#|संसदेत
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी तसंच सर्व वृत्त वाहिन्यावरून होणार आहे. हा कार्यक्रम परीक्षेतील तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रीया बीड इथले शिक्षक कृष्णा जाधव आणि विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. “प्रधानमंत्री मोदीजी नी जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे ‘परिक्षा पे चर्चा’ यामुळं शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांना परिक्षेमध्ये न घाबरता, न कसलं प्रकारचं तणाव घेता, कसं सामोरं जावं, तसंच याचा फायदा विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक यांना सुद्धा होतो.’’ “विद्यार्थी हे फक्त विद्यार्थीच नाही. विद्यार्थी हे परीक्षार्थी नाही, तर भारताचे भविष्यातले चांगले नागरिक होणार, या दृष्टीकोनातूनच परीक्षा पे चर्चा ही मोहीम राबवली आहे. याचा फायदा आम्हासारख्या तुम्हासारख्या सर्वच विद्यार्थ्यांना होऊ शकतो.’’
छत्तीसगढ इथं आज सकाळपासून बिजापूर-नारायणपूर सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. तसंच दोन सुरक्षा कर्मचारी शहीद तर दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले असल्याचं बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज यांनी सांगितलं. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यावेळी स्वयंचलित शस्त्रांसह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या ५२ व्या जागतिक पुस्तक मेळ्याचा आज समारोप होणार आहे. या मेळ्यात पन्नास देशातले दोन हजार प्रकाशक आणि एक हजार वक्ते सहभागी झाले होते.
जर्मनी इथं सुरू असलेल्या खुल्या बुद्धिबळ ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी भारताचा डी.गुकेश बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे. पात्रता फेरीच्या नवव्या आणि अंतिम फेरीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत होऊनही गुकेशनं तीन पूर्णांक पाच गुणांसह हा टप्पा गाठला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ओडिशात कटक इथं थोड्याच वेळात सुरू होत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक - शून्यने आघाडीवर आहे. हा सामनाही जिंकून विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काल सत्तारुढ आम आदमी पार्टीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सकाळी ११ वाजता त्यांनी दिल्लीचे उपराज्यपाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत त्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. आतिशी यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ केवळ चार महिन्यांचा राहिला.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. दिल्ली विधानसभेत मोठा विजय मिळविल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाचे नाव निश्चित करायचे यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, दिल्ली भाजप अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांच्यासह भाजपचे अन्य काही महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
नवीन आयकर विधेयक या आठवड्यात संसदेत सादर करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. संसदेत हे विधेयक सादर केल्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठविलं जाईल. संसदीय समितीनं मंजुरी दिल्यानंतर या विधेयकाला मंत्रीमंडळाची मंजुरी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याआधीचे आयकर विधेयक सहा दशकांपूर्वी मंजूर होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले होते. त्याची जागा आता हे आगामी विधेयक घेईल.
इन्शुरन्स मार्केट, पेन्शन मार्केट आणि शेअर इकॉनमी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचे तीन महत्त्वपूर्ण पैलू असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. आज नागपूर इथं ‘अम���तकाल: विकसीत भारत २०४७’ या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यात सगरोळी इथं आज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट-युजी परीक्षा येत्या ४ मे रोजी घेण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए नं जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती ७ मार्चपर्यंत चालणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं काल दोन दिवसीय ४५ व्या पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्र शासन, उपवने, उद्याने आणि सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन विभागाचे सहायक संचालक जे.व्ही चौगुले यांनी केलं आहे.
0 notes
Text
जिथे काही नाही तिथे छाती फुगून दाखवण्यात अर्थ नाही , उद्धव ठाकरेंनी दिलं मोदींना आव्हान
जिथे काही नाही तिथे छाती फुगून दाखवण्यात अर्थ नाही , उद्धव ठाकरेंनी दिलं मोदींना आव्हान
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी ,’ बांगलादेशात हिंदूंची मंदिरे जाळली जात आहेत आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुसतेच अत्याचार पहात बसलेले आहेत. संसदेत महत्त्वाच्या विषयाला बगल देऊन चर्चा भरकटवली जाते. हिंदूंना भावना आहेत. यांचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री इथे पत्रकार परिषद घेत केंद्र…
0 notes
Video
youtube
प्रणिती शिंदे मराठा धनगर आरक्षणावर संसदेत गरजल्या..
