#संघातून
Explore tagged Tumblr posts
Text
‘ नियोजित कट होता त्यात माझा बळी ‘, राम शिंदे यांचा अजित पवारांवर आरोप
‘ नियोजित कट होता त्यात माझा बळी ‘, राम शिंदे यांचा अजित पवारांवर आरोप
कर्जत जामखेड मतदार संघातून शरद पवार गटाकडून विजयी झालेले रोहित पवार यांची अजित पवार यांच्यासोबत भेट झाली त्यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांचे दर्शन घेतले तेव्हा अजित पवार यांनी आशीर्वाद देताना ‘थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर कळलं असतं’, असा मिश्किल टोला लगावला. अजित पवारांच्या याच विधानावर बोट ठेवत भाजपचे नेते राम शिंदे यांनी गंभीर आरोप केला आहे. कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे भाजपचे…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल-जनतेची मतच नव्हे तर मनं जिंकल्याची भावना मुख्यमंत्र्यांकडून व���यक्त
विद्यमान मंत्रिमंडळातल्या जवळपास सर्वच सदस्यांचा विजय, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांना पराभवाचा धक्का
मराठवाड्यातल्या ४६ जागांपैकी महायुतीला ३९ जागा, तर महाविकास आघाडीचा सात जागांवर विजय
आणि
बॉर्डर गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ २१८ धावांनी आघाडीवर
****
राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल मिळाला आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी भाजपने ६५ जागा जिंकल्या असून, ६८ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसनेनं ३२ जागा जिंकल्या असून, २५ जागांवर शिवसेना उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं २६ जागांवर विजय मिळवला असून, १५ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने पाच जागा जिंकल्या असून १० जागांवर आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १२ जागा जिंकल्या तर आठ जागांवर आघाडी असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सहा जागा जिंकल्या असून चार जागांवर पक्ष आघाडीवर आहे, समाजवादी पक्षाने दोन, जनसुराज्यशक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
****
महायुतीचा हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, राज्यातल्या मतदारांचे विशेषत: महिला आणि युवकांचे आभार मानले.
****
आपण लोकांची मतं नव्हे तर मन जिंकल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. आपण राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि विकासाला जनतेने प्राधान्य दिल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले –
लोकांना आरोप प्रत्यारोप नकोय. लोकांना सुडाचं राजकारण नकोय. लोकांना डेव्हलपमेंट हवंय आणि विकास. विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. जनतेने दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर जनतेने विकासाच्या मुद्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत, अजित पवार या��नी, लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून न जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं.
****
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवला आहे. यासोबतच जवळपास सगळेच विद्यमान मंत्री देखील विजयी झाले. परळीमधून धनंजय मुंडे, सिल्लोड-अब्दुल सत्तार, उदगीर - संजय बनसोडे, येवला - छगन भुजबळ, कागल - हसन मुश्रीफ, परंडा - तानाजी सावंत, रत्नागिरी - उदय सामंत, श्रीवर्धन - आदिती तटकरे, सावंतवाडी -दीपक केसरकर, औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, मालेगाव बाह्य - दादा भुसे, जामनेर - गिरीश महाजन, मलबार हिल्स - मंगलप्रभात लोढा, शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील, पाटण - शंभुराज देसाई, अंबेगाव – दिलीप वळसे पाटील, तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे.
****
अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या ��्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे.
****
काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेने नाकारलं आहे, यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे आदींचा समावेश आहे.
****
मुंबईत कुलाबा मधून भाजपचे राहुल नार्वेकर, धारावीमधून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड, डोंबिवली मधून भाजपचे रविंद्र चव्हाण तर गोरेगाव मतदार संघातून भाजपच्या विद्या ठाकूर, विजयी झाल्या.
वरळी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, माहिम मतदारसंघातूनही ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. या मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर दुसऱ्या, तर मनसेचे अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहीले. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी झाले. या मतदरासंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी दुसऱ्या क्रमांकावर राहीले.
मुंब्रा कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड ९५ हजार १४५ मतांनी विजयी झाले. नवी मुंबईत ऐरोलीतून भाजपचे गणेश नाईक तर बेलापूर मधून मंदा म्हात्रे विजयी झाल्या.
इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, तर ब्रम्हपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार ��िजयी झाले.
****
मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने ३९, तर महाविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाट, तर औरंगाबाद पूर्व मधून भाजपचे अतुल सावे विजयी झाले. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूर मधून शिवसेनेचे रमेश बोरनारे, कन्नड मधून शिवसेनेच्या संजना जाधव, फुलंब्री मधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे जिंकले आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टी मधून भाजप महायुतीचे सुरेश धस, माजलगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले.
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजप महायुतीचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर, तर भोकरदन मधून भाजपाचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला.
****
लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड, अहमदपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर-राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंग्यातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर औसा-भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले. लातूर शहर-महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमित देशमुख यांनी आघाडी घेतली, मात्र भाजपच्या उमेदवार अर्चना चाकूरकर यांच्या मागणीवरुन याठिकाणी फेरमोजणी सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर तुळजापूर मधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला, तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत आघाडीवर आहेत.
उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी हे मतमोजणी झाल्यानंतर तीन हजार ९६५ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी पुन्हा एकदा मतमोजणीची मागणी केल्यामुळे याठिकाणी पुन्हा मोजणी होत आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद बोंडारकर, नांदेड उत्तर-शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव- भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जीतेश अंतापूरकर, मुखेड - भाजपचे तुषार राठोड, भोकर -भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट - भाजपचे भीमराव केराम, तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर विजयी झाले.
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संतुक हंबर्डे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांचा पराभव केला.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजु नवघरे, हिंगोली मधून भाजपचे तानाजी मुटकुळे, तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.
****
��रभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल पाटील, पाथरी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा विजय झाला. गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे आघाडीवर आहेत.
****
बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांचा सलग चौथ्यांदा विजय झाला. मेळघाटातून भाजपचे केवलराम काळे, मोर्शीतून उमेश यावलकर विजयी झाले. गोंदिया मतदारसंघातून भाजपाचे विनोद अग्रवाल विजयी झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महायुतीचे उमेदवार अव्वल ठरले. सावंतवाडी इथून दीपक केसरकर, कुडाळ मधून शिवसेनेचे निलेश राणे, कणकवली मधून भाजपचे नितेश राणे विजयी झाले.
शहापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा, शिरपूर मधून भाजपचे काशीराम पावरा, यांचा विजय झाला.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे, आरमोरी मधून काँग्रेसचे रामदास मसराम, बोईसर शिवसेनेचे विलास तरे, तर नंदुरबार मधून शिवसेनेचे आमशा पाडवी विजयी झाले.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
झारखंड विधानसभा निवडणुकीत एकूण ८१ जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्चानं आठ जागा जिंकल्या असून, २७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं एक जागा जिंकली असून, १९ जागांवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेस १४, तर राष्ट्रीय जनता दल चार जागांवर आघाडीवर आहे.
वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी चार लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत, पहिल्या सामन्याच्या आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं बिनबाद १७२ धावा करत, २१८ धावांची आघाडी घेतली आहे.
****
0 notes
Text
१०१ जालना विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार भास्कर मुकुंदराव दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
१०१ जालना विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार भास्कर मुकुंदराव दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी हरकळ साहेब यांच्याकडे अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल जालना विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक २०२४ साठी मा भास्कर मुकुंदराव दानवे यांनी आज गुरुपुष्यामृत दिनी गुरुवार (दि.24) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी हरकळ साहेब यांच्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्री भास्कर…
0 notes
Text
HBD Sandeep Patil: Wishes from Pradip Madgaonkar
संदीप पाटील हे सचिनला भारतीय संघातून वगळणार होते, पण...
0 notes
Text
HBD Sandeep Patil: Wishes from Bandya Mama
संदीप पाटील हे सचिनला भारतीय संघातून वगळणार होते, पण...
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-lok-sabha-election-result-nagesh-patil-ashtikar-wins/
0 notes
Text
तीन कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर – www.VastavNEWSlive.com
नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. आज शनिवारी यातील तीन बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून हिमायतनगर बाजार समितीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला असून भोकर येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 15 व ��ाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. तर राजकीय युतीचा नवा पटर्न राबवून कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजपने युती करून सत्ता ताब्यात घेतली आहे. येथे भाजपने 10 व कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. तर सर्वांचे लक्ष लागलेल्या नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल उद्या रविवारी जाहीर होणार आहे. हिमायतनगर: कॉंग्रेसचा सर्वच 18 जागेवर विजय बहुचर्चित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच 18 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून बाजार समितीवर कॉंग्रेसचे एक हाती वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती तर शिवसेना शिंद गट व भाजप अशी युती होऊन तिरंगी लढत झाली होती. मात्र शिंदे भाजप गटाच्या काही उमेदवारांची अनामत रक्कम सुद्धा वाचवता आली नाही. तर उभावा गटाला या निवडणुकीत खाते सुद्धा उघडण्याची संधी मिळली नाही. या निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत. यात सेवा सहकारी सोसायटीमधून राठोड कृष्णा ���ुकाराम, सूर्यवंशी संजय विनायकराव, वानखेडे प्रकाश विठ्ठलराव, कॉकवाड दत्ता पुंजाराम, चिकनेपवाड राजेश मारोतराव, वाडेवाड जनार्दन रामचंद्र, टेकाळे खंडू मारोती, महिला राखीव गटातून सूर्यवंशी कांताबाई, वानखेडे शिलाबाई व इतर मागासवर्गीय गटातून शिंदे सुभाष जीवन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधून गडमवाड शामराव दत्तात्रय, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारणमधून परमेश्वर लक्ष्मणराव गोपतवाड व कदम रामराव आनंदराव, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून भिसे दादाराव सदाशिव, आर्थिक दुर्बल घटकातून शिरफुले धर्मराज गणपती व आडत व्यापारी मतदारसंघातून पळशीकर, संदीप शंकरराव, सय्यद रऊफ सय्यद गफूर व हमाल मापाडी मतदारसंघातून शेख मासुम शेख हैदर यांचा समावेश आहे. भोकर येथे आघाडीला स्पष्ट बहुमत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा गड असलेल्या भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या निकालाकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागून होत. येथे कॉंग्रेसने 13, राष्ट्रवादी 2 तर भाजपाने 3 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचे खा. प्रताप पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे दोन व्यापारी सारंग मूंदडा व पंकज पोकलवार हे विजयी झाले. हमाल मापाडीमध्ये सय्यद खालेद, ग्रा.पं. सर्वसाधारण मतदार संघातून कॉंग्रेसचे जगदीश पा. भ���सीकर, भाजपाचे गणेश कापसे हे विजयी झाले. अर्थिक दुर्बल घटकमधून राजकूमार अंगरवार, अनू.जाती जमाती प्रवगार्तून किशन वागतकर, ईमाव प्रवगार्तून बालाजी शानमवाड, से.सह.संस्था मतदार संघातून भाजपाचे किशोर पा. लगळूदकर, सुभाष पा.किन्हाळकर, राष्ट्रवादीचे विश्वांभर पवार, रामचंद्र मूसळे, उज्वल केसराळे, केशव पा. सोळंके, व्यकंटराव जाधव, गणेश राठोड तर महिलामधून राष्ट्रवादीच्या ज्योती कदम, वर्षा देशमूख हे विजयी झाले. अनु. जाती जमाती मतदारसंघात अटितटीची लढत पहावयास मिळाली. शिवाजी देवतळे यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारून समंदरवाडी येथील तरुण तडफदार किशन वागतकर यांना उमेदवारी दिली होती. देवतूळे यांनी वागतकरांना शेवटपर्यंत झुंज दिली मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. तेलंगणातील बिआरएस पक्षाने बाजार समिती निवडणूकीत पॅनल उभे केले होते. पॅनलप्रमूख नागनाथ घिसेवाडांनी विरोधकासमोर आव्हान उभे केले होते. या निवडणूकित बिआरएसच्या उमेदवारांना सपसेल पराभव स्विकारावा लागले. कुंटूर येथे भाजपचे 10 तर कॉंग्रेसचे 8 विजयी नायगाव : सत्तेसाठी काहीही होऊ शकते, हे दाखवून देत नायगावनंतर कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजप युतीचा पटर्न राबविण्यात आला. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिंदे गटाला बाजूला ठेवण्यात आले. या निवडणुकीत भाजपने बाजी मारत 10 तर कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपची 1 जागा बिनविरोध निघाल्याने 17 जागेसाठी निवडणूक झाली होती. मतमोजणीनंतर शेतकरी विकास पॅनलने सर्वच जागेवर एकतर्फी विजय मिळविला. सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण गटामधून कदम येसाजी देवराव जाधव रेश्माजी दतराम, रुपेश देशमुख कुंटूरकर, धर्माधिकारी अंबादास नारायणराव, धर्माधिकारी शिवाजीराव बळवंतराव मोरे मनोजकुमार रावसाहेब व पांडे हनुमंत ज्ञानोबा विजयी झाले. सेवा सहकारी महिला राखीवमध्ये सुवर्णा संभाजी जाधव व महिला राखीवमधून प्रणिता आनंदराव हंबर्डे हे विजयी झाले. इतर मागासवर्गीय गटामधून रमेश गंगाराम व परडे गोविंद गंगाराम सेवा सहकरी विजाभज गटातून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारणमध्ये कदम बालाजी देवराव, कदम माधव वामनराव विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीमधून आईलवार दतात्रय पोचीराम, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकमधून लव्हाळे बालाजी गंगाधर, व्यापारी अडते व्यापारी मतदारसंघामधून जाधव बालाजी महाजन व शेवाळे गोविंद दिगंबर विजयी झाले. अशा पद्धतीने राजकीय युती म्हणून एकत्र आलेल्या भाजपला 10 तर कॉंग्रेस पक्षाला 8 जागा मिळल्या आहेत. Read the full article
0 notes
Text
'का' केले शिक्षक संघातून शरद पवारांना बाजूला?
सातारा (महेश पवार) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ(थोरात गट) आयोजित एक दिवशीय शिक्षण परिषद व शिक्षक मेळावा आज दि. १७ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी येथे होत आहे. शिक्षक संघटनेची आजवर झालेली अधिवेशने किंवा मेळाव्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार एकदाही दूर राह���ले नाहीत. परंतु, या शिक्षण परिषद व मेळावा कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांच्या नावालाही…
View On WordPress
0 notes
Text
नवी मुंबईतल्या राजकारणातला सर्वात नावाजलेला चेहरा अशी ख्याती असलेल्या गणेश नाईकांच्या समोर मंदा म्हात्रेंचा काय निभाव लागणार? अश्या चर्चा नवी मुंबईत रंगू लागल्या होत्या. दुसरीकडे नव्याने तयार झालेल्या ऐरोली मतदार संघातून राष्ट्रवादीने गणेश नाईक यांचे धाकटे सुपुत्र संदिप नाईक यांना उमेदवारी देऊ केली. आता पिता-पुत्र दोघेही नवी मुंबईचं भवितव्य ठरवणार अशी नवी मुंबई करांची निश्चिती झाली. https://acharyaniti.com/will-the-shivshakti-bhimshakti-experiment-revive-the-thackeray-group/
0 notes
Text
राहुरीत पुन्हा शिवाजी कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे ? , बुऱ्हाणनगरमध्ये तर तिकीट जाहीर होताच..
राहुरी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या वतीने माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर बुऱ्हाणनगरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे. बुऱ्हाणनगर हे शिवाजी कर्डिले यांचे होम ग्राउंड आहे. शिवाजी कर्डिले यांनी त्यांच्या कारकिर्दीत दादा पाटील शेळके, भानुदास कोतकर यांच्यासोबत अनेक वर्ष संघर्ष केला. 1995 मध्ये नगर नेवासा मतदार संघातून…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• राज्यात विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्यानं, सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच उमेदवारांचा जनसंवादावर भर • निवडणुकीत बंडखोरी करणारे १६ उमेदवार काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून चित्ररथाद्वारे मतदार जनजागृतीची मोहिम आणि • हिंगोली जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात, पहिल्या दिवशी ७०० ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांचं मतदान
राज्यात विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्यानं, सर्व प्रमुख पक्षांनी तसंच अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. सोबतच समाज माध्यमांचा देखील प्रभावी प्रचारासाठी उपयोग करण्यात येत आहे. महाविकास आघाडी फक्त मतांचं राजकारण करते, ही आघाडी कोणतीही गॅरंटी पूर्ण करू शकत नाही, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मलकापूर इथं आयोजित सभेला ते काल संबोधित करत होते. अमरावती जिल्ह्यात वरुड इथं देखील त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. मोर्शी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्य��ान आमदार देवेन्द्र भुयार आणि भाजपचे उमेश उर्फ चंदू यावलकर यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असली, तरी भाजपला मतदान करण्याचं आवाहन शाह यांनी केलं.
भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव इथं भाजप उमेदवार अशोक उईके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. जातीवादी आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर रहा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
काल सुटीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, जनसंवाद आणि सभा घेण्यावर भर दिल्याचं दिसून आलं. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी काल पदयात्रा काढली. याच मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांची सभा झाली. औरंगाबाद मध्यचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी काल पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला. औरंगाबाद पश्चिम मतदार संघातले माहाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी देखील घरोघरी जाऊन नागरीकांशी संवाद साधला. एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काल औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ काल भव्य आशीर्वाद यात्रा पार पडली. दरम्यान, धाराशिव मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत, धाराशिव आणि कळंब विधानसभा मतदारसंघासाठी आगामी काळात कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचं पाणी आणण्याला प्राधान्य देण्यात येईल, असं सांगितलं. यासोबतच त्यांनी मतदारसंघातल्या इतर प्रस्तावित कामांची माहिती देऊन, ती पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं.
कळंब मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांनी काल कळंब तालुक्यात विविध ठिकाणी सभा घेत प्रचार केला. मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यात आपण विधानसभेत आणि रस्त्यावर देखील आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, तुळजापूर शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप पाटील यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं.
गंगापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची काल सभा झाली. पवार यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या भूम - परंडा विधानसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ देखील सभा घेतली. राज्यात बळीराजा सुखी झाला पाहिजे, त्याच्या घरातली मुलं उच्चशिक्षित झाली पाहिजेत, त्यासाठी आम्ही काम हातात घेतलं असून, महाविकास आघाडीचे संघटन उभं केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांची जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष टारफे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ��ाकरे यांची जाहीर सभा पार पडली.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या १६ उमेदवारांना काँग्रेस पक्षानं सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज दाखल करुन पक्ष शिस्तीचा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
मराठा समाजात संभ्रम नाही, लोकसभेला मराठा समाज एकत्र आला होता, आता विधानसभेलाही मराठा समाजाने, ज्याने आपल्या आरक्षणाला विरोध केला, त्याला पाडावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ते काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. राजकारणापेक्षा आपण सर्वजण मिळून आपल्या आंदोलनाची तयारी करू, असं सांगून त्यांनी, पुढच्या वेळी सामूहिक उपोषण करणार असल्याचं सांगितलं.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानाचं कर्तव्य करावं याकरता मतदान जनजागृतीचे कार्यक्रम राज्यात सर्वत्र होत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघात आजपासून चित्ररथाद्वारे जनजागृतीची मोहिम राबवण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता हा चित्ररथ जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना होणार आहे. जिल्ह्यातल्या गंगापूर - खुलताबाद मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी जनजागरण रॅली, संकल्प पत्र लेखन, रांगोळी, वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पथनाट्य, प्रबोधनपर भारुड आणि लोकशाही दिंडी आदी उपक्रम राबवले जात आहेत. अनेक प्रबोधनात्मक गीतांमधून काल खुलताबाद, गंगापूर, जामगाव, वाळूज, रांजणगाव, शिल्लेगाव, लासूर स्टेशन इथं जनजागृती करण्यात आली. नांदेड इथं मतदार जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत आज युवा मतदार मेळावा आणि पोलीस भरती मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात झाली असून, काल पहिल्या दिवशी ७०० ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी मतदान केलं. गृह मतदानासाठी जिल्ह्यातून एक हजार ७० जणांनी नोंदणी केली आहे. सेनगाव तालुक्यातल्या हुळी इथं १०२ वर्षे वयाच्या आजोबांनी, तसंच ८७ वर्षीय पारूबाई पोले यांनी मतदानाचा हक्क बजावला.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघातल्या सहा उमेदवारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या मतदारसंघात उमेदवारांच्या खर्चाच्या लेख्यांची पहिली तपासणी गेल्या शुक्रवारी झाली. त्यानुसा�� उमेदवार महेबुब इब्राहिम शेख, प्रदीप चव्हाण यांना निवडणूक खर्चाचा हिशोब विलंबाच्या कारणांसह, तर सुरेश धस, बाळासाहेब आजबे, भिमराव धोंडे यांना लेख्यातील तफावतीसंदर्भात ४८ तासात खुलासा सादर करावा, अशा नोटिसा आष्टीच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसिमा शेख यांनी बजावल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शासकीय सेवेतल्या एका अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश देण्यात आले असून, दुसऱ्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यास ताकीद दिली आहे. यासंदर्भा��� खुलताबादच्या कोहीनूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्याविरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सुनावणी घेतली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नांदेड पोलीस परीक्षेत्रात हातभट्टी निर्मूलनासाठी काल नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यात एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत २२ लाख ५९ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १६९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ही माहिती दिली.
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा उत्पादन शुल्क विभागानं गेल्या तीन दिवसात धडक कारवाया करुन आठ लाख १७ हजार ३० रुपयांच्या मुद्देमालासह अवैध दारु जप्त केली. जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया मुक्त आणि निर्भयपणे पार पडावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले आहेत.
परभणी शहराजवळ वसमत महामार्गावरव दुचाकीला ट्रॅक्टरने धडक देऊन झालेल्या अपघातात पती-पत्नी आणि मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. एकनाथ घुगे हे पत्नी शुभांगी आणि मुलगा समर्थ यांच्यासह परभणी इथून हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यातल्या अंजनवाडी गावाकडे दुचाकीवर जात असताना विना नंबरच्या ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगात उलट दिशेने येऊन त्यांना धडक दिल्यानं हा अपघात झाला. मयत एकनाथ घुगे हे रिसोड बस डेपोत वाहक म्हणून कार्यरत होते.
दक्षिण आफ्रिकेनं दुसर्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव केला. काल गकेबरहा इथं झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सहा बाद १२४ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेच्या संघानं हे लक्ष्य १९व्या षटकात सात गडी गमावत पूर्ण केलं. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.
0 notes
Text
आ. कैलास गोरंटयाल यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटणार
जालन्यातील बैठकीत शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निर्धार Congress will meet party leaders for the candidature of MLA Kailas Gorantyal जालना दि.११(प्रतिनीधी) काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले विद्यमान आमदार कैलास गोरंटयाल यांना जालना वि��ानसभा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी करत काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवार दि.१२ ऑगस्ट रोजी छत्रपती…
0 notes
Text
'मला टीमने तयार राहण्यासाठी सांगितले आहे....' राहुलच्या वक्तव्याने पंतची वनडे संघातून कायमची एक्झिट
‘मला टीमने तयार राहण्यासाठी सांगितले आहे….’ राहुलच्या वक्तव्याने पंतची वनडे संघातून कायमची एक्झिट
‘मला टीमने तयार राहण्यासाठी सांगितले आहे….’ राहुलच्या वक्तव्याने पंतची वनडे संघातून कायमची एक्झिट KL Rahul Press Conference – भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात केएल राहुलला यष्टीरक्षक म्हणून खेळवण्यात आले. या सामन्यानंतर केएल राहुलने मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे पंतच्या संघातील बाहेर पडण्यावर चर्चा केली जात आहे. KL Rahul Press Conference – भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात केएल राहुलला…
View On WordPress
#आहे#एक्झिट#कायमची#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#टीमने#तयार#पंतची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#मला#राहण्यासाठी#राहुलच्या#वक्तव्याने#वनडे#विश्��#संघातून#सांगितले?#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडल्यानंतर KL राहुल काय म्हणाला?
IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडल्यानंतर KL राहुल काय म्हणाला?
केएल राहुल IND विरुद्ध SA मालिका: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडल्यानंतर केएल राहुल निराश झाला आहे. या मालिकेसाठी त्याला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले होते मात्र दुखापतीमुळे त्याला बाहेर पडावे लागले होते. आता त्याच्या जागी ऋषभ पंतकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्याच्या एका ट्विटमध्ये केएल राहुलने पंत आणि त्याच्या टीमला मालिकेसाठी ‘बेस्ट ऑफ लक’ म्हटले आहे.…
View On WordPress
#IND vs SA 1ली T20#IND vs SA T20 मालिका#IND वि SA#KL राहुल T20I मालिकेतून बाहेर#केएल राहुल एसए मालिका गमावल्यामुळे#केएल राहुलचे ट्विट#केएल राहुलला दुखापत#भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका#भारत-दक्षिण आफ्रिका पहिला T20#संघातून वगळल्यानंतर केएल राहुलचे वक्तव्य
0 notes
Text
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना दसरा मेळाव्याला सिंधुदुर्गातून हजारो शिवसैनिक जाणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना दसरा मेळाव्याला सिंधुदुर्गातून हजारो शिवसैनिक जाणार
सावंतवाडी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ०५ ऑक्टोंबर २०२२ रोजी मुंबई येथील बीकेसी मैदान, बांद्रा, कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्हयातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक हजारोंच्या संस्थेने उपस्थित राहणार आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून जास्तीत जास्त पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित…
View On WordPress
0 notes