Tumgik
#मुंबईत पाऊस
airnews-arngbad · 7 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून अन्य दोनजण जखमी झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी कारवाई करत, किश्तवाड जिल्ह्यातल्या छत्रू पट्ट्यातल्या नदगाम भागात संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान जंगल परिसरात सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. दरम्यान, जखमी जवानांना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
हिंदी भाषा सर्व भारतीय भाषांना पूरक असून गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदी आणि इतर स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी भरीव कार्य झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीत अभिमानानं भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगासमोर हिंदीचं महत्त्व अधोरेखित केल्याचं ते म्हणाले. हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेसह स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी सर्व देशवासीयांनी प्रयत्न करावेत असं आवाहनंही त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र सरकारनं आजपासून कच्च्या तेलावर वीस टक्के आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क साडे बत्तीस टक्क्यांनी वाढवले ​​आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क शून्यावरून वीस टक्के करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेलावर आयात शुल्क लावल्याने सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असून कापूस उत्पादकांनाही काही प्रमाणात फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
मालवण इथल्या राजकोट किल्ला परिसरातील पुतळा कोसळल्या प्रकरणी, अटकेत असलेला मूर्तीकार जयदीप आपटे याला स्थानिक न्यायालयानं २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपटेच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल  मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईत २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत येत्या  १८ तारखेला हा सन्मान सोहळा होणार आहे. तापमान वाढीचं युग संपलं असून होरपळीचं युग सुरू झाल्यानं पर्यावरण रक्षणासाठी त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेनं व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
****
लातूर इथं संसर्गजन्य आजारावरील दोन दिवसीय परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या देवाडा साखर कारखान्याजवळ  काल सायंकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रज्वल आणि निखिल साठवणे अशी या मृत भावंडांची नावं आहेत, दुचाकीवर जाताना अज्ञात वाहनानं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कालपासून थांबवण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले होते, पाण्याची आवक कमी झाल्यावर ६ दरवाजे सुरु होते. काल हे सहा दरवाजेही बंद केल्याचं धरण प्रशासनानं सागितलं.
****
राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल.विदर्भातही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त  केली आहे.
****
राज्यात “एक पेड मां के नाम” या अभियानाअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
मुंबईत वीकेंडला मुसळधार पाऊस?
https://bharatlive.news/?p=171890 मुंबईत वीकेंडला मुसळधार पाऊस?
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रात ...
0 notes
marathinewslive · 2 years
Text
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडितांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडितांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत
राज्यभरात बुधवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान, पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील १४…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, विदर्भात यलो अलर्ट
मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, विदर्भात यलो अलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढील तीन दिवस पाऊस, विदर्भात यलो अलर्ट प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter महाराष्ट्रात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. मुंबई आणि आसपासच्या भागांसाठी हवामान विभाग एक अलर्ट जारी केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
[Hindi] होलीचा दिवस दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये कॅसेंआगावा हवामान / [Hindi] दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे होळीवर हवामान
[Hindi] होलीचा दिवस दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये कॅसेंआगावा हवामान / [Hindi] दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे होळीवर हवामान
देशातील बहुतेक शहरांमध्ये मार्चच्या कालावधीत वाढत्या तापमानात बेतहासा वाढ दिसून येते. सर्दीची विदाई आधी गर्भवती जोपर्यंत ट्रेलर झाली ती मार्चच्या लोकांच्या दिवसांमध्ये ती लोक द्राव करीत होती. तथापि मार्चच्या आरंभपासून उष्णतेच्या तापमाना दरम्यान मध्यभागी होणा प्री्या प्री मनासूनच्या वर्षामध्ये काही आराम दिलेले नाही. वाढत्या पारे वर ब्रेक लागा आणि बेतहाशा आणि बेमौसम गर्भवती लोकांना काही आराम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
येत्या चार दिवसात राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Tumblr media
मुंबई : राज्यात काही भाग वगळता पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह, ठाणे, परिसरात आज पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने उघडीप दिल्याने उष्णतेत वाढ झाली होती. मात्र, रात्री पाऊसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर इकडे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात दोन दिवसाच्या उघडीपीनंतर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. औसा आणि निलंगा तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आह���. अनेक ठिकाणी जमीन खरवडून गेल्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, येत्या चार दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आठवड्याभरापासून मुंबईत पावसाने दडी मारल्याने अतिशय उष्ण आणि दमट वातावरणात तयार झाले होते. मात्र, रात्री पावसाने हजेरी लावण्याचे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, येत्या २ ते ३ दिवसात मुंबईत आणखी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच तिस-या दिवसापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुन्हा पाऊस सक्रिय होणार राज्यातील अनेक भागात आषाढी एकादशीपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला होता. मात्र, काही भागात पावसाने उघडीप दिल्याने शेती काम करण्यास मुभा मिळाली. यादरम्यान शेतक-यांनी आपले खुरपणी, वखरणी, खते टाकणे अशी कामे उकरुन घेतली आहे. राज्यात आता पुन्हा पाऊस सक्रिय होणार असून, येत्या चार दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. Read the full article
0 notes
mhlivenews · 2 years
Text
राज्यात पूरस्थिती नियंत्रणासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची १४ पथके तैनात
राज्यात पूरस्थिती नियंत्रणासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची १४ पथके तैनात
मुंबई,दि.26 : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मुंबईत (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, एनडीआरएफ अशी एकूण १२ पथके तैनात आहेत. नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
राज्यात पूरस्थिती नियंत्रणासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची १४ पथके तैनात
राज्यात पूरस्थिती नियंत्रणासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची १४ पथके तैनात
मुंबई,दि.26 : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मुंबईत (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, एनडीआरएफ अशी एकूण १२ पथके तैनात आहेत. नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती…
