क दिला जाणार आहे. ही अर्ज प्रक्रिया फार सोपी केली आहे त्यासाठी आता उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आहे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड चालू शकत याच बराबर पाच एकर शेतीची अट ही आता वगळण्यात आली आहे.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांची ही पूर्ण मुलाखत प्रासंगिक या सदरात प्रसारित केली जाणार आहे
****
नांदेड जिल्ह्यात या योजनेसाठी आतापर्यंत ७० हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. महिलांकडून ऑफलाईन अर्जही स्वीकारले जात आहेत. गावोगाव अर्ज भरून घेण्यासाठी शिबीरं घेतली जात आहेत. महापालिकेअंतर्गतही अर्ज भरून घेण्यासाठी मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. कोणीही मध्यस्थामार्फत अर्ज भरून घेण्यासाठी प्रयत्न करू नये तसंच कोणी पैसे मागत असतील तर त्यांची तक्रार करावी असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिला मोठी गर्दी करत आहेत. मोबाईलवर तसंच सेवा केंद्रांवरूनही हे अर्ज भरता येणार आहेत.
यासाठी प्रत्येक ग्राम पातळीवर ग्राम समिती आणि नगर पंचायत तसंच नगरपालिका पातळीवर वॉर्डसमिती नियुक्त केली असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महिलांच्या सुविधेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सोपी झाली असून अधिकाधिक महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
****
देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोसमी पावसासाठी महाराष्ट्रासह देशभरात पोषक वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे असणार असून, किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्��वला आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरडी कोसळणं आणि वीज अंगावर वीज कोसळून मृत्यू झालेल्यांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. राज्यातील २० जिल्ह्यांतील साडे आठ लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. नाशिकमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोणावळ्यातील धबधब्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांनी पुराची पातळी गाठली आहे. खेड ते दिवाणखवटी दरम्यान दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आजही पावसाच्या सरी कोसळल्या. जालना शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात आज दुपारी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. जालना आणि छत्रपती संभाजीनगर शहरासह, बीड, धाराशिव तसंच परभणी जिल्ह्यात काल अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
महसुली कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. सुधारित आकृतीबंध कर्मचारी कपात न करता लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या या आंदोलनामुळे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, तसंच वसमत या तहसील कार्यालयात आज कामकाज होऊ शकलं नाही. परभणी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे.
बीड इथं संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी इमारती बाहेर निदर्शने करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगर इथंही महसूल विभागाचे बहुतांश कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारणीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांची यादी उद्यापासून परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यालयात अवलोकनासाठी ठेवण्यात येणार आहे.
****
0 notes
Text
गौतम अदाणींनी सिल्वर ओक बंगल्यावर घेतली शरद पवारांची भेट!
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस उद्योगपती गौतम अदानी (Gauram Adani) यांना टार्गेट करतं. अशातच उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. या चर्चेवेळी राष्ट्रवादीचा (Ncp) एकही नेता उपस्थित नव्हता. या दोघांमध्ये चर्चा काय झाली हे गुलदस्त्यात आहे शरद पवार (Sharad Pawar) आणि गौतम अदाणी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अदाणी किंवा शरद पवार यांच्याकडून काहीही तपशील समोर आलेला नाही. दरम्यान, गौतम अदाणी यांनी 20 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असा हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर खळबळ माजली होती. हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी हिंडेनबर्ग हे नाव आपण ऐकलं नाही असं म्हटलं होतं. अशात अदाणींनी पवारांची भेट घेतल्यानं खळबळ माजली आहे. महत्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
Text
शरद पवारांनी पती-पत्नीच्या भांडणाप्रकरणात काहीही कारवाई केली नसल्याचा राग
शरद पवारांनी पती-पत्नीच्या भांडणाप्रकरणात काहीही कारवाई केली नसल्याचा राग
शरद पवारांनी पती-पत्नीच्या भांडणाप्रकरणात काहीही कारवाई केली नसल्याचा राग खा.शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. दिवाळीतही त्यांना अशा स्वरूपाच्या धमकीचे जवळपास 100 फोन आले होते. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदवत बिहारमधील नारायण सोनी याला ताब्यात घेतले आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाच्या दूर���्वनीवर फोनवर ही धमकी दिली. पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. 2…
View On WordPress
0 notes
Text
Sharad Pawar Silver Oak Mumbai House 2 Corona Positive Cases
Sharad Pawar Silver Oak Mumbai House 2 Corona Positive Cases
[ad_1]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा बंगला सिल्व्हर ओकवर दोघांना कोरोनाची लागण ��ाल्याचं समोर आलं आहे. हे दोघेही जण शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक असल्याची माहिती आहे. दरम्यान यांपैकी कुणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हते अशीही माहिती आहे.
रॅपिड टेस्टमध्ये सिल्व्हर ओकवरील हे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र: एमव्हीए सरकार वाचवण्यासाठी शरद पवार बाहेर पडले, सिल्व्हर ओक येथे महत्त्वपूर्ण बैठक, आता दिल्लीला रवाना
महाराष्ट्र: एमव्हीए सरकार वाचवण्यासाठी शरद पवार बाहेर पडले, सिल्व्हर ओक येथे महत्त्वपूर्ण बैठक, आता दिल्लीला रवाना
महाराष्ट्राच्या संकटाचा सामना करण्यासाठी शरद पवार यांनी सिल्व्हर ओक येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली दरम्यान, विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या नामांकनाला हजेरी लावण्यासाठी शरद पवार दिल्लीला जात आहेत.त्याला सामोरे जाण्यासाठी तयारीचा कार्यक्रमही सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा आज (26 जून, रविवार) सहावा दिवस आहे. एकनाथ शिंदे (एकनाथ शिंदे) गटाचे बंडखोर आमदार…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध
देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर आज झालेल्या हल्ल्याच्या काही वेळातच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत हे आजच्या घटनास्थळी धाव घेतली आणि झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त केला. देशाला लांच्छनास्पद या हल्ल्याची घटना आहे.न्यायालयाचा निर्णय संपकरी…
View On WordPress
0 notes
Text
अखेर अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांनी ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर दिले
अखेर अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांनी ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर दिले
मुंबई : मुंबई दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चाही केली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार…
View On WordPress
0 notes
Text
subodh bhave wants to play role of sharad pawar | सुबोध भावे साकारणार शरद पवार?
subodh bhave wants to play role of sharad pawar | सुबोध भावे साकारणार शरद पवार?
[ad_1]
मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायची इच्छा बोलून दाखवली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सुबोध भावेने शरद पवारांची भेट घेतली. सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका साकारायला मला नक्कीच आवडेल, असं तो…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा; पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा या निर्णयाला तीव्र विरोध; तर हा पक्षांतर्गत निर्णय असल्याची अन्य पक्षांची भूमिका.
राज्यात निवडणुका झाल्या तर विरोधकांना सपशेल पराभूत करू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा.
खारघरसह विविध मुद्यांवर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेस पक्षाची मागणी.
आणि
प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासोबत परिचर्या महाविद्यालय देण्याचा राज्य सरकारचा विचार.
****
खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. लोक माझे सांगाती, या पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचं आज मुंबईत प्रकाशन झालं, या समारंभात शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय अचानक जाहीर केला –
एक मे एकोणीसशे साठ ते एक मे दोन हजार तेवीस इतक्या प्रदीर्घ काळाच्या नंतर कुठतंरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे.
पवार यांच्या या निर्णयामुळे उपस्थितांसह पक्षाचे पदाधिकारी, नेते तसंच कार्यकर्त्यांना धक्का बसला. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी हा निर्णय परत घेण्याचा आग्रह केला. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांना यावेळी भावना अनावर झाल्या. पवार यांच्याशिवाय राजकीय जीवन व्यर्थ असल्याची भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, पक्षाची फेररचना करायची असल्यास आम्ही सगळे जण तयार आहोत, पण शरद पवार यांनी अध्यक्षपदी रहावं, असा आग्रह केला.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पवार यांच्या निर्णयामागची भूमिका समजावण्याचा प्रयत्न केला. वाढत्या वयामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून, ते फक्त अध्यक्षपदावरून दूर होत आहेत, असं सांगताना, अजित पवार यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा दाखला दिला. पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला कायम मिळत राहील, त्यांच्या मार्गदर्शनात नवीन अध्यक्ष तयार झाला, तर हरकत काय, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. ते म्हणाले –
काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. आणि साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं. उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला जे काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील ना. साहेब महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहेत. साहेब देशामध्ये फिरणारच आहेत. ते वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातनं पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना होणारच आहे. नवीन होणारा अध्यक्ष, नवीन होणारी कार्यकारीणी, बाकीचे सगळे सहकारी, साहेबांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात भावनिक होण्याचं काही कारण नाही.
मात्र, अजित पवार यांच्या या सांगण्याला जवळपास सगळ्याच नेत्यांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी विरोध करत शरद पवार यांनी तहहयात पक्षाच्या अध्यक्षपदी रहावं, असा आग्रह सुरूच ठेवला. शरद पवार यांनी निर्णय मागे घे��पर्यंत सभागृहातच उपोषणाला बसण्याची घोषणा कार्यकर्त्यांनी के���ी. यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासोबत पुन्हा चर्चा करण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे प्रस्थान केलं.
दरम्यान, सध्या सिल्व्हर ओकवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. पवार यांनी कार्याध्यक्ष नियुक्त करून, पक्षाच्या कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवावी, मात्र अध्यक्षपदी शरद पवार यांनीच कायम राहावं, असा प्रस्ताव अनेक नेत्यांनी या बैठकीत दिल्याचं वृत्त आहे. पवार यांनी आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. धाराशिव, बुलडाणा इथल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे, हे राजीनामा सत्र तत्काळ थांबवण्याची सूचना शरद पवार यांनी केल्याचं, अजित पवार यांनी सांगितलं.
****
दरम्यान, पवारांचा अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना शरद पवार हे फक्त अध्यक्षपदावरून दूर होत आहेत, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही, याकडे लक्ष वेधलं.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात बोलताना, देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी अध्यक्षपदावरून बाजूला होणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं.
दरम्यान, शरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असून, ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. या क्षणाला त्यावर बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि योग्यवेळी त्यावर बोलू, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्यात निवडणुका झाल्या तर विरोधकांना सपशेल पराभूत करू, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज गडचिरोली इथे माध्यमांशी बोलत होते. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, असं आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच दिलं आहे, त्यासंदर्भातल्या प्रश्नाला फडणवीस यांनी हे उत्तर दिलं. बारसू शुद्धीकरण प्रकल्पाबाबत विरोधक दुटप्पीपणानं वागत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा डाव आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाच्यावेळी खारघर इथे झालेली दुर्घटना, अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची गरज, स्थानिकांचा विरोध असलेला बारसू प्रकल्प, या सगळ्या मुद्यांवर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस पक्षाने राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवनात भेट घेतली, त्यानंतर पटोले माध्यमांशी बोलत होते. सरकारच्या महसूल आणि कृषी विभागाकडे असलेल्या पीकपेऱ्याच्या म��हितीच्या आधारे सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, पंचनाम्यांसाठी थांबू नये, असं पटोले यावेळी म्हणाले.
****
प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासोबत परिचर्या महाविद्यालय देण्याबाबत गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसंच नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या दोन अद्ययावत हृदयरोग अतिदक्षता कक्षांच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते. वैद्यकीय क्षेत्राच्या मनुष्यबळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला असून येत्या दीड महिन्यात सुमारे पाच हजार कर्मचारी नियुक्त केले जातील, असंही महाजन यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असलेली जमीन कृषी विभागाकडून दिली जाईल, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. लातूर इथं कृषी महाविद्यालयाच्या, अनुसूचित जातींच्या मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वसतीगृहाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. या रुग्णालयासाठीच्या दहा एकर जमिनीची मागणी कृषी विद्यापीठाकडे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सत्तार यांना दिली, त्यानंतर कृषीमंत्र्यांनी ही घोषणा केली. कोविड साथीमुळे दोन वर्षं रद्द झालेली सोयाबिन परिषद येत्या चौदा ऑगस्टला लातूरमध्ये होणार असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं. लातूरच्या कृषी महाविद्यालयासाठी यावर्षी पन्नास कोटी रुपयांचा निधी दिल्याची, तसंच मुलींच्या आणि मुलांच्या अजून प्रत्येकी एका वसतीगृहाला मंजुरी दिल्याची माहितीही सत्तार यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका आयुक्तपदी जी.श्रीकांत यांची नेमणूक झाली आहे. जी.श्रीकांत हे २००९ च्या आयएएस तुकडीचे अधिकारी असून या नियुक्तीपूर्वी ते छत्रपती संभाजीनगर इथं राज्य कर विभागाच्या सह आयुक्त पदावर कार्यरत होते.
****
आजपासून येत्या पाच तारखेपर्यंत मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. यातच, आज म्हणजे दोन मे आणि परवा, म्हणजे चार मे ला, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यताही हवामान केंद्रानं वर्तवली आहे
****
0 notes
Text
औरंगाबाद नामांतरावरून आघाडीत धुसफूस, शिवसेनेच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध!
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकार संकटात आले असताना दुसरीकडे औरगांबाद जिल्ह्याच्या नामांतरावरून आघाडीत धुसफूस सुरू झाले असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत शिवसेनेच्या अनिल परब यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर काँग्रेस नाराज असल्याचे वृत्त आहे. आज सकाळी ��िल्वर ओकवर झालेल्या बैठकीत काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. मात्र, शिवसेनेचा एकही प्रतिनिधी सहभागी झाला नाही. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे अनिल परब यांनी मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मांडला होता. त्याच प्रस्तावावर आज सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. काँग्रेसकडून शिवसेनेनं घेतलेल्या नामकरणाच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. शिवसेनेत बंड केलेले आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाकडूनही औरंगाबादच्या नामांतरावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. शिवसेनेकडून दीर्घकाळ याची मागणी करण्यात येत होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर या नामांतराचा मुद्दा भाजप, मनसेकडून उपस्थित करण्यात येत होता. पोलिस भरती प्रक्रिया तात्काळ राबविणार : वळसे पाटील दरम्यान, राज्यात आता ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती होणार आहे.पोलीस भरतीला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या भरती संबंधिची प्रक्रिया तात्काळ राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या भरतीसाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे. राजयतील पोलीस भरती ही दोन टप्प्यामध्ये करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील पाच हजार पोलीस भरती ही पूर्ण झाली असून दुस-या टप्प्यातील सात हजार २३१ पदांसाठीची ही भरती आता करण्यात येणार आहे. काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार दुस-या टप्प्यातील या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या संबंधी प्रक्रिया त्वरीत सुरू करण्यात येणार असून तसे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना देण्यात आल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. Read the full article
0 notes
Text
मोठी बातमी.! शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला
मोठी बातमी.! शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला
मोठी बातमी.! शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला मुंबई – सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात धमक्यांचं सत्र मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (दि. १३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी समोर आली होती. मुंबईतील सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी दिली होती. मात्र, शरद पवार अधिवेशनासाठी दिल्लीला गेले…
View On WordPress
0 notes
Text
विधानसभेत मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षाच्या आघाडीत घेण्याच्या हालचाली...
विधानसभेत मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षाच्या आघाडीत घेण्याच्या हालचाली…
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. मंगळवारी ‘सिल्व्हर ओक’ येथे ही भेट झाली. लोकसभा निवडणुकीनंतर आता महराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय भेटीगाठींना उधाणं आलंय.
पक्षाच्या अनौपचारिक बैठकीत राज ठाकरेंनी लोकसभा निकालाबाबत नेत्यांची मते जाणून घेतली. लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादी…
View On WordPress
0 notes
Text
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह महाराष्ट्र राज्य परिवहनच्या 115 कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर, शरद पवार यांच्या घराबाहेर हल्ला प्रकरण
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह महाराष्ट्र राज्य परिवहनच्या 115 कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर, शरद पवार यांच्या घराबाहेर हल्ला प्रकरण
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 115 कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर प्रतिमा क्रेडिट स्रोत: फाइल फोटो शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनात सहभागी असलेले अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते (अॅड. गुणरत्न सदावर्ते) आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 115 कर्मचाऱ्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन…
View On WordPress
0 notes
Text
माथेफिरूचा पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला
माथेफिरूचा पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला
मुंबई : मरीन ड्राईव्ह परिसरात गस्तीवर असणाऱ्या दोन पोलिसांवर करण नायर नावाच्या माथेफिरूने कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. यात पोलिसांना अशा प्रसंगांनाही सामोरं जावं लागत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
करण प्रदीप नायर असं या माथेफिरूचं नाव आहे. तो ब्रीच कँडी येथील सिल्व्हर ओक इस्टेटमध्ये राहतो. पोलीस…
View On WordPress
0 notes
Text
लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पवारांच्या भेटीला
लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पवारांच्या भेटीला
लोकसभा निकालानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी आता चालू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या राजकीय भेटीने राज्यात चर्चाना उधाण आले आहे.
शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे सायंकाळी ही भेट झाली. सुमारे पाऊण तास चाललेल्या भेटीत अनेक राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या…
View On WordPress
0 notes
Text
शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला, दोन-तीन महिन्यांपासून सतत फोनवरून देत होता धमकी…
शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला, दोन-तीन महिन्यांपासून सतत फोनवरून देत होता धमकी…
शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला, दोन-तीन महिन्यांपासून सतत फोनवरून देत होता धमकी… गोविंद ठाकूर, मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या घरी अज्ञात व्यक्तीने फोन करून पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि मुंबईत आल्याचे सांगून देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.…
View On WordPress
#गुन्हे��ारी#देणाऱ्या#देत#दोन-तीन#धमकी#पवार#फोनवरून#महिन्यांपासून#यांना#लागला#व्यक्तीचा#शरद#शोध#सतत#होता
0 notes