#रहाणे पुजारा कसोटी संघ
Explore tagged Tumblr posts
darshaknews · 3 years ago
Text
भारताच्या नवीन कसोटी कर्णधाराच्या प्रश्नावर गांगुलीने दिले उत्तर, पुजारा-रहाणेच्या भविष्यावर असे म्हटले
भारताच्या नवीन कसोटी कर्णधाराच्या प्रश्नावर गांगुलीने दिले उत्तर, पुजारा-रहाणेच्या भविष्यावर असे म्हटले
टीम इंडियाच्या नवीन कसोटी कर्णधाराबद्दल सौरव गांगुली म्हणतो: दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघाचे कसोटी कर्णधारपद सोडले आहे. कोहलीनंतर टीम इंडियाचा कसोटी कर्णधार कोण होणार, हा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे. यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्याने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कसोटी सामन्यांबाबतही चर्चा केली. टीम इंडियाच्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
रहाणे, पुजाराला वगळले
रहाणे, पुजाराला वगळले साहा, इशांतलाही डच्चू; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी संघ जाहीर कसोटी कर्णधारपदही रोहितकडे पीटीआय अपेक्षित कामगिरी करण्यात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा आणि इशांत शर्मा या अनुभवी खेळाडूंना भारताच्या कसोटी संघातून वगळले आहे. श्रीलंकेविरुद्ध ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** जगात सर्वो��्तम असलेली प्रत्येक वस्तू देशात उत्पादित करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावं -  मन की बात मधून पंतप्रधानांचं आवाहन
** पोलिस भरतीच्या पहिल्या टप्प्यात पाच हजारावर पोलिसांची भरती - गृहमंत्री अनिल देशमुख
** जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू, नव्या चोवीस रुग्णांची नोंद
आणि
** ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या पाच बाद २७७ धावा; कर्णधार अजिंक्य राहाणेचं नाबाद शतक
****
जगात सर्वोत्तम असलेली प्रत्येक वस्तू देशात उत्पादित करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते.
आपल्या दैनंदिन आयुष्यात कळत-नकळत वापरल्या जाणाऱ्या परदेशी वस्तूंना स्वदेशी पर्याय शोधावेत, आणि आपल्या देशातल्या कष्टकरी लोकांनी बनवलेल्या उत्पादनांचा वापर करण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. नव्या वर्षात संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण होईल आणि त्याचं स्थान अधिक सशक्त व्हावं असं पंतप्रधान यावेळी म���हणाले. आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजेत याची खात्री करण्याची वेळ आली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. कोल्हापूरच्या अंजली तसंच मुंबईचे अभिषेक यांनी पाठवलेल्या पत्रांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. देशात बिबट्यांची संख्या वाढली असून, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटे असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. एकदाच वापरायच्या प्लॅस्टिकपासून देशाला मुक्त करायचंच असून हा देखील नव्या वर्षाच्या संकल्पांपैकी एक संकल्प ठेवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या वेळी केलं. पंतप्रधानांच्या या संबोधनाच्या मराठी अनुवादाचं रात्री आठ वाजता पुन:प्रसारण होणार आहे.
****
राज्यात साडेबारा हजार पोलिस भरती मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पाच हजार २९५ पोलिस भरतीचे आदेश संबंधित विभागाना लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ही भरती प्रक्रीया लवकरच सुरू होईल, असंही त्यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं. नागपूरमध्ये चालू वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे पंधरा टक्क्यांनी गुन्ह्यात घट झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागानं प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार देशातल्या गुन्हेगारीमध्ये पाटना शहरानंतर दुसरे शहर म्हणून नागपूरचा उल्लेख होता, परंतु ही आकडेवाडी ही २०२०मधील नसून २०१९मधली असल्याचं गृहमंत्री देशमुख म्हणाले.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३४५ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात २४ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १३ हजार ७८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ८ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले बारा हजार ४३१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज तीन नवे कोविडग्रस्त दाखल झाले, तर चार जणांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातल्या एकूण कोविड रुग्णांची संख्या आता ४५ हजार ३०१ झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ५५६ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे. जिल्ह्यात या संसर्गानं आतापर्यंत एक हजार १९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
राज्यातल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी विकासकांचा फायदा केला जात असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने काही शिफारसी राज्य सरकारला केल्या होत्या. त्यातल्या काही निवडक आणि सोयीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जात असून, त्याचा राज्याच्या तिजोरीला फटका बसेल तसंच काही निवडक लोकांनाच लाभ होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा निर्णय तत्काळ स्थगित करण्यात यावा, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीची विषय पत्रिका गोपनीय असते, पण याबाबतचे संबंधित संपूर्ण कागदपत्रं आणि शासन निर्णयाचा मसुदा सर्व विकासकांकडे उपलब्ध आहेच शिवाय समाजिक माध्यमांवरही दिसत असल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं आहे.
****
गुजरात पोलीस दहशतवाद विरोधी पथक - एटीएसने मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी दाऊद इब्राहिम याच्या टोळीतला गुंड माजीद कुट्टी याला अटक केली आहे. माजीद कुट्टी हा गेल्या २४ वर्षांपासून फरार होता. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात २३ फेब्रुवारी १९��६ एका छापेमारीत चार किलो आरडीएक्स, दहा डिटोनेटर, ११५ पिस्तुलं आणि शेकडो गोळ्या असा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. पाकिस्तानी बनावटीची ही शस्त्रं राजस्थानच्या बाडमेर सीमेवरून गुजरातमध्ये पोहोचली होती, ती मुंबई आणि अहमदाबादेत पाठवली जाणार होती. या कारवाईनंतर माजीद कुट्टी मलेशियाला पळून गेला होता. तो भारतात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला केली.
****
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आज राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. पुण्यात प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात चूल पेटवून दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला. सिलिंडरचे दर कमी झाले नाहीत, तर आमचं पुढचं लक्ष्य हे पेट्रोल पंपावर लावलेले पंतप्रधानांचे फलक असतील, असा इशारा चाकणकर यांनी दिला. कोविड टाळेबंदीच्या काळात लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना, सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात गॅस आणि इंधन उपलब्ध करुन देण्याऐवजी दरवाढ केल्याचा आरोप या आंदोलकांनी केला.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योध्दयांच्या कुटुंबियांना आज नागपूर इथं राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांचं विमा कवच सानुग्रह सहायता निधी देण्यात आला. राज्याचे ऊर्जा मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत तसंच क्रीडामंत्री सुनील केदार यावेळी उपस्थित होते.
****
भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज मेलबोर्न इथं दुसऱ्या दिवशी पाच बाद २७७ धावा काढून पहिल्या डावात ८२ धावांची आघाडी घेतली आहे. पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे १०४ आणि रविंद्र जडेजा ४० धावांवर खेळत होते. भारतानं आज सकाळी एक बाद ३६ या धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. शुभमन गील ४५, चेतेश्वर पुजारा १७, ऋषभ पंत २९, हनुमा विहारी २१ धावा काढून बाद झाले. मिशेल स्टार्क आणि पॅट कमीन्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. चार सामन्यांच्या या मालिकेत पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया संघ एक शून्यनं आघाडीवर आहे.
****
करंज या झाडांच्या बियांपासून बायोडिझेल निर्मितीवर अधिक संशोधन व्हावं, अशी अपेक्षा केंद्रीय परिवहन तसंच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ग्रीक क्रूड अ‍ॅण्ड बायो फ्यूएल फाऊंडेशन या संस्थेच्या वतीनं आज नागपुरात करंज झाडाच्या रोपट्यांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी गडकरी बोलत होते. शेतकऱ्यांसाठी कीटकनाशक कसं तयार करता येईल यावर संशोधन व्हावं, अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली. करंजपासून निर्माण झालेलं हे जैविक इंधन आपल्या पारंपरिक डिझेलपेक्षा चांगलं असून प्रदूषण न करणारं असल्याचंही गडकरी म्हणाले.
****
२०१५ ची ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या मात्र निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना यंदाची ग्रामपंचायत निवडणूक लढवता येणार नाही. निवडणूक विभागानं याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या ३ हजार ८४० जणांना यंदाची निवडणूक लढवता येणार नसल्याची सूचना निवडणूक आयोगानं  जिल्हा प्रशासनाला केली आहे. या व्यक्तींच्या नावाची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे अशा व��यक्तींनी उमेदवारी दाखल केल्यास त्यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद होण्याची शक्यता आहे
****
0 notes
webmaharashtra-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
भारताची श्रीलंकेवर 1 डाव आणि 53 धावांनी मात कोलंबो : दुसऱ्या कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि ५३ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. पहिल्या डावात शानदार फलंदाजी करत भारतीय संघाने 9 गड्यांच्या मोबदल्यात 622 धावांचा विशाल डोंगर उभा केला. मालिकेत भारताकडून पहिल्या डावात अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांनी शतकं साजरी केली. तर लंकेच्या फलंदाजांवर अंकुश लावण्याची जबाबदारी अश्विन आणि जाडेजाने चोखपणे बजावली.गोलंदाजीत रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात तर रविंद्र जाडेजाने दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली. भारताने दिलेल्या डोंगराएवढ्या धावसंख्येपुढे श्रीलंकेचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात पत्त्याच्या पानांप्रमाणे अक्षरशः कोसळला. मात्र लंकेच्या फलंदाजांनी पहिल्या डावातील चुका सुधारत दुसऱ्या डावात दिमुथ करुणरत्ने आणि कुशल मेंडीसच्या शतकी खेळीच्या जोरावर लंकेने भारताचा काही प्रमाणात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना संघातील इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. त्यामुळे पराभवाची चव त्यांना चाखावी लागली. या विजयामुळे भारतीय संघाने कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
रहाणे-पुजाराचे टीम इंडियात पुनरागमन अजूनही शक्य? जाणून घ्या रोहित शर्माने काय दिले
रहाणे-पुजाराचे टीम इंडियात पुनरागमन अजूनही शक्य? जाणून घ्या रोहित शर्माने काय दिले
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची पोकळी भरून काढणे अवघड आहे, पण एक वेळ अशी येते की, पुढचा विचार करून तरुणांना संधी देणे गरजेचे असते, असे मत भारताचा नवा कसोटी कर्णधार रोहित शर्माने गुरुवारी व्यक्त केला. भारतासाठी 82 कसोटी सामने खेळलेल्या रहाणे आणि 95 सामने खेळलेल्या पुजाराला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. रहाणे आणि पुजाराच्या अनुपस्थितीचा काय परिणाम…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
कसोटी मालिकेत टीम इंडियात दिसणार मोठा बदल, हे फलंदाज भरतील पुजारा-रहाणेची जागा
कसोटी मालिकेत टीम इंडियात दिसणार मोठा बदल, हे फलंदाज भरतील पुजारा-रहाणेची जागा
कर्णधार म्हणून रोहित शर्माची पहिली कसोटी���ी भारताच्या मधल्या फळीसाठी एका नव्या युगाची सुरुवात करेल. यामध्ये अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या जागी शुभमन गिल आणि हनुमा विहारी यांना स्थान मिळू शकते. या मोसमात तीन कसोटी सामन्यांसाठी (श्रीलंकेविरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध एक) रहाणे आणि पुजारा यांना संघात ठेवले जाणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या सामन्यात विहारी आणि गिल या दोघांचा पर्याय…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
भारताने श्रीलंकेविरुद्ध कसोटी आणि T20 जाहीर केले, पाहा कोणाला मिळाले स्थान
भारताने श्रीलंकेविरुद्ध कसोटी आणि T20 जाहीर केले, पाहा कोणाला मिळाले स्थान
भारत विरुद्ध श्रीलंका संघ जाहीर: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहितला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तर वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचा युवा खेळाडू सौरभ कुमार याला 18 सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे. या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह उपकर्णधार असेल. भारत आणि…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
निवडकर्त्यांचा खेळाडूंना संदेश, 'रणजीमध्ये प्रथम धावा करा, विकेट घ्या मग देशासाठी खेळा'
निवडकर्त्यांचा खेळाडूंना संदेश, ‘रणजीमध्ये प्रथम धावा करा, विकेट घ्या मग देशासाठी खेळा’
टीम इंडियाचा कसोटी संघ: मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. संघाची कमान रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि रिद्धिमान साहा या दिग्गजांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. या चार खेळाडूंना आगामी कसोटी मालिकेतून बाहेर ठेवण्यासोबतच…
View On WordPress
#इशांत श्रमा सोडला#ऋद्धिमान साहा आणि इशांत शर्मा बाद#चेतन शर्मा ते इशांत श्रमा आणि रिद्धिमान साहा#चेतन शर्मा ते रहाणे आणि पुजारा#चेतन शर्माचा पुजारा रहाणेला संदेश#धावा काढा विकेट घ्या आणि देशासाठी खेळा#निवड समितीने वरिष्ठ क्रिकेटपटूंना रणजी ट्रॉफी खेळण्यास सांगितले#निवडकर्त्यांनी साहा आणि इशांतला रणजी ट्रॉफी खेळण्यास सांगितले#भारताचा कसोटी कर्णधार#भारतीय क्रिकेट संघाची आगामी कसोटी मालिका#भारतीय चाचणी संघ#रहाणे पुजारा बाद ��ाला#रहाणे पुजारा वगळला#वरिष्ठ क्रिकेटपटूंना निवडकर्त्यांचा संदेश#विद्धिमान साहा वगळला#श्रीलंका कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया#श्रीलंका मालिकेसाठी भारतीय कसोटी संघ
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
रहाणे आणि पुजाराला टीम इंडियात परतण्याची संधी आहे, इथे चांगली कामगिरी करावी लागेल
रहाणे आणि पुजाराला टीम इंडियात परतण्याची संधी आहे, इथे चांगली कामगिरी करावी लागेल
रणजी ट्रॉफी 2022 अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजारा: टीम इंडियाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना कसोटी कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्याची संधी मिळणार आहे. हे दोन्ही खेळाडू रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून आपला फॉर्म सुधारू शकतात. ही स्पर्धा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिकाही मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून खेळवली जाणार आहे. 25 फेब्रुवारीपासून…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 December 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा. ****
आपला देश २०२१मध्ये यशाची नवी शिखरं पदाक्रांत करेल, असा विश्र्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधताना व्यक्त केला. या कार्यक्रम मालिकेचा हा बहात्तरावा भाग होता. नव्या वर्षात संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण होईल आणि त्याचं स्थान अधिक सशक्त व्हावं असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. नव्या वर्षात आपण आपल्या देशाला शुभेच्छा देऊया, त्याचं अभिनंदन करुया, या कोल्हापूरमधील अंजली यांनी पाठवलेल्या शुभेच्छांचा त्यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी उल्लेख केला. आपल्याला आलेल्या पत्रांमध्ये लोकांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या काळामध्ये देशाचं सामर्थ्य, देशवासीयांच्या सामूहिक श��्तीचं कौतुक केलं असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. मुंबईच्या अभिषेक यांनी कोरोना विषाणू संदर्भात पाठवलेल्या संदेशाचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. या संकट काळात देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली असून या क्षमतेचं नाव ‘आत्मनिर्भरता’ असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीत पूर्वी विदेशी महागड्या खेळण्यांना मोठी मागणी होती आता देशात बनवलेल्या खेळण्यांची मागणी होत असल्याची माहिती एका पत्रात असल्याचं त्यांनी सांगितलं. विचारांमध्ये घडून आलेला हा खूप मोठा बदल आहे आणि त्याचा हा एक उत्तम पुरावा असल्याचं ते म्हणाले. देशातील लोकांनी ठोस पावले उचलली आहेत. स्थानिक गोष्टींचा ते आग्रह धरत आहेत. हा मंत्र घराघरात निनादत असल्याचं ते म्हणाले. अशावेळी आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजेत याची खात्री करण्याची वेळ आली असून जे काही जगात सर्वोत्तम आहे ते आपण देशात उत्पादित करून दाखवू. यासाठी आपल्या उद्योजकांना पुढं यावं लागेल, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. आपल्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या गोष्टींची व्यवस्थित पडताळणी करा आणि लक्षपूर्वक बघा की, कळत-नकळत अशा कोणत्या परदेशी वस्तू आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात प्रवेश केला आहे. त्या गोष्टींसाठी देशात बनवलेले पर्याय शोधा आणि हेही ठरवा की आता आपण देशात उत्पादित, देशातल्या कष्टकरी लोकांनी त्यांच्या कष्टानं बनवलेल्या उत्पादनांचा वापर करू, असं ते म्हणाले. देशात बिबट्यांची संख्या वाढली असल्याची आकडेवारी नमूद करताना त्यांनी बिबट्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आपल्याला देशाला एकदा वापरायच्या प्लॅस्टिकपासून मुक्त करायचंच असून हा देखील २०२१ च्या संकल्पांपैकी एक ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केलं. या कार्यक्रमाचं रात्री आठ वाजता आकाशवाणीवरून मराठीमध्ये पुनः प्रसारण होणार आहे.  
****
देशात आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होऊन तो ९५ पूर्णांक ८२ शतांश टक्के झाला आहे. या काळात १८ हजार सातशे नवे रुग्ण आढळले आहेत तर, २७९ रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात सध्या २ लाख, ७८ हजार, सहाशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल नऊ लाखांहून आधिक जणांची कोरोना विषाणू संसर्गासाठी चाचणी करण्यात आली आहे.
****
महाविकास आघाडी सरकार येत्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी भरीव आर्थिक तरतूद करुन या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं धनगर समाजातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते काल बोलत होते. धनगर समाज महासंघाचे नवे प्रदेशाध्यक्ष विधिज्ञ चिमण डांगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळानं जवळपास सर्व ठिकाणचे पर्यटक निवास आता उघडले आहेत. या पर्यटक निवासांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं आरोग्यरक्षक व्यवस्थांसह तातडीच्या वैद्यकिय सुविधाही इथं उपलब्ध झाल्या आहेत. नव वर्षाचं स्वागत करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे.
****
भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज मेलबोर्न इथं दुसऱ्या दिवशी पाच बाद २७७ धावा काढून पहिल्या डावात ८२ धावांची आघाडी घेतली आहे. पावसामुळे दिवसभराचा खेळ थांबला तेंव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे शतक झळकवून १०४ आणि रविंद्र जडेजा ४० धावांवर खेळत होते. भारतानं आज एक बाद ३६ या धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. शुभमन गील ४५, चेतेश्वर पुजारा १७, ऋषभ पंत २९, हनुमा विहारी २१ धावा काढून बाद झाले. मिशेल स्टार्क आणि पॅट कमीन्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. चार कसोटींच्या या मालिकेत पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया संघ एक शून्यनं आघाडीवर आहे.
****
नांदेड-हैदराबाद-परभणी प्रवासी रेल्वे गाडी आता नांदेड-तांडूर-परभणी विशेष एक्सप्रेस रेल्वे म्हणून धावणार आहे. रेल्वे मंडळानं या बदलाला मान्यता दिली. येत्या १० जानेवार��� पासून ही गाडी नांदेड- तांडूर-परभणी अशी धावणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे.
****
0 notes