#विशाल सिंग
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी/काँग्रेसकडून सोनिया गांधी यांचा राजस्थानातून उमेदवारी अर्ज दाखल
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी-प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी सात हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
आणि
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर उद्या निकाल
****
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, यामध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर गुजरात मधून जे.पी. नड्डा यांच्यासह चार, मध्य प्रदेशातून डॉ. एल मुरुगन यांच्यासह, चार, तर ओडिसामधून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजस्थान मधून आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. बिहार मधून अखिलेश प्रसाद सिंग, तर हिमाचल प्रदेश मधून अभिषेक मनू सिंघवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, गरज भासल्यास, येत्या २७ तारखेला मतदान होईल.
दरम्यान, आपल्याला मिळालेल्या उमेदवारीबद्दल अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत -
भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची मला उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी ��ोदी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पक्षामध्ये गेल्यानंतर ताबडतोब ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली, हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे असं माझा व्यक्तिगत मत आहे.
****
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना इथून लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली असं आंबेडकर म्हणाले. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण न देता वेगळे आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
****
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीनं राज्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. बीड जिल्ह्यात सर्वत्र बंद पाळण्यात आला. परळी, माजलगाव आणि केज इथं दूचाकी रॅली काढण्यात आली तसंच जरुड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लातूर जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. अहमदनगर जिल्ह्यातही पारनेर कर्जत, जामखेड, श्रीगोंदा शेवगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. नाशिक इथं मराठा समाजातर्फे लाक्षणिक आंदोलन कण्यात आलं. सातारा जिल्ह्यात कराड, फलटण, खंडाळा इथं बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी सात हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यातील शासकीय तसंच अनुदानित वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करून ते दरमहा १८ हजार रुपये करण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्यात लातूरसह सहा ठिकाणी परिचर्या महाविद्यालयं उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला. ही महाविद्यालयं प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेची असणार आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित एक कोटी २१ लाख रुपये दरवर्षी खर्च करण्यासही राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मान्यता दिली.
ऑन��ाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू पुरवण्यासाठीच्या सर्वंकष सुधारित रेती धोरणाला मंजुरी, मुद्रांक शुल्क माफीमध्ये भाडेपट्ट्याचा समावेश करणं, उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देणं, तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला
****
आज देशभरात वसंत पंचमीचा सण उत्साहात साजरा झाला. या दिवशी विद्येची, बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त आज पंढरपूर इथं विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा झाला.
****
छत्रपती संभाजीनगर इथून आज सकाळी अयोथ्या इथल्या बाळरामाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी भगवा झेंडा दाखवून रेल्वेला रवाना केले. श्रीराम नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात सर्व राम भक्त रेल्वेनं अयोध्येकडे रवाना झाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर उद्या, गुरूवारी निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन करणार आहेत. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी ही सुनावणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल देत, पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाला दिलं आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी आज बरखास्त करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन नाना गावंडे यांनी दिली. नांदेड शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
लातूर इथं सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय १००व्या नाट्य संमेलनात आज 'नाटक माझ्या चष्म्यातून' या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. या परिसंवादात आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि पत्रकार विलास बडे सहभागी झाले होते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात हरवत चाललेली भावना आणि संवेदना नाटकामुळे जिवंत असल्याच�� जाणीव 'नाटक माझ्या चष्म्यातून' या परिसंवादात झाली. नाटक ही कला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामीण भागात जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने नाट्य स्पर्धांचं आयोजन होणं आवश्यक असल्याचं मत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच आज झालेल्या नाट्यगीत महोत्सवात सादर झालेल्या नाट्य गीतांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक लाभार्थी आपल्याला झालेल्या लाभांची माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथंही लाभार्थींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेतील गट-अ ते गट-ड पदावरील अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षासूची संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी त्याच्या हरकती २६ तारखेपर्यंत विहीत पुराव्यासह कार्यालयाकडे समक्ष सादर कराव्या, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज भारतीय योग संस्थेची छत्रपती संभाजीनगर शाखा आणि जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सूर्यनमस्कार साधना कार्यक्रम घेण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते. योगाचं महत्व जगभरात मान्य झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग केला जात असल्याचं, कराड यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आलं. आज कार रॅलीने या अभियानाचा समारोप करण्यात आला.
****
केज तालुक्यातील आडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाने आडस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात चांगली आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार आहे.
****
देशाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योजकांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. उद्योजक घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रकल्प आधारित ज्ञानावर भर द्यावा आणि त्यासाठी विविध आस्थापनांबरोबर संलग्नित राहून काम करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केलं आहे. आज विद्यापीठात "उद्योग विद्यापीठ सहयोग" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कुलगुरू बोलत होते.
****
0 notes
Text
विशाल सिंगसोबतचे खोटे फोटो शेअर केल्याने देवोलिना भट्टाचार्जी ट्रोल झाल्या, आता दिले उत्तर
विशाल सिंगसोबतचे खोटे फोटो शेअर केल्याने देवोलिना भट्टाचार्जी ट्रोल झाल्या, आता दिले उत्तर
देवोलिना भट्टाचार्जीने तिच्या ट्रोलिंगवर चोख प्रत्युत्तर दिले: गेल्या आठवड्यात एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अचानक सोशल मीडियावर एक चित्र आले आणि मग बातमी बनत गेली. हा फोटो देवोलिना भट्टाचार्जीचा होता ज्यामध्ये विशाल सिंह तिच्यासोबत दिसत होता, जर तुम्ही विशाल सिंहला ओळखत नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की विशाल साथ निभाना साथिया (साथ निभाना साथिया) या मालिकेत जिगर मोदीच्या भूमिकेत दिसला…
View On WordPress
#एबीपी बातम्या#देवोलिना भट्टाचार्जी#देवोलिना भट्टाचार्जी आणि विशाल सिंग#देवोलिना भट्टाचार्जी फोटो#देवोलिना भट्टाचार्जी बॉयफ्रेंड#देवोलिना भट्टाचार्जी वय#देवोलिना भट्टाचार्य पती विशाल सिंग#देवोलीना भट्टाचार्जी#देवोलीना भट्टाचार्जी एंगेजमेंट#देवोलीना भट्टाचार्जी शस्त्रक्रिया#विशाल सिंग
0 notes
Text
Bigg Boss 16: इतिहासात पहिल्यांदाच बदलणार बिग बॉसचा आवाज, घरात दिसणार हे मोठे बदल
Bigg Boss 16: इतिहासात पहिल्यांदाच बदलणार बिग बॉसचा आवाज, घरात दिसणार हे मोठे बदल
बिग बॉसचा आवाज बदलणार: सलमान खान वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 16 लवकरच टीव्हीवर स्फोट होणार आहे. हा शो हिट व्हावा यासाठी निर्मात्यांनी सर्व तयारी केली आहे. आता शोमध्ये दिसलेल्या स्टार्सच्या नावांवरूनही पडदा हटण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, बिग बॉस 16 च्या संदर्भात मोठे अपडेट्स समोर येत आहेत. यावेळी बिग बॉसचा आवाज बदलणार असल्याचे वृत्त आहे. बातमीनुसार, यावेळी तुम्हाला बिग बॉसचा जुना आवाज ऐकायला…
View On WordPress
#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही गॉसिप#टीव्ही ताज्या बातम्या#टीव्ही नवीनतम गप्पाटप्पा#टीव्ही बातम्या#टीव्ही मालिका#दिया और बाती हम#दीपिका सिंग#दीपिका सिंग इंस्टाग्राम#दीपिका सिंग न्यूज शो#दीपिका सिंग बातम्या#दीपिका सिंह बिग बॉस 16 मध्ये#प्राची देसाई#बिग बॉस १६#बिग बॉस 16 मध्ये विशाल पांडे#मनोरंजन गप्पाटप्पा#मनोरंजन ताज्या बातम्या#मनोरंजन बातम्या#विशाल पांडे#सलमान खान
0 notes
Text
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप, ‘मोगुल’चं काम थांबलं : आता आमिर खान काजोलसह ‘या’ चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप, ‘मोगुल’चं काम थांबलं : आता आमिर खान काजोलसह ‘या’ चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप, ‘मोगुल’चं काम थांबलं : आता आमिर खान काजोलसह ‘या’ चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका असं म्हंटलं जातंय की या चित्रपटात आमिरपेक्षा सर्वात उत्तम काम विशाल जेठवा याने केलं आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटल्याचं आपण पाहिलं आहे. यामुळे आमिरचं प्रचंड नुकसा झालं आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मही आमिरच्या या चित्रपटाला प्रदर्शित करायला तयार नाहीत.…
View On WordPress
#‘मोगुल’चं#आता#आताची बातमी#आमिर#एंटरटेनमेंट बातम्या#काजोलसह#काम#खान#चड्ढा&8217;#चित्रपटात#ट्रेंडिंग बातमी#थांबलं#न्यूज अपडेट मराठी#फ्रेश बातमी#फ्लॉप#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भूमिका;#मनोरंजन#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महत्वाची#महाराष्ट्राची बातमी#या#रेगुलर अपडेट#लाल#वायरल बातमी#साकारणार#सिंग#सिने जगत
0 notes
Photo
मळण ला दि. 16 डिसेंबर रोजी पुरस्कार वितरित Award to Short Film - Malam NEXGN INTERNATIONAL SHORT FILM FESTIVAL, इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथून मळण या चित्रपटास अवॉर्ड ऑफ एक्सलन्स फॉर बेस्ट फिल्म हा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 16 डिसेंबर या महोत्सवात शेवटच्या दिवशी दिग्दर्शकाच्या वतीने मयूर नरवाडे व विशाल दुधमल यांनी स्वीकारला आहे. NEXGN (Creative Studio) ही इंटरनॅशनल ऍक्रिडि��ेशन फोरम अँड एमरेट्स इंटरनॅशनल ऍक्रिडिटेशन द्वारे प्रमाणित केलेल्या संस्थेचे फाउंडर सुरज साळुंखे तसेच डायरेक्टर रविना सिंग हे आहेत. तसेच नेक्सजन क्रिएटिव्ह स्टुडिओ हि वेब डिझाईनिंग, ग्राफिक्स डिझायनिंग, लोगो डिझाईनिंग, इव्हेंटस सेट अप्स, सोशल मीडिया मार्केटिंग, ब्रँड प्रमोशन साठी प्रसिद्ध असलेली ही अत्याधुनिक सोयी द्वारे स्थापित संस्था इचलकरंजी येथे आहे. त्यांच्या वतीने आयोजित या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात "मळण" फिल्म साठी ट्रॉफी व आंतरराष्ट्रीय मूल्याचे प्रमाणपत्र वितरित केले आहे, असे मळण लघु चित्रपटाचे निर्माते, लेखक व दिग्दर्शक ऍड . चारुशील माने यांनी कळविले आहे. यापूर्वी मळण लघुचित्रपटास रहिकवार ब्रदर्स आयोजित नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्डस 2019 बल्लारपूरमध्ये मळण साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त झाला होता व कला-समृद्धी फिल्म फेस्टिवल मुंबई येथे नॅशनल शॉर्ट फिल्म चे नामांकन मिळाले होते, तसेच पहिले वैदर्भीय आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव वर्धा जिल्ह्यात पार्टीसिपेशन अवॉर्ड मिळाला होता. याशिवाय ११वे दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड मुंबई मध्ये "मळण" ला बेस्ट शॉर्ट फिल्म पुरस्कार मिळाला आहे. एवढेच नव्हे तर इचलकरंजी येथील विनोद आवळे यांच्या देखील वेगळ्या आयोजित इचलकरंजी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये मळण लघुचित्रपटाची निवड झाली आहे.मळण च्या यशाबद्दल ॲड. चारुशील माने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. https://www.instagram.com/p/B6JMD78l-s3/?igshid=ojtgwngl6wwp
0 notes
Photo
पेण्डारी गांव में जुआ फड़ पर छापामार कर 6 जुआरियों को पुलिस ने पकड़ा। बिलासपुर/सकरी- रविवार को सकरी पुलिस थाना प्रभारी अभिनव उपाध्याय को मुखबिर से सूचना मिली कि सकरी थाना क्षेत्र के पेण्डारी गांव के एक कोठार में बड़े स्तर पर जुआ खेला जा रहा है। सूचना मिलते ही थाना प्रभारी अभिनव उपाध्याय अपने थाना स्टॉप प्रधान आरक्षक सिद्धार्थ पाण्डेय, आरक्षक गजपाल जांगड़े, तरुण प्रताप सिंग, मुकेश राय, शैलेंद्र साहू के साथ ग्राम पेंडारी के लिये रवाना हुये। सकरी पुलिस ने मुखबिर द्वारा बताए गए स्थान पर घेराबंदी कर छापा मारा। पहले दो जुआरियों ने पुलिस देख कर भागने का प्रयास किया। चारों ओर से घिरा देख भागने में नाकामयाब रहे। पुलिस ने जुआ खेल रहे संजू वल्द मन्नूलाल विश्वकर्मा 26 वर्ष निवासी भरा��ी, रामनारायण वल्द बंशीलाल यादव 29वर्ष पेण्डारी, श्रवण कुमार वल्द बलदाऊ साहू 29वर्ष पेण्डारी, मनोज वल्द विशाल साहू 28वर्ष पेण्डारी, रामायण वल्द साधराम विश्वकर्मा 30वर्ष पेण्डारी, संदीप बघेल वल्द सेवक राम 24वर्ष पेण्डारी निवासी को जुआ खेलते हुए पकड़ लिया। पुलिस ने फड़ से 2950रू व ताश की गड्डी बरामद की। सभी पकड़े गये जुआरियों की तलाशी भी ली गयी। उनके पास से और कुछ बरामद नही हुआ। गौरतलब हो कि सकरी परिक्षेत्र के गांव में कई दिनों से बड़े स्तर पर जुआ खेले जाने की सूचना मिल रही थी जिस पर सकरी पुलिस की तत्परता, सूझबूझ और मुखबिर की सहायता से सभी 6आरोपियों को सकरी पुलिस ने अपने हिरासत में ले लीया। सभी आरोपियों के खिलाफ अपराध धारा 13 जुआ एक्ट की तहत कार्यवाही की गई हैं।
0 notes
Photo
Chapter 45 “ COMFORT ZONE ” #journeyofdirectorismailumarkhan जैसे ही “सपनो से भरे नैना “ से फ़्री हुआ, इमैजिन टीवी का शो “बाबा ऐसा वर ढूंढो” से बुलावा आया, बहुत ही यूनिक स्टोरी थी, एक बौनी लड़की की कहानी, जितनी दमदार स्टोरी थी। उतनी ही दमदार कास्ट, विक्रांत मेस्सेय, दर्शन कुमार, अशिता धवन, दर्पण, जूही असलम, नपुर अलंकार, तब्रेज, शलिनी साहुता, राज सिंग और अदिति तैलंग, मुझे लीप से शूट शुरू करना था, लेकिन किसी वजह से मैं, लीप से पहली वाली कहानी के प्री क्लाइमैक्स से जुड़ गया, सौरभ तिवारी साहब का पहला शो बतौर निर्माता था, बैनर का नाम “नौटंकी फ़िल्मस“ क्या ग़ज़ब नरेशन देते है सौरभ जी, मैंने आज तक ऐसा नरेशन नहीं सुना, विशाल भारद्वाज साहब की किसी फ़िल्म से कम ना था, बहुत ही मज़ा आया वो सारे सीन शूट करते हुए, सौरभ साहब चाहते थे, जिमी ज़िप का इस्तेमाल हो क्लाइमैक्स में, लेकिन ज़िप को जब तक ३६० डिग्री ना ऑपरेट करो,शॉट्स बहुत अच्छे नहीं बन पाते,, एक दो शॉट के लिए हाथी मँगाने का कोई मतलब नहीं था, क्योंकि यहाँ तो, १० में से पाँच ऐक्टर तो डूप्लिकेट थे, जो अवेलबल थे, उनका भी आउट टाइम था, टोटल केआस था। क्लाइमैक्स का एंड रिज़ल्ट मुझे बहुत अच्छा लगा, लीप शुरू हुआ, महीने भर में क्रीएटिव चेंज हुआ, वो अपना डिरेक्टर ले आए।यह कहे कर “ प्रोड्यूसर ऐसा डायरेक्टर ढूंढ़ो “ जिसके साथ मैं कंफर्टेबल हूँ । मैं नए रास्तों पर नयी मंज़िलों की ऑर चल पड़ा .. क्या हुआ बताते हैं ... बताते हैं ... #filmindustrybychoice #safaranama #directorsjourney #storytellingbymasterrs #rewind #imaginetv #babaaisavardhoondho https://www.instagram.com/p/BsWGgg9HrQi/?utm_source=ig_tumblr_share&igshid=d6mjwivrf2zv
#journeyofdirectorismailumarkhan#filmindustrybychoice#safaranama#directorsjourney#storytellingbymasterrs#rewind#imaginetv#babaaisavardhoondho
0 notes
Photo
मोदी किसानो की लोन क्यों माफ नही करते है : राहुल गुजरात विधानसभा चुनाव को लेकर राहुल गांधी भी आज आक्रमक प्रचार करते हुए दिखे । राहुल ने आज दोपहर सोमनाथ मंदिर में दर्शन करके सौराष्ट्र में चुनाव प्रचार का आरंभ किया । विशाल जनसभा को संबोधन करते हुए राहुल ने बीजेपी और प्रधानमंत्री पर एक बार फिर प्रहार किए । राहुल गांधी ने कहा कि पिछले २२ सालो से गुजरात में स्वैच्छिक रुप से सरकार चल रही है । मोदी, अमित शाह, विजय रुपाणी आकर उनके मन की बात कहकर चले जाते है । आपकी बीजली, पानी ओर जमीन मोदी लेकर चले जाते है और उनके मन की बात कह जाते है । किन्तु आप के मन की बात कभी नही सुनते । जब कांग्रेस की सरकार होगी तब मन की बात लोगो की सुनी जाएगी । उन्होंने कहा कि मोदी हमेशा लोगो से लेते रहे थे । गरीबो से पास भी गब्बर सिंग टेक्स लेते है । कांग्रेस पार्टी ने देश में मनरेगा योजना लागू की और ३५ हजार करोड़ रुपये खर्च किए । मोदी ने एक कंपनी ताता नेनो को दे दी । मनरेगा योजना लोगो को रोजगारी उपलब्ध करा रही थी । मोदी ने लोगो की रोजगारी छीन ली है । देश में अमीर उद्योगपतिओं की लोन माफ की जा रही किन्तु किसानो के लोन नही माफ हो रहे है । उन्होंने कहा कि किसानो को उनके उत्पादन के बदले में पुरी किंमत नहीं मिल रही है । राहुल गांधी ने कहा कि उनके शासन में कपास, मुगफली समेत सभी उत्पादनो में किसानो को अच्छी किंमत मिल रही थी । नोटबंदी और जीएसटी के कारण लाखो लोग बेरोजगार हो चुके है । १५ लाख रुपये सभी के खाते में जमा करने की बात अभी अधुरी रही है । देश में लाखो लोग बेरोजगारी के चलते मुश्किल में है । शिक्षण और आरोग्य की सेवा खराब हालात में है ।
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी/काँग्रेसकडून सोनिया गांधी यांचा राजस्थानातून उमेदवारी अर्ज दाखल
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी-प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी सात हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
आणि
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर उद्या निकाल
****
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, यामध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर गुजरात मधून जे.पी. नड्डा यांच्यासह चार, मध्य प्रदेशातून डॉ. एल मुरुगन यांच्यासह, चार, तर ओडिसामधून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजस्थान मधून आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. बिहार मधून अखिलेश प्रसाद सिंग, तर हिमाचल प्रदेश मधून अभिषेक मनू सिंघवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, गरज भासल्यास, येत्या २७ तारखेला मतदान होईल.
दरम्यान, आपल्याला मिळालेल्या उमेदवारीबद्दल अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत -
भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची मला उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पक्षामध्ये गेल्यानंतर ताबडतोब ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली, हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे असं माझा व्यक्तिगत मत आहे.
****
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना इथून लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली असं आंबेडकर म्हणाले. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण न देता वेगळे आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
****
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीनं राज्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. बीड जिल्ह्यात सर्वत्र बंद पाळण्यात आला. परळी, माजलगाव आणि केज इथं दूचाकी रॅली काढण्यात आली तसंच जरुड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लातूर जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. अहमदनगर जिल्ह्यातही पारनेर कर्जत, जामखेड, श्रीगोंदा शेवगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. नाशिक इथं मराठा समाजातर्फे लाक्षणिक आंदोलन कण्यात आलं. सातारा जिल्ह्यात कराड, फलटण, खंडाळा इथं बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी सात हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ ���िंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यातील शासकीय तसंच अनुदानित वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करून ते दरमहा १८ हजार रुपये करण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्यात लातूरसह सहा ठिकाणी परिचर्या महाविद्यालयं उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला. ही महाविद्यालयं प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेची असणार आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित एक कोटी २१ लाख रुपये दरवर्षी खर्च करण्यासही राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मान्यता दिली.
ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू पुरवण्यासाठीच्या सर्वंकष सुधारित रेती धोरणाला मंजुरी, मुद्रांक शुल्क माफीमध्ये भाडेपट्ट्याचा समावेश करणं, उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देणं, तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला
****
आज देशभरात वसंत पंचमीचा सण उत्साहात साजरा झाला. या दिवशी विद्येची, बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त आज पंढरपूर इथं विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा झाला.
****
छत्रपती संभाजीनगर इथून आज सकाळी अयोथ्या इथल्या बाळरामाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी भगवा झेंडा दाखवून रेल्वेला रवाना केले. श्रीराम नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात सर्व राम भक्त रेल्वेनं अयोध्येकडे रवाना झाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर उद्या, गुरूवारी निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन करणार आहेत. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी ही सुनावणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल देत, पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाला दिलं आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी आज बरखास्त करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन नाना गावंडे यांनी दिली. नांदेड शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
लातूर इथं सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय १००व्या नाट्य संमेलनात आज 'नाटक माझ्या चष्म्यातून' या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. या परिसंवादात आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि पत्रकार विलास बडे सहभागी झाले होते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात हरवत चाललेली भावना आणि संवेदना नाटकामुळे जिवंत असल्याची जाणीव 'नाटक माझ्या चष्म्यातून' या परिसंवादात झाली. नाटक ही कला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामीण भागात जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने नाट्य स्पर्धांचं आयोजन होणं आवश्यक असल्याचं मत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच आज झालेल्या नाट्यगीत महोत्सवात सादर झालेल्या नाट्य गीतांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक लाभार्थी आपल्याला झालेल्या लाभांची माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथंही लाभार्थींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेतील गट-अ ते गट-ड पदावरील अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षासूची संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी त्याच्या हरकती २६ तारखेपर्यंत विहीत पुराव्यासह कार्यालयाकडे समक्ष सादर कराव्या, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज भारतीय योग संस्थेची छत्रपती संभाजीनगर शाखा आणि जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सूर्यनमस्कार साधना कार्यक्रम घेण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते. योगाचं महत्व जगभरात मान्य झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग केला जात असल्याचं, कराड यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आलं. आज कार रॅलीने या अभियानाचा समारोप करण्यात आला.
****
केज तालुक्यातील आडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाने आडस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात चांगली आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार आहे.
****
देशाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योजकांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. उद्योजक घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रकल्प आधारित ज्ञानावर भर द्यावा आणि त्यासाठी विविध आस्थापनांबरोबर संलग्नित राहून काम करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केलं आहे. आज विद्यापीठात "उद्योग विद्यापीठ सहयोग" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कुलगुरू बोलत होते.
****
0 notes
Text
बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळीची जड लक्षणांसह कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह
बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळीची जड लक्षणांसह कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह
निक्की तांबोळी कोरोना पॉझिटिव्ह : अभिनेत्री निक्की तांबोळी पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली. बिग बॉस 14 मध्ये अंतिम फेरीत सहभागी झालेली अभिनेत्री निक्की तांबोळी हिने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मला गंभीर लक्षणांसह कोविड-19 पॉझिटिव्ह झाला आहे. मी स्वतःला क्वारंटाईन केले आहे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. मी आलेल्या…
View On WordPress
#COVID-19#अभिनव शुक्ला#कोरोनाविषाणू#कोविड 19#खतरों के खिलाडी 11#निकी तांबोळी#निकी तांबोळी इन्स्टाग्राम#निक्की तांबोळी#निक्की तांबोळी कोविड पॉझिटिव्ह#मोठा मालक#विशाल आदित्य सिंग
0 notes
Text
19 जून रोजी मनोरंजन जगतातील मोठी बातमी
19 जून रोजी मनोरंजन जगतातील मोठी बातमी
19 जून 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 19 जून रोजी अनेक मोठ्या बातम्यांनी सिनेमा आणि टीव्हीवर लक्ष वेधून घेतले आहे. लॉरेन्स विश्नोईच्या टार्गेट लिस्टमध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचेही नाव होते. करण जोहरकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा त्याचा कट होता. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचा एक फोटो समोर आला आहे. यानंतर शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन ‘डॉन 3’मध्ये एकत्र दिसणार असल्याची अटकळ…
View On WordPress
#19 जून 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या#अमिताभ बच्चन#करण जोहर#करण जोहर लॉरेन्स#करण जोहर लॉरेन्स बिश्नोई#थलपती विजय#दिवसाच्या मनोरंजन बातम्या#पंकज त्रिपाठी#पंकज त्रिपाठी मिर्झापूर ३#बिष्णोई#मनोरंजन बातम्या#लॉरेन्स बिश्नोई#विशाल आदित्य सिंग#शाहरुख खान#शाहरुख खान अमिताभ बच्चन डॉन ३
0 notes
Text
विशाल आदित्य सिंगला लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहायचे आहे, मधुरिमा तुलीमुळे तिचा प्रेमावर विश्वास?
विशाल आदित्य सिंगला लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहायचे आहे, मधुरिमा तुलीमुळे तिचा प्रेमावर विश्वास?
विशाल आदित्य सिंग लिव्ह-इन रिलेशनशिपला प्राधान्य देत आहे. बिग बॉस स्टार्स मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंग हे त्या टीव्ही जोडप्यांपैकी एक आहेत ज्यांची प्रेमकथा कधीही पूर्ण होऊ शकली नाही. मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंग यांचे काही दिवसांपूर्वी ��्रेकअप झाले होते. मधुरिमा तुलीपासून वेगळे झाल्यानंतर विशाल आदित्य सिंगने सना मकबूलला डेट करायला सुरुवात केली. विशाल आदित्य सिंग मात्र याबाबत कधीच…
View On WordPress
0 notes
Text
20 मे च्या मोठ्या मनोरंजन बातम्यांवर एक नजर टाका
20 मे च्या मोठ्या मनोरंजन बातम्यांवर एक नजर टाका
20 मे 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: सिनेमा आणि टीव्ही जगतातील अनेक मोठ्या बातम्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या कमाल आर खानला (KRK) ट्विटरवर ब्लॉक केले आहे. ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त, चित्रपट निर्मात्यांनी त्याच्या चाहत्यांना एक मोठी भेट देत त्याच्या एनटीआर 31 चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. हॉलिवूडची लोकप्रिय…
View On WordPress
#A$AP रॉकी#कंगना राणौत#कंगना राणौत धाकड#कनिष्ठ NTR#कार्तिक आर्यन#कार्तिक आर्यन भुलैया २#केआरके#चक्रव्यूह 2#धाकड#भूल भुलैया २#मनोरंजन 20 मे ची मोठी बातमी#मनोरंजन बातम्या#रणवीर सिंग#रिहाना#विशाल कोटियन#सिद्धार्थ शुक्ला
0 notes
Text
विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात ‘ही’ भूमिका आमिर खानला साकारायची होती, पण..
विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात ‘ही’ भूमिका आमिर खानला साकारायची होती, पण..
विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात ‘ही’ भूमिका आमिर खानला साकारायची होती, पण.. आमिरच्या मनात एखादी गोष्ट येते तेव्हा तो ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही असं इंडस्ट्रीतल्या कित्येक दिग्गजांचं म्हणणं आहे. सध्या आमिर खान चांगलाच चर्चेत आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळे त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चांगलाच आपटला. आमिरच्या कारकीर्दीतला हा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा अशी चर्चा बाहेर होत आहे. खरंतर यावेळेस आमिरचा चित्रपट…
View On WordPress
#“ही#आताची बातमी#आमिर#एंटरटेनमेंट बातम्या#खानला#चित्रपटात#ट्रेंडिंग बातमी#न्यूज अपडेट मराठी#पण…”#फ्रेश बातमी#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भारद्वाज#भूमिका;#मनोरंजन#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#यांच्या#रेगुलर अपडेट#वायरल बातमी#विशाल#साकारायची#सिने जगत#सिने सृष्टी#सेलेब्रिटी न्यूज#होती
0 notes
Text
छोटा शकीलच्या जवळच्या 'सलीम फ्रूट'ला फसवल्याप्रकरणी 3 जणांना अटक, 50 लाखांची फसवणूक
छोटा शकीलच्या जवळच्या ‘सलीम फ्रूट’ला फसवल्याप्रकरणी 3 जणांना अटक, 50 लाखांची फसवणूक
गुंड छोटा शकीलचा जवळचा सहकारी सलीम फ्रूट याला ५० लाखांची फसवणूक केल्याच्या बहाण्याने एनआयएच्या तपासातून तिघांना अटक करण्यात आली आहे. विशाल देवराज सिंग, जफर उस्मानी आणि पवन दुरिजेजा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याला फसवणूक केल्याप्रकरणी अटक. प्रतिमा क्रेडिट स्त्रोत: व्हिडिओ ग्रॅब गँगस्टर छोटा शकीलचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ��ब्राहिमचा जवळचा माणूस सलीम फळ…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date –24 October 2019 Time 11.00 to 11.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक –२४ ऑक्टोबर २०१९ सकाळी ११.०० वाजता **** राज्य ��िधानसभा निवडणुकीतील निकालांचे कल हाती येत आहेत. भाजप ��िवसेना महायुती १७८ जागांवर आघाडीवर असून बहुमताच्या दिशेनं वाटचाल करत आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी ८९ जागांवर आघाडीवर आहे. वंचित बहुजन आघाडी दोन जागांवर आघाडीवर आहे. अन्य उमेदवार १९ जागांवर पुढे आहेत. . सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उदयनराजे भोसले हे दहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील या मतदारसंघात आघाडीवर आहेत. **** औरंगाबाद मध्य मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना चौथ्या फेरीअखेर दहा हजार २८२ मतांची आघाडी मिळाली आहे. औरंगाबाद पश्चिममधे दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे संजय शिरसाट पाच हजार ८७३ मतांनी आघाडीवर आहेत. कन्नड मतदार संघात शिवसनेचे उदय सिंग राजपूत आठ हजार ९६९ मतांनी आघाडीवर आहेत. औरंगाबाद पूर्व मध्ये तिसऱ्या फेरी अखेर एमआयएमचे डॉ.अब्दुल गफार कादरी १७ हजार २४ मतांनी आघाडीवर आहेत. सिल्लोड मधे शिवसेनेचे अब्दुल सत्तार सतरा हजार ४०३ मतांनी आघाडीवर आहेत. पैठण मतदार संघात पहिल्या फेरी अखेर शिवसेनेचे संदिपान भुमरे एक हजार ४११ मतांनी आघाडीवर आहेत. फुलंब्री मतदार संघात दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे हरिभाऊ बागडे तीन हजार ३२० मतांनी आघाडीवर आहेत. वैजापूर मतदार संघात शिवसेनेचे विजय बोरनारे एक हजार २९८ मतांनी तर गंगापूर मतदार संघात भाजपचे प्रशांत बंब सहा हजार ७१६ मतांनी आघाडीवर आहेत. **** जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे २८६ मतांनी आघाडीवर आहेत. बदनापूर विधानसभा मतदासंघात पहिली फेरी अखेर भाजपचे नारायण कुचे हे सात हजार मतांनी आघाडीवर आहेत. जालना मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार अर्जून खोतकर ३९० मतांनी आघाडीवर आहेत. **** लातूर जिल्ह्यात अहमदपूर मतदार संघातून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मोहनराव पाटील आघाडीवर आहेत.भारतीय जनता पक्षाचे विनायकराव पाटील यांना त्यांनी मागं टाकलं आहे. निलंगा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे संभाजी पाटील निलंगेकर आघाडीवर आहेत.लातूर ग्रामीणमधून कॉंग्रेसचे धीरज देशमुख साडे अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत. **** बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर हे ५८ मतांनी पुढे आहेत केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या नमिता मुंदडा या अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत. बीड मधील परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे भाजपच्या पंकजा मुंडें यांच्यापेक्षा साडे सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. **** उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचे कैलास पाटील हे १५११ मतांनी आघाडीवर आहेत. उमरगा लोहार मतदारसंघातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे १७ हजार १८९ मतांनी आघाडीवर आहेत लोहा मतदारसंघातून शेकापचे श्मामसुंदर शिंदे आघाडीवर आहेत तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे आघाडीवर आहेत परंडा तानाजी सावंत आघाडीवर आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संतोष बा��गर हे ३५ हजार ८३५ मतांनी आघाडीवर आहे, नाशिक मध्य मधून भाजपच्या देवयानी फरांदे ७०९० मतांनी आघाडीवर आहेत शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल हे आघाडीवर आहेत **** परभणीच्या गंगाखेड मतदारसंघातून शिवसेनेचे विशाल कदम तर जिंतूरमधून भाजपाच्या मेघना बोर्डीकर आघाडीवर आहेत. जऴगाव ग्रामिण मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील हे आघाडीवर आहेत. दक्षिण सोलापूरमधे भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर आहेत. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धऩ मतदार संघातून राष्ट्रवादीच्या अदीती तटकरे आघाडीवर आहेत. कल्याण ग्रामिण मनसेचे पाटील आघाडीवर आहेत. सातारा जिल्ह्यातल्या फलटण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हण आघाडीवर आहेत. सातारा जिल्ह्यातल्या दक्षिण कराड मतदार संघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर आहेत. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेच्या सुमनताई आर आर पाटील आघाडीवर आहेत. तर इस्लामपूर मतदार संघात जयंत पाटील आघाडीवर आहेत. अकोल्यातून भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर आहेत. **** सोलापूर जिल्ह्यातल्या ११ विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर सांगोल्यातून शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील, मोहोळमधून शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर, पंढरपूरमधून सुधाकरपंच परिचारक, बार्शीतून दिलीप सोपल तर अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी आघाडीवर आहेत. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार देशमुख तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सुभाष देशमुख यांनी आघाडी घेतली आहे. **** नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे १८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. कराड मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण हे आघाडीवर आहेत. ****
0 notes