#लाखापेक्षा
Explore tagged Tumblr posts
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 21.10.2024 रोजीचे सकाळी : 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पोलिस स्मृतिदिवस आज पाळला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलिस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथं चिनी सैन्याचा हल्ला मोडून काढताना, पोलिस विभागाचे दहा कॉन्स्टेबल हुतात्मा झाले होते. त्यांच्यासह देशभरात विविध मोहिमांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
महाराष्ट्र पोलिस दलानेही एका ट्विट संदेशातून हुतात्मा पोलिसांना अभिवादन केलं आहे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचा मान राखत जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या सर्व हुतात्मा पोलिसांना सलाम, असं या संदेशात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी डॉक्टर आणि ६ बांधकाम कामगारांची हत्या केली. सोनमर्गच्या झेड-मोड बोगदा परिसरात बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली. दोन दहशतवाद्यांनी एका खासगी कंपनीच्या खानावळीमध्ये घुसून गोळीबार केला. यावेळी मारले गेलेले डॉ.शहनवाज हे बडगाम जिल्ह्यातील नैदगाम इथले रहिवासी होते. गेल्या तीन दिवसांतील मजुरांना लक्ष्य करण्यात आलेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा भ्याड हल्ला असल्याचं म्हटलं आहे, या घृणास्पद हाल्ल्याचे चोख उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात १८ लाख ५३ हजार निव्वळ सदस्य जोडले गेले आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. या महिनाभराच्या काळात सुमारे नऊ लाख ३० हजार नवीन सदस्यांनी नोंदणी केली असून, नव्या सदस्यांपैकी अडीच लाखापेक्षा जास्त महिला सदस्य असल्याचं. याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ही आकडेवारी म्हणजे देशभरात रोजगाराच्या संधी वाढल्या असल्याचेच स्पष्ट संकेत आहेत, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत सी व्हिजिल या ऍपवर ६६७ तक्रारी आल्या असून त्यातल्या ६६० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक, खासगी जागेतल्या विनापरवानगी लावलेल्या जवळपास सात लाख जाहिराती काढण्यात आल्या, तसंच बेकायदेशीर रोकड, मद्य, अंमली पदार्थ इत्यादी मिळून १४ कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली.
****
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दहाव्या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी नवी मुंबईतील एक भंगार व्यापारी असून मुख्य आरोपींना शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
नांदेड पोलीस परिक्षेत्रात अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत साडे आठ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर २१२ गुन्हे दाखल करण्यात आले. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चारही जिल्ह्यातील पाच अप्पर पोलीस अधीक्षक सहभागी झाले होते.
****
परभणी महानगरपालिकेच्या धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रावर अमृत पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यांअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामामुळे शहराचा पाणीपुरवठा आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असं आवाहन परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. अहिल्यानगर तसंच नाशिक जिल्ह्यातून होणारी पाण्याची आवक १२ हजार घनफूट प्रतिसेकंद पेक्षा अधिक झाली असल्यानं, धरणाचे १८ दरवाजे उघडून सुमारे १९ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पाच्या दहा दरवाजाद्वारे नदीपात्रात १६ हजार ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रकल्पात सध्या ७५ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
****
नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे जवळपास ३८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवला आहे. चांदवड, देवळा, कळवण, त्रंबक आणि बागलाणमध्ये मका, कांदा भातपिक तसंच द्राक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक कैलास शिरसाट यांनी सांगितलं.
****
हाँगकाँग इथं झालेल्या आशियायी क्रॉस कंट्री धावण्याच्या स्पर्धेत भारतीय धावपटूंनी सात सुवर्णपदकांची कमाई केली आहे. यात तीन वैयक्तिक सुवर्णपदकांचा समावेश आहे. धावपटू गुलवीर सिंह आणि सीमा यांनी या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.
****
0 notes
Text
छत्रपती शिवाजी महाराज — एक अद्वितीय योद्धा
जयंती आपल्या राजाची
प्रजेच्या प्रखर सूर्याची!
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तेज
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमान
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राष्ट्रवाद
जगातील एक उत्तम अशा राजाच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आज ही जेंव्हा महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा पहिला दिवा हा महाराजांना असतो,
ते देवाचे अवतार होते म्हणून ना��ी तर यासाठी की महाराष्ट्रातील मंदिर आणि देवाचं रक्षण माझ्या राजानं केल��.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर सूर्य जन्मला. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडा, वाजत होता. ‘शिवाजी’ हे नाव त्यांना शिवाई देवीच्या नावावरून देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक अनन्य साधारण व्यक्तिमत्व, ते शौर्यमय आणि धर्माचे पालक होते. त्यांचे सामर्थ्य, वीरत्व, आणि राष्ट्रीय भावना आजही आपल्याला स्फुरण देतात. तसेच त्यांचा संघर्ष आणि साहस ह्या दिवशी शिवाजी महाराजांना स्मरणीय बनवतात.
शिवजयंतीच्या दिवशी राज्यातील विविध शाळांमध्ये विशेष कार्यक्रम होतात. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती नाटक, कथा या द्वारे शाळांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी सांगितली जाते. एवढेच काय असंख्य कार्यक्रम संपूर्ण देशभर राबवले जातात.
शिवाजी महाराज हे प्रजाहित जाणणारे राजे होते. त्यांनी सर्व धर्मांसाठी समान आणि न्यायप्रिय शासन स्थापनेचा प्रयत्न केला. अठरा पगड जातींना एकत्र घेऊन ज्यांनी स्वराज्याच स्वप्न पूर्ण केले. यामुळे हा दिवस सर्वांसाठीच आपुलकीचा गर्वाचा आणि जिव्हाळ्याचा दिवस आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चयाचे महामेरू आहेत, त्यांची दूरदृष्टी, नीतीमत्ता कमालीची आहे, मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य उभ केलं.
आज याच स्वराज्याचा डंका जगभर गाजताना आपल्याला पाहायला मिळतो.
आपल्या या तेजसूर्याला, प्रजाहितदक्ष राजाला द्या डिजिटल सलाम…
कसे?
तर आपल्या महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारे आपले AdBanao App हे आहे ३५ लाखापेक्षा जास्त बिझिनेसची पहिली पसंद.
आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीचा उत्साह वाढवा फक्त आमच्या सोबत.
Read the full blog on our website
#adbanao#shivaji maharaj#shivaji#branding#digitalmarketing#marketing#social media branding#postermaker#adbanaoapp#social media advertising#maratha#festival#indian festvial#marathi#maharashtra#history
0 notes
Text
कारंज्यात शनिवारपासून बैलजोडी ईनामी पटाचा महासंग्राम; 2 लाखांची विविध बक्षिसे
गोंदिया, दि.23 : भारतीय जनता पार्टी शेतकरी आघाडीतर्फे जवळील कारंजा येथील सिद्धांत बाबा पटांगण येथे दोन दिवशीय बैलजोडी पटस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विविध प्रकारचे 2 लाखापेक्षा अधिकचे पुरस्कार, वैयक्तिक व प्रोत्साहनपर बक्षीसे देऊन शेतकरी, बैलजोडी व कातकरास गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता खा. सुनील मेंढे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी…
View On WordPress
0 notes
Text
आयपीएलाचा फायदा ‘एनएमएमटी’ला: वाहनतळ ते मैदान विशेष बससेवा; दहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न
आयपीएलाचा फायदा ‘एनएमएमटी’ला: वाहनतळ ते मैदान विशेष बससेवा; दहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न
आयपीएलाचा फायदा ‘एनएमएमटी’ला: वाहनतळ ते मैदान विशेष बससेवा; दहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न नवी मुंबई : नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील मैदानात आयपीएल सामान्यांसाठी नवी मुंबई परिवहन उपक्रमाने वाहनतळ ते मैदान अशा विशेष बसची सुविधा दिली होती. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत १३ सामने या मैदानात झाले असून यातून एनएमएमटीला दहा लाखांपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले आहे.नवी मुंबई शहरातील नेरुळ…
View On WordPress
0 notes
Text
"बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल, पण...," जयंत पाटील यांचं भाजपा नेत्यांना प्रत्युत्तर; म्हणाले "तुम्हाला शोभत नाही" | NCP Jayant Patil on BJP over Baramati Sharad Pawar sgy 87
“बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल, पण…,” जयंत पाटील यांचं भाजपा नेत्यांना प्रत्युत्तर; म्हणाले “तुम्हाला शोभत नाही” | NCP Jayant Patil on BJP over Baramati Sharad Pawar sgy 87
एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवारांच्या बारामतीत भाजपाला होत आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. जयंत पाटील यांनी बी जे पी नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला ���हे. “बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती आहे, त्यामुळे कोणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे आणि अजित पवार…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रीय लोक अदालतीचा पुणे पॅटर्न
राष्ट्रीय लोक अदालतीचा पुणे पॅटर्न
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून घेण्यात आलेल्या सहा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ७ लाखापेक्षा अधीक दाखल प्रकरणे निकाली काढत पुणे जिल्ह्याने राज्यात आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. लोकन्यायालयात प्रकरण मिटल्याने दोन्ही पक्षकारांमध्ये जिंकल्याची भावना निर्माण होते तसेच दोन्ही पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत होते. लोक अदालतीचा हा यशस्वी पुणे पॅटर्न राज्यासाठी पथदर्शी असाच…
View On WordPress
0 notes
Text
रामपूर पोटनिवडणूक: भाजपचे उमेदवार घनश्याम लोधी सर्वात श्रीमंत उमेदवार, सपा उमेदवाराच्या बँक खात्यात फक्त 81 हजार
रामपूर पोटनिवडणूक: भाजपचे उमेदवार घनश्याम लोधी सर्वात श्रीमंत उमेदवार, सपा उमेदवाराच्या बँक खात्यात फक्त 81 हजार
रामपूर पोटनिवडणूक १ प्रतिमा क्रेडिट स्त्रोत: टीव्ही 9 रामपूर पोटनिवडणुकीत सपाकडून असीम रझा, तर भाजपकडून घनश्याम लोधी हे उमेदवार आहेत. त्यांच्या नामांकनात प्रतिज्ञापत्रात दिलेल्या तपशिलानुसार, असीम रझा यांच्या बँक खात्यांमध्ये एक लाखापेक्षा कमी रक्कम आहे, तर भाजपचे उमेदवार घनश्याम लोधी हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या दोन जागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे (पोल वर)…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली. पाच लाखांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासह, कौटुंबिक काळजी, महिलांची प्रतिष्ठा, मोठ्यांचा आदर, निरोगी आणि सुरक्षित भारताच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. आतापर्यंत जवळपास ४९ टक्के आयुष्मान कार्ड महिलांना वितरीत करण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे. आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
परदेशस्थ भारतीय राष्ट्रदूत असून, ते नेहमीच देशाला बळ देत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. काल न्यूयॉर्कमधील लाँग आयलंड इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांमध्ये भारतीय नागरिकांच्या भूमिकेचं कौतुक करताना मोदी यांनी, जगासाठी, AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असा अर्थ होतो, तर भारतासाठी AI म्हणजे अमेरिकन-भारतीय अशी भावना असल्याचं सांगितलं. भारतीय नागरिक उभय देशांना जोडण्याचं काम करतात आणि त्यांचं कौशल्य आणि प्रतिभा अतुलनीय असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.
****
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ - आयआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रेकरुंसाठी भारत गौरव रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. या रेल्वेच्या माध्यमातून बद्रीनाथ, केदारनाथ, कार्तिक स्वामी अशी यात्रा करता येईल. ११ दिवसांच्या यात्रेची सुरुवात दोन ऑक्टोबरला मुंबईतून होणार आहे.
****
माहेश्वरी समाजाला लाभलेला सेवेचा वारसा नवी पिढी कायम ठेवेल, असा विश्वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला आहे. ते काल नाशिक जिल्हा माहेश्वरी सभेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
****
राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी काल बाल कर्करुग्णांशी संवाद साधला. राज्यपालांच्या हस्ते या बालकांना गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी मुलांना राजभवन दाखवण्यात आलं.
दरम्यान, राज्यपालांनी काल विविध जैन संघांनी आयोजित केलेल्या रथयात्रेला मुंबईतल्या प्रार्थना समाज इथून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रथयात्रेत सहभागी झालेल्या जैन संघाचं अभिनंदन करुन ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.
****
रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देऊ असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काल सातारा इथं केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर पवार बोलत होते.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या ७६ लाखापेक्षा जास्त झाली आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी ही माहिती दिली. या उपक्रमाअंतर्गत सध्या मुंबईत २४३ दवाखाने सुरु असून, १ हजार १४० कर्मचारी कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत लवकरच आणखी ३७ नवे दवाखाने सुरु केले जाणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
****
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल जिल्ह्यातल्या शिवपूरमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
सिडकोतर्फे बेलापूर ते खारघर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडला बेलापूरमधल्या नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बेलापूर जेट्टीजवळ नागरिकांनी काल मानवी साखळी करत आंदोलन केलं. वन टाईम प्लॅनिंग अंतर्गत नवी मुंबई महापालिकेनं बेलापूरचा विकास केला, असं असताना सिडकोतर्फे कोस्टल रोडसाठी या भागात आखणी केल्याच्या विरोधात नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
****
अंबाजोगाई - लातूर रस्त्यावर नांदगाव पाटीजवळ कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. काल सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. मृत सर्व जण लातूर जिल्ह्यातले रहीवाशी होते.
