#बदललेलं
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
प्रेमासाठी धर्मेंद्र झालेले मुस्लिम, बदललेलं नाव माहीत आहे का?
प्रेमासाठी धर्मेंद्र झालेले मुस्लिम, बदललेलं नाव माहीत आहे का?
प्रेमासाठी धर्मेंद्र झालेले मुस्लिम, बदललेलं नाव माहीत आहे का? Dharmendra- Hema Malini: हिंदी सिनेविश्वात अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांची ऑनस्क्रीन जोडी तर सुपरहिट झालीच शिवाय खऱ्या आयुष्यातही त्यांनी एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्वीकार केला. यातली एक जोडी म्हणजे एव्हरग्रीन धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची. दोघांनी घरच्यांचा तीव्र विरोध पत्करून लग्न केलं होतं. Dharmendra- Hema Malini: हिंदी…
View On WordPress
0 notes
manoasha · 22 days ago
Text
जबाबदारीत हरवलेलं बालपण ,  संघर्ष आणि उभारणी
Sibling bond of unconditional love. काउंसलरच्या दृष्टिकोनातून: जबाबदारीमुळे हरवलेलं बालपण – एक केस स्टडी मागील वर्षी मी एक महत्त्वपूर्ण केस ऑनलाइन काउंसलिंगद्वारे हाताळली, जी मला खूपच जवळची वाटते. आताच मला त्या केस संदर्भात feed back मिळाला, जो खूपच सकारात्मक आहे.ही केस मुंबईहून होती, जिथे एक 12 वर्षांची मुलगी, अनन्या (बदललेलं नाव), आपल्या लहान भावाच्या जबाबदारीखाली दबलेली होती. हे प्रकरण फक्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२८ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय लोक शाही आघाडी सरकारचं उद्दीष्ट भ्रष्टाचार समूळ नष्ट करणं आणि पुराव्यावर आधारित कारवाई करणं हे असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत धोरणाचं उद्दिष्ट देशातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देणं आणि रोजगारक्षमता वाढवणं हे असून, सरकारनं थेट लाभ हस्तांतराच्या माध्यमातून आतापर्यंत ३८ लाख कोटी रुपये लोकांना दिल्याचंही मोदी यांनी सांगितलं.
****
स्वातंत्रयवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जागतिक गुंतवणुकदार बँक गोल्डमन सॅक्सनं, २०२४ साठी भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपीचा दर, सहा पूर्णांक सात टक्क्यांपर्यंत वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मोठ्या प्रमाणात लाभांश हस्तांतरणामुळे अतिरिक्त वि��्तीय वाढीचा वेग अपेक्षित आहे. भारताचा वाढीव वेग सक्षम असून, एप्रिल - जून मध्ये चलनवाढीचा दर खाली येण्याची शक्यता आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
****
वसुधैव कुटुंबकम ही भारताची मुलभूत मूल्यं आणि नीतिमूल्य ही जागतिक आरोग्य परिषदेच्या, सर्व काही आरोग्यासाठी आणि सर्वांसाठी आरोग्य, या मध्यवर्ती संकल्पनेशी सुसंगत आहे, असं मत केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी व्यक्त केलं आहे. स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या बैठकीत ते काल बोलत होते. माहिती आणि जागरुकता तसंच प्रतिबंधात्मक उपाय यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच, पारंपारिक सार्वजनिक आरोग्यविषयक दृष्टीकोन ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
****
रेमाल चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये बांगलादेशात दहा, तर पश्चिम बंगालमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. या चक्रीवादळामुळे बदललेलं पश्चिम बंगालमधलं वातावरण हळूहळू पूर्वदावर येईल, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली.
****
0 notes
omkarbhoir · 5 years ago
Text
डोंगर, देवदार आणि दगड
प्रस्तावना 
हिमालयात फिरायला गेलेला तसा मी काही पहिला मनुष्य नाही. अगदी अभ्यासपूर्ण, जिज्ञासू आणि संशोधक मन असलेला आणि हिमालयाचं रहस्य आता मीच सोडवणार असा विचार करणारा तर मुळीच नाही. कामाच्या रहाटगाड्यात कंटाळलेलो आम्ही तिघे जण काहीतरी वेगळं म्हणून कामधंदे सोडून फिरायला गेलो तेवढंच काहीसं ऍडव्हेंचर. तिघांचे तीन वेगळे विचार, कामं करण्याच्या वेगळ्या पद्धती आणि समोर दिसतंय ते चितारण्याच्या वेगळ्या शैली. हे जे तुम्ही आता काही वाचताय, पाहताय हि माझी शैली.
हे प्रवास वर्णन नाही, अनुभवकथन नाही, हा काही प्रवासाचा इतिवृत्तांत सुद्धा नाही, तर मला गोळा कराव्याशा आणि सांगाव्याशा वाटलेल्या क्षणाचा घेतलेला मागोवा आहे. हे काही पॅचेस आहेत; आठवणीत सदैव कोरल्या गेलेल्या क्षणांचे. बरं, या फक्त आठवणी नाहीयेत तर त्यासोबत काही पुरावे सुद्धा आहेत, त्या क्षणांचे. पहिला पुरावा म्हणजे, गोळा केलेले काही दगड; जे निःशब्द, शाश्वत असतात. त्यांना भावना नसतात पण त्यांनी सगळं सोसलेलं असतं, अनुभवलेलं असतं. दुसरा पुरावा म्हणजे  झाडांची पानं आणि लाकडाचे काही तुकडे, झाडं तशी दगडांइतकी जुनी नसतात. पण ती नव्याने येत असतात, बहरत असतात. त्या झाडांच्या आधीच्या पिढ्यांनी, दगडांसारखंच सगळं पाहिलेलं असतं, आळीपाळीनं. त्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर ती तग धरून उभी असतात.
असेच काहीसे क्षण, काही पुरावे सांगणारे हे शब्द. बस्स, त्यापलीकडे काही नाही.
...........
९ ऑगस्ट, २०१८. गुलमर्ग, काश्मीर.
Tumblr media
“इरफानभाई, अब ये टुरिस्ट स्पॉट बोहोत हो गये. किधर ऐसी जगह ले चलो, जहाँ कोई नहीं हो.”
आमचे घोडे रस्ता सोडून कच्च्या वाटेला लागले. घोडा आणि इरफान सराईतपणे त्या गोल दगडांवरून आणि गुडघाभर चिखलातून जात होते. आम्ही पाठीवर बॅगा आणि मुठीत जीव घेऊन कसेबसे त्या चार पायांच्या फुरफुरणाऱ्या प्राण्यावर बसलो होतो. हलकासा पाऊस पडत होता म्हणून इरफानची थोडी घाई चालली होती. त्या अरुंद पायवाटेवरून जाताना आजूबाजूच्या झुडूपाला आमचे पाय घासले जात होते. इथे आम्हाला माणसं दिसत नव्हती. उगाच खिदळणं नाही, मोबाईलवर फोटो काढणं नाही. जसजसे पुढे जात होतो, वाहत्या पाण्याचा आवाज तीव्र होत होता. इरफानला आम्हाला काय हवंय ते कळलं होतं.
एक ओहोळ होता तो. मोठमोठाले दगड असलेला, आधी भिजून गेलेल्या दगडांवर चांगलंच शेवाळ साचलं होतं. आजूबाजूला सरळ वाढलेली पाईन ची घनदाट झाडं आणि त्यातूनही झिरपून पडणारा पाऊस. ओलं करणारा नव्हे तर जॅकेटवर दवबिंदूंसारखा विसावणारा. या सगळ्याला खळाळत वाहणाऱ्या पाण्याचं पार्श्वसंगीत. पाणी मात्र स्वच्छ होतं. इरफान गेला आणि ओंजळीत पाणी घेऊन प्यायला. आम्हालाही बोलला, “पीओ, कुछ नहीं होता हैं” आम्ही सुद्धा एका रिकाम्या बाटलीत पाणी भरून घेतलं आणि घोटभर प्यायलो.
मग आम्ही तिथे विसावलो, बराच वेळ थांबलो. दगडांवर बसलो, ओल्या गवतातून फिरलो. निघालो तेव���हा दुपार टळून गेली होती. भूक जाणवायला लागली होती पण आम्हाला त्या दिवशीचा निवांत क्षण मिळाला होता.
...........
१० ऑगस्ट, २०१८. श्रीनगर, काश्मीर.
आठवणीत ठेवण्यासारख्या क्षणातला हा एक क्षण. लिहिताना पेनाची खरखर स्पष्ट ऐकू यावी, इतका निवांत आणि शांत. काय असेल या शांततेचं रहस्य? मला उगाचंच पहिल्या जगातून आलेल्या त्या पत्रकारांच्या भूमिकेत घुसायचं नाहीये. पण देवदारच्या लाकडांनी नटलेल्या या हाऊसबोट मधली हि उबदार शांतता; माझ्या मनातल्या ‘काश्मीर’ या समीकरणाबाबत अजूनच गोंधळ उडवत आहे. हि वरवरची शांतता की