#युवराज कर्णधार
Explore tagged Tumblr posts
Text
सचिन तेंडुलकरला पाठिंबा दिल्याने युवराज सिंगने कर्णधारपद गमावले होते, माजी अष्टपैलू म्हणाला- एमएस धोनी कुठेही कर्णधार झाला नाही माजी अष्टपैलू खेळाडूचा दावा - एमएस धोनी कुठून कर्णधार झाला माहीत नाही
सचिन तेंडुलकरला पाठिंबा दिल्याने युवराज सिंगने कर्णधारपद गमावले होते, माजी अष्टपैलू म्हणाला- एमएस धोनी कुठेही कर्णधार झाला नाही माजी अष्टपैलू खेळाडूचा दावा – एमएस धोनी कुठून कर्णधार झाला माहीत नाही
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग म्हणतो की, सचिन तेंडुलकरला पाठिंबा दिल्यामुळेच त्याला कर्णधारपद मिळाले नाही. एवढेच नाही तर उपकर्णधारपदही गमावले. इतकेच नाही तर माजी अष्टपैलू खेळाडूने असा दावाही केला की 2007 मध्ये एमएस धोनी कुठून आला आणि कर्णधार झाला. युवराज सिंगने सांगितले की, एक काळ असा होता की त्याला ग्रेग चॅपल आणि सचिन तेंडुलकर यापैकी एकाची निवड करावी लागली. त्याने सचिन…
View On WordPress
#एमएस धोनी#कर्णधार#कॅप्टन#ग्रेग चॅपल#ग्रेग चॅपेल#चॅपल#चॅपल पंक्ती#धोनी#भारत#भारताचे कर्णधार#भारतीय संघ#युवराज#युवराज कर्णधार#युवराज चॅपल#युवराज चॅपेल#युवराज धोनी#युवराज भारत#युवराज सिंग#राजकुमार#सचिन#सचिन तेंडुलकर
0 notes
Text
"लाँग लॉस्ट फ्रेंड" सह रोहित शर्माच्या फोटोवर, हरभजन सिंग युवराज सिंगला ट्रोल करतो | क्रिकेट बातम्या
“लाँग लॉस्ट फ्रेंड” सह रोहित शर्माच्या फोटोवर, हरभजन सिंग युवराज सिंगला ट्रोल करतो | क्रिकेट बातम्या
भारताचा कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूसोबतचा एक फोटो शेअर केला युवराज सिंग Instagram वर. चित्रात एकमेकांना मिठी मारताना दोघेही हसत आहेत. “माझ्या दीर्घकाळ हरवलेल्या मित्राला अनेक वर्षांनंतर भेटलो,” रोहितने हृदयाच्या डोळ्यांच्या इमोजीसह फोटोला कॅप्शन दिले. युवराज सिंगने या फोटोला प्रतिसाद देत ‘माय ब्रोथामन’ असे लिहिले. तथापि, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग, ज्याने…
View On WordPress
0 notes
Text
IND vs ENG Test: बुमराहने ब्रॉडच्या एकाच षटकात कुटल्या ३५ धावा; रचला विश्वविक्रम, फलंदाजीचा Video पाहून नक्कीच थक्क व्हाल
IND vs ENG Test: बुमराहने ब्रॉडच्या एकाच षटकात कुटल्या ३५ धावा; रचला विश्वविक्रम, फलंदाजीचा Video पाहून नक्कीच थक्क व्हाल
IND vs ENG Test: बुमराहने ब्रॉडच्या एकाच षटकात कुटल्या ३५ धावा; रचला विश्वविक्रम, फलंदाजीचा Video पाहून नक्कीच थक्क व्हाल इंग्लंडमधील बर्मिगहॅम येथे सुरु असणाऱ्या पाचव्या कसोटीमध्ये कर्णधार बुमराहने तुफान फलंदाजी केली Jasprit Bumrah scores 35 runs in one over of Stuart Broad : २००७ साली भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंहने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावले…
View On WordPress
0 notes
Text
युवराजने 1000व्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या विजयाबद्दल केले अभिनंदन, या खेळाडूचे केले कौतुक
युवराजने 1000व्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या विजयाबद्दल केले अभिनंदन, या खेळाडूचे केले कौतुक
अहमदाबाद वनडे : भारताने वेस्ट इंडिजवर ६ गडी राखून विजय मिळवला. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना ६ विकेटने जिंकला. टीम इंडियासाठी हा सामना ऐतिहासिक होता, कारण टीम इंडियाचा हा 1000 वा एकदिवसीय सामना होता. यामध्ये कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. भारताच्या विजयानंतर अनेक खेळाडूंनी संघाचे अभिनंदन केले. भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगने कर्णधार रोहितचे अभिनंदन…
View On WordPress
#अहमदाबाद#अहमदाबाद एकदिवसीय सामना#अहमदाबाद वनडे#टीम इंडिया#भारत वि वेस्ट इंडिज#भारत वि वेस्ट इंडीज#भारत वेस्ट इंडिज एकदिवसीय#युझवेंद्र चहल#युवराज सिंग#रोहित शर्मा#विराट कोहली
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 November 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर येत्या आठ डिसेंबरला मोर्चा काढण्याचा मराठा क्रांती मोर्चा संघटनेचा इशारा
** केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचं संरक्षण साधणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
** कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबादमध्ये एका तर जालन्यात चार रुग्णांचा मृत्यू
आणि
** भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी
****
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर येत्या आठ डिसेंबरला मोर्चा काढणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे. मराठा मोर्चाची आज पुण्यात बैठक झाली, त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ऊर्जा भरतीमध्ये सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास - एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना वगळल्याच्या विरोधात सर्व जिल्ह्यात वीज महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर परवा एक डिसेंबरला आंदोलन केलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. राज्य सरकारनं न्यायालयीन प्रक्रिया आणि इतर प्रत्येक बाबतीत वेळकाढूपणा केल्यानं, मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे, या अस्वस्थतेतूनच हे आंदोलन केलं जात असल्याचं, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
****
मराठा समाजाला आरक्षण का देण्यात येत नाही, याचा जाब प्रत्येकानं राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या समाजानं सत्तेत बसवलं, तोच समाज सत्तेतून खाली उतरवेल, असा इशाराही उदयनराजे यांनी यावेळी दिला. सर्वोच्च न्यायालायचा निकाल येईल, त्याला अधीन राहून मराठा समाजाची टक्केवारी राखून ठेवत इतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. मराठा समाजाच��या मोर्चांना उत्तर देण्यासाठी प्रतिमोर्चे काढण्यात येतात, त्यामागे कोण असतं, असा प्रश्नही उदयनराजे यांनी विचारला आहे.
****
राज्यात मुंबई उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयांचं कामकाज येत्या मंगळवारपासून नियमितपणे सुरू होणार आहे. सर्व न्यायालयांचे न्यायाधीश आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेनं दोन पाळ्यांत सकाळी अकरा वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत आणि दुपारी दोन वाजेपासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत काम करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस. डी दिघे यांनी दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची सद्य स्थिती लक्षात घेऊन मुख्य न्यायाधीश आणि प्रशासकीय न्यायाधीशांच्या समितीनं हा निर्णय घेतला आहे.
****
केंद्र सरकारनं आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचं संरक्षण साधणारे कायदे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज `मन की बात` या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा हा ७१वा भाग होता. या कायद्यांची ‘योग्य आणि पूर्ण माहिती’ शेतकऱ्यांची ताकद होऊ शकते असं पंतप्रधान म्हणाले. या कायद्याचा वापर करून राज्यातल्या धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या भटाणे गावातले शेतकरी जितेंद्र भोई यांनी व्यापाऱ्याकडून थकबाकी कशी मिळवता आली याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याबाबत जितेंद्र भोई यांनी आकाशवाणीसाठी आपली प्रतिक्रिया दिली आहे…
आज माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मन की बात या कार्यक्रमातून देशाचे माननीय प्रधानमंत्री साहेबांनी माझा नामोल्लेख केला. त्याबद्दल मला खूपच आनंद होत आहे. माननीय प्रधानमंत्री साहेबांचे आभार मानतो की, माझे मक्याचे पैसे बुडालेले असताना मी केंद्र शासनाचा शेतकरी हिताचा कायद्याच्या मदतीने मला तो पैसा परत मिळाल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज एका ९० वर्षीय कोविड बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार १४४ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. औरंगाबाद इथल्या घाटी रुग्णालयातून आज सहा जणांना सुट्टी देण्यात आली, जिल्ह्यातले ४१ हजार ११५ रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोविडबाधितांची एकूण संख्या ४३ हजार १८४ झाली आहे.
****
जालना जिल्ह्यात आज चार कोविडबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता ३१७ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात कोरोना विषाणू संसर्ग झालेले ४३ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार २८३ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या १२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार ६०४ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर ��ाधित असलेल्या ३६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातले सर्वच प्रकल्प वर्षभरापासून रखडले असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव इथला टेक्निकल टेक्सटाईल पार्क आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे प्रकल्प, महाविकास आघाडी सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी घेवून केंद्राकडे शिफारस केली नसल्यामुळे रखडले असून, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी न ठेवल्यानं आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केले नसल्यानं रखडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. येत्या पंधरा डिसेंबर पर्यंत यासंदर्भात बैठक घेतली नाही तर मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करण्यात येईल, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.
****
मध्य रेल्वे परवा, मंगळवारपासून काही विशेष गाड्या सुरू करत आहे. यातली मुंबई - लातूर विशेष ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून रात्री नऊ वाजता सुटेल आणि लातूरला दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता पोहचेल. लातूर इथून रात्री साडे दहा वाजता सुटणारी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहचेल. मुंबई-आदिलाबाद विशेष ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दुपारी चार वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता आदिलाबादला पोहचेल. आदिलाबाद इथून दुपारी एक वाजता सुटणारी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचेल. या विशेष गाड्यांमधू फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे.
$60B7F3D6-B41D-4F2E-890F-60F527B****
क्रिकेट
ऑस्ट्रेलियात सिडनी इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा ५१ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया संघानं आज सकाळी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, निर्धारित षटकांत यजमान संघानं चार गड्यांच्या मोबदल्यात ३८९ धावा करत, भारतीय संघासमोर ३९० धावांचं आव्हान ठेवलं. कर्णधार विराट कोहलीच्या ८९ आणि के एल राहुलच्या ७६ धावा वगळता भारतीय संघाचे अन्य फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर निष्प्रभ ठरले, निर्धारित षटकांत भारतीय संघ ३३७ धावांवर सर्वबाद झाला. तीन सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना दोन डिसेंबरला खेळवला जाणार आहे.
****
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आजचा ���कदिवसीय सामना खेळून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं अडीचशे एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा कोहली हा नववा भारतीय खेळाडू आहे. कोहलीच्या आधी अजहरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, आणि महेंद्रसिह धोनी या कर्णधारांसह अनिल कुंबळे, युवराज सिंह, विरेंद्र सेहवाग, यांनी यापूर्वी असा विक्रम केला आहे.
****
राज्यात परवा, मंगळवारी पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या करता मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह, आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र, शासकीय किंवा खासगी आस्थापनांनी दिलेलं ओळखपत्र, शिक्षण संस्थेत कार्यरत शिक्षक मतदारांना दिलेलं ओळखपत्र, पदवी किंवा पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत अपंगत्वाचं मूळ प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रं पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग काळात औषधी गुणधर्मामुळे परदेशात हळदीची मागणी वाढली असल्यानं चालू वर्षी १६ लाख हळद पोत्यांची निर्यात करण्यात आली आहे. सांगली मार्केट यार्डात देशातल्या सर्व ठिकाणची हळद विक्रीसाठी येत असून सध्या दररोज ४ हजार हळद पोत्यांची आवक सुरू आहे. राज्यात सांगली, हिंगोली, वसमत, नांदेड, जळगाव इथून दरवर्षी हळदीचं उत्पादन घेतलं जातं.
****////****
0 notes
Text
विराट-अनुष्काचा विवाह झाला .
विराट-अनुष्काचा विवाह झाला ., बॉलिवूडची चुलबुली गर्ल अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार विराट कोहली इटलीमध्ये विवाहबंधणात अडकले आहेत. विरुष्काच्या शाहीविवाह सोहळ्याचा विधी सुरु झाला असून १५ डिसेंबर पर्यंत हा लग्नसोहळा रंगणार आहे. विराट आणि अनुष्काचा विवाह हा पंजाबी पंद्धतीने झाला. विराट आणि अनुष्का दोन्ही ही पंजाबी आहेत. इटलीमध्ये सोमावारी दुपारी विराट आणि अनुष्का यांनी सात फेरे घेतले. लग्न सोहळ्यामध्ये दोन्ही कुटुंबियांच्या जवळचे व्यक्ती आणि मित्र परिवार उपस्थित होते. या सोहळ्यासाठी सचिन आणि युवराज व्यतिरिक्त अजून कोणालाही आमंत्रण दिलं गेलं नव्हतं. लग्नानंतर क्रिकेटर्स आणि बॉलिवूडकरांसाठी मुंबईतील जेडब्लू मॅरियट हॉटेलमध्ये २६ डिसेंबरला मोठं रिसेप्शन दिलं जाणार आहे. ज्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. दोघांच्या नातेवाईकांसाठी २१ डिसेंबरला दिल्लीत रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.,,http://www.maharashtracitynews.com/virat-anushka-got-married/
0 notes
Text
श्रीलंकेला 321 धावांचं टार्गेट
श्रीलंकेला 321 धावांचं टार्गेट
ओव्हल : भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेसमोर 321 धावांचं आव्हान ठेवलंय. याही सामन्यात भारताचे सलामीवीर धवन- रोहित या जोडीने शतकीय भागीदारी करत संघाला शानदार सुरुवात करून दिली.रोहित शर्मा 78 तर शिखर धवनने 125 धावांची तुफान खेळी केली. मात्र कर्णधार विराट (0) आणि युवराज (7) या मधल्या फळीतील फलंदाजांना सपशेल अपयश आले. मात्र महेंद्रसिंग धोनीने…
View On WordPress
0 notes
Text
सौरव गांगुली वाढदिवस: युवराज सिंगने भारताच्या माजी कर्णधाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या | क्रिकेट बातम्या
सौरव गांगुली वाढदिवस: युवराज सिंगने भारताच्या माजी कर्णधाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या | क्रिकेट बातम्या
भारताचे माजी कर्णधार आणि सध्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली शुक्रवारी 50 वर्षांची झाली आणि सोशल मीडियावर ‘दादा’साठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एक मजबूत लाइनअप तयार करण्याचे श्रेय गांगुलीला जाते आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2001-02 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते आणि ऑस्ट्रेलियाने यजमानांना फॉलो करण्यास सांगितल्यानंतर या संघाने ईडन…
View On WordPress
0 notes
Text
IPL 2022: SRH च्या अभिषेक शर्मा आणि CSK च्या शिवम दुबेमध्ये युवराज सिंगची झलक दिसली, रवी शास्त्रींनी ऋषभ पंतला दिला सल्ला ऋषभ पंतला दिला मोठा सल्ला
IPL 2022: SRH च्या अभिषेक शर्मा आणि CSK च्या शिवम दुबेमध्ये युवराज सिंगची झलक दिसली, रवी शास्त्रींनी ऋषभ पंतला दिला सल्ला ऋषभ पंतला दिला मोठा सल्ला
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांना पाहून भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला वाटते की तो स्वत: पूर्वीप्रमाणेच फलंदाजी करतो. सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा शिवम दुबे यांच्या नावाचाही समावेश आहे. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला खास…
View On WordPress
#SRH#अभिषेक#अभिषेक शर्मा#आयपीएल#आयपीएल २०२२#आयपीएल बातम्या#ऋषभ पंत#डीसी#दिल्ली आयपीएल बातम्या#दिल्ली राजधान्या#पँट#पँट रसेल मोड#पंत#पंत फलंदाजी#पंत रसेल मोड#युवराज#युवराज सिंग#रवी शास्त्री#राजकुमार#शास्त्री#शास्त्री पंत#शिवम दुबे#सनरायझर्स हैदराबाद
0 notes
Text
“तू माझ्यासाठी नेहमीच चिकू असशील”; खास भेटीसह युवराज सिंगचे विराटसाठी भावनिक पत्र
“तू माझ्यासाठी नेहमीच चिकू असशील”; खास भेटीसह युवराज सिंगचे विराटसाठी भावनिक पत्र
“तू माझ्यासाठी नेहमीच चिकू असशील”; खास भेटीसह युवराज सिंगचे विराटसाठी भावनिक पत्र भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने माजी कर्णधार आणि सहकारी खेळाडू विराट कोहलीसाठी खास पत्र लिहिले आहे. या पत्रासोबत युवराजने विराटसाठी खास भेटही पाठवली आहे. तू माझ्यासाठी नेहमीच चीकू राहशील आणि जगासाठी किंग कोहली, असे युवराजने म्हटले आहे. विराट कोहलीने सप्टेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान तिन्ही फॉरमॅटमध्ये…
View On WordPress
0 notes
Text
Virender Sehwag Shares Throwback Picture With Sachin Tendulkar, Sourav Ganguly, Rahul Dravid, And Yuvraj Singh
Virender Sehwag Shares Throwback Picture With Sachin Tendulkar, Sourav Ganguly, Rahul Dravid, And Yuvraj Singh
माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग शुक्रवारी खेळण्याच्या दिवसातील स्वतःचे छायाचित्र शेअर करून चांगले जुने दिवस आठवले. चित्रात फलंदाजीचे उस्तादही होते सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार आणि वर्तमान भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (बीसीसीआय) प्रमुख सौरव गांगुली, ‘द वॉल’ राहुल द्रविड आणि अनुभवी अष्टपैलू युवराज सिंग. या सर्व स्टार्सना भारतीय संघाच्या यशाचे श्रेय दिले जाते आणि त्यांनी भूतकाळात असंख्य विजयांना…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 May 2019 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ मे २०१९ सकाळी ७.१० मि. ****
** राज्यातल्या दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे ४८ तासांत निराकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात चारा छावणी आणि टँकरची मागणी व्हॉटस्ॲपवर नोंदवण्याची सूचना
** भेंडवळच्या घटमांडणीत यंदा चांगल्या पावसाचा अंदाज
** डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्वर्गीय विलासराव देशमुख आणि लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र कार्यान्वित
आणि
** लातूर जिल्ह्यात सोयाबीन बियाणांच्या आरएस २२८ आणि डीएस २२८ या वाणांवर बंदी घालण्याची मागणी
****
राज्यातल्या दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे ४८ तासांत निराकरण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रशासनाला दिले. दुष्काळावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुचवत, या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचंही आवाहन त्यांनी यावेळी केलं.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या दुष्काळ परिस्थिती आणि उपाययोजनांचा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. सर्व दुष्काळग्रस्त गावातील सरपंचांनी त्यांच्या गावात जलसंधारणाची अधिकाधिक कामे घ्यावीत, त्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करत असून त्यांच्या बॅंक खात्यात थेट निधी जमा केला जात आहे. ज्या गावात पाणीपुरवठ्याची योजना बंद पडली आहे. अशा योजनेच्या दुरूस्तीचे प्रस्ताव तात्काळ पाठविण्यात यावेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात ज्या ठिकाणी अतिरिक्त चारा छावण्यांची, टँकरची गरज आहे तिथली मागणी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून नोंदवण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. या दोन्ही जिल्ह्यांसाठी ८८७९७३४०४५ हा व्हॉटसॲप क्रमांक त्यांनी जाहीर केला.दुष्काळाशी संबंधित बाबी, तक्रारी, मागण्या आणि अडचणी या क्रमांकावर पाठवाव्यात त्या थेट माझ्यापर्यंत पोहोचणार असल्याचं मुख्यमंत्यांवरनी सांगितलं.
****
नाशिकच्या गंगापूर, दारणा, मुकणे, वालदेवी प्रकल्पांमधून औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरसाठी पाणी सोडण्यात आलं आहे. बावीसशे दशलक्षघन फूट इतकं पाणी सोडण्यात आलं असून ते येत्या १५ मेपर्यंत वैजापूरला पोहचेल, असा अंदाज जलसंपदा विभागानं व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता, शिर्डी, पुणतांबा या भागांनाही या पाण्याचा पुरवठा होणार आहे.
****
शिवशाहीर बाबासाहेब उर्फ बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार काल पुण्यात त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. दिल्लीत गेल्या ११ मार्च ला झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यास बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे काल पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुरंदरे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन पद्मविभूषण प्रदान केला.
****
यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यामध्ये साधारण तर जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज बुलढाणा जिल्ह्यातल्या भेंडवळ इथल्या घटमांडणीत व्यक्त करण्यात आला आहे. याठिकाणी अक्षय तृतीयेला दरवर्षी घटमांडणी करुन वर्षभराच्या पाऊस तसंच पिक परिस्थितीचं भाकित बघण्याची परंपरा गेल्या साडेतीनशे वर्षापासून आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्वर्गीय विलासराव देशमुख आणि लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र कार्यान्वित करण्यात आलं आहे. येत्या १५ मे रोजी वामन कर्डक अध्यासन तर २४ मे रोजी स्वर्गीय विलासराव देशमुख अध्यासन केंद्राचं उदघाटन होणार आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख अध्यासन केंद्राच्या संचालकपदी डॉक्टर राम चव्हाण यांची तर वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राच्या संचालकपदी डॉक्टर युवराज धबडगे यांची नियुक्ती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर इथल्या ऋणमो��न कुंडात काल ७३ जिवंत आणि १७ तुटलेली काडतुसं सापडली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलावातला गाळ काढण्याचं काम सुरु असतांना साधारण १५ ते २० वर्ष जुनी ही काडतुसं सापडल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात यंदाच्या खरिप हंगामात सोयाबीन बियाणांच्या आरएस २२८ आणि डीएस २२८ या वाणांवर बंदी घालण्यात यावी अशा मागणीचं निवेदन जिल्हा खत किटकनाशक आणि बियाणे विक्रेत्या संघटनेनं जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना काल दिलं. गेल्या वर्षी या वाणाची बियाणं उगवली नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. संघटनेनं ही बियाणे न विकण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र तरीही ती विकलेली निदर्शनास आल्यास संबंधितांवर प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे.
****
पिण्याचं शुध्द पाणी, जनावरांना चारा, तसंच शेत मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातल्या यंत्रणांनी योग्य नियोजन करण्याचं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केलं आहे. काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दुष्काळ निवारणाच्या कामात हयगय केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
****
परभणी जिल्ह्यातल्या पाणी टंचाई निवारणासाठी पैठणच्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावं, या मागणीसाठी काल अखिल भारतीय किसान सभा आणि जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीच्यावतीनं औरंगाबाद शहरातल्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं, यावेळी आंदोलकांनी घोषणा देत पाण्याची मागणी केली.
****
विक्रम टी कंपनीच्या दायित्व उपक्रमाअंतर्गत भाईश्री आणि नाम फाउंडेशनच्यावतीनं औरंगाबाद शहरात कडक किटली या उपक्रमांतर्गत ११ महिलांना कडक किटली टि स्टॉल वितरीत करण्यात आले. यावेळी अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे, भाईश्री फाउंडेशनचे रमेश पटेल तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.
****
लातूर जिल्ह्यातल्या शिरुर ताजबंद इथं सकाळी फिरायला गेलेल्या एका शिक्षक दाम्पत्याला अज्ञात वाहनानं चिरडलं. श्रावण सोमवंशी आणि प्रतिभा सोमवंशी अशी त्यांची नावे असून या अपघातात प्रतिभा सोमवंशी यांचा जागीच मृत्यु झाला तर श्रावण सोमवंशी यांचा रुग्णालयात नेत असतांना मृत्यु झाला. हे दोघे वळसवंगीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते.
****
जालना जिल्ह्यात विडोळी इथल्या भाऊसाहेब वाल्हेकर या ग्रामसेवकाला तीन हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अंबडच्या पाचोड नाका परिसरात अटक केली. वडिलांच्या नावावर असलेलं घर स्वत:च्या नावावर करण्यासाठी ग्रामसेवकानं तक्रारदाराकडुन बॉंड पेपर न घेता चार हजारांची रुपयांची लाच मागितली होती.
****
लातूर जिल्ह्यात मेथी इथं काल दुपारी अचानक लागलेल्या आगीत जवळपास पंधरा घरं जळून खाक झाली. या आगीत तीन म्हशी, वीस कोंबड्यांसह साडे नऊ लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. सुरूवातीला एका गोठ्याला अचानक लागलेली ही आग वाऱ्यामुळे पसरल्याचं सांगण्यात आलं.
****
गोंदिया जिल्ह्यातले तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जावेद इनामदार, त्याची पत्नी हुस्ना इनामदार या दोघांच्या विरोधात काल जवळपास ८० लाख रूपयांची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्या प्रकरणी अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला. ७८ लाख १५ हजार रुपयांची बेहिशोबी मालमत्ता संपादित करतांना त्यांच्या पत्नीने सहकार्य केल्यानं या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी राज्य शासनानं सुरू केलेल्या कायाकल्प योजनेत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला ५० लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. या रुग्णालयात असलेली स्वच्छता, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकात केली जाणारी जागृती तसंच रुग्णालयातील जैविक कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट यात सर्वाधिक गुण मिळाल्यानं रुग्णालयाचा प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे, असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे यांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातल्या साळसाने इथल्या ग्रामसेवकाला आचारसंहिता भंग केल्यामुळे काल निलंबित करण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या विकास कामांसाठी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केल्यामुळे सोमनाथ गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
****
महाराष्ट्र राज्य गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांच्या हत्या प्रकरणातल्या प्रमुख तीन आरोपींना अकोला जिल्हा न्यायालयानं १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम गावंडे, निवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे आणि त्यांचा पुतण्या धीरज यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
****
अनुभवी आणि नव्या दमाच्या खेळाडूंच्या समावेशामुळे भारतीय क्रिकेट संघ तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकेल, असा विश्वास, माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्�� केला आहे. १५ सदस्यीय भारतीय संघात, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहीत शर्मा आणि मोहम्मद शमी सारखे अनुभवी तर हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कुलदीप पंड्या यांच्यासारखे नवे खेळाडू आहेत. येत्या ३० मे पासून इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना, पाच जून रोजी दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
//***********//
t1"0 U
0 notes
Photo
रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय कटक : भारताने बाराबती स्टेडियममध्ये गुरुवारी अखेरपर्यंत रंगतदार ठरलेल्या दुसऱ्या वन-डे लढतीत इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला. तीन सामन्यांच्या मलिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. युवराज सिंग व महेंद्रसिंग धोनी यांनी केलेल्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर भारतानं तीन सामन्यांची मालिका 2 - 0 ने खिशात घातली. भारताने निर्धारित ५० षटकात ६ बाद ३८१ धावांची दमदार मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ८ बाद ३६६ धावांत रोखला गेल्या. जेसन रायने (८२) संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने जो रुटसोबत (५४) दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. कर्णधार मॉर्गनने सूर गवसल्याचे संकेत देताना ८१ चेंडूंमध्ये १०२ धावांची खेळी केली. त्याने मोईन अलीसोबत (५५) सहाव्या विकेटसाठी ९३ धावांची तर लियाम प्लंकेटसोबत (नाबाद २६) चार षटकांत ५० धावांची भागीदारी केली. पण त्याचे हे प्रयत्न संघाचा पराभव टाळण्यात अपुरेच पडले.इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनची शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली.इंग्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी २२ धावा असताना भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करताना केवळ ६ धावा दिल्या, अन भारताने जल्लोष केला.
0 notes