#वाटायचे
Explore tagged Tumblr posts
Text
खासदार निलेश लंके हे हवेत गेले आहेत , विजय औटी म्हणाले की..
निलेश लंके हे खासदार झाल्यानंतर लंके यांच्या भाषणात देखील मोठ्या प्रमाणात अहंकार जाणवत असल्याची कुजबुज लंके समर्थक मतदारांमध्ये देखील होत आहे. आमदार होईपर्यंत निलेश लंके हे सर्वसामान्य नागरिकांना आपले वाटायचे मात्र खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर निलेश लंके हे सर्वसामान्य जनतेपासून काही प्रमाणात दुरावलेले दिसून येत आहेत. निलेश लंके यांचे कट्टर विरोधक असलेले पारनेरचे विजय सदाशिव औटी यांनी लंके…
View On WordPress
0 notes
Text
मित्र
एकेक लागला गळायलानी पाय माझे वळायला ।काळ लोटला वेळ लोटलीमित्रांसाठी लागलो हळहळायला । दिवस तेव्हाचे आठवतातभारी वाटायचे याच मित्रात ।शाळा सुटली नोकरी लागलीकाम काम तेच होतं कर्मात । आता थोडी मिळाली उसंतबोलावे भेटावे वाटत मित्रांना ।पण तेही निघालेत दूर आतासांगा थांबवू कसे मी सर्वांना ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
Virender Sehwag: पाकिस्तानचे ‘हे’ दोन फास्ट बॉलर्स मला स्पिनर्स वाटायचे; वाचा, वीरुचा भन्नाट किस्सा
Virender Sehwag: पाकिस्तानचे ‘हे’ दोन फास्ट बॉलर्स मला स्पिनर्स वाटायचे; वाचा, वीरुचा भन्नाट किस्सा
Virender Sehwag: पाकिस्तानचे ‘हे’ दोन फास्ट बॉलर्स मला स्पिनर्स वाटायचे; वाचा, वीरुचा भन्नाट किस्सा Virender Sehwag on india vs pakistan match: आशिया चषक २७ ऑगस्टपासून सुरू होत असून भारताचा पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तानशी होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सने युट्युब चॅनेलवर एक विशेष कार्यक्रम सुरु आहे. ज्यामध्ये दोन्ही देशाचे खेळाडू भारत-पाकिस्तान लढतीच्या आठवणी सांगत…
View On WordPress
#“मला#“हे#sehwag:#virender#किस्सा#क्रिकेट#क्रीडा#खेळ बातम्या#टेनिस#दोन#पाकिस्तानचे#फास्ट#बॉलर्स#भन्नाट#भारत लाईव्ह मीडिया#मराठी खेळ अपडेट्स#राष्ट्रीय खेळ बातम्या#वाचा&8230;#वाटायचे#वीरुचा#स्पिनर्स#स्पोर्ट्स#स्पोर्ट्स अपडेट मराठी#हॉकी
0 notes
Text
सातारी कंदी पेढा
मिथक आणि वास्तव
भारतामध्ये पेढा बऱ्याच ठिकाणी उत्पादित होतो, प्रत्येक ठिकाणची पेढा बनविण्याची पद्धत आणि खासियत वेगळी आहे. त्यामुळेच पेढ्याला ठिकठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतात.
मथुरेचे पेढे, सातारी कंदी पेढे, राजस्थानमधील चिवाला येथील पेंडा, धारवाडी पेढा, कुंथलगिरी येथील पेढा, गुजरात भुज येथील पेढा, नरसोबाची वाडी येथील पेढा, जेजुरी येथील पेढा अशी काही खास ठिकाणे आहेत.
सातारी कंदी पेढा आणि मथुरा, कुंथलगिरी, नरसोबाची वाडी येथील पेढ्यांमध्ये साम्य आढळते. तरीही भाजणीची उत्कृष्ट पद्धत आणि फिक्केपणा तसेच मर्यादित गोडवा यामुळे सातारी कंदी पेढाच भारतामध्ये वरचढ आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो.
सातारी कंदी पेढा हा खमंग भाजणीचा, खरपूस भाजलेला, मर्यादित गोडव्याबरोबरच वेलचीचा निसटता स्वाद देतो.
कंदी भाजणीमुळे तोंडात पटकन विरघणारा पेढा हे सातारी कंदी पेढ्याचे वैशिष्ट्य.
कंदी पेढा नाव कसे पडले याला काही आख्यायिका आहेत, कोण म्हणते ब्रिटिशांनी दिले, कोण म्हणते करंडीत मिळायचा त्यामुळे , कोण म्हणते कंदमुळे असलेल्या रानातून भागातून खवा यायचा त्यामुळे ..वगैरे वगैरे...
या सर्व आध्यायिका धांदात चुकीच्या आहेत.
पेढ्याच्या खरपूस भाजणी लाच कंदी भाजणी म्हणतात ..
पेढा तयार होताना जी खरपूस भाजणी असते तिलाच कंदी नावाने ओळखलं जातं.
'कंदी भाजणीचा पेढा' अशी तुळजाराम मोदी यांची पूर्वी एअर इंडियाच्या विमानांमध्ये जाहिरात असायची.
भाजणीमुळे जो मंद सुगंध पसरतो त्यावरून कंदी भाजणीची चाचणी लक्षात येते.
कंदी भाजणी हे एक कौशल्य आहे, प्रतिभा आहे. हे कौशल्य, ही प्रतिभा संपादन करणं प्रत्येकाला जमणे केवळ अशक्य. म्हणूनतर प्रत्येक दुकानातील पेढ्याच्या चवीमध्ये फरक आहे.
खवा भाजणे, प्रमाणात साखर घालणे, ती विरघळली कि इलायची पेरणे हे कोणीही करू शकते, त्याला फार काही ज्ञान लागत नाही.. पण हीच कंदी भाजणी असा गैरसमज करून घेत अर्धवट ज्ञान घेऊन असंख्य कंदी पेढ्याचे व्यापारी तयार झालेत.
मात्र अस्सल कंदी भाजणी घेणे मोजक्याच पारंपरिक आणि खानदानी घराण्यांना जमते..
पुर्वी तुळजाराम मोदी, नारायणराव लाटकर, बी. एम. लाटकर, बाळप्रसाद मोदी, राजाराम मोदी हे स्वतः भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन, देवपूजा करून सोवळ्यातच दूध घोटवायचे .. त्याचा खवा बनवायचे, तदनंतर लगेच तो खवा मुस्त्याने घोटवत अस्सल कंदी पद्धतीने भाजत कुंदा मारायचे..
यानंतरच गडी लोकांना म्हणजेच कामगारांना कारखान्यात प्रवेश असायचा, त्यांचे काम फक्त पेढे हातावर वळत गोलाकार बनवून ताटात लावून दुकानामध्ये विक्रीला पाठवायचे असे.
असाच आणि असाच नियम होता.
नंतरच्या पिढीने उदार धोरण स्वीकारत मोजक्या विश्वासहार्य लोकांना ही भाजणी कशी असते याचे ज्ञान दिले...आणि कंदी भाजणीचे रहस्य हळहळू जगजाहीर झाले.
कोणत्याही पदार्थाला भौगोलिक परिस्थिती सुद्धा तितकीच महत्वाची आणि आवश्यक असते.. तशीच कंदी पेढ्याला सातारचे आल्हाददायक वातावरण पण लाभले..
आणि म्हणूनच कंदी पेढ्याला सातारी कंदी पेढा हे नाव मिळाले आणि सातारी कंदी पेढा जगातल्या खवैयांच्या जिभेवर रुळला.
पुर्वी कंदी पेढा बनविताना उत्पादक स्वतःच खवा बनवायचे, त्यासाठी सुरवातीला साताऱ्याच्या डोंगराळ भागातून दूध यायचे, नंतर कोल्हापूर बॉर्डर वरून यायचे .. आजही सातारा आणि कोल्हापूर येथे दुधाचा दर्जा तुलनेने सर्वोत्कृष्ट आहे.
काळ बदलला, कंदी पेढा बनवायचे अर्धवट टेक्निक जगजाहीर झाल्याने बरेचजण या व्यवसायात उतरले .. तयार खवा घेऊन पेढा बनवू लागले तिथेच चव बदलायला सुरवात झाली.
अस्सल कंदी भाजणीचा पेढा बनविणे सोपे असते तर साताऱ्यात आजपर्यंत एकच कै. तुळजाराम मोदी यांना मिठाई शास्त्रज्ञ म्हणून त्या काळच्या राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले गेले नसते. असो..
(मोदी-लाटकर याबद्दल परत कधीतरी माझ्या शब्दात मांडेन)
कच्या मालाचा दर्जा घसरला आणि साहजिकच फिनिश गुड्स वरती परिणाम झाला.
परराज्यातील लोकांनी सुद्धा या व्यवसायामध्ये उदरनिर्वाहासाठी प्रवेश केला. मात्र त्याचा दर्जा टिकविण्यात त्यांना रस नसल्याने केवळ आर्थिक उन्नत्तीसाठी पेढ्यांमध्ये साखरी पेढा, दोन नंबर अशा क्वालिटी आल्या. त्यामुळे चवीचा दर्जा अजून खालावत गेला. आतातर मैदा पण मिसळतात काही जण.. असो..
कंदी पेढ्यांचे उत्पादक ते कंदी पेढ्यांचे व्यापारी हा साताऱ्याच्या कंदी पेढ्याचा प्रवास कडू आहे. दुर्दैवी आहे.
ग्राहक पण याला काही प्रमाणात जबाबदार आहेत.. वाटायचे तर आहेत म्हणून दोन नंबरची क्वालिटी डिमांड ग्राहकांनीच निर्माण केली.. दोन नंबर पेढा निर्माण झाला अन वाटणारे आणि खाणारेपण मूळ चव विसरले 🤦🏻
फारच अति झालंय म्हणून आता साताऱ्याचा कंदी पेढा जीआय मानांकनाखाली आणणे आवश्यक आहे. मात्र ज्यांनी कंदी पेढ्याचा धंदा मांडलाय ते याला साथ देत नाहीत ही शोकांतिका आहे.
असो.. इतर कोणाबद्दल मी सध्या तरी बोलणार नाही .. माझ्याबद्दल इतकंच सांगेन कि माझ्याकडे अस्सल कंदी भाजणीचा पेढा बनतो, अजूनही लाकडाच्या, कोळशाच्या ताव्यावर भाजला जातो, चाचणी पारंपरिक पद्धतीने होते, खवा स्वतःचा आहे (बाहेरचा बिलकुल नाही), हायजिन मेंटेन असते, कंदी भाजणीची मूळ चव जपणे हा माझा धर्म आणि कर्तव्य आहे.
ही कंदी पेढ्याची चव अनुभवायला जरूर या.
येणे शक्य नसल्यास मला 91455-00012 ला मेसेज करा मी तुम्हाला पोच करेन. (अर्थातच विनामूल्य).
ही पोस्ट लिहण्यास सातारकरांनी मला टॅग केले, मेसेज केले, हक्काने सांगितले, समक्ष भेटून सांगितले .. (पाठपुरावाचं केला जणू.. 😀)..
या बहुमानाबद्दल आभार न मानता ऋणी राहणे मी पसंत करेन.
फेसबुक सातारा या व्यासपीठाचे अत्यंत प्रामाणिकपणे आभार.
टीप:- जीआय मानांकनासाठी छत्रपती उदयनराजे यांनी पुढाकार घेतला असून युवानेते संग्राम बर्गे त्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांना आपल्याच साताऱ्याचे श्रीधर पारुंडेकर, महेश निकम टेक्निकल करस्पॉन्डन्स पूर्ण करण्यासाठी साथ देत आहेत. आई जगदंबा हे कार्य पूर्णत्वाला नेवो 🙏🏻🕉.
कंदी पेढ्याच्या विक्रेत्यांना मी एवढच विनंती करेन कि दर्जा ठेवा .. ग्राहकांनी पण दर्जा बघावा .. 🙏🏻
याआधी आपल्या साताऱ्याचे राजेंद्र पाटील आणि पुणेस्थित आंतरराष्ट्रीय फूड एक्सपर्ट डॉ. उदय पोतदार यांनी कंदी पेढ्याविषयक अभ्यासपूर्ण पोस्ट केल्या आहेत .. त्याची लिंक कमेंट मध्ये देईन.
वरील पोस्ट माझ्या वैयक्तिक प्रत्यक्ष अनुभव, घेतलेली मेहनत, तिचा कस आणि आपल्या सर्वांनी दिलेली प्रेरणा यातून निर्माण झालेली आहे.
गोडवा वाढवूया..
प्रशांत मोदी (लाटकर)
जगप्रसिद्ध सातारी कंदी पेढ्याचे उत्पादक :-
मोदी'ज् नारायण पेढेवाले
विसावा नाका मारुती मंदिराशेजारी,
विसावा नाका, सातारा
91455-00012
वरील फोटो श्री नरेंद्र जाधव यांनी माझ्या कारखान्यात काढला आहे.
हाच फोटो कित्येक व्यापारी वापरतात. 🤦🏻😀
कृपया शेअर करा .. कॉपी पेस्ट करा
2 notes
·
View notes
Text
*शाळेचा माझा पहिला दिवस*
आज दहा ऑगस्ट.माझा शाळेमध्ये हजर होण्याचा पहिला दिवस आज सुध्दा ते दिवस आठवला की अंगावर शहारा आणि तेवढीच हुरहुर वाटणारा तो दिवस.
आदल्या दिवशी सर्व शिक्षकांना आपल्या शाळेच्या ऑर्डर दिल्या. मला ऑर्डर मिळाली.जावली पंचायत समितीकडून आता महाबळेश्वर तालुक्यात असलेले आरव हे ठिकाण जेथून चगदेव, सिंधी, यासारखी सातारा जिल्ह्याच्या बॉर्डर वर असलेली अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत किंवा सध्या पेपरमधे येत असतात.त्यांच्या जवळ असलेले हे आरव हे ठिकाण माझ्यासारखेच अनेक शिक्षकांना त्या भागातल्या ऑर्डर मिळालेल्या होत्या. आदल्या दिवशी अधिकार्यानी शिवसागर जलाशयांमध्ये असलेल्या सर्व शिक्षकांची मिटिंग हॉलमध्ये घेतली आपला प्रवास कुठून कसा होणार आहे याची पुसटशी कल्पना दिली कसे द्यावे ते सांगितले त्यावेळेस अंगावर भीतीदायक वातावरण निर्माण झाले.
दुसरे दिवशी आमच्याच आळीतील श्री गोरख शिंदे या माझ्या बंधूला घेऊन आमचा प्रवास शाळा सर करण्यासाठी सुरू झाला एकतर घरात अठरा पगड दारिद्र्य त्यामुळे नोकरी शिवाय पर्याय नव्हता एका पोत्यामध्ये एक महिन्यावर पुरेल एवढी चटणी कडधान्य रॉकेल स्टो हे साहित्य घेतला ऑर्डर घेतली कपडे घेतले झोपण्यासाठी दोन चादर घेतल्या. अन् शाळेच्या दिशेने प्रवास सुरू झाला लिंबाचीवाडीतून सकाळी लवकरच निघालो कारण सकाळी साडे नऊची बामनोली एस.टी सातारा डेपोतून हलते असे सांगण्यात आले होते त्यामुळे बंधु व मी प्रवासाला लागलो. एसटीनेच स्टॅंडवर पोचलो. माझ्यासारखे अनेक शिक्षक माझ्यासारखाच बाडा बिस्तार घेऊन स्टॅंडवर आलेली होती. आम्ही सर्वांनी बामणोली एस.टी वाट पहिली.आम्ही सर्वजण एसटीमध्ये बसलो अन् प्रवाशांना लागला
यापूर्वी जावळीच्या जंगलाच्या संदर्भात पुस्तकात वाचले असेल पण प्रत्यक्ष अनुभव कधीच घेतला नव्हता एसटीने सातारा सोडला हळुहळु ती कास पठाराला लागली. कांसच्या जवळ आली. जशी पुढे जाऊ लागली तसेच दोन्ही बाजूला असलेले घनदाट जंगल सतत पडणारा पाऊस या गोष्टी पाहून खरंतर मनामध्ये भीतीच वाटत होती कधी आपलं गाव येणार असं वाटतं पण एस्टीचा अखंड प्रवास चालत होता एक एक व्यक्ती एक एक शिक्षक कालपासून आपली गावं आली की उतरत होते सर्वांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत होते मला पण वाटत होतं . जंगलातच कुठेतरी आपलं पण गाव असेल पण कुठलं काय एसटी बामनोली मध्ये आली आणि आमच्या पैकी राहिलेले काही एक शिक्षक एसटीने बामणोलीत मध्ये उतरलो. त्या ठिकाणी आल्यानंतर तो परिसर पाहिला. उतरत्या छपराची घर लाल दगड आणि वेगळीच भाषा बोलणारी माणसं. आम्हांला वाटल लवकर पुढला प्रवास सुरू होणार आहे किंवा येथेच पुढे चालत आपल्या शाळेच्या गावात जायाचं असेल पण कशाचं काय एका शिक्षकांनी सांगितले आता सोडा आपली भाकरी अन् खायला सुरुवात करा तीनला लाँच त्या वेळी पुढचा प्रवास सुरू होईल. तोपर्यंत बसा. खरं पाहिलं तर आम्ही बामणोली पर्यंत येईपर्यंत भिजलो नव्हतो. पण एसटीतून उतरल्यापासून सतत पडणारा पाऊस यामुळे बऱ्यापैकी अंगांमध्ये थंडी भरायला सुरुवात झाली होती. छत्रीने अंग मोडायला सुरुवात केली होती सर्व काडया मोडायला मोडल्या होत्या. आता ते पोत्याला साहित्य चादर कपडे या सर्वांनी भिजायला सुरुवात केली होती काय करावे सुचत नव्हते असे करतच ३ वाजले.कोणीतरी आवाज दिला लॉन्च आली आणि आम्ही त्या समुद्रासारख्या दिसणाऱ्या शिवसागराच्या ठिकाणी पोहोचलो.लाँचमध्ये प्रथमच चढत होतो. लाँच म्हणजे काय असते ती गोष्ट प्रथमच पाहत होतो. बरेच नवे संबोध आज मिळत होते. तसाच गप्प लाँच वर चढलो. एका कोपऱ्यात जाऊन बसलो. आता पाण्यातून प्रवास सुरू झाला होता. लॅांन्चा धडधड आवाज येत होता. जुने प्रवासी गप्पा मारत होते. लांन्चावाला नवी शिक्षकांच्या ओळखी करून घेत होता. कोण कोठे उतरणार आहे याची खात्री करत होता. आम्ही मात्र गप्प होतो.