Tumgik
#राजवट
airnews-arngbad · 27 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर - देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रांचं वाटप
एकात्मिक निवृत्तीवेतन-यु पी एस योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी विविध राजकीय पक्षांकडून राज्यभरात आंदोलन
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पिकविमा दाव्याचे प्रलंबित सव्वा दोनशे कोटी रुयपे मिळण्याचा मार्ग मोकळा
आणि
मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस - अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर येत आहेत. देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दिदींबरोबर ते यावेळी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान राज्यातल्या स्वयंसहाय्यता गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी, तसंच पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील. लखपती दीदींचा हा राज्यातला पहिला ऐतिहासिक मेळावा असेल, ३४ राज्यांमधल्या जवळजवळ ३० हजार ठिकाणांहून या कार्यक्रमात लखपती दीदी दूरदृष्यप्रणाली द्वारे सहभागी होणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीतला हा तिसरा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
केंद्रीय मंत्रीमंडळानं एकात्मिक निवृत्तीवेतन-यु पी एस योजनेला काल मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या २३ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. राज्य सरकारचे अधिकारी-कर्मचारी यात सहभागी झाले, तर ही संख्या ९० लाखांनी वाढेल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. या योजनेअंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेवटच्या १२ महिन्यांच्या वेतनाच्या निम्मी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळेल. मात्र यासाठी त्यांना किमान २५ वर्ष सेवेत राहावं लागेल. किमान १० वर्ष सेवा केलेल्यांना किमान १० हजार रुपये निवृत्तीवेतन दिले जाईल. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला मूळ वेतनाच्या ६० टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल. पुढच्या आर्थिक वर्षापासून ही योजना लागू होईल.
****
राज्यातल्या शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी सुरूच राहील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. यवतमाळ इथं लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात ते काल बोलत होते. या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ४० लाख महिलांनी नोंदणी केली असून, एक कोटी सात लाख लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी काल विविध राजकीय पक्षांच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आलं.
ठाणे इथं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मूक निदर्शनं करण्यात आली. शासन आणि प्रशासनाचा वचक नसल्याने अशा घटना वाढत असल्याने, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोघांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर इथं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं आंदोलनात सहभाग घेतला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी थोरात यांनी केली. मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काळ्या फिती बांधून भर पावसात आंदोलन केलं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सरकारवर टीका केली.
छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात तोंडावर काळ्या फिती बांधून निदर्शनं करण्यात आली.
जालना इथं शहरातल्या गांधीचमन चौकात महाविकास आघाडीच्यावतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. भोकरदन, मंठा, जाफ्राबाद, बदनापूर इथंही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
बीड इथं आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं.
****
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही काल बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात 'जागर जाणिवेचा' हे अभियान राबवण्यात आलं. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मौन धारण केलं. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती यासारख्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.
****
नेपाळ इथल्या बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह काल जळगावच्या विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानानं आणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर ते नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांसह अन्य लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
****
केंद्रीय रेल्‍वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजता ते सचखंड गुरूद्वाऱ्याला भेट देतील. दुपारी १२ वाजता ते नांदेड रेल्वे स्थानकावर विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी अडीच वाजता विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, सायंकाळी ते हैदराबादकडे प्रयाण करतील.
****
परभणी जिल्ह्यातल्या जवळपास दोन ल���ख शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पिकविमा दाव्याचे प्रलंबित असलेले दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुयपे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने संबंधित पीक विमा कंपनीला प्रलंबित रक्कम एका आठवड्यात शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान २१ ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर आले असता, त्यांनी परभणीतल्या शेतकऱ्यांनी पिकविम्याची समस्या ऐकून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या संदर्भात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेतली. या बैठकीत पीक विमा कंपनीने पीक कापणी संबंधी घेतलेले आक्षेप समितीने फेटाळून लावत प्रलंबित पैसे आठवडाभरात अदा करण्याचे आदेश दिले.
****
मराठवाड्यात काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात काल दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातल्या पाचोड, लाडगाव आडुळ या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे पैठण तालुक्यातल्या कडेठाण इथल्या मजरदरा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली. जगप्रसिद्ध वेरूळ इथला सिता न्हाणी धबधबा पाहण्यासाठी काल पर्यटकांनी गर्दी केली होती. या मार्गावर काही काळ वहातूक कोंडी झाली होती.
बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातल्या पाली, नलावंडी पाटोदा, लिंबागणेश तसंच पाटोदा गेवराई, माजलगाव, केज, परळी आणि वडवणी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं तर नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड, कंधार इथं अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातही पाथरी, सोनपेठ, मानवत इथं तर हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि टेंभुर्णी इथं अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या लिंबगाव इथं सर्वाधिक ११६ पूर्णांक ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जालना जिल्ह्यात सहा मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. कपाशी, सोयाबीन, ऊस या पिकांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलं. या पावसामुळे खरिपातल्या पिकांना जीवनदान मिळाले असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नांदेडमधला विष्णुपुरी प्रकल्प ९८ टक्के भरला असून, प्रकल्पाचे दोन दरवाजे काल सायंकाळी उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात येत्या पाच सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता परभणीच्या वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं वर्तवली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात गेले तीन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यात दुस-यांदा पूर आला आहे. गंगापूर धरणातून काल संध्याकाळी सात हजार ४३१ घनफुट प्रति सेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं. तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून रात्री नऊ नंतर तीस हजार १६९ घनफुट प्रति सेकंद विसर्ग करण्यात येत आहे, तर पालखेड धरणातून कादवा नदीत पाणी विसर्ग प्रवाहित करण्यात आला.
****
जालना इथल्या गजकेसरी स्टील कंपनीत भीषण स्फोट होऊन ३४ कामगार जखमी झाले. काल दुपारी हा अपघात झाला. यापैकी १५ जणांना किरकोळ जखमा असल्याने त्यांना प्रथमोपचार करून सुटी देण्यात आली. बारा कामगार ३० ते ६५ टक्क्यांपर्यंत भाजले असून, त्यांच्यावर जालना इथं, तर सात कामगार ६५ टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्याने त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कारखाना मालकासह अन्य तिघांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं उभारण्यात येणाऱ्या साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीचं भूमिपूजन काल क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं.
****
बीड जिल्ह्यात परळी इथल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे हा महोत्सव उद्या २६ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं येत्या तीन ते १८ ऑक्टोबर या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
नाशिक मनपा : प्रशासकीय राजवट की आणीबाणी?
https://bharatlive.news/?p=187338 नाशिक मनपा : प्रशासकीय राजवट की आणीबाणी?
प्रशासकीय राजवटीत ...
0 notes
news-34 · 11 months
Text
0 notes
mukundhingne · 1 year
Text
मार्शल लॉ च्या काळातील सोलापूरचे राष्ट्राभिमानी नगराध्यक्ष माणिकचंद शहा
ब्रिटिशांच्या जोखडात संपूर्ण देश असताना ‘युनियन जॅक’ उतरवून ‘तिरंगा ध्वज’ फडकवत साडेतीन दिवस स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या सोलापूर शहरावर ब्रिटिशांनी ‘मार्शल लॉ’ सारखा जुलमी कायदा लागू केला. मुळातच भारतावर राजवट करणाऱ्या ब्रिटिशांनी मार्शल लॉ या जुलमी कायद्याची निर्मिती केल्यानंतर राजकीय उठाव दडपून टाकण्यासाठी या कायद्याचा वापर अखंड भारतात फक्त दोन शहरांवर केला होता. सोलापूर आणि पेशावर (फाळणी […]मार्शल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत आंदोलन..
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
सामाजिक न्याय केवळ कायदे करून मिळत नाही. कृतीतून प्रगट व्हावा लागतो. यामुळेच सामाजिक न्यायाची, न्यायोत्तर कल्पना केवळ कल्पनाच राहते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यांतर स्त्री-पुरुष समानतेचा कायदा झाला. पण आज स्त्रियांना सामाजिक न्याय मिळतो, असे आपण म्हणू शकत नाही. तसे जर असते तर आज देशात वेगळे वातावरण दिसले असते. स्त्रियांना त्यांचा जन्माचा हक्क नाकारला जातो. विज्ञानाची प्रगती मानवी होत साधणारी आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हाच गर्भलिंगचिकित्सेसारख्या वैज्ञानिक प्रगतीमुळे स्त्री गर्भाची हत्या करण्याचे नवेच खूळ समाजात प्रस्थापित झालेले दिसते. कायदा करूनही त्याला पायबंद बसत नाही. ही सामाजिक अन्यायाची परिसीमा झालेली दिसते. तशीही स्त्री लोकशाही राज्यात जास्तीत जास्त अन्यायाची शिकार झालेली दिसते.
थोर विचारवंत बॅ. नाथ पै यांनी लोकशाहीविषयी असे म्हटले आहे, की ‘ज्या ठिकाणी जनतेचे दुःख, जनतेचे सुख, जनतेच्या आशा, जनतेच्या आकांक्षा, जनतेची स्वप्न ही सरकारची स्वप्न असतात, जनतेचे दुःख हे सरकारचे दुःख होते, जनतेच्या आशा या सरकारच्या आशा होतात, जनतेला ठेच लागते आणि ज्या सरकारच्या डोळ्यांत पाणी येते, जनता रक्तबंबाळ होते आणि सरकार विव्हळू लागते तीच खरी लोकशाही.’ यावरून आजच्या लोकशाहीचे स्वरूप तर कोणाच्याही ध्यानात येते. उलट असे तर झाले नाही की, या देशातील जनतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शोषण करणाऱ्या, गुलामगिरी लावणाऱ्या परकियांची राजवट संपली आणि त्याजागी स्वकियांची राजवट आली. कारण खेड्यापाड्यातील माणसांना आणि स्त्रियांना जर या प्रश्नाचे उत्तर विचारले तर ते नकारार्थी देता येईल का, हे तपासून पाहिले तर निराशाच पदरी पडते.
साधी भारनियमाची गोष्ट घ्या, खेड्यात चवदा तास भारनियमन असते. शहरात आठवड्यातून एकदा तेही एखादा तासच असते. त्यामुळे शहरातील उद्योगधंद्यांना वीजपुरवठा जास्त व नियमित होतो तेच खेड्यातील शेतीला पाणी देताना वीज आडवी येते आणि पिके करपून जाऊन पूर्ण नुकसान होते. याउलट शहरातील वीज कमतरतेमुळे फार तर तेवढ्यापुरता धंदा बंद राहील व थोडेसे नुकसान होईल, पण पिके करपल्यामुळे पूर्ण नुकसान होते. याची दखल घेतली जात नाही. दुसरा प्रश्न असतो, मूल्य निर्धारित करण्याचा. शहरातील उद्योजक त्यांच्या उत्पादित मालाच्या किमती तेच ठरवितात. उलट खेड्यातील शेतीतून पिकणाऱ्या मालाच्या किमती सरकार ठरविते अथवा सरकारचा अभयहस्त असणारी सावकार मंडळी ठरविते. आता मागे सरकारने ज्येष्ठ नागरिकांना महापालिका, नगरपालिकांचा दवाखान्यातून औषधोपचार मोफत करण्याचा जीआर काढला होता. पण ज्या खेड्यात नगरपालिकाच नाहीत अथवा दवाखाने नाहीत त्यांचे काय? अशावेळी त्यां��ा या दवाखान्यांसाठी शहरातच यावे लागेल आणि शहरांतून निवासी पत्ता वा निवासी पुरावा मागितला तर या सवलतीपासून वंचितच राहावे लागणार..
ग्रामीण भागातील वृद्ध औषधांपासून तसेही वंचित असतात. जिथे पोटच भरत नाही, तिथे औषधांचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे म्हातारपण म्हणजे उपाशी राहणे आणि वेदना सहन करीत मरणाची वाट पाहणे, एवढेच त्यांना माहीत असते. त्यातूनही पुरुषाला सातबारा त्याच्या नावावर असला तर किमान भाकरी तरी मिळते. पण वृद्ध स्त्री फक्त कष्टाची व वेदना सोसण्याची धनी ठरते. मोफत मिळणाऱ्या गोष्टी तर खेड्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्याआधी त्या भ्रष्टाचाराने खाऊन टाकलेल्या असतात. त्यामुळे ��रंच ज्यांना समाजसेवा करायची आहे, त्यांनी किमान बामच्या बाटल्या जरी खेड्यात वृद्धांना वाटल्यात तरी त्यांच्या तळमळणाऱ्या जिवांना दिलासा मिळेल. आणि मरता मरता त्या जिवांना शांत मरण मिळेल. तसे या सामाजिक न्यायाबद्दल आपण नेहमीच बोलतो. पण नुसतेच बोलतो, खरे ना?
-वैभव वैद्य....
0 notes
vimalb-blog · 2 years
Text
Nya. Loyancha Khuni Kon? न्या. लोयांचा खुनी कोण?
Price: (as of – Details) खून झालेला सीबीआय न्यायाधीश. भारताचे डिस्चार्ज झालेले गृहमंत्री. वर्णद्वेषी राजवट. एक सत्यकथा. 2016 मध्ये, तपासी पत्रकार निरंजन टकले यांना सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश लोया यांच्या संभाव्य हत्येबद्दल माहिती मिळाली होती, ज्यात मुख्य आरोपी अमित शाह होते. लोया यांचे भयभीत कुटुंब, मोडकळीस आलेली मीडिया संस्था, अपारदर्शक न्यायप्रणाली, इंटेलिजन्स ब्युरोचे सदस्य आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी योग्य आहे का? दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळाचे निर्णय बेकायदेशीर आहेत का? संविधान काय म्हणते?
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी योग्य आहे का? दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळाचे निर्णय बेकायदेशीर आहेत का? संविधान काय म्हणते?
उद्धव ठाकरे भगतसिंग कोश्यारी एकनाथ शिंदे 2008 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने हे कलम 164-1A चे उल्लंघन मानले नाही आणि हिमाचल प्रदेश राज्याच्या बाबतीत कलम 164-1A संबंधित प्रकरणात त्या मंत्रिमंडळाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, मुख्यमंत्री असूनही आणि फक्त 9 मंत्री महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला 16 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
हा भारतीय संविधानाचा अपमान, राष्ट्रपती राजवट लावा
हा भारतीय संविधानाचा अपमान, राष्ट्रपती राजवट लावा
डेमोक्रॅटिक रिपाईच्या पॅन्थर डॉ.माकणीकर यांची मागणी मुंबई दि.11 : सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना या सरकारला मान्यता मिळाली आणि पुढील कार्यकाळ पूर्ण करण्याची मुभा दिली तर ही घटना भारतीय संविधानाचा अवमान ठरेलं. यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ.राजन माकणीकर यांनी व्यक्त केले आहे. भारतीय संविधानाचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
राज्यात खरीप हंगामाचं नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
उच्च शिक्षण संस्थांमध्ये वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यास यूजीसीची परवानगी
ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना पद्म भूषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान
आषाढी यात्रेसाठी एसटीकडून पाच हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन
आणि
मराठवाड्यात अतिवृष्टी-लातूर जिल्ह्यात नदीकाठालगत धोक्याचा इशारा
****
राज्यात यंदा चांगल्या पावसाची शक्यता लक्षात घेत, शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही, याची दक्षता घेऊन, खरीप हंगामाचं नियोजन करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री ��कनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईत काल खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बियाण्यांचा काळाबाजार आणि बनावट बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागानं धडक कारवाई करावी, पाणीटंचाई असलेल्या भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, चारा छावण्या उभारण्याला जिल्हा प्रशासनानं प्राधान्य द्यावं, तसंच आपत्तीकाळात सर्व विभागांनी समन्वयातून काम करावं, आदी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
दरम्यान, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. कांदा निर्यात, सोयाबीन तसंच कपाशीच्या किमान हमी भावाकडे लक्ष देण्याची, तसंच तेलाची आयात कमी करून देशांतर्गत तेलाचं उत्पादन वाढवण्याची आवश्यकताही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ तसंच राज्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचं पटोले यांनी सांगितलं.
****
बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या चार बांग्लादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथक -एटीएसनं अटक केली. या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना बनावट कागदपत्रं मिळवून देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरता होणाऱ्या या निवडणुकीसाठी, ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. येत्या २६ जून रोजी मतदान होणार असून, एक जुलैला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीत मतदानाची वेळ वाढवण्याबाबतची काही संघटनांची मागणी मान्य करत, निवडणूक आयोगानं ही वेळ आता सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केली आहे.
****
विद्यापीठ अनुदान आयोग- यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांना वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय अंमलात येणार आहे. सध्या एका वर्षात एकाच शैक्षणिक सत्रात प्रवेश घेता येतो. परीक्षांचा निकाल उशीरा लागलेल्या तसंच वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या सत्रात प्रवेश न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या नव्या निर्णयामुळे, लाभ होणार आहे.
****
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली नीट ही परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयाच्या सुटीकालीन पीठानं त्यावर राष्ट्रीय चाचणी संस्थेला नोटीस बजावली असून पुढची सुनावणी येत्या आठ जुलैला ठेवली आहे. मात्र परीक्षेनंतरच्या समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार दिला.
****
ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांना पद्म भूषण पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. मुंबईत वांद्रे इथल्या त्यांच्या निवासस्थानी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितिन करीर तसंच अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी प्यारेलाल यांना हा पुरस्कार प्रदान करत, शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन सत्कार करून त्यांचं अभिनंदन केलं.
****
आषाढी यात्रेसाठी श्री श्रेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात पाच हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. राज्यातल्या कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्याच्या अनेक महसूल मंडळात सोमवारी अतिवृष्टीची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यातल्या दहापैकी सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात लातूर, औसा, निलंगा, चाकूर, रेणापूर आणि शिरूर अनंतपाळ या तालुक्यांचा समावेश आहे. एकाच दिवसात जिल्ह्यात ६३ पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस झाला. घरणी नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्यानं, शिरुर अनंतपाळ ते उदगीर हा राज्यमार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. या नदीवरच्या पुलाचं काम सुरू असल्यानं, हा पर्यायी पूल उभारण्यात आला होता. या ठिकाणी वाहतुकीसाठी दुसरा मजबूत पर्यायी पूल तयार करून देण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने घरणी नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन, रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधारे पूर्ण भरले आहेत. त्यामुळे रेणा नदी काठावरच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रेणा नदी काठावरच्या गावातल्या शेतकरी आणि नदीकाठी वस्ती करून राहिलेल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
**
धाराशिव जिल्ह्यातही आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे जिल्ह्यातल्या तेरणा नदीसह इतर नद्या वाहत्या झाल्या असून, यामुळे जिल्ह्यावरचं पिण्याच्या पाण्याचं संकट काही प्रमाणात कमी होणार आहे. या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
**
बीड जिल्ह्यात चार महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यात घाटनांदूर मंडळामध्ये ६६ मिलीमीटर, अंबाजोगाई मंडळात ७१, परळी वैद्यनाथ तालुक्यात ध��्मापुरी मंडळात ८१ मिलीमीटर, तर धारूर तालुक्याच्या मोहखेड मंडळात सर्वाधिक ९१ मिलीमीटर पाऊस झाला.
दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण मराठवाड्यात सक्रिय झाला आहे. आज आणि उद्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ उद्या गुरुवारी होणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सकाळी अकरा वाजता समारंभाला सुरूवात होईल, विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळांवरुन या समारंभाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
****
राज्य वस्तू आणि सेवा कर विभागानं केलेल्या जिल्ह्यांच्या विभागीय पुनर्रचनेमुळे धाराशिव जिल्ह्यातल्या व्यापारी आणि उद्योजकांची गैरसोय होणार असून, हा जिल्हा परत सोलापूर विभागीय कार्यालयाला जोडावा, अशी मागणी केली जात आहे. जिल्हा व्यापारी आणि कर सल्लागार संघटनेच्यावतीनं काल संबंधित कार्यालयात या मागणीचं निवेदन देण्यात आलं.
****
दक्षिण कोरिया आणि मुंबईच्या काही निर्यातदारांनी काल जालना जिल्ह्यात बदनापूर मोसंबी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी या फळासंबंधी सर्व माहिती दिली. जालना जिल्ह्यात मोसंबीला भौगोलिक मानांकन मिळालं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना अमेरिकेसोबत होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भरतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. गुणतालिकेत अ गटात भारत पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे.
सध्या नामिबिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सामना सुरु आहे. काल या स्पर्धेत पाकिस्ताननं कॅनडाचा सात गडी राखून पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात आकाशवाणी चौकात गॅस सिलिंडरची वाहतुक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्यानं रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. काल रात्री ही दुर्घटना घडली. या घटनेत संबंधित महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत. सदर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
****
जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल बियाणं, खतं तसंच औषधी विक्रेत्यांच्या दुकानाना भेट देऊन तपासणी केली. सिंधी काळेगाव इथले शेतकरी विष्णुपंत गिराप यांच्या शेतात भेट देऊन पांचाळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही यांची कृषी विभागाने दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
****
परभणी जिल्ह्यातल्या, अल्पसंख्यांक समाजातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी गंगाखेड आणि सेलू इथल्या वसतीगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी गंगाखेड इथं येत्या २४ तारखेपर्यंत तर सेलू इथं प्रवेशासाठी येत्या १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
****
विवाहित जोडप्यापैकी एक जण दिव्यांग असलेल्या पंधरा जोडप्यांना हिंगोली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं वाटप करण्यात आलं. दिव्यांग व्यक्तीसोबत विवाह करण्यासाठी सुदृढ व्यक्तींनी पुढे यावं आणि त्यांना सामाजिक समानता मिळावी, हा या योजनेचा हेतू आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड- हडपसर-नांदेड विशेष गाडीच्या तीन फेऱ्या रद्द केल्या आहेत. यात नांदेड - हडपसर विशेष गाडी आज तसंच येत्या १९ आणि २६ या तारखांना, तर, हडपसर ते नांदेड विशेष गाडी उद्या तसंच येत्या २० आणि २७ या तारखांना रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
Text
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राष्ट्रवादीची मागणी; जंतर मंतरवर निदर्शने
https://bharatlive.news/?p=116588 मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राष्ट्रवादीची मागणी; जंतर ...
0 notes
Video
youtube
मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत आंदोलन..
0 notes
nirannjan17 · 5 years
Text
शरद पवार साहेब- एक राजकीय धुरंधर
23 नोव्हेंबर ची राजकीय परिस्थिती पाहता सकाळ पासून रात्री पर्यंत अनेक वृत्त वाहीनीवर महाराष्ट्रातील राजकारणातील नाट्यामुळे शरद पवार साहेबांवर गंभीर आरोप केले. मात्र भाजपा सारख्या मोठ्या पक्षाला देखील अजून शरद पवार नावाचं प्रत्यय आलेला दिसत नाही. तिन्ही पक्षाच्या संपूर्ण सफल बैठका झाल्यानंतर एकदम अजित पवार कसे भाजपा कडे गेले आणि बाकीचे सगळे आमदार राष्ट्रवादी मधे कसे हा मोठ्या प्रश्नाचं उत्तर कोणी शोधलंच नाही. कदाचित राष्ट्रपती राजवट लवकरात लवकर काढून सर्व नवनिर्वाचित आमदारांना सभागृहात आणुन ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्याचा शरद पवार साहेबांचा मानस असावा. कारण एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट असणे म्हणजे ते राज्य केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येतं म्हणजेच भाजपा च्या आणि ह्या तिन्ही पक्षाच्या आघाडीला साहजिकच केंद्र सरकारचा विरोध असेल. त्यामुळे ते संपूर्ण सहा महिने राष्ट्रपती राजवट काढणार नाही याचा देखील विचार शरद पवार साहेबांनी केला असावा. त्यामुळेच की काय अजित पवार यांना भाजपा कडे पाठवून राष्ट्रपती राजवट काढणं आणि मग सर्व आमदार विधानसभेत आले की भाजपा सरकार अल्प मतात जाईल आणि शिवसेना त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांना दोन्ही पक्षाच्या पाठींबा असलेलं पत्र देइल आणि शिवसेनेच्या नेतृत्वात नवीन सरकार येईल. राष्ट्रपती राजवट काढून टाकल्यामुळे केंद्र सरकारचा हस्तक्षेप राहणार नाही. तसेच फडवणीस याचं पुन्हा येण्याच काही दिवसाच का होईना स्वप्न ही पूर्ण होइल.
N.D. PATIL_01
1 note · View note
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र: 'सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा', शिवसेना खासदार संजय राऊत यांची राज्यपालांकडे मागणी
महाराष्ट्र: ‘सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’, शिवसेना खासदार संजय राऊत यांची राज्यपालांकडे मागणी
शिवसेना खासदार संजय राऊत. (फाइल फोटो) इमेज क्रेडिट स्रोत: ANI केवळ २ मंत्र्यांचे (शिंदे-फडणवीस) मंत्रिमंडळ राज्याशी संबंधित निर्णय कसे घेऊ शकते, या संजय राऊत यांच्या प्रश्नाला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ३२ दिवसही झाला नाही. तोपर्यंत फक्त 7 मंत्र्यांनी घेतलेले निर्णय रद्द व्हायला हवे होते. शिवसेना खासदार संजय राऊत (संजय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते
तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते
मुंबई : विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवरून राज्यात सध्या राजकारण तापलेलं आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने राज्यपालांचा (Governor Bhagat Sing Koshyari) आणि घटनेचा अपमान केला आहे. त्यामुळे कदाचित राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 February 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ११ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
संसदेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब;सामुहिक शक्ती आणि सामुहिक संकल्पातून भावी पिढीसाठी कार्य करत राहण्याचा मानस पंतप्रधानांकडून व्यक्त 
लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार-केंद्रीय गृहमंत्र्यांचं सूतोवाच
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं तिसऱ्या टप्प्यातलं आमरण उपोषण सुरू
समृद्धी महामार्गावर काल सलग दुसऱ्या दिवशी अपघात होऊन तिघांचा मृत्यू
      आणि 
१९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलियात अंतिम सामना
****
संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज काल अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. याबरोबरच सतराव्या लोकसभेचा कार्यकाळही काल पूर्ण झाला. यानिमित्तानं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदनाला संबोधित केलं. सामुहिक शक्ती आणि सामुहिक संकल्पातून भावी पिढीसाठी साठी कार्य करत राहण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले..
लोकतंत्र और भारत की यात्रा अनंत है। दुनिया जिस प्रकार से भारत की महात्म्य को स्वीकार कर रही है, भारत के सामर्थ्य को स्वीकार करने लगी है, और उसको, इस यात्रा को हमें और सख्ती के साथ आगे बढाना है। चुनाव बहोत दूर नही है। यह लोकतंत्र का सहज, आवश्यक पहलू है। और मुझे विश्वास है, की हमारे चुनाव ही देश की शान बढाने वाली है। लोकतंत्र की हमारी जो परंपरा है, पुरे विश्व को अचंबित करनेवाल अवश्य रहेंगे।
दरम्यान, १७ व्या लोकसभेत आतापर्यंतचं सर्वाधिक ९७ टक्के कामकाज झाल्याचं, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. सतराव्या लोकसभेच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांचा अध्यक्ष बिर्ला यांनी आढावा घेतला. सतराव्या लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्याची घोषणा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी केली. 
राज्यसभेचं कामकाजही काल अनिश्चितकाळासाठी तहकूब झालं. सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या अधिवेशन काळातल्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यापूर्वी राज्यसभेत अर्थव्यवस्थेवरच्या श्वेतपत्रिकेवर चर्चा पूर्ण झाली.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज गोंदिया इथं एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पायाभरणी, तसंच गोंदिया शिक्षण संस्थेचे संस्थापक मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
****
आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. नवी दिल्लीत एका खासगी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. संसदेनं डिसेंबर २०१९ मध्ये या कायद्याला मंजुरी दिली आहे. हा कायदा नागरिकत्व देणारा असून नागरिकत्व काढून घेणारा नाही, त्यामुळे याबाबत अपप्रचाराला बळी पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं...
“सीएए किसी की भी नागरिकता लेने का कानून नहीं है, छीनने का कानून नहीं है। इस देश की माइनॉरिटी को और विशेषकर मुस्लिम भाइयों को भड़काया जा रहा है। देश ��ें किसी की भी नागरिकता सीए छिन ही नहीं सकता क्योंकि कानून में प्रोविझन ही नहीं है। सीए जो सर्नार्थी आये है पाकिस्तान और बांग्लादेश से धार्मिक प्रताड़ना के कारण। उनको नागरिकता देने का कानून है।“
****
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं भविष्य निर्वाह निधीसाठी सव्वा ८ टक्के व्याजदर निश्चित केला आहे, केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली. गेल्या आर्थिक वर्षात पी एफ वर ८ पूर्णांक १५ शतांश टक्के दरानं व्याज मिळत होतं.
****
राज्यातल्या गुन्हेगारी घटनांची राज्यपालांनी गंभीर दखल घेत, राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन, त्यांना याबाबतचं निवेदन दिलं, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्य सरकार बरखास्त करत राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि ताबडतोब विधानसभा निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं लवकरात लवकर निकाल द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरुद्ध सक्तवसूली संचालनालय- ईडीने मनी लॉन्ड्रीग - काळा पैसा वैध करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना समन्स जारी होण्याची शक्यताही ईडीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात वानखेडे यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाने नाशिक इथं संस्कृत विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी काल नाशिक इथं ही माहिती दिली. यासाठी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाने जिल्हा प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून, जागेची मागणी केली आहे. भूखंड उपलब्ध झाल्यावर इतर पायाभूत सुविधांसाठी केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचं गोडसे यांनी सांगितलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं कालपासून तिसऱ्या टप्प्यातल्या आमरण उपोषण सुरू केलं. सरकारनं मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अध्यादेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि कायद्यात रुपांतर करायला हवं. मात्र, याबाबतची कोणतीही प्रक्रिया सरकारने अद्याप सुरू केलेली नाही, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. सरकारने दोन दिवसात अधिवेशन बोलावून अध्यादेशात उल्लेख केल्याप्रमाणे सगेसोयऱ्यांबाबतचा कायदा संमत करावा, कुणबी नोंदी सापडलेल्या सर्वांसह त्यांच्या नातेवाईकांनाही शपथ पत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली. सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी आमची दारं कायम खुली असल्याचं, जरांगे यांनी स्पष्ट केलं.
****
मुंबई नागपूर समृध्दी महामार्गावर काल रात्री एक कार अज्ञात वाहनावर धडकून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अब्दिमंडीनजिक हा अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असलेले हे प्रवासी नाशिक इथं जात असतांना, त्यांची चारचाकी एका वाहनाच्या मागच्या बाजुला धडकून हा अपघात झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल. भारताने दक्षिण आफ्रिेकेला तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवून अंतिम फेरी गाठली आहे. भारताने यापूर्वी पाच वेळा हा चषक जिंकला आहे.
****
नांदेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल शहरातील अशोकनगर भागात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसंच नागरिकांची आरोग्य तपासणी करत आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आलं. दरम्यान, मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांचे लाभ मिळालेल्या लाभार्थांनी आपले अनुभव या शब्दांत कथन केले.
बाईट - आरती गोवंडे आणि दिलीप हिवरे, जि.नांदेड
****
परभणी जिल्ह्यात मोदी आवास घरकुल योजनेने उल्लेखनीय कामगिरी केली असून, जिल्ह्यात एकूण १३ हजार चारशे ६३ एवढ्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्याला दिलेल्या उद्दीष्टापैकी ९९ पूर्णाक ०१ टक्के उद्दीष्ट पूर्ण केलं आहे. दरम्यान, शासनाच्या नवीन निर्णयानुसार विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी दिली आहे.
****
लातूर इथं आयोजित तीन दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाचा काल समारोप झाला. शेतीतल्या नव्या तंत्रज्ञाना विषयी परिसंवाद, चर्चासत्रं आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव कथन यामधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल जागर स्पर्धा महोत्सवाअंतर्गत नाट्यछटा स्पर्धांची शालेय गटातील विद्यार्थींची निवड चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी एकपात्री प्रयोग, स्वगत, नाट्य प्रवेश सादर केले. सान्वी देशपांडे, उम्मे रोमान शेख, रोहित जगताप, मिष्टी रगडे यांचा परीक्षकांकडून गौरव करण्यात आला.
****
लातूर इथं अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वतीनं १०० वं नाट्य संमेलन आणि राज्य शासनाच्या महासंस्कृती महोत्सवाचं येत्या १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes