#वाटलं…आणि
Explore tagged Tumblr posts
Text
हार्दिक पटेल पिछाडीवर का होते? अजित दादा म्हणाले आश्चर्य वाटलं…आणि थेट विश्लेषणचं करून टाकलं…
हार्दिक पटेल पिछाडीवर का होते? अजित दादा म्हणाले आश्चर्य वाटलं…आणि थेट विश्लेषणचं करून टाकलं…
हार्दिक पटेल पिछाडीवर का होते? अजित दादा म्हणाले आश्चर्य वाटलं…आणि थेट विश्लेषणचं करून टाकलं… मुंबई : नुकतेच गुजरात विधानसभेचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देतांना थेट विश्लेषणच करून टाकलं आहे. अजित पवार गुजरात निवडणुकीच्या यशावर बोलत असतांना त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेलचे उदाहरण…
View On WordPress
#अजित#आजच्या प्रमुख घडामोडी#आश्चर्य#करून#का#टाकलं!#थेट#दादा#पटेल#पिछाडीवर#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#म्हणाले#राजकारण#राजकारण लेटेस्ट#वाटलं…आणि#विश्लेषणचं#शासन#सरकार#हार्दिक#होते
0 notes
Text
निसर्गाचा उद्देश.माझ्या वहीतलं एक पान.
घरात खूप उकडा होत होता अर्थात उन्हाळ्याचे ��िवस होते. समुद्र आणि समुद्राचा वारा डोळ्यासमोर येत होता. वाटलं उठावं आणि सरळ समुद्रावर जावं. नाहीतरी मला समुद्राची ओढ कायमची असते. फक्त उकाडा हे आज निमित्त झालं होतं.घरापासून समुद्र फक्त एक मैलांवर असल्याने फारसं चालावं लागत नव्हतं.वाळूत पाय टाकून समुद्राच्या पाण्याजवळ धावत धावत गेलो. पाण्यात पाय घातल्यावर अंगातली सगळी उष्णता पायातून समुद्राच्या पाण्यात…
0 notes
Text
आत्म्याचा आवाज
समाजात किंवा वैयक्तीक आयुष्यात कुटुंबामध्ये, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादा मुद्दा योग्य आहे, खरा आहे हे माहीत असून सुद्धा त्याबाबतीत गप्प बसणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणे हे चूक आहे कारण तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे त्याच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टीला, मुद्द्याला मूक समर्थन देत असता.त्यामुळें चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे फावते आणि काळ सोकावतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुध्दपूर्व काळातले बहुसंख्य जाणते, सुशिक्षित जर्मन लोक ज्यांनी जाणून बुजून हिटलरच्या ज्यू विरोधी धोरणांकडे दुर्लक्ष केलं. जर्मनीमध्ये दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जर्मन��तल्या न्यायाधीशांवर Nuremberg इथे भरण्यात आलेला खटला. Judgement at Nuremberg या अत्यंत सुंदर चित्रपटामध्ये हा खटला आणि त्या अनुषंगाने हे सर्व दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये हे न्यायाधीश अंतिमतः मान्य करतात की, जे घडत आहे ते आम्हाला ठाउक असूनही आम्ही सत्याच्या बाजूने उभं न राहता चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांना मूक समर्थन देत राहिलो. We chose not to look at it. आमचीही यात चूक होती.
आता असं तटस्थ न राहता योग्य, सत्याच्या बाजूने उभं राहण्यात अनेक अडचणी असू शकतात. त्या योग्य गोष्टीला समर्थन देऊन, त्यामागे उभं राहून तुमचं शारीरिक, मान���िक, आर्थिक नुकसान होत असणं शक्य आहे. पण माणूस जेव्हा असा आतला आत्म्याचा आवाज ऐकून कृती करतो, तेव्हा ती केल्यानंतर जे चिरंतन आत्मिक समाधान मिळते, ज्याला आपले अनेक संत, उपनिषदांत - गीतेतले ऋषि सच्चिदानंद म्हणतात तो मात्र ते म्हणतात तसा अवर्णनीय-अनिर्वचनीय असतो. मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगत कर्म करताना छोटी - मोठी सुखं- दुःख येत राहतात पण तो आनंद मात्र कायम असतो. अनेकदा यावर लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आयुष्यात काय करायचं आहे तेच ठाउक नाही त्यावर उपनिषदांत नेति - नेति (हे नाही, हे नाही) चा उपाय सांगितलेला आहे. म्हणजे जे अयोग्य, असत्य आहे ते आपल्या पातळीवर यथाशक्ती त्याला नेति, हे नाहीं म्हणत नाकारणे. म्हणजे अंतिमतः जे श्रेयस आहे ते तुम्हाला सापडते. पण यासाठी समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणें अखंड सावधान, अर्थात जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्ही आत्म्याच्या आवाजावर मनाचा पडदा न ठेवता, तो न दाबता हो म्हणायला हवे आणि त्यावर चालण्याचे धाडस मात्र दाखवायला हवे.
उदा:
१. सोफी स्कोल (Sophie Scholl):
काळ साधारण १९४० चं दशक.जर्मनी मध्ये हिटलर जे काही करत होता ते चुकीचं आहे हे माहीत असणारे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज असणारे अनेक जर्मन लोक होते पण त्यामधले क्वचितच कोणी विरोध करायला पुढे आले. Sophie Scholl नावाची भरपूर वाचन असलेली, कला, संगीत, साहित्य या सगळ्यात गती असलेली जर्मन मुलगी. तिने वयाच्या २०-२१ व्या वर्षी हिटलरच्या अमानवी- ज्यू विरोधी धोरणाविरुद्ध ती चुकीची, असत्य व अन्यायकारक आहेत म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवला.तिच्या समवयस्क भावंडांसोबत १९४२ मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये leaflets वाटली होती , त्याबद्दल तिला gillotin वर चढविण्यात आलं. तिचं म्हणणं होतं की असं भ्याडपणें जगण्यापेक्षा जर माझे मरण हे जर इतरांसाठी प्रेरणा बनणार असेल तर ह्या आयुष्याचे मूल्य ते किती?
२. व्हिन्सेंट व्हॅन गॉग (Vincent van Gogh):
व्हिन्सेंट व्हॅन गॉग या प्रसिद्ध चित्रकाराला आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचंय हे जवळपास वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत समजत नव्हतं. पण म्हणून उच्च - मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या या व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी चारचौघं जो धोपट मार्ग निवडतात तो न निवडता वेळोवेळी त्याच्या मनाचा कौल, आतला आवाज ऐकण्याचा प्रामाणिकपणा आणि धाडस दाखवलं. चांगलं वाचन असणाऱ्या या मनुष्याला आयुष्यात एका टप्प्यावर साधारण विसाव्या वर्षी प्रामाणिकपणे असं वाटलं की आपण ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा त्याने मनापासून २-३ वर्षे गरीब खाण-कामगारांमध्ये राहून ते काम केलं. तिथे त्याला असं वाटलं की या माणसांना जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे तिथे त्यांच्या खऱ्या व्यथा न समजून घेता धर्मप्रसार करणे हे खरं म्हणजे ख्रिस्ताच्या शिकवणीच्या विरुद्ध काम आहे. म्हणून तो सर्व सुखसोयी सोडून बाह्या सरसावून खाणकाम शिकून त्यांच्यात सामील झाला.
साधारण २५-२६ व्या वर्षी त्याला स्वतःमध्ये असलेला चित्रकार सापडला. तेव्हा तिथून पुढे वयाच्या ३५ व्या वर्षी कोणत्याही पैसा - प्रसिद्धीचा सोस न धरता त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने कित्येक चित्रे काढली ज्यामधील एकही चित्र तो हयात असेपर्यंत विकलं गेलं नाही (काहीसं श्रीकृष्णाने भगवद्��ीतेमध्ये सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाप्रमाणे - योग्य काम करत असाल तर फळाची चिंता राहात नाही). आज मात्र त्याच्या एका चित्राची किंमत किमान काही कोटी डॉलर्स मध्ये जाते.
आता एखाद्याला या दोन्हींचा काय संबंध असं वाटणं शक्य आहे.पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस तिच व्यक्ती करू शकते जिच्याकडे अंतर्मनाचा आवाज ऐकून त्यानुसार काम करण्याचं साहस, त्यावर अंमल करण्याची हिम्मत आहे. म्हणून ही दोन उदाहरणं एकमेकांशी सलग्न आहेत. काम कोणतंही असो, तुम्ही ते समाजहितासाठी करत आहात किंवा तुमच्या स्वतःसाठी. आत्म्याचा आवाज ऐकून जर ते केलं जात असेल तर ते स्वहिताचं असेल तरी त्यातून नकळत इतरांच, समाजाचं हित साधलं जातं. आणि तुम्ही ते समाजहितासाठी करत असाल तरी त्यातून अप्रत्यक्षरीत्या स्वहित साधलं जातं. मात्र तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे.
अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील.
आता यावर अनेकांचं असं म्हणणं असू शकेल की आम्हाला नाही बनायचं असं महान/असामान्य वगैरे. आम्हाला नाही करायचं सत्याधिष्ठीत काम .नाही ऐकायचा आतला आत्म्याचा आवाज. आम्हाला असं छोटं आणि सामान्यच आयुष्य जगायचं आहे. आम्हाला केवळ आमच्या शरीराला आणि मनाला क्षणिक सुख देणाऱ्या आमच्या वासना, कामना , इच्छा पूर्ण करायच्या आहेत. पण या सर्व वासना-कामना पूर्ण झाल्यावर पण माणसाला एक आंतरिक शून्यता, पोकळी जाणवत राहते जी एवढया सगळया वासनांच्या मागे धावाधाव करून देखील भरून येत नाही/ येऊ शकत नाही.आणि माणूस गरजेपेक्षा जास्त अधिकाधिक संचय करायला बघतो आणि अधिकाधिक असमाधानी, असंतुष्ट बनतो. माणसाचा मूळ आंतरिक स्वभावच अनंत आकाशाला गवसणी घालण्याचा आहे, स्वातंत्र्यात, मुक्ततेमध्ये जगण्याचा आहे. अनेक जण या मूळ आंतरिक स्वभावाकडे, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पैसा - प्रतिष्ठा - स्पर्धा यांच्या मागे लागून ही अंतर्गत बेचैनी भरण्याचा प्रयत्न करतात पण तरीही चिरंतन शांतता, समाधान काही मिळत नाही.
कारण असं करताना आपण एकप्रकारे स्वतःशी खोटं बोलत असतो आणि आपलं स्वतःचं मोठं नुकसान करून घेत असतो. याची छोटीशी परीक्षा अशी की, तुम्ही कोणतीही गोष्ट, कृती का करत आहात असं स्वतःला विचारा. आणि येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर जर असं का? विचारत राहीलात तर तुम्हाला असं आढळेल की ३-४ वेळा विचारल्यावर मिळालेल्या उत्तरांनंतर, समाधानासाठी - आनंदासाठी असं उत्तर मिळेल. पण ती कृती जर आतला आवाज ऐकून करत नसाल तर मात्र तुम्हाला मिळणारा तो आ��ंद ,ते समाधान क्षणिक असतं.��ोणतीही कृती करताना आपल्याला आपला मूळ स्वभाव, आत्म्याचा आवाज क्षीण का होईना ऐकू येत असतो, मग ते काम म्हणजे आपण मूक राहून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्याचं का असेना, तो सांगत असतो की मी हे जे करतोय ते चूक आहे. तो आपल्याला सांगत असतो योग्य काय आहे, सत्य काय आहे ते. आपल्याला सगळं कळत असतं पण वळत मात्र नसतं. थोडं धाडस दाखवण्याची आवश्यकता असते त्याचं ऐकून त्या आवाजानुसार चालण्यासाठी, त्यानुसार काम करण्यासाठी..
अष्टावक्र गीतेवर बोलताना ओशो म्हणतात तसं "घटना अभी घट सकती है। आत्मा से मन और वासनाओं का पर्दा अभी हट सकता है बस तुम्हारे हां भरने की देरी है।"
~ चैतन्य
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या एक लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी
धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
शिवसेना आमदार अपात्रता निकालाला दोन्ही गटांकडून न्यायालयात आव्हान
१६ व्या आविष्कार आंतर विद्यापीठ महोत्सवात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद
आणि
मानवी लोभ आणि वसाहतवादी प्रवृत्तीकडून निसर्गाचं शोषण-विवेकानंद व्याख्यानमालेत डॉ वंदना शिवा यांचं प्रतिपादन
****
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीणच्या एक लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला. या योजनेसाठी २४ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी यावेळी, पीएम-जनमन अभियानाच्या लाभार्थ्यांशी संवादही साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी इथल्या भारती रण आणि भाऊसाहेब रण या बहीण भावांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. त्यांनी या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी -सुविधांविषयी चर्चा केली, या दोघांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेछा देऊन शासनाकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. या संवादानंतर भारती हिने आकाशवाणीशी बोलताना आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या..
‘‘मी आज माननीय प्रधानमंत्री यांच्यासोबत संवाद साधला. आणि मला खूप चांगलं वाटलं, पीएम-जनमन योजनेमध्ये आम्हाला घरकुल मिळालेलं आहे. कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आयुष्यमान भारत कार्ड मिळालेलं आहे. गॅस कनेक्टिव्हिटी ��िळालेली आहे. लाईटपण मिळालेली आहे. शुद्ध पाणी पिण्याचा नळ पण मिळालेला आहे. याच्यासाठी आम्ही धन्यवाद सांगते. धन्यवाद.’’
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या कोलाम आदिवासी जमातीच्या जवळपास पंधराशे नागरिकांचं वास्तव्य आहे. या नागरिकांना काल झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. किनवट आणि माहूर तालुक्यातल्या कोलाम जमातीच्या आठवी ते दहावी या वर्गात शिकणाऱ्या पात्र सर्व ३५ मुलींना प्रत्येकी ७० हजार रुपये मुदत ठेवीचे धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी खुबा यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात नरेशवाडी इथल्या गिरीवनवासी प्रगती मंडळाच्या सभागृहात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जनमन कार्यक्रम घेण्यात आला.
****
राज्यातल्या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवण्याची आणि यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहिम राबवावी, मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात यावी, आठवडाभरात हा बदल दिसायला हवा, आणि या कामावर राज्यस्तरावर लक्ष ठेवण्यासाठी सुकाणू अधिकारी नेमण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं शहरातल्या मध्यवर्ती समर्थ राम मंदिरासह अनेक मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
****
जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमधे दावोस इथं रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी मुंबई विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना, या दौऱ्यातून महाराष्ट्राचं ब्रॅण्डिंग, गुंतवणुकीच्या संधी, विविध उद्योगांबरोबर होणारे सामंजस्य करार आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी आदींची माहिती दिली.
****
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या गटाने मुंबई उच्च न्यायालयात, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या १४ आमदारांना अपात्र ठरवलं नाही, या निर्णयाला भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत, या आमदारांच्या निलंबनाची मागणी केली. तर, एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा मूळ शिवसेना राजकीय पक्ष ठरवण्याच्या, आणि शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची पात्रता कायम ठेवण्याच्या ��ार्वेकर यांच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
****
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह मान्यवरांनी अत्रे यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
****
प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्या पार्थिव देहावर काल उत्तरप्रदेशात लखनौ इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. राणा यांचं कर्करोगानं निधन झालं, ते ७१ वर्षांचे होते.
****
राज्यात काल कोरोना मुळे तीन जणांचा मृत्यू झाला. राज्यात काल कोविड-१९ च्या ३५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ६० रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात कोरोनाच्या जे एन वन या नव्या प्रकारानं बाधित झालेल्या रुग्णांची संख्या २५० झाली आहे.
****
राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सन २०२३ या वर्षासाठी नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कारांची घोषणाही काल करण्यात आली. सन २०२१ या वर्षासाठीचा पुरस्कार हिराबाई कांबळे यांना, तर २०२२ चा पुरस्कार अशोक पेठकर यांना जाहीर झाला आहे.
****
नाशिक इथं झालेल्या २७ व्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सवात’ केंद्र सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा विभागामार्फत देशसेवा तसंच समाजसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवकांना आणि स्वयंसेवी संस्थांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय युवा पुरस्काराने’ काल सन्मानित करण्यात आलं. यामध्ये लातूर इथली विधी पलसापुरे आणि अकोल्याच्या वैष्णवी गोतमारे यांचा समावेश आहे.
कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन काल राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रीय युवक महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
****
१६ व्या आविष्कार आंतर विद्यापीठ महोत्सवात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघानं शुद्ध विज्ञान शाखेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं आहे. नाशिक इथल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात या महोत्सवाचा काल समारोप झाला. यावेळी विद्यापीठाच्या संघाला फिरता चषक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. जालना इथल्या जेईएस महाविद्यालयाचा विद्यार्थी श्रीनिवास साईंदर या विद्यार्थ्याने सादर केलेला प्रयोग सर्वोत्तम ठरला, विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांच्याहस्ते त्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं.
****
मानवी लोभ आणि वसाहतवादी प्रवृत्ती यांनी निसर्गाचं शोषण केल्याचं प्रतिपादन पर्यावरण��ादी लेखिका डॉ वंदना शिवा यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथल्या विवेकानंद महाविद्यालयात विवेकानंद व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प डॉ शिवा यांनी गुंफलं, ‘स्वये असू धरा: पर्यावरणीय आणि मानवी समस्यांचा गुंता खरा, या विषयावर त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भाष्य केलं’. या व्याख्यानमालेत आज प्राचार्य डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचं ‘वर्तमानातील महात्मा गांधी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान काल पालघर इथं मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत विविध नागरिकांनी त्यांना मिळालेल्या लाभाबाबत माहिती दिली. चंद्रकला बरफ आणि बबन बरफ यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं..
या यात्रेचं काल जालना शहरात मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी स्वागत केलं. यानिमित्त शहरातल्या वाल्मिकनगर आणि विसावा शाळा इथं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी नंगरपंचायत कार्यालयातही यानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
****
नव्या फौजदारी कायदातल्या हिट अँड रन संदर्भातल्या तरतुदींविरोधात बीड शहरात सर्व चालक मालक संघटनेच्या वतीनं काल एल्गार मोर्चा काढण्यात आला.
****
0 notes
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आव���ज यायला लागले.
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली.
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले.
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती.
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत.
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
1 note
·
View note
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
View On WordPress
0 notes
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
View On WordPress
0 notes
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
View On WordPress
0 notes
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
View On WordPress
0 notes
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
View On WordPress
0 notes
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
View On WordPress
0 notes
Text
लोकं पूर्वकल्पीत धारणा ���ेवून एकमेकांशी का वागतात?
“मागच्या वेळी तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा कधी पाहिलं होतं,त्याला भेटला होता आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला जे वाटलं होतं तेच होतं का? कदाचित कधीच नसावं.विचार करा,एका दिवसात तुम्हाला किती वेळा “अरे,तो अबोल आहे”किंवा “ती इतकी छान नाही”किंवा “ते तिथे का असतील?”असे प्रश्न मनात उद्भवलेअसतील.आजकाल, लोक नेहमी असं गृहीत धरतात की त्यांना इतरांबद्दल सर्व गोष्टी माहित आहेत.परंतु खरोखर, इतरांबद्दल,…
View On WordPress
0 notes
Text
धूम मेट 6.0
तितक्यात तो पाठीमागे असलेल् जाणवला. तिने मागे वळून पाहिले… त्याला हे अनपेक्षित होतं की ती एकदम मागे बघेल आणि दोघांत हर्डली चार इंचाच अंतर होत. ती त्याच्या डोळ्यांत हरवली आणि तो तिच्या… इतकं जवळ पहिल्यांदाच कुणीतरी मुलगी त्याने बघितली होती.समोर चे दोघे व्यक्ती त्यांच्याकडे पाहू लागले. हे त्याला जाणवलं. सुरजने लगेच घसा खाकरला. त्याला ओकवर्ड वाटलं तस पण ती मात्र जागी झाली.” सॉ…..” ती लगेच मागे वळून…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या एक लाख लाभार्थ्यांना लाभाचा पहिला हप्ता जारी.
धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिव देहावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
आणि
१६ व्या आविष्कार आंतर विद्यापीठ महोत्सवात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद.
****
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीणच्या एक लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला. या योजनेसाठी २४ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी यावेळी, पीएम-जनमन अभियानाच्या लाभार्थ्यांशी संवादही साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी इथल्या भारती रण आणि भाऊसाहेब रण या बहीण भावांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. पंतप्रधानांनी या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी -सुविधांविषयी चर्चा केली, या दोघांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेछा देऊन शासनाकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. या संवादानंतर भारती हिने आकाशवाणीशी बोलताना आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या..
मी आज माननीय प्रधानमंत्री यांच्यासोबत संवाद साधला. आणि मला खूप चांगलं वाटलं, पीएम-जनमन योजनेमध्ये आम्हाला घरकुल मिळालेलं आहे. कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आयुष्यमान भारत कार्ड मिळालेलं आहे. गॅस कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे. लाईटपण मिळालेली आहे. शुद्ध पाणी पिण्याचा नळ पण मिळालेला आहे. याच्यासाठी आम्ही धन्यवाद सांगते. धन्यवाद.
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या कोलाम आदिवासी जमातीच्या जवळपास पंधराशे नागरिकांचं वास्तव्य आहे. या नागरिकांना आज झालेल्या कार्यक्रमात केंद्र शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात नरेशवाडी इथल्या गिरीवनवासी प्रगती मंडळाच्या सभागृहात जनमन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. गरीब कल्याणाचा अजेंडा हे सरकार राबवत असल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवण्याची आणि यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज मुंबईत यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यात तातडीने संबंधित जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून धार्मिक स्थळांची स्वच्छता मोहिम राबवावी. मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबवून विद्युत रोषणाई करण्यात यावी. धार्मिक स्थळांवर कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेष योजना तयार ���रण्याच्या आणि या योजनेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या योजनेसाठी महसूल विभागाच्या माध्यमातून सुकाणू अधिकारी नेमून राज्यस्तरावरुन लक्ष ठेवण्यात यावं, तसंच आठवडाभरात हा बदल दिसायला हवा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. महिला सशक्तीकरणासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत आढावा घेतला. रत्नागिरी जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ‘बचत गट मॉल’ ची संकल्पना इतर जिल्ह्यातही राबवण्याची सूचना त्यांनी केली.
****
स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आपल्या शिष्टमंडळासमवेत उपस्थित राहणार आहेत. “नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वत विकास या विषयावर ते या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेत प्रथमच तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.
****
मुंबईतल्या न्हावा-शेवा बंदरावर दहा कोटी रुपयांच्या पर��ेशी सिगारेट घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी जप्त केला. कंटेनरमध्ये संयुक्त अरब अमिराती बंदरातून आयात करण्यात आलेल्या चिनी धाग्याचे गालिचे असल्याचं खोटं सांगत हा माल नेला जात असताना महसूल गुप्तचर विभागानं ही कारवाई केली.
****
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह मान्यवरांनी अत्रे यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. अत्रे यांचे शिष्यगण, कलावंत आणि रसिक चाहते यावेळी उपस्थित होते.
****
मकरसंक्रांतीचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. सूर्याच्या मकर संक्रमणाचा हा दिवस परस्परांना तिळगूळ देऊन साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तरायणातला सूर्य आपणा सर्वांच्या स्वप्नांना एक नवी ऊर्जा देवो अशी प्रार्थना त्यांनी ट्विट संदेशात केली आहे.
संक्रांतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी पतंगबाजीचे सामने सुरू आहेत. राज्य सरकारनं यापूर्वीच धोकादायक मांजावर बंदी घातलेली आहे.
****
दरम्यान, नाशिकमधल्या पाथर्डी फाटा इथं पतंगाचा मांजा काढताना विजेचा धक्का लागून एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर सिन्नर तालुक्यात मांजामुळे एका दुचाकीस्वाराचा गळा चिरला गेला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
****
१६ व्या आविष्कार आंतर विद्यापीठ महोत्सवात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं आहे. नाशिक इथल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात १२ ते १५ जानेवारीदरम्यान झालेल्या या महोत्सवात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने शुद्ध विज्ञान शाखेत हे अजिंक्यपद पटकावलं, विद्यापीठाच्या संघाला फिरता चषक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. जालना इथल्या जेईएस महाविद्यालयाचा विद्यार्थी श्रीनिवास साईंदर या विद्यार्थ्याने सादर केलेला प्रयोग सर्वोत्तम ठरला, विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांच्याहस्ते त्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात येत्या २४ तारखेपर्यंत ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत, मोबाईल व्हॅनमधून फिरत्या लोकअदालतीचं आयोजन, करण्यात आलं आहे. ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर यांनी केलं आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आज पालघर इथं मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत विविध नागरिकांनी त्यांना मिळालेल्या लाभाबाबत माहिती दिली. चंद्रकला बरफ आणि बबन बरफ यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं..
बाईट – चंद्रकला बरफ, बबन बरफ, पालघर.
****
या यात्रेचं आज जालना शहरात आगमन झालं. मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी संकल्प रथाचं स्वागत केलं. यानिमित्त शहरातल्या वाल्मिकनगर आणि विसावा शाळा इथं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी नंगरपंचायत कार्यालयातही यानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
****
कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन, आज राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. धुळ्यात क्रीडा दिनानिमित्त आज शालेय खेळाडू आणि क्रीडा संघटना यांनी एकत्रितपणे प्रतिज्ञा घेतली. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, आज पैलवान खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त, त्यांच्या स्म���तींना अभिवादन करण्यात आलं. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी खाशाबा जाधव क्रीडा संकुलात जाधव यांच्या पुतळ्यास आणि प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यानिमित्ताने विद्यापीठात ‘फिट इंडिया विक’चं उद्घाटनही करण्यात आलं. या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार, पुश-अप्स, फुटबॉल, एरोबिक्स, धावण्याची शर्यत, गोळा फेक, अशा खेळांचं आयोजन करण्यात येणार आहे.
****
नव्या फौजदारी कायदातल्या हिट अँड रन संदर्भातल्या तरतुदींविरोधात बीड शहरात सर्व चालक मालक संघटनेच्या वतीने आज एल्गार मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगर इथंही मालवाहू रिक्षा चालक मालक सेनेच्या वतीने बंद पाळून आंदोलन करण्यात आलं. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष सलीम पटेल वाहेगावकर यांच्यावतीनं विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात परळी इथं बेकायदेशीर रित्या जमाव करुन दुकानांवर दगडफेक केल्या प्रकरणी तीस जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
वैचारिक पातळीवर भिकारी आहे आपला देश,वाईट वाटलं तरी हे सत्य आहे.
देव,धर्माच्या अंधारात खितपत पडून राहण्यात धन्यता मानतात इथली लोकं.
कोरोनाने जग हादरवून सोडले,कधी नव्हे ती संकटं ओढवलीत पण तरी लोकांनी सरकरकडे आरोग्य सुविधांपेक्षा मंदिराची जास्त मागणी केली.
देवासमोर सपशेल झोपून नमस्कार करणारा प्रधानमंत्री स्वतःची शैक्षणिक डिग्री लपवतो तरी लोकांना तो भावतो.त्या देशातील लोकांची वैचारिक क्षमता वेगळी सांगायला नको.
आज कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. आता यातील सत्य आणि असत्य हा संशोधनाचा विषय होईल.पण या लॉकडाऊन च्या खेळात हातावरचं पोट असणारे कुटुंब उध्वस्त होतात,हा अनुभव सर्वांनी घेतलाय.
देशाला मंदिराची नाही तर सुसज्ज इस्पितळांची गरज आहे.जिथं सामन्यातील सामान्य माणूस आपला हमखास विलाज करून पूर्ण बरा होईल.
पण साला हे कळणार तो हिंदुस्थानी कसला ?
देशभरातून वर्गणी गोळा करून अयोध्येला भव्य मंदिर बांधतील, आणि स्वतःच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर तडफडून मरतील.पण फरक कळून घेणार नाहीत.
0 notes
Text
विमानतळावर साडी नेसून पोहचली अभिनेत्री; जोरात हवा आली अन्… Video
विमानतळावर साडी नेसून पोहचली अभिनेत्री; जोरात हवा आली अन्… Video
विमानतळावर साडी नेसून पोहचली अभिनेत्री; जोरात हवा आली अन्… Video मुंबई – आपल्या कपड्यांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात असलेली अभिनेत्री उर्फी जावेद बऱ्याच दिवसांनी चांगल्या पोशाखात मीडिया समोर आली होती. तेव्हा सर्वांना वाटले आता उर्फी फक्त फोटोसाठी पोज देऊन निघून जाईल. कारण तिने परिधान केलेली साडी चर्चेत राहण्यासारखी नव्हती. परंतु हवेची झुळूक आली आणि उर्फीचा पदर सरकला. उर्फीला याचं वाईट तर वाटलं नाही…
View On WordPress
0 notes