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
पावसाचा दणका ! तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस
पावसाचा दणका ! तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस
मुंबई : मुंबईत सोमवारपासून मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासात मुंबई शहर विभागापेक्षा उपनगरात सर्वाधिक पाऊस पडला आहे. आज ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई शहर व उपनगरातील वाहतूक सुरळीत सुरु आहे. गेल्या २४ तासात मुंबई शहर विभागात ८२, पूर्व उपनगरात १०९ तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी सेमीकॉन इंडिया २०२४ या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आजचे युग हे सिलिकॉन डिप्लोमसीचे युग आहे. हा कार्यक्रम योग्यवेळी ठेवण्यात आला आहे. आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये जगाला आत्मविश्वास निर्माण करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. सेमीकंडक्टर संबंधित पायाभूत सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भारतात डेटा सेंटरची मागणी सातत्याने वाढत आहे. ती पूर्ण केली जाईल.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी, राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी दिली. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७०० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २०० अर्ज पात्र ठरले आहेत. यातील १०० ज्येष्ठांनी अयोध्या दर्शनाचा पर्याय निवडला आहे तर ७० हून अधिक ज्येष्ठ तिरुपती बालाजी दर्शनासाठी इच्छुक आहेत. अयोध्यासमवेत नांदेडहून अमृतसर इथल्या सुवर्णमंदिर दर्शनासाठीही तयारी केली जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
****
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रकाशयोजनेतील जागतिक आघाडीवर असलेल्या सिग्नीफायने देशातील सर्वात मोठ्या प्रदीप्त मोदकांचे अनावरण केले आहे. मुंबईत स्थापन झालेल्या या प्रदीप्त मोदकाचे नाव एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. १६ फूट उंच आणि ४ फूट पायथ्याशी असलेल्या या मोदकाला प्रकाश देण्यासाठी फिलिप्सचे दिवे लावण्यात आले आहेत. हा मोदक ७ सप्टेंबरपासून पुढील ११ दिवसांसाठी चिंतामणी गणपती मंडळ आणि मुंबईतील लाल बागचा राजा चौकात बसवण्यात आला आहे.
****
लातूर महानगरपालिकेने गेल्या ५ दिवसात शहरातून एक हजार ६४० मेट्रिक टन कचरा उचलला आहे. आगामी ८ दिवसात उर्वरित कचरा उचलण्याची ग्वाही मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त संस्थेच्या कंत्राटाचा कालावधी संपला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी संस्था नेमण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचं, महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
****
नवी मुंबई महापालिकेचे 'पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महावि‌द्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची १ जुलै रोजी दिल्ली येथे भेट घेऊन तात्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती.
****
भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखिल तुटला आहे. जिल्ह्यातील जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे दीड मीटरने तर ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. या पावसामुळे नदीकाठावर असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडल्यानं १७ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. विविध भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भात येत्या २४ तासात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
0 notes
Text
Mumbai Rain मुंबईत पाऊस सुरूच, काही ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम; लोकल गाड्यांचा वेग कमी
https://bharatlive.news/?p=108481 Mumbai Rain मुंबईत पाऊस सुरूच, काही ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर ...
0 notes
loksutra · 2 years
Text
Maharashtra Rain: मुंबई, पुणे, सातारा, पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज; महाराष्ट्रात आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे
Maharashtra Rain: मुंबई, पुणे, सातारा, पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज; महाराष्ट्रात आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे
हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे IMD ने पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आठवडाभर मुसळधार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
snehalshelote · 2 years
Link
0 notes
nandedlive · 2 years
Text
राज्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक भागांत रेड अलर्ट
Tumblr media
मुंबई : राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणा-या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ‘एनडीआरएफ’च्या १३ आणि ‘एसडीआरएफ’ची दोन पथके तैनात आहेत. तसेच गेल्या १२ दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यात ८४ नागरिकांचा तर १८० जनावरांचा मृत्यू झाला आहे. मध्ये रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिराने सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या मध्य उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा वेग मंदावला आहे. चंद्रपूर येथील रहमतनगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात चंद्रपूर शहरातल्या रहमत नगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात झालीय. जवळपास ६० ते ७० घरात नदीचे पाणी शिरले असून लोकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतलाय. इरई धरणाचे सर्व म्हणजे ७ दारे १ मीटरने उघडल्याने इरई नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नदीचे पाणी सातत्याने वाढत राहिल्यास चंद्रपूर शहरातल्या आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसायला लागला आहे. तर अनेक ठिकाणचे रस्ते बंद होण्याची शक्यता निर्माण झालीय. वसईमध्ये घरावर दरड कोसळली वसईमध्ये घरावर दरड कोसळली असून या मध्ये एकाच कुटुंबातील चौघेजण फसले. त्यातील दोघा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून दोन जण आत फसले असल्याची माहिती मिळालीय. पुणे शहरासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरणात क्षमतेच्या १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. आणखी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सुरुवातीला सुमारे १००० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. पालघरमध्ये दोन दिवस अतिवृष्टी, रेड अलर्ट जारी भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक १२ आणि १४ जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’ मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत मुसधळार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच, अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. पाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत मुंबई, कल्याण, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागने म्हटले आहे. Read the full article
0 notes
kokannow · 2 years
Text
कोकणात जोरदार पाऊस
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा मुंबई : मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबई आणि कोकणासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
राज्यात येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई – प्रतिनिधी भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यातल्या तुरळक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात कालही (शुक्रवार) पावसाने बऱ्याच ठिकाणी दर्शन दिलं होतं. आजही विविध ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईत तर अगदी पहाटेपासून पाऊस सुरु आहे. मुंबईतील चुनाभट्टी, दादर, लालबाग परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. राज्यात येत्या 5 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes