#लागेल”
Explore tagged Tumblr posts
Text
१८.०१.२०२५ मी कामावर आहे. आठवड्याचा शेवटचा दिवस उद्या रविवार. पण आजचा रविवार सर्वात जवळचा आणि वास्तववादी वाटतो. मी माझे व्हिजन बोर्ड आणि माझी दिनचर्या आणि दृष्टीकोन सुधारण्यासाठी एक प्रणाली तयार करण्यात व्यस्त आहे परंतु माझ्या मनाला उच्च जाणीवेमध्ये आणण्यासाठी देखील मी व्यस्त आहे. यानंतरच मी कामाच्या तासांचा एक मोठा पल्ला गाठू शकतो. माझ्या व्हिजन बोर्डवर पुढे न जाता मी काम करण्यास नकार दिला. मला हे त्वरीत पूर्ण करावे लागेल. i'm at work. Last day of the week tomorrow's sunday. But today feels closest and realistic to it being a sunday. im busy creating my vision board and a system to better my routine and outlook but also get my mind into a higher state of consciousness. only after this i can get on a long streak of working hours. cant get my self to focus without sorting out my vision board, without this i refuse to work. I got to get this done quickly. cause theres cascading consequences.
27 notes
·
View notes
Text
84 लक्ष योनींमधून मुक्त होण्यासाठी कोणती भक्ती करावी लागेल पहा उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
3 notes
·
View notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 05 January 2025 Time: 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
दिल्लीसाठी आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे. आज पहिल्यांदाच नमो भारत ट्रेन राजधानीत प्रवेश करणार आहे. त्याठिकाणी दिल्ली मेट्रोसह इतर विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक संपर्क माध्यमावर दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी गाजियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीतील न्यू अशोकनगर रेल्वेस्थानकादरम्यान नमो भारत रेल्वेनं प्रवास केला. या प्रवासात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी एका विद्यार्थिनीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर कविता सादर केली.
छत्तीसगढमध्ये आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत. या गोळीबारामध्ये सुरक्षादलाचा एक जवानही हुतात्मा झाला. सुरक्षा दलांनी मारलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनास्थळावरून शस्त्रांस्त्रासह दारूगोळा मोठ्या प्रमाणात जप्त ���रण्यात आला आहे. अद्याप गोळीबार आणि शोध मोहिम सुरूच असल्याचं याविषयीच्या वृत्तात म्हटलं आहे.
सर्व मातृभाषांचं जतन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं केंद्रिय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे. आज हैदराबाद इथं जागतिक तेलुगू कॉन्फेडरेशनच्या परिषदेत रेड्डी बोलत होते. तेलगू भाषेचं संगणकीकरण करण्याची गरज असल्याचं मतही रेड्डी यांनी व्यक्त केलं.
चीन इथं पसरलेल्या एचएमपी विषाणूच्या प्रसा��ावर केंद्र सरकारच्या सर्व माध्यमांद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. केंद्र सरकारने गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये वाढणाऱ्या श्वसनाच्या आजाराबद्दल वेळेवर माहिती देण्याची विनंती, जागतिक आरोग्य संघटनेला केली आहे. एचएमपी हा विषाणू भारतासह जगभरात पसरत आहे, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त देखरेख गटाला आढळून आलं असून, ICMR आणि IDSP च्या सहाय्यानं इन्फ्लूएंझा सारख्या आजारासाठी आणि तीव्र श्वसनाच्या आजारासाठी भारतात आधीच मजबूत पाळत ठेवणारी यंत्रणा आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. राज्यात मागील तीन विधानसभा निवडणुकांमध्ये १०० पेक्षा अधिक जागा जिंकणारा पक्ष हा भाजपच आहे. त्यामुळं राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याचे उद्दीष्ठ ठरवलं आहे. ते पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनीधींसह पदाधिकाऱ्यांना मेहनत घ्यावी लागेल, असं प्रतिपादन भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नागपूर इंथ भाजपच्या राज्यातील सदस्य नोंदणी उद्घाटन समारंभात बोलत होते.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यृ प्रकरणी पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह इतर नागरिक सहभागी झाले आहेत.