****
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीनं धाराशिव इथं काल ‘सामाजिक संवाद मेळावा’ घेण्यात आला. संविधान अभ्यासक वाल्मीक निकाळजे, विवेक विचार मंचचे प्रांत समन्वयक अरुण कराड यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
****
परभणीमध्ये काल लायन्स क्लबच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात ३४० जणांनी रक्तदान केलं.
****
कोल्हापूर शहरात काल रात्री उशिरा मुसळधार पाऊस झाला. परतीच्या या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असून शेती कामालाही गती आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मिक्स्ड मार्शल आर्ट्स कुस्ती स्पर्धेत विजय मिळवणारा संग्राम सिंह हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. जॉर्जियाच्या तब्लिसी इथं सुरू असलेल्या गामा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत संग्रामनं पाकिस्तानच्या अली रझा नसीर याच्यावर अवघ्या ९० सेकंदात मात केली. संग्राम हा या स्पर्धेच्या ९३ किलो वजनी गटात सर्वात वेगवान विजय नोंदवणारा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.
****
0 notes
Text
कळंब मध्ये चोरट्यांनी दोन एटीएम वर चोरट्यांचा डल्ला : दहा लाखापेक्षा आधिकची रक्कम केली लंपास.
कळंब मध्ये चोरट्यांनी दोन एटीएम वर चोरट्यांचा डल्ला : दहा लाखापेक्षा आधिकची रक्कम केली लंपास.
कळंब : शहरातील प्रमूख अशा ढोकी रोडवरील दोन वेगवेगळ्या बँकेच्या एटीएएमवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यात दहा लाखापेक्षा अधिकची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमीक माहिती समोर येत आहे . मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरट्यांचा हैदोस सुरू आहे. याचे लोण आता कळंब शहरात पोहचले असून शहरातील ढोकी रोड अर्थात लक्ष्मी रोडवर कार्यान्वित करण्यात आलेल्या बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेच्या…
View On WordPress
0 notes
Text
धारणीत भीषण अग्नीतांडव; आग लागून 70 लाखाचे नुकसान
धारणीत भीषण अग्नीतांडव; आग लागून 70 लाखाचे नुकसान
अमरावती : जिल्ह्यातील धारणी शहरातील जुन्या वस्तीतील वार्ड क्रमांक 10 मधील महेश व जगदीश मालवीय यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याची घटना काल सायंकाळी घडली. आगीत 70 लाखापेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे. धरणी शहरातील महेश व जगदीश मालवीय यांच्या पुरातन मोठ्या घरात अचानक गुरुवारी रात्री साठे आठ वाजता आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. घरातील फर्निचर, धनधान्य, किराणा साहित्य…
View On WordPress
0 notes
Text
‘गुरुपौर्णिमा’ गाण्याल�� प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद! अवघ्या काही तासांत २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ
‘गुरुपौर्णिमा’ गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद! अवघ्या काही तासांत २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ
‘गुरुपौर्णिमा’ गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद! अवघ्या काही तासांत २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सफल झालं याचं परिमाण सांगताना आपण नेहमी ‘मरावे परंतु कीर्ती रुपी उरावे’ या उक्तीचा वापर करतो. आपण हयात नसतानाही कीर्तीरूपांत लोकांच्या स्मरणात राहणे, त्यांच्या आठवणीत जिवंत राहणे यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते. असं जगणं फार कमी लोकांच्या वाट्याला येतं.अशा…
View On WordPress
#२०#अवघ्या#उदंड#काही#गाण्याला#गुरुपौर्णिमा;#जास्त#तासांत&8230;#पाहिला#प्रतिसाद#प्रेक्षकांचा#बातम्या#लाखापेक्षा#लोकांनी#व्हिडीओ
0 notes
Text
Property tax : खुशखबर !! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ता कर माफ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
#Property tax : खुशखबर !! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ता कर माफ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे #Mumbai #Maharashtra
Property tax : मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ फुटापेक्षा कमी ; लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार Property tax : मुंबई दिनांक १ जानेवारी २०२२ नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून साडे पंधरा लाखापेक्षा अधिक प्रकरणे निकाली - महासंवाद
राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून साडे पंधरा लाखापेक्षा अधिक प्रकरणे निकाली – महासंवाद
मुंबई,दि. १२: महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या र��ष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एका दिवसात १५.५० लाखापेक्षा जास्त प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या माध्यमातून वाहतूक विभागाला ६९ कोटी पेक्षा जास्त रुपयांचा महसूल मिळाला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आज…
View On WordPress
0 notes
Text
सरकारी नोकर भरती सुरू करा
सरकारी नोकर भरती सुरू करा
मुंबई : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने २०२१ या नव्या वर्षात शासकीय सेवेत सध्या रिक्त असलेल्या एक लाखापेक्षा जास्त पदांसाठी सुधारित महापोर्टल तयार करून भरती प्रक्र��या सुरू करावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. मागील सरकारने मेगाभरतीचा फुगा फुगवून सुशिक्षित बेरोजगारांची दिशाभूल केल्याने…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 09 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०९ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या वर्षी जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत लोखंड, पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर बारा टक्के समान जीएसटी दर लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य जनतेल्या पुरवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटं, बॅटरी-संचलित कार सेवा अशा सेवांवर जीएसटी लागू केला जाऊ नये अशीही शिफारस या परिषदेनं केली होती.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौर्यावर असून, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीची आरती करुन दर्शन घेतलं. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानासह, मुंबईतल्या विविध भागातल्या गणेश मंडळांना भेट देणार आहेत.
दरम्यान, शाह यांच्या उपस्थितीत काल मुंबईत राज्यातल्या प्रमुख भाजप नेत्यांची विशेष बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मंत्री आणि आमदार उपस्थित होते.
****
महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं आयोजित सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्याअंतर्गत सातव्या दिवसापर्यंत देशभरात एक कोटी ७९ लाखापेक्षा जास्त उपक्रम राबवले गेल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. यात नवजात बालकांसाठीच्या पूरक आहाराशी संबंधित २० लाखापेक्षा जास्त उपक्रमांचा समावेश होता.
****
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं आजपासून उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं दोन दिवसीय राष्ट्रीय आढावा परिषद आयोजित केली आहे. चिंतन शिबिर नावाच्या या परिषदेत देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सामाजिक न्याय आणि समाजकल्याण विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. उपेक्षित समाजाच्या कल्याणाच्या उद्देशानं विविध योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीवर या शिबिरात चर्चा करण्यात येईल.
****
शेतमाल तारण कर्ज योजनेमुळे राज्यातल्या शेतमालाला वाढीव बाजारभाव मिळाल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा शेतकर्यांना होत आहे. शिवाय बाजार समित्यांच्या उत्पन्नातही वाढ होत असल्यानं, या योजनेला शेतकरी आणि बाजार समित्यांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या २०२३-२४ या हंगामामध्ये राज्यातल्या ६७ बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेत सहभाग घेतला. त्यामध्ये सुमारे दोन लाख ७७ हजार क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल तारणात स्वीकारला. त्यावर ३६ कोटी ३४ लाख २४ हजार रुपयांच्या कर्जाचं वाटप शेतकर्यांना करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली.
****
सांगली जिल्ह्यातल्या तासगावच्या श्री गणपती पंचायतनचा, २४५वा रथोत्सव आणि संस्थानच्या दीड दिवसाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा काल पार पडला. गणपती मंदिर ते जवळच्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भाविकांहस बाराबलुतेदारांनी हा रथ ओढला. रथासमोरचे मानवी मनोरे, झांजपथक यामुळे हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे पाच लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला. या प्र��रणी पोलीसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात साडे ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. आज दुपारी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून तीन हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. नदीकाठावरील गावातल्या नागरीकांनी सतर्कता बाळगावी, कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये, असं आवाहन जायवाडी धरणाच्या नियंत्रण कक्षानं केलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मांजरा धरणात ५३ पूर्णांक ३४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लातुर शहरासह बीड जिल्ह्यातल्या केज, अंबाजोगाई तसंच धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहराचा देखील पाणी प्रश्न मिटला आहे. याशिवाय मांजरा धरणावर आधारित असलेल्या शेतीसह सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या शंभर टक्के पाऊस झाला आहे. शिवाय जिल्ह्यात तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, घरणी, मसलगा अशा मध्यम प्रकल्पात देखील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर भागातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
****
0 notes
Photo
‘108 रुग्णवाहिका’ रुग्णांसाठी आधार, राज्यात एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची वाहतूक '108 रुग्णवाहिका' रुग्णांसाठी आधार, राज्यात एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची वाहतूक#ambulans #coronavirus pic.twitter.com/VnTIbFjLlc — DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK (@InfoNashik) …
0 notes