#मिळवून
Explore tagged Tumblr posts
Text
चार वेळा वर्ल्डकप जिंकणारा भारतीय क्रिकेटपटू; कॅन्सरशी लढताना मिळवून दिले वि्श्वविजेतेपद!
चार वेळा वर्ल्डकप जिंकणारा भारतीय क्रिकेटपटू; कॅन्सरशी लढताना मिळवून दिले वि्श्वविजेतेपद!
चार वेळा वर्ल्डकप जिंकणारा भारतीय क्रिकेटपटू; कॅन्सरशी लढताना मिळवून दिले वि्श्वविजेतेपद! Go to Source
View On WordPress
#कॅन्सरशी#क्रिकेटपटू#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#चार#जिंकणारा#दिले#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भारतीय#मराठी खेळ बातमी#मिळवून#लढताना#वर्ल्डकप#विश्व#वि्श्वविजेतेपद!#वेळा#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग • महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचारसभेत काँग्रेसचा पंचसूत्री जाहीरनामा प्रसिद्ध • गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी • घड्याळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रवादी काँग्रेस��ा निर्देश आणि • मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं आता वेग घेतला असून, विविध पक्षांच्या बड्या नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. महाविकास आघाडीची संयुक्त प्रचारसभा काल मुंबईत वांद्रे- कुर्ला संकुलात झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मविआचे इतर नेते सभेला उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पंचसूत्री जाहीरनामा यावेळी प्रसिद्ध करण्यात आला. महिलांना दरमहा तीन हजार रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या महालक्ष्मी योजनेचा तसंच बेरोजगारांना चार हजार रुपये अर्थसहाय्याचा त्यात समावेश आहे. भाजपाप्रणित लोकशाही आघाडी सरकारच्या धोरण आणि कार्यक्रमांवर नेत्यांनी यावेळी टीका केली.
दरम्यान, राहुल गांधी काल सकाळी नागपूर इथं संविधान संमेलनात सहभागी झाले होते. संविधान हे केवळ एक पुस्तक नसून, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान आहे, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. तत्पूर्वी त्यांनी, नागपूर इथल्या दीक्षाभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची काल लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं प्रचार सभा झाली. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. राज्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राची सत्ता एकदा आपल्या हातात द्या, असं आवाहन मराठवाड्यातल्या या आपल्या पहिल्या सभेत ठाकरे यांनी केलं. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी काल भारतनगरमध्ये पदयात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधला.
मुंबईतल्या माहीम मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर आणि मानखुर्द - शिवाजीनगर मध्ये सुरेश पाटील यांना रिपब्लिकन पक्षाने अधिकृत पाठींबा जाहीर केला आहे. पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल ही माहिती दिली. रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठीच महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा असल्याचं त्यांनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार जागृतीसाठी राज्य निवडणूक आयुक्तांतर्फे येत्या आ�� नोव्हेंबर पासून मोबाईल व्हॅन्स सुरू करण्यात येणार आहेत. या व्हॅन्सवर मतदान जनजागृतीविषयक माहिती देण्यात येणार आहे. या गाड्या राज्यातल्या १५ जिल्ह्यांमध्ये मतदार जागृतीचं कार्य करतील.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण दोन हजार ८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दोन हजार ८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण २८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेत्री कविता मेढेकर यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज अको���ा आणि वाशिम या जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आर्थिक कमतरतेमुळे बुद्धिमान विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशानं मंजूर केलेल्या या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मिळू शकेल, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, भारतीय अन्न महामंडळासाठी वर्ष २०२४-२५ मध्ये दहा हजार सातशे कोटी रुपयांच्या समभाग भांडवलाला मंजुरी दिल्याची माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली. या निर्णयामुळे महामंडळाची कार्यान्वयन क्षमता वाढेल, असं त्यांनी नमूद केलं.
घड्याळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं येत्या ३६ तासात सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करावं, असे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये घड्याळ या चिन्हांवरुन असलेल्या वादावर काल न्यायालयात सुनावणी झाली. दोन्हीं गटांनी ऐन निवडणुकीच्या काळात आपली ऊर्जा न्यायालयात भांडण्यात खर्च करण्यापेक्षा प्रचारावर भर द्यावा, असा सल्लाही न्यायालयानं यावेळी दिला.
निवडणूक प्रक्रिया राबवताना त्यात कोणत्याही शंकेला वाव राहू नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी, आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य ��्यावं, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांनी काल निवडणूक यंत्रणांना दिले. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमधल्या निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवाव्यात आणि मतदानाबाबत जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिन हॅक करून विजयी करून देतो, असे सांगत नाशिकमधल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराकडे ४२ लाख रूपयांची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीला नाशिक पोलीसांनी अटक केली आहे. भगवानसिंग चव्हाण असं त्याचं नाव आहे. मध्य नाशिक विधानसभा मतदार संघातले उमेदवार वसंत गीते यांच्या मुंबई नाका इथल्या कार्यालयात जाऊन त्याने ही मागणी केली होती.
नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि रुग्ण सेवा मंडळ सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंटचं उद्घाटन काल महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते झालं. “मतदाराला प्रोत्साहन म्हणून मतदानाच्या बोटाची शाई दाखवा आणि मोफत डोळे तपासणी करून घ्या” असा उपक्रम आयोजित केला आहे. यावेळी मोठया प्रमाणात मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. काल वाचनालयाच्या वतीने बाह्यरुग्ण विभागात आणि लसीकरण केंद्रात रुग्णाला दिल्या जाणाऱ्या पावती आणि औषधाच्या कागदावर २० नोव्हेंबर २०२४ रोजी मी मतदान करणार तुम्ही पण करा, असा एक शिक्का देण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड मतदारसंघातल्या अनेक गावांमध्ये स्वीप अंतर्गत शिक्षक संचाने गायन आणि पथनाट्यातून मतदान जनजागृती केली. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथंही शिक्षकांनी आठवडी बाजारात नागरिकांशी संवाद साधून, मतदान जनजागृती केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिव्यांग आणि ८५ वर्षांपूढील नागरिकांसाठी येत्या १३ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरु होणार आहे. जिल्ह्यात असे चार हजार ४२४ मतदार आहेत. सिल्लोड मतदारसंघात १३ ते १६ नोव्हेंबर, पैठण, गंगापूर आणि कन्नड मतदारसंघात १५ ते १७, फुलंब्री १४ ते १७, औरंगाबाद मध्य आणि पश्चिम १३ ते १५, औरंगाबाद पूर्व १३ ते १८ आणि वैजापूर इथं १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान गृह मतदान होणार आहे.
परभणी तालुक्यातल्या नृसिंह पोखर्णी या ग्रामपंचायतीला नुकताच आयएसओ दर्जा प्राप्त झाला आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोन्सीकर यांच्या प��कानं काल या गावाला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली. ग्रामपंचायत आयएसओ बनवल्याबद्दल तसंच ग्रामपंचायतीचे अभिलेखे अद्ययावत केल्याबद्दल घोन्सीकर यांनी यावेळी ग्रामपंचायतीचं अभिनंदन केलं.
पंढरपूर इथं होणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून तीन विशेष अनारक्षित गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. या गाड्या आठ ते १५ नोव्हेंबरदरम्यान विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे जाणार आहेत. यामध्ये लातूर-पंढरपूर विशेष गाडी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी लातूर स्थानकावरून सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. पंढरपूर-लातूर ही विशेष गाडी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी पंढरपूरहून दुपारी एक वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि लातूरला संध्याकाळी सात वाजून २० मिनिटांनी पोहोचणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.
जालना तहसील कार्यालयातला तलाठी दुर्गेश गिरी याला पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं अटक केली. तक्रारदाराच्या भूखंडाचा फेर घेण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागानं दहा ठिकाणी धाडी टाकून एकूण दोन लाख ७४ हजार रुपयांची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली. याप्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली असून, गुन्हे दाखल झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सीमेवर जळगाव जामोद तालुक्यातल्या भिंगारा गावातल्या एका शेतात पोलिसांना ४५ क्विंटल गांजाची झाडे आढळून आली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 notes
Text
विधानसभेसाठी तिकीट मिळवून देतो पीएमओ मधून बोलतोय , एक फोन आला अन..
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी उमेदवार इच्छुक आहेत मात्र तिकिटांचा तिढा अद्यापही सुटलेला नसून यामुळे फसवणुकीचे देखील प्रकार घडू लागलेले आहेत असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आलेला आहे. एका व्यक्तीने फोन करून आपण पंतप्रधान कार्यालय अर्थात पीएमओ ऑफिसमधून बोलत आहोत असे सांगत विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. एका लोकप्रतिनिधींनी त्यानंतर पोलिसात तक्रार दिली आणि…
0 notes
Text
✨ दिवाळीच्या सजावटीला द्या नवा रंग, काबावत ब्रशसह! 🎨
या आनंदाच्या सणात तुमच्या घराला नवीन रंगाची मढवण करा! 🥰आमच्या उच्च दर्जाच्या इंटीरियर्स पेंट ब्रशच्या मदतीने तुमच्या घराच्या भिंतींना एक नवा जीवनस्पर्श द्या. 🖌️
🪔 दिवाळी म्हणजे रंग, प्रकाश, आणि उत्सव 😍 आणि यावर्षी तुमच्या सृष्टीत एक सुंदर परिवर्तन घडवण्यासाठी तुमच्या सोबतीला आहे काबावत ब्रश! 🌈 आमचे ब्रश तुम्हाला परिपूर्ण फिनिश मिळवून देतात, ज्यामुळे तुमचे प्रत्येक स्ट्रोक सजावटीला एक नवा आयाम देईल. 💫
तुमच्या घराच्या भिंतींसाठी एक सुंदर रंगाची निवड करा आणि काबावत ब्रशच्या मदतीने तुमच्या स्वप्नातील सजावट पूर्ण करा. 😇दर्जेदार आणि विश्वासार्ह ब्रशमुळे तुम्हाला मिळेल एक आकर्षक आणि भव्य फिनिश, जी तुमच्या घराच्या सौंदर्यात आणखी वाढ करेल. 💯
आत्ताच ऑर्डर करा आणि आपल्या घराला द्या खास दिवाळीचा स्पर्श! 🛒
📞 संपर्क: 82096 17061 | 98218 25663 📧 [email protected] 🌐 https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/
#DiwaliDecor#KabawatBrush#SmoothFinish#ProfessionalPainting#DiwaliPainting#CelebrateWithColors#HomeTransformation
0 notes
Text
वंचितांसाठीच्या योगदानाबद्दल सचिन वायकुळे यांचा बार्शी नगरपालिकेकडून सन्मान
बार्शी:- वंचित घटक असलेले तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क मिळवून देणे, तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांचे आरोग्य तसेच शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळवून देणे यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल लेखक सचिन वायकुळे यांचा बार्शी नगरपालिकेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात माजी पालकमंत्री विजकुमार देशमुख, आमदार बबन अवताडे तसेच आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते वायकुळे…
0 notes
Text
0 notes
Text
Hinjawadi : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 74 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ;पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई
एमपीसी न्यूज – बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे (Hinjawadi)आमिष दाखवले. यातून हिंजवडी येथील एका व्यक्तीची 74 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने छत्रपती संभाजीनगर येथील टोळीला बेड्या ठोकल्या. साजिद शहा कासम शहा (वय 30), अभिजित रामराव श्रीरामे (वय 32, दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.…
0 notes
Text
जळकोट तालुक्यातील पीक नुकसानीची मंत्री संजय बनसोडे यांनी केली पाहणी
नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना; शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार लातूर, दि. १८ : जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा…
0 notes
Text
तुम्हाला दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा कोठे मिळतील? | PEC Translation
आजच्या जागतिक संवादाच्या युगात, विविध भाषांमध्ये समजून घेणे आणि संवाद साधणे अत्यंत आवश्यक बनले आहे. यामध्ये विशेषतः स्पॅनिश भाषा अत्यंत महत्त्वाची ठरते. स्पॅनिश सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे, आणि त्यामुळे स्पॅनिश भाषांतर सेवा शोधणाऱया लोकांची संख्या देखील वाढत आहे. जर तुम्हाला दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा शोधायच्या असतील, तर PEC Translation एक उत्कृष्ट विकल्प आहे.
PEC Translation मध्ये आमच्या सेवांचे स्वरूप
PEC Translation ही एक विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित भाषांतर संस्था आहे, जी विविध भाषांमध्ये भाषांतर सेवा प्रदान करते. स्पॅनिश भाषांतरात आम्ही खासकरून खालील सेवांचा समावेश करतो:
तांत्रिक भाषांतर: तांत्रिक दस्तऐवज, वापरकर्ता मार्गदर्शक, सॉफ्टवेअर आणि इत�� तांत्रिक सामग्रीच्या भाषांतराच्या बाबतीत आमच्या तज्ञांकडे गहन ज्ञान आहे.
व्यावसायिक भाषांतर: करार, अहवाल, विपणन साहित्य आणि इतर व्यावसायिक दस्तऐवजांसाठी उच्च दर्जाचे भाषांतर.
वैद्यकीय भाषांतर: वैद्यकीय दस्तऐवज, रोगनिश्चितीचे अहवाल, आणि औषधांची माहिती यांसारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजांचे अचूक भाषांतर.
नैतिक भाषांतर: साहित्य, कविता, कथा आणि इतर सांस्कृतिक साहित्याची भाषांतर.
वेब स्थानांतर: वेबसाइट आणि ऑनलाइन सामग्रीचे स्पॅनिश भाषेत स्थानांतर, जेणेकरून तुमच्या व्यवसायाची जागतिक स्तरावर उपस्थिती मजबूत केली जाऊ शकते.
आमचा अनुभव आणि तज्ञता
PEC Translation मध्ये आमच्याकडे अभियांत्रिकी, वैद्यक, साहित्य, संगीत आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये तज्ञ असलेल्या भाषांतरकांचा एक मोठा संघ आहे. आमचे भाषांतरक स्पॅनिश भाषेमध्ये तरबेज असून, त्यांच्याजवळ स्थानिक संस्कृतीची पूर्ण माहिती असते. हे सुनिश्चित करते की तुमच्या सामग्रीमध्ये ना केवल भाषेसंबंधी योग्यतेचा विचार केला जातो, तर सांस्कृतिक संदर्भही विचारात घेतला जातो.
सेवांचा दर्जा
आमच्या सेवांचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी, PEC Translation कडून आपल्याला उच्चतम स्तराचे भाषांतर प्राप्त होते. प्रत्येक प्रोजेक्टसाठी कस्टम प्रोसेस विकसित करण्यात येते, ज्यामुळे तुमच्या गरजांनुसार भाषांतराची गुणवत्ता उत्तम राहते. आमची गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया युक्ती पद्धतीनुसार चालते, ज्या अंतर्गत प्रत्येक भाषांतरावर पुनरावलोकन केले जाते.
किमती आणि बजेट
PEC Translation कडून स्पॅनिश भाषांतर सेवा घेताना, तुम्ही उच्च गुणवत्ता कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मिळवू शकता. आमच्या किमती प्रतिस्पर्धात्मक आहेत आणि आम्ही सर्व स्तरांवरच्या व्यापारांसाठी अनुकूलित योजना उपलब्ध करतो. प्रोजेक्टची लांबी, विषय, आणि वेळेच्या गरजा यावर आधारित किमतीतील साधे समायोजन केले जातात.
सानुकूलित सेवा
PEC Translation मध्ये, आम्ही प्रत्येक ग्राहकाची वैयक्तिक गरज ओळखतो आणि त्यानुसार सानुकूलित सेवा देतो. तुमच्या प्रोजेक्टच्या खास मागण्या, डेडलाइन, किंवा विशिष्ट शैलीशी संबंधित कोणतेही गोष्टी असल्यास, आमची टीम त्या सर्व गोष्टींचा विचार करून तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय देऊ शकते.
अंतिम विचार
स्पॅनिश भाषेच्या लोकप्रियतेमुळे, दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा मिळवण्यासाठी PEC Translation एक आदर्श विकल्प आहे. आमच्या तज्ञांच्या ज्ञानामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या सर्वोत्तम साधनांमध्ये गुंतवणूक कर��ा येईल. आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या भाषांतर आवश्यकतांसाठी एक पूर्णपणे सानुकूलित अनुभव मिळवा.
तुमच्या आवश्यकतांसाठी दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा हवी असल्यास, PEC Translation तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. आम्ही तुम्हालांच तुम्हाला आवश्यक ते भाषांतर मिळवून देण्यासाठी सज्ज आहोत.
संपर्क साधा
आमच्या सेवांबद्दल अधिक माहितीसाठी किंवा तुमच्या प्रोजेक्टसाठी कोटेशन मिळवण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या किंवा आम्हाला थेट संपर्क करा. आम्ही तुमची सेवा करण्यात आनंदित होऊ.
0 notes
Text
एक मात्र खरं जे आहे ते तसंच आहे.
मी श्री समर्थांना म्हणालो “मला असं वाटतं की, हे व���श्व अपघात��ने निर्माण झालेलं नाही.तसंच हे विश्व अराजकतेमध्ये सहअस्तित्व ठेवून विविध घटकांच्या संयोजनात संधी मिळवून अपघाताने निर्माण झालेलं नाही.” श्री समर्थ मला म्हणाले,“उलटपक्षी,अर्थ आणि उद्देश असलेल्या ह्या संघटित विश्वावर,विश्वास ठेवण्यासाठी,आपल्यामध्ये अशी भावना निर्माण झालेली असते की,सुसंवाद आणि सुव्यवस्थेची पुरेशी सोय असलेलं हे विश्व आहे.मला…
0 notes
Text
सामन्यापूर्वी ३ दात तुटलेले, ३० टाकेही पडले; तरीही या धाकड खेळाडूने संघाला मिळवून दिला विजय
सामन्यापूर्वी ३ दात तुटलेले, ३० टाकेही पडले; तरीही या धाकड खेळाडूने संघाला मिळवून दिला विजय
सामन्यापूर्वी ३ दात तुटलेले, ३० टाकेही पडले; तरीही या धाकड खेळाडूने संघाला मिळवून दिला विजय LPL 2022 – क्रिकेटपटू हे खेळापुढे काहीच जुमानत नाहीत. आपल्या संघाला संधी मिळताच विजय मिळवून देणं हे एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असते. अशाच एका खेळाडूची धाकड खेळी सामन्यात पाहायला मिळाली. LPL 2022 – क्रिकेटपटू हे खेळापुढे काहीच जुमानत नाहीत. आपल्या संघाला संधी मिळताच विजय मिळवून देणं हे एकमेव ध्येय…
View On WordPress
#३#३०#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#खेळाडूने#टाकेही#तरीही#तुटलेले#दात#दिला#धा��ड#पडले#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#मिळवून#या#विजय#विश्व#संघाला#सामन्यापूर्वी#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 October 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशव��णी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद मोदी आज दुपारी वाराणसी इथं सहा हजार एकशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहेत. आर. जे. शंकर नेत्र रुग्णालयाचं ते उद्घाटन करतील आणि दुपारी साडेचार वाजता वाराणसीतील सिगरा क्रीडा संकुल इथं विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहेत. आग्रा, दरभंगा आणि बागडोगरा विमानतळांच्या नवीन नागरी केंद्रांची पायाभरणी पंतप्रधान दूरस्थ पद्धतीनं करणार आहेत.
****
शिक्षण क्षेत्रात झालेल्या बाजारीकरणामुळं शिक्षणाच्या दर्जावर विपरीत परिणाम होत असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. राजस्थान मधल्या सीकर इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षण हे कधीच ���त्पन्नाचं साधन नव्हतं, तर ते त्यागाचं, परोपकाराचं आणि समाज सक्षम घडवण्याचं माध्यम होतं. शिक्षण क्षेत्राचा व्यवसाय होणं, हे राष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनं पोषक नसल्याचं धनखड यावेळी म्हणाले.
****
दिवाळी आणि छट पूजा सणांच्या निमित्तानं होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं एकूण ५७० विशेष रेल्वेंची घोषणा केली आहे. या विशेष गाड्या राज्यातल्या मुंबई, पुणे, नागपूर आदी स्थानकांमधून सुटणार आहेत. उत्तरेकडच्या दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी आदी ठिकाणी जाण्यासाठीही विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे गांड्यांसोबतच मध्य रेल्वेद्वारे लातूर, सावंतवाड़ी रोड, नागपुर, पुणे, कोल्हापुर, नांदेडसह महाराष्ट्रातील अन्य ठिकाणांचा प्रवास करणा-या प्रवाश्यांसाठी १०८ रेल्वे गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे.दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बंगळुरू आणि इतर ठिकाणासाठीही रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचं आरक्षण सुरु झालं आहे.
****
राज्य सरकारतर्फे होत असलेला खर्च आणि एकंदर कारभार आणि राज्याच्या एकूण अर्थव्यवस्थेवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. त्या काल मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. राज्य आर्थिक संकटात असून सरकारनं मोठ्या प्रमाणावर कर्जं घेतली आहेत असं त्या म्हणाल्या.
****
लोकनेता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा गाळप हंगाम २०२१-२२ मधील देय असलेल्या, प्रति टन चार रूपयां पैकीच्या, प्रतिटन तीन रुपयांचा भरणा करण्याचे निर्देश शासनानं दिले आहे. अन्यथा संबंधित साखर कारखान्यांना, यंदाचा हंगाम २०२४-२५ साठीचा ऊसगाळप परवाना देण्यात येणार नाही, असं साखर आयुक्त कुणाल खेमनार यांनी सर्व साखर कारखान्यांना कळवलं आहे. राज्यातल्या ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी आणि सामजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्याकरता ही योजना राबवण्यात येत असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे.
****
बंगळुरू इथं भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पावसामुळे उशिरा सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा न्यूझीलंडनं एक बाद १७ धावा केल्या होत्या. सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडला १०७ धावांची आवश्यकता आहे. भारताचा पहिला डाव ४६ धावांवर संपुष्टात आला होता, दुसऱ्या डावात काल भारतानं ४६२ धावा केल्या.
****
तुळजापूरचे माजी आमदार नरेंद्र बाबुराव बोरगावकर यांचं आज पहाटे पुणे इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांनी लातूर बीड धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे ते काही काळ अध्यक्ष होते. तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथल्या बालाघाट शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी पाच वाजता तुळजापूर येथील मोतीझरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज वीजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. भारत���य हवामान खात्यातर्फे अहिल्यानगर जिल्ह्यात काल प्रमाणे आजही वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा आणि अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आ���ी आहे. जिल्ह्यासाठी ''ऑरेंज अलर्ट'' जारी करण्यात आलेला आहे. नदी अथवा ओढे नाल्यांवरच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये, असं आवाहन अहिल्यानगर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गांजाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. थायलंडच्या बँकॉक इथून आलेल्या प्रवाशानं खेळणी आणि अन्नपदार्थांच्या खोक्यात जवळपास नऊ किलो वजनाचा हा गांजा लपवला होता. याचं मूल्य अंदाजे आठ कोटी रुपये असून या प्रकरणी प्रवाश्याला ताब्यात घेण्यात आलं असल्याचं तसपास यंत्रणेनं म्हटलं आहे.
****
पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून सुमारे ४५ लाख २३ हजार रुपये उकळल्या प्रकरणी बीड इथं सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी २४ लाख रुपये रोख आणि उर्वरित २१ लाख २३ हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून हस्तांतरित करण्यातआलेहोते.
****
0 notes
Text
0 notes
Text
अपहृत मुलगी सुखरूप मिळवून दिली संतरामपालजी महाराजांनी |Pune| Sant Rampal...
youtube
अवश्य ऐका हा इंटरव्यू- अपहृत मुलगी सुखरूप मिळवून दिली संत रामपालजी महाराजांनी - प्रियंका भारत कांबळे |Pune | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Text
अपहृत मुलगी सुखरूप मिळवून दिली संतरामपालजी महाराजांनी |Pune| Sant Rampal...
youtube
0 notes