परभणी इथंल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निषेध करते, तसच या प्रकरणाची चौकशी विशेष पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी अशी, मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधे जर महायुतीनं योग्य स्थान दिलं नाही तर स्वबळावर लढू, असं देखील आठवले यांनी स्पष्ट केलं.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेनिमित्त कचरामुक्त यात्रा ही मोहीम राबवण्यात येत असून, यात्रेतील स्वच्छता आणि कचरामुक्तीच्या उद्देशानं ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन विशेष मोहीम हाती घेतली आहे. दररोज सकाळी ५ वाजता आणि रात्री ११ वाजेदरम्यान यात्रेतील गर्दी कमी झाल्यानंतर स्वच्छता कर्मचारी प्लास्टिकसह इतर कचरा उचलत आहेत. दरम्यान, यंदा��ी यात्रेकरुंना फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मराठवाडा साहित्य परिषद आर्थात मसापच्यावतीनं मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचा आज सायंकाळी पाच वाजता छत्रपती संभाजीनगरातील ना.गो. नांदापूरकर सभागृहात मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. डॉ. रसाळ यांच्या 'विंदांचे गद्यरूप' या समीक्षाग्रंथास नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. या निमित्तानं हा सन्मान केला जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यीक डॉ. चंद्रकांत पाटील हे डॉ. रसाळ यांच्या साहित्यिक कारकिर्दीवर भाष्य करणार आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं संक्रांतीच्या सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात भजेपार इथं आज राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते 'भजेपार कबड्डी चषक २०२५' चा उद्घाटन सोहळा पार पडला. या तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रसह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत.
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४८
मोबाईलवर आलेला काॅल मनोरमाचा आहे हे बघितल्यावर तो घेत शुभदाने चेष्टेच्या सूरांत विचारलं, "भर दुपारी जरा विश्रांती घ्यायचं सोडून फोन कसले करतेस ग?" "तुझ्या विश्रांतीमधे खोडा घातला असेल तर माफ कर;-- पण तुला वेळ असेल तर भेंटायचं होतं म्हणून विचारायला फोन केला होता! पण माझ्यासोबत आणखीही कुणीतरी असेल!" "मी मोकळीच आहे;-- त्यामुळे केव्हांही भेटूं शकतो! पण अशी कोड्यांत बोलूं नको! तुझ्यासोबत कोण येणार आहे ते सरळ सांगून टाक!" "सुहासिनी!" आश्चर्याच्या धक्क्यातून स्वत:ला सांवरीत शुभदा म्हणाली, " खरं सांगतेस? पण डाॅक्टरांनी मॅडमना बाहेर पडायची परवानगी कशी काय दिली?" "डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच सुहासिनीला घडल्या प्रकारातून लौकरांत लौकर बाहेर काढायचे प्रयत्न चालले आहेत! म्हणून तुला मुद्दाम सांगायला फोन केला की तिच्याशी गप्पा मारतांना गेल्या शुक्रवारी जे घडलं त्याचा विषयही काढायचा नाहीं! जणूं कांही घडलंच नाहीं अशा प्रकारे वागायचं-बोलायचं! अशक्तपणामुळे ती घेरी येऊन पडली आणि तिला लागलं असं तिच्या मनावर ठसवायचे हे प्रयत्न आहेत!" मनोरमाच्या विस्तृत खुलाशाने समाधान न होऊन शुभदाने शंका विचारली, "पण आपण कितीही सांगीतलं तरी मॅडमना हे पटेल कां? आणि त्यांनी लिहून ठेवलेली ती चिठ्ठी?" "ती चिठ्ठी भाऊसाहेबांनी फाडून नाहींशी केली आहे! सुहासिनीने चिठ्ठीचा विषय काढला तर 'पॅरॅलिसिसचा झटका येतां येतां आपण मुश्किलीने वाचलो' याच्या घबराटीतून जवळजवळ ३ महिने अंथरूण धरल्याने तुला नाहीं ते भास होत आहेत' असं सांगायचं ठरलं आहे! तिच्या वांट्याला आलेल्या सक्तीच्या एकटेपणावर उपाय म्हणून तिला चार माणसांत घेऊन जायला ��ुरुवात केली आहे! काल संध्याकाळी सारसबागेत गणपतीचे दर्शन घेऊन, तिथेच थोडा वेळ बसून आम्ही चौघेजण मग जरा चेंज म्हणून बाहेर हाॅटेलमधे जेवायला गेलो होतो!" "तुमचे हे प्रयत्न यशस्वी ठरावेत असंच मलाही वाटतं!" शुभदा म्हणाली, "बरं, तुम्ही येणार आहांत तर कांही खायला करून ठेवूं कां?" 'अजिबात नाही! आम्ही अचानक आलो असं भासवायचं आहे ना! तुझ्या��डे जायचं आहे हे अजून सुहासिनीलाही सांगितलेलं नाहीं! आम्ही आल्यावर बघूं;--- गप्पांच्या ओघांत तिलाच विचारून काय जमेल ते कर!" "किती वेळांत याल?" "आपला हा काॅल संपला की मी लगेच सुहासिनीकडे जाणार आहे! त्यामुळे तिच्याकडून तुझ्या घरी येईपर्यंत एकुण तासभर तरी लागेल!"
अनंत घरी परत आला तेव्हां संध्याकाळी ७ वाजूून गेले होते. तो फ्रेश होऊन कीचनमधे येऊन बसला तशी त्याच्या पुढे गरमागरम चहाचा कप ठेवीत शुभदा म्हणाली, "बाहेर कांही खाऊन आला असाल तर किती भूक आहे ते सांगा. मी त्याप्रमाणे जेवणाची तयारी करीन." "असा कसा मी बाहेर कांही खाऊन येईन?" अनंत डोळे मिचकावीत म्हणाला, "सप्रेमॅडमसाठी तूं खास कांहीतरी बनवलं असशील त्याला मग उचित न्याय कोण देणार? मला तर आता सणसणून भूक लागली आहे!" "म्हणजे त्या येणार आहेत हे तुम्हांला ठाऊक होतं?" चकीत होऊन शुभदाने विचारलं, "मग मला कां सांगीतलं नाहीं?" "नाहीं,नाहीं! जेवण झाल्यावर मी मनोहरपंतांबरोबर 'स्वयंसिद्ध'च्या कामासाठी बाहेर पडलो, तेव्हां मला कांहीच कल्पना नव्हती. पण वाटेमधे त्यांनी आज मनोरमावहिनी आपल्या घरीं सप्रेमॅडमना कशासाठी घेऊन येणार आहेत ते मला सविस्तर सांगीतलं! कित्येक महिन्यांनी तुम्ही भेटला असाल ना? आतां कशी आहे त्यांची तब्येत?" "जयू परत गेल्यावर मध्यंतरी २ वेळां कांंही कारणा-निमित्ताने आमची ओझरती भेट झाली होती;-- पण मोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी हवा तो वेळ मात्र आजच मिळाला! मोठ्या शर्थीने परतवून लावलेल्या, आकस्मिक पॅरॅलिसिसच्या झटक्याच्या चालण्या-बोलण्यांत आढळणाऱ्या पुसट खुणा वगळतां त्यांची तब्येत चांगली वाटली! मुख्य म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न झालाच नाहीं असं चित्र उभं करण्याचे सर्वांचे आटोकाट प्रयत्न यशस्वी होताहेत असं खात्रीने जाणवलं!" "ते कसं काय?" "अहो, मॅडम नेहमींच्या मोकळेपणाने सर्व चालूं घडामोडींबद्दल खेळीमेळीने भाष्य करीत होत्या! जयूने मागच्या भेटीनंतर त्यांच्याशी संपर्क ठेवला असल्याचंही त्यांच्या बोलण्यात आलं! पण अलीकडे दीर्घ आ��ारपणामुळे त्यांनाच उत्तरादाखल मेल पाठवतां आली नाही म्हणाल्या! त्यामुळे तिच्या सध्यांच्या हालहवालीची त्यांनी खुप आपुलकीने चौकशी केली! त्या अजूनही जयूचा उल्लेख प्रेमाने 'बबली' असाच करतात बरं कां!" "अरे वा! कांही म्हण, पण आपल्या जयूवर खरंच जीव आहे त्यांचा!" कौतुकाने मान डोलावीत अनंत म्हणाला, "जयूला त्यांच्या अलीकडच्या आजारपणाबद्दल माहीत नसणार! आतां तिचा फोन येईल तेव्हां तिला थोडक्यांत कल्पना दे, म्हणजे ती संपर्क साधेल! जमलं तर सरप्राईज म्हणून मॅडमना व्हिडिओ काॅल कर असं सांगायला हवं जयूला" "खरंच, 'बबलीचा काॅल आला!' म्हणून किती हरखून जातील मॅडम!" मनोमन कल्पनाचित्र रंगवीत शुभदा उत्साहाने म्हणाली, "नक्की सुचवूंया आपण जयूला मॅडमना व्हिडिओ काॅल करण्याबद्दल! पण मला आतां सांगताहांत, त्याची आठवण करून द्यायचं तुम्हीही लक्षांत ठेवा! नाहींतर जयूचा फोन आला की बाकी सगळं बोलतांना, तिला 'मॅडमना व्हिडिओ काॅल कर' असं सांगायचं नेमकं राहून जायचं!" "मनोहरपंतांच्या म्हणण्यानुसार डाॅक्टरांनी दिलेल्या सल्ल्याबाबत खुद्द भाऊसाहेबही आधी साशंक होते! पण बायकोच्या तब्येतीमधे झपाट्याने झालेली सुधारणा पाहून त्यांचाही उत्साह आतां दुणावला आहे! विशेषत: घडल्या प्रकाराबाबत गिरीश आणि शिरीष कसे वागतील, या भीतीचं दडपण, त्या दोघांना वकीलसाहेबांनी दिलेल्या जमालगोट्यामुळे पुरतं नाहींसं झाल्याने ते आतां आम्हां सर्व मित्रमंडळींशी खुप मोकळेपणाने बोलूं लागले आहेत!!"
२० जुलै २०२३
0 notes
Text
काल याच्या जाळ्यातून मुक्त होण्यासाठी कोणत्या परमेश्वराच्या शरणात जावे लागेल?
0 notes
Text
53. इंद्रिय विषयांच्या लालसेचा त्याग
श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती इंद्रियांद्वारे विषयांची सेवन करत नाही त्याच्यापासून इंद्रिय वस्तू निघून जातात, परंतु रस (लालसा) दूर होत नाही आणि जेव्हा व्यक्ती परमात्म्याची प्राप्ती करते तेव्हाच तृष्णा संपते (2.59). इंद्रियांना एक भौतिक साधन आणि नियंत्रक आहे. मन हे सर्व इंद्रियांच्या नियंत्रकांचे संयोजन आहे. श्रीकृष्ण आपल्याला तृष्णा टिकवून ठेवणाऱ्या नियंत्रकावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात.
श्रीकृष्ण ने ‘रस’ हा शब्द वापरला आहे ज्याचा लाक्षणिक अर्थ फळांचा रस असा आहे. पिकलेले फळ कापल्यानंतर ते पिळेपर्यंत त्याचा रस दिसून येत नाही. दुधातील लोण्याचेही तसेच आहे. रस ही इंद्रियांमध्ये विद्यमान असणारी आंतरिक ओढ आहे.
अज्ञानी अवस्थेत, इंद्रियेही बाह्य वस्तूंशी जुळलेली असतात आणि सुख-दु:खाच्या अवस्थामध्ये सतत हिंदकळत असतात. नंतर नंतर मिष्ठान्नासारख्या बाह्य वस्तू या पैसे नसणे किंवा डॉक्टरांनी दिलेला सल्ला यामुळे दूर सारल्या जातात मात्र मिष्ठान्नांबद्दलची ओढ कायम राहते. बाह्य स्थितींमध्ये नैतिकता, देव/कायदा/प्रतिष्ठा यांची भीती, वय वाढणे, परिस्थिती अशांचा समावेश होऊ शकतो. श्रीकृष्ण त्या अंतिम स्थितीचे वर्णन करतो जेथे ही ओढच ��ंपुष्टात येते.
श्रीकृष्ण ने श्रीमद भागवतात (11:20:21) एक अत्यंत व्यावहारिक सल्ला दिला आहे. जंगली घोड्यांना आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांचा प्रशिक्षक त्यांच्याबरोबर काही काळ धावत असतो. जेव्हा घोड्यांना पूर्णपणे समजून घेणे त्याला जमायला लागते तेव्हा तो त्यांच्यावर आपल्या मर्जीनुसार बसणे आणि रपेट करणे सुरू करतो. श्रीकृष्ण इंद्रियांची तुलना या जंगली घोड्यांशी करतो.
येथे दोन मुद्दे मांडण्यात आले आहेत. पहिला हा की प्रशिक्षक घोड्यांना पहिल्याच प्रयत्नात नियंत्रित करू शकत नाही कारण ते त्याच्यापेक्षा जास्त ताकदवान आहेत. त्याचप्रकारे आपण एकाएकी इंद्रियांना नियंत्रित करू शकत नाही. काही काळ आपल्याला त्यांच्यानुसार वागावे लागेल, जोपर्यंत आपण त्यांना समजून घेऊ शकत नाही आणि मग हळुहळू आपण त्यांना नियंत्रित करू शकतो. दुसरे म्हणजे, आपण इंद्रियांच्या प्रभावाखाली असताना देखील आपल्याला जाणीव ठेवली पाहिजे की आपल्याला इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
जागरूकता आणि लालसा एकत्र असू शकत नाहीत. जागरूकता मध्ये आपण लालसांना बळी पडू शकत नाही कारण हे केवळ अज्ञानात घडते.
0 notes
Text
. 🍁 *ज्ञान गंगा* 🍁 .
➖ *विवाहातील प्रचलित वर्तमान परंपरांचा त्याग :-* ➖
विवाहात व्यर्थ खर्च बंद करावा लागेल. उदाहरणार्थ मुलीच्या विवाहात मोठी वरात घेऊन येणे, हुंडा देणे, ह्या व्यर्थ परंपरा आहेत. ज्यामुळे मुलगी ही कुटुंबावरील भार समजली जाते आणि तिला गर्भातच खुडण्याचे उद्योग सुरु आहेत. माता-पित्यांसाठी तर हे महापाप आहे. मुलगी देवीचे स्वरूप आहे. आमच्या विकृत परम्परानी मुलीला शत्रू बनविले आहे. श्री देवीपुराणाच्या तीसर्याे स्कंदात याचे प्रमाण आहे कीह्या ब्रह्माण्डाच्या प्रारम्भी तिन्ही देवतांचा (म्हणजेच श्री ब्रह्मदेवजी, श्री विष्णुजी आणि श्री शिवजी) यांचा त्यांची श्री दुर्गादेवीजींनी विवाह केला त्यावेळी कोणी वरात काढली नव्हती किंवा भोजनावळ सुद्धा घातल्या नव्हत्या. ना नाचगाणी होती किंवा बँडबाजा होता. श्री दुर्गादेवीने आपल्या ज्येष्ठ पुत्रास ��्री ब्रह्मदेवाला म्हटले की हे ब्रह्मा! ही सावित्री नामक मुलगी तुला पत्नीच्या रूपात देत आहोत. हिला घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाट. त्याचप्रमाणे आपल्या मधल्या पुत्राला म्हणजेच श्री विष्णु यांना लक्ष्मीजी आणि कनिष्ठ पुत्र श्री शंकरजींना पार्वतीजी देऊन सांगितले, ह्या तुमच्या पत्नी आहेत. ह्यांना घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाटा. तिघेही आपल्या पत्नी बरोबर घेऊन आपल्या लोकात गेले आणि मग जगाचा विस्तार झाला.
*शंका समाधान* :- काही व्यक्ति असे म्हणतात की पार्वतीजीचा मृत्यु झाला. त्या देवीचा पुनर्जन्म राजा दक्षाच्या घरात झाला होता. यौवनात पदार्पण केल्यावर देवी सतीजींनी (पार्वती) नारदाने सांगितल्यानंतर श्री शंकरांना पति म्हणून स्वीकारण्याचा दृढ़ संकल्प करून आपल्या मातेकरवी आपली इच्छा पिता दक्ष याला सांगितली. तेव्हा राजा दक्ष यांनी म्हटले की हे शंकरजी माझे जावई बनण्यायोग्य नाहीत कारण ते नागडे राहतात. एकाच मृगजीन बांधून राहतात आणि शरीरावर राख फासून भांगेच्या नशेत असतात. सर्पांना सोबत ठेवतात. अशा व्यक्तिशी माझ्या मुलीचा विवाह करून जगात मी आपले हसू नाही करून घ���णार. परंतु देवी पार्वती सुद्धा जिद्दीला पक्कया होत्या. त्यांनी स्वतःची इच्छा श्रीशंकरजींना कळवली आणि त्यांना सांगितले मी आपल्याशी विवाह करू इच्छीत आहे. राजा दक्षाने पार्वतीजीचा विवाह अन्य कोणासोबत ठरविला होता. त्याच दिवशी श्री शंकरजी आपल्या हजारोंच्या सँख्येतील भूत-प्रेत, भैरव आणि आपल्या गणां सह विवाह मंडपात पोहोचले. राजा दक्षाच्या सैनिकांनी विरोध केला. शंकारांची सेना आणि दक्षाच्या सेनेत युद्ध झाले. पार्वतीजींनी शंकरजींना वरमाला घातली. श्री शंकरजी पार्वतीजींना बलपूर्वक कैलाश पर्वतावर आपल्या घरी घेऊन गेले. काही व्यक्ति असे म्हणतात की बघा! श्री शंकरजी सुद्धा भव्य अशी वरात घेऊन पार्वतीशी विवाह करण्यास आले होते. त्यामुळे वरातीची परंपरा पुरातन आहे. त्यामुळे वरातीशिवाय विवाहात शोभा येत नाही. त्याचे उत्तर असे आहे की हा विवाह नव्हता तर प्रेम प्रसंग होता. पार्वतीजींना बलपूर्वक इचलून घेऊन जाण्यासाठी श्री शंकरजी वरात नाही तर सेना घेऊन आले होते. विवाहाची पुरातन परम्परा श्री देवी महापुराणाच्या तीसर्यार स्कंदात आहे व ती वर सांगितली आहे. मुले आणि मुलींनी आपल्या माता-पित्याच्या इच्छेनुसार विवाह केला पाहिजे. प्रेम विवाह हे महाक्लेशाचे कारण होऊ शकते. पुढे भगवान शंकरजी आणि पार्वतीजी यांच्यामध्ये काही गोष्टींवरून तंटा झाला. शंकरजींनी पार्वतीजीशी पत्नीचे नाते समाप्त केले व बोलाचाली सुद्धा बंद केल��. पार्वतीजींनी विचार केला आता हे घर माझ्यासाठी एक नरकच बनले आहे.त्यामुळे काही दिवस मी आईकडे जाऊन राहते. पार्वतीजी आपल्या पिता दक्षाच्या घरी माहेरी गेल्या. त्या दिवशी राजा दक्ष यांनी एका हवन यज्ञाचे आयोजन केले होते. राजा दक्षाने आपल्या मुलीला सन्मानाने न वागवता म्हटले की आज काय घ्यायला आली आहेस? बघितलेस त्याचे प्रेम, निघून जा माझ्या घरातून. पार्वतीजींनी आपल्या आईस श्री शंकरजी नाराज झाल्याची गोष्ट सांगितली. मातेने आपल्या पतिला सगळे सांगितले होते. पार्वतीजींना ना माहेरी काही स्थान होते ना सासरी. प्रेमविवाहाने अशी गंभीर परिस्थिति उत्पन्न निर्माण केली की दक्ष पुत्रीला आत्महत्या करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरला नाही आणि राजा दक्षाच्या विशाल हवनकुण्डात जाळून मृत्यू पावल्या. धार्मिक अनुष्ठानाचा नाश केला. आपले अमोल मानवी जीवन गमावून बसल्या. पित्याचाही नाश करवला कारण जेव्हा श्री शंकरजींना हे सर्व माहिती झाल्यावर ते आपली सेना घेऊन तिथे गेले आणि आपले सासरे दक्षजीचे मुंडके छाटून टाकली. नंतर बकर्याऊचे मुंडके लावून जीवित केले. त्या प्रेम विवाहाने कसे घमासान केले. श्री शंकरांच्या सैन्याला वरात असल्याची बतावणी सांगून ह्या कुप्रथेला जन्म दिला आहे. आणि हा प्रसंग प्रेमविवाह रूपी कुप्रथेचा जनक आहे आणि हे समाजाच्या विनाशाचे कारण बनले आहे.
जे विवाह सुप्रथेनुसार झाले, ते आजपर्यंत सुखी जीवन जगत आहेत. जसे श्री ब्रह्मदेवजी आणि श्री विष्णुजी.
*विवाह करण्याचा उद्देश* :- संततीची उत्पाती हाच विवाहाचा उद्देश आहे. मग पति-पत्नी मिळून परिश्रम करून मुलांचे पालन करतात. त्यांचा विवाह करून देतात. मग ते आपले घर थाटतात. त्याशिवाय प्रेमविवाह हे समाजात अशांतिचे बीज पेरत आहेत. समाज बिघडवणारे हे अस्तनीतले निखारे आहेत.
0 notes
Text
आली दिवाळी
आली आली, आली दिवाळी ।अंगणात काढू, रंगीत रांगोळी । टिमटीम करती, दिव्यांच्या माळा ।दीपक जळतो, आनंद सोहळा । नवीन कपडे, नवीन साज ।उत्साह भरला, मनात आज । चकली लाडू, करंजी अनारसा ।या या लवकर, पूजेला बसा । करू या पूजन, लक्ष्मी मातेचे ।येऊ दे ग आता, क्षण सुखाचे । फटाक्यांचा मग, होईल गजर ।जपून खायचे, लागेल हो नजर ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
0 notes
Text
काल याच्या जाळ्यातुन मुक्त होण्यासाठी कोणत्या परमेश्वराच्या शरणात जावे लागेल पहा उदया सकाळी 5:55 वाजता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता युट्युब संत रामपाल जी मराठी सतसंग व फेसबुक संत रामपाल जी मराठी सतसंग वर पहा
0 notes
Text
त्या दिवसाचीही चिंता करायला हवी, ज्या दिवशी हा संसार सोडावा लागेल. | San...
youtube
अवश्य ऐका हा शॉर्ट सत्संग: त्या दिवसाचीही चिंता करायला हवी, ज्या दिवशी हा संसार सोडावा लागेल | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 18 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १८ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
विधानपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार असून, महायुतीने प्राध्यापक राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नागपुरात विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि महायुती��्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. सत्ताधारी आणि ��िरोधकांमध्ये संवादाची या राज्याला दीर्घ परंपरा आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याची आणखी प्रगती होईल, अशा शुभेच्छा दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी या भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं. त्यानंतर ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ते आज पाचव्या स्थानापर्यंतचा भारताचा प्रवास जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांच्या टप्प्यात अविश्वसनीयपणे वेगवान वाढीचा आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के. बेरी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नीती आयोग, कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले आणि इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘भारताच्या बहुविध संक्रमणांवर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या अनुषंगाने ते बोलत होते. सर्वात उत्तम अर्थव्यवस्था आपल्याला व्हायची असेल तर गुंतवणूक वाढली पाहिजे, या संदर्भात या कार्यशाळेत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. वातावरणातील बदल आणि नागरिकीकरण ही महत्वाची आव्हानं असताना आमची भूमिका ही पुढचे दहा वर्ष कसे असतील ही असल्याचं बेरी यांनी नमूद केलं.
लोकसभेत काल ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. भारत हा जगात सर्वाधिक वृद्धी दर नोंदवणारा देश आहे. गेले तीन वर्ष देशाचा वृद्धीदर सरासरी ८ पूर्णांक ३ दशांश टक्के होता, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. केंद्र सरकारनं ११ लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च पायाभूत सुविधांवर करायचा ठरवला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल, असं त्या म्हणाल्या. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात किरकोळ, खाद्य आणि इंधन महागाई मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
करदात्यांना अधिक सेवा देण्याच्या उद्देशानं चार नव्या उपक्रमांची घोषणा केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार अगरवाल यांनी केली. या ��ार उपक्रमांमध्ये नागरिकांची सनद, संपूर्ण करसंबंधित माहितीसाठी सुविधा केंद्र, सूचना करण्यासाठी व्यवसाय सुलभता टॅब आणि कर भांडारासाठी सी बी आय सी संग्रह यांचा समावेश आहे. यामुळे करसेवेमध्ये पारदर्शकता आणि विश्वास वाढीस लागेल. करदात्यांना सक्षम बनवून आणि त्यांच्या सूचनांचा समावेश करून, एक सुलभ प्रणाली तयार केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
नागपूरमधल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून एक हजार ५४७ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. विधानभवनातल्या मंत्रिमंडळ सभागृहात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असं फडणवीस यांनी सांगितलं. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आशियाई विकास बँक आणि यूरोपीयन इन्वेस्टमेंट बँक यांच्याकडून एकूण तीन हजार ५८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे.
धुळे जिल्ह्यातल्या पळासनेर जंगलात पैशांचा पाऊस पाडण्याच्या वादातून गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिरपूर तालुका पोलिसांनी मध्यप्रदेशमधल्या खंडवामधून चौघांना अटक केली आहे. जादूटोणा कायदा कलमान्वये तक्रारदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यात येत्या २१ ते २७ डिसेंबर दरम्यान बंधारे मोहीम आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात बंधारे बांधण्यासाठी अंगणवाड्या, युवक क्रीडा मंडळ, बचतगट, स्वयंसेवी संस्था, विविध कर्मचारी संघटना आणि ग्रामस्थांना सहभागी करुन घेतलं जाणार आहे. गेली सहा वर्ष कुडाळ पंचायत समिती कोणत्याही शासकीय निधीशिवाय केवळ लोकसहभागातून बंधारे मोहीम राबवत आहे.
ग्रामीण भागातल्या नागरिकांना दरडोई ५५ लिटर शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं, या उद्देशानं राज्य शासनानं जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यात एक हजार १०० कामं मंजूर असून, ही कामं पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
राज्यात सध्या थंडीचा प्रचंड कडाका जाणवत असून, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमान���त लक्षणीय घट झाली आहे. आज राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४०
'स्वयंसिद्ध अनाथाश्रम' चालविणाऱ्या ट्रस्टींची तांतडीने बोलावलेली बैठक अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. ट्रस्टच्या अध्यक्षांनी घडलेल्या घटनाक्रमाला वर्तमानपत्रांत प्रसिद्धी मिळूं नये याची शिताफीने काळजी घेतली असली तरी दबत्या आवाजांत चर्चा सुरु होती. त्यामुळे ट्रस्टशी संबधित बहुसंख्य सभासद बैठकीला आवर्जून उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी अध्यक्ष विश्वनाथ वैद्य यांनी आदल्या दिवशी घडलेल्या दुर्दैवी घटनाक्रमाबद्दल माहिती देत दिलगिरी व्यक्त करुन चर्चेला सुरुवात केली. तिघीं परिचारिकांविरुद्ध झालेल्या पोलीसी कारवाईचा निषेध करण्यासारखं कांहीच नसल्याने, दैनंदिन क���रभार सांभाळणाऱ्या ट्रस्टींना इतर ट्रस्टींनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमाराला पटतील अशी उत्तरं देणं कठीण झालं होतं! विशेषत: मनोहर भोसलेसारख्या ट्रस्टच्या हितचिंतकाने विचारलेले प्रश्न संबंधितांना घायाळ करणारे होते! वातावरणातला तणाव वाढत जातांना पाहून, आपल्या अधिकारामधे कामकाजांत हस्तक्षेप करीत अध्यक्ष विश्वनाथ वैद्य यांनी बैठक बरखास्त झाल्याचं जाहीर करीत समारोप केला, "चर्चेदरम्यान उपस्थित झालेल्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं ताबडतोब मिळणं शक्य नाहीं हे उघडच आहे! पण ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना आश्वासन देतो की घडल्या प्रकाराचा सखोल तपास करून, आजपासून बरोबर सात दिवसांनी याच वेळी, इथेच आयोजित केलेल्या बैठकीत संपूर्ण अहवाल सादर केला जाईल! त्यामधे आपल्या 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'चं नांव कलंकित करणारे असे प्रकार पुन: घडूं नयेत यासाठी नियोजित उपायांचाही समावेश असेल!"
बैठकीच्या समारोपानंतर थोड्याच वेळांत जमलेल्या संबंधितांची गर्दी कांहीशा अस्वस्थ शांततेमधेच पांगली. बैठकीपूर्वी अध्यक्षांनी केलेल्या विनंतीनुसार मनोहर भोसले आपल्या सहकाऱ्यांसह त्यांची वाट पहात थांबले होते त्या खोलीत येऊन अध्यक्ष विश्वनाथ वैद्य यांनी भोसलेंचे दोन्ही हात आपल्या हातांत घेऊन प्रेमभराने दाबले आणि भारावलेल्या स्वरांत ते म्हणाले, "मनोहरपंत, तुम्ही विचारलेल्या टोकदार प्रश्नांनी नियामक मंडळाच्या सदस्यांची उडालेली भंबेरी पुरेशी बोलकी आहे! त्यांच्या अब्रूची लक्तरे चव्हाट्यावर येऊं नयेत म्हणूनच मी बैठक ताबडतोब स्थगित करण्याचा निर्णय घेतला!" अनंत आणि इतरांकडे वळून ते पुढे म्हणाले, "तुम्ही सर्वांनी मनोहरपंतांना ऐनवेळी साथ देऊन अनाथाश्रमाचा कारभार कालपासून सांभाळला त्याचं मोल शब्दांनी करण्यासारखं नाहीं. तथापि तुम्हां सर्वांना अधिक त्रास होऊं नये यासाठी मी अन्य कांही हितचिंतकांच्या मदतीने स्त्री-पुरुष स्वयंसेवकांची व्यवस्था केली आहे! काम समजावून दिल्यावर ते सगळी जबाबदारी अंगावर घेतील!" "वैद्यसाहेब, तुमची बैठक सुरु असतानाच आज काम करणाऱ्या स्वयंसेवकांची टीम आम्हांला आंत येऊन भेटली!" अनंत पुढे होत नमस्कार करून म्हणाला, "त्यांना काम समजावण्याला सुरवात झाली आहे! सगळी घडी सुरळीत बसेपर्यंत आमच्यापैकी एक-दोघं ऐनवेळी लागेल त्या मदतीसाठी इथे दिवसभर आळी-पाळीने हजर असतील! तुमच्या मागे कामांचा मोठा व्याप आहे;-- तरी तुम्ही ��थली काळजी अजिबात करूं नका!" त्याला दुजोरा देत भोसले म्हणाले, "वैद्यसाहेब, स्वयंसेवकांची टीम दाखल झाली आहे. त्यामुळे आतां इथल्या कारभाराची काळजी सोडा आणि झाल्या घटनांच्या सखोल तपासाचा पाठपुरावा करा! कारण त्याच्या तपशीलावर माझ्याप्रमाणे इतर अनेकांचीही नजर असणार आहे!"
जवळजवळ २४ तासांच्या तणावानंतर फुरसतीचा मोकळा वेळ मिळाला तेव्हां शुभदाला घरांतली खोळंबलेली कामं आठवली. चहा झाल्यानंतर 'दमायला झालंय्' या सबबीखाली ती अनंत बरोबर रोजच्यासारखी फिरायला गेली नाही! अनंत एकटाच बाहेर पडल्यावर लगेच तिने फ्रिजमधून मेथीची जुडी बाहेर काढली आणि डायनिंग टेबलापाशी बसून निवडायला सुरुवात केली! हात आणि डोळे यांत्रिकपणे मेथीची पानं पारखून निवडत असले तरी तिच्या मनांत मात्र अनाथाश्रमातील आठवणींनी फेर धरला होता! त्यामधे ती एवढी गुंगून गेली की तासाभराने अनंत बंद दाराचं लॅच उघडून घरांत आल्याचं तिला समजलंही नाहीं. अनंतने तिची हरवल्यागत झालेली अवस्था उमजून कसलाही आवाज न करतां कीचनमधे येत हलक्या हाताने दोन छोट्या प्लेट डायनिंग टेबलवर मांडल्या आणि ट्यूूबलाइट लावली. त्यासरशी शुभदा एकदम भानावर आली आणि आपल्याकडे बघत, मिस्कील हंसत उभ्या असलेल्या अनंतकडे डोळे मोठे करुन पहात म्हणाली, "असे काय चोरासारखे घरांत शिरलात आवाज न करतां? आणि या दोन प्लेट कशासाठी मांडल्या आहेत?" "बायको दमली आहे, म्हणून तिच्या श्रमपरिहारासाठी बदाम-पिस्ता कुल्फी आणली आहे!" तिच्यासमोर खुर्ची ओढून घेऊन बसत अनंतने हातातलं पार्सल उघडलं आणि कुल्फी बाहेर काढीत विचारलं, "एक पुरेल? की माझीसुद्धां देऊं?" "काय वात्रटपणा हा! जसे कांही हो म्हटलं तर तुमची कुल्फीसुद्धां देणारच आहांत!!" शुभदा कृतक् कोपाने म्हणाली, "एवढी दानत होती, तर माझ्यासाठी दोन कां नाहीं आणल्या?" "नाहीं बुवा सुचलं आपल्याला!" कानाच्या पाळ्या पकडल्याचा नाटकी आविर्भाव करीत अनंत म्हणाला, "त्यासाठी बंद्याला माफी असावी!" त्यावर हंसत शुभदा कुल्फी खाऊं लागल्याचं पाहून अनंतने विचारलं, "शुभदा, खरं सांग! शरीराने घरी आली असलीस तरी मनाने तूं अजूनही अनाथाश्रमांतच रेंगाळते आहेस कां?"
२५ मे २०२३
0 notes
Text
0 notes
Text
youtube
नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी साक्षात बोलू लागेल. जप टाळू नका. घरात चारही दिशांनी पैसा येईल.
0 notes