Tumgik
#वीजवितरण
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विजेचा शॉक लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू; धनजंय मुंडेंनी वीजवितरण कंपनीला धरलं जबाबदार
विजेचा शॉक लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू; धनजंय मुंडेंनी वीजवितरण कंपनीला धरलं जबाबदार
विजेचा शॉक लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू; धनजंय मुंडेंनी वीजवितरण कंपनीला धरलं जबाबदार बीड : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचे निधन झाले आहे. विजेचा धक्का लागून संतोषचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोषसोबतच बाबुराव मुंडे यांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. संतोष मुंडे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १४ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१४ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात येत्या २०२२ पर्यंत फिरतं पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार असल्याचं पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी काल सांगितलं.
पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या १५ पशुवैद्यकीय रुग्णालयांचा काल प्रारंभ करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांमुळे पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे, असं त्यांनी नमूद केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषिपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालये ही नितांत गरज असल्याचं ते म्हणाले.
****
बीड जिल्ह्याच्या गेवराई इथं शेतपंपांचा विद्युत पुरवठा महावितरणनं खंडित केल्या प्रकरणी काल सुरु करण्यात आलेलं उपोषण चर्चेनंतर माघे घेण्यात आलं. रब्बी हंगामातील पिकं ऐन भरात असताना, वीजवितरण कंपनीनं पूर्व सूचना न देता शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह काल दुपारी उपोषन सुरू केलं. मात्र महावितरणचे वरिष्ठ आधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये सविस्तर बैठक होऊन एका आठवड्यात वीज बील भरल्यास आणि कुठलीही थकबाकी न ठेवल्यास वीज तोडणी करु नये असं लेखी आश्वासन मिळाल्यानं उपोषण मागे घेण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यातले मोक्का अंतर्गत फरार असलेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हा शाखेनं काल अटक केली. अटक केलेल्या पाचही अट्टल गुन्हेगारांविरूद्ध जालना, औरंगाबाद, बीड, परभणी  इथं दरोडे, चोरी, खून, लुटमार यासारखे गंभीर अकरा गुन्हे दाखल आहेत. गुन्हा करून हे गुन्हेगार मागील आठ- दहा वर्षांपासून फरार होते. विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी बीड विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली.
****
चेन्नई इथं भारत - इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दूसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव सर्वबाद ३२९ धावांवर संपुष्टात आला असून इंग्लंडच्या पहिल्या डावात दोन बाद १६ धावा झाल्या आहेत.
***///***
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
अशीही कुरघोडी! वीज वितरण कंपनीने तहसील कार्यालयाची वीज तोडताच महसूल विभागाचा दणका
अशीही कुरघोडी! वीज वितरण कंपनीने तहसील कार्यालयाची वीज तोडताच महसूल विभागाचा दणका
अशीही कुरघोडी! वीज वितरण कंपनीने तहसील कार्यालयाची वीज तोडताच महसूल विभागाचा दणका हिंगोली: आपण राजकारणात नेहमी एकमेकांवर कुरघोडी करताना बघितलं आहे. परंतु शासकीय कार्यालयांची कधीही बघितली नसेल याचा प्रत्येय हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरात अनुभवायला मिळाला. वीज बिलापोटी ७ लाख ४५ हजार थकल्याने वीजवितरण कंपनीने रविवारी वसमत तहसील कार्यालयाची वीज तोडणी तोडली. तर काल ९ लाख ५४ हजाराचा अकृर्षीक कर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 January 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** औरंगाबादमध्ये आयोजित अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०चं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन ** राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर; उद्योग मंत्री सुभाष देसाई - औरंगाबाद, परभणी -नवाब मलिक, हिंगोली -वर्षा गायकवाड तर उस्मानाबादचे - शंकरराव गडाख पालकमंत्री ** राज्यात सहापैकी नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाला तर धुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत; वाशिम, अकोला, पालघर आणि नंदुरबार त्रिशंकू ** आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र रकाना करून जनगणना करण्याचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर आणि ** कामगार संघटनांच्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद **** औरंगाबाद इथं आजपासून सुरु होणाऱ्या अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०, या औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे. शहरातल्या चिकलठाणा औद्योगिक परिसरात, कलाग्राम आणि गरवारे क्रीडांगणावर आयोजित या प्रदर्शनात मराठवाड्याबरोबरच राज्य आणि परराज्यातले, चारशे चव्वेचाळीस उद्योग आपापली उत्पादनं प्रदर्शित करणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा समारोप येत्या रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच औरंगाबाद दौरा असल्यानं, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचं औरंगाबाद विमानतळावर आगमन होणार आहे. दोन दिवसीय दौर्यात मुख्यमंत्री, मराठवाड्यातल्या औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यातल्या अनुशेषांसह शेतकरी पीक कर्ज, शिवभोजन योजना, आरोग्य योजना, पीकविम्याबाबत आढावा बैठक घेणार आहेत. **** राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावं काल जाहीर करण्यात आली. उद्योग मंत्री सुभाष देसाई औरंगाबादचे पालकमंत्री असतील. जालना - राजेश टोपे, बीड - धनंजय मुंडे, परभणी नवाब मलिक, हिंगोली वर्षा गायकवाड, नांदेड - अशोक चव्हाण, उस्मानाबाद - शंकरराव गडाख तर लातूरचं पालकमंत्रीपद अमित देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडचे आमदार आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार यांच्याकडे धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ***** राज्यात झालेल्या सहा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीची काल मतमोजणी करण्यात आली. नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाला तर धुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं. वाशिम, अकोला, पालघर आणि नंदुरबार जिल्हा परिषदांमध्ये मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. वाशिम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकूण ५२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं १२, काँग्रेस नऊ, शिवसेना सहा, तर भाजपनं सात जागा जिंकल्या. अकोला जिल्हा परिषदेतत भारिप बहुज महासंघाला २२, शिवसेनेा १३, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि भाजपला प्रत्येकी सात जागा मिळाल्या. पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेनं अठरा, राष्ट्रवादी काँग्रेसनं चौदा, काँग्रेसनं एक, तर भाजपानं बारा जागा जिंकल्या तर इतर बारा उमेदवार निवडून आले. नंदुरबार इथं भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना प्रत्येकी २३ जागा तर शिवसेनेला सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा जिंकता आल्या. दरम्यान, धुळे जिल्ह्यातल्या चार पंचायत समितीच्या एकूण ११२ गणांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक ७१, काँग्रेसनं १७, शिवसेनेनं १०, राष्ट्रवादी काँग्रेसनं सहा, तर आठ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. पालघर जिल्ह्यातल्या आठ पंचायत समितीसाठीच्या ११४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला ४७, भाजपला २१, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला १२, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २०, मनसेला दोन, बहुजन विकास आघाडीला सात जागांवर आणि पाच अपक्ष उमेदवारांना विजय मिळवण्यात यश आलं आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे धनंजय सावंत यांची निवड झाली आहे. काल झालेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अस्मिता कांबळे यांना ३०, तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या अंजली शेरखाने यांना २३ मतं मिळाली. शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्यानं, अध्यक्षपदी भाजप उमेदवार विजयी झाल्या. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मनिषा पवार, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमल बुधवत यांची निवड झाली. **** लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती - जमातीला तसंच अँग्लो इंडियन समाजाला नामनिर्देशनाद्वारे प्रतिनिधित्व देण्याच्या निर्णयाला पुढील दहा वर्ष मुदतवाढ देण्यास, राज्य विधीमंडळानं मान्यता दिली आहे. संसदेनं मंजूर केलेल्या या संविधानातल्या कलम १२६च्या सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यासाठी काल विधीमंडळाचं विशेष अधिवेशन झालं. हे विधेयक समाजातल्या सर्व स्तरांना समान संधी देणारं असून, सामाजिक न्यायाचा भक्कम पाया असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाच्या अनुमोदनाचा प्रस्ताव मांडताना सांगितलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. विधानपरिषदेतही मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधेयकाच्या समर्थनात आपले विचार मांडले. याचवेळी आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र रकाना करून जनगणना करण्याचा ठरावही आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. **** समाजसुधारकांनी घालून दिलेल्या मार्गाचं अनुसरण करत समाजातल्या वंचित घटकांचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. राज्य विधीमंडळाच्या कालच्या विशेष अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. अनुसूचित जाती - जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, महिला आणि तळागाळातल्या घटकांच्या कल्याणासाठी योजना आणि कार्यक्रमांची तत्परतेनं अंमलबजावणी केली जाईल, असं राज्यपाल म्हणाले. महिलांसंदर्भातल्या गुन्ह्यांबाबत त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात येईल, त्यासाठी कायद्यांमध्ये आवश्यक ती सुधारणा देखील केली जाईल, असं आश्वासनही राज्यपालांनी यावेळी दिलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** कामगार संघटनांनी काल पुकारलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. या संघटनांनी क्रांती चौक इथून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. या बंदच्या अनुषंगानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरच्या गोळेगाव इथं या आंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतुक खोळंबली होती. लातूर जिल्ह्यात शासकीय कर्मचारी, राष्ट्रीयकृत बॅंकेतील कर्मचारी, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झाले. आंदोलकांनी लातूर शहरातल्या प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढला. जिल्ह्यातही तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथ सरकारी कार्यालयांसह खाजगी उद्योग-व्यवसाय तसंच, बँकांमध्ये संपाचा संमिश्र परिणाम दिसून आला. नांदेड जिल्हा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. परभणी जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातल्या बॅंक, वीजवितरण, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामरोजगार सेवक, आदी कर्मचारी संपात सहभागी झाले होते. राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघानंही आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर काल मोर्चा काढला होता. जालना जिल्ह्यातही कालच्या या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद इथली संत गोरोबाकाका साहित्य नगरी सज्ज झाली आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या संमेलनाला ग्रंथदिंडीनं प्रारंभ होणार आहे. या संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमांबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे उस्मानाबादचे वार्ताहर १० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता दिवशी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री ना धो महानोर यांच्या हस्ते आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे . या साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी ११ जानेवारीला चार वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन तर १२ जानेवारीला कथा लेखकांशी संवाद, परिसंवाद, परिचर्चा, बालकुमार मेळावा, उस्मानाबाद जिल्ह्यातले जेष्ठ कथालेखक प्राध्यापक भास्कर चंदनशिव ,दिल्ली येथील मराठीभाषक हिंदी लेखक लक्ष्मण नथुजी शिरभाते , तसंच श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाच्या श्रीमती सुमती लांडे यांचा सत्कार आणि साहित्य संमेलनाचा समारोप प्राचार्य रा रं बोराडे यांच्या उपस्थितीत होत आहे . **** नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातही काल अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. औरंगाबाद इथं काल बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीविरोधात मोर्चा काढण्यात आला. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही काल धरणे आंदोलन करण्यात आलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, शेतमजूर संघटना आणि ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १३ मार्च २०१८ सकाळी ११.०० वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत क्षयरोग निर्मुलन शिखर संमेलनाचं उद्धाटन करुन ‘क्षयरोग मुक्त भारत’ या अभियानाची सुरुवात करत आहेत. हे अभियान राष्ट्रीय पातळीवर, निश्चित आखणी करुन राबवण्यात येणार असून, रुग्णांना निदान, उपचार आणि सहाय्याकरता आगामी तीन वर्षांसाठी १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सन २०२५ पर्यंत क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याचं उद्दीष्ट नव्या राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाअंतर्गत ठरवण्यात आलं आहे. . **** डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी झालेल्या, अनियमीत नियुक्त्यांची चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलं आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, यांनी यासंदर्भात काल राज्यपालांची भेट घेऊन, बेकायदेशीर पद्धतीनं केलेल्या या नियुक्त्या रद्द करून, ही प्रक्रिया नव्यानं राबवण्याची मागणी केली. **** लातूर जिल्ह्यात उदगीर जवळ तोंडार इथल्या विलास - दोन या साखर कारखान्यात या वर्षी विक्रमी गाळप झालं आहे. जिल्ह्यातले इतर साखर कारखाने बंद असल्यानं आणि शेतकऱ्यांनी लागण झालेल्या सर्व ऊसाची नोंद कारखान्याकडे न करणं, यामुळे कारखान्याच्या गाळप प्रक्रियेवर मोठा दबाव आला आहे. असं असलं तरी क्षेत्रातल्या सर्व ऊसाचं गाळप झाल्याशिवाय हंगाम बंद केला जाणार नाही, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित देशमुख यांनी दिली आहे. **** नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात बिजूर इथल्या एका संस्थाचालकाला शिक्षकाकडून लाच घेताना काल अटक करण्यात आली. विश्र्वास राचुरे असं त्याचं नाव असून, तो लोकशिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष आहे. **** लातूर महापालिकेची सुमारे १२ कोटी १७ लाख रूपयांची वीजदेयकं थकल्यामुळे, वीजवितरण कंपनीनं पथदिवे, तसंच पाणी पुरवठ्याचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचं उपमहापौर देवीदास काळे यांनी सांगितलं. **** परभणी जिल्ह्यात काल एका रस्ते अपघातात तीन जण ठार झाले. पालम लोहा रस्त्यावर काल सकाळी दुचाकी आणि मालवाहू गाडी यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. *******
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 27 February 2018 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि. ****
आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असून, पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असल्याचं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात पारनेर इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा सहकारी बँकांना टाळे लावायला निघालेलं सरकार, दुसरीकडे बँका ओरबाडून पळून जाणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, ठाकरे यांनी केला. केंद्र सरकार लोकांचे प्रश्न सोडवायला तयार नाही. अच्छे दिन आले नाहीत, ��सं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, हे देशाला मिळालेलं फसवं नेतृत्व असल्याचं, ठाकरे म्हणाले. **** मराठी भाषा ही जास्तीत जास्त लोकाभिमुख होऊन ज्ञान भाषा व्हावी याकरता सरकारनं भाषेच्या विकास प्रक्रियेला अधिक चालना द्यावी अशी शिफारस करणारा ठराव आज मराठी भाषा गौरव दिनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमतानं मंजूर केला. विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा ठराव मांडला. मराठी विषय बारावी पर्यंत सक्तीचा करण्याबद्दल, अभ्यास मंडळाला सूचना करण्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिली. मराठीचा राज्य कारभारात जास्तीत जात उपयोग करण्याबद्दल पावलं उचलली जात आहेत असं ते म्हणाले. आज सकाळी विधिमंडळ प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ध्वनीक्षेपक बंद पडल्याचा तसंच मराठी गौरव गीतात सातवं कडवं गायल गेलं नसल्याचा मुद्दा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी विरोधी पक्षांनी उपस्थित केला. सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसून सरकार तुघलकी वागणूक देत असल्याचा आरोप करत विधानपरिषेत विरोधकांनी घोषणाबाजी केली, त्यामुळे परिषदेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत स्थगन प्रस्ताव मांडला. **** मराठी भाषा विद्यापीठ उभारण्यासाठी ग्रंथाली प्रकाशनाला मुंबईत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्याकडे या जागेची करारप्रत सोपवण्यात आली. वांद्रे पश्चिम मतदार संघात हे विद्यापीठ उभारलं जाणार आहे. **** मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातल्या एका न्यायालयात आज संपूर्ण युक्तिवाद मराठी भाषेतून करण्यात आला. न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती एस.एम.गव्हाणे यांनी कामकाज मराठीतून करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयातल्या सगळ्या विधीज्ञांनी मराठीतून युक्तिवाद करुन हा दिवस साजरा केला. **** औरंगाबाद इथं आज मराठी भाषा दिनानिमित्त बहुभाषिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महापौर नंदकुमार घोडले यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. ��ा बहुभाषिक संमेलनामध्ये २४ भाषांचे प्रतिनिधी, पंधरा महाविद्यालयं, आठ शाळा सहभागी झाल्या होत्या. शहरातल्या वसंतराव नाईक महाविद्यालयात डॉ.महेश खरात यांचं ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यातल्या अडचणी’ या विषयावर व्याख्यान झालं. **** मराठा आरक्षणा संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगानं आयोजित केलेली जनसुनावणी आज उस्मानाबाद इथं घेण्यात आली. यावेळी विविध संस्था संघटनांकडून निवेदनं स्वीकारण्यात आली. ही सुनावणी पाच ते नऊ मार्च या कालावधीत अनुक्रमे नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आणि जालना या ठिकाणी होणार आहे. **** आगामी होळीचा सण साजरा करताना वीजेसंबंधी अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे. होळी पेटवताना सभोवताली वीज वाहिन्या किंवा वीजवितरण रोहित्र नाहीत, याची खात्री करावी, असं औरंगाबादच्या महावितरण कार्यालयाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितलं आहे. **** अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसून, त्यांचा मृत्यू शुद्ध हरपल्यानंतर, स्नानगृहातल्या टबमध्ये अपघातानं बुडून झाल्याचं, दुबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे त्यांच्या मृत्यूचा तपास थांबवण्यात आल्याचं, दुबई पोलिसांनी सांगितल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे. दरम्यान, श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात आणण्यासंबंधी दुबई पोलिसांनी आवश्यक कागदपत्रं कपूर कुटुंबीयांकडे सोपवली आहेत. दुबईतल्या भारतीय दुतावासातून ही माहिती देण्यात आली. श्रीदेवी यांच्या मृतदेहावर रसायनांचं लेपन करून, त्यांचा मृतदेह भारतात आणला जाणार आहे. श्रीदेवी यांचा शनिवारी मध्यरात्रीनंतर दुबईत एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. **** येत्या सहा मार्च रोजी होणाऱ्या पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्यात येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना, एकनाथ महाराज विश्वस्त संस्थानचे कार्यकारी विश्वस्त तथा अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी दिल्या आहेत. आज पैठण इथं झालेल्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यात्रा उत्सवाच्या व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकांनी पैठण नगर परिषदेत नाव नोंदणी करण्याचं आवाहनही सोरमारे यांनी केलं आहे. ****
0 notes