#सगळ्यांची
Explore tagged Tumblr posts
Text
ll वानप्रस्थ ll : ३२
चहा पिऊन झाल्यावर विशाल आणि विवेक लगेच निघाले. अनंत आणि सबनीसांना उद्देशून विशाल म्हणाला, "काका, आम्ही येऊं आतां? दुकानांत एक मदतनीस आहे कामांत मदत करायला;-- पण त्याच्यावर जास्त वेळ सगळं काम टाकणं बरोबर नाहीं!" "अनंतराव, आपणही आतां चलायचं कां?" त्यांच्या पाठोपाठ सबनीसांनी सूतोवाच केलं,"या दोघांचीही धंद्याच्या टायमाला आपण आणखी किती खोटी करायची?" "काका, बसा हो जरा निवांत!आतां या टायमाला गिऱ्हाईकांची वर्दळ नसल्याचं तुम्ही बघतांय् की! रोज सकाळी १० नंतर दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत आम्हांलाही थोडी फुरसत भेटते" ऊठूं पाहणाऱ्या सबनीसांना खाली बसायचा आग्रह करीत केदार म्हणाला. त्याला दुजोरा देत एकनाथ सांगू लागला," मग मात्र साधारणतः ३ वाजेपर्यंत गिऱ्हाईक भरपूर येतं! त्यानंतर एकदां ५ वाजले की पुन्हा गर्दी होऊं लागते ती अगदी रात्री ८-८.३० वाजतां आम्ही स्टाॅल बंद करीपर्यंत!" " म्हणजे तुम्ही स्टाॅल बंद करतां रात्री ८-८.३० वाजतां?" सबनीसांनी कांहीशा आश्चर्याने विचारलं, " मी तर ऐकून आहे की खवय्यांची गर्दी रात्री अगदी १०-१०.३० पर्यंत असते!" "अहो काका, मी रात्री १० पर्यंत स्टाॅल चालवायचा ठरवलं तर माझी बायको मला घरांत तरी घेईल का?" केदार चेष्टेच्या सूरांत म्हणाला, 'झोपण्यापुरता तरी कशाला घरी येतोस? स्टाॅलवरच झोप' म्हणत घराचं दार माझ्या थोबाडावर बंद करील ती!" "चेष्टा राहूं दे!", एकनाथ म्हणाला, " पण काका, आम्ही सकाळी ७ वाजतां स्टाॅल उघडतो तो द���वसभर चालुं असतो! त्यामुळे रात्री ८ /८.३० पर्यंत इतकं थकायला होतं ��ी पुढे आणखी उशिरापर्यंत स्टाॅल सुरु ठेवणं शक्यच नाहीं!"
आतांपर्यंत सगळं संभाषण शांतपणे ऐकत असलेला अनंत म्हणाला, "माफ करा, पण तुमच्या खाजगी आयुष्यात मी नाक खूपसतोय असं वाटत नसेल तर माझ्या कांही प्रश्नांची उत्तरं द्याल?" केदार आणि एकनाथने एकमेकांकडे बघत होकारार्थी मान हलवली तेव्हां अनंतने विचारलं, " एकुण परिस्थिती बघतां हा स्टाॅलच तुम्हां दोघांच्या उपजीविकेचं साधन असावं! म्हणजे यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच तुमची दोघांचीही कुटुंबं अवलंबून असतील ना?" दोघांनीही पुन्हा होकारार्थी मान हलवली;-- तथापि अनंतचा रोख कशाकडे आहे याचा अंदाज न आल्याचा गोंधळ त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होता. तो दूर करण्यासाठी अनंत म्हणाला, "म्हणजे थोडक्यात, यातून जास्तीत जास्त नफा कसा होईल याचा विचार तुम्ही करीत असाल ना?" "नक्कीच!" अनंतचा रोख लक्षांत आल्याने कांहीसा हुरूप येऊन केदार म्हणाला," सुरुवातीला ६ महिने जेमतेम स्टाॅलच्या भाड्यापुरते पैसे सुटत होते;-- पण मग हळुहळू धंदा वाढत चालला, तसा नफाही चांगला होऊं लागला!" "खोटं कशाला बोलूं, काका?" एकनाथ म्हणाला, "देवाच्या दयेनं गेलं वर्षभर आम्हांला केलेल्या कष्टांचं चांगलं फळ मिळत आहे! त्यामुळे आतां पूर्वीचं कर्जही थोडं थोडं करून फेडतां येतंय्!" "म्हणजे?" सबनीसांनी आश्चर्याने विचारलं, "अरे, कुुठल्या कर्जाच्या गोष्टी करताय् तुम्ही?"
"काका, ती चित्तरकथा खुप मोठी आहे! थोडक्यात सांगायचं तर एकाच मोटारसायकल दुरुस्तीच्या गराजमधे काम करीत असतांना माझी आणि एकनाथची दोस्ती झाली. राहायलाही आम्ही एकाच वस्तीमधे होतो. घरी समजावून सांगणारं वा धाक दाखवणारं कुणी नसल्याने शाळेत जाण्याच्या वयांत आम्ही उंडारक्याच केल्या! शिक्षण नाही, मग चांगली नोकरी तरी कोण देणार होतं?" गत दिवसांच्या वाईट आठवणींनी केदारचा घसा दाटून आला! "पण असंच चोरून-मारून कुणाच्या तरी बाईक्स चालवायच्या छंदापायीं आम्हांला सगळ्या गाड्यांची माहिती झाली होती, दुरुस्तीची छोटी-मोठी कांमंही शिकलो होतो! त्यांतूनच मग पुढे गराजमधे काम लागलं, हात सरावले आणि पोटापुरते पैसेही मिळायला लागले! पण सगळं सुरळीत चाललं असतांना अचानक करोनाची साथ आली ;-- आणि हळुहळू गराजमधे येणारं काम कमी-कमी होत शेवटी गराज बंदच झालं!" "अचानक नोकरी गेल्याने घरांत सगळ्यांची उपासमार होऊं लागली! खुप वणवण केली, पण कांही काम भेटेना! भाजी विकण्यापासून ते हमालीपर्यंत काय-काय नाहीं केलं, पण पोटापुरतेही पैसे मिळत नव्हते! जे मिळेल ते घरीं देऊन कधी कधी नुसत्या चहा-पावावर दिवस काढले आहेत!" आवंढा गिळत केदार म्हणाला,"असेच एकदां कुठल्याशा स्टाॅलवर एक चहा दोघांत पीत असतांना माझ्या आणि एकनाथच्या मनांत विचार आला की सतराशे साठ ठिकाणी कामधंदा शोधीत फिरण्याऐवजी असाच स्टाॅल आपण टाकला तर?"
