#रोहित चव्हाण
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 06 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरात नक्षलवाद्यांनी केलेल्या एका स्फोटात आज सकाळी २ जवान किरकोळ जखमी झाले. जवानांनी सतर्कता दाखवत नक्षल्यांचा मोठा घातपात करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
आजच्या जागतिक सहकार दिनानिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सहकारामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर होत असल्यामुळं देशाचा आर्थिक विकासदर वाढण्यास मदत होत असल्याचं अमित शहा यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी सहकार ही एक चळवळ आहे. शेती, उद्योग, पणन, बँकींग या क्षेत्रात सहकारामुळं कष्टकरी वर्गाच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सामाजिक प्रसारमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रा व्यवस्थित आणि सुरक्षितपणे सुरू आहे. यात्रेच्या काल सातव्या दिवशी २१ हजार ६८६ भाविकांनी श्री अमरनाथ यांच्या पवित्र गुफेत दर्शन घेतलं. गेल्या २९ जूनपासून ��ात्रा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत १ लाख ५२ हजार ९४६ भाविकांनी पवित्र हिमशिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळं आज यात्रा काही काळासाठी थांबविण्यात आली आहे.
****
राज्यातल्या १० हजार गावांमध्ये मदत आणि पुनर्वसन विभाग, कृषी तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात काल विधानसभेत दिली. महसूल मंडळ स्तरावरून हवामान केंद्र आता गावपातळीपर्यंत नेण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात सदस्य संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण, भास्कर जाधव, राजेश टोपे यांनी भाग घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर शहराचे माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीचे निमंत्रीत सदस्य राजू शिंदे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उद्या शहरात होणाऱ्या मेळाव्यात पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
****
मुंबई - बल्लारशा नंदीग्राम एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी येत्या १० आणि ११ तारखेला आदिलाबाद ते बल्लारशा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली असून ती मुंबई ते अदिलाबाद दरम्यान धावेल तर बल्लारशा -मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ११ आणि १२ तारखेला अंशतः रद्द करण्यात आली असून या दिवशी ती आदिलाबाद ते मुंबई दरम्यान धावेल.
****
१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारतचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यापाल न्यायमूर्ती पी.सदाशिवम् यांच्या अध्यक्षतेखालील पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीनं ही घोषणा केली. नवी दिल्ली इंथ येत्या १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
या पुरस्कारासाठी समितीनं राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याचं राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे.
****
भारत आणि झिम्बॉब्वे दरम्यान सुरु होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. संध्याकाळी साडेचार वाज���ा सामन्याला सुरुवात होईल. टी ट्वेंटी सामन्यातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारताची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असून, शुभमन गिल हा संघाचं नेतृत्व करणार आहे. आयपीएल सामन्यांच्या अनुभवानंतर अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडे या खेळाडूंचा झिम्बॉब्वे सोबतच्या या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा १२ धावांनी पराभव केला. चेन्नईतल्या एम ए चिदंबम् मैदानावर काल झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेनं १८९ धावा केल्या, भारतीय महिला संघ प्रत्युत्तरादाखल निर्धारित २० षटकात ४ बाद १७७ धावाच करु शकला.
****
0 notes
Text
चार मित्रांची 'बेफिकर' गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
चार मित्रांची ‘बेफिकर’ गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
बेफिकर असलेल्या चार मित्रांची ‘आम्ही बेफिकर’ ही गोष्ट आता प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचे नुकतेच सोशल मीडियाद्वारे टीजर पोस्टर लाँच करण्यात आले. ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा…
View On WordPress
#&039;आम्ही बेफिकर&039;#अंतरिक्ष चौधरी#कविश्वर मराठे#मिताली मयेकर#रोहित चव्हाण#सुयोग गोऱ्हे#हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा
0 notes
Text
एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर यांचे गितेश कडू यांनी केले स्वागत
एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर यांचे गितेश कडू यांनी केले स्वागत
सिंधुदूर्ग : एस टी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हिरेन रेडकर याचे वैभववाडी तालुक्यात स्वागत करताना करण्यात आले. गितेश कडु युवासेना जिल्हा समन्वयक सिंधुदुर्ग व युवा सैनिक रोहित रावराणे व आदित्य चव्हाण ,सुनील भागवत आदी उपस्थित होते. प्रतिनिधी / कोकण नाऊ / सिंधुदुर्ग
View On WordPress
0 notes
Text
सातारा, पवार आणि पाऊस; हातात छत्री असतानाही पावसात भिजणाऱ्या रोहित पवारांचा फोटो व्हायरल
सातारा, पवार आणि पाऊस; हातात छत्री असतानाही पावसात भिजणाऱ्या रोहित पवारांचा फोटो व्हायरल
सातारा, पवार आणि पाऊस; हातात छत्री असतानाही पावसात भिजणाऱ्या रोहित पवारांचा फोटो व्हायरल Rohit Pawar News : आमदार रोहित पवार यांनी सातारा येथे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केलं. Rohit Pawar News : आमदार रोहित पवार यांनी सातारा येथे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देऊन…
View On WordPress
#असतानाही#आजची बातमी#आणि#आताची बातमी#छत्री#ठळक बातमी#ताजी बातमी#पवार#पवारांचा#पाऊस#पावसात#फोटो#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#भिजणाऱ्या#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राजकारण#रोहित#व्हायरल!#सातारा#हातात
0 notes
Text
विनोदाच्या बादशाहांचा 'भिरकीट' | १७ जूनला उडणार हास्याचे फवारे
विनोदाच्या बादशाहांचा 'भिरकीट' १७ जूनला उडणार हास्याचे फवारे अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' हा चित्रपट येत्या १७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 'भिरकीट'चा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटामध्ये हास्याचे फवारे घेऊन मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे बादशाह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद, श्रीकांत यादव, मीनल बाळ, शिल्पा ठाकरे, दिप्ती धोत्रे, आर्या घारे, सेवा मोरे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नामदेव मिरकुटे, राधा सागर,मी अश्विनी बागल यांच्यासारख्या जबरदस्त कलाकारांची मांदियाळी असून हे सगळेच कलाकार आपल्या धमाल विनोदी शैलीने चित्रपटगृहात अक्षरशः हास्यकल्लोळ करणार आहेत. त्यांची ही धमाल पाहण्यासाठी प्रेक्षकही प्रचंड उत्सुक आहेत.
या चित्रपटात गिरीश कुलकर्णी हे एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ते या चित्रपटात 'तात्या' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. जो नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून जाणारा आहे. गावातील प्रत्येक स्त्री तिची व्यथा घेऊन 'तात्या'कडे सोडवायला जाते. असा हा सदैव सेवेसाठी तत्पर असणारा 'तात्या' प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवणार असून अशा प्रकारची भूमिका गिरीश कुलकर्णी यांनी पहिल्यांदा साकारली आहे. तर सागर कारंडे आपल्याला एक धमाल राजकारण करताना दिसणार आहे. तो 'बंटी दादा' ही भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त हृषिकेश जोशी, कुशल बद्रिके, तान्हाजी गालगुंडेही आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांना लोटपोट हसवणार आहेत. या चित्रपटात विनोदाचे बादशाह असल्याने 'भिरकीट' चित्रपटगृहात धुमाकूळ घालणार आहे.
दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात की, " या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अनेक विनोदवीर आहेत, ज्यांनी आजवर अवघ्या महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने हसवले आहे. या चित्रपटातील प्रत्येक विनोदवीराची अनोखी विनोदशैली आहे. त्यांच्या हसवण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचे हसवण्याचे आपापले वेगळे टाईमिंग आहे आणि हे असे वेगवेगळे विनोदवीर एकत्र 'भिरकीट'मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हास्याचे जबरदस्त पॅकेज आपल्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक ज्यावेळी विरंगुळा म्हणून चित्रपटगृहात एखादा चित्रपट पाहायला जातो, तेव्हा त्य���ला निव्वळ मनोरंजन हवे असते, अशा वेळी 'भिरकीट' त्यांच्या या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल. प्रेक्षक केवळ हसणारच नाही तर त्यातून एखादा संदेशही घेऊन जातील.''
क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत, सुरेश जमतराज ओसवाल व भाग्यवंती सुरेश ओसवाल निर्मित 'भिरकीट' या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले असून पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. तर या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी युएफओने सांभाळली आहे. Read the full article
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 January 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या यात्रेच्या देशभरातल्या हजारो लाभार्थ्यांसह, केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार तसंच इतर लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात पदमपुरा भागात विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांचा हा कार्यक्रम दाखवण्यात येत आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान आजपासून तीन दिवस गुजरात दौऱ्यावर जात असून, उद्या गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथं जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. दहा जानेवारीला गांधीनगर इथं त्यांच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचं उद्घाटन होईल. “भविष्याचे प्रवेशद्वार” अशी या परिषदेची संकल्पना आहे.
****
शालेय जीवनातच विद्यार्थांना रस्ता वाहतुकीचे नियम शिकवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल 'सडक सुरक्षा अभियान २०२४ - संवेदना का सफर' या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. १८ वर्षाखालील मुलांना रस्ता सुरक्षतेसाठी जागरूक करण्यासाठी समाज माध्यमे, महाविद्यालय, सामाजिक संघटनांनी पुढाकर घ्यावा, असं आवहन गडकरी यांनी केलं. देशात रस्ते अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते वाहतूक आणि सुरक्षा अधिक बळकट करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
आकाशवाणी दिल्ली ��थले माजी उर्दू वृत्तनिवेदक अ��रफ आबिदी यांचं काल रात्री दिल्लीत निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. आबिदी यांनी १९८२ ते २००२ पर्यंत जवळपास २० वर्ष आकाशवाणी दिल्लीच्या वृत्त विभागात काम केलं.
****
नागरिकांमध्ये सुदृढ आरोग्याविषयी जागरुकता वाढावी या उद्देशानं यवतमाळमध्ये हेल्थ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. यात नागपुर, पुणे, मुंबई सारख्या इतर अनेक शहरांमधले धावपटुही सहभागी झाले होते. यात पोलीस विभागानं नशामुक्त पहाट अभियानातून व्यसनमुक्ती बाबत जनजागृती केली. विजेत्या धावपटूंना आणि नशामुक्त पहाट अभियानात आयोजित स्पर्धेतल्या विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आलं.
****
रत्नागिरी इथं काल पहिल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. २१, १० आणि पाच किलोमीटर्स अशा वेगवेगळ्या अंतराच्या स्पर्धेत पाच ते ८८ वर्षं या वयोगटांतल्या एकूण दीड हजार स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. क्रीडा पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचं सहकार्य लाभलं.
****
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन - सीटू प्रणित जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीनं शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या ११ तालुक्यांमधल्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी काल लोणी इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावं, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान वेतन पगारी रजा, शासकीय भत्ते, आरोग्य विमा आणि इतर सुविधा द्याव्या, आदी मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या जेष्ठ कवयित्री संध्या रंगारी यांना साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार' माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. नांदेड इथल्या सावित्री -रमाई महोत्सवात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
****
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं सुरु असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत ���ुरुषांच्या दहा मीटर एयर रायफल पिस्टल सांघिक प्रकारात भारतीय खेळाडुंनी सुवर्ण पदक पटकावलं. वरुण तोमर, अर्जुन सिंह चीमा आणि उज्वल मलिक यांच्या संघानं हे यश सं��ादन केलं. वरुण आणि अर्जुन यांनी वैयक्तिक प्रकारात देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
****
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेन्टी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं टी ट्वेन्टी संघात पुनरागमन झालं आहे. या मालिकेसाठी रोहीत शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. शुभमन गिल, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, कुलदीप यादव, आवेश खान, अर्षदिप सिंग आणि मुकेश कुमार गोलंदाजीची बाजू सांभाळणार आहेत. येत्या ११ जानेवारीपासून भारतात या मालिकेला सुरुवात होईल.
****
हवामान
राज्यभरात पुढचे दोन दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
Photo
पत्रकार पर केंद्र सरकार हुई मेहरबान रोहित शर्मा ,दिल्ली :- । देश भर के पत्रकारों के कल्याण के लिए केंद्र सरकार ने “पत्रकार वेलफेयर स्कीम” नाम की फरवरी 2013 शुरू एक योजना को संशोधित कर पत्रकारों से सम्बंधित 1955 के एक अधिनियम के तहत पत्रकार की श्रेणी में आने वाले देश के नागरिक सभी पत्रकारों के लिए लागू किया है. इसके अंतर्गत निधन हो जाने पर परिजन के बेसहारा हो जाने, अपंगत्व और बीमारी के इलाज के लिए केंद्र सरकार की ओर से 5 लाख रुपए तक की सहायता दी जाएगी. समिति गठित है इसके लिए एक समिति का गठन भी किया जा चुका है. इसमें केंद्रीय सूचना और प्रसारण मंत्री संरक्षक या पैट्रोन हैं. विभाग के सचिव अध्यक्ष, प्रधान महानिदेशक (एम व सी), एएस एंड एएफ, संयुक्त सचिव (पी), सदस्य हैं तथा सूचना एवं प्रसारण मंत्रालय के उप सचिव/निदेशक सदस्य संयोजक हैं. यह समिति ही पीड़ित पत्रकार अथवा उनके परिजन के आवेदन पर विचार करेगी. पत्रकार की श्रेणी के सभी पत्रकार और उनके परिजन हालांकि इसमें केंद्र अथवा राज्य सरकार से अधिस्वीकृत (एक्रीडेटेड) पत्रकार होने का कोई बंधन नहीं है, लेकिन Working Journalists and other Newspaper Employes -Condition of service- And Miscellaneous Provision Act 1955 के अंतर्गत वे सारे, जो पत्रकार होने की व्याख्या में आते हैं, इस योजना के तहत मदद पाने अधिकारी ��ैं. इनके अलावा टीवी और वेब जर्नलिज्म के माध्यम से सेवाएं देने वालों को भी इस योजना का लाभ दिया जाएगा. साथ ही समाचार पत्रों के संपादक से लेकर उपसंपादक, रिपोर्टर, फोटोग्राफर, कैमरामैन, फोटो जर्नालिस्ट के अलावा फ्रीलान्स जर्नालिस्ट, अंशकालिक संवाददाता और उनके आश्रितों को इसके दायरे में रखा गया है. इनके लिए कम से कम पांच वर्षों की पत्रकार के रूप में सेवा में होना अनिवार्य है. आवेदन भेजने की प्रक्रिया पीड़ित पत्रकार अथवा उनके परिजन इसके लिए विहित फॉर्म पर अपने आवेदन महानिदेशक (एम एन्ड सी), प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो, ए विंग , शास्त्री भवन, नई दिल्ली के पते पर भेज सकते हैं. तीन पृष्ठों के इस फॉर्म का नमूना प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (पत्र सूचना ब्यूरो) के वेबसाइट से डाऊनलोड किया जा सकता है. उसके साथ अन्य अन्य जरूरी दस्तावेजों, जो फॉर्म के साथ जोड़ने हैं, की सूची भी उपलब्ध हो जाएगी.  1 से 5 लाख तक सहायता साथ ही उसमें बताया गया है कि किन-किन परिस्थितियों में पीड़ित पत्रकार अथवा उनके परिजन को 1 लाख रुपए से लेकर 5 लाख रुपए तक की सहायता राशि उपलब्ध कराई जाएगी. उल्लेखनीय है कि महाराष्ट्र सरकार की ओर से भी “शंकरराव चव्हाण पत्रकार कल्
0 notes
Text
युवासेना आयोजित रक्तदान शिबिरात 32 रक्तदात्यांचे रक्तदान
युवासेना आयोजित रक्तदान शिबिरात 32 रक्तदात्यांचे रक्तदान
संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची उपस्थिती युवा सेनेच्या वतीने वैभववाडी तालुका आयोजित रक्तदान शिबिरात 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्या वेळीशिवसेना संपर्कप्रमुख सिंधुदुर्ग अरुण दुधवडकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू,युवासेना तालुका चिटणीस रोहित पावसकर, वैभववाडी माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, शिवसेना विभाग प्रमुख राजेश तावडे, युवासेना उपतालुका प्रमुख सत्यवान सुतार, विभाग प्रमुख राहुल इस्वलकर ,…
View On WordPress
0 notes
Text
शहीद जवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शहीद जवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शहीद जवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार म. टा. प्रतिनिधी, सांगली काश्मीरमधील सोफियाँ भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान रोमित तानाजी चव्हाण (वय २४) यांच्या पार्थिवावर आज वाळवा तालुक्यातील शिगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीत रोहित चव्हाण यांच्यासह आणखी एक जवान शहीद झाला होता. रोमितचे पार्थिव काश्मीरमधून…
View On WordPress
0 notes
Text
प्रो-कबड्डी लीग सीजन-5 के लिए टीमें सजीं, अब मैदान मारने की बारी has been published on PRAGATI TIMES
प्रो-कबड्डी लीग सीजन-5 के लिए टीमें सजीं, अब मैदान मारने की बारी
नई दिल्ली, (आईएएनएस)| प्रो-कबड्डी लीग सीजन-5 के लिए मंगलवार को खिलाड़ियों की नीलामी प्रक्रिया संपन्न हो गई।
जुलाई में शुरू हो रही ��ीग के लिए 12 फ्रैंचाइजी टीमें सज चुकीं हैं और अब सबको मैदान मारने का इंतजार है। इस साल पुरानी आठ टीमों के अलावा चार नई टीमें भी अपना वर्चस्व कायम करने की कोशिश करेंगी। देश के बेहद लोकप्रिय इस लीग में इस साल तीन माह तक 130 से भी अधिक मुकाबले खेले जाएंगे। सीजन-5 के लिए सोमवार और मंगलवार को राजधानी दिल्ली में दो दिन खिलाड़ियों की नीलामी हुई। उल्लेखनीय है कि सीजन-5 के लिए लीग में चार नई टीमों को शामिल किया गया है, जिसमें तमिलनाडु, उत्तर प्रदेश, हरियाणा और गुजरात शामिल हैं। दो दिवसीय नीलामी प्रक्रिया में यूपी ने सबसे बड़ा दांव लगाकर नितिन तोमर को खरीदा। नितिन को यूपी द्वारा कबड्डी लीग के इतिहास में लगाई गई सबसे बड़ी बोली 93 लाख रुपये में खरीदा गया। इसके बाद रोहित कुमार को बेंगलुरू बुल्स ने 83 लाख रुपये, मंजीत चिल्लर को जयपुर पिंक पैंथर्स ने 75.5 लाख रुपये, बंगाल वॉरियर्स ने डिफेंडर सुरजीत सिंह को 73 लाख रुपये और जांग कुन ली को 80.3 लाख रुपये में खरीदा। कबड्डी लीग के सीजन-5 में के लिए सभी टीमों को 18 से 25 खिलाड़ियों का चयन किया था। ऐसे में कुछ टीमों ने 18, तो कुछ टीमों ने 24 खिलाड़ियों का चयन किया। दो दिनों तक चली नीलामी में 12 टीमों ने कुल 46.99 करोड़ रुपये खर्च किए। ए-वर्ग में जहां तोमर को सबसे अधिक बोली मिली वहीं बी वृर्ग में रेडर सुरज देसाई को टीम दिल्ली ने 52.5 लाख रुपये में खरीदा। यह इस वर्ग के लिए पीकेएल इतिहास की अब तक की सबसे बड़ी बोली है।पहले दिन ए वर्ग के 44 खिलाड़ियों का चयन किया गया वहीं दूसरे दिन बी वर्ग के 58 खिलाड़ियों का चयन हुआ। नीलामी में शामिल 10 पाकिस्तानी खिलाड़ियों को कोई खरीदार नहीं मिला जबकि ईरानी खिलाड़ी सबकी पसंद रहे। नीलामी में कुल 379 खिलाड़ी शामिल थे लेकिन अंतिम रूप से 227 खिलाड़ियों का चयन हुआ। दक्षिण कोरियाई टीम के कप्तान जांग कुन ली 80.3 लाख रुपये के साथ लीग में सबसे महंगे खिलाड़ी बने। उन्हें बंगाल वारियर्स ने अपने साथ जोड़े रखा है। टीमें :बंगाल वॉरियर्स :- रेडर- जांग कुन ली (रीटेन किए गए खिलाड़ी), अनिल कुमार, दीपक नरवाल, कुलदीप सिंह, मनिंदर सिंह, विनोद कुमार , वीरेंद्र वजीर सिंह डिफेंडर – अमिरेस मोंडाल, राहुल कुमार, संदीप मलिक , शशांक वानखेड़े, सुरजीत सिंह, य��ग चान को ऑलराउंडर- भुपेंदर सिंह, रण सिंह, रवींद्र रमेश कुमावत, विकास और श्रीकांत तेवतिया। बेंगलुरू बुल्स :-रेडर – अजय कुमार, गुरविंदर सिंह, हरीश नाइक, रोहित, रोहित कुमार, सिनोथरन कनेशहरजाह, सुमित सिंह, सुनील जयपाल डिफेंडर -कुलदीप सिंह, महेंद्र सिंह, प्रदीप नरवाल, रविंदर पहल, सचिन कुमार ऑलराउंडर – आशीष कुमार (रीटेन किए गए खिलाड़ी), अमित, अंकित सांगवान, प्रीतम चिल्लर और संजय श्रेष्ठा। दबंग दिल्ली :- रेडर – अबु फजल, आनंद पाटिल, रवि दलाल, रोहित बालियान, शुभम अशोक पाल्कर, सूरज देसाई, सुरेश कुमार, विपिन मलिक डिफेंडर – बाजीराव होगड़े, नीलेश शिंदे, सतपाल, सुनील कुमार, स्वप्निल दिलीप शिंदे, विराज विष्णु लांगड़े ऑलराउंडर – मिराज शेख (रीटेन किए गए खिलाड़ी), चेतन एस, रूपेश तोमर, तापस पाल, विशाल और यथार्थजयपुर पिंक पैंथर्स :- रेडर – अजीत सिंह, जसवीर सिंह, कमल किशोर, पवन कुमार कादियान, राहुल चौधरी, के. सेल्वामणि, सुनील सिद्धगावली, तुषार पाटिल डिफेंडर – जेई मिन ली, मनोज डुल, नवनीत गौतम, रविंदर कुमार, सोमवीर शेखर, विघ्नेश बी, ऑलराउंडर – एन. अभिषेक, डोंग ग्यू किम, मंजीत चिल्लर, सांतापानसेवलम और सिद्धार्थ पटना पाइरेट्स :- मौजूदा चैम्पियन रेडर – प्रदीप नरवाल (रीटेन किए गए खिलाड़ी), मोहम्मद जाकिर हुसैन, मोनू गोयाट, विजय, विकास जगलान, विनोद कुमार, विष्णु उथ्थम, डिफेंडर – जयदीप, मनीष कुमार, सचिन शिंगडे, संदीप, सतीष कुमार, विरेंद्र सिंह, विशाल मणे, ऑलराउंडर – अरविंद कुमार, जवाहर, मोहम्मद मघसोउदलु, परवीन बिलालपुनेरी पल्टन :- रेडर – दीपक निवास हुड्डा (रीटेन किए गए खिलाड़ी), अक्षय जाधव, जीबी मोरे, राजेश मोंडाल, रोहित कुमार चौधरी, सुरेश कुमार, उमेश मात्रे डिफेंडर – धर्मराज चेरालाथन, गिरीष मारुति एर्नाक, मोहम्मद जियाउर रहमान ऑलराउंडर- अजय, नरेंद्र हुड्डा, रवि कुमार, संदीप नरवाल, ताकामित्सु कोनो टीम यूपी :- रेडर – अजवेंदर सिंह, गुलवीर सिंह, महेश गौड़, नितिन तोमर, रेशांक देवाडिगा, सुलेमान कबीर, सुरेंद्र सिंह डिफेंडर – गुरविंदर सिहं, हादी तािजक, जीवा कुमार, नितेश कुमार, जूनियर रोहित कुमार, सनोज कुमार, बी.एस. संतोषऑलराउंडर – पंकज, राजेश नरवाल, बी. सागर कृष्णा, सुनील टीम तमिलनाडु – रेडर – अजय ठाकुर (प्रायट्री पिक), भवानी राजपूत, डोंग गियोन ली, के. प्रपनजान, एम. थिवाकरन, सारंग अरुण देशमुख, सोमबीर, विनीत शर्मा, वलीद अल हसानी डिफेंडर – अमित हुड्डा, अनील कुमार, अनील कुमार, सी. अरुण, जे. दर्शन, मुगिलन, राजेश, संकेत चव्हाण, टी. प्रभाकरन, विजय कुमार, विजिन थंगादुराईऑलराउंडर – अनंत कुमार, चान सिक पार्क, प्रताप और सुजीत महाराणा टीम हरियाणा :- रेडर – आशीष चोकर, दीपक कुमार दहिया, खोमसान थोंगखाम, प्रशांत कुमार राय, सोनू नरवाल, सुरजीत सिंह, विकाश खंडोला, वजीर सिंह डिफेंडर – एम. बाबु, जीवा गोपाल, महेंद्र सिहं ढाका, मोहित चिल्लर, नीरज कुमार, राजू लाल चौधरी, राकेश सिंह कुमार, विकास ऑलराउंडर- डेविड मोसाम्बायी, दीपक कुमार राठी, कुलदीप सिंह, मयूर शिवतारकर, प्रमोद नरवाल तेलुगू टाइटंस :- रेडर – राहुल चौधरी (रीटेन किए गए खिलाड़ी), अंकित मलिक, अथुल एमएस, मोहसेन एम., मुनीष, निलेश सालुंके, विकास, विकास कुमार, विक्रांत, विनोद कुमार डिफेंडर – अमित सिंह चिल्लर, फरहाद रहीमी मिलाघारदान, रोहित राणा, सोमबीर, विनोद कुमार ऑलराउंडर – आर. एलानगेश्वरन, राकेश कुमार, विशाल भारद्वाज यू मुम्बा :- रेडर – अनूप कुमार (रीटेन किए गए खिलाड़ी), दर्शन, काशीलिंग अडाके, मोहन रमन, नितिन मदाने, शब्बीर बापू, श्रीकांत जाधव डिफेंडर – डी.सुरेश कुमार, जोगिंदर नरवाल, एन. रणजीत, सुरेंदर सिंह ऑलराउंडर – डोंग जू होंग, ई. सुभाष, हादी ओस्तोराक, कुलदीप सिंह, शिव ओम, जोंग जू ओकटीम गुजरात :- रेडर – अमित राठी, चंद्रन रणजीत, महेंद्र गणेश राजपूत, पवन कुमार शेरावत, राकेश नरवाल, सचिन, सुकेश हेगड़े, सुल्तान डांगे डिफेंडर – फजल अतराचली (प्रायट्री पिक), अबोजार मोहाजेर मिघानी, सी. कालाई अरासान, मनोज कुमार, प्रवेश बैंसवाल, सुनील कुमार, विकास काले ऑलराउंडर – महिपाल नरवाल, रोहित गुलिया, सेयोंग रेयोल किम
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 October 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांच्या सद्यस्थितीचा अहवाल तातडीनं सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश;राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची राज्यसरकारला नोटीस
आरोग्यासह विविध समस्यांवर चर्चेसाठी विधीमंडळाचं दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी
बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ;इंग्लंडला हरवत न्यूझीलंडची विजयी सलामी
आणि
आशियाई क्रीडा स्पर्धेत कालही भारताची तीन सुवर्णपदकांना गवसणी
****
राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयांच्या सद्यस्थितीचा अहवाल तातडीनं सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून राज्यातल्या आरोग्य सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमली असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाही दिलेले आहेत, त्यामुळे औषध खरेदीत विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं मुख्यमंत्र्यांनी सूचित केल���.
**
शासकीय रुग्णालयातल्या मृत्यू प्रकरणी स्वतःहून दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य शासनाच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे. चार आठवड्यांत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल द्यावा, असं त्यात म्हटलं आहे.
****
दरम्यान, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी काल नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तसंच रुग्णांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही काल या रुग्णालयाला भेट दिली. शिंदे सरकार संवेदनाहीन असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
****
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातल्या डॉक्टरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिष्ठाता आणि बालरोग विभागातल्या डॉक्टरांनी जाणीवपूर्वक उपचाराकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे या रुग्णालयात आई आणि नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.
****
आरोग्यासह राज्यातल्या विविध समस्या हाताळण्यात शिंदे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून, या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचं दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिलं. शासकीय रुग्णालयांमधल्या मृत्यूप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांवर कारवाई करावी, मृत रुग्णांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी, शासनसेवेतली पदं कंत्राटी स्वरुपात भरण्याचा शासननिर्णय तत्काळ रद्द करावा, आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीसंदर्भात आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षाचं निवडणूक चिन्ह मिळावं आणि अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता मिळावी, यासाठी अर्ज केला आहे. या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोध केला आहे.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची कोविड काळातली देय नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना आठ दिवसात दिल्यास, पीक विमा कंपन्यांवर कारवाईचा इशारा, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या योजनेत सहभागी असलेल्या सहा कंपन्यांपैकी चार कंपन्यांकडून दोनशे चोवीस कोटी रुपये येणं बाकी आहे, कोविड ही जागतिक आपत्ती ��ोती, त्यामुळे कंपनीने सह��ार्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन मुंडे यांनी केलं आहे.
****
सिक्कीम मध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १८ वर पोहोचली असून, २६ जण जखमी झाले आहेत. तर लष्कराच्या सैनिकांसह सुमारे शंभरावर लोक बेपत्ता आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातले सैनिक पांडुरंग तावरे यांचाही समावेश आहे. ते पाटोदा तालुक्यातल्या काकडहिरा इथले रहिवासी आहेत.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या काल बहीण-भावाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. अश्विनी जाधव आणि रोहित चव्हाण असं यांचं नाव असून, ते दोघं कपडे धुण्यासाठी ता तळ्यावर गेले असताना ही दुर्घटना घडली.
अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा इथं देखील कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. दीपक, सानिया आणि कृष्णा सुरवसे अशी त्यांची नावं असून, हे तिघेही आई-वडिलांना कपडे धुण्यात मदत करण्यासाठी तलावावर गेले असता हा अपघात झाला.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडनं ५० षटकात नऊ बाद २८२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या संघानं ३७व्या षटकात एक गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. भारताचा या स्पर्धेतला पहिला सामना येत्या रविवारी ऑस्ट्रेलियासोबत चेन्नईत होणार आहे.
****
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल १२ व्या दिवशी भारतानं तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारत २१ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ३३ कांस्य पदकांसह एकूण ८६ पदकं जिंकून पदक तालिकेत चौथ्या क्रमांकावर कायम आहे.
‘‘तिरंदाजीत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी सुवर्ण पदक पटकावलं. पुरुष संघानं दक्षिण कोरियाचा, तर महिला संघानं तैवानचा पराभव केला. स्क्वॅश मध्ये मिश्र दुहेरी प्रकारात दिपिका पल्लिकल आणि हरिंदर पाल संधू या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं. स्क्वॅश मध्येच पुरुष एकेरीत सौरव घोषालनं रौप्य, तर कुस्तीमध्ये अंतिम पंघालनं कांस्य पदक जिंकलं. बॅडमिंटनमध्ये एच. एस. प्रणॉयनं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. भारताच्या पुरुष कबड्डी संघानं अ गटातलं प्रथम स्थान कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.’’
****
दिव्यांग बांधवांना शासनातर्फे विविध सोयी सवलती मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. हिंगोली इथं काल 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी' या उपक्रमात ते बोलत होते. दिव्यांग लाभार्थ्यांना आवश्यक असलेल्या विविध प्रमाणपत्रांचं यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आलं.
****
काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी अधिष्ठातांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं. नांदेडच्या रुग्णालय अधिष्ठातांना स्वच्छतागृहाची सफाई करायला लावणारे खासदार हेमंत पाटील यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. धुळे इथंही या मागणीसाठी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं.
****
पर्यावरणविषयक पत्रकारितेसाठी अर्थ जर्नालिझम नेटवर्क या संस्थेच्या अक्षय ऊर्जा कार्यशाळेला काल छत्रपती संभाजीनगर प्रारंभ झाला. आयआयटी पवईच्या पर्यावरण विभागातले प्राध्यापक डॉ. श्याम असोलेकर यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ पर्यावरणासाठी जागरूकतेने प्रयत्न करण्याची गरज डॉ असोलेकर यांनी व्यक्त केली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातून संवादक, तज्ज्ञ आणि संशोधक सहभागी झाले आहेत. काल पहिल्या दिवशी, प्रयास चे अश्विन गंभीर, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे महाव्यवस्थापक विनोद शिरसाट आदींनी मार्गदर्शन केलं.
****
`मेरी माटी - मेरा देश` अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे काल शहरात अमृत कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते, नागरिकांनी यावेळी कलशात माती संकलित केली. ही माती दिल्ली इथं अमृत वाटिकेसाठी पाठवली जाणार आहे.
****
बीड जिल्ह्यात गेवराई इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या संस्थेतल्या सर्व कर्मचारी प्रशिक्षणार्थींनी उपजिल्हा रुग्णालयाचा परिसरही स्वच्छ केला.
वडवणी इथंही काल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह डॉ. बाबासाहेब अंबेडकर चौक आणि महादेव मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
****
शिवसेना ठाकरे ��टाच्या वतीने जनतेशी संवाद साधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात सुरु असलेल्या होऊ दे चर्चा या उपक्रमात काल माजी खासदार चंद्रकांत खैरे सहभागी झाले होते. आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षांचा पराभव निश्चित असल्यानं त्या धास्तीनं सरकार निवडणूक घेत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. या उपक्रमाअंतर्गत पक्षाचे नेते जनतेशी संवाद साधत आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्यातल्या कृषी सहाय्यकांची एक हजार चारशे एकोणचाळीस रिक्त पदं तातडीनं भरणार - कृषी मंत्री अब्दुल सत्तार.
खासगी शाळांमधलं शुल्क ठरवण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार - शिक्षण मंत्री दीपक केसरकर.
सूतगिरण्यांना राज्य शासन आणि बँकेकडून एकाच वेळी भांडवल उपलब्ध करुन देणारी कार्यप्रणाली आखणार - वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील.
आणि
विरोधी पक्ष, सत्ताधारी आमदारांची विधानभवन परिसरात निदर्शनं.
****
राज्यातल्या कृषी सहाय्यकांची एक हजार चारशे एकोणचाळीस रिक्त पदं तातडीनं भरण्यात येतील यासाठी येत्या १५ दिवसात जाहिरात काढण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रातली पदं –‘पेसा’च्या संदर्भात आदेश दिले आहेत त्यामुळे ‘पेसा’ची पदं वगळून अन्य पदं भरण्यात येतील, असं सत्तार यांनी सांगितलं.
****
खासगी शाळांमधलं शुल्क ठरवण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. समाधान अवताडे, राजेश टोपे, रोहित पवार, विजय वडेट्टीवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातल्या एका शाळेत शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्याना डांबून ठेवल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर केसरकर बोलत होते. विनाअनुदानित शाळेचं शुल्क किती असावं हे राज्य शासन ठरवत नसल्यानं अनेकदा या शाळांमधल्या शुल्कासंदर्भात अनेक तक्रारी राज्य शासनाकडे येत असतात. ही समिती येणाऱ्या काळात याबाबत काम करेल. तसंच या प्रश्नाबाबत अधिवेशन संपल्यानंतर एक बैठकही घेण्यात येईल,असं केसरकर म्हणाले.
****
थकीत वीज देयकामुळं कुठल्याही सरकारी शाळेचा वीज पुरवठा यापुढं खंडीत केला जाणार नाही. सर्व सरकारी शाळांची वीज देयकं शालेय शिक्षण विभाग भरेल असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. शाळांना सौर ऊर्जा वापरण्याच्��ा सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. थकीत वीज देयकांसाठी सार्वजनिक बाबींचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये आणि राज्य सरकारनं याविषयी तातडीनं धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षेनेते अजित पवार यांनी केली होती. हा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला जाईल, असंही केसरकर म्हणाले. राज्यात प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयं, प्राथमिक आरोग्य केंद्रं, उपजिल्हा रुग्णालयं, जिल्हा रुग्णालयं, ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकीत देयकांसाठी खंडीत करण्याच्या घटना घडत आहेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं होतं.
****
सूतगिरण्यांना राज्य शासन आणि बँकेकडून एकाच वेळी भांडवल उपलब्ध करुन देणारी कार्यप्रणाली आखणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य बळवंत वानखेडे, योगेश सागर यांनी संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी पुन्हा सुरू करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नवीन वस्त्रोद्योग धोरणामध्ये यापुढे वैयक्तिक ५ टक्के रक्कम तयार ठेवल्यानंतरच राज्य शासन आणि बँकांची रक्कम एकाच वेळी कशी देता येईल याची आखणी करण्यात येणार असल्याचं मंत्री पाटील म्हणाले.
****
राज्यातल्या धान उत्पादक ��ेतकऱ्यांना आधारभूत किंमती व्यतिरिक्त प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येत असल्याचं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितलं. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना चव्हाण बोलत होते. गेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर १५ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
****
राज्यातल्या पात्र शिधापत्रिकाधारकांना काल गुढीपाडव्याला सुरु करण्यात आलेल्या ‘आनंदाचा शिधा’ संचाचं वितरण पुढील महिनाभर सुरु राहणार असल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत औरंगाबाद आणि अमरावती विभागातले सर्व जिल्हे तसंच नागपूर विभागातले वर्धा, अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतल्या केशरी-शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना हा ‘आनंदाचा शिधा’ वाटप केला जात आहे.
****
विधीमंडळ सुरु असताना विधीमंडळाच्या कामकाजालाच मंत्र्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे, अशी मागणी विधान सभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळं विधानसभेत आज प्रश्न क्रमांक दोन राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली. या गोष्टी सभागृहात वारंवार घडत आहेत. सभागृहात चुकीचे पायंडे पाडता कामा नये, अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.
****
राज्यात धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना वाढत असून सरकारनं या घटनांची गांभीर्यानं नोंद घेतली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. याला आळा घालण्यासाठी कायदा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव विचाराधीन असून यावर सरकार योग्य निर्णय घेईल, असंही त्यांनी यावेळी एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात नमूद केलं.
****
महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजही विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत राज्य सरकारविरोधी निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांनी आंदोलक आमदारांचं नेतृत्त्व केलं. ‘बिरबलाची खिचडी’ म्हणून चूल मांडून शिंदे सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. सत्ताधारी आमदारांनीही यावेळी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी घोषणाबाजी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सकाळी आंदोलन करताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राहुल गांधी यांच्याविरोधात अवमानकारकरित्या आंदोलन केल्याकडे काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्षांचं लक्ष वेधलं. याबद्दल थोरात म्हणाले की –
(काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात)
येथे ज्या पद्धतीनं राहुलजींचा फोटो आणि त्यावर घोषणा जोडे मारो आणि त्यामध्ये आविर्भाव तसे करणं, या��ूर्वी अशा प्रकारचं झालेलं नव्हतं, अशी घटना कधी पूर्वीची नाही. दुर्दैवानं आज ती पाहावयास मिळाली. शेवटी सर्व पक्षांना सुद्धा राष्ट्रीय पातळीला, राज्य पातळीला नेते आहेत. असं जर संसदेच्या, विधानभवनाच्या परिघामध्ये असं घडत असेल आणि त्या पद्धतीने ते चालत असेल तर कधीही दुसऱ्या पक्षाच्या सुद्धा नेत्यांच्या बाबतीत हे घडू शकतं ही वस्तूस्थिती आहे.
ही राज्याची संस्कृती नाही, असे प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी पवार यांनीही केली. सत्ताधारी पक्षाचे सदस्य पुन्हा असे प्रकार करणार नाहीत असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात बोलणाऱ्यांचा निषेध झाला पाहिजे असंही फडणवीस म्हणाले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या असंसदीय आंदोलनाची चौकशी करण्याचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. असे प्रकार यापुढे पुन्हा घडले तर कठोर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.
****
पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतुनं गडचिरोली जिल्ह्यात पेरून ठेवण्यात आलेली शक्तीशाली स्फोटकं विशेष अभियान पथकाच्या पोलिसांनी शोधून नष्ट केल्यानं मोठा घातपात काल टळला. नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात नेलगुंडा गावाजवळ रस्त्याच्या कडेलगत ही स्फोटकं पुरुन ठेवली होती. प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातल्या नक्षलवाद विरोधी अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना त्यांनी ही स्फोटकं शोधली.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग अध्यासन केंद्रातर्फे ‘शहीद भगतसिंग यांची सामाजिक - सांस्कृतिक प्रतिमा’ या विषयावर आज एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. भगतसिंग अनेक अंगांनी समृद्ध असं व्यक्तिमत्व आहे. आजही नवीन क्रांतीसाठी भगतसिंगाचे विचार प्रेरणादायी असल्याचं प्राध्यापक तानाजी ठोंबरे आपल्या बीजभाषणात म्हणाले. भगतसिंग हे आधुनिक युगाचे महानायक असल्याचं प्रतिपादन प्राचार्य डॉ.शिवाजी देवडे यांनी उद्घाटनपर भाषणात केलं. ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. पहिल्या सत्रात ‘शहीद भगतसिंग यांची सामाजिक प्रतिमा’ या विषयावर डॉ. मारोती तेगमपुरे यांनी भगतसिंगांचे क्रांती कार्य आणि विचारविश्वाचा आढावा घेतला.
****
धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातल्या रोहकल इथल्या सरपंचाचा पती हनुमंत कोलते याला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. दुहेरी पंप लघू योजनेचं काम पूर्ववत सुरु ठेवण्यासाठी त्यानं ही लाच मा��ितली होती. सौर ऊर्जेवर आधारित या योजनेतल्या प्रकल्पाचं १८ ला�� रुपयांचं काम सुरु ठेवण्यासाठी कोलतेनं पर्यवेक्षकाकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं लाच घेताना त्याला अटक केली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे माजी मुख्यम��त्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये आज हैद्राबाद इथं भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश केला. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेणार असल्याचं जाधव यांनी यावेळी सांगितलं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
· प्रजासत्ताक दिनानिमित्त नवं, बलशाली राज्य घडवण्याच्या दृष्टीनं संकल्प करू या - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आवाहन.
· निर्भया पथकामुळं महिला सुरक्षेच्या कामाला अधि�� बळकटी प्राप्त होणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही.
· मराठवाड्यात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा.
आणि
· राज्यात कर वाढण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत.
****
राष्ट्रनिर्माण कार्यात महाराष्ट्राचं मोठं योगदान असून स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताना आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवं, बलशाली राज्य घडवण्याच्या दृष्टीनं संकल्प करूया, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथं त्र्यहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यावेळी कोश्यारी बोलत होते. राज्यानं आरोग्य, पर्यावरण, उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, पर्यटन, वनं, सर्वसामान्यांना घरं, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा अशा विविध क्षेत्रात गेल्या अडीच वर्षात भरीव कामगिरी केल्याचं ते यावेळी म्हणाले. कोश्यारी यांनी यावेळी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
****
निर्भया पथकामुळं महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी प्राप्त होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून निर्भया पथकासह विविध निर्भया उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. निर्भया संकल्पगीताचं लोकार्पण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते झालं. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातलं हे गीत, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी तयार केलं आहे. शेट्टी यांनी यावेळी ५० लाख रुपये निधी निर्भया पथकासाठी दिला. याच निमित्तानं मुख्यमंत्री निधीत धनादेशाद्वारे जमा झालेला ११ लाख रुपये निधीही महिला सुरक्षिततेच्या कामासाठीच वापरला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी बोलताना, निर्भया प्रकरणानंतर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढल्याची माहिती दिली. विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते निर्भया बोधचिन्हाचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
****
मराठवाड्यामध्ये प्रजासत्ताक दिन आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ऐकू यात या संदर्भातला वृत्तांत –
औरंगाबाद इथं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. त्याची दखल राज्य मंत्रिमंडळानं घेतली असल्याचं सांगत देसाई यांनी प्रशासनाचं कौतुक केलं. विविध विकासात्मक कामांमुळं जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचं देसाई म्हणाले.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. देवगिरी किल्यावर नायब तहसिलदार प्रशांत देवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. वीज महावितरण परिमंडल कार्यालयात व्यवस्थापकीय सहसंचालक डॉ. मंगेश गोंदावल�� यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी घटना उद्देश पत्रिकेचं कर्मचाऱ्यांनी सामुहिक वाचन केलं.
जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण करण्यात आलं.
नांदेड इथं पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. चव्हाण यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरीक, पत्रकार, युवक युवती यांना शुभेच्छा दिल्या. पोलीस तसंच विविध दलाच्या पथकांनी यावेळी मानवंदना दिली.
बीड इथं पोलिस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस दलातले अधिकारी-कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुंडे यांनी स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
उस्मानाबाद इथं पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते तुळजाभवानी क्रीडासंकुलाच्या मैदानावर मुख्य ध्वजारोहण झालं. उस्मानाबाद जिल्हा आकांक्षीत जिल्हा म्हणून केंद्र सरकारनं जाहीर केला असून विविध क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून प्रयत्न होत केले जात असल्याचं गडाख यांनी सांगितलं.
लातूर इथं पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं देशमुख यांनी मानवंदना स्वीकारून, उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोविड प्रादुर्भावाचा राज्याने तसंच लातूर जिल्ह्याने केलेल्या मुकाबल्याचा उल्लेख करत, संसर्ग टाळण्यासाठी नियमांचं पालन करावं, असं आवाहन देशमुख यांनी केलं. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकाला ५० हजार रुपये मदतनिधी दिला जातो, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ११६ मृतांच्या वारसांना सानुग्रह मदत निधी देण���यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. कोविडजन्य परिस्थितीत दोन्ही पालक गमावलेल्या जगनाथ नागोराव गाडे तसंच पंढरीनाथ महादू कांदे या बालकांना पाच लाख रुपये मुदतठेवीचं प्रमाणपत्र देण्यात आलं.
हिंगोली शहरात संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर राज्याचे शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. कोविडमुळं अनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपये ठेवीचं प्रमाणपत्र देण्यात आलं. वीर मातेला सरकारच्या वतीनं चार एकर जमीन प्रदान करत असल्याचं प्रमाणपत्रही सुपूर्द करण्यात आले.
हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी, औरंगाबाद
****
राज्याचा अर्थसंकल्प अकरा मार्च रोजी जाहीर केला जाणार असून राज्यात कर वाढणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री ��संच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्गामुळं राज्यांना खूप फटका बसला आहे. गेल्या काळात `एक राष्ट्र, एक कर` असा निर्णय झाला आणि सेवा आणि वस्तू कर आला. त्याला आता पाच वर्ष झाली आहेत. त्या पाच वर्षांच्या काळात केंद्र ठराविक रक्कम राज्यांना देत होतं. ती आता बंद होणार आहे, असं पवार म्हणाले. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी कोरोना विषाणू संसर्गाची दोन वर्ष कठीण गेली असून अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं त्या पाच वर्षांमध्ये अजून दोन वर्ष वाढवावी, अशी मागणी केंद्र सरकारला केली आहे. आता त्यावर काय निर्णय घेतात ते पहावं लागेल, असंही पवार म्हणाले.
****
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग येत्या एक फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालना इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजरोहण कार्यक्रमप्रसंगी ते आज बोलत होते. आपल्याला कोरोना विषाणू संसर्गा बरोबर राहायचं असल्यामुळं कृती दल आणि केंद्र सरकारच्या सुचनांचं पालन करावं लागेल, असं ते म्हणाले. राज्य, समाज आणि स्वतःच्या सुरक्षीततेसाठी नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावं, नियमांचं पालन करावं, त्याद्वारे आपण लवकर संसर्गावर मात करू शकू, असं ते म्हणाले. संसर्गामुळं राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आला आहे. निर्बंध लावण्यात आल्यानं उद्योजकांना नुकसान होत आहे. महसूल देखील कमी प्रमाणात जमा होत असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात ऑलिंपिक दर्जाच्या दहा मीटर `एअर फायरिंग रेंज` आणि मुष्टीयुद्ध `रिंग`चं लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज झालं. पोलिस दलातल्या उदयोन्मुख खेळाडुंसह इतर खेळांडुंना सरावासाठी याचा उपयोग होऊन त्यांच्या खेळाचा दर्जा अधिक सुधारेल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल असं देसाई यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरात राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातल्या कर्मचाऱ्यांनी आज `भीक मागा` आंदोलन केलं. तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. आजच्या आंदोलनातून जमा झालेले पैसे निषेध नोंदवण्यासाठी प्रशासनाला पाठवणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी इथं आज पहाटे झालेल्या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन ट्रक आणि एका सात आसनी वाहनांदरम्यान हा भीषण अपघात झाला. गंभीर जखमींमधे दोन पुरुष, दोन महिला, आणि तीन लहान मुलांचा समावेश असून हे सर्व उस्मानाबाद इथले राहणारे आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क कर�� शकता.
****
** कोविड संसर्गाचा दुप्पट झालेला दर आणि ओमायक्रॉनची वाढती रुग्णसंख्या - या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोविड नियमांचं काटेकोर पालन करावं - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
** औरंगाबाद इथं ओमायक्रॉनचे दोन रुग्ण; दोघेही परदेश प्रवास करून आल्याची माहिती
** टीईटी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या घरातून २४ किलो चांदी, दोन किलो सोनं आणि काही हिरे जप्त
आणि
** औरंगाबाद जिल्ह्यात रस्त्यालगत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे निर्देश
****
राज्यात कोविड संसर्गाचा दर दुप्पट झाला असून, ओमायक्रॉनची रुग्णसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून सर्व कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज जालना इथं माध्यमांशी बोलत होते. राज्यात कोविडची तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची असेल, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता, सण तसंच नववर्षाचं स्वागत करताना, निर्बंधांकडे दुर्लक्ष करू नये, अशी सूचना टोपे यांनी केली आहे. ते म्हणाले...
माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की, आपण सण आहे. नवीन वर्षाचं स्वागत आहे. निश्चित प्रकारे करावं, परंतू निर्बंध लक्षात घेऊन त्याचं अनुपालन करत करत या सगळ्या गोष्टी कराव्यात. सध्या जो सहाशे सातशेचा आकडा दररोजचा होता, तो आता चौदाशेवर दररोज चालला आहे. याची गती जर अशी वाढत गेली तर हे नक्कीच आहे की, तिसरी लाट जर आली तर ती आता ओमायक्रॉनचीच राहील. म्हणुन आपल्या सगळ्यांना काळजी घ्यायची आहे. एवढीच माझी यानिमित्ताने नम्रता पूर्वक सुचना आहे.
केंद्राने आता कोविड प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेणं गरजेचा असून आता याबाबत निर्णय घ्यायला हवा अशी मागणीही टोपे यांनी केली. १२ ते १८ वर्ष वयोगटातल्या बालकांना लसीकरण करण्यासाठी केंद्राकडे मागणी केली असून, याबाबत निर्णय व्हायला पाहिजे असंही ते म्हणाले.
****
औरंगाबाद इथं ओमायक्रॉनचे आज दोन रुग्ण आढळले. यापैकी एक रुग्ण लंडनहून कुटूंबासह मुंबईमार्गे औरंगाबाद इथं आला आहे. या कुटुंबातली एक तरुणी मुंबईत झालेल्या तपासणीत ओमायक्रॉन बाधित आढळली होती. तिचे ५५ वर्षीय वडील औरंगाबाद इथं झालेल्या तपासणीत बाधित असल्याचे आढळलं आहे. दुसरा रुग्ण ३३ वर्षाचा तरुण असून, तो दुबईहून औरंगाबाद इथं आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८४वा भाग असेल. आकाशवाणी आ��ि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
लोकशाहीत सत्तेच्या माध्यमातून गरीबांचे अश्रू पुसायचे असतील तर सर्वांनी दिवगंत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं सुशासन अंगिकारणं आवश्यक असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नागपूर इथं वाजपेयी यांचा जयंती निमित्त सुशासन दिवस कार्यक्रमात बोलत होते.
****
वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आज उस्मानाबाद इथं लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोहित शशिकांत निंबाळकर यांना रक्तदान सेवेबद्दल, बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं अनाथ मुलांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारे गर्जे दांपत्य आणि वर्षानुवर्षे करत असलेल्या अंत्यविधीच्या सेवेसाठी उस्मानाबाद इथले बाळासाहेब गोरे यांना लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा आणि सोयीसुविधा द्यायलाच हव्यात, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात ‘अटलशक्ती महासंपर्क अभियानाची सुरुवात आज चंद्रकांत पाटील यांनी केली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिक्षक पात्रता परीक्षा - टीईटी रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी, आरोग्य विभागातील भरती, म्हाडा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत. याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयमार्फेत करावा या मागणीचाही पाटील यांनी पुनरुच्चार केला.
****
आरोग्य भरतीच्या परीक्षेबाबत विधिमंडळात चर्चा झाली असून, पुन्हा परीक्षेबाबतचा निर्णय पोलीस तपासाचा अहवाल आल्यानंतर घेतला जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते आज जालन्यात बोलत होते. यापुढे राज्यात खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही असंही टोपे यांनी सांगितलं. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल असं टोपे म्हणाले.
****
शिक्षक पात्रता परिक्षा टीईटी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी मोठं घबाड जप्त केलं आहे. पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या बंगळुरू इथल्या घरातून काल रात्री तब्बल २४ किलो चांदी दोन किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विनकुमार हा जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात रस्त्यालगत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात ''ऍडव्हायझरी कमिटी फॉर सेफ फूड अँड हेल्दी डाएट'' या विषयावर झालेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते. पर्यंटकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न देण्याची जबाबबदारी अन्न औषध प्रशासनाची असल्याने ही जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पडावी अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. शहरात पुरवठा होणाऱ्या दुधाची शुद्धता तपासणी करावी, अन्न प्रक्रिया आणि निर्मिती उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी, रस्त्यालगत असलेल्या खाद्यपदार्थांच्या ठेल्यांवरच्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता तपासणी करावी, तसंच पदार्थ तळण्यासाठी तेलाचा दोन पेक्षा अधिक वेळा पुनर्वापर वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अन्न औषध प्रशासनाला दिले आहेत.
****
उस्मानाबाद इथल्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष केशव तुकाराम पाटील यांचं आज राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. उस्मानाबाद जनता बँकेचेही ते काही काळ संचालक होते. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. उस्मानाबादच्या शैक्षणिक वाटचालीत त्यांचा मोठा सहभाग होता.
****
जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबाद तालुक्यातल्या पिंपळखुटा इथल्या राजू खोसरे यांच्या शेतवस्तीवर काल मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. चार ते पाच दरोडेखोरांनी घरातल्या पाच महिलांना काठी आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
इतर मागासवर्ग ओबीसी आरक्षणासंदर्भात समता परिषद आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलच्या वतीने आज औरंगाबाद इथं सेवन हिल परिसरात निषेध म्हणून केंद्र सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आलं.
****
लातूर शहरातल्या दिव्यांग, निराधार, विधवा आणि इतर पात्र व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रभागात समाधान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विधिज्ञ किरण जाधव यांच्या हस्ते लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये समाधान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
****
0 notes
Text
युवासेना आयोजित रक्तदान शिबिरात 32 रक्तदात्यांचे रक्तदान
युवासेना आयोजित रक्तदान शिबिरात 32 रक्तदात्यांचे रक्तदान
संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची उपस्थिती कणकवली : युवा सेनेच्या वतीने वैभववाडी तालुका आयोजित रक्तदान शिबिरात 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्या वेळीशिवसेना संपर्कप्रमुख सिंधुदुर्ग अरुण दुधवडकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू,युवासेना तालुका चिटणीस रोहित पावसकर, वैभववाडी माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, शिवसेना विभाग प्रमुख राजेश तावडे, युवासेना उपतालुका प्रमुख सत्यवान सुतार, विभाग प्रमुख राहुल…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 September 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ सप्टेंबर २०२१ सकाळी ७.१० मि. ****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** राज्यात आता, २२ ऑक्टोबरपासून चित्रपट आणि नाट्यगृहे सुरू करण्यासही परवानगी
** समृध्दी महामार्ग नांदेडला जोडण्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया येत्या मार्च-२०२२ पर्यंत पूर्ण होईल- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
** ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला प्रारंभ
** राज्यात तीन हजार, २७६ नवे कोविड बाधित रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर ९२ बाधित
आणि
** जालना जिल्ह्यात सर्वत्र दमदार तर परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात संततधार पाऊस
****
राज्यात शाळा, धार्मिक स्थळांपाठोपाठ आता, २२ ऑक्टोबरपासून चित्रपट आणि नाट्यगृहे सुरू करण्यासही परवानगी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं आहे. कृती दल सदस्य खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास तसंच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी काल मुख्यमंत्र्या��नी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
आरोग्याचे नियम पाळून ही परवानगी देण्यात येईल, यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती तयार करण्याचं काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. परब यांना येत्या २८ सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात परब यांना याआधी ३१ ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांचे कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे.
****
पंतपधान नरेंद मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या 'मन की बात ' कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८१ वा भाग असेल. दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
मराठवाड्यात मुंबई - नागपूर समृध्दी महामार्ग नांदेडला जोडण्यास मंत्रीमंडळ उपसमितीनं मान्यता दिल्यानं जालना-परभणी-हिंगोली-नांदेड या चारही जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार असून येत्या मार्च -२०२२ पर्यंत संबंधीत भूसंपादन प्रक्रीया पूर्ण होईल अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. मराठवाड्यात अतिजलद रेल्वेसाठीही केंद्रीय मंत्री नितिन गडकरींसोबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या कुंभेफळ इथं १४ व्या वित्त आयोगातून महिला आणि बालकांसाठी सुसज्ज रुग्णालय इमारतीचं लोकार्पण तसंच कुंभेफळ इथल्या विविध विकास कामांचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, यावेळी बोलतांना त्यांनी मराठवाड्याच्या विकासाकरीता दळणवळणाची साधनं तसंच रस्त्याच्या कामांकरीता निधीची कमत���ता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली.
पुढील तीन वर्षात मराठवाड्यात जवळपास ९०० किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वरुड काझी ते एमआयडीसी, लाडगाव ते जडगाव या रस्त्यांकरीता ४ कोटी रुपये निधी देखील उपलब्ध करुन देण्यात येईल, असं आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिलं.
यावेळी बोलतांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी नुकसान झालेल्या फळबागांकरीता जाचक अटी रद्द करुन छाननी समिती देखील बरखास्त करण्यात आली आहे, यामुळे शेतकऱ्यांना निश्चित मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
****
जालना जिल्ह्यात सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी आवश्यक कामं करण्याबरोबरच प्रलंबित कामं पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास ��ंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. यासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कामे पूर्ण करताना प्रशासकीय पातळीवर येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवण्यात येतील, असं पाटील यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, या आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांची कामं आणि दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे केली. आमदार कैलास गोरंट्याल, आमदार बबनराव लोणीकर,आमदार नारायण कुचे यांनीही विविध कामांसाठी जलसंपदा मंत्र्यांकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
****
औरंगाबाद इथं काल ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल झालं. यावेळी बोलतांना त्यांनी मराठी भाषा विद्यापीठ निर्माण करण्यासाठी शासनानं समिती स्थापन केली असल्याचं सांगितलं. पैठण इथं संतपीठही लवकरच पूर्णवेळ कार्यान्वित होत असल्याचं ते म्हणाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उदघाटनानंतर निमंत्रितांचं कवी संमेलन काल झालं, त्यानंतर प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर आली आहे या तसंच आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर या विषयांवर परिसंवाद झाले. रात्री लिव्ह इन रिलेशनशिप नाट्यप्रयोग सादर झाला. आज या संमेलनाचा समारोप होणार आहे.
****
राज्यात काल तीन हजार, २७६ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख, ४१ हजार, ११९ झाली आहे. काल ५८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३८ हजार ८३४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार ७२३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ६० हजार ७३५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक २४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३७ हजार, ९८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ९२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातील दोन, तसंच औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात काल ३२ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात २८, औरंगाबाद १७, लातूर १०, जालना तीन, तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला, परभणी जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
लातूर जिल्ह्यात नवनवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, तसंच जिल्ह्याला ‘क्रीडा केंद्र’ करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं खासदार सुधा��र शृंगारपुरे यांनी म्हटलं आहे. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त नेहरु युवा केंद्रातर्फे आयोजित फिट इंडिया फ्रीडम दौडचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या दौडमध्ये सहभाग नोंदवला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा इथंही युवा संकल्प दौंडच आयोजन करण्यात आलं होतं. केंद्राचे जिल्हा समन्वयक धनंजय काळे यांनी हिरवा झेंडा दाखवून संकल्प दौडचं उद्घाटन केलं.
नेहरू युवा केंद्राची नांदेड शाखा आणि भारत सरकारच्या युवा कार्य आणि खेळ मंत्रालयाच्या वतीनं आज नांदेड इथंही फिट इंडिया रन घेण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी हिरवा झेंडा दाखवून या दौडची सुरुवात केली.
****
बीडच्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांची एक सदस्यीय प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कारभारात अनियमितता आढळून आल्यानं भारतीय रिजर्व बँकेनं या बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यात शिवना नदी काठच्या सर्व नुकसानग्रस्त भागांची खासदार इम्तियाज जलील यांनी काल पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गंगापूर, कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील नुकसानीसंदर्भात आढावा बैठक घेतली. नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी सविस्तर अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवडी इथं वीज पुरवठा खंडित केल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी काल औरंगाबाद-नांदेड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. जवळपास दिड तास नागरिकांनी रस्ता अडवल्यानं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वीज बिलं न भरल्यानं महावितरण कंपनीनं आठ दिवसांपासून अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
****
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कालही पावसाचा जोर दिसून आला. जालना जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. शहरात काल सकाळी जोरदार पाऊस झाला. मंठा तालुक्यात पाटोदा गावात रामतीर्थ नदीचं पाणी अनेकांच्या घरात घुसलं, त्यामुळे या गावाचा अन्य भागाशी संपर्क तुटला होता. अंबड तालुक्यातील सुखापुरीच्या नदीलाही पूर आल्यानं चार तास वाहतूक ठप्प झाली होती.
औरंगाबाद जिल्ह्याच्या काही तालुक्यात मध्यम तर, बीड जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. काल सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास डोंगरतळा शिवारात अतिवृष्टी झाली. त्यामुळे गावाजवळच्या सिंचन तलावात क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्यानं काल तलावातील पाणी गावात शिरलं. जिंतूर ते येलदरी मार्गावरील शेवडी गावाजवळील मुख्य रस्त्यावर पावसाचं पाणी साचल्यानं या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली होती.
सेलू तालुक्यातला लोअर निम्न दुधना धरणाचे कालच्या पावसामुळे चौदा दरवाजे उघडून दुधना नदीत पाणी सोडण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातही काल पाऊस झाला. जिल्ह्यातील डिग्रस काळे फाटा ते गावात जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने दाटेगाव, लोहगाव, सावळी, कंजारा, भोसी, खिल्लार, नंदगाव, सिद्धेश्वर, करंजाळा, गांगलवाडी या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील सिध्देश्वर धरणाचे काल सलग चौथ्या दिवशी बारा दरवाजे उघडून पाणी नदी पात्रात सोडण्यात आलं.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उजनी भागात काल झालेल्या जोरदार पावसामुळं तेरण��� नदीला पूर आला. त्यामुळं उजनी - एकंबी रस्त्यावरील पुलावरुन वेगानं पाणी वाहात असल्यानं दोन गावातील संपर्क तुटला होता. रात्री उशिरापर्यंत तिथलं पाणी ओसरलं नव्हतं. जिल्ह्यातलं माकणी इथलं निम्न तेरणा धरण भरण्याची शक्यता आहे. धरण भरल्यास तेरणा नदीत पाणी सोडावं लागणार असल्यानं नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
****
बीड नजिकच्या पाली गावाजवळ चारचाकी दुभाजकाला धडकून अपघातात दोन जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. काल पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
//**************//
0 notes