#सामन्याला
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 10 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत आहे. यामध्ये २०२५-२६ च्या अनुदान मागण्या आणि संबंधित विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. या काळात एकंदर वीस बैठका नियोजित आहेत तसंच, बँकिंग कायदे-सुधारणा विधेयक, किनारी जहाज वाहतूक-कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये मंजूरीसाठी चर्चा होईल. येत्या ४ एप्रिलपर्यंत हे सत्र सुरु असणार आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळं आज पहाटे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अस्वस्थता आणि छातीत त्रास होत असल्यानं ७३ वर्षीय धनखड यांच्यावर हृदयरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
****
नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये आज सकाळी केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पतंजली मेगा फूड आणि हर्बल पार्कचं उद्घघाटन करण्यात आलं. संत्र प्रक्रीया उद्योगाशी संबंधित अशिया खंडातील सर्वात मोठं केंद्र म्हणून हे केंद्र असल्याचं वृत्त आहे. ज्यामुळे विदर्भात पिकवल्या जाणाऱ्या संत्र्यांची एका दिवशी जवळपास आठशे टन फळ��ंवर अशाप्रकारे प्रक्रिया केली जाऊ शकते. याद्वारे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.
****
देशात दर आठ मिनिटांना एका महिलेचा गर्भाशय कर्करोगानं मृत्यू होत असून हे थांबवण्यासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस-एचपीव्ही प्रतिबंधक लस ही माता, मुली बहिणींसाठी कवचकुंडले आहेत असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं.
कोल्हापूर इथं औद्योगिक सामाजिक जबाबदारी- सीएसआर अंतर्गत हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं काल संपूर्ण जिल्ह्यातील ९ वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते २६ वर्षापर्यंतच्या आणि त्यापुढील अविवाहित महिलांसाठी एचपीव्ही लसीकरणाचं आयोजन करण्यात आलं. या लसीकरण शुभारंभ कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.
एचपीव्ही लस घेतलेल्या मुलींना कोणताही त्रास होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं या संदर्भात सुरक्षित लस म्हणून मान्यता दिलेली आहे. यामुळं न घाबरता गर्भाशय कर्करोग टाळण्यासाठी ही लस घ्यावी, असं ते म्हणाले.
****
भंडारा जिल्ह्याच्या लाखनीनजीक राष्ट्रीय महामार्गावर मौजे गडेगाव शिवारात जनावरांची अवैध वाहतूक करणारी मालवाहू जीप पोलिसांनी ताब्यात घेत १३ गोवंशाची सुटका केली. महामार्गावर गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या पथकानं संशयाच्या आधारे पाठलाग करुन हे वाहन थांबवलं. त्यावेळी या वाहनात अवैधरित्या दाटीवाटीनं कोंबून कत्तलीच्या हेतुनं जनावरं नेण्यात येत असल्याचं आढळलं. याप्रक्ररणी वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  
****
पीएच. डी. संशोधन कार्य करणाऱ्या इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना संशोधन प्रगती अहवाल प्राप्त होताच त्यांच्या तपासणीनंतर, अधिछात्रवृत्तीची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, त्यामुळे निधी वितरणाबाबत विद्यार्थ्यांनी संभ्रम बाळगू नये, असं आवाहन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था- महाज्योतीतर्फे करण्यात आलं आहे.
आतापर्यंत २५ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील संशोधन अहवाल सादर केलेल्या ४१४ विद्यार्थ्यांना निधी वितरीत झालेला आहे. पात्र संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून शंभर टक्के दरानं सरसकट अधिछात्रवृत्ती अदा करण्यासाठी अंदाजित एकूण सव्वाशे कोटी रुपयांपेक्ष�� जास्त निधी लागणार असून महाज्योती कार्यालयानं या निधीची मागणी ही पूरक मागणीद्वारे शासनाकडे केलेली आहे.
****
येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गुजरात, कर्नाटक किनारी, केरळ आणि माहे इथे काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थितीचा अंदाज आहे.
****
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. दुपारी अडीच वाजता दुबई इथं सामन्याला सुरुवात होईल. चुरशीच्या या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. चॅम्पियन्स करंडक चषक पटकावण्यासाठी भारतीय संघ पूर्ण कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झालेला आहे.  या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं एकही सामना गमावलेला नाही. मात्र, चिवट खेळ करत क्षेत्ररक्षणातही तितकीच सरस भूमिका बजावणाऱ्या न्युझीलंडचा संघही विजयासाठी आतूर आहे.
****
भारतीय महिला कबड्डीपटूंनी आशिया करंडक पाचव्यांदा जिंकला आहे. इराणमध्ये तेहरान इथं सहाव्या आशिया महिला कबड्डी अजिंक्यपदाच्या सामन्यात त्यांनी काल यजमान इराणचा ३२-२५ अशा गुणांनी पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय महिला संघ अजिंक्य राहिला आहे.
****
भारताच्या सिद्धांत बांथिया आणि त्याचा बल्गेरियन सहकारी अलेक्झांडर डोन्स्की यांनी एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचं दुहेरी गटातील विजेतेपद पटकावलं. रवांडाची राजधानी किगाली इथं हा सामना खेळला गेला.
बांथिया आणि डोन्स्की या जोडीनं फ्रान्सचा जेफ्री ब्लँकेनॉक्स आणि चेक प्रजासत्ताकचा झ्डेनेक कोलार या जोडीनं दोन विरुद्ध एक असा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. आज एकेरी सामन्यानंतर या स्पर्धेचा समारोप होणार आहे.
****
0 notes
valentin10 · 1 month ago
Text
IND vs ENG : दुसरा एकदिवसीय सामना कटकमध्ये, मॅचच्या वेळेत बदल? - Marathi News | India vs england 2nd odi live and digital streaming know all details marathi news | TV9 Marathi
India vs England 2nd Odi Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली होती. दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? — À lire sur www.tv9marathi.com/sports/cricket-news/india-vs-england-2nd-odi-live-and-digital-streaming-know-all-details-marathi-news-1346928.html/amp
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला मनसेचा विरोध; देशपांडे म्हणाले, बाळासाहेबांना…
https://bharatlive.news/?p=108213 भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला मनसेचा विरोध; देशपांडे म्हणाले, ...
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
शिखर धवनचा इशान किशन, शुभमन गिल सोबतचा डान्स तुम्हाला तुडवेल. पहा | क्रिकेट बातम्या
शिखर धवनचा इशान किशन, शुभमन गिल सोबतचा डान्स तुम्हाला तुडवेल. पहा | क्रिकेट बातम्या
झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी, टीम इंडिया हरारे येथे विजय मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेवर हक्क सांगितल्यानंतर टीम इंडिया हरारेमध्ये पोहोचल्यामुळे आत्मविश्वासाने बहरला आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याला अवघा एक दिवस बाकी असताना भारताने धडाकेबाज फलंदाजी केली शिखर धवन सहकारी सहकाऱ्यांसोबत…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
समरस्लॅममध्ये रोमन रेन्स विरुद्ध ब्रॉक लेसनर मॅच बुक करणे ही WWE ची सर्वात मोठी चूक का आहे?
समरस्लॅममध्ये रोमन रेन्स विरुद्ध ब्रॉक लेसनर मॅच बुक करणे ही WWE ची सर्वात मोठी चूक का आहे?
WWE समरस्लॅम 2022 साठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. या कारणास्तव, त्याने समरस्लॅम 2022 साठी रोमन रेन्स विरुद्ध ब्रॉक लेसनर सामना जाहीर केला आहे. हा सामना अधिक मनोरंजक बनवण्यासाठी त्याने हा शेवटचा मॅन स्टँडिंग सामना बनवला आहे. त्यानंतर अनेक चाहते या सामन्याला चुकीचे बुकिंग म्हणत आहेत. अशा परिस्थितीत, या लेखात आम्ही कोक करतो की WWE ने हा सामना बुक करून मोठी चूक का केली आहे. रोमन रेन्सचा चॅम्पियन…
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
महिला वर्ल्डकप २०२२, भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह अपडेट- टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
महिला वर्ल्डकप २०२२, भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह अपडेट- टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
माउंट माउंगानुई: आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan Cricket Match)यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या या सामन्याचे लाईव्ह अडपेट महाराष्ट्र टाईम्स सोबत…भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह अपडेट (India vs Pakistan Cricket Match) >> >> भारताला विजयासाठी एका विकेटची गरज >> राजेश्वरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात
पृथ्वी शॉ-शिखर धवन सलामी जोडी मैदानात​ मुंबई : आयपीएलच्या १४ व्या हंगामातील ७ वा  सामना राजस्थान रॉयल्स  विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स  यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ही मॅच खेळवण्यात येत आहे. राजस्थानने टॉस जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. त्यामुळे रिषभ पंतची दिल्ली प्रथम बॅटिंग करत आहे. उभय संघांनी या मोसमातील पहिला सामना खेळला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajnetanewscom · 4 years ago
Text
MI vs RCB Live Score, IPL 2021 | मुंबईला चौथा धक्का, हार्दिक पांड्या आऊट
MI vs RCB Live Score, IPL 2021 | मुंबईला चौथा धक्का, हार्दिक पांड्या आऊट
चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) पहिला सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indins) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यात खेळवण्यात येत आहे. बंगळुरने टॉस जिंकून रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidambaram Stadium) खेळण्यात येत आहे. मुंबईला चौथा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 17 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०२ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 March 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०२ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
देशाचं वस्तू आणि सेवा कर-जी.एस.टी. संकलन गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारीमध्ये नऊ पूर्णांक एक शतांश टक्क्यांनी वाढून एक लाख, ८४ हजार कोटी रुपये झालं आहे. जीएसटी संकलन एक लाख, ७० हजार कोटी रुपयांहून अधिक जमा होण्याचा हा सलग बारावा महिना आहे. केंद्रीय जीएसटीमधून ३५ हजार, २०४ कोटी रुपये, राज्य जीएसटीमधून ४३ हजार, ७०४ कोटी रुपये, एकात्मिक जीएसटीमधून ९० हजार, ८७० कोटी रुपये तर नुकसानभरपाई उपकरातून १३ हजार, ८६८ कोटी रुपये महसूल प्राप्त झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत. पंतप्रधान आज वंतारा या प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्रासह सासन गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठकही होणार आहे. पंतप्रधान मोदी स्वत: अध्यक्ष असलेल्या सोमनाथ मंदिर संस्थानच्या महादेवाच्या मंदीरात पूजाही करणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळ-एस.टी.त भारतीय पोलिस सेवेतल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. पुण्यात स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने महिलांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. महिला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असून या प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे मिसाळ यांनी यावेळी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर इथं शहर विद्रूप करणाऱ्या नागरिकांविरुद्ध महानगरपालिकेनं दंडात्म�� कारवाईला सुरुवात केली आहे. नागरी मित्र पथक आणि मनपा कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत ८७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
धाराशिव इथं आज सकाळी फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत सायकल फेरी काढण्यात आली. नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं. श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम इथून फेरीला प्रारंभ झाला.
धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षातील संभाव्य पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे असे नि��्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत पुजार बोलत होते. पाण्याशी संबंधित असलेल्या यंत्रणांनी त्यांच्याशी संबंधित असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनादेखील त्यांनी यावेळी देण्यात आल्या.
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. दुपारी अडीच वाजता दुबई इथं सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेच्या अ गटातील हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतही दाखल झाले आहेत. दरम्यान, स्पर्धेच्या ब गटात काल झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर सात गडी राखत विजय मिळवला. या गटात पाच गुणांसह दक्षिण अफ्रिका अव्वल स्थानी तर ऑस्ट्रेलिया चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतानं आजचा सामना जिंकल्यास, उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीची शक्यता आहे.
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला प्रारंभ झाला आहे. काल सायंकाळी चंद्रदर्शनानंतर मशिदींमधून तरावीह ही रात्रीची विशेष नमाज अदा करण्यात आली. आज पहाटे सहर नंतर पहिला रोजा अर्थात उपवास सुरु झाला. आता संध्याकाळनंतर ईफ्तारद्वारे उपवास सोडला जाईल.रमजान महिन्याच्या अखेरीस ईद-उल-फित्र साजरी केली जाते.
भारतीय रेल्वेच्या विविध विभागांकडून आगामी सण होळीनिमित्त आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ,प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.दक्षिण मध्य रेल्वेकडून जालना ते पाटणा दरम्यान विशेष गाडीच्या सहा फेऱ्या करण्यात येणार आहेत. काचीगुडा ते अजमेर मदार या विशेष गाडीच्याही चार फेऱ्या होणार आहेत. तसंच, मध्य रेल्वेसुध्दा प्रमुख मार्गांवर ४८ अतिरिक्त रेल्वे गाड्यांच्या फेरी चालवणार आहे.यातील काही गाड्या ठाणे मार्गे नशिक रोड-जळगाव -भुसावळ मार्गावरील आहेत तर काही दौंड मार्गे अहिल्यानगर मार्गावर धावणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आला आहे.
गोसेवा आयोगाच्या पाठीशी शासन खंबीर पणे उभं असून महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे गोसंवर्धन आणि गोसंरक्षणाचे कार्य उत्तम असुन त्यासाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल. असं प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या काल पुण्यात गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित अधिवक्ता कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
समाजासाठी आवश्यक प्रत्येक काम करणे हे समाजाचेच दायित्व आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनक��्याण समिती'तर्फे आयोजित 'पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार' प्रदान समारंभात डॉ. कृष्णगोपालजी बोलत होते. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील 'गोयल ग्रामीण विकास संस्थान' आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
IND vs PAK: भारत-पाक सामन्याला तुफान गर्दी, ४ हजार तिकिटे वाढवली; कुठे बुक कराल? पाहा
IND vs PAK: भारत-पाक सामन्याला तुफान गर्दी, ४ हजार तिकिटे वाढवली; कुठे बुक कराल? पाहा
IND vs PAK: भारत-पाक सामन्याला तुफान गर्दी, ४ हजार तिकिटे वाढवली; कुठे बुक कराल? पाहा ICC T20 World Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी ज्यांना उभे राहून सामना बघायचा आहे त्यांच्यासाठी आयसीसीने ४००० तिकिटे जारी केली आहेत. ICC T20 World Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज: दुसऱ्या T20I ला दोन तास उशीर, हे कारण आहे | क्रिकेट बातम्या
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज: दुसऱ्या T20I ला दोन तास उशीर, हे कारण आहे | क्रिकेट बातम्या
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याला लॉजिस्टिक समस्यांमुळे विलंब झाला आहे. सोमवारी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणारा सामना आता भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. “सीडब्ल्यूआयच्या नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीमुळे, त्रिनिदादहून सेंट किट्समध्ये महत्त्वपूर्ण संघाचे सामान येण्यास लक्षणीय विलंब झाला आहे. परिणामी, आजचा दुसरा गोल्डमेडल T20 चषक सामना दुपारी 12:30 वाजता…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
IPL 2022: RCB चे '23 एप्रिल' पासून खास कनेक्शन, हे आकडे अतिशय धक्कादायक आहेत.
IPL 2022: RCB चे ’23 एप्रिल’ पासून खास कनेक्शन, हे आकडे अतिशय धक्कादायक आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या 36 व्या सामन्यात विराट कोहली गोल्डन डकवर आऊट झाला. त्याचवेळी आरसीबीच्या उर्वरित फलंदाजांनीही निराशाजनक कामगिरी केल्याने संघ अवघ्या 68 धावांवर आटोपला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) लाजिरवाण्या सामन्याला सामोरे जावे लागले. हा सामना 23 एप्रिल रोजी खेळला गेला आणि या दिवशी RCB ने त्यांची…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
खुशखबर! टीम इंडियाच्या ‘या’ सामन्यापासून प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश एका सामन्याला प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार | #IndvsAus #BoxingDay #AllowMaximum25kSpectators http://www.headlinemarathi.com/sports-news-marathi/team-india-vs-australia-boxing-day-test-mcg-to-allow-maximum-25k-spectators/?feed_id=15611&_unique_id=5f9a379076a73
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
गेल्या ४० वर्षात कधीच भारताचा पराभव झाला नाही; रोहित शर्माला कायम ठेवायचाय हा विक्रम
गेल्या ४० वर्षात कधीच भारताचा पराभव झाला नाही; रोहित शर्माला कायम ठेवायचाय हा विक्रम
नवी दिल्ली: भारत आणि श्रीलंका यांच्यात मोहाली येथे ४ मार्चपासून पहिली कसोटी मॅच होणार आहे. ही कसोटी विराट कोहलीच्या करिअरमधील १००वी कसोटी आहे. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक स्वरुप आले आहे. त्याच बरोबर या लढतीपासून रोहित शर्मा कसोटी संघाचे नेतृत्व करेल. नुकतीच त्याची कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली होती. वनडे आणि टी-२० मालिके प्रमाणेच आता पहिल्या कसोटी मालिकेत विजयाने सुरूवात करावी अशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Photo
Tumblr media
सावंतवाडीचा सुपुत्र आज दुबईत मैदान गाजवणार !!! आयपीएलच्या आजच्या कोलकाता आणि मुंबई या सामन्यात सावंतवाडीचा सुपुत्र निखिल नाईकला संधी मिळालीय. काही वेळात सामन्याला सुरुवात होणार असून निखिल त्यावेळी मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दिसेल.
0 notes
mhlivenews · 4 years ago
Text
विजयी संघ होणार मालामाल
विजयी संघ होणार मालामाल
मुंबई -अक्षय घुग��  मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आयसीसी क्रमवारीत (ICC Ranking) अव्वल स्थानावर असणाऱ्य़ा न्यूझीलंड आणि भारत (New Zealand vs India) यांच्यात इंग्लंडमध्ये 18 जूनपासून सामन्याला सुरुवात होणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगत वाट पाहत असलेल्या या सामन्यातील विजयी संघाला कोट्यावधींच्या बक्षिसासह आकर्षक आणि मानाची ट्रॉफी…
Tumblr media
View On WordPress
0 notes