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/politicians-misleading-the-public/
0 notes
Text
संसदेत गोंधळ का झाला?; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले नवीन संसदभवन…
0 notes
Text
'संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा लाच घेतात', भाजप खासदाराचे खळबळजनक आरोप
https://bharatlive.news/?p=167916 'संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा लाच घेतात', भाजप खासदाराचे ...
0 notes
Text
राहुल गांधींवर कारवाई हा आवाज दाबण्याचा प्रयत्न : आशिष कापगते
अर्जुनी मोरगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले आहे. राहुल गांधीवर झालेली कारवाई ही सत्तेचा उद्रेक आहे. तडकाफडकी कारवाई करुन हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. सध्या देशात अघोषित आणीबाणी लागली आहे. जे सरकार विरोधात बोलणार त्यांच्यावर कारवाई होणार असा सरकारचा पवित्रा आहे. राहुल गांधी हे संसदेत आणि जनतेसमोर केंद्र सरकारच्या अपयशाची आणि चुकीच्या…

View On WordPress
0 notes
Text
भाववाढीची चर्चा पुढील आठवड्यात, खासदारांना गैरवर्तणुकीचा 'खेद' करण्यास सांगितले: सूत्र
भाववाढीची चर्चा पुढील आठवड्यात, खासदारांना गैरवर्तणुकीचा ‘खेद’ करण्यास सांगितले: सूत्र
राज्यसभेतील १९ सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून आज विरोधी पक्षांच्या दहा नेत्यांनी नायडू यांची भेट घेतली. नवी दिल्ली: संसदेतील सामूहिक निलंबनानंतर, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितले की, जर चूक करणाऱ्या सदस्यांना सभागृहात “त्यांच्या गैरवर्तनाचे गांभीर्य लक्षात आले” आणि पश्चात्ताप झाला तरच निलंबन मागे घेण्याचा विचार केला जाऊ शकतो, सूत्रांनी सांगितले.…

View On WordPress
0 notes
Text
' जुमलाजीवी ' सोबतच आता ' ह्या ' शब्दांना संसदेत बंदी, पर्यायी शब्द शोधून टीका करावी लागणार
‘ जुमलाजीवी ‘ सोबतच आता ‘ ह्या ‘ शब्दांना संसदेत बंदी, पर्यायी शब्द शोधून टीका करावी लागणार
संसदेत कामकाज सुरू असताना अनेकदा आरोप-प्रत्यारोप करताना खासदारांकडून शाब्दिक मर्यादा ओलांडल्या जात असल्याने संसदेचे पावित्र्य भंग होते. विधायक कार्यासाठी चर्चा सुरू असताना अनेकदा खासदारांकडून ‘ जुमलाजीवी, बालबुद्धी, शकुनि, जयचंद, लॉलीपॉप, चांडाळ चौकडी, पिठठु अशा शब्दांचा वा��र केला जातो त्यामुळे संसदेची आणि पर्यायाने देशाची प्रतिमा डागाळत असल्याने अनेक शब्दांना संसदेत वापरण्यावर बंदी घालण्यात…

View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 09 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०९ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
दिल्ली विधानसभेत मोठा विजय मिळविल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, दिल्ली भाजप अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांच्यासह भाजपचे अन्य काही महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. त्यात भाजपला ४८ तर आम आदमी पक्षाला अवघ्या २२ जागा मिळाल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काल सत्तारुढ आम आदमी पार्टीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी त्यांच्या मतदारसंघात विजय मिळविला असला तरी त्यांच्या पक्षाच्या सर्वच दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आज सकाळी आतिशी यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात त्या दिल्लीचे उपराज्यपाल सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द करतील.
नवीन आयकर विधेयक या आठवड्यात संसदेत सादर करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. संसदेत हे विधेयक सादर केल्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठविलं जाईल. संसदीय समितीनं मंजुरी दिल्यानंतर या विधेयकाला मंत्रीमंडळाची मंजुरी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याआधीचे आयकर विधेयक सहा दशकांपूर्वी मंजूर होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले होते. त्याची जागा आता हे आगामी विधेयक घेईल.
इन्शुरन्स मार्केट, पेन्शन मार्केट आणि शेअर इकॉनमी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचे तीन महत्त्वपूर्ण पैलू असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. आज नागपूर इथं ‘अमृतकाल: विकसीत भारत २०४७’ या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. आर्थिक वाढीसाठी आर्थिक साक्षरता महत्वाची असून यासाठी जागृती करण्याची आवश्यकता असल्याचं गडकरी म्हणाले.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावं आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करावे, असं आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलं आहे. तसंच भयमुक्त-कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असंही त्यांनी म्हटलं आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून आणि इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं काल दोन दिवसीय ४५ व्या पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्र शासन, उपवने, उद्याने आणि सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन विभागाचे सहायक संचालक जे.व्ही चौगुले यांनी केलं आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस येणाऱ्या मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे. काल झालेल्या लिलावात मोसंबीला प्रतिटन १८ हजार रुपये दर मिळाला. जालना बाजार समितीमध्ये दररोज अडीचशे ते ३०० टन मोसंबी विक्रीस येत असून दरात आणखी वाढ होण्याची शक्यता, जालना जिल्हा मोसंबी अडतिया संघटनेचे अध्यक्ष नाथा पाटील घनघाव यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची शंभरी पार केली आहे. महाराष्ट्राकडे सर्वाधिक ११३ पदकं असून, त्यात २५ सुवर्ण, ४२ रौप्य आणि ४६ कांस्य पदकांचा समावेश आहे. महिला मुष्टियुद्धात दिव्या पवारनं ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या सांघिक टेनिसच्या अंतिम फेरीत, महाराष्ट्राने गुजरातवर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं, तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत, तामिळनाडूनं कर्��ाटकला हरवून अव्वल स्थान पटकावलं. या स्पर्धेत परभणी जिल्हा ॲथलेटीक्स संघटनेचा खेळाडू किरण मात्रे याने १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. किरण हा परभणी तालुक्यातल्या त्रिधारावाडी इथला रहिवासी असून सध्या सेनादलात कार्यरत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ओडिशात कटक इथं होत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक - शून्यने आघाडीवर आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्वागत उपक्रमात काल ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक श्रीकांत सराफ तसंच लेखक माणिक पुरी यांचं व्याख्यान झालं, सराफ यांनी आपल्या तितरबितर या पुस्तकाबद्दल तर पुरी यांनी पक्षी येती अंगणी या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केलं.
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस भवनसमोर अमेरिका आणि भारत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. अमेरिकेच्या अमानवीय कृती आणि केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात ही निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट-युजी परीक्षा येत्या ४ मे रोजी घेण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए नं जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती ७ मार्चपर्यंत चालणार आहे.
0 notes
Text
' जुमलाजीवी ' सोबतच आता ' ह्या ' शब्दांना संसदेत बंदी, पर्यायी शब्द शोधून टीका करावी लागणार
‘ जुमलाजीवी ‘ सोबतच आता ‘ ह्या ‘ शब्दांना संसदेत बंदी, पर्यायी शब्द शोधून टीका करावी लागणार
संसदेत कामकाज सुरू असताना अनेकदा आरोप-प्रत्यारोप करताना खासदारांकडून शाब्दिक मर्यादा ओलांडल्या जात असल्याने संसदेचे पावित्र्य भंग होते. विधायक कार्यासाठी चर्चा सुरू असताना अनेकदा खासदारांकडून ‘ जुमलाजीवी, बालबुद्धी, शकुनि, जयचंद, लॉलीपॉप, चांडाळ चौकडी, पिठठु अशा शब्दांचा वापर केला जातो त्यामुळे संसदेची आणि पर्यायाने देशाची प्रतिमा डागाळत असल्याने अनेक शब्दांना संसदेत वापरण्यावर बंदी घालण्यात…

View On WordPress
0 notes
Video
youtube
राष्ट्रवादी पक्ष ओरिजनल विधानावरून संसदेत गोंधळ..