#भात्यातील
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड म्हणजे गुंतवणूकदारांच्या भात्यातील टॉप ट्रेंडिंग अस्त्र
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड म्हणजे गुंतवणूकदारांच्या भात्यातील टॉप ट्रेंडिंग अस्त्र
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड म्हणजे गुंतवणूकदारांच्या भात्यातील टॉप ट्रेंडिंग अस्त्र युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचा स्टॉक रु. ८६० चा टप्पा गाठू शकतो. मध्यम मुदतीत तो रु. ९०० पर्यंत झेपावू शकतो. गुंतवणूकदारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. नजीकच्या कालावधीत ते अधिक नफ्याची अपेक्षा या शेअरच्या माध्यमातून करू शकतात. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचा स्टॉक रु. ८६० चा टप्पा गाठू शकतो. मध्यम मुदतीत तो रु. ९००…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 July 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ जुलै २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      शिवसेनेच्या बारा खासदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश, लोकसभेत खासदार राहूल शेवाळे गटनेता.
·      १२ खासदारांनी वेगळा गट करुन लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.
·      महागाई तसंच अन्न पदार्थांवर वस्तू आणि सेवा कर आकारण्यावरुन संसदेत दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांचा गदारोळ, दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित.
·      सुट्या स्वरुपात खाद्य पदार्थ खरेदी केल्यास त्यावर वस्तु आणि सेवा कर आकारण्यात येणार नाही - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ��ांचं स्पष्टीकरण.
·      उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
आणि
·      राज्यात झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती अजूनही कायम.
****
आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या बारा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. या खासदारांनी संसदीय गट नेते म्हणून राहूल शेवाळे यांची निवड केली आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी आज दिल्लीत दिली. संसदेत गटाच्या प्रतोद म्हणून भावना गवळी काम पाहणार आहेत. शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदारांमध्ये कल्याणचे श्रीकांत शिंदे, हिंगोलीचे हेमंत पाटील, बुलडाण्याचे प्रतापराव जाधव, रामटेकचे कृपाल तुमाणे, मावळचे श्रीरंग बारणे, कोल्हापूरचे संजय मंडलिक, हातकणंगलेचे धैर्यशील माने, शिर्डीचे सदाशिव लोखंडे, नाशिकचे हेमंत गोडसे आणि पालघरचे राजेंद्र गावितयांचा समावेश आहे.
****
लोकसभेतील १२ खासदारांनी वेगळा गट करुन लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. शिंदे यांच्यासोबत यावेळी सर्व १२ खासदार उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि भूमिका घेऊन आपण जात असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा विधानसभा आम्ही भारतीय जनता पक्षासोबत एकत्रित लढलो होतो, त्यामुळे आम्ही जनतेच्या मनातील सरकार स्थापन केल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलतांना केलं.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. भारतीय जनता पक्षानं शिवसेनेत फूट पाडल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला. माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, असं ठाकरे यावेळी म्हणाले. कितीही संकटे आली तरी संघर्ष करु, पुन्हा पक्ष नव्यानं उभा करु, असा निर्धार ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
महागाई तसंच अन्न पदार्थांवर वस्तू आणि सेवा कर आकारल्याच्या निषेधार्थ संसदेत आज दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांनी गदारोळ केला. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित केला. सभापती ओम बिर्ला यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी नाकारली आणि प्रश्नोत्तराचा तास सुरु केला. त्यामुळे काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाच्या सदस्यांनी महागाई विरोधात घोषणाबाजी सुरु केली. गदारोळ वाढत गेल्यानं सभापतींनी लोकसभेचं कामकाज स्थगित केलं. ��ाज्यसभेत अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांचा स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतर विरोधकांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोठा गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं.
****
मसूर, गहू, ओट्स, मका, तांदूळ, मैदा, रवा, बेसन, आणि लस्सी यांसारखे खाद्य पदार्थ सुट्या स्वरुपात खरेदी केल्यास त्यावर वस्तु आणि सेवा कर - जी एस टी आकारण्यात येणार नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे. एक��� ट्विटमध्ये या ११ वस्तूंची यादी जोडत त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. वस्तू सुटे, अनपॅक किंवा लेबलशिवाय खरेदी केल्या गेल्या असतील तर या वस्तूंना जीएसटीमधून सूट दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. मात्र या वस्तू पॅक करून लेबल लावून विकल्या गेल्यास ५ टक्के दराने जीएसटी आकारला जाणार आहे.
****
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी महासचिव सीताराम येचुरी, शिवसेनेचे संजय राऊत यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी सहा ऑगस्ट रोजी होणार आहे.
****
ऑनलाईन सट्टेबाजीच्या भ्रामक जाहिराती दाखवू नये अशा सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांना दिल्या आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं गेल्या ९ जूनला सट्टेबाजीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी २०२२ च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुलांना मोहात पाडणाऱ्या अशा जाहिरातींवर निर्बंध घालण्याच्या उद्देशानं या मार्गदर्शक सूचना तयार केल्या असल्याचं ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती अजूनही कायम आहे. पुरामुळे २८ जिल्हे आणि २८९ गावे प्रभावित झाली आहेत. तात्पुरती ८३ निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आत्ता पर्यंत १२ हजार २३३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे १०८ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १८९ प्राणी दगावले आहेत. पावसामुळे आतापर्यंत ४४ घरांचं पूर्णत: तर एक हजार ३६८ घरांचं अशंत: नुकसान झालं आहे.
मराठवाड्यात औरंगाबादसह काही जिल्ह्यांत आज कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.
गडचिरोली जिल्ह्यात पाऊस थांबला आहे. मात्र जिल्ह्याच्या काही भागात अजूनही पूरस्थिती कायम असून १८ मार्गांवरील वाहतूक बंद आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व २३ दरवाजे एक मीटरने, ��र १० दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून २ लाख ११ हजार घनफूट प्रति वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे वैनगंगा नदी आणि तिच्या उपनद्यांना पूर आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे. चंद्रपूर, वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या ७०० ते ८०० नागरिकांचं राज्य राखीव पोलिस दलाच्या सहाय्याने स्थलांतर करण्यात येत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. लवकरच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.
****
बर्मिंगहॅम इथं होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडुंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दहा वाजता संवाद साधणार आहेत. क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याआधी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे, असं सूत्रांनी सांगितलं. २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होत असलेल्या या स्पर्धेत २१५ खेळाडू सहभागी होत आहेत.
****
राष्ट्रव्यापी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं दोनशे कोटी ३३ लाख मात्रांचा टप्पा गाठला आहे. काल देशभरात २७ लाख ७८ हजारांहून अधिक लोकांचं लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. कोविडमुक्तिचा दर सध्या ९८ पूर्णांक ४७ शतांश टक्के इतका आहे. देशात काल नव्या १५ हजार ५२८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १६ हजारांहून अधिक लोक काल कोविडमुक्त झाले.
****
वन महोत्सवातंर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील वृक्षारोपणाचा शुभारंभ करमाड इथं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते आज झाला. करमाड इथल्या न्यू हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी ‘एक विद्यार्थी, एक झाड’ याप्रमाणे करमाडच्या टेकडीवर वृक्षारोपन केलं. या रोपांमध्ये कडूलिंब, चिंच, करंज, बांबू, वड, पिंपळ आणि उंबर आदींचा समावेश आहे. वनमहोत्सवातंर्गत करमाड आणि भांबर्डा इथल्या टेकडींवर ४० हजार रोपे लावण्यात येणार आहेत.
****
0 notes
dnyanesh001 · 6 years ago
Link
मटा प्रतिनिधी, मुंबईनौदलाच्या भात्यातील 'तलवार' अशी ओळख असलेल्या पश्चिम कमांडमध्ये महत्त्वाचे खांदेपालट झाले आहेत... from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2YlClNW
0 notes