#सभात्याग
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date -20 December 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
परभणीतल्या अप्रिय घटनेची, तसंच बीड जिल्ह्यात मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. विधानसभेत आज परभणी आणि बीड इथल्या घटनांबाबत झालेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते.
संविधानाचा अपमान करणाऱ्याची जात, धर्म, पंथ न पाहता कारवाई करण्यात येणार असून, या घटनेबद्दल अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. परभणीमधल्या अप्रिय घटनेतला आरोपी हा मनोरुग्ण आहे, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आणि दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या ५१ जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणी अतिरिक्त बळाचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोडबांड यांना निलंबित करून त्यांची चौकशी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. शांततेत आंदोलन सुरु असताना काही जण हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत असतील, तर सगळ्यांनी त्यावर आक्षेप घेतला पाहिजे, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रकरणात बीडच्या पोलिस अधिक्षकांची बदली केली असल्याचं त्यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात वाळू माफिया, उद्योगांना त्रास देणाऱ्यांना मोहिम राबवून सर्वांवर संघटित गुन्ह्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
अल्पकालीन चर्चेवर जितेंद्र आव्हाड यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत उत्तर मागितले असता अध्यक्षांनी ती नियमांतर्गत नाकारले यावर विरोधकांनी सभात्याग केला.
****
दरम्यान, विधानसभेत आलेल्या ��ीन स्थगन प्रस्तावाच्या सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ��ेटाळल्या. मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना, सत्ताधारी बाकांवरून काँग्रेस विरोधी घोषणा देत विरोध केला. काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार तसंच इतर सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो विधानसभेत बैठक स्थानावर लावले. नियमाप्रमाणे कुठल्याही नेत्याचे फोटो किंवा चित्र विधानसभेत झळकवण्यास अध्यक्षांनी मनाई केली, यावर दोन्ही बाकावरून बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थनार्थ घोषणा देत गदारोळ निर्माण झाल्यानं, अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं होतं.
****
हिंगोली जिल्हा बस आगाराला नविन बसेस उपलब्ध करुन द्याव्यात, हिंगोली मधल्या जिल्हा उपकेंद्रांना बळकट करुन सोयी सुविधा निर्माण कराव्या, रिक्त पदे भरावी, विस्कळीत झालेली आरोग्य सुविधा बळकट करावी आदी मागण्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आज विधान परिषदेत केल्या.
तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी, राज्यातल्या शाळांना देण्यात येणाऱ्या टप्पा अनुदानाकरता ९२६ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली.
****
संसदेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. लोकसभेत आजही विरोधी पक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. खासदारांनी सभागृहाची मर्यादा राखावी आणि संसदेच्या गेटबाहेर आंदोलन करू नये, असं आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं. हा गदारोळ सुरुच राहील्यानं अध्यक्षांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं.
दरम्यान, एक राष्ट्र एक निवडणुकीशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेनं संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवली आहेत. आज लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संविधान संशोधन विधेयक २०२४, आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक २०२४ समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव सादर केला. ही समिती आपला अहवाल पुढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सादर करेल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. या कार्यक्रमाचा आठवा भाग पुढील महिन्यात सादर होणार आहे. या संवादात्मक कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू झाली असून, १४ जानेवारीपर्यंत MyGov पोर्टलवर नोंदणी करता येईल. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना जीवन एक उत्सव म्हणून साजरे करण्यासाठी प्रोत्साहित करणं, ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
****
अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि सरहद, पुणेतर्फे दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते काल पुण्यात करण्यात आलं. दिल्लीत सुमारे ७० वर्षांनंतर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देऊन हे संमेलन अभूतपूर्व ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
****
रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटात आज सकाळी एका खाजगी बसच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. ही बस पुण्याहून महाड कडे लग्नाचं वऱ्हाड घेऊन जात होती. जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
जालना समाजकल्याण विभागातली महिला लिपीक सुलोचना साबळेला पाच हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. ॲट्रासिटीच्या गुन्ह्यातल्या तक्रारदारास मंजूर झालेल्या ७५ हजार रुपयांचं अनुदान खात्यावर वर्ग करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
****
0 notes
Text
Monsoon Session: मणिपूर घटनेवरून विरोधकांचा सभात्याग
https://bharatlive.news/?p=112889 Monsoon Session: मणिपूर घटनेवरून विरोधकांचा सभात्याग
आज विधिमंडळाचा पावसाळी ...
0 notes
Text
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांचा सभात्याग; शरद पवार गटाचे आमदार अनुपस्थित, चर्चांना उधाण
0 notes
Text
नितीश कुमार यांनी बिहार विधानसभेत बहुमत चाचणी जिंकली, भाजप बाहेर पडला: 10 तथ्ये
नितीश कुमार यांनी बिहार विधानसभेत बहुमत चाचणी जिंकली, भाजप बाहेर पडला: 10 तथ्ये
पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नव्या महाआघाडी सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. मतदानापूर्वी त्यांच्या भाषणाच्या निषेधार्थ भाजपने सभात्याग केला. या मोठ्या कथेतील शीर्ष 10 गुण येथे आहेत: भाजपच्या वॉकआउटनंतर झालेल्या मतदानात श्री कुमार यांना सर्व 160 मते मिळाली. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत नितीश कुमार यांच्या सरकारला 164 आमदारांनी पाठिंबा दिल्याने बहुमताची चाचणी ही…
View On WordPress
0 notes
Text
Petrol Price Hike : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला
#Petrol Price Hike : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला #Loksabha #India #National #PriceHike
(Courtesy Loksabha Tv) Petrol Price Hike : नवी दिल्ली (दि २२ मार्च २०२२) : मंगळवारी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी लोकसभेत मोठा गदारोळ केला. या विषयावर चर्चा घेण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फेटाळून लावल्यानंतर काँग्रेस, तृणमूलसहित इतर विरोधी खासदारांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला.जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रा���ील तेल…
View On WordPress
0 notes
Photo
...म्हणून ‘एससीओ’च्या परिषदेतून अजित डोवाल यांनी केला सभात्याग परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले | #AjitDoval #Pakistan #JammuKashmir #NSA http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/nsa-ajit-doval-leaves-sco-meeting-objecting-to-pakistans-fictitious-map-mea-busts-lies/?feed_id=10460&_unique_id=5f61acbc6a60f
0 notes
Text
नगरसेवकाकडून अतिरिक्त आयुक्तांना शिविगाळ
नगरसेवकाकडून अतिरिक्त आयुक्तांना शिविगाळ, #NagarsevakAbuse #Assistant commissioner #PuneCorporation #PmcBuilding
Nagarsevak Abuse |नगरसेवकाकडून अतिरिक्त आयुक्तांना शिविगाळ
Nagarsevak Abuse |सजग नागरिक टाइम्स :- पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाकडून
अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ करण्यात आल्याची घटना आज मंगळवारी घडली.
या घटनेमुळे स्थायी समितीच्या बैठकीत तणाव निर्माण झाला होता.
यामुळे चिडलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी सभात्याग करीत निषेध नोंदवला.
पुणे…
View On WordPress
0 notes
Photo
तारकर्लीत सरपंचाच्या सभात्यागामुळे ग्रामस्थ आक्रमक ; ग्रा. पं. ला ठोकले टाळे मालवण : ग्रामसभेत मागील सभेच्या इतिवृत्त वाचन व त्यातील ठरावाना मंजुरी देण्याच्या विषयावरून निर्माण झालेल्या वादात ग्रामसभेच्या अध्यक्षा तथा गावच्या सरपंचानी सभात्याग केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी मालवण तालुक्यातील तारकर्ली गावात घडली.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 18 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १८ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज बाधित झालं. अमित शहा यांनी काल राज्यसभेत संविधानावरच्या चर्चेला उत्तर देताना केलेल्या वक्तव्यावर, आज लोकसभेत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. आज सदनाचं कामकाज सुरु होताच या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेप��्यंत तहकूब झालं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेतही आज काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याचा आपण निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर भाजपचे आशिष शेलार यांनी हरकत घेतली आणि संसदेतल्या कार्यवाहीबाबत या सभागृहात बोलणं उचित नसल्याचं सांगितलं. त्यावर अध्यक्षांनी, हे वक्तव्य तपासून उचित कारवाई केली जाईल असं सांगितलं.
विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यसभेतला हा मुद्दा उपस्थित करुन चर्चेची मागणी केली. मात्र एका सभागृहाचा मुद्दा दुसर्या सभागृहात उपस्थित करता येत नसल्याचं सांगून, उपसभापती निलम गोर्हे यांनी ही मागणी फेटाळली. यावर विरोधी पक्षाचा सदस्यांनी गदारोळ केला आणि हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली. या गदारोळातच उपसभापतींनी विरोधक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करत असल्याचं म्हंटलं. त्यावर विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. दरम्यान, विधान परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती, तोपर्यंत राम शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.
सोयाबीन, कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचं सांगून विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. सोयाबीन, कापसाला योग्य भाव नाही, धानाला बोनस नाही, अशी स्थिती असून, सरकारने शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग - एमपीएससी मार्फत वर्ष २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.
जगभरातल्या संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातला मानाचा ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव आजपासून सुरू होत आहे. येत्या २२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्रीय संगीतातल्या अनेक दिग्गज कलाकारांसह १५ नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला येत्या २९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, यात्रा प्लास्टिक मुक्त करण���यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितलं. या यात्रेच्या आढावा बैठकीनंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. या यात्रेत शेतकऱ्यांसाठी भव्य कृषी आणि पशु प्रदर्शन, कृषिनिष्ठ शेतक-यांचा सत्कार, अश्व, श्वान, कुकूट प्रदर्शन आणि विविध स्पर्धेचे उद्घाटन, कुस्त्यांची दंगल, पारंपारीक लोककला महोत्सव, महिला आरोग्य शिबिर तसंच शेवटच्या दिवशी लावणी महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती करणवाल यांनी दिली.
क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आज ब्रिस्बेन इथं झालेल्या कसोटी सामन्यानंतर अश्विननं पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. अनिल कुंबळे नंतर सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या अश्विनच्या नावावर ५३७ बळी आहेत. तसंच फलंदाजीत अश्विननं सहा शतकांसह तीन हजार धावा केल्या आहेत. ३०० कसोटी बळी आणि तीन हजार धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन क्रिकेट जगतातला ११ वा खेळाडू ठरला, तर ११ वेळा मालिकावीर किताब पटकावत अश्विननं मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती.
दरम्यान, बॉर्डर-गावस्कर मालिकेतला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या, प्रत्यूतरात भारतीय संघानं पहिल्या डावात २६० धावा केल्या. वारंवार पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सात बाद ८९ धावांवर रोखलं. भारतासमोर विजयासाठी २७५ धावांचं आव्हान होतं. मात्र, भारतीय संघाच्या आठ धावा झाल्या असतानाच पाऊस आणि खराब प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत असून, मालिकेतला चौथा सामना मेलबर्न इथं २६ तारखेपासून खेळवण्यात येणार आहे.
0 notes
Text
India-China Conflict : तवांग चकमकीचे संसदेत पडसाद; सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा सभात्याग
India-China Conflict : तवांग चकमकीचे संसदेत पडसाद; सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा सभात्याग
India-China Conflict : तवांग चकमकीचे संसदेत पडसाद; सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा सभात्याग India china clash : भारत व चीन सैनिकांदरम्यान तवांग येथे झालेल्या चकमकीचे पडसाद संसदेत उमटले. विरोधकांनी सभागृहातून वॉकआऊट करत सरकारचा निषेध नोंदवला. India china clash : भारत व चीन सैनिकांदरम्यान तवांग येथे झालेल्या चकमकीचे पडसाद संसदेत उमटले. विरोधकांनी सभागृहातून वॉकआऊट करत सरकारचा निषेध…
View On WordPress
#|संसदेत#conflict:#india-china#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#गांधींच्या#चकमकीचे#ठळक बातम्या#तवांग#ताज्या घडामोडी#नेतृत्वात#न्यूज फ्लॅश#पडसाद#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#लेटेस्ट बातमी#विरोधकांचा#सभात्याग#सोनिया
0 notes
Text
विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन खडाजंगी | नियमांवर बोट ठेवत विरोधकांकडून सभात्याग
विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन खडाजंगी | नियमांवर बोट ठेवत विरोधकांकडून सभात्याग
मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने होणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल सभागृहात मांडला. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर आपल्याकडे आपण म्हणताय की बहुमताचा आकडा मोठा आहे तर एवढी भीती…
View On WordPress
0 notes
Text
ग्रामपंचायत सुधारणा विधेयक सादर
ग्रामपंचायत सुधारणा विधेयक सादर
[ad_1]
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील गोंधळात ग्रामपंचायत सुधारणा विधेयक सादर करण्यात झाले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत विधेयकाला विरोध दर्शविला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा फडणवीस यांचे आक्षेप खोडून काढत प्रत्युत्तर दिले. अखेर विरोधकांनी बहिष्कार टाकत सभात्याग केला.
पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी राज्य…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही तिहेरी तलाक विधेयक मंजूर
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही तिहेरी तलाक विधेयक मंजूर
लोकसभेपाठोपाठ बुधवारी राज्यसभेतही तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 99 मते तर विरोधात 84 मते पडली. काँग्रेसने विधेयकाला विरोध केला मात्र जदयु, अण्णा द्रमुकने विरोध करीत सभात्याग केला. बिजू जनता दलाने विधयकाला पाठिंबा दिला.
राज्यसभेत साडेचार तास वादळी चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. 1984 मध्ये 400 वर जागा जिंकणारी…
View On WordPress
0 notes
Text
अजित पवार आणि गिरिष बापट आमने सामने, मराठा अारक्षणावरुन बाचाबाची
अजित पवार आणि गिरिष बापट आमने सामने, मराठा अारक्षणावरुन बाचाबाची @AjitPawarSpeaks @NCPSpeaks #hellomaharashtra
मुंबई | विधीमंडळाच्या पायर्यांवर सत्ताधारी आक्रमक झालेले असताना आज विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधे बाचाबाची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पावार आणि भाजपा नेते गिरिष बापट आमने सामने आल्याने सभागृहा बाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री भाषण करण्यासाठी उठले असता विरोधकांनी सभात्याग केल्याने सत्ताधार्यांची पंचाईत झाल्याचे बोलले जात आहे.
View On WordPress
0 notes
Photo
राज्यपालांचा भाषणाचा गुजरातीत अनुवाद, सभागृहात गदारोळ मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली पण, पहिल्याच दिवशी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केलेल्या भाषणाचा अनुवाद आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला. त्यामुळे त्यांच्या भाषणादरम्यानच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेच्या नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: मराठी अनुवाद केला. पण तोपर्यंत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्याग केला. या गोंधळातच राज्यपालांचे भाषण गोंधळातच सुरू होते. दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विरोधकांनी याप्रकरणी राज्यपालांची भेटही घेतली. मराठी भाषांतराच्या घोळावर विनोद तावडेंना स्पष्टीकरण द्यावे लागले. ‘राज्यपालांचं अभिभाषण मराठीत अनुवाद करणारा व्यक्ती भाषांतर कक्षेत नसल्याने मी स्वत: मराठीत भाषांतर केले. मोघलांना जसे सगळीकडे संताजी-धनाजी दिसत होते तसें काहींना गुजरातीत भाषण ऐकायला आलं असेल. पण या सर्व प्रकाराची चौकशी विधानसभा अध्यक्ष करतील.’ असं तावडे यावेळी म्हणाले.
0 notes
Photo
अवघ्या अर्धा तासात बहुमताच्या जोरावर ३९२ प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना शिवसेनेने केले मंजूर भाईंदरपाडा येथील मैदान विकासकाच्या घशात घालण्याचा, खाडीचे पाणी शुध्द करुन पाण्याची विक्री करण्याचा, गडकरी रंगायतनवर छत टाकण्यासह असे एकुण ३९२ प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना अवघ्या अर्धा तासात बहुमताच्या जोरावर सत्ताधारी शिवसेनेने मंजूर केल्याने सत्ताधाऱ्यांच्या हडेलप्पी कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाने सभात्याग केला.
0 notes