#शिवसेना भाजप युती
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १० नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला वेग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड आणि अकोल्यात सभा • भाजप तसंच महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार • मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार • मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचा विजय • बीड आणि हिंगोली इथं गृह मतदानाला सुरुवात आणि • मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला आता वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद राज्यभरात होत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल अकोला आणि नांदेड इथं सभा झाल्या. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नऊ मतदार संघातले उमेदवार आणि लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोदी यांनी, मराठवाडयाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना तर विदर्भासाठी नदी जोड योजना महायुती सरकारच राबवू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. अकोला इथं झालेल्या सभेत त्यांनी, एक है तो सुरक्षित है, हा नारा पुन्हा एकदा दिला. राज्य आणि केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन मोदी यांनी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा, घराणेशाहीचा आरोप केला.
एक है तो सुरक्षित है आणि कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा देऊन भाजप फुटीरतावादी राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. ते काल नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरच्या मिहान मध्ये आलेला एअरबस चा प्रकल्प हा गुजरातला पळवण्यात आला, अशी टीका त्यांनी केली. अमरावतीच्या तिवसा इथं काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारसभेला, तसंच उत्तर नागपुरात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचारसभेला खरगे यांची संबोधित केलं.
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. त्यांच्या आज जळगाव, बुलडाणा आणि अमरावती याठिकाणी प्रचारसभा देखील होणार आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील आज मुंबईत महाविकास आघाडीचं घोषणापत्र जारी करणार आहेत. काँग्रेसचे सचिव के सी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यावेळी उपस्थित असतील.
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे, औरंगाबाद मध्यचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे संजय शिरसाठ यांच्या प्रचारार्थ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. मराठवाड्यातल्या पहिल्या पिढीने दुष्काळ पाहिला मात्र पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान, शिरसाट यांच्या प्रचारार्थ अभिनेते गोविंदा काल शहरात आले होते. यावेळी रॅली काढण्यात आली. परभणी इथले महायुतीचे शिवसेना उमेदवार आनंद भरोसे आणि जिंतूरच्या भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ परभणी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतली. युती सरकर दहा कलमी योजना राबवणार असून, राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात जास्त अधिकार लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि शेतकऱ्यांचा असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्रात यावेळी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची आणि उमेदवारांची संख्या जास्त असून त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. काल एका वृत्तवाहिनीला ते मुलाखत देत होते. शरद पवार यांनी हिंगोली इथं तसंच बीडमध्ये परळी आणि आष्टी इथल्या सभांनाही काल संबोधित केलं.
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, कंधार इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल सभा घेतली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका त्यांनी केली. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं देखील ठाकरे यांनी जनसभेला संबोधित केलं. जालना इथं काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना प��ोले यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. त्यानंतर पटोले यांची छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व चे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ सभा झाली.
एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगाबाद मध्य आणि पूर्व मतदारसंघात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. हर्सूल परिसरात त्यांनी जनसभेला संबोधित केलं.
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून, मतदान करण्यासाठी, मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड, पारपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र आदींचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते विजय पाटकर यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
मराठवाडा साहित्य परिषद - मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचे सर्व २२ सदस्य बहुमतानं विजयी झाले. या पॅनलच्या विरोधात डॉ. सर्जेराव जिगे यांच्या परिवर्तन मंचाचे १५ उमेदवार उभे होते. काल छ��्रपती संभाजीनगर इथं परिषदेच्या कार्यालयात मतमोजणी पार पडली. येत्या पंधरा दिवसांत कार्यकारी मंडळाची बैठक होवून पदाधिकारी निवडले जाणार आहेत. आपण सहाव्यांदा ही निवडणूक जिंकलो असून, आता मराठवाड्यातला वा.ड्मयीन इतिहास लिहून तो प्रकाशित करण्याच्या उपक्रमासह मराठवाड्यातल्या मराठी भाषेच्या शब्दकोष निर्मितीचं काम केलं जाणार असल्याचं प्राचार्य ठाले पाटील यांनी सांगितलं.
बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला काल सुरुवात झाली. ८५ वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण ३०७ नागरीक गृह मतदान करणार असून, आजपर्यंत हे मतदान चालेल. यासाठी एकूण २२ पथकं ��ेमण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान सुरु झालं असून, यासाठी १८ पथकं रवाना करण्यात आली आहेत.
नांदेड इथं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा काल श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, सर्व महिलांनी मतदान केलं पाहिजे, अशा आशयाचे संदेश या माध्यमातून देण्यात आले. त्याबरोबरच सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी उभारण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करत मतदानाची शपथ दिली.
लातूर ग्रामीणचे निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मतदान जनजागृतीच्या पथकाने गावात गृहभेटी देवून मतदार जागृतीस सुरुवात केली आहे. या अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करुन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जालना जिल्ह्यात ज्या गावांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती, अशा भागात, विशेष फेरी काढून, मतदान संकल्प पत्राचं वाचन करून मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. याअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे यांच्या मार्गदर्शनातून, अंतरवाली सराटी, नालेवाडी वाळकेश्वर, शहागड, महाकाळा अंकुशनगर कारखाना, वडीगोद्री, शहापूर आणि दाडेगाव या गावांमध्ये, शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीनं फेरी काढण्यात आली.
स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी परभणी येत्या १४ तारखेला जिल्हास्तरीय मॅरेथॉनचं, तर १७ तारखेला सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात एक हजार ५२३ मतदान केंद्रावर १४ लाख चार हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांव्यतिरिक्त सैन्य दलात कार्यरत असलेले जिल्ह्यातले दोन हजार ६१२ मतदार ऑनलाईन पद्धतीने मतदान करणार आहेत.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम २०२४-२५ साठी मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र हिंगोली जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. या केंद्रावर ७ जानेवारी पर्यंत मूग आणि उडीद तर १२ जानेवारी पर्यंत सोयाबीन खरेदी सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या केंद्रावर संपर्क करुन नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकार्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी मुग,उडीद आणि सोयाबीन केंद्रावर जावून नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकार्यांनी केलं आहे.
धाराशिव इथल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याची ३१ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. याठिकाणी ३०० तज्ञ डॉक्टर उपलब्ध असलेले सुसज्ज आणि सर्वात मोठे वैद्यकीय संकुल उभारण्याचं काम हाती घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
0 notes
adbanaoapp-india · 10 months ago
Text
महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास? | Loksabha Election 2024
Tumblr media
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी २०२४ साठी आजच फ्री डाउनलोड करा AdBanao अँप आणि मिळवा सर्व पक्षाचं प्रचार पोस्ट्स | Maharashtra Loksabha Election 2024 महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास?
तुम्ही ही करा AdBanao सोबत आपल्या पार्टीचा प्रचार…
गेल्या ५ वर्षात देशामधील सर्वात जास्त राजकीय घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्रातच…
२०१९ साली भाजप-शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळून सुद्धा सरकार बनवता आले नाही कारण, २०१९मधील शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत एक नवीन समीकरण बनवले.आणि उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे जवळ पास निश्चित झाले असताना;
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी ��ाँग्रेसचे मुख्य नेते अजित दादा पवार यांनी सरकार स्थापन करून शपथा देखील घेतल्या.
पहाटे घडलेले हे सरकार ६ दिवसाच्या आतच कोसळले.
Tumblr media
आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी पहिली पसंद
AdBanao घेऊन आले आहे,
👉लोकसभेसाठी सर्व पक्षांसाठी इलेक्शन विशेष पोस्टर्स
👉इलेक्शन विशेष व्हिडिओज
👉 पार्टी स्पेशल ऍनिमेटेड व्हिडिओज
👉इलेक्शन विशेष प्रोफाईल पिक्चर
👉तुमचा फोटो वापरून प्रचार करण्यासाठी विशेष फ्रेम्स
👉व्हाट्सॲप स्टिकर्स
👉ट्रेंडिंग रील्स
👉पार्टी फ्रेम्स
👉आणि यासोबत मिळवा इलेक्शनसाठी खूप काही.
३५ लाख पेक्षा जास्त बिझनेस आणि ३६५ दिवसाच्या फेस्टिवल इमेजेस आणि व्हिडिओजसाठी AdBanao ॲप आहे पहिली चॉईस.
तर या लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आणि आपल्या पार्टीच्या एकदम जबरदस्त पोस्टर्स साठी आताच फ्री डाउनलोड करा.
AdBanao ॲप.
Read the full on our Website
0 notes
gajananjogdand45 · 10 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/patals-ramdasi-poem-shamla-election-conundrum/
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
तीन कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर – www.VastavNEWSlive.com
Tumblr media
नांदे�� (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. आज शनिवारी यातील तीन बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून हिमायतनगर बाजार समितीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला असून भो���र येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 15 व भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. तर राजकीय युतीचा नवा पटर्न राबवून कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजपने युती करून सत्ता ताब्यात घेतली आहे. येथे भाजपने 10 व कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. तर सर्वांचे लक्ष लागलेल्या नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल उद्या रविवारी जाहीर होणार आहे. हिमायतनगर: कॉंग्रेसचा सर्वच 18 जागेवर विजय बहुचर्चित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच 18 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून बाजार समितीवर कॉंग्रेसचे एक हाती वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती तर शिवसेना शिंद गट व भाजप अशी युती होऊन तिरंगी लढत झाली होती. मात्र शिंदे भाजप गटाच्या काही उमेदवारांची अनामत रक्कम सुद्धा वाचवता आली नाही. तर उभावा गटाला या निवडणुकीत खाते सुद्धा उघडण्याची संधी मिळली नाही. या निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत. यात सेवा सहकारी सोसायटीमधून राठोड कृष्णा तुकाराम, सूर्यवंशी संजय विनायकराव, वानखेडे प्रकाश विठ्ठलराव, कॉकवाड दत्ता पुंजाराम, चिकनेपवाड राजेश मारोतराव, वाडेवाड जनार्दन रामचंद्र, टेकाळे खंडू मारोती, महिला राखीव गटातून सूर्यवंशी कांताबाई, वानखेडे शिलाबाई व इतर मागासवर्गीय गटातून शिंदे सुभाष जीवन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधून गडमवाड शामराव दत्तात्रय, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारणमधून परमेश्वर लक्ष्मणराव गोपतवाड व कदम रामराव आनंदराव, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून भिसे दादाराव सदाशिव, आर्थिक दुर्बल घटकातून शिरफुले धर्मराज गणपती व आडत व्यापारी मतदारसंघातून पळशीकर, संदीप शंकरराव, सय्यद रऊफ सय्यद गफूर व हमाल मापाडी मतदारसंघातून शेख मासुम शेख हैदर यांचा समावेश आहे. भोकर येथे आघाडीला स्पष्ट बहुमत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा गड असलेल्या भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या निकालाकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागून होत. येथे कॉंग्रेसने 13, राष्ट्रवादी 2 तर भाजपाने 3 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचे खा. प्रताप पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे दोन व्यापारी सारंग मूंदडा व पंकज पोकलवार हे विजयी झाले. हमाल मापाडीमध्ये सय्यद खालेद, ग्रा.पं. सर्वसाधारण मतदार संघातून कॉंग्रेसचे जगदीश पा. भोसीकर, भाजपाचे गणेश कापसे हे विजयी झाले. अर्थिक दुर्बल घटकमधून राजकूमार अंगरवार, अनू.जाती जमाती प्रवगार्तून किशन वागतकर, ईमाव प्रवगार्तून बालाजी शानमवाड, से.सह.संस्था मतदार संघातून भाजपाचे किशोर पा. लगळूदकर, सुभाष पा.किन्हाळकर, राष्ट्रवादीचे विश्वांभर पवार, रामचंद्र मूसळे, उज्वल केसराळे, केशव पा. सोळंके, व्यकंटराव जाधव, गणेश राठोड तर महिलामधून राष्ट्रवादीच्या ज्योती कदम, वर्षा देशमूख हे विजयी झाले. अनु. जाती जमाती मतदारसंघात अटितटीची लढत पहावयास मिळाली. शिवाजी देवतळे यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारून समंदरवाडी येथील तरुण तडफदार किशन वागतकर यांना उमेदवारी दिली होती. देवतूळे यांनी वागतकरांना शेवटपर्यंत झुंज दिली मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. तेलंगणातील बिआरएस पक्षाने बाजार समिती निवडणूकीत पॅनल उभे केले होते. पॅनलप्रमूख नागनाथ घिसेवाडांनी विरोधकासमोर आव्हान उभे केले होते. या निवडणूकित बिआरएसच्या उमेदवारांना सपसेल पराभव स्विकारावा लागले. कुंटूर येथे भाजपचे 10 तर कॉंग्रेसचे 8 विजयी नायगाव : सत्तेसाठी काहीही होऊ शकते, हे दाखवून देत नायगावनंतर कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजप युतीचा पटर्न राबविण्यात आला. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिंदे गटाला बाजूला ठेवण्यात आले. या निवडणुकीत भाजपने बाजी मारत 10 तर कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपची 1 जागा बिनविरोध निघाल्याने 17 जागेसाठी निवडणूक झाली होती. मतमोजणीनंतर शेतकरी विकास पॅनलने सर्वच जागेवर एकतर्फी विजय मिळविला. सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण गटामधून कदम येसाजी देवराव जाधव रेश्माजी दतराम, रुपेश देशमुख कुंटूरकर, धर्माधिकारी अंबादास नारायणराव, धर्माधिकारी शिवाजीराव बळवंतराव मोरे मनोजकुमार रावसाहेब व पांडे हनुमंत ज्ञानोबा विजयी झाले. सेवा सहकारी महिला राखीवमध्ये सुवर्णा संभाजी जाधव व महिला राखीवमधून प्रणिता आनंदराव हंबर्डे हे विजयी झाले. इतर मागासवर्गीय गटामधून रमेश गंगाराम व परडे गोविंद गंगाराम सेवा सहकरी विजाभज गटातून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारणमध्ये कदम बालाजी देवराव, कदम माधव वामनराव विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीमधून आईलवार दतात्रय पोचीराम, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकमधून लव्हाळे बालाजी गंगाधर, व्यापारी अडते व्यापारी मतदारसंघामधून जाधव बालाजी महाजन व शेवाळे गोविंद दिगंबर विजयी झाले. अशा पद्धतीने राजकीय युती म्हणून एकत्र आलेल्या भाजपला 10 तर कॉंग्रेस पक्षाला 8 जागा मिळल्या ��हेत. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
भाजप-शिवसेना युती सरकारला धोका नाहीच; भुजबळांनी फेटाळला राऊतांचा ‘तो’ दावा
https://bharatlive.news/?p=92189 भाजप-शिवसेना युती सरकारला धोका नाहीच; भुजबळांनी फेटाळला राऊतांचा ‘तो’ ...
0 notes
loksutra · 2 years ago
Text
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली
बच्चू कडू म्हणाले, ‘मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे काहीशी नाराजी आहे. आश्वासन दिले नसते तर आज मी मंत्रीपद मागितले नसते. बच्चू कडू प्रहार जनशक्ती पार्टी प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क महाराष्ट्रातील दोन आमदार असलेला छोटा पक्ष प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आज (बुधवार, 10 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
बंडखोरी करण्याचा विचार मनात कसा आला? मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलं उत्तर; म्हणाले... | How idea of rebellion come to mind CM Eknath Shide gave answer rmm 97
बंडखोरी करण्याचा विचार मनात कसा आला? मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलं उत्तर; म्हणाले… | How idea of rebellion come to mind CM Eknath Shide gave answer rmm 97
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर घडलं आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेऊन अडीच महिन्याहून अधिकचा कालावधी लोटला आहे. पण बंडखोरी नेमकी कोणत्या कारणातून घडली? याबाबत अद्याप अनेक प्रश्न जनतेच्या मनात कायम आहेत. बंडखोरीचा विचार मनात कसा आला? असं विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 5 years ago
Text
Chandrakant Patil: 'शिवसेनेला उपरती झाली तरच एकत्र येऊ, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही'
Chandrakant Patil: ‘शिवसेनेला उपरती झाली तरच एकत्र येऊ, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही’
[ad_1]
कोल्हापूर: महाराष्ट्राच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत, असं वक्तव्य करणारे भाजपचे प्रदे��ाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही वेळातच याबाबत खुलासा केला आहे. ‘एकत्र यायला तयार आहोत याचा अर्थ आम्ही हात पुढे केला असा अर्थ नाही. शिवसेनेला उपरती झाली तर ते येतील. आम्ही त्यांच्याकडं जाणार नाही,’ असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. (Chandrakant Patil on Shivsena-BJP Alliance)
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
• विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड आणि अकोल्यात सभा, मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना महायुतीचं सरकारच आणेल असा विश्वास • भाजप फुटीरतावादी राजकारण करत असल्याचा काँग्रेस ��ध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप • मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार • सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या अधिकृतपणे निवृत्त होणार, न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार पदभार आणि • बीड, हिंगोली तसंच नाशिक इथं गृह मतदानाला सुरुवात
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून, विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद आज राज्यभरात होत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज राज्यात अकोला आणि नांदेड इथं सभा झाल्या. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नऊ मतदार संघातले उमेदवार आणि लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोदी यांनी, मराठवाडयाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना तर विदर्भासाठी नदी जोड योजना महायुती सरकारचं राबवू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. अकोला इथं झालेल्या सभेत त्यांनी, एक है तो सुरक्षित है, हा नारा पुन्हा एकदा दिला. महाराष्ट्रानं २०१४ ते २०२४ अशी दहा वर्षं भाजपला सातत्यानं संधी दिली, महाराष्ट्रवासीयांची देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी यातून दिसते, असं ते म्हणाले. राज्य आणि केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन मोदी यांनी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा, घराणेशाहीचा आरोप केला.
****
एक है तो सुरक्षित है आणि कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा देऊन भाजप फुटीरतावादी राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरच्या मिहान मध्ये आलेला एअरबस चा प्रकल्प हा गुजरातला पळवण्यात आला, अशी टीका त्यांनी केली. तत्पूर्वी, खरगे यांनी नागपुरातल्या दीक्षाभूमीला भेट देऊन, डॉ. आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला आदरांजली वाहिली. अमरावतीच्या तिवसा इथं काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारसभेला त्यांनी संबोधित केलं, उत्तर नागपुरात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या प्राचारार्थ खरगे यांची आज सभा होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे, औरंगाबाद मध्यचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा शहराच्या बजरंग चौकात होत आहे. परभणी इथले महायुतीचे शिवसेना उमेदवार आनंद भरोसे आणि जिंतूरच्या भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ परभणी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतली. युती सरकार दहा कलमी योजना राबवणार असून, राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात जास्त अधिकार लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि शेतकऱ्यांचा असल्याचं ते म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, कंधार इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका त्यांनी केली. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं देखील ठाकरे यांनी जनसभेला संबोधित केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड इथं परळी विधानसभा मतदारसंघातले महाविकास आगाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. जालना इथं काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. त्यानंतर पटोले यांची छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्वचे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ सभा झाली.
****
एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज औरंगाबाद मध्य आणि पूर्व मतदारसंघात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. हर्सूल परिसरात ओवैसी जनसभेला संबोधित करणार आहेत.
****
सत्याला नेहमीच असत्याशी सामना करावा लागतो, महाराष्ट्राप्रमाणेच हिमाचल प्रदेशनेही ऑपरेशन कमळचा सामना केला पण जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली, अशी माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यावेळी उपस्थित होते. काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात जाहीर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत, अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातल्या ��नतेची दिशाभूल केली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
नाशिक- चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघातले भाजपचे बंडखोर केदा आहेर आणि आत्माराम कुंभार्डे या दोघांची पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपाने मालेगाव बाह्य मधले बंडखोर कुणाल सूर्यवंशी, बागलाणमधले आकाश साळुंखे आणि जयश्री गरुड या तिघांची हकलपट्टी केली होती.
****
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून, मतदान करण्यासाठी, मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड, पारपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र आदींचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे.
****
राज्यात येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते विजय गोखले यांनी केलं आहे. बाईट – विजय गोखले
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या रविवारी अधिकृतपणे निवृत्त होणार आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा काल न्यायालयात शेवटचा दिवस होता. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या निकालांमध्ये अयोध्या जमीन वाद, दोन प्रौढांनी सहमतीने ठेवलेल्या समलिंगी संबंधांना मान्यता आणि अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार यांचा समावेश आहे. त्यांचे हे निर्णय समाज आणि राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे होते.
****
देशभरात आज राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा केला जात आहे. नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी, आणि समाजातल्या वंचित घटकांसह सर्व नागरिकांना न्याय प्रक्रियेचा लाभ मिळावा, हा यामागचा उद्देश आहे. नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत शिक्षण देण्यासाठी तसंच विविध प्रकल्प आणि योजनांच्या माध्यमातून विवाद निवारण यंत्रणा मजबूत करुन अधिकन्याय्य समाजाची निर्मिती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
****
बीड विधानसभा मतदारसंघात आजपासून गृह मतदानाला सुरुवात झाली. ८५ वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण ३०७ नागरिक गृह मतदान करणार असून, उद्यापर्यंत हेमतदान चालेल. यासाठी एकूण २२ पथकं नेमण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान सुरु झालं असून, यासाठी १८ पथकं रवाना करण्यात आली आहेत. नाशिक विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान होत असून, आज पहिल्या दिवशी सुमारे शंभराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केलं.
****
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात नवडणे शिवारातल्या एका शेतात धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीवरुन केलेल्या कारवाईत ६७ लाख २० हजार रुपये किमतीचा मद्यसाठा पकडला आहे.
****
0 notes
kokannow · 3 years ago
Text
दिल्लीच्या हुकूमशहांना रोखण्याची ताकद महाराष्ट्राच्या जनतेमध्ये : आ. वैभव नाईक
दिल्लीच्या हुकूमशहांना रोखण्याची ताकद महाराष्ट्राच्या जनतेमध्ये : आ. वैभव नाईक
बाळा गावडे यांच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेशइन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाचा विभागीय मेळावा संपन्न कणकवली : महाराष्ट्राच्या जनतेच्या रक्तात लढण्याची वृत्ती आहे. २०१४ मध्ये देखील युती तुटली होती तेव्हा देखील ��िवसेनेविरोधात संपूर्ण देशातील भाजप उतरले होते.त्यांचा मराठी माणसाबद्दल द्वेष वेळोवेळी त्यांनी केलेल्या कृतीवरून व वक्तव्यावरून दिसून येत आहे. त्यामुळेच मराठी माणसाचा पाठींबा असलेला शिवसेना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
आघाडीत ‘वंचित’ चौथा भिडू; ठाकरे गट-वंचितच्या युतीची अधिकृत घोषणा
Tumblr media
मुंबई: अखेर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीत चौथा भिडू मिळाला आहे. वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठे आव्हान उभे राहणार आहे. याशिवाय या नव्या युतीचे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या दूरगामी परिणाम होणार आहेत. यावेळी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी युती संदर्भातील प्रास्ताविक केले. यावेळी संजय राऊतहेही उपस्थित होते. ज्या स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहत होते. यापूर्वी असा प्रयोग झाला. पण प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पहिल्यांदाच एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. देश प्रथम म्हणून एकत्र आलो आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देश प्रथम हा मुद्दा महत्त्वाचा घेऊनच आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आमच्यासोबतचे जे सहकारी आहेत. ते एकत्र येऊन काम करणार आहोत, असंही त्यांनी सांगितले. वैचारिक प्रदूषण संपवायचंय एक भ्रम पसरवला जातो. हुकूमशाहीकडे ��शीच वाटचाल होत असते. जनतेला भ्रमात ठेवायचे. नको त्या वादात अडकवायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे हे सुरू आहे. याच वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. संविधानाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. राजकीय वाटचाल कशी असेल ते परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. तळागाळातील जनतेपर्यंत जे काही देशात चाललं आहे. ते पोहोचवण्याची गरज आहे. परवा पंतप्रधान आले. सभेला कोण आले. कुठून आले. त्यांना काय सांगितलं. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा अन् निवडणुका गेल्यावर गरीब रस्त्यावर आणि त्यांची उड्डाण सुरू असतात. ते रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं. संभाव्य संकट रोखण्यासाठी : सुभाष देसाई गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आंबेडकर आणि ठाकरे यांच्यात दोन बैठकाही झाल्या. देशात एक वातावरण आहे. त्यानुसार देश हुकूमशाहीकडे चालला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नको त्या गोष्टीकडे लक्ष जात आहे. त्यामुळे देश भरकटवण्याचं काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशाचा भवितव्याचा विचार करून दोन्ही नेत्यांनी एकत्र यायचे ठरवले. संभाव्य संकट रोखण्यासाठी या दोन्ही शक्तींनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुभाष देसाई यांनी सांगितलं. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात युती झाल्यास या पक्षाला बसणार फटका, संजय आवटे यांचं विश्लेषण
ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात युती झाल्यास या पक्षाला बसणार फटका, संजय आवटे यांचं विश्लेषण
ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात युती झाल्यास या पक्षाला बसणार फटका, संजय आवटे यांचं विश्लेषण पुणे – उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्याशी वंचितशी युती करण्याबाबत चर्चा केली. यासंदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक संजय आवटे म्हणाले, शिवसेना ही भाजपपासून दूर गेली, याला फार मोठा अर्थ आहे. यामुळं महाराष्ट्राचं राजकारण आमुलाग्र बदललं आहे. शिवसेना आणि भाजप हासुद्धा हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे. दोघांनी युती…
View On WordPress
0 notes
snehalshelote · 3 years ago
Link
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र : 'आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार', मुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य, गेल्या 24 दिवसांत 89 शेतकऱ्यांनी दिले प्राण
महाराष्ट्र : ‘आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार’, मुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य, गेल्या 24 दिवसांत 89 शेतकऱ्यांनी दिले प्राण
मराठवाड्यात आतापर्यंत 54, यवतमाळमध्ये 12, जळगावमध्ये 6, बुलढाण्यात 5, अमरावतीमध्ये 4, वाशिममध्ये 4, अकोल्यात 3 आणि चंद्रपूर-भंडारामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. Cm एकनाथ शिंदे आणि Dy Cm देवेंद्र फडणवीस प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क 30 जून रोजी महाराष्ट्रात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन मोठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
मग राकाँशी युती करणार्‍या भाजप नेत्यांचे निलंबन का नाही?
मग राकाँशी युती करणार्‍या भाजप नेत्यांचे निलंबन का नाही?
भंडारा : राज्यातील महाविकास आघाडीत कधीही शक्य नसलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आलेत. भाजपाला सत्तेपासून दूर सारण्यासाठी तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी केली. म्हणजेच ते तिन्ही भाजप चे शत्रू पक्ष आहेत. भंडारा जिल्हा परिषद व पं��ायत समिती निवडणुकीत माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष बनला.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरु, मराठवाड्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा • भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज अकोला आणि नांदेड इथं सभा • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीत बंडखोरी करणारे आठ जण निलंबित • मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ आणि • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ६१ धावांनी विजय
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरु असून, सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी राज्याच्या दौर्यावर असून, आज त्यांच्या अकोला आणि नांदेड इथं सभा होणार आहे. नवीन नांदेड मध्ये कौठा इथल्या मैदानावर ही सभा होईल. दरम्यान, मोदी यांनी काल धुळे आणि नाशिक इथं जाहीर सभा घेतल्या. धुळे इथं सभेला संबोधित करताना त्यांनी, महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करु शकतं, असं सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. महाविकास आघाडीने अनेक विकासप्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप करत, आघाडीमध्ये आपसात भांडणं असल्याबद्दल त्यांनी टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिव इथं धाराशिव मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे आणि तुळजापूर मतदारसंघाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर पहिल्या शंभर दिवसांचं व्हिजन मांडत त्यानुसार काम करणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आज त्यांची परभणी इथं सभा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात उमेदवार जनसंवाद आणि पदयात्रेवर भर देत आहेत. काल औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुहास दाशरथे यांनी मतदारसंघात पदयात्रा काढून नागरीकांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात तसंच औरंगाबाद पूर्व मतदार संघातले एम आय एम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी नागरिकाशी संवाद साधला. पैठण मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आडूळ इथं प्रचार सभा घेतली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज विविध पक्षां���्या प्रमुख नेत्यांच्या तीन प्रचार सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिडको परिसरात बजरंग चौक इथं संध्याकाळी स��ा होईल. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सिडको एन-फोर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं तसंच एम आय एम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांची हर्सुल परिसरात संध्याकाळी सभा होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. लोकसभेला फेक नरेटीव्ह पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि महायुतीचं मोठं नुकसान केलं, आता विधानसभेला मात्र फेक नरेटीव्ह चालणार नाही, असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल परभणी जिल्ह्यात सेलू इथं जिंतूर विधानसभा मतदारसंघातले पक्षाचे उमेदवार विजय भांबळे, तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. पवार यांच्या आज बीड जिल्ह्यात परळी, आष्टी आणि बीड इथे सभा होणार आहेत. लातूर शहर विधानसभेचे काँग्रेस उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सभा झाली. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आल्यास लातूरला सोयाबीनचं विशेष केंद्र उभारणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल जालना इथं सभा घेतली.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणार्या आठ जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निलंबित केलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. यामध्ये नांदेड इथले विश्वंभर पवार, पूजा व्यवहारे, आनंद सिंधीकर यांचा समावेश आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते सुनिल बर्वे यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. या निवडणुकीत युवकांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं: जिल्हाधिकारी स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे वृत्त विभाग प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली ही मुलाखत, आज सकाळी साडे अकरा वाजता आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होणार आहे. आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर, या यू- ट्यूब चॅनेलवर देखील आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.
विधानसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा,अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत करण्यात आला. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचं लोकार्पण करण्यात आलं. याअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मतदार गीताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं या कार्यक्रमाचा शुभारंभ स्मार्ट सिटी स��ागृहात करण्यात आला. आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया ही जगात आदर्श आणि पारदर्शक आहे, जास्तीत जास्त लोकांचा प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी पाहिजे, त्याकरता सर्वांनी मतदान करणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. याअंतर्गत नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम शहरातल्या तिरंगा ध्वज कॉर्नर या ठिकाणी घेण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात नांदेडकरांनी मतदान करण्याची शपथ घेतली.
मतदार जनजागृतीसाठी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं स्वीप कक्षाच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या २० तारखेला मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारताने ६१ धावांनी जिकंला. काल डर्बन इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने २० षटकात आठ बाद २०२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ अठराव्या षटकात एक चेंडु शिल्लक असतांना १४१ धावसंख्येवर सर्वबाद झाला. ५० चेंडूत १०७ धावा करणारा भारताचा संजु सॅमसन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
बीड जिल्ह्यात पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. काल सकाळच्या सुमारास नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणाऱ्या सय्यद कुटुंबियांच्या गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सय्यद हमीद आणि सय्यद मुदस्सीर या पिता पुत्राचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं स्थानिक गुन्हे शाखेनं एका महिलेकडून १८ लाख रोख रक्कम जप्त केली. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या तपासणीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पाटोदा तालुक्यातल्या भाकरेवस्ती इथं गुन्हे शाखेनं डीजे साहित्य चोरणारी टोळी पकडली असून, ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दीचा ताण कमी क��ण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड - मुंबई - नांदेड रेल्वेच्या दोन विशेष फेऱ्या करण्याचं ठरवलं आहे. ही गाडी उद्या दहा नोव्हेंबरला रात्री अकरा वाजता नांदेड इथून सुटेल आणि परवा ११ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबईहून दुपारी साडेतीन वाजता निघून मंगळवारी सकाळी सव्वासहा वाजता नांदेडला पोहोचेल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उद्या १० नोव्हेंबरला होत असून, बीड इथल्या १६ परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा होत आहे.
0 notes