मी मात्र शांत होतो. मला वाटायचे त्या कुठल्यातरी पाण्याच्या किनाऱ्यावर आपलं गाव दिसेल त्या गावा उतरायचं आणि लगेच गावात गेल्यानंतर प्रमुखाची गाठ भेट घ्यायची आणि चित्रपटाप्रमाणे प्रवास सुरू करायचा. पण कशाचं काय लाँच सोळशी खोऱ्यांमध्ये गेली तिथून पुन्हा माघारी आली. पुन्हा शिंदी खोऱ्यांमध्ये घुसली. अशी गरज करत करत पुढे ती जात होती आता मात्र मी रडकुंडीला आलो होतो. मी ��णि माझ्या सारखे एक शिक्षक तेवढेच राहिलेलो होतो. सांयकाळचे सहा वाजायला आले होते तरी सुध्दा गावचा पत्ता नव्हता. रात्र पडत चालली होती मी खूप घाबरलो तो चारी बाजूला दिसणारे पाणी जंगल. काय करावे ते कळत नव्हते माझे बंधू गोरख शिंदे सुद्धा घाबरलेले दिसत होते. आता ह्या असल्या अंधारात आम्हाला मोरणीला उतरवण्यात आले. आणि मला सांगण्यात आले की येथुन पुढे एक किलोमीटर अंतरावर आरव हे गाव आहे तुम्ही या जंगलातून उत्तरेला चालत जा. अशा रात्रीत परिसर नवा .रात्र, परिसराचा अंदाज नाही बॅटरीचा चांगली चालत नव्हती. वेगवगेळ्या प्राण्यांचे आवाज येत होते. सापांची भीती होती. अशा परस्थितीत डोक्यावर बोझा. बंधु जवळ पिशवी .सर्व तोलत पुढे जात होतो. सर्व कपडे भिजले होते. काही सुचत नव्हतं जंगलातून पुढे जात होतो तो काळाकुट्ट अंधार होता कुठे घराचा किंवा कशाचा पत्ता लागत नव्हता. बराच वेळ चालतोय तरी गाव दिसत नव्हती काका म्हणाला बघ बाबा माघारी फिरू या पहिल्या गावात जाऊया. काय करावे ते सुचत नव्हते. सूचन्याचे ते वय सुध्दा नव्हते एकोणीस वर्षी सर्व्हिसला लागलो होतो. काय करावं ते कळत नव्हतं शिक्षक म्हणजे काय तेच मुळात समजत नव्हतं. काकाला म्हटले थोडा कड काढूया पुढे जाऊया तेवढ्यात जंगलांमध्ये जाळ दिसला अन् जाळच्या दिशेने जात राहिलो. आज कळते की जाळ म्हणजे त्या घरांमध्ये जनावरे अथवा थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेली लाकडांची भट्टी त्याला एक विशिष्ट नाव आहे आज मी विसरलोय खरं. शेवटी त्या घरांमध्ये पोहोचलो. घरात पोहोचलो आणि विचारलं गावाचं नाव काय? आणि ती व्यक्ती म्हटली *आरव* .-----
एवढा लेखनाचा प्रपंचा कशासाठी तर आज नोकरीला लागून *अठ्ठावीस वर्षे पूर्ण* झाली. पण आज सुद्धा तो नोकरीचा पहिला दिवस आठवला की ते दिवस आठवले शिवाय राहत नाहीत
----- श्री. कचरनाथ शिंदे
2 notes
·
View notes
Text
काकड आरती...
पहाटे पहाटे (झुंजुरक्यात) विठ्ठल मंदिरातून येणारा टाळ मृदुंगाचा आवाज, आईचे भल्या पहाटे उठुन सडा रांगोळी काढणे, नंतर नऊवार साडी नेसून आरतीचे ताट हातात घेऊन मंदिरात जाणे, ही सर्व दिवाळी जवळ आल्याची चाहुल! क्वचित कधी जाग आली तर हे कळायचं. या दिवसात पहाटे हलक्याशा गार हवेत पाय पोटाशी दुमडून, डोक्यावरुन गच्च पांघरुन घेऊन गाढ झोपण्याचे जे सुख आहे ते जगात कशातच नाही. शाळेला सुट्ट्या! ना गृहपाठ, ना अभ्यास! फक्त अन फक्त मनसोक्त झोप! रात्री लाल पान सात किंवा कॅरम खेळून उशीरा झोपायचं अन उशीरा उठायचं हीच या दिवसातली खरी मजा.
आई रोज पहाटे कशी काय उठते याचे नवल वाटायचे. तशी ती नेहमीच लवकर उठायची पण दिवाळीच्या काही दिवस आधीच्या या काळात अजूनच लवकर उठायची. आम्ही उठेपर्यंत ती देवळात जाऊन आलेली असायची. आम्ही उठल्यावर देवळात काय काय झाले, रोज काय होत असते हे सांगायची. ‘काकड आरतीला गावातील खूप बायका व पुरुष येतात. आरती, भजन, भारुड, गवळणी सादर केले जातात. खूप प्रसन्न व धार्मिक वातावरण असते. उद्या लवकर उठा आणि चला माझ्याबरोबर, बघा किती छान वाटते ते.’
काकड आरती म्हणजे काय याबद्दल ती म्हणाली ‘चातुर्मासामध्ये विष्णूचे अवतार असलेले विठ्ठल ��िद्रिस्त असतात. म्हणून या दिवसात देवाला जागे करण्यासाठी पहाटे एका विशिष्ट ज्यातीने आरती करतात. जीला काकड आरती म्हणतात. ती ओवाळून देवाला जागे केले जाते. कार्तिक महिन्यात देवाला काकड आरती करायची ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. कोजागीरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत एक महिना हा उत्सव चालतो.’
ती पुढे म्हणाली ‘या दिवसात पहाटे खूप शुद्ध हवा असते. आरोग्यासाठी हे वातावराण फारच चांगले असते. काकडा आरतीने देवांना जागे करुन त्यांच्यासोबत सर्व लोकांनाही या शुद्ध हवेचा लाभ व्हावा म्हणून जुन्या लोकांनी ही प्रथा सुरु केली. त्यामुळेही काकडा आरतीला महत्व आहे.’
मराठी महिन्याबद्दल तिने सांगितले की ‘हिंदू कॅलेंडरमध्ये दोन भाग आहेत. आपले चैत्र वैषाख वगैरे मराठी महिने अमावस्येला संपतात. उत्तर भारतातले पौर्णिमेला संपतात. म्हणून त्यांच्या आणि आपल्या महिन्यात पंधरा दिवसांचा फरक आहे. त्यांचा महिना पंधरा दिवस आधीच सुरु होतो. काकडा आरती आपल्याकडे अश्विनमध्ये पंधरा दिवस अन कार्तिकमध्ये पंधरा दिवस चालते. तिकडे संपूर्ण कार्तिकमध्ये चालते.’
एक कोजागीरी पौर्णिमा सोडले, तर बाकी काही कळत नव्हते. काय कार्तिक महिना, काय चातुर्मास अन काय त्रिपुरारी पौर्णिमा! समजत काही नव्हतं पण जे काही ती सांगत होती ते ऐकायला आवडत होते. कॅलेंडरची गम्मतही आवडली होती.
रोज सकाळी तिच्याकडून अशी नवीन माहिती मिळत असल्यामुळे हुरुप यायचा अन र��त्री झोपतांना विचार करायचो की उद्या आईबरोबर मंदिरात जाऊत. पण पहाटे उठायची वेळ आली की ‘उद्या नक्की’ असे म्हणून परत डोक्यावरुन पांघरुण घेऊन ताणुन द्यायचो. हे नेहमीचेच! पण तिथले वर्णन ऐकून वाटायचं जायलाच पाहिजे एकदा!
एक दिवस लवकर झोपून आईबरोबर उठलो. नरक चतुर्थीचा अपवाद वगळता भल्या पहाटे उठायचा हा बहुधा पहिलाच प्रसंग होता. आंघोळ करुन झटपट तयार होऊन तिच्यासोबत पहाटेच्या निळसर उजेडातच देवळाला निघालो. काकी (चुलत आज्जी) व गल्लीतील इतर बायका वाटच पहात होत्या. सगळेजण कपड्याने झाकलेले आपापले ताट हातात घेऊन मंदिरात पोहोचले.
तिथे आधीच अनेक बायका जमलेल्या होत्या. काही ज्येष्ठ मंडळीही दिसत होती. सर्वत्र धुप आगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. गुरुजींची पूजा आटोपली आणि आरतीला सुरुवात झाली. ‘युगे अठ्ठावीस..’ झाले. मग ‘श्यामल कोमल रुप मनोहर, हरीला बुक्का द्या लावून...’ झाले. त्यानंतर कोरसमध्ये श्रीकृष्णाची काकड आरती सुरु झाली. सर्व बायका आपापल्या ताटातील आरत्या ओवाळत कोरसमध्ये एका सुरात काकड आरती म्हणू लागल्या –
ओवाळू आरती मदन गोपाळ��� I
श्याम सुंदर गळा वैजयंती माळा II
चरण कमल ज्याचे अति सुकुमार I
ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर II
ओवाळू आरती...
नाभिकमल ज्याचे ब्रम्हचर्याचे स्थान I
हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान II
ओवाळू आरती...
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी I
वेधले मानस हारपली दृष्टी II
ओवाळू आरती...
जडित मुगुट ज्याचा दैदिप्यमान I
तेणे कोंदले अवघे त्रिभुवन II
ओवाळू आरती...
