#सामान्यांचं
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
सर्व सामान्यांचं शासकीय कार्यालयांतलं खेटे मारणं बंद व्हावं यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
विधानसभा अध्यक्षांची शिवसेनेच्या शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस, उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी.
भाजपबरोबर जाण्याचा निर्णय कधीही घेतला नाही- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा खुलासा.
आणि
विकासकामांमुळंही काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द तर काही अंशत: रद्द.
****
सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी शासकीय कार्यालयांमध्ये खेटे मारणं बंद व्हावं, यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गडचिरोली इथं हा उपक्रम झाला, त्यावेळी शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत आल्यानं शासनाची शक्ती आणखी वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
डबल इंजिनला अजून एक इंजिन जोडलेलं आहे. त्यामुळे हे ट्रीपल इंजिन या राज्याचा विकास करेल. सर्वसामान्य माणसाला न्याय देईल. घरी बसून काम करणाऱ्यांपेक्षा सर्वसामान्यांच्या दारी जावून काम करणाऱ्यांसोबत आपण जायला पाहिजे, विकासाला साथ दिली पाहिजे, हे ही दादांना पटलं. आणि म्हणून दादा सोबत आले.
मंत्र्यांबरोबरच सचिवांनीही जिल्ह्याचे दौरे केले पाहिजे, असं सांगून विकासकामं गुणवत्तापूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन वर्षांत कार्यान्वित होणार असून, शेतकऱ्यांना यामुळं पूर्णवेळ पाणी मिळेल, असं ��पमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. या सर्वांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या अंतर्गत अपात्रते विरोधातली कारवाई टाळण्यासाठी आमदारांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी सुरू होणार असल्याचंही विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
****
भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याबाबत चर्चा झाल्या असल्या तरी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय कधीही घेतला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्य दौऱ्याचा प्रारंभ आज नाशिक दौऱ्यानं केला, त्यावेळी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्ष कमकुवत करत असल्याची टीका त्यांनी केली. आपल्याच पक्षातल्या आमदार आणि काही नेत्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो. पक्षातले फुटीर आपण ओळखू शकलो नाही. हा आपलाच दोष आहे, असं ते म्हणाले. आपण थकलेलो नाही आणि निवृत्तही झालेलो नाही, असं त्यांनी आवर्जून नमुद केलं. आपण आपली मुलगी सुप्रिया सुळे यांच्यावर सतत अन्याय केला. प्रफुल्ल पटेल यांना पराभवानंतरही राज्यसभेवर पाठवलं, केंद्रीय मंत्रिपद दिलं, असं पवार या संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. येवला इथं शरद पवार यांची एक जाहीर सभा सध्या सुरू आहे.
****
रेल्वे मंत्रालयानं आज सर्व रेल्वे गाड्यांच्या ‘एसी चेअर कार’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’च्या भाडेशुल्कात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली. ही कपात त्वरीत लागू होणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. वातानुकूलित तसंच वंदे भारतसह सर्व गाड्यांना हे सवलतीचे दर लागू होणार आहेत. वातानुकुलीत डबे असलेल्या गाड्यांमध्ये सवलतीच्या दराची योजना लागू करण्याचे अधिकार विभागीय रेल्वेला देण्यात आले आहेत. आरक्षण शुल्क, जलद गति अधिभार, जीएसटी यासारखं इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारलं जाणार आहे. यापूर्वी आरक्षित तिकीट दरावर कोणताही परतावा दिला जाणार नाही तसंच ही योजना विशेष रेल्वे गाड्यांवर लागू होणार नाही, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातल्या विविध विद्यापीठांमध्ये एकमेकांशी संवाद साधण्याकरता ‘इंटर युनिवर्सिटी ई बोर्ड ऑफ स्टडीज’ ची संकल्पना राज्य शासनाकडे मांडण्यात येणार आहे. या संदर्भातल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत या संबंधी माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगानं सुकाणू समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप शहरातल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात आज झाला. त्यानंतर ते बोलत होते. विद्यापीठातल्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. एनसीसी, एनएसएस, प्रशिक्षण आदींचं अतिरिक्त गुणांकन काय असावं, नविन अभ्यासक्रमाचा कार्यकाळ यासारख्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या संदर्भातल्या सूचना शासनाला पाठवणार असल्याचं करमळकर यांनी यावेळी सांगितलं. या धोरणाचा समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठानं शिबिरांचं आयोजन, स्पर्धा, चित्रप्रदर्शन, व्याख्यानांचं आयोजन करावं अशा सूचना राज्य सरकारला करणार असल्याचंही करमळकर यांनी यावेळी सांगितलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या देखरेखीच्या कामामुळं नरसापूर-नगरसोल-नरसापूर ही रेल्वे परवा, सोमवारपासून १५ जूलै पर्यंत औरंगाबाद ते नगरसोल अंशत: रद्द करण्यात आली आहे. रेल्वेतर्फे ही माहिती देण्यात आली आहे. हैद्राबाद रेल्वे विभागामध्ये सुरू असलेल्या विकासकामांमुळंही काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या सोमवारपासून १६ जुलै पर्यंत निझामाबाद - नांदेड - निझामाबाद जलद गाडी रद्द करण्यात आली आहे. तर निझामाबाद ते पंढरपूर जलद रेल्वे मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. दौंड ते निझामाबाद जलद रेल्वे उद्यापासून १५ जुलै पर्यंत मुदखेड ते निझामाबाद अशी अंशतः रद्द करण्यात आली आहे.
****
धुळे जिल्ह्यात औद्यागिक परिसरातल्या एका कंपनीवर आज कृषी आणि पोलिस विभा��ाच्या पथकानं छापा टाकत दहा लाख रूपयांच्या बनावट रासायनिक खतांचा साठा जप्त केला. या कारवाईत बनावट खताच्या आठशे गोण्या जप्त करण्यात आल्या. विभागीय कृषी विभागाच्या पथकानं जिल्हा गुणवत्ता नियंत्रकाना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांनी आज बाभळगाव इथं विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेतल्या.
****
बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी जिल्हा पोलीसांनी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये पोलिस विविध वाहनधारकांना वाहनं चालवताना काळजी घ्या, वाहनं हळू चालवा, असं सांगत आहेत. पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. वाहनाच्या आणि चालकांच्या तपासण्या या अंतर्गत केल्या जात आहेत.
****
औरंगाबाद शहर परिसरात आज बहुतांश ढगाळ वातावरण होतं पण पावसानं हुलकावणी दिली.
धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळं साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात नदी नाले दुथडी भरु�� वाहू लागले आहेत. साक्री तालुक्यातील दुसाणे गावात नाल्याचं पाणी शेतात शि��ून पिकांचं नुकसान झालं आहे. तर शिंदखेडा तालुक्यातल्या दरखेडा इथं वीज कोसळल्यामुळं एक बैल मरण पावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आज चौथ्या दिवशीही कायम आहे. बुलडाणा जिल्ह्यात दमदार पावसामुळं खोळंबलेल्या पेरण्याला सुरुवात झाली आहे. परवा सुरू झालेल्या पावसानं आज सकाळच्या सत्रात उघडीप दिली होती. त्यामुळं जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शेतकरी वर्गानं पेरणीला सुरुवात केली आहे. सोयाबीन, तूर, उडीद आदींसह पिकांच्या पेरणीला बुलडाण्यात सुरुवात झाली आहे.
****
आगामी एकशे बत्तीसाव्या ड्युरंड चषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या तीन आकर्षक चषकांची आज मुंबईत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. कुलाबा इथल्या आर्मी ऑफिसर्स इन्स्टिट्यूट मध्ये या चषकांचं प्रथम स्वागत करण्यात आलं. चषकाच्या स्वागतासाठीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस ॲडमीरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते. त्यानंतर ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया तसंच मरीन ड्राईव्ह इथं हे चषक मांडण्यात आले होत. दिल्ली इथून हा उपक्रम सुरू झाला आहे. ड्युरँड चषक स्पर्धा यंदा तीन ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान कोलकाता इथं खेळवण्यात येणार आहे. यात २४ संघ खेळणार आहेत.
****
पी. वी. सिंधू आणि लक्ष्यसेन कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज आपापल्या गटात उपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत. आपल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत सिंधू ही जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध आणि लक्ष्यसेन जपानच्याच केंता निशिमोतोविरुद्ध खेळणार आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मागील सीटवरील प्रवाशांनी सीट बेल्ट न लावण्याच्या मुद्द्यावरुन गडकरी संतापून म्हणाले, “सामान्यांचं राहू द्या मुख्यमंत्रीही…”
मागील सीटवरील प्रवाशांनी सीट बेल्ट न लावण्याच्या मुद्द्यावरुन गडकरी संतापून म्हणाले, “सामान्यांचं राहू द्या मुख्यमंत्रीही…”
मागील सीटवरील प्रवाशांनी सीट बेल्ट न लावण्याच्या मुद्द्यावरुन गडकरी संतापून म्हणाले, “सामान्यांचं राहू द्या मुख्यमंत्रीही…” “मागील सीटवर बसलेल्यांना आपण सीट बेल्ट घालण्याची गरज नाही असं वाटतं,” गडकरींनी व्यक्त केली खंत टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर कार आणि रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Amul Milk Price : ‘अमूल’ने दुधाच्या किमती वाढवल्या; सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार?
Amul Milk Price : ‘अमूल’ने दुधाच्या किमती वाढवल्या; सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार?
Amul Milk Price : ‘अमूल’ने दुधाच्या किमती वाढवल्या; सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार? अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी हे नवे दर लागू होतील. गेल्या काही महिन्यांपासून महागाईमुळे आधीच सामान्यांना महिन्याचा ताळेबंद मांडताना मोठी कसरत करावी लागत असताना आता पुन्हा एकदा आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. देशातील अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलनं दुधाच्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 July 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १० जुलै २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      दक्षिणेतल्या देवस्थानांप्रमाणे पंढरपूरचा विकास करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.
·      शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटाच्या ५३ आमदारांना विधिमंडळ सचिवालयाची नोटीस.
·      औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या ठरावाबाबत आपल्याला पूर्वकल्पना नव्हती-खासदार शरद पवार यांच्याकडून स्पष्ट.
·      आषाढी एकादशीचा उत्सव मराठवाड्यात भक्तिभावाने साजरा.
आणि
·      कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांची सुखरुप सुटका.
****
दक्षिणेतल्या देवस्थानांप्रमाणे पंढरपूरचा विकास करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज पंढरपूर इथं शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्य शासन राज्यातला सर्व घटकांच्या विकासासाठी कटीबद्ध आहे, हे सर्व सामान्यांचं सरकार आहे असं शिंदे म्हणाले. शिवसेनेच्या ४० आमदारांचा उठाव ही ऐतिहासिक घटना असून, हा उठाव सत्तेसाठी नसल्याचा, पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. आपण मुख्यमंत्री असलो तरी सर्वसामान्यांचा सेवक म्हणून कार्यरत राहणार असल्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पंढरपूर इथं ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ अंतर्गत विजेत्या कार्यालयाला पारितोषिक वितरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत हा उपक्रम कार्यक्षमपणे राबवण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.
****
विधीमंडळ सचिवालयाने शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटाच्या ५५ पैकी ५३ आमदारांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि त्यानंतर झालेला मुख्यमंत्र्यांचा विश्वासदर्शक ठराव या दोन्हींसाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून आपापल्या समर्थक आमदारांना पक्षादेश-व्हीप बजावण्यात आला होता. यामध्ये आपलाच व्हीप अधिकृत असा दोन्ही गटांचा दावा आहे. त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांच्या व्हीपचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी पाठवलेल्या या नोटिसीत आमदारांना सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांना ही नोटीस बजावण्यात आलेली नाही. उद्या सुनावणी होण्याची ��क्यता आहे.
****
गेल्या सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराच्या नामांतराचा ठराव घेतला, त्याबाबत आपल्याला पूर्वकल्पना नव्हती असं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबाद तसंच उस्मानाबाद शहरांच्या नामांतराऐवजी या शहरातल्या पाणी पुरवठ्यासह इतर नागरी समस्या आणि मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवं, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं आपण म्हणालो नाही, अडीच वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे असं आपण कार्यकर्त्यांना सुचवलं असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. नव्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी खूपच तत्परता दाखवली, अशी तत्परता दाखवणारे ते पहिले व्यक्ती असल्याची उपरोधिक टीका पवार यांनी केली.
शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाला काहीही आधार नसल्याची टीका पवार यांनी केली. ते म्हणाले –
कुणी हिंदुत्वाचा विषय काढतो, कुणी राष्ट्रवादीचा विषय काढतो ह्या सगळ्या गोष्टी सुरतला गेल्याच्या संबंधीचा निर्णय झाला. त्यानंतर हे झालेलं आहे. त्याच्या आधी निदान माझ्या तरी काही कानावर याची अशी काही गोष्ट आलेली नाही. तर जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाला काही आधार नाही. पण त्यामुळे काही तरी लोकांच्या समोर स्पष्टीकरण केलं पाहिजे याशिवाय दुसरा कुठलाही विषय नाही.
२०२४ ची निवडणूक महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी एकत्र लढवावी अशी आपली इच्छा आहे. मात्र त्याबाबत मित्रपक्षांसोबत अद्याप चर्चा झालेली नाही असंही पवारांनी स्पष्ट केलं.
****
नागपूर मधल्या डबल-डेकर उड्डाणपुलाच्या बांधकामाचं अनुकरण संपूर्ण देशात केलं जाणार असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज नागपुरात एका कार्यक्रमात बोलत होते. एकाच पीलरवर उड्डाणपूल आणि मेट्रो असल्याने तसंच महा मेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सोबत काम केल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात कपात झाली असून, कामही गुणवत्तापूर्ण झाल्याचं गडकरी यांनी सांगितलं. असाच डबल डेकर उड्डाणपूल पुण्यातही बांधला जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
****
देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने १९८ कोटींचा टप्पा पार केला आहे. दोन कोटी ६० लाख ७३ हजार ३६५ लसीकरण सत्रांतून १९८ कोटी ७६ लाख ५९ हजार २९९ नागरिकांना कोविड लस देण्यात आली. यामध्ये तीन कोटी ६५ लाखांवर किशोरवयीन नागरिकांचा समावेश आहे.
****
आषाढी एकादशीचा उत्सव आज मराठवाड्यातही भक्तिभावाने साजरा झाला. औरंगाबाद शहरात आज सकाळपासून पावसाची झड ल��गलेली असूनही, नागरिकांनी शहरातल्या विठ्ठलमंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. टाळ आणि मृदुंगाच्या गजरात रस्त्यावरून जाणाऱ्या दिंड्या सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या.
 औरंगाबाद जवळील प्रतिपंढरपूर इथं येणाऱ्या वारकऱ्यांना मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत एकनाथ महाराजांचा 'हरिपाठ' ग्रंथांचं वितरण करण्यात आलं. यावेळी विजय महाराज खेडकर तसंच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, वारकरी उपस्थित होते.
आमदार संजय शिरसाट यांच्या वतीनं वारकऱ्यांना फळवाटप करण्यात आलं. विविध सेवाभावी संस्था संघटनांच्या वतीनं प्रति पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भाविकांसाठी मोफत चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
****
जालना जिल्ह्यातल्या प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. सालाबादाप्रमाणे आज सकाळी आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. नगरप्रदक्षिणा करून ही मिरवणूक सायंकाळी मंदिरात पोहोचेल. पावसाची संततधार सुरू असतानाही पाखली मिरवणुकीत सहभागी भाविकांचा उत्साह कायम असून, सर्व धर्मियांकडून पालखीचं ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत केलं जात आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांची राजूर पोलिस आणि जहागिरदार वाडीतल्या युवकांनी सुखरुप सुटका केली. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि कळसूबाई शिखराच्या परिसरात कालपासून अतिवृष्टी होत आहे. पावसाचा अंदाज न आल्याने काल हजारो पर्यटक कळसूबाई शिखराकडे गेले होते. अडकलेल्या गिर्यारोहकांनी पोलिस मदत केंद्राला फोन करत माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गाईड आणि गावकऱ्यांच्या मदतीने मोहीम राबवत पर्यटकांची सुटका केली.
****
नाशिक जिल्ह्यात पावसाच्या संततधारांमुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गंगापूर धरणात ४० टक्के पाणी साठा झाला असून, भावली धरणात ५९ टक्के तर दारणा धरणात ६१ टक्के साठा झाला आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्यामुळे पालखेड धरणातून पाच हजार तर दारणा धरणातून तीन हजार आठशे दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
निम्न दुधना धरणाच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ पाहता, धरणातून कधीही पाणी विसर्ग करावा लागू शकतो, यामुळे धरणाच्या खालील बाजूस दुधना नदीपात्राजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा द���ण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या जालना कार्यालयाचे कार्यकारी अभियंता एस बी कोरके यांनी याबाबत सेलू, मानवत परभणी इथल्या उपविभागीय अधिकारी तसंच तहसीलदार यांना पत्र पाठवून सूचित केलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील पाच डोंगरी आणि कोयलारी या गावातील दूषित पाणी प्यायल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या चार व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रशासनाने चोवीस तासात ५ लाख रुपयांचे मदतीचे धनादेश पाठवले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना दूरध्वनी वरुन संपर्क करुन आढावा घेतला. जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेचे विविध चमू घटनास्थळी कार्यरत असून, पाच डोंगरी, कोयलारी काट कुंभ आणि चूरणी इथंल्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांची संख्या २३१ असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी सांगितलं.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
महावितरणमध्ये अधिकऱ्यांचा कोट्यवधींचा कमिशन घोटाळा उघड, पत्रामुळे बिंग फुटले
महावितरणमध्ये अधिकऱ्यांचा कोट्यवधींचा कमिशन घोटाळा उघड, पत्रामुळे बिंग फुटले
महावितरणमध्ये अधिकऱ्यांचा कोट्यवधींचा कमिशन घोटाळा उघड, पत्रामुळे बिंग फुटले वीज बिल भरलं नाही तर महावितरणकडून सामान्यांचं वीज कनेक्शन कापलं जातं. पण आता महावितरणमधील अधिकाऱ्यांनीच कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे महावितरणमधीलच एका अधिकाऱ्याने वरिष्ठांना पत्र लिहिल्याने हा घोटाळा उघड झाला आहे. वीज बिल भरलं नाही तर महावितरणकडून सामान्यांचं वीज कनेक्शन कापलं जातं. पण आता…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
पंतप्रधानांची नक्कल आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे ‘ते’ शब्द; राष्ट्रवादीनं जुन्हा व्हिडीओ ट्वीट करत साधला निशाणा!
पंतप्रधानांची नक्कल आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे ‘ते’ शब्द; राष्ट्रवादीनं जुन्हा व्हिडीओ ट्वीट करत साधला निशाणा!
पंतप्रधानांची नक्कल आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे ‘ते’ शब्द; राष्ट्रवादीनं जुन्हा व्हिडीओ ट्वीट करत साधला निशाणा! देशभरात हळूहळू वाढू लागलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडू लागलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत असताना रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे त्याचा अजूनच भडका उडत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती देखील वाढू लागल्या आहेत. या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 July 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ जुलै २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांसाठीचं आरक्षण लागू ** राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात ठिबक सिंचन योजनेसाठी ८० टक्के अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा ** शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कृषी आयोग स्थापन करण्याची शिवसेनेची मागणी ** आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी पंढरपूर नगरी दुमदुमली. आणि ** विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत यजमान इंग्लंडचा अंतिम फेरीत प्रवेश **** वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- मराठा आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. एमबीबीएस अभ्यासाक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती. यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी हे आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षण कायदा ३० नोव्हेंबर २०१८ पासून अमलात आला. मात्र, वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली होती. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून हे आरक्षण लागू करता येणार नाही, असा दावा याचिकार्त्यांनी केला होता. दरम्यान, राज्य सरकारनं काल २०१४मध्ये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरता आरक्षण देण्याचा काढलेला आदेश रद्द करण्याया शासन निर्णय जारी केला, यामुळे तात्पुरत्या स्वरुपात खुल्या प्रवर्गातून विविध पदांवर केलेल्या नियुक्त्या रद्द झाल्या आहेत. **** राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात ठिबक सिंचन योजनेसाठी ८०टक्के अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथं आयोजित कृषी पंढरी कार्यक्रमात ते काल बोलत होते. **** शेती तसंच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कृषी आयोग स्थापन करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत प��्रकारांशी बोलत होते. सरकारं बदलली तरी, प्रशासकीय यंत्रणा तीच असल्यामुळे, अंमलबजावणीतले कच्चे दुवे कायम राहतात, असे कच्चे दुवे दुरुस्त करण्याचा अधिकार या कृषी आयोगाला असावा, ठाकरे यांनी म्हटलं आहे. पीक विमा दाव्यांची देयकं अदा न केल्याच्या निषेधार्थ येत्या बुधवारी, मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर निषेध मोर्चा काढणार असल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतरही विमा कंपन्या पीक विम्याच्या दाव्यांचा निपटारा करणार नसतील, तर शिवसेना आपल्या भाषेत त्यांना समज देईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. **** प्रत्येक विद्यापीठांनी विस्तारीकरणाबरोबरच गुणवत्ता विकासाकडेही लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, श्रमिक पत्रकारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात २३८ सदनिकांच्या बांधकामाचं भूमीपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. **** आषाढी एकादशीनिमि��्त आज पंढरपूरमध्ये १२ लाख भाविकांचा मेळा जमला आहे. राज्य आणि राज्याबाहेरून अनेक दिंड्या आणि पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक तसंच वैयक्तिक वाहनांनीदेखील मोठ्या प्रमाणावर भाविकांची मांदियाळी पंढरपूरात अवतरली आहे. किर्तन, भजन, टाळ -मृदुगांच्या तसंच विठू नामाच्या गजरानं अवघं पंढरपूर दुमदुमनं गेलं आहे. पहाटे दोन वाजून १५मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्निक शासकीय महापूजा झाली.यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेस बसण्याचा मान लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या सांगाची सुनेवाडी तांडा इथल्या विठ्ठल चव्हाण आणि त्यांच्या पत्नी प्रयाग चव्हाण यांना मिळाला. आषाढी वारी सकारात्मक शक्तीचे दर्शन घडवते असं सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले…. पंढरी आणि माऊली सर्व सामान्यांचं आशास्थान आहे या महाराष्ट्रामध्ये ही शेकडो वर्षाची परंपरा या परंपरेला महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवला आमची संस्कृती अबाधित ठेवली आणि खऱ्या अर्थानं लाखो लोकं यावे या ठिकाणी येतात एक सकारात्मक शक्तीचा आविष्कार हा या वारीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा-आकांक्षा यांचे प्रतिनिधित्व करणारी अशा प्रकारची वारी आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, चांगला पाऊस येऊन बळी राजा सुखावला पाहिजे अशी मागणी आपण विठ्ठलाच्या ��रणी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या छोट्या पंढरपूरमध्येही आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. राज्यमंत्री अतुल सावे यांनी पंढरपूर इथं मध्यरात्रीनंतर सपत्नीक महापुजा केली. या यात्रेमुळे आज औरंगाबाद- पुणे रस्त्यावरच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** अनुसूचित जाती - जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा - अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्ह्यांचा तत्परतेनं तपास करुन गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा होण्यासाठी, कायद्याची प्रभावी अमंलबजावणी होणं गरजेचं आहे असं सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं त्यांनी या कायद्यासंदर्भात मराठवाडा विभागाची आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले... अॅट्रॉसिटी अॅक्ट ज्यागोष्टीचा आम्हाला अडसर वाढतो .विशेषता: शिक्षा होत नाही किंवा कोर्टामध्ये केसेसचा निकाल जास्त लागत नाही या विषयावर ती आम्ही चर्चा केली त्याची कारणे शोधायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर गावागावात वातावरण हे असता कामा नये तर वातावरण समभावाचा असावा अशा प्रकारची देखील इंस्ट्रक्शनस त्यांना दिलेले आहेत **** इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल उपांत्यफेरीत यजमान इंग्लंडनं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करतांना इंग्लंडसमोर विजयासाठी २२३ धावांचं आव्हान ठेवलं. इंग्लडनं हे आव्हानं ३२व्या षटकात ८ गडी राखून पूर्ण केलं. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी आता इंग्लड आणि न्यूझीलंड या संघामध्ये होणार आहे. या दोन्ही संघाना आतापर्यंत कधीच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मिळालेलं नाही. **** बीड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत संपादीत केलेल्या जमिनीच्या मावेजासाठी ११ कोटी ६९ लाख रूपये मंजूर केल्याबद्दल बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने काल राज्याचे रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणं १५ दिवसात मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. **** विद्यमान सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता केलेली नसून केवळ जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप अखि�� भारतीय काँग्रेस समितीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. लातूर शहर विधानसभा मतदार संघातल्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारून कामाला लागावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. **** परभणी जिल्ह्यात काल दुपारी बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. खरीपाच्या पिकांसाठी हा पाऊस पोषक असल्यानं, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहर परिसरातही काल पाऊस झाला. **** परभणी जिल्ह्यात जिंतूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार विजय भांबळे यांच्यावर कारवाई करावी, तसंच संबंधित कर्मचाऱ्याविरोधात दाखल केलेला मागासवर्गीय अन्याय अत्याचार प्रतिबंधक -ॲट्रासिटी कायद्यातर्गंत गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी संभाजी सेनेच्यावतीने काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. **** नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांच्यात काल नाशिक इथं सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर आणि महाराष्ट्र विश्वकोश मंडळाचे सचिव श्यामकांत उपस्थित होते. आरोग्य विद्यापीठाशी संबंधित असा विश्वकोष मंडलाचा हा पहिलाच करार असल्याचं म्हैसेकर यांनी सांगितलं. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 January 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १० जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि. ****  चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणं अनिवार्य नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा  नगराध्यक्षांना वित्तीय अधिकार आणि स्थैर्यासह विशेष अधिकार देण्याचा राज्य सरकारचा निर्णय  बीड जिल्ह्यातल्या गहिनीनाथ आणि नारायणगडाच्या विकासासाठी प्रत्येकी २५ कोटी रुपयांचा आराखडा आणि  अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर रिक्षातल्या सिलेंडरनं अचानक पेट घेतल्यानं तीन मुलांचा होरपळून मृत्यू ***** चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणं अनिवार्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्��टलं आहे. यासंदर्भात ३० नोव्हेंबर २०१६च्या आपल्याच निर्णयात न्यायालयानं बदल केला आहे. केंद्र सरकारनं स्थापन केलेली आंतर मंत्रालयीन समिती, याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना दिव्यांगांना उभं राहण्याची सक्ती नाही, हा नियम समितीचा निर्णय येईपर्यंत लागू राहील, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. ही समिती सहा महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. **** राज्यातल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांना वित्तीय अधिकार आणि स्थैर्य देण्यासह त्यांच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी त्यांना विशेष अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासाठी नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियमात सुधारणा करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणांनुसार आता थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना पहिली अडीच वर्षे पदावरून दूर करण्याची मागणी करता येणार नाही. त्यानंतर पदावरून दूर करण्याची मागणी केल्यास नगराध्यक्षांच्या गैरवर्तणुकीबाबतची ठोस कारणे नगरसेवकांना द्यावी लागणार आहेत. या आरोपांची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाणार असून या चौकशीत दोषी आढळल्यास जिल्हाधिकारी शासनाकडं अहवाल पाठवतील आणि त्याआधारे शासनामार्फत नगराध्यक्षांना पदावरून दूर करता येईल. तसंच नगरपरिषद निधी आणि शासन अनुदानातून होणाऱ्या कामांना वित्तीय मंजुरी देण्याचे अधिकार नगराध्यक्षांना प्राप्त होतील. नगरपरिषदेची निर्णय प्र��्रिया गतिमान करण्यासह प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी विविध सुधारणा यामध्ये प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. राज्यातील अकृषी विद्यापीठांनी आगामी शैक्षणिक वर्षाकरिता सादर केलेल्या बृहत आराखड्यांची अंमलबजावणी सुलभ व्हावी यासाठी राज्य सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात दुरुस्तीचा अध्यादेश पुन्हा जारी करण्यासही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. **** लातूर जिल्हा संपूर्णपणे हागणदारी मुक्तीच्या वाटेवर असून जिल्ह्यातल्या ७८३ ग्रामपंचायतीपैकी ७७३ ग्रामपंचायतीं हागणदारी मुक्त झाल्या आहेत. लोकवर्गणी आणि कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून गावं हागणदारीमुक्त करणारा लातूर जिल्हा मराठवाड्यातला एकमेव जिल्हा ठरणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर… लातूर जिल्ह्यातील दहा पैकी निलंगा आणि औसा तालुक्यातील फक्त ११ गावे हगणदारी मुक्त होण्याचे शिल्लक आहेत. निलंगा तालुक्यातील तांबाळा गावची जमिण खडकाळ असल्यामुळे शासकीय अनुदानातुन हे काम करणे शक्य होत नव्हते त्यामुळे या गावासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पर्सनल सोशल रिस्पॉन्सीब्लीटी म्हणून वर्गणी जमा केली. त्याच प्रमाणे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुंबईतील कंपण्याशी संपर्क करुन आठ लाख चौऱ्याएंशी हजार रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला आहे त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसातच लातूर जिल्हा हगणदारी मुक्त होणार आहे. औसा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायती पैकी १०४ ग्रामपंचायतीचे तर निलंगा तालुक्यातील ११६ पैकी १०९ ग्रामपंचायतीचे काम पुर्ण होत आले आहे. त्यामुळे शिल्लक ११ गावातील कामे येत्या चार ते पाच दिवसात पुर्ण होउन जिल्हा हगणदारी मुक्त होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी व्यक्त केला. आकाशवाणी बातम्यांसाठी अरुण समुद्रे, लातूर. **** शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सहकार आणि पणन विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असून, आता याकामी कॉर्पोरेट क्षेत्राचाही सहभाग घेणार असल्याचं सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं आहे. कॉर्पोरेट संस्था आणि खरेदी विक्री संघ, विकास सोसायट्या यांच्यामध्ये सामंजस्य करार करुन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यात येत असल्याचं ते म्हणाले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समविचारी पक्षांना एकत्रितपणे २०१९ची निवडणूक लढावी लागणार असल्याचं मत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं लातूर शहर आणि ग्रामीण विधानसभा मतदार संघातल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाचा सत्कार थोरात यांच्या ��स्ते काल करण्यात आला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ��ेतकरी, व्यापारी सरकारच्या विरोधात असल्याचं सांगून त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. **** बीड जिल्ह्यातल्या गहिनीनाथगड आणि नारायणगडाचा सर्वागिण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या प्रत्येकी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हे गड सामान्यांचं शक्तीस्थळ असल्यानं भक्तांच्या सोयी सुविधांसाठी आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. **** अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाट्याजवळ प्रवरासंगम इथं ऑटोरिक्षाला एका वाहनानं धडक दिल्यामुळं रिक्षातल्या सिलेंडरनं अचानक पेट घेतल्यानं रिक्षातल्या तीन मुलांचा होरपळून मृत्यु झाला. यात दोन मुली आणि एका मुलाचा समावेश असून ही सर्व मुले तेरा वर्षाच्या आतली आहेत. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात या मुलांचे आजोबा आणि रिक्षाचालक जखमी झाले आहेत. औरगांबाद इथले रहिवासी असलेले रफिक हाजी जाफर कुरेशी चांदा इथला साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून औरंगाबादकडं आपल्या नातवंडांसोबत रिक्षातून परत येत असतांना ही घटना घडली. **** प्राण्यांच्या संरक्षणासाठी लोकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होणं आवश्यक असल्याचं मत औरंगाबादचे अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या बैठकीत ते काल बोलत होते. प्राण्यांच्या संरक्षणासाठी सर्व यंत्रणांनी मिळून शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. **** लातूर जिल्हा अंधत्व आणि कर्करोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागानं ठोस पावलं उचलावीत अशा सूचना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्या आहेत. मुंबई इथं काल लातूर जिल्ह्यातल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत अर्थसंकल्पपूर्व आढावा घेऊन कोणत्या विभागाला किती विकास निधी आवश्यक आहे याचा आढावा घेण्यात आला. **** प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांर्तगत खासगी रुग्णालयांनी देखील सहभाग नोंदवून गरजूंना या अभियानाचा लाभ द्यावा, असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केलं. हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. या अभियानातंर्गत गरोदर महिलांची मोफत तपासणी केली जाते. **** पैठणच्या जायकवाडी धरणातून जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेतून अंबड शहराला दररोज चार दशलक्ष घनमीटर पाणी देण्याचा निर्णय मंत्रायलीन स्तरावर झाल्याची माहिती बदन��पूरचे आमदार नारायण कुचे यांनी काल अंबड इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. मुख्यमंत्र्यांचे ��प्पर सचिव प्रविण परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या उपस्थितीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी जालना आणि अंबड नगरपालिकांमध्ये करार करण्यात येणार असल्याचं कुचे यांनी सांगितलं. **** हिंगोली इथं बांधकाम कामगाराने काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तीन हजारांची लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेविका दगूबाई आनंदराव खोंडे या महिला कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडलं. सेनगाव तालुक्यातल्या जांभरून तांडा इथल्या शामराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी मजूर आहेत. त्यांना काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी दगूबाई खोंडे यांनी चार हजार रूपये लाचेची मागणी केली होती. *****
0 notes
airnews-arngbad · 8 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 June 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक  ३ जून २०१७ सकाळी ६.५० मि. ****
��� अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा • कर्जमाफीसह अनेक मागण्या मान्य झाल्यानं, राज्यातला शेतकरी संप मागे • अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आणि • रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात आज विविध रेल्वे विकास कामांना प्रारंभ. **** अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल रात्री उशीरा शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ३१ ऑक्टोबरपर्यंत कर्ज माफ करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाणार असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने मान्य केलं आहे की, ३१ ऑक्टोबरपर्यंत यासंदर्भातलं कर्ज माफ करण्यासंदर्भातली कार्यवाही केली जाईल. त्याकरता आम्ही एक समिती तयार करत आहोत, जी समिती यासंदर्भात अभ्यास करेल. त्यातनं गरजू शेतकरी वगळला जात नाही हे बघेल. आणि ज्याप्रमाणे मागच्या कर्जमाफीत काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला, तसा गैरफायदा घेता येणार नाही हे ही याच्यामध्ये ही समिती बघेल. या समितीमध्ये सरकारचे लोकं आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतील. त्यामाध्यमातनं अल्पभूधारक थकित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं होईल. शेतमालाच्या हमीभावासंदर्भात महिनाभराच्या आत राज्य कृषी मूल्य आयोगाचं गठन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केला. दूध दरवाढीसंदर्भातही २० जूनपर्यंत निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या सुमारे ७० टक्के मागण्या मान्य झाल्यानं, शेतकरी संप मागे घेत असल्याचं, शेतकरी संघटनांचे मुख्य समन्वयक धनंजय जाधव यांनी जाहीर केलं. ते म्हणाले.   या मागण्या आहेत त्याच्यामध्ये ७० टक्के मागण्या जवळपास आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलेल्या आहेत. आणि त्यामुळे हा आपला जो संप आहे हा आम्ही माघारी घेत आहोत. या बैठकीला शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी जयाजी सूर्यवंशी, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. **** दरम्यान, शेतकरी संपाच्या काल दुसऱ्या दिवशी मुंबई तसंच पुण्याकडे जाणारा शेतमाल आणि दुध पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शनं करत, दूध तसंच भाजीपाल्याचा पुरवठा रोखून धरला होता. त्यामुळे काल अनेक ठिकाणचे आठवडी बाजारही भरले नाहीत. **** राज्यात एक ते सात जुलै दरम्यान राबवल्या जात असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणं आवश्यक असल्याचं, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यात वृक्षलागवड मोहिमेच्या तयारीसंदर्भात काल आढावा बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते. विधानसभा ��ध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. **** सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेमध्ये सनदी सेवा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या १४ विद्यार्थ्यांची केंद्रीय नागरी सेवेत निवड झाली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाच्या वतीनं लवकरच या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचंही बडोले यांनी सांगितलं. **** अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल आज सायंकाळी पाच वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी ई महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावरून उमेदवारांना आपल्या गुणपत्रिका डाउनलोड करता येईल, अशी माहिती संबंधित कार्यालयाकडून देण्यात आली. **** केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई माध्यमाचा दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना आज दुपारी Cbse.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. **** महाराष्ट्रातल्या मालवण इथले मूळचे असलेले लिओ अशोक वराडकर यांची आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. आयर्लंडमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेवटच्या फेरीत ७३ पैकी ५१ मतं मिळवत वराडकर यांनी विजय मिळवला. वराडकर यांची आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल कोकणासह अनेक ठिकाणी फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. **** हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज परळी दौऱ्यावर येत आहेत. औरंगाबाद इथं मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेल्या तिकीट आरक्षण कार्यालयाचं उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते आज होणार आहे. परळी इथून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून हे कार्यक्रम होणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं. जालना ते नगरसोल डेमू गाडीचा साईनगर शिर्डी पर्यंत विस्तार करण्यात येणार असून, या गाडीला प्रभू हिरवा झेंडा दाखवतील. नांदेड आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांच्या अनेक विकास कामांचा प्रारंभही प्रभू यांच्या हस्ते यावेळी होणार आहे. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर येत आहेत. सकाळी पावणे अकरा वाजता मुख्यमंत्री नांदेड विमानतळावर पोहोचतील, त्यानंतर ते हेलिकॉप्टरनं परळीकडे रवाना होतील. साडे अकरा वाजेच्या सुमारास परळी रेल्वे स्थानकावर होणाऱ्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभाला ते उपस्थित राहतील. माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमांमध्येही मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. दुपारी सव्वा दोन वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं नांदेडकडे रवाना होतील. **** माजी मंत्री दिलीप देशमुख यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘दिलीपरावजी देशमुख: एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ या विद्याधर कांदे-पाटील लिखीत चरित्रग्रंथाचं काल लातूर इथं माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. देशमुख यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांनी काम केलेल्या संस्था प्रकाशझोतात आल्या, या शब्दात डॉ. वाघमारे यांनी देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला. **** स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवरील पदवीधर मतदार संघातून दहा नोंदणीकृत पदवीधरांची नव्याने निवडणूक घेण्यासाठी, नवीन मतदार यादी तयार केली जात आहे. कालपासून या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. विद्यापीठाच्या पदवीधरांनी तीन जुलै पर्यंत नाव नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. **** परभणी शहर आणि परिसरात काल शेतकरी संपाचा परिणाम जाणवला. भाजीपाला तसंच दूध फेकून दिलं जाण्याच्या भीतीनं तुरळक शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्रीसाठी आणल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** केंद्र सरकारच्या तीन वर्षपूर्ती निमित्त, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत काल परळी इथं रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यवसाय मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे तसंच खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी युवकांना मार्गदर्शन केलं. **** परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहर आणि परिसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाउस झाला. या पावसामुळे सर्व सामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं मात्र वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. ****
0 notes