१६ फेेब्रुवारी २०२३
0 notes
Text
इंजिनियरिंग ड्रॉइंग म्हणजे इंजिनियर्सची भाषा!
Author– श्री. अनिलकुमार अर्जुन देसले
(इंजिनियरिंग ड्रॉइंग निदेशक, एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक)
तांत्रिक शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे अभियांत्रिकी आरेखन म्हणजेच इंजिनियरिंग ड्रॉइंग. थोडक्यात, इंजिनिअरिंग ड्रॉइंग ही इंजिनियर्सची भाषा असते. भाषा म्हणजे आपल्या मनातील विचार, संकल्पना, भावना हे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे साधन होय. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषा माध्यम म्हणून वापरल्या जातात; परंतु तांत्रिक शिक्षणात या भाषा उपयुक्त ठरत नाहीत. त्याऐवजी चित्रकला ही संकल्पना उपयोगात आणून एका व्यक्तीकडून विविध विचार अनेक व्यक्तींपर्यंत पोहचवणे सहजरित्या शक्य होते. म्हणूनच, अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तींसाठी आपल्या संकल्पनांचे किंवा विचारांचे व्यवस्थितपणे दृश्य स्वरूपात संक्रमण करण्यासाठी जी पद्धत शोधून काढली; त्या पद्धतीलाच ‘इंजिनियरिंग ड्रॉइंग’ असे म्हणतात.
मोटारगाडी, रेल्वे, विमान, घडयाळ इ. प्रकारची अनेक यंत्रे तसेच या यंत्रांचे वेगवेगळे भाग निरनिराळ्या ठिकाणी तयार होतात. हे तयार करणाऱ्या कामगाराला/कारागिराला यंत्राची किंवा यंत्राच्या विशिष्ट भागांची माहिती तोंडी सांगणे शक्य आणि सोईचेही नसते. त्यामुळे अभियंता त्या यंत्राचे किंवा विशिष्ट भागांचे प्रमाणबद्ध चित्र काढून कामगाराला/कारागिराला देत असतो. प्रमाणबद्ध चित्रावरून कामगाराला/कारागिराला यंत्राची तसेच यंत्राच्या भागांची व्यवस्थित कल्पना येते आणि त्यातून निर्मिती सहज शक्य होते. याच कारणामुळे, अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वीरित्या काम करण्यासाठी प्रत्येकाला इंजिनियरिंग ड्रॉइंग या विषयी सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे.
साधारणत: इंजिनियरिंग ड्रॉइंगमध्ये कुठल्याही यंत्राचे तसेच यंत्रांच्या वेगवेगळ्या भागांचे चित्र रेखाटून त्यात लांबी, रुंदी, उंची इत्यादिपासून ते वापरण्याची जागा, वापरला जाणारा धातू, रंग, वजन या सर्व बाबींची माहिती नमूद केलेली असते. त्यामुळेच यंत्रनिर्मिती प्रक्रिया व काही काळानंतर त्या यंत्राची दुरुस्ती करणे सहज शक्य होते. उदा. मोटार वाहनाची निर्मिती ते गॅरेजमध्ये होणारी दुरुस्ती त्याचबरोबर इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, हाऊस वायरिंग, पाणी पुरवठा/गॅस पुरवठा या सगळ्यांची निर्मिती प्रक्रिया व दुरुस्ती सहज होते.
औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने निर्मितीचा वेग वाढविण्यात इंजिनियरिंग ड्रॉइंगचा मोठा वाटा आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंगच्या माध्यमातून प्रत्येक यंत्राच्या तसेच यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची निर्मिती प्रक्रिया, दुरुस्ती यामध्ये लागणारा वेळ कमी होऊन उत्पादन वाढीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे.
वरील मांडलेल्या सर्व गोष्टींचा बारकाई अभ्यास व विचार केल्यास लक्षात येते, की इंजिनियरिंग ड्रॉइंग एक महत्त्वाचा विषय असून त्याची इत्यंभूत माहिती व ज्ञान आपल्याकडे असणे आवश्यक आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंग हा इंजिनियर्सचा आत्मा आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
Source: https://aissmsitcboribhadak.org/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3/
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 19 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी ४९ खासदारांवर बेशिस्त वर्तनासाठी निलंबनाची कारवाई
मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार
किल्ले प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन उत्साहात साजरा
आणि
राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं येत्या २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान उदगीर इथे आयोजन
****
संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधी ��क्षाच्या ४९ खासदारांना बेशिस्त वर्तनासाठी निलंबित करण्यात आलं. लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी थरूर, डिंपल यादव, कार्ती चिदंबरम यांच्यासह ४१ आणि राज्यसभेतील आठ खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं.
त्यापूर्वी संसदेचं काम आजही सुरक्षा त्रुटी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांचं निलंबन या मुद्यांवरुन सातत्यानं बाधित झालं. लोकसभेत दुसऱ्या स्थगितीनंतर साडेबारा वाजता कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रविड मुनेत्र कळघम तसंच अन्य पक्षांच्या सदस्यांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत गदारोळ करणाऱ्या ४९ खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला, तो सदनानं मंजूर केला.
****
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देशभरात आता पर्यंत प्रसाद योजनेंतर्गत ४६ परियोजना आणि स्वदेश दर्शन अंतर्गत एकूण ७६ परियोजना स्वीकृत करण्यात आल्या आहेत. याशिवाय या दोन योजनांतर्गत विकास करण्यासाठी नवीन स्थळं निश्चित करण्यात आली आहेत.
नवीन धार्मिक स्थळांमध्ये मराठवाड्यातलं घृष्णेश्वर मंदिर, श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर तर त्र्यंबकेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. स्वदेश दर्शन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे
केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल लोकसभेत ही माहिती दिली. या संबधीचा प्रश्न खासदार हेमंत पाटील यांनी विचारला होता.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज विधानसभेत मराठा आरक्षणावरच्या चर्चेला उत्तर देत हो���े. आपल्या सरकारने कोणत्याही आंदोलनाबाबत कधीही ताठर भूमिका घेतलेली नसून, सर्वच समाजाच्या आंदोलकांशी चर्चा करून सामोपचाराने मार्ग काढल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले -
मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी समाज किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टीकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे, त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच दक्ष आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र यासंदर्भात नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संद��प शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेच्या पटलावर ठेवला.
****
राज्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रगती जाणून घेता यावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. जानेवारी महिन्यात हे पोर्टल सुरू होणार असून या माध्यमातून नागरिकांना पारदर्शकपणे कामांची प्रगती पाहता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
रस्त्यांची कामं पूर्ण करण्यात दिरंगाई होत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असंही मंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठवाडयाला हक्काचं पाणी मिळावं अशी शासनाची भूमिका असल्याची ग्वाही सरकारकडून आज विधानसभेत देण्यात आली. मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने ऊर्ध्व भागातून मराठवाडयाला हक्काचे समन्यायी पाणी वाटप करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही या विभागाला नेहमीच यासाठी संघर्ष का करावा लागतो, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता.
****
सातारा जिल्ह्यात किल्ले प्रतापगडावर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तिथीनुसार शिवप्रताप दिन उत्साहात साजरा झाला. सकाळी किल्ले प्रतापगडवरील भवानी मातेची पूजा झाल्यानंतर शिवप्रताप दिन सोहळ्यास प्रारंभ झाला. यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रांत, तहसीलदार आणि उपस्थित मान्यवर या मिरवणूकित सहभागी झाले होते.
****
यावर्षीचा राज्यस्तरीय युवा महोत्सव लातूर जिल्ह्यात उद्गीर इथे येत्या २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात जवळपास १३ समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वकृत्व, छायाचित्रण, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादनं अशा प्रकारामध्ये स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार असून राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक तसंच पुणे या आठ विभागातून सुमारे ८०० कलाकार सहभागी होण्याची शक्यता आहे.
या महोत्सवातले विजेते राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होणार आहेत. येत्या १२ ते १६ जानेवारी दरम्यान पुण्यात राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे.
****
केंद्र शासनातर्फे काढण्यात आलेली विकसित भारत सं��ल्प यात्रा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या वर्सुस आणि छडवेल गावात पोहचली. महिला आणि बालकांची आरोग्य तपासणी तसेच आधार कार्ड नोंदणी, आयुष्यमान भारत आरोग्य विमा लाभार्थी नोंदणी, तसंच सिकलसेल तपासणी शिबीर करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत विविध योजनेसाठी नागरिकांनी नोंदणी केली आहे. या यात्रेचे जिल्हा समन्वयक तसंच जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओमप्रकाश रामावत यांनी याबाबत अधिक माहिती दिली -
सुरक्षा बीमा योजना जी आहे, ती आतापर्यंत तीन हजार एकशे त्रेपन्न लोकांनी त्याची नोंदणी केलेली आहे. जीवनज्योती बीमा योजना जी आहे, ज्यामध्ये दोन हजार पाचशे सव्वीस लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. दहा हजार लोकांची जवळपास आरोग्य तपासणी केलेली आहे. आणि यासोबतच सहाशे अठ्ठावीस प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे जे लाभार्थी आहेत, जे सुटून गेले होते आतापर्यंत किंवा वंचित राहिले होते, त्यांनासुद्धा आपण लाभ दिलेला आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील रुद्रापूर इथं केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. यावेळी नाबार्ड आणि जिल्हा सहकारी केंद्रीय बँकेच्या वतीने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता शिबिर राबवण्यात आलं. नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दिलीप दमय्यावार यांनी बँकेमार्फत राबवण्यात आलेल्या विविध योजनांची ग्रामस्थांना माहिती दिली.
आम्ही इथे नाबार्ड आणि डी सी सी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक आणि डिजीटल साक्षरता अभियानाचा एक कँपे घेतला, ज्या कँपमध्ये आम्ही बँकेमार्फत राबविण्यात आलेल्या केंद्र सरकाच्या विविध योजनांची माहिती लोकांना दिली. विशेषकरून प्रधानमंत्री जीवनज्योती योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेची माहिती लोकांना दिली आणि लोकांना आवाहन केलं आहे की, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या योजनेचा फायदा घ्यावा.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याला आज साडे चार वाजता सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या आतापर्यंत दोन बाद ८५ धावा झाल्या आहेत. परवा रविवारी झालेला या मालिकेतला पहिला सामना भारतानं ८ गडी राखून जिंकला आहे. या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना येत्या गुरुवारी जोहान्सबर्ग इथे होणार आहे.
****
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई, प्रदेश यांच्या वतीने देण्यात येणारा पी.सावळाराम राज्य��्तरीय साहित्यरत्न पुरस्कार नांदेड इथले प्रसिद्ध साहित्यिक नारायणराव रामन्ना कंदमवार पाटील यांना मुंबईत प्रदान करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी तसंच बाजारातून हरवलेले तब्बल १०२ महाग मोबाईल सायबर पोलिसांनी शोधले आहेत. या सर्व मोबाईलची किंमत १३ लाख ५४ हजार ९०० रुपये इतकी आहे. यापैकी ५६ मोबाईल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते आज मोबाईल धारकांना परत करण्यात आले.
****
राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे, मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत यासंदर्भातल्या आपल्या भाषणात नुकतंच हे जाहीर केलं आहे.
****
0 notes
Text
सासूबाई दुपारी जेवण झाल्यानंतर काजू खात होत्या…
Bandya : ‘अहो… सासूबाई मला काजू द्या ना टेस्टसाठी’
सासूबाईंनी एकच काजू हातावर ठेवला
Bandya : बस्स एकच काजू??
सासूबाई : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट अशीच आहे…
😀😀😀😂😂😂🤣🤣🤣🤩🤩🤩
0 notes
Text
सासूबाई दुपारी जेवण झाल्यानंतर काजू खात होत्या…
Pradip : ‘अहो… सासूबाई मला काजू द्या ना टेस्टसाठी’
सासूबाईंनी एकच काजू हातावर ठेवला
Pradip : बस्स एकच काजू??
सासूबाई : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट अशीच आहे…
😀😀😀😂😂😂🤣🤣🤣🤩🤩🤩
0 notes
Text
All your saree needs at one place your wholesale saree store: Get a collection of various sarees with best quality and reasonable price! Our wholesale saree shop for all your saree needs in one place: Get every type of saree with excellent quality and possible prices!
In our Rang Creation store, you can find all types of sarees, all colors and designs. Visit our store now at Ulhasnagar!
#rangcreationsaree#bridalsarees#paithanisarees#ethinicwear#indiansaree#handloomsarees#sareelover#buysarees
1 note
·
View note
Text
हल्ली घड्याळाच्या गजराची गरज नाही वाटत....
दिपाचं ही तसंच काहीसं झालं होतं..रोज सकाळी 6 ला उठायचं...उठल्यावर मनात एकच प्रश्न आज जेवायला काय बनवायचं ..बहूूधा हा प्रश्न सगळ्यांच बायकांना ��डत असेल नाहींका...तेेव्हढयात,अग थांब मी तुला भाजी कट करून देेेतो समीर डोळे चोळतच किचन मध्ये येेेतो...प्रत्येक नवऱ्याने जर असाच विचार करून घर कामात मदत केली तर सगळं किती सोपं होईल ना...दोघांंचा टिफिन भरून तिची ऑफीस ला जायची तैयारी..दिपाचं हे रोजचं ठरलेल वेळापत्रक...तसा समीर तिला मदत करायचा पण त्याच आपलं हळूहळू चाललेलं असायचं...
अरे समीर तेवढं लाईट बिल भरलंस का रे..तेवढं आज भरून घे...अरे हो आणी वेेळ ��िळेल तसा गॅसचा नंबर पण लावून घे...घाई घाईत च दिपा समीर ला बोलुन निघाली...घड्याळात 7 वाजून 5 मिनिटे झाली...तशी ती पटापट पायऱ्या उतरत विचार करत होती...आज 7:15 ची लोकल चुकते की काय...आणि मग उशीर झाला की पुढे बस चुकेेेल...आणी लेट पचिंग...या महिन्यात ला हा दुसरा लेट मार्क...असा विचार रोजच तिच्या मनात येेेई...मग तशी तिची पाऊले अजून वेगाने रिक्षा च्या दिशेने जाई...कशीबशी station ला आल्यावर घड्याळात बघितलं 7:12 हुश्श...अजून 3 min आहेेेत लोकल यायला...तसा तिने जिना चढून प्लॅटफॉर्म 5 गाठला...एकदातरी माणसा ने मुंबई लोकल चा अनुभव घ्यावा तोही सकाळी 7 ते 10 आणि संंध्याकाळी 5 ते 8...अबब!! केवढी ही माणसांची गर्दी...

एका साखरेच्या कणाला शे दोनशे मुंग्यानी ओढत घेऊन जावंं अगदी तशीच.....तेेव्हढयात अनौनसमेंट होते ..."7 वाजून 15 मिनिटांची..छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ला जाणारी 15 डब्यांची जलद लोकल थोड्याच वेळात प्लँटफॉर्म क्रमांक 5 वर येेेत आहे..."तशी बॅग पुढे घेेेऊन सगळ्यांची लोकल मद्धे चढायाची घाई....चला आज पण लोकल मद्धे चढता आलं म्हणजे आपण आज वेळेत पोहचू.. एवढ्या गर्दी मद्धे पण लोकल मद्धे चढता येणं म्हणजे एक कलाच आहे बरं का ही मुंबईकरांची...त्याहून पुढे म्हणजे, बसायला सीट मिळाली तर...कुणाला पारितोषिक मिळण्या इतका आनंद कुठे नाही...एकमेकांना ढकलून पुढें चढणारे पण हेच आणि कुणाला मद्धेच चक्कर आली की पाणी बिस्कीट देेनारे पण हेेेच!
"आज माझ्या मुलांची परीक्षा आहे रात्रभर त्याचा अभ्यास घेत होते" .."अग, माझ्या पण मुलीची तब्ब���्त ठीक नाही ..माझीही झोप झाली नाही ग " ..."उद्या मुलांच्या शाळेत मीटिंग आहे ..."अग माझ्या घरी लग्न आहे "..."माझ्या घरी पाहुणे येणार आहेेेत...""या सगळ्या बायकांंच्या गप्पा ...
रो....ज कानावर येई...पण खरंच कमाल आहे ना या सगळ्या बायकांंची....multitasking म्हणतात ना ते हेेंच!! कसं काय जमतं ना या बायकांना हा विचार रोज थक्क करूूून जाई... आणि दिवस भर काम करण्याची प्रेरणा पण देई...

एवढं करून ही ह्या प्रत्येकी आपआपल्या कामात निपुण, अत्यंत प्रामाणिक, चिकाटी आणि धाडसी सुध्दा बरं का !!हे झालं दिपाच...पण संसाराचा ब्यालन्स करण्यासाठी सर्वच स्त्रीयांना खुप मेहनत घ्यावी लागते..
वाटेवर कुठेतरी मग आपल्याला आई वडिलांची प्रत्येक क्षणी जाणीव होते...त्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांची, त्यांनी पार पाडलेेल्या प्रत्येक जबाबदारी ची....संसाराची गाडी पुढें नेेत असताना आपल्या मुलांवर चुकीचे संस्कार तर होत नाही ना याची वेळोवेळी खबरदारी घेतलेली...कसंंकाय जमलं बाबा यांंना हे सगळं ...आणि परत या विचाराने नवीन काहीतरी करण्याची उम्मीद निर्माण होते...
परिस्थिती माणसाला सर्वकाही करायला शिकवते हे चांगलं समजलं होतं...कोणत्याही कामाची लाज वाटू नये...प्रामाणिक पणे केलेल्या कामात यश नक्कीच मिळते ही माझ्या वडिलांची शिकवण...यात उत्त्त्तम साथ दिली ती माझ्या आईने...time managment शिकावं तर या सगळ्या बायकांकढुन...दिपा लाही हळू हळू हे सगळं जमायला लागलं होतं..शेवटी म्हणातात ना ,"अनुभवाचे बोल "
आपल्याला नेहमीच असं सांगितलं जातं ,लग्न म्हणजे संसार रुपी रथ...या रथाची दोन चाके म्हणजे नवरा-बायको...आणि या रथाचा वेग कायम राखण्यासाठी ही दोन्ही चाके व्यवस्थित असावी लागतात...तरच संसार टिकतो.. अगदी बरोबर...पण व्यवस्थित म्हणजे नेमकं काय...तर जेंव्हा ही दोन्ही चाके बॅलन्स मद्धे असतील ...एकमेकांना घट्ट पकडून धरतील...कुणा एकाचा तोल जात असेेेल तर त्याला वेळीच सावरतील...
आणि हा बॅलन्स म्हणजे एकमेकांबद्दल चा"आदर"....एकमेकांप्रती असणारा " विश्वास"...आणि अर्थातच "प्रेम"...तर हवेच...
कुठल्याही नात्यात प्रेम असेल तरचं ते नातं टिकत हे अगदी खरं आहे....
प्रत्येक माणूस हा वेगळा असतो...नवरा-बायको जरी एक असले तरी माणूस म्हणून ही दोन विभिन्न व्यक्तीमत्त्वे असतात...त्यामुळे प्रत्येकाचे म��� वेगवेेेगळे असू शकते...म्हणून समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करायला शिका...
आपल्या समाजात विशेषतः भारतीय कुटुंबात
एक विरोधाभास दिसून येतो...मुलांना शिस्त लावण्यावर जास्त कष्ट घेतले जात नाहीत पण मुलींना मात्र उठता बसता शिस्त शिकवली जाते...एकींकडे आपण स्त्री-पुरुष समानता मानतो आणि आपल्याच घरात आपण मुलांना आणि मुलीना वेगळी वागणूक देतो...स्वयंपाक घरातली कामे फक्त मुलींनी च केली पाहीजे अशी
एक चुकीची प्रथा आपल्या कडे आहे...आता हळूहळू सुशिक्षित समाज होत चालल्याने ही प्रथा बदलत आहे..
प्रत्यकाने आत्मनिर्भर झालंच पाहिजे..
त्यासाठी मुलांना आणि मुलींना लहानपणा पासुनच स्वतःची कामे स्वतः करायला शिकवलं पाहिजे...
आणि या काळातील अतिशय मौल्यावान आणि महत्त्वाची शिकवण जी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना द्यायला हवी ती म्हणजे प्रत्येक स्त्री चा "आदर..."।। मुलगा-मुलगी समान म्हणार्यांनी केवळ वंशाचा दिवा पाहिजे म्हणून स्त्री-भ्रूण हत्या करणारे ...खरंच लाज वाटते अशा लोकांची ...मुलगा पण हवाच की...पण हा पण तुमच्याच हाडा मांसा चा
गोळा आहे....यासाठी आधी महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्री ने तिची मानसिकता बदलली पाहिजे... तिला रडायला नाही लढायला शिकवा...तिला वाट्टेल तसं जगू द्यात..हा खुला आसमंत तिचा पण आहे तिला हवं तसं वावरू दयात....
यामुळे स्त्रीयांवरील अत्याचार आपसूकच कमी होतील..
आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे...कुणी वैज्ञानिक कुणी डॉक्टर कुणी इंजिनिअर कोणी पोलिस कोणी शिक्षक कोणी नर्स कोणी वकील..अजून बऱ्याच क्षेत्रात...पण प्रत्येक घराला स्वर्ग बनवणारी फक्त फक्त ही स्त्री च !!त्यामुळे प्रत्येक स्त्री ला माझा मानाचा मुजरा !!!
'उठ नारी,...तू प्रेम आहेस...तू आस्था आहेस... तू विश्वास आहेस
तू माता आहेस...जननी आहेस...भगीनी आहेस
तू आधार आहेस...तू नवी उम्मीद आहेस...तू आशेचा किरण आहेस...
उठ,तुझं अस्तित्व सांभाळ...तुझं कर्तृत्व खूप मोठं आहे.. आणी एक नाही प्रत्येक दिवस हा नारी दिवस बनव...
शेवटी विसरू नकोस तू एक "रणरागिणी" आहेस...!!!!
☺☺
नम्रता देशमाने-जैन
1 note
·
View note
Text
मासिक पाळी - (ती , तो आणि आपण)....
निसर्गाने महीलांना दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे मातृत्व, आणि या मातृत्वाचा आनंद घेण्यासाठी तिला दर महिन्याला जावं लागतं त्या या ५ दिवसातून. त्या ५ दिवसातील वेदना त्यातून होणारा रक्तस्त्राव, पोटातील दुखणे यापेक्षा जास्त वेदना समाज देतो तिला प्रत्येक वेळी.
मासिक पाळी म्हणजे नक्की काय???
गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून बाहेर टाकली जाणारी अंतरत्वचा. गर्भधारणा झाली नाही तर महिन्याला 4-5 दिवस ही क्रिया घडते त्याला आपण मासिक पाळी म्हणतो.
---------------------------------------
समाजाचा दृष्टिकोन
आता बराच काळ झालं आहे, स्त्रिया पॅड चा वापर करतात, यावर काही लोकांकडून मोकळे��णाने बोलले ही जाते, जनजागृती ही मोठ्या प्रमाणात केली जातेय. मध्यंतरी यावर पॅड मॅन सारखा चित्रपट ही येऊन गेला आणि त्याला चांगला प्रतिसाद ही मिळाला. पण तरीही सर्व सुरळीत अजून तरी झालेले नाही...
आजही दुकानात मेडिकल मधे मुली सॅनिटरी पॅड घ्यायला गेल्यावर हळूचपणे शरमेने काका whisper , stayfree द्या अस्स बोलतात . आणि जर तिचा आजूबाजूला कोणी पुरुष असेल किंवा एखादा समवयीन मुलगा असेल तर जरा घाबरतच घेते ,ती जणू काही तरी पापच करतेय या भावनेने. दुकानदारही काळया पिशवीत किंवा मग एका newspaper मधे तिला गुंडाळून देतो. इतकं केल्यानंतरही ती गुपचूप त्याला लगेच बॅगेत, तिचा जवळचा पिशवीत आत टाकते, का??? काय गरज या सगळ्यांची ??? का? ती बिनधास्तपणे बोलू शकत नाही की मला पॅड द्या, का? ती हातात कुठलही आवरण न लावता सगळ्यांना दाखवत घरी नेऊ शकत नाही? या सर्वांना जबाबदार कोण? पुरुष की मग महिला? ज्या स्वतः या परिस्थिती तून गेलेल्या असतात किंवा जात असतात...
मासिक पाळीत पुरुषांनी काय करावे यावर बोलण्याबरोबर बायकांनी बायकांसाठी काय करावे ? यावर ही बोलायला हवं!
प्रत्येक माणसाचा स्वभाव जसा वेगळा असतो तसाच प्रत्येक स्त्रीचा तिचा पाळीदरम्यान येणाऱ्या समस्या आणि अनुभव वेगळे असतात. उगीच होणारी चिडचिड त्यातून येणारे नैराश्य, कधी आनंद होणे, तर कधी दुःख अशा अनेक समस्यांना तिला तोंड द्यावे लागते . अशा वेळी तिचा सोबत असणाऱ्या स्त्रीने तिला समजून घेणे तितकेच महत्वाचे. आपण सहन केलं किंवा आपल्याला समजून घेणार कोणी नव्हतं तरी आपण सगळं सुरळीत केलं किंवा करतोय म्हणून तिचा वेदनांना दुर्लक्ष करणे मुळातच चुकीचं. तिची तुलना आपल्याशी न करता तिला स्नेहाने आणि आपुलकीने वागून समजून घेणे तितकेच महत्वाचे मग तुम्ही तिची आई, सासू,बहीण, मैत्रीण, काकू, मामी किंवा कुठल्याही नात्याचे असाल...
पुरुषांनी ही पाळी म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला पाहिजे. तिला म्हणजे बहिणीला, मुलीला, बायकोला ,आईला ,मैत्रिणीला आपुलकी दाखवून तिच्याशी सहज या विषयावर बोलता यायला पाहिजे. तिला या काळात त्रास झाल्यावर दवाखान्यात जायची वेळ आल्यास तिचा सोबत निसंकोष पणे सोबत जाता येईल इतकं मोकळीक होता यावे... खरंतर पुरुषत्व सारख्या भिकार गोष्टी शिवाय आपल्याकडे त्यांना विशेष देण्यासारखं आहे तरी काय??? त्यामुळे तिचा हा त्रास संपायला हवा, किमान कमी तरी करता याव���...
पण मुळात असं काहीही होत नाही आणि झालं तरी अगदी मोजकेच उदाहरण सांगता येतील.
मुळात गडबड आहे ती इथल्या सडक्या मेंदूत.
आपण असे म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषांचा मागे एक स्त्री असते , आज तिचं गरज आहे एका आनंदी यशस्वी स्त्रीचा मागे पुरुषाने उभे राहण्याची. बाईला फक्त भोग वस्तू म्हणून वापरत असलेल्या मानसिकतेला बदलवण्याची.
-वैभव वैद्य....
0 notes
Text
या स्कीम मध्ये गुंतवून दरमहा कमवा २५००० रुपये. TATA scheme 2023. २ मिनिटांत संपूर्ण माहिती.
25 हजार रुपये रोख ते पण तुमच्या बँक अकाउंट मध्ये थेट. आज आपण TATA scheme जाणून घेणार आहोत. की काय आहे ही स्कीम ? याच्यामध्ये पैसे कसे गुंतवायचे ? या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला याच ब्लॉगमध्ये मिळतील. टाटा इंडिया कंजूमर फंड डिरेक्ट ग्रोथ प्लान- Tata India Consumer Fund – Direct Growth Plan. ही स्कीम टाटा ग्रुपने काढलेली आहे. या स्कीमने आपल्याला रेगुलर इन्कम चालू होऊ शकते. या स्कीमचं नाव आहे टाटा…
View On WordPress
#tata digital fund direct growth#tata digital fund india direct plan growth#tata digital india fund#tata digital india fund direct growth#tata digital india fund direct growth review#tata digital india fund direct plan growth#tata digital india fund growth#tata digital india mutual fund#tata india consumer fund#tata india consumer fund direct growth plan#tata india consumer fund direct growth review
0 notes
Text
Virat Kohli: सगळ्यांची तोंडं बंद होणार..,रवी शास्त्रींचं कोहलीबद्दल मोठं वक्तव्य
Virat Kohli: सगळ्यांची तोंडं बंद होणार..,रवी शास्त्रींचं कोहलीबद्दल मोठं वक्तव्य
Virat Kohli: सगळ्यांची तोंडं बंद होणार..,रवी शास्त्रींचं कोहलीबद्दल मोठं वक्तव्य Virat Kohli Asia Cup 2022: विराट कोहली अखेरचा इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत दिसला होता. त्या मालिकेत त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही, त्यामुळेच त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर विराट कोहलीने वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे मालिकेतून ��ाघार घेतली होती. Virat Kohli Asia Cup 2022: विराट…
View On WordPress
#kohli#virat#कोहलीबद्दल#क्रिकेट#क्रीडा#खेळ बातम्या#टेनिस#तोंड#बंद#भारत लाईव्ह मीडिया#मराठी खेळ अपडेट्स#मोठं#राष्ट्रीय खेळ बातम्या#वक्तव्य#शास्त्रींचं#सगळ्यांची#स्पोर्ट्स#स्पोर्ट्स अपडेट मराठी#हॉकी#होणार..#रवी
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : १५
संध्याकाळच्या पायीं फेरफटक्यासाठी अनंतसोबत जाण्याचं शुभदानं मुद्दाम यासाठी टाळलं होतं की तो फिरुन परत येईपर्यंत मधल्या तासा-दीड तासांत, तिला उद्यां तांतडीने आणायच्या किराणामालाची यादी हातावेगळी करायची होती! विशेषत: दिवाळीचा फराळ बनविण्यासाठी ते आवश्यक होतं! घरांत काय चीज-वस्तु आहेत त्याचा धांडोळा घेतल्यावर ती कागद आणि पेन घेऊन यादी लिहूं लागणार, एवढ्यांत डोअरबेल वा��ली! 'आतां कोण बरं आलं असावं?' असा विचार करीत तिनं दार उघडलं तर पावसांत नखशिखांत चिंब भिजून, निथळत असलेला अनंत दाराबाहेर उभा! "अहो, एवढे कसे भिजलात? छत्री घेऊन गेला नव्हता कां?" या तिच्या प्रश्नावर जोरदार पावसांत दुर्दशा होऊन मान टाकलेली छत्री तिच्यासमोर नाचवीत अनंत सस्मित म्हणाला, "इंदिराबाईंनी पावसाला 'घर माझं चंद्रमौळी' म्हणून अवेळी धिंगाणा न घालण्यासाठी विनवलं होतं! पण इथं तर साक्षात् माझी छत्रीच चंद्रमौळी निघाली! ती कसली या एवढ्या जोरदार पावसाच्या धिंगाण्यापुढे टिकाव धरणार!"
"काय बाई तरी या पावसानं छळ मांडलाय् यंदा! दिवाळी आठवड्यावर आली तरी दारी बसलेल्या लोचट कुत्र्यासारखा किती हाकलला तरी जातां जात नाहींये!" लगबगीने मोठा टाॅवेल कपाटातून काढीत शुभदा म्हणाली, "आधी अंग कोरडं करून कपडे बदला! डोक्यावरचं ते केसांचं जंगल नीट पुसा! ऐन दिवाळीत उगीच सर्दी व्हायला नको!" "या पावसानं छत्री मोडून टाकल्यामुळे अर्ध्या रस्त्यातून परत फिरावं लागल्याने, तूं सांगितलेली भाजी मात्र आणतां आली नाहीं!" "त्याचं कांही अडलेलं नाहीं! तुम्ही अंग आणि केस कोरडे करुन कपडे बदलेपर्यंत मी भरपूर आलं घालून चहा करते!" पुढील १५ मिनिटांत अनंत तयार होऊन डायनिंग टेबलापाशी येऊन बसला तेव्हां शुभदा चहा गाळीत होती! वाफाळत्या गरमागरम चहाचा कप हाती घेत अनंत मिस्कीलपणे म्हणाला,"सारखा-सारखा कितींदा चहा हवा असतो हो तुम्हांला?' असं नाराज होत बोलण्याऐवजी तूं प्रेमाने असा गरमागरम चहा देणार असशील तर पावसांत रोजच भिजायला मी तय्यार आहे!"
"थट्टा पुरे!" त्याला दटावीत शुभदा म्हणाली, "पमाताईंचा मेसेज आला आहे की त्या रात्री आपल्याला सोयीस्कर असेल अशा वेळीं फोन करणार आहेत;-- भाऊबीजेचा एकुण सगळा बेत ठरविण्याविषयीं!" "अरे हो;-यंदा भाऊबीज तिच्याकडे ठरली आहे ना! मग तिच्या उत्साहाला कसं उधाण येईल बघ!" अनंत आठवण होऊन पुढे म्हणाला, " यंदा पावसाचा धुमाकूळ पाहून किती बरं वाटतंय् की भाऊबीजेला पावसा-पाण्यांतून मीनाताईकडे पनवेलला किंवा अंजूकडे ठाण्याला जायचं नाहींये! उलट सगळ्यांची पमाताईकडे येत���ंना कशी तारांबळ उडते ते बघायला जाम मजा वाटेल!" "काय हो तुम्हांला चेष्टा सुचतेय्! सगळे बिचारे हौसेनं येतील, तर तुम्हांला त्यांची गंमत बघायची आहे!" शुभदा कौतुकानं म्हणाली, त्यांत कांही खोटं नव्हतं! अनंतला सख्खी बहीण नव्हती. पमाताई त्याची एकुलती एक चुलत बहीण तर मीनाताई आणि अंजू दोन्ही मावसबहीणी! पण सगळ्यांचे लागेबां��े इतके घट्ट जुळलेले की आप-पर भाव नव्हता! पमाताई आणि अनंतच्या वयाचा मान राखून त्यांनी ठरवल्यानुसार सर्वांची भाऊबीज एकाच घरी होत असे! मग शुभदाचा धाकटा भाऊ असो वा मीनाताई आणि अंजू यांचे सख्खे भाऊ, सगळे तिथेच येत! दिवसभर गप्पांची कौटुंबिक मैफिल आणि विविध खाद्यपदार्थांची नुसती रेलचेल! "शुभदा, यंदा ३ वर्षांनंतर एकत्र भाऊबीज होणार आहे. त्यातच माझा साठावा वाढदिवस आपण साजरा केलेला नाहीं! त्यामुळे भाऊबीजेसाठी तिन्ही बहिणींना आणि सोबत हजर असलेल्या इतर सगळ्यांनाही कांंही ना कांही छानशा भेटवस्तु द्याव्या असं माझ्या मनांत आहे! तुझी संमती असेल तर त्या दृष्टीने विचार करून तुला काय सुचतंय् बघ!कारण आतां मधे फार दिवस उरलेले नाहींत!!
२० ऑक्टोबर २०२२
0 notes
Text
मद्यधुंद अवस्थेत ' ती ' बसमध्ये आली अन चालकापासून वाहकापर्यन्त सगळ्यांची..
मद्यधुंद अवस्थेत ‘ ती ‘ बसमध्ये आली अन चालकापासून वाहकापर्यन्त सगळ्यांची..
दारूच्या नशेत धुंद झालेल्या एका महिलेने एसटी बसमध्ये जोरदार धिंगाणा घातलेला असून हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे उघडकीला आलेला आहे. रात्रीच्या वेळी बसमधून प्रवास करताना या महिलेने बसच्या वाहकाला आणि चालकाला जबरदस्त शिवीगाळ केली त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले मात्र तरीदेखील तिने पोलिसांना देखील अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पोलिसांनी तिला प्रश्न विचारले त्यावेळी तिने…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 12.11.2023, रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 12 November 2023
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १२ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
दीपावलीनिमित्त सर्वत्र उत्साह;दीपोत्सवासह सांगितिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शेती आणि संसारोपयोगी साहित्याचं वाटप
राज्य शासन���चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर;विविध सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा
आणि
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट;बुधवारी भारताचा न्यूझीलंडसोबत तर गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेसोबत सामना
****
राज्यभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे. त्यानिमित्त विविध ठिकाणी दिवाळी पहाटसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटे नरक चतुर्दशीनिमित्त अभ्यंगस्नानाचा सोहळा साजरा झाला, संध्याकाळी घरोघरी पारंपरिक पद्धतीने दिव्यांच्या ��ोषणाईत आणि आतिषबाजीत लक्ष्मीपूजन होऊन दीपोत्सव साजरा होईल.
अयोध्येत काल दीपोत्सव साजरा झाला. शरयू नदीच्या ५१ घाटावर २२ लाख २३ हजार पणत्या प्रज्वलति करण्यात आल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत अशी मनोकामना व्यक्त केली आहे.
‘‘दिवाळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि भरभराट आणते. प्रकाश आणि ऊर्जेचा उत्सव आपण त्याच उत्साहाने साजरा करूया. आपण निसर्गपूजक आहोत. आपले सण देखील तोच संदेश देतात म्हणूनच स्वच्छतेचा कटाक्ष बघूया. प्रदूषण टाळूया, सणांचा आनंद घेताना पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारीसुद्धा आपली सगळ्यांची आहे हे लक्षात ठेवून सण साजरे करूया.’’
****
लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक साहित्यासह गृहशोभेच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या असून, महिलावर्गाची सकाळपासूनच खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. तोरणांसाठी झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली असून, फुलांच्या बाजारपेठेत निरनिराळ्या फुलांचा सुगंध दरवळत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल जालना जिल्ह्यात भोकरदन इथं बाजारात स्थानिक विक्रेत्यांकडून दिवाळीसाठीच्या विविध साहित्याची खरेदी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वोकल फॉर लोकल या आवाहनाला प्रतिसाद देत, नागरिकांनी स्थानिक विक्रेत्यांकडूनच साहित्य खरेदी करण्याचं आवाहन मंत्री दानवे यांनी केलं आहे.
****
नांदेड इथं जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, सचखंड गुरुद्वारा मंडळ आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून १५ नोव्हेंबरपर्यंत गोदावरी किनाऱ्यावर बंदाघाट इथं दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी सचखंड गुरुद्वारा मंडळाच्या 'शबद' कीर्तनाने या कार्यक्रमांना सुरुवात होत आहे. परवा १४ नोव्हेंबर रोजी सकाळी दिवाळी पाडवा पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, सचखंड गुरुद्वारामध्ये काल ऐतिहासिक तख्तस्नान सोहळा साजरा झाला. ऐतिहासिक शस्त्रांचीही स्वच्छता करण्यात आली. या सोहळ्यानं गुरुद्वाऱ्यात दीपमाला महोत्सवालाही प्रारंभ झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातही विविध ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम तसंच दीपावली स्नेहमिलन सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत आहे. संगीत रसिकांचा या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
****
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार "शेतकरी कुटुंबास मदतीचा हात-संवेदन २०२३"या योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शेती आणि संसार उपयोगी साहित्याचं वाटप केलं जात आहे. यामध्ये परसबागेतील भाजीपाला, बियाणं, नॅनो युरिया, सुक्ष्म मूलद्रव्यं, दिवाळी फराळासाठी उपयुक्त साहित्य आणि राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे उत्पादित करण्यात येत असणाऱ्या विविध वस्तूंचा समावेश आहे. हे साहित्य पूर्णपणे लोकवर्गणीतून देण्यात येत आहे. परळी इथं नुकत्याच एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात या साहित्याचं वाटप करण्यात आलं.