एका जनार्दनी देखियले रुप I
पाहता जाहले अवघे तद्रूप II
आवाळू आरती मदन गोपाळा I
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा II
रोज पहाटे झोपेत असतांना ऐकायला मिळायची ती हीच आरती! प्रत्यक्ष ऐकतांना खूप रोमांचक वाटत होती. टाळ मृदुंगाच्या ठेक्यात ऐकतांना अंगावर काटा येत होता. काकड आरतीनंतर कर्पुर आरती झाली, घालीन लोटांगन झाले, ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि हेही झाले. सर्व जमलेल्या लोकांनी आरती घेतली. तिर्थ प्रसाद घेतला. गाभार्यात जाऊन विठ्ठल रुख्माईचे दर्शन घेतले, बुक्का लावला. देवाला नमस्कार करुन प्रदक्षिणा घातली आणि पुढच्या कार्यक्रमासाठी सर्वजण सज्ज झाले.
टाळ मृदुंगाच्या धुमधुमाटात भजने सुरु झाली. गाभार्याच्या दाराच्या दोन्ही बाजूला दोन रेषेत बायका गळ्यात अडकवलेले टाळ वाजवत होत्या. मध्यभागी मृदुंग आणि हार्मोमियम वाजवणारे बसले होते. मृदुंगाच्या तालात पाय एकदा मागे एकदा पुढे टाकत लयीमध्ये टाळ वाजवत भजन म्हणतांना सर्वांचे भान हरपल्यासारखे दिसत होते. तल्लीन झाले होते सगळे. त्यात समेवर आल्यावर वादक मृदुंगाचा ठेका आणि टाळ जोर जोरात वाजवत वातावरण निर्मिती करत होते. ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा’, अशी एकाहुन एक सरस भजने अन गवळणी म्हटली जात होती.
एक भजन संपले की ‘बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय‘ हा पुकारा व्हायचा, की लगेच पुढचे भजन सुरू व्हायचे. खूप छान वाटत होते. जन्मास यावे अन एकदा तरी काकडा आरती पहावी हे मनोमन पटले होते.
एका मोठ्या टोपल्यातून सर्वांना प्रसाद वाटण्यात आला आणि त्या दिवशीच्या काकड आरतीची सांगता झाली. एवढे भावपूर्ण अन पवित्र वातावरण मी पहिल्यांदाच पहात होतो. तेही एवढ्या पहाटे!
साधारण अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी पाहिलेली ही काकड आरती आजही चांगलीच स्मरणात आहे. आजकाल ही प्रथा कमी होत चालली आहे. छोट्या गावामध्ये अजून चालू असेल, माहित नाही, पण शहर��त तरी कुठे काकडा आरती ऐकायला पहायला मिळत नाही. नव्या पिढीला याबद्दल फारशी माहिती नाही. त्यांना हे माहित करुन दिले पाहिजे. ही पिढी खूप चाणाक्ष, बुद्धीमान आहे, धर्माचा अभिमान बाळगणारी आहे. काय सांगता, येत्या काही वर्षात शहरा शहराने पहाटेच्या काकड आरतीचे मंजूळ स्वर ऐकायला मिळतीलही...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
1 note
·
View note
Text
valentines of our childhood...
7 फेब्रुवारी :- Rose Day
कधी काळी गुलाब माझ्या पण हातात होत पण द्यायची कधी हिम्मतच झाली नाही , हिम्मत गोळा करता करता गुलाबाच्या एकेक पाकळ्या निसटत गेल्या आणि आ��वण म्हणून वहीच्या मधल्या ��ानावर एकच वाळलेली पाकळी शिल्लक राहिली. माझ्या अव्यक्त प्रेमाची साक्ष देणारी. त्या वेळी गुलाब हातात पकडायला सुद्धा भीती वाटायची पण कशीतरी हिम्मत एकवटली . मनातल्या गोष्टी मनातच राहून गेल्या आणि गुलाब वहीच्या पानात . सगळेच अनुत्तरित प्रश्न ! पण तरीही मन समाधानी. कारण पाहिलेली स्वप्ने तुटायची भीती मनात आजिबात नव्हती, ती एक अशी साखरझोप होती जिला वेळेची किनार नव्हती.
8 फेब्रुवरी :- Propose Day
आता जे हात गुलाब पकडू शकले नाही ते कुणाचा हात हातात मागण्याची हिम्मत करणे म्हणजे अवघडच . Propose Day म्हणजे काय ते आम्हाला माहीतच न्हवते मुळी. खरं तर आमचा प्रपोज Day म्हणजे “शाळेचा शेवटचा दिवस” . म्हणजे नुसतीच पोकळ अफवा .म्हणे काय तर “शेवटच्या दिवशी तिला विचारणार “. खरं म्हणायचं झाल तर शेवटच्या दिवशी आम्हा मुलांना केवळ दोनच महत्वाची कामं असायची. एक तर “तिला विचारने” आणि “एखाद्या मास्तर ला मारणे”. ह्यात “मास्तर” तर घावलं पण “ती” काही सापडली नाही. अखेरचा दिवस “अंगभर दौडेल असा दिवभरासाठीचा उत्साह” तर घेऊन यायचा पण संपताना मात्र “ कायम आठवणीत राहील एवढी निराशा पदरात पाडून जायचा”. खरं तर हा Propose Day कधी सफल ठरला नाही म्हणून तर एक आठवणींचा प्रवास अजून कायम चालू आहे आणि शेवटपर्यंत असाच चालू राहील. एक वाट हयानिमित्ताने कायम माझ्या पावलांच्या सोबत घट्ट नाळ रोवून आहे. एक अनुभव हयानिमित्ताने खोल मनात कुठेतरी अजून बहरून आहे .
9 फेब्रुवरी :- Chocolate Day
Chocolate Day वर आता बोलायचं झालं तर खिशात तर कधी एक रुपया पण नसायचा , आणि 10 रुपये ची Dairy Milk मिळाली तर मोठी लॉटरी लागल्यासारखं वाटायचं. Silk , Fruit and nut सारखी भानगड त्या वेळी तर काय नव्हती. त्यावेळी भाव खाण्याचीच मुलींची एव्हढी सवय होती की chocolate day ला Cadbury पण खायची असते हे बहुधा क्वचितच कुनाच्या तरी लक्षात आले असेल. आता तर भाव खाऊन मानणारं पोरींचं मन चॉक्लेट खाऊन पण मानत नाही . खर्च तर पूर्ण होतो , पण अपेक्षा नाहीच .निरपेक्ष मनं आता हरवली आहेत . आता अपेक्षा पूर्ण करण्यात एक वेगळीच मजा वाटू लागतीये. जिथे अपेक्षा आहेत तिथे आता खरे प्रेमही कुठे दिसेनासं झालंय. एक Chocolate चा गोडवा तर सर्वांनाच ऐकून माहीत आहे पण प्रत्यक्ष तो गोडवा दोघांमधल्या कडवटपनाला दूर करेल इतका पण “सार्थ” ठरेल काय ?.शेवटी काय ???? “chocolate चं ओ ते !!!”
10 फेब्रुवरी :- Teddy Day
Teddy Day म्हणलं कि सर्रास “तात्या विंचू” ची आठवण यायची. त्या गटात मग हळूहळू गोंडस अश्या काळ्या बाहुल्यांचा पण समावेश झालं. टेडी असावा तर काळ्या बाहुल्यांसारखा ! स्वतः उलटा लटकून च्या लटकुन दुसर्याला दृष्ट लागणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेणारा .एकवेळ माणूस कुत्री पाळनार नाही पण घराघरात उलट्या लटकलेल्या “Teddy” चा Swag एकदम हटके असाच होता . हयापलीकडचा Teddy आम्हाला Reality शो मध्ये दिसायचा .शोची नायिका तिझ्याहून दीड पटीने जड अश्या teddy ला घट्ट मिठी मारून बसलेली असायची. “माहेरची साडी” असं तर ऐकल होतं पण “माहेरचा टेडी” ही संकल्पना आमच्यासाठी नवीनच होती. त्यातल्या त्यात ती नायिका त्या “टेडी “ ला असे काही चिकटून बसायची कि तिझ्या नवर्याच्या “मग आम्ही कुणाचं घोडं मारलं ?” अश्या अविर्भावाच्या मुद्रा काहीश्या त्याच्या चेहेर्यावर असायच्या . दोन मन एकत्र येण्याच्या काळात हा “Teddy” मधे उगाच का येतो ? हेच कळत नाही . अश्या वेळी पुन्हा पुन्हा मला “swag se करेंगे सबका स्वागत “ हे गाणे Background ला वाजताना ऐकू येते आणि समोर आमचा जिवाभावाचा “ दरवाज्यावर शीर्षासन करत असलेला काळा टेडी” !
11 फेब्रुवरी: Promise Day
“ एक गोष्ट सांगायची आहे तुला !”, कुणाला सांगणार तर नाहीस?”, एव्हढ्याश्या वाक्यावर एखादी सीक्रेट गोष्ट मनातून बाहेर यायची. “
एखाद्याला शब्द द्यायला एक क्षण सुद्धा लागत नाही , पण निभावताना अक्खं आयुष्य सुद्धा कमी पडेलं अशी परिस्तिथी निर्माण होते. मी सुद्धा केलेलं Promise , स्वतःशीच ! कारण दुसर्याला दिलेलं प्रॉमिस जर पूर्ण झाल नाही तर त्या व्यक्तिला गमावून बसण्याची हिम्मत माझ्यात अजिबात नव्हती. स्वतःशीच प्रामाणिक राहण्याचं प्रॉमिस सोईच वाटलं. जर स्वतःशीच प्रामाणिक राहिलं तर आपल्या माणसांचा विश्वास गमवायची वेळच येत नाही.
