#महसूल
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
राज्य उत्पादन शुल्कात तब्बल 32.86 टक्के वाढ; नोव्हेंबरअखेर ‘इतके’ हजार कोटींचा महसूल
राज्य उत्पादन शुल्कात तब्बल 32.86 टक्के वाढ; नोव्हेंबरअखेर ‘इतके’ हजार कोटींचा महसूल
राज्य उत्पादन शुल्कात तब्बल 32.86 टक्के वाढ; नोव्हेंबरअखेर ‘इतके’ हजार कोटींचा महसूल मुंबई – राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सन 2022-23 या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत 12 हजार 952.82 कोटी रूपयांचा महसूल जमा झाला आहे. गतवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत 9748.96 कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. गतवर्षीच्या तुलनेत महसूलात 32.86 टक्के वाढ झाली आहे. राज्यात एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर कोतवालांच्या मानधनवाढीबाबत केलेल्या घोषणेप्रमाणे कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर करताना केलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 6 days ago
Text
राधाकृष्ण विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल, अमृतवाहिनी बँकेची शाखा तुम्हाला..
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर इथे बोलताना बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला असून ,’ शिर्डी मतदारसंघाप्रमाणे आपल्याला संगमनेरचा विकास करायचा आहे त्यासाठी तुम्ही परिवर्तन करा. तरुणांना रोजगाराच्या संधी मी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतो. आमच्यावर दहशतीचा आरोप केला जातो तर मग अमृतवाहिनी बँकेची शाखा राहात्यात काढावी का वाटते ?, ‘ असे देखील प्रश्नचिन्ह त्यांनी…
0 notes
airnews-arngbad · 10 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• आज बलिप्रतिपदा-विक्रम संवत २०८१ ला प्रारंभ-लक्ष्मीपूजनाचा सोहळा काल उत्साहात साजरा • देशभरात वस्तू आणि सेवा कर महसुलात ऑक्टोबर महिन्यात नऊ टक्के वाढ • राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाबाबत दोन हजार ६२ तक्रारी प्राप्त • सोलापूर जिल्ह्यात चौघांचा तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू आणि • न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात भारत १४९ धावांनी पिछाडीवर
बलिप्रतिपदा अ��्थात दिवाळीचा पाडवा आज साजरा होत आहे. विष्णूचा पाचवा ��वतार असलेल्या वामनाने तीन पावलं भूमीचं दान मागून राक्षसांचा राजा बलि याला पाताळात पाठवल्याची आख्यायिका आजच्या सणामागे सांगितली जाते. गोवर्धन पूजाही आज केली जाते. विक्रम संवत २०८१ अर्थात व्यापारी वर्गाच्या नव्या वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे, पाडव्यानिमित्त सर्वत्र विशेष खरेदीचा प्रघात आहे. घरांसह वाहनं, आभुषणं, आणि इतर साहित्य खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येतो. दीपोत्सवात सर्वाधिक मानाचा लक्ष्मीपूजनाचा सण काल साजरा झाला. लक्ष्मीपूजनासाठी कमळासह विविध प्रकारची फुलं, नैवेद्यासाठी नाना तऱ्हेची पक्वान्नं, पूजेसाठी फडे-केरसुण्या, लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्हं आणि सौभाग्यालंकार, तसंच विविध पूजा साहित्यानं सजलेल्या बाजारपेठा, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या विशेषत: महिलांच्या गर्दीनं काल फुलून गेल्या होत्या. काल सायंकाळी घरोघरी पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन करण्यात आलं. आकर्षक आणि सुबक रांगोळीच्या पार्श्वभूमीवर मंद तेवणाऱ्या पणत्या, विद्युत रोषणाईच्या झगमगत्या माळा, नाना तऱ्हेचे आकाशदिवे, आणि आकाश व्यापून टाकणाऱ्या नयनरम्य आतिषबाजीने आसमंत उजळून गेला .
शिर्डीमधे साईबाबा संस्‍थानच्‍या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी दिवाळीनिमित्त साईबाबांच्‍या समाधी मंदिरात लक्ष्‍मी कुबेर पूजन, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आलं. काल दिवाळीनिमित्त साईबाबांची मूर्ती हिरेजडीत सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली होती. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही मंदिर समितीनं विविध फुलांच्या माध्यमातून आकर्षक आरास केली होती.
वस्तू आणि सेवा कर महसूल ऑक्टोबर महिन्यात नऊ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमधे एक लाख ७२ हजार कोटी रुपये महसूल वस्तू आणि सेवा करापोटी मिळाला होता. तो यंदा एक लाख ८७ हजार कोटी रुपयांच्या पलिकडे गेला आहे. देशांतर्गत खरेदी विक्री व्यवहारांमधे वाढ झाल्यामुळे करमहसुलात वाढ झाली असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.
नमो ड्रोन दिदी योजनेच्या संचालनाबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. या योजनेचं संचालन केंद्रीय स्तरावर अधिकार प्राप्त समितीकडे देण्यात आलं आहे.
१९ ��िलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात काल ६२ रुपयांनी वाढ झाली. कालपासून हे नवे दर लागू झाले. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
राज्यभरात आचारसंहिता भंगाबाबत सी-व्हिजिल ॲपवर आतापर्यंत एकूण दोन हजार ६२ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दोन हजार ५९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. याच कालावधीत विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत सुमारे २३४ कोटी ४९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराची मोर्चेबांधणी केली आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा होणार असून, त्यातली पहिली सभा येत्या आठ नोव्हेंबरला धुळ्यात होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील सहा नोव्हेंबर रोजी राज्यात प्रचार दौऱ्यावर येत असून, ते नागपूर आणि मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावतील असं कॉँग्रेसतर्फे सांगण्यात आलं आहे.
मुंबादेवी विधानसभा मतदार संघातल्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एन.सी यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला. नागपाडा पोलीस ठाण्यात शिवसेनेनं तक्रार नोंदवल्य���नंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबईतल्या माहिमचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. माहिमचे मनसे उमेदवार अमित ठाकरे यांना भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी सांगितलं.
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम ��ालपासून लागू झाले. आता रेल्वे तिकिटांचं आरक्षण १२० दिवसांऐवजी प्रवासाच्या ६० दिवस आधी करता येणार आहे. मात्र, ३१ ऑक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणं कायम राहणार आहेत. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, तसंच तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
दक्षता जनजागृती सप्ताह सध्या पाळला जात आहे. २८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी या निमित्तानं सतर्क राहून, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची निर्भयपणे माहिती देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी केलं आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की, दिनांक २८ आक्टोबर २०२४ ते ३ नोहेंबर २०२४ या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये आपले शासकीय काम असेल आणि त्यासाठी कुणी आपल्याला लाच मागत असेल तर तात्काळ आपण लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क करावा. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारे लाच देणे किंवा लाच घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुणी लाच मागत असेल तर तात्काळ संपर्क करावा.
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात चार ऊसतोड मजुरांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. माढा इथल्या जगदाळे वस्तीवर यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांपैकी २४ ते २६ वर्ष वयोगटाले काही जण काल दुपारी अंघोळीसाठी खैराव इथं सीना नदीवर गेले होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली. याबाबत माहिती मिळताच, माढा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. लासूर स्टेशन परिसरात ही दुर्घटना घडली. अनुक्रमे १७ आणि १८ वर्षाच्या या दोघा भावांपैकी एक जण पाय घसरून विहिरीत पडला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरा भाऊही बुडाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पहिल्या डावात भारत १४९ धावांनी पिछाडीवर आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर काल सकाळी सुरु झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला पाहुणा संघ २३५ धावांत सर्वबाद झाला. रवींद्र जडेजानं पाच, वॉशिंग्टन सुंदरने चार तर आकाशदीपने एक बळी घेतला. काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ��ारतीय संघाच्या चार बाद ८६ धावा झाल्या होत्या. शुभमन गील ३१ तर ऋषभ पंत एका धावेवर खेळत आहे. दरम्यान या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडनं २-० अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.
आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ हंगामासाठी हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती झाली आहे. २०२४ च्या आय पी एल हंगामासाठी रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आय पी एल चं विजेतेपद पटकावलं आहे.
दिवाळीच्या आपल्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं करण्यात येतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीनं, वंचितांना दिवाळी फराळ वाटप उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथल्या नागरिकांनी स्वेच्छेने जमा केलेली फराळाची पाकिटं जवळपास पाचशे कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं अन्न वाचवा समितीच्या वतीने दिव्यांग तसंच अंध व्यक्तींना मिठाई आणि कपडे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात असलेले केंद्रीय निमलष्करी दलाचे सुमारे दोनशे महिला- पुरुष पोलिसांसोबत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी काल दिवाळी साजरी केली.
दिवाळी तसंच छटपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या पाहता, मध्य रेल्वेनं मुंबईहून गोरखपूर, दानापूर, छपरा, तसंच काझीपेठसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज आणि उद्या या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
0 notes
aksharhandwritinganalysis · 1 month ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
" देहबोली व अक्षरावरून स्वभाव ओळख " या विषयावर मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे नवनियुक्त तलाठी बॅच साठी प्रशिक्षण.
0 notes
mhlivenews · 2 months ago
Text
कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १० सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप - कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. 2 : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. सन 2023…
0 notes
marmikmaharashtra · 3 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/revenue-fortnight-34-persons-appointed-to-the-post-of-talathi/
0 notes
automaticthinghoagiezine · 4 months ago
Video
youtube
नाशिक महसूल कर्मचारी संघटनेचे आंदोलन..
0 notes
news-34 · 4 months ago
Text
0 notes
mhadalottery2023 · 5 months ago
Text
म्हाडाची पाच हजार घरांची लॉटरी? वांद्रे रेक्लमेशन, आदर्शनगर, अभ्युदयनगर येथे घरे
मुंबई: आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या धर्तीवर वांद्रे रेक्लेमेशन, आदर्शनगर (वरळी) आणि अभ्युदयनगर (काळा चौकी) या वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. . आणि विकास एजन्सी. या पुनर्विकासामुळे म्हाडाला 300 चौरस फुटांची 5000 घरे मिळणार असून सर्वसाधारण विक्रीतून 9000 कोटी रुपयांचा महसूल मिळणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 5 months ago
Text
मतमोजणी केंद्रात नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
Training of the officers and staff appointed at the counting center is completed जालना, दि. 31 (जिमाका) :- 18-जालना लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी मंगळवार,  दि. 4 जून 2024 रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतमोजणी केंद्रात नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात शुक्रवार दि.31 मे 2024 रोजी  संपन्न झाले. प्रशिक्षण जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
मंत्रालयात मागण्यांबाबत ५ एप्रिलला बैठक | नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार : महसूल मंत्री
अहमदनगर, दि.३ : राज्यातील नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. यासाठी प्रशासनाची मंत्रालयात ��� एप्रिल रोजी बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने अहमदनगर येथील कार्यक्रमादरम्यान महसूल मंत्री विखे पाटील यांना नायब तहसीलदारांच्या विविध मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 15 days ago
Text
काँग्रेसनं लघु कानडे यांच तिकीट कापलं , हेमंत ओगले म्हणाले की.. 
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जुने समर्थक आणि विद्यमान आमदार लघु कानडे यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारलेली असून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले हे आता या ठिकाणावरून निवडणूक लढवणार आहेत.  श्रीरामपूर तालुक्यामध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कानडे आणि ससाणे गटात जोरदार स्पर्धा लागलेली होती. दोन दिवसांपूर्वीच पहिल्या यादीत कानडे यांचे नाव आले नाही…
0 notes
airnews-arngbad · 12 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी होत आहे. उमेदवारांना चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
दरम्यान, काल अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यभरात २८८ मतदार संघांसाठी एकूण सात हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल झाल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल ३६८ अर्ज दाखल झाले. धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात काल १३० उमेदवारांनी १७९ अर्ज भरले. जिल्ह्यात आतापर्यंत १८५ उमेदवारांचे २७१ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.
लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात काल १२५ उमेदवारांनी १७३ नामनिर्देशन पत्रं दाखल केले, तर जिल्ह्यात आतापर्यंत २१३ उमेदवारांनी ३०१ अर्ज भरले आहेत.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काल २७ उमेदवारांनी ३४ अर्ज दाखल केले. आतापर्यंत ४१ जणांचे ५६ अर्ज दाखल झाले आहेत. तर जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदार संघात काल ३८८ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत ५१५ उमेदवारांनी एकूण ६६७ अर्ज भरले आहेत.
जालना जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघात काल १४९ उमेदवारांनी २०८ अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत एकूण २५८ उमेदवारांचे ३८२ अर्ज दाखल झाले आहेत.
बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात आतापर्यंत ४०९ उमेदवारांनी ५६६ अर्ज दाखल केले, परभणी जिल्ह्यात १८९ उमेदवारांनी २४४ अर्ज भरले आहेत तर हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा मतदार संघात काल १२४ नामनिर्देशनपत्रं दाखल झाली आहेत.  
****
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देखील काल संपली असून, अर्जांची छाननी आज होत आहे. शुक्रवारी एक नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतिल. या टप्प्यात ३८ मतदारसंघांमधे येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत ६२ अर्ज बाद झाले असून, ४३ मतदारसंघांमधे मिळून ७४३ अर्ज वैध ठरले आहेत. या टप्प्यासाठी उमेदवारी मागं घेण्याची मुदत आज संपणार आहे. या टप्प्यात येत्या १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
****
अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरात आज भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शरयू नदीच्या घाटावर होणाऱ्या दीपोत्सवात, पणत्या उजळण्याचे सर्व विक्रम मोडले जाणार आहेत. नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी २८ लाख दिवे उजळ��े जाणार आहेत. मुख्य कार्यक्रमासाठी संपूर्ण शहराची स्वच्छता आणि सजावट करण्यात आली आहे. एक हजार १०० हून अधिक पुजाऱ्यांकरवी शरयू नदीची आरतीही करण्यात येणार आहे. नागरिकांनीही हा सण उत्साहानं साजरा करत आपल्या घरी दीपोत्सव करावा असं आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
****
भारत - स्पेन दरम्यान दृढ मैत्री संबंध असून ते वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर राहील, असं स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी म्हटलं आहे. मुंबईत चौथ्या स्पेन- भारत मंचाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. शाश्वत भविष्याच्या दृष्टीनं या दोन्ही देशांचं सहकार्य सकारात्मक पुढाकार ठरेल, असा विश्वास, त्यांनी व्यक्त केला. व्यापार, गुंतवणूक त्याचप्रमाणे डिजिटल तंत्रज्ञान आणि त्यानं निर्माण झालेली आव्हानं या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
****
विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरात सी-व्हिजिल  ॲपवर एकूण एक हजार ६४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी एक हजार ६४६ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली.
****
बीड जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा भासत असून, जिल्हा रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी रक्तदान भवन त��ार करण्यात आलं असून, त्याठिकाणी सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला आहे. जिल्हाभरातल्या नागरीकांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात काल अवैध वाहतुक होणाऱ्या मद्यासह सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कळंब- अंबाजोगाई मार्गावर महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
****
नंदुरबार इथं काल एका तलवार बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी २३ तलवारी एक गुप्ती आणि दोन चाकू जप्त केले. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
****
धाराशिव इथल्या जात प्रमाणपत्रासाठी संबंधित कार्यालयातला शिपायाला १९ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने काल रंगेहात पकडलं. सागर क्षीरसागर असं त्याचं नाव आहे
****
पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलिय���चा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांच्या जोडीने उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात या जोडीने जर्मनीचे ॲलेक्झांडर ज्यूरेव आणि ब्राझीलच्या मार्सेलो मेलो या जोडीचा सहा - सात, सात - सहा असा पराभव केला.
****
0 notes
aksharhandwritinganalysis · 3 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
" तुमचे हस्ताक्षर व तुमची देहबोली (Body language) याद्वारे व्यक्ती विश्लेषण " या विषयावर मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, छ. संभाजीनगर येथे तलाठी बॅच क्र.२५ साठी सेमिनार.
1 note · View note
sharpbharat · 7 months ago
Text
adityapur bajaar samiti- आदित्यपुर थाना रोड का अतिक्रमण, बाजार समिति की रसीद पर दुकानदारों से वसूल रहा मनमाना महसूल
आदित्यपुर: कृषि उत्पादन बाजार समिति के शह पर दिंदली सहकारी स्वावलंबन समिति आदित्यपुर थाना रोड का अतिक्रमण कर वहां स्थायी और फुटपाथी दुकान लगवा रहा है. बदले में बाजार समिति के रसीद पर दुकानदारों से मनमाना महसूल वसूल रहा है. इस संबंध में पूछे जाने पर बाजार समिति के सचिव ने बताया कि बाजार का टेंडर हुआ है मगर महसूल का दर निर्धारित नहीं किया ��या है. उनसे जब बाजार का दायरा कहां तक तय है पूछा गया तो…
Tumblr media
View On WordPress
0 notes