****
राज्यातल्या राजघराण्यांकडे असलेली जुनी कागदपत्रं तपासण्यात यावीत, या कागदपत्रांमध्ये कुणबी मराठा अशा आणखी नोंदी सापडण्याची शक्यता, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी वर्तवली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात प्रत्येक आमदारांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे, असं मतही जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.
****
राज्य शासनाचा २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल ही घोषणा केली.
२०२२ आणि २०२३ चे विविध सांस्कृतिक पुरस्कारही काल जाहीर झाले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर आणि पंडित शशिकांत श्रीधर मुळ्ये यांना, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार- सुहासिनी देशपांडे आणि अ��ोक समेळ यांना, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार - नयना आपटे आणि पंडीत मकरंद कुंडले यांना, नाटकासाठीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार वंदना गुप्ते आणि ज्योती सुभाष यांना, कंठ संगीत पुरस्कार अपर्णा मयेकर आणि रघुनंदन पणशीकर यांना, लोककला पुरस्कार हिरालाल रामचंद्र सहारे आणि कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज यांना, चित्रपट क्षेत्रासाठीचा पुरस्कार चेतन दळवी आणि निशिगंधा वाड यांना जाहीर झाला, तर तमाशासाठीचा सांस्कृतिक पुरस्कार बुढ्ढणभाई बेपारी-वेल्हेकर आणि उमा खुडे यांना जाहीर झाला आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून देत आहोत
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यांचं चित्र स्पष्ट झालं आहे. बुधवारी मुंबईत होणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत भारताचा न्यूझीलंडसोबत तर गुरुवारी कोलकात्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेसोबत सामना होणार आहे.
काल झालेल्या सामन्यांमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा ९३ धावांनी तर ऑस्ट्रेलियानं बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला. इंग्लंडने दिलेलं ३३८ धावांचं लक्ष्य गाठताना पाकिस्तानचा संघ ४४ व्या षटकात २४४ धावांवर सर्वबाद झाला. पुण्यात झालेल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशनं दिलेलं ३०७ धावांचं लक्ष्य, ऑस्ट्रेलियानं ४५ व्या षटकांत आठ गडी राखून साध्य केलं.
आज या स्पर्धेत भारताचा नेदरलँडसोबत सामना होणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रीडा संकुलावर दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
दिवाळीची सुटी लागताच, लहान मुलांची घराच्या अंगणात किल्ले उभारण्याची लगबग सुरू होते.
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ८ व्या वर्गात शिकणारा शिवार्थ दिलीप दारव्हेकर या विद्यार्थ्याने दीपावली निमित्त घराच्या अंगणात किल्ले रायगडची प्रतिकृती साकारली आहे. घरगुती तसंच उपयोगात न येणाऱ्या वस्तूंपासून शिवार्थने ही प्रतिकृती तयार केली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर...
गेल्या तीन दिवसांपासून अंगणातच माती , पुठ्ठे व काही टाकाऊ वस्तुपासून किल्ले रायगडचा जिवंत देखावा साकारला आहे. यात महादरवाजा, मेना दरवाजा, राणी महल , अष्टप्रधान मंडळ निवासस्थान , गंगासागर तलाव , मिनार , राज्यसभा, हत्ती तलाव , हत्तीखाना , हनुमान टाके, बाजारपेठ , जगदीश्वर मंदिर , श्री छत्रपतींचे समाधीस्थळ , दारू कोठार , टकमक टोक आशा प्रमुख स्थळांचा जिवंत देखावा साकारला आहे .या बालकलावंताने साकारलेला देखावा पाहण्यासाठी व आपल्या पाल्य���ंना दाखवण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
****
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तृतीयपंथीयांसाठी स्मशानभूमी तसंच किन्नर भवनासाठी जागा वितरणाचे आदेश निर्गमीत केले आहेत. नांदेड शहरालगत मौजे म्हाळजा परिसरात सुमारे दीड हेक्टर भूखंड वितरित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. दिवाळीच्या पर्वावर नव्या सामाजिक न्यायाची अपूर्व भेट मिळाल्याबद्दल तृतीयपंथीयांच्या संघटनांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या हापसापूर शिवारात कापसाच्या पिकात लागवड केलेली गांजाची २३५ झाडं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जप्त केली. या झाडांचं वजन सुमारे ४५ किलो आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन शेत मालकांना ताब्यात घेतलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी इथल्या कंत्राटी कामगार कोविड योद्ध्यांनी काल रुग्णालयासमोर बसून ठेचा भाकरी खाऊन दिवाळी साजरी केली. या रुग्णालयात ९८ कंत्राटी कामगार कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घ्यावं, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून हिंगोली जिल्ह्यात ५३५ लाभार्थ्यांना ३३ कोटी ६५ लाख रुपयांहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. या ५३५ लाभार्थ्यापैकी ४६२ लाभार्थ्यांना महामंडळाकडून व्याज परतावा मंजूर झाला आहे. आतापर्यंत ४५७ लाभार्थ्यांना ४ कोटी २९ लाख ४३ हजार ३२५ रुपये व्याज परतावा केला आहे. ****
0 notes
Text
Pradip: बाळा! तुझी गर्लफ्रेण्ड आहे का?
Bandya : नाही!
Pradip : हल्ली तर सगळ्यांची असते.
जरा सोशल बन.
Bandya (लाजत) : तशी एक आहे.
Pradip - “तेव्हाच प्रत्येक वेळी नापास होतोस.”
असं म्हणत pradip नी Bandya चांगलाच हाणला.
0 notes
Text
Pradip: बाळा! तुझी गर्लफ्रेण्ड आहे का?
Bandya : नाही!
Pradip : हल्ली तर सगळ्यांची असते.
जरा सोशल बन.
Bandya (लाजत) : तशी एक आहे.
Pradip - “तेव्हाच प्रत्येक वेळी नापास होतोस.”
असं म्हणत pradip नी Bandya चांगलाच हाणला.
0 notes
Text
मद्यधुंद अवस्थेत ' ती ' बसमध्ये आली अन चालकापासून वाहकापर्यन्त सगळ्यांची..
मद्यधुंद अवस्थेत ‘ ती ‘ बसमध्ये आली अन चालकापासून वाहकापर्यन्त सगळ्यांची..
दारूच्या नशेत धुंद झालेल्या एका महिलेने एसटी बसमध्ये जोरदार धिंगाणा घातलेला असून हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे उघडकीला आलेला आहे. रात्रीच्या वेळी बसमधून प्रवास करताना या महिलेने बसच्या वाहकाला आणि चालकाला जबरदस्त शिवीगाळ केली त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले मात्र तरीदेखील तिने पोलिसांना देखील अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पोलिसांनी तिला प्रश्न विचारले त्यावेळी तिने…
View On WordPress
0 notes