“ At last promises are just another random words” असं वाचलं होतं कुठेतरी ! एखाद्याला शब्दाच्या वचनात अडकवणे म्हणजे एका अर्थी त्या व्यक्तीचा विश्वास आयुष्यभरासाठी विकत घेणे असा होतो तर दुसरीकडे जर तेच बंध आपल्याकडून पाळले गेले नाहीत तर ती व्यक्तिच आपल्यासाठी कायमची अनोळखी बनून राहते. असं काहीसं आपलं प्रॉमिस
“विश्वास न देता विश्वासपात्र बनण्याचं “,” दुनियेच्या नाही तर स्वतःच्याच नजरेत स्वतःलाच शोधण्याच”.
12 फेब्रुवरी :- Hug day
कधीतरी खरंच वाटायचं, “घट्ट मिठीत एकदा तरी तिला घ्यावे “ .मग सगळ्या जगाचा विसर पडावा. सगळी दुनिया एका बाजूला आणि प्रेमात आकंठ बुडलेले आम्ही दोघे दुसर्याच टोकावर. मग अचानक झोपेतून जाग यायची आणि स्वप्नांची मिठी एकदम सुटायची .मग अश्या वेळी पुन्हा आठवायचा तो “Teddy”. आमच्याकडे तर नसायचाच आणि असला तरी केवळ हातात बसेल एव्हढाचं, मग त्याला मिठी कशी मारणार ?? . अश्या वेळी उशी घेऊन गप्प पडून राहायचे . टीव्हीवर नायक –नाईकांची मिठी सुटता सुटत नसायची , काहीही कारण नसले तरी ते मिठीच मारायचे ,दिवसाचा एक तास तरी त्यांना मारलेली मिठी सोडवायलाचं जायचा .अश्या लोकांना “ Hug day “चं जरातरी कौतुक वाटत असेल का असा विचार मनात यायचा. मग नायकाला बघून कधीकधी वाटायचे अॅक्टिंग च्या क्षेत्राकडे आपले लक्षं वळवावे. अश्या वाटण्या न वाटण्यातच अक्खं बालपण निघून गेल. आमचा “Hug Day” साजरा तर झाला पण केवळ स्वप्नात आणि कल्पनेतंच. वास्तववादी जगात कधी त्याची एंट्री झालीच नाही. असो !! पण तीझ्यासोबतच्या आठवणींना मी मारलेली मिठी ही कधी न सुटणारी आहे . एक एक क्षण आजूनही माझ्या खांद्याभोवती खेळतात ,माझे मलाच घट्ट पकडून ठेवतात.
अजून काय हवंय ??
13 फेब्रुवरी :- KI## Day
तेव्हा पण आणि आज पण ,साधा “की#” हा शब्द ऐकलं तरी सुद्धा लाज वाटायची आणि लिहायची गोष्ट झालीच तर मला विनाकारण hashtag का वापरायला लागले ह्यावरून तरी एखादं लगेच समजून जाईल. मग सोयीसाठी ह्याला मी “राष्ट्रीय इमरान हश्मि दिन” म्हणून घोषित करायचो. कारण ki## म्हनलं कि इमरान हश्मिचं नाव आदराने घेतलं जायचं. आता ह्या दिवसाबद्दलच्या आठवणीबाबत बोलायचे झाले तर खूप “Awkward शांतता” माजेल . पुन्हा एकदा तो टीव्हीचा चं संदर्भ द्यायला लागायचा॰ सतत मिठीत असणारे नायक –नायिकांमध्ये तेव्हा क्वचितच “कि#” घडायचा .” इंग्लिश चॅनलवाले खूपचं advance होते हे मला दोन चार इंग्लिश चॅनल पाहिल्यावर कळलं .
तसं तर ऑन’स्क्रीन कि# होणार आहे ह्याची भणक आम्हाला आधीच लागायची . पण तेव्हा घरातले सगळे जण शेजारी बसलेले असायचे ,मग आम्ही काहीतरी कारण काढून तिथून निसटायचा प्रयत्न करायचो अन्यथा सर्व काही बघून पण न बघितल्यासारखे करायचो . अश्यात जर इमरान हश्मीचा एखादा मूवी चालू झाला तर आम्ही सोयीनेच पळ काढायचो. अॅक्टिंग ��ूप जमायची पण अश्या वेळी समोरच्याला अगदी सहज कळेल अश्या प्रकारे चेहेर्यावर बारा वाजलेले असायचे . सगळ्या अॅक्टिंग चा फालूदा तो एक प्रसंग करून जायचा. तेव्हा विश्वास बसायचा कि आपला जन्म एकवेळ ki## करण्यासाठी भलेही झाला असेल पण अॅक्टिंग करण्यासाठी अजिबात नाही.
Ki## day च्या तश्या आठवणी मागे वळून पाहायला गेलं त्याला “रोमॅंटिक ट्च” अजिबात नव्हता.होता तर तो फक्त विनोद ! विनोद ,ते पण चार मित्रांच्यात ,आणि घरात हाच विनोद एक नवीन रूप धारण करायचा. एक “Awkward” रूप, आणि सवयीची ती एक “Awkward” शांतता !!
14 फेब्रुवरी ;- Valentines Day
आता येतो तो सगळ्यात महत्वाचा दिवस . “व्हॅलेंटाईन्स डे”.अर्थात प्रेमाचा दिवस . प्रेम म्हणजे नक्की काय ? हयाबाबत अनेक जण स्वतःची मतं मांडून जातात . मी पण मांडतो .माझ्या नजरेत खरं प्रेम म्हणजे नक्की काय?
माझ्या मते “प्रेम करनं हे आपल्या हातात असतं पण प्रेमात पडनं हे आपल्या हातात अजिबात नसतं “.
“जीव लावणं हे आपल्या हातात असतं पण एखाद्यावर जीव जडणे हे आपल्या हातात कधीच नसतं”,
“ती कायमची माझीच झाली पाहिजे ह्याला प्रेमापेक्षा महत्वाकांक्षा म्हणावं लागेल”,
आणि “काही जरी झालं तरी मी आयुष्याभर तिझाच आहे असे म्हणून स्वतःशीच वचनबद्ध होणे हे खरे “प्रेम” म्हणेन “,
शेवटी काय ?? ,
तर ,”कुणीतरी कायम सोबत असणे “ हयापेक्षा
“दूर गेल्यावर कुणाची तरी कायम उणीव भासणे “ हे खरे प्रेम.!!
प्रेम तर सर्वच जणं करतात. काहींना आपले प्रेम मिळते काहींना नाही, तर काहीचे प्रेम अव्यक्तच राहते. माझ्यासारखे..
मग सुरू होतो एक प्रवास , एकाच उत्तराच्या शोधात,
“ती सध्या काय करते??”!!
आणि त्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मन पुन्हा आतुर होते . हे वेड असं असतं की ह्यात क्षितिज मिळवण्यापेक्षा त्यापर्यंत केलेला प्रवासच खूप काही न विसरण्याजोगे अनुभव देऊन जातो. कधीकधी आकाशाला गवसणी घालण्यापेक्षा मोकळेपनाणे हवेत तरंगण्याची मजा अनुभवणे गरजेचे असते . कारण त्यातच खरा आनंद दडलेला असतो.
मागे वळून जर पहिले तर “आपण एकत्र आलो ह्याचे नवल आपल्याला
क्वचितच कधीकधी वाटते” पण “एकत्र ��ेण्यासाठी आपण काय काय केले हे आयुष्यभर आठवणीत राहते !!”.
“ खरे प्रेम ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळे असते का ??”
!! समाप्त !!
2 notes
·
View notes
Text
दुल्कर सलमान मामूट्टीवर NDTV ला: "माझ्या वडिलांचे नाव कधीही कलंकित करू इच्छित नाही"
दुल्कर सलमान मामूट्टीवर NDTV ला: “माझ्या वडिलांचे नाव कधीही कलंकित करू इच्छित नाही”
दुल्कर सलमानने हा फोटो शेअर केला आहे. (शिष्टाचार: dqsalmaan) अभिनेता दुल्कर सलमान कबूल करतो की त्याला नेहमी वाटायचे की त्याचे वडील, मल्याळम सुपरस्टार, मामूटीचे बूट भरण्यासाठी खूप मोठे आहेत. त्यामुळे तो बराच काळ चित्रपटांपासून दूर राहिला, 2012 च्या चित्रपटातून त्याने वयाच्या 26व्या वर्षी पदार्पण केले. दुसरा शो, गुंड खेळत आहे. त्याच्या उशिराने एंट्री होऊनही, दुल्कर आज मल्याळम सिनेमात एक सुपरस्टार…
View On WordPress
0 notes
Text
स्वागत दिवाळीचे
संपले नवरात्रदहन झाले रावणाचे ।आहेत आत्ता सारेदिवसच आनंदाचे ।झाला मस्त दसरास्वागत आता दिवाळीचे ।खिसा जरा सांभाळाआहेत दिवस खर्चाचे ।सदरा साडी पॅन्ट सांगाकुणास काय घ्यायचे ।फराळ पाणी गिफ्ट सारेकुणाकुणास वाटायचे ।बोनस जाईल असाच मगदागिने कसे घडवायचे ।गरम होईल वातावरणसांगा कसे सांभाळायचे ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 June 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३० जून २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
· बहुमत चाचणी रोखण्याची मागणी सर्वोच्�� न्यायालयानं फेटाळल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदासह विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा
· शिवसेनेचा बंडखोर गट काल गुवाहाटीमधून गोव्यात दाखल
· औरंगाबाद शहराचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशीव नामकरण करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांचं पुनर्गठन करण्याचा प्रस्तावही मंजूर
· अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या ८०५ कोटी १७ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य सरकारची मान्यता
· हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन होणार
· उपराष्ट्रपती पदाची सहा ऑगस्टला निवडणूक
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे तीन हजार ९५७ रुग्ण, मराठवाड्यात १०८ बाधित
आणि
· हैदराबाद मुक्तीसंग्रामातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, बॅरिस्टर काशीनाथ नावंदर यांचं निधन
****
सविस्तर बातम्या
महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी रोखण्याची शिवसेनेची मागणी सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबरोबरच विधानपरिषद सदस्यत्वाचाही काल राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची त्यांनी राजभवन इथं भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून, त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घेण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश दिल्यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, बहुमत चाचणी थांबवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलावणं घटनाबाह्य असल्याचं, शिवसेनेनं या याचिकेत म्हटलं होतं. न्यायालयानं या याचिकेवर सायंकाळी तातडीनं सुनावणी घेतली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं बहुमत चाचणी रोखण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर काल सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी थेट संवाद साधत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले...
Byte…
महाविकास आघाडीकडे शिवसेनेकडे किती आमदार आहेत, मग भाजपकडे किती आहेत, आणखी किती आहेत, मला त्यामध्ये रस नाही. मी यापूर्वीच तुम्हाला ��ांगितलेलं आहे, की माझ्या विरोधामध्ये कोण आहेत, किती आहेत, मला त्याच्यात आजीबात रस नाही. पण माझ्या विरोधात एक जरी माझा माणूस उभा राहीला तरी ते मला लज्जास्पद आहे. ठिके तुमची इच्छा ही प्रमाण. कारण का मला तो खेळच खेळायचा नाहीये. आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा देखील त्याग करत आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या विधानपरिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देत आहे
आपल्या कार्यकाळात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामकरण करता आलं, याचं समाधान वाटत असल्याची भावना, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ज्या लोकांनी सतत ही मागणी केली, ते लोक या बैठकीला अनुपस्थित होते, मात्र ज्यांचा या नामकरणास विरोध असल्याचं भासवण्यात आलं, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र या नामकरणाला कोणताही विरोध न करता, तत्काळ मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी कर्जमुक्तीसह महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.
बहुमत चाचणीची मागणी होताच, राज्यपालांनी तत्काळ बहुमत चाचणीचे आदेश दिले, तीच तत्परता विधान परिषदेच्या नामनियुक्त १२ आमदारांच्या प्रलंबित प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी दाखवावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
बंडखोर शिवसैनिक आमदारांनी नाराजीच्या मुद्यावर प्रत्यक्ष आपल्याशी चर्चा करायला हवी होती, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लावल्या जात असलेल्या सुरक्षा बंदोबस्तावर, त्यांनी उपरोधिक टीका केली. ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांततेचं आवाहन केलं. शिवसेना आपलीच आहे, ती कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आश्वासित केलं. ते म्हणाले...
Byte…
मी आज सांगतो उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्या अधेमध्ये येऊ नका. त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचलं, शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन उतरवलं, त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या, आणि त्यांना ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या, तो गोडवा त्यानं लखलाभो. मला तुमच्या प्रेमाचा गोडवा पाहीजे. मला तुमच्या आशिर्वादाचा गोडवा पाहीजे, हा कोणी हिरावून नाही घेऊ शकत. मला पुन्हा सगळ्यांची साथ, सोबत, आशिर्वाद पाहीजे, प्रेम पाहीजे. पुन्हा मी शिवसेना भवनामध्ये बसायला सुरूवात करणार आहे. माझ्या शिवसैनिकांना भेटायला सुरूवात करणार आहे आणि पुन्हा एकदा नविन भरारी मारणार आहे. सगळे जे काही तरुण तरुणी आणि माझ्या माता - भगीनी आहेत, त्यांना सोबत घेऊन. शिवसेना आपलीच आहे, शिवसेना कधीही आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभेचं आज बोलावलेलं विशेष अधिवेशन रद्द करण्यात आलं आहे.
****
शिवसेनेचा बंडखोर गट काल गुवाहाटीमधून गोव्यात दाखल झाला. बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर हा गट आज मुंबईत येणार होता.
****
औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत संमत झालेले हे ठराव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येऊन त्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका तसंच महानगरपालिका आणि नगरपालिका यांचं नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल आणि वन विभाग तसंच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं “लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असं नामकरण करण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
****
राज्यातल्या विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ या तिन्ही प्रादेशिक विकास मंडळांचं पुनर्गठन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. ही मंडळे पुर्नगठीत करण्यासंदर्भातली विनंती केंद्र शासनाला करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्यात येईल. सध्याच्या मंडळाचा कालावधी ३० एप्रिल २०२० रोजी संपुष्टात आला आहे.
अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या ८०५ कोटी १७ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच यात राज्य शासनाचा आर्थिक हिस्सा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठीचा राज्य शासनाचा दोन हजार ४०२ कोटी ५९ लाख रुपयांचा ५० टक्के इतका हिस्सा केंद्र शासनास निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्याने देण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. राज्यात हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीने केलेल्या शिफारशीस तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
राज्यातल्या ग्रामीण भागात विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवण्यास देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली. ग्रामीण भागात २० लाभार्थ्यांकरता एक वसाहत निर्माण करण्यात येईल. दहा कुटुंबांकरता प्रति वसाहतीसाठी अंदाजे ४४ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला लाभार्थी निवडण्याचे अधिकार देण्यात येणार आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतिपद निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकीची अधिसूचना पाच जुलै रोजी जारी करण्यात येणार आहे. यासाठी १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आवश्यकता भासल्यास सहा ऑगस्टला उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान घेतलं जाईल. विद्यमान उपराष्ट्रपत��� व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार ९५७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ७२ हजार ४७४ झाली आहे. काल या संसर्गानं सात रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ९२२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल तीन हजार ६९६ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ९८ हजार ८१७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २५ हजार ७३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १०८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४२, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १८, जालना आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी १४, तर बीड जिल्ह्यात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
राज्यातल्या चार कोटी जमीनमालकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी त्यांच्या सातबारा उताऱ्याशी लिंक करण्याचा निर्णय, भूमिअभिलेख विभागानं घेतला आहे. या सुविधेमुळे संबंधित जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंद, बोजा आदींची माहिती, खातेदाराला एस एम एस आणि ई-मेलच्या माध्यमातून समजणार आहे. तसंच जमिनींची परस्पर विक्री होत असल्यास ही बाब खातेदारांना समजणार असून, या माध्यमातून फसवणूक रोखणं शक्य होणार आहे.
****
राज्यात पावसाचं प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यातल्या २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, चार ऑगस्टला मतदान होणार असल्याची घोषणा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं केली आहे.
****
औरंगाबाद महापालिकेच्या प्रशासकपदी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासक पदी बदली झाली आहे.
मुंबईचे विद्यमान पोलिस आयुक्त सेवानिवृत्त होत असल्यानं, गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसाळकर यांची मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
हैदराबाद मुक्तीसंग्रामातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, बॅरिस्टर काशीनाथ नावंदर यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. हैदराबाद मुक्ती संग्रामात स्टेट काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले नावंदर यांनी भुमीगत राहून औरंगाबाद तहसिल कचेरीवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता. परसोडा आणि रो��ेगाव रेल्वे रुळ उखडून, तसंच तारा तोडून निजाम सरकारची दळणवळण व्यवस्था ��ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील ते सहभागी होते. विद्यार्थी संघाचे चिटणीस, मराठवाडा स्वातंत्र्यसैनिक संघटना, मराठवाडा बुद्धिबळ संघटना, तसंच औरंगाबाद वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. नावंदर यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शहरातल्या टी.व्ही.सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात, आतिषबाजी करुन आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. उस्मानाबादचं धाराशीव नामांतर करण्याचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे उस्मानाबाद शहरातही शिवसेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला.
दरम्यान, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराला विरोध दर्शवला आहे. सत्ता जात असल्याचं लक्षात येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतला जातो. त्याअनुषंगानं आम्ही लढा देणार असल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं.
****
औरंगाबादचे आमदार हरवले असल्याची तक्रार आम आदमी पक्षाच्या वतीनं देण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष तक्रार घेण्यास नकार देण्यात आल्यानं ही तक्रार टपालानं पाठवण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच आमदारांचा समावेश आहे, या बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात काल वाहन फेरी काढण्यात आली.
दरम्यान, पैठण तालुक्यातल्या रजापूर इथं शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि संदिपान भुमरे यांच्या समर्थनार्थ शांततेत भव्य रॅली काढण्यात आली. पाचोड पोलिसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
****
राज्यात येत्या दोन दिवसात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आज ऑरेंज अलर्ट तर ठाणे, पालघरसह विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
0 notes
Text
महाराष्ट्र: सुंदर पत्नी कोणाच्याही लक्षात येऊ नये, पतीला मुलांसह 10 वर्षे घरात कैद
महाराष्ट्र: सुंदर पत्नी कोणाच्याही लक्षात येऊ नये, पतीला मुलांसह 10 वर्षे घरात कैद
जिल्हा रुग्णालय बीड, महाराष्ट्र महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका पतीने आपल्या सुंदर पत्नीला लोकांच्या नजरेपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या सुंदर पत्नीला 10 वर्षे घराबाहेर पडू दिले नाही. एवढेच नाही तर त्याने पत्नीसह आपल्या मुलांनाही घरात कैद केले. आपल्या सुंदर बायकोकडे कोणीतरी एकटक पाहील असे त्याला नेहमी वाटायचे. सगळा वेळ त्याला वाटायचं की बायको घराबाहेर गेली तर सगळे आंबे. सर्व बाजारात डूम येईल.…
View On WordPress
0 notes
Text
CWG 2022: भारताला सुवर्ण मिळवून देणाऱ्या लक्ष्य सेनचे वयाच्या सहाव्या वर्षी लक्ष्य पाहून लोकांना आश्चर्य वाटायचे
CWG 2022: भारताला सुवर्ण मिळवून देणाऱ्या लक्ष्य सेनचे वयाच्या सहाव्या वर्षी लक्ष्य पाहून लोकांना आश्चर्य वाटायचे
CWG 2022: भारताला सुवर्ण मिळवून देणाऱ्या लक्ष्य सेनचे वयाच्या सहाव्या वर्षी लक्ष्य पाहून लोकांना आश्चर्य वाटायचे आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या आंग जे योंगचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील हे त्याचे पहिले पदक आहे. या विजयामागे त्याची मेहनत आणि त्याचे वडील … आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत…
View On WordPress
#2022#cwg#आश्चर्य#क्रिकेट#क्रीडा#खेळ बातम्या#टेनिस#देणाऱ्या#पाहून#भारत लाईव्ह मीडिया#भारताला#मराठी खेळ अपडेट्स#मिळवून#राष्ट्रीय खेळ बातम्या#लक्ष्य#लोकांना#वयाच्या#वर्षी#वाटायचे#सहाव्या#सुवर्ण#सेनचे#स्पोर्ट्स#स्पोर्ट्स अपडेट मराठी#हॉकी
0 notes
Text
महाराष्ट्रियन मुलगी वसुधा सोबत सेक्स- 1 | Mastaram.Net
New Story has been published on https://www.mastaram.net/marathi-sex-kahani/maharashtrian-mulagi-vasudha-sobat-sex-1.html
महाराष्ट्रियन मुलगी वसुधा सोबत सेक्स- 1
तुला लाज नाही वाटत.. आईच्या नावाने हलवताना त्यात लाज वाटायचे काय? चक्क तिला भोगत असताना मला काही वाटत नाही मग तिच्या नावाने मूठ मारायला कसली लाज आली आहे “आणि हे वर तोंड करून सख्ख्या बहिणीला सांगतोस? तेही आपल्या लहान बहिणीला
Read Full Story https://www.mastaram.net/marathi-sex-kahani/maharashtrian-mulagi-vasudha-sobat-sex-1.html
4 notes
·
View notes
Text
घुमते रह जाओगे....
पूर्वीच्या काळी प्रवास म्हणलं की एक वेगळीच उत्सुकता असायची. बस, ट्रेन मिळेल की नाही, जागा मिळेल की नाही, प्यायला खायला मिळेल का नाही अशा अनेक समस्या असायच्या. जेवायचे ताट वाटी, शिधा, पाण्यासाठी पितळेचा फिरकीचा लोटा हे सर्व साहित्य सोबत ठेवावे लागायचे. जेवायखायच्या तक्रारी नसायच्या. जिथे जे मिळेल ते खायचे, जे पाणी मिळेल ते प्यायचे. पूर्वी स्वत:ची गाडी फार क्वचित कुणाकडे तरी असायची. सायकल असणे ही सुद्धा मोठी बाब. मोटरसायकल, स्कुटर दुर्मिळ होत्या. त्या काळी पायी किंवा बैलगाडीत जास्तकरून प्रवास करावे लागायचे. बसेस सुद्धा डायरेक्ट नव्हत्या. बदलून बदलून आपल्याला पाहिजे त्या स्थानाला जावे लागायचे.
आज मात्र सर्व सोयी झाल्या आहेत. ज्या प्रवासासाठी आठ पंधरा दिवस लागत होते, ते आता दोन तीन दिवसांवर आले आहे. जाणे येणे, खाणे पिणे, राहणे याच्या उत्तम सोयी झाल्या आहेत. रस्ते चांगले झाले आहेत. नवीन पिढीला याच सुखसोयीची सवय आहे. त्यांना पूर्वीच्या काळातल्या गैरसोयीबद्दल सांगितले की आश्चर्य वाटते.
१९६०-७० मध्ये जन्म घेतलेल्या जवळपास सर्वांना गैरसोयीतील प्रवासाच्या तसेच अत्याधुनिक सोयीसुविधातल्या प्रवासाचासुद्धा अनुभव आहे. टेलिफोन ते स्मार्टफोन हा बदलसुद्धा त्यांनी पचवला आहे. तरी जुन्या काळातील आठवणी अजूनही त्यांच्या मनातून जात नाहीत.
अगदी लहानपणी आम्ही सायकल चालवायला शिकलो. सायकलवर उमरग्याच्या जवळपास असणार्या अनेक गावांना गेलो होतो. तुरोरी, मुळज, जकेकुर, अमृतकुंड अशा गावी मित्रांसोबत जातांना खूप मजा केली. १९८५ साली लातूर ते तुळजापूर १६० कि.मी. जाणेयेणे सायकलस्वारी आम्ही चार मित्रांनी केली. खूप मजा आली होती. हे अनुभव विसरता येणे शक्य नाही.
बैलगाडी तर हक्काचे वहान! येळअमावस्या, रासणी, पेरणी अथवा एरवीसुद्धा शेतात जाण्यासाठी बैलगाडी ठरलेलीच. गच्च भरलेल्या कडब्याच्या पेंड्यावर बसून अथवा धान्याच्या पोत्यांवर बसून अंबारीत बसल्यासारख्या भाव चेहर्यावर असायचा. रेड्याच्या खटार्याचा तसेच घोडागाडीचाही अनुभव घेतला.
पाच दहा किलोमिटर पायी चालणे काहीच वाटायचे नाही. पर्याय सुद्धा नव्हता. आता अनेक पर्याय उपलब्ध असूनही त्यावेळच्या आठवणी ताज्या करण्याचा मोह होतो. २००३-४ साली आम्ही काही मित्र औरंगाबाद ते खुलताबाद पायी गेलो होतो. निमित्त होते हनुमान जयंतीचे. रात्री साडेनऊला निघून पहाटे सहा वाजता हनुमान जन्माच्या वेळेस भद्रा मारुती मंदिरात पोहोचलो. रस्त्याने हजारो भाविक सोबत होते. अनेक लोकांनी भाविकांसाठी खाण्यापिण्याचे मोफत स्टॉल्स लावले होते. सर्वांना ते आग्रह करत होते. हे पहात पहिल्या तासभराचा प्रवास काहीच वाटला नाही. पण खरी मजा दौलताबाद घाटापासून सुरू झाली. पायच ओढेना! कसेबसे घाट चढून गेलो. पुढे एखादा स्पीड ब्रेकर जरी लागला तरी पीडब्लूडीला शिव्या घालायचो. मंदिरात पोहोचल्यावर रांगेत शेवटी शेवटी तर बसूनच सरकत होतो. दर्शन घेवून बसस्टँडकडे कसे पाय ओढले आमचे आम्हालाच माहित! बसमध्ये तुडुंब गर्दीत उभे राहुनच प्रवास करावा लागला. घरी आलो तर माझे अवघडून चालणे पाहुन शेजार्यांना वेगळीच शंका आली. पत्नीला फोन करून विचारून त्यांनी खात्री करून घेतली आणि मगच निश्वास सोडला! पुढे चारपाच दिवस ‘वाकडे पाय पडणे’ याचा ‘तसा’ नाही पण त्या अर्थाचा शब्दश: अनुभव घेतला!
सायकल झाली, पायी प्रवासही झाला. बसचा तर लहानपणापासून अनुभव होताच. बसेस आजच्या सारखे स्लिपर किंवा लक्झरी नव्हत्या. लाल परी! आजकाल तिला लाल डब्बा म्हणून हिणवले जाते, पण आमच्यासाठी ती परीच होती. तीन सिट एकीकडे आणि दुसरीकडे दोन सीट आणि मागे पुढे संपूर्ण बाकडे अशी पन्नास प्रवाशांची सोय असायची. रात्रीच्या प्रवासाची बस म्हणजे रातराणी. स्वच्छ धुतलेली आणि एकही सिट फाडून स्पंज बाहेर न निघालेली लाल परी. या बसमध्ये संपूर्ण तीन सीटचे बेंच रिकामे मिळाले तर त्यापेक्षा दुसरे सुख नसायचे. लांब पाय करून ताणून द्यायचा अनुभव ज्यांनी घेतला आहे त्यांना आजच्या स्लिपर क���चचे काहीच विशेष वाटणार नाही.
रेल्वेचा पहिला प्रवास १९७५ साली झाला. तिरूपती बालाजीला आई वडील आणि भावंडांसोबत गुलबर्ग्याहुन रेणीगुंठाला गेलो होतो. रिझर्वेश बिजर्वेशन काही नाही. जनरल ड्ब्यातून प्रवास. लाकडी पट्या ठोकलेले बर्थ होते. त्यावरच दाटीवाटीने प्रवासी बसायचे. स्टेशनवरच्या नळातून फिरकीचा तांब्या भरून पाणी घेऊन ते पुढच्या स्टेशनपर्यंत पुरवले जायचे. एखाद्या स्टेशनवर केळीच्या पानावर मिळालेले ईडली वडा सांबर गर्दीत बसून खाण्याची मजा काही वेगळीच असायची. पुढे अत्याधुनिक रेल्वे, मेट्रो हा प्रवासही केला, पण ती पहिली आठवण अजुनही मनात आहे.
एका मित्रासोबत १९९४ साली सहकुटुंब अलिबागला गेलो होतो. अर्थात लाल परीने. तिथे अचानक एक योग जुळून आला. मांडवा धक्क्यावरून गेटवे ऑफ इंडीया रात्रीच्या वेळी दिसते, हे पाहुन बोटीने तिथे जावे असे ठरले आणि दुसर्या दिवशी बोटीचा अनोखा प्रवासही घडला. बॉब क्रिस्टो हा विलन नट त्यावेळी भेटला होता. अथांग सागरात, चारी बाजूला पाणीच पाणी, खवळलेल्या लाटा पार करत आम्ही गेटवेला पोहोचलो. तिथे असलेल्या बग्गीचा आनंदही लुटला. डबल डेकर बसने स्टेशन अन मग लोकलने बोरीवलीतील बहिणीकडे जात असंख्य आठवणी मनात साठवून तो प्रवास संपला.
लहानपणी हिल्मन या कारने आम्ही बरेच फिरलो होतो. पण अगदीच लहान असल्यामुळे फारसे कळत नव्हते. पुढे स्वत:च्या कारने तिरूपती, गोवा, गुजरात आणि महारष्ट्रभर प्रवास झाला. स्वत: चालवत फिरण्याचा अनुभव आणि मजा वेगळीच असते.
२००८ साली विमान प्रवासाचा पहिला अनुभव घेतला. अहमदाबाद ते मुंबई हा आयुष्यातील पहिला विमान प्रवास. खूप उत्सुकता होती. काय होईल, कसे होईल ही धाकधुक होती. पण काहीही वाटले नाही. अगदी सराईत प्रवाश्याप्रमाणे, जसे काही रोज विमान प्रवास करतो अशा अविर्भावात तो प्रवास केला. पुढे अनेकदा दिल्ली प्रवास घडला, तसेच कायम लक्षात राहिल असा चेन्नई ते कोलंबो आणि परत असा प्रवासही घडला.
कारने आरामात फिरत असलो तरी एक इच्छा मनात होती की आपण मोटरसायकलवर भारत भ्रमण करावे. त्या इच्छेने जोर धरला आणि सुझुकी झियस ही नवीकोरी मोटरसायकल विकत घेतली. पण योग जुळून आला नाही. सोबत यायला कुणीच तयार होईना. मग २०११ साली उमरग्याला मोटरसायकलवर जाऊन दुधाची तहान ताकावर भागवली. नितीन काजवे हा मित्र सोबत आल्यामुळे हा योग जुळून आला. आमच्या घराण्यात मांजरसु��ब्याच्या घाटाचे वेगळेच महत्व आहे. १९६४ साली वडील आणि काका, काकांच्या नव्या कोर्या जावा कंपनीच्या मोटरसायकलने औरंगाबादहुन उमरग्याला निघाले होते. घाटात त्यांचा मोठा अपघात झाला आणि ते थोडक्यात वाचले होते. जखमी अवस्थेतच ते तुळजापूरमार्गे उमरग्याला कसे पोहोचले ही माझ्या जन्माच्या अगोदरची ही गोष्ट ऐकून आम्ही हरखून जायचो.
१९८० साली मोठा भाऊ मित्रासोबत अल्विन पुष्पक या स्कुटरने उमरग्याला निघाला होता. त्याचाही मांजरसुंब्याच्या घाटात अपघात झाला होता. हा घाट पार करणे आपल्यासाठी धार्जिन नाही हे ओळखून तो परत फिरला होता. मी मात्र मोटरसायकलवर हा प्रवास पूर्ण करण्यात यशस्वी झालो. बहुतेक इजाबिजा टळली असावी!
घरी कळू न देताच आम्ही निघालो होतो. बीडच्या घाटात थांबून अंदाज्यानेच वडलांच्या व भावाच्या अपघात स्थळाला नमस्कार केला आणि मजल दरमजल करत उस्मानाबादला एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. अचानक तुफान पाऊस आणि विजांचा गडगडाट सुरू झाला. आम्ही बसलो होतो त्याच्या बाजूला असलेल्या खोलीचे पत्रे उखडून हवेत कागदासारखे उडून गेले. आमच्या डोक्यावरच पत्रेही जोर जोरात तांडव करत होते. पण नशीबाने उडाले नाहीत. जेवण आटोपून आम्ही संध्याकाळी उमरग्याला पोहोचलो. वहीनींनी आमची खूप खरडपट्टी काढली. घरी बायकोलाही माहित नव्हते. त्यांनी मोबाईलवर आमचा प्रताप सांगितला त्यावेळी तिनेही डोक्यावर हात मारून घेतला. (अर्थात मनातल्या मनात ते दृश्य दिसले!).
दुसर्या दिवशी सकाळी लवकर निघून परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत एका हॉटेलमध्ये पेपर वाचला तेव्हा मोठी बातमी होती की उस्मानाबादला काल झालेल्या भीषण पावसात वीज पडून दोन व्यक्ती दगावल्या! लगेच पेपर बाजूला ठेवला आणि संध्याकाळी सुखरूप घरी पोहोचलो. वाटेत त्याच मांजरसुंब्याच्या घाटातले सीताफळे आठवण म्हणून घरी घेऊन आलो.
नंतरच्या काळात गिअरवाले स्कुटर जाऊन ऑटो गिअरवाले स्कुटरेट्स निघाल्या. या छोट्या गाड्या शहरात फिरण्याच्याच सोयीसाठीच बनल्या आहेत. हे माहित असूनही नुकताच २०२२ च्या १ जुलैला एक धाडसी निर्णय घेतला. मुलीला तिची अॅक्सेस स्कुटर पाहिजे होती. ती पोहोचवण्यासाठी एका ट्रांस्पोर्टच्या ट्रकमधून स्कुटर पुण्याला पोहोचवून येतो असे सांगून घरून निघालो आणि तडक त्याच अॅक्सेसवर पुण्याकडे प्रयाण केले. सोबत अर्थातच नितीन काजवे हा मित्र. वय वर्षे सत्तावन्न अठ्ठावन्न असलेले आम्ही दोन ‘तरूण’ मित्र अगदी मजेत, कसलाही त्र���स न होता आरामात सहा तासात पुण्यात पोहोचलो. तिथे गेल्यावर मुलीला आणि तिच्या मार्फत बायकोला आमचा प्रताप कळला, आणि नेहमीप्रमाणे तिने कपाळावर हात मारून घेतला (परत काल्पनिक दृश्य!).
थोडक्यात सांगायचे तर पायी, बैलगाडी, खटारा, टांगा, बग्गी, बस, रेल्वे, कार, सायकल, मोटरसायकल, स्कुटर, विमान, बोट अशा सर्व प्रवासी माध्यमांचा वापर करायला मिळाला हे आमचे भाग्यच! फक्त आम्हाला ट्रामचा अनुभव घेता आला नाही ही खंत आहे. मिळेल त्या साधनांचा आनंद घेत प्रवास केला तरच घुमते रह जाओगे हे मात्र खरे आहे!
अजून हेलिकॉप्टर, पॅरा ग्लायडिंग आणि सबमरीन बाकी आहे. बघूत नशीबात असले तर...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
अनुभव
स्त्री रुग्ण वय 52 वर्ष-
दिवाळीची साफ सफाई करतांना अचानक कंबरेत दुखायला लागले. दुखणे एवढे वाढले की बसायला पण जमत नव्हते. सर्व वेदना शामक गोळ्या इंजेक्शन घेऊन झाले पण फरक काही पडत नव्हता. थोड्या वेळ बरे वाटायचे, परत जैसे थे.. जणू काही दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले होते. शेवटी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी क्लिनिकला आल्या. कटी बस्ती, मसाज, पत्र पोट्टली शेक व मात्रा बस्ती असा उपचार सुरू केला. उपचार चालू होऊन 3 च दिवस झालेत ,तो त्यांना फरक जाणवायला लागला. आता स्वतः Activa चालवत उर्वरीत उपचार घ्यायला क्लिनिकला येत आहेत. कोणतीही वेदनाशामक औषधे न घेता, वजने(traction) न लावता 3 दिवसांत होणारा हा बदल रुग्णासाठी व माझ्यासाठी सुखद अनुभव देणारा ठरला.
#backpain #backpainrelief #katibasti #ayurvedicmassage #backpains #ayurveda #panchakarma #panchakarmatreatment #ayurvedicmedicines #ayurvedaeveryday #ayurvedicclinic #ayurvedicdoctor #ayurvedicdoctorinthane #health #wellness #fitness #strong #healthcare #healthyliving #drsagarnarkhede #drnarkhedeayurvedclinic
http://www.narkhedeayurved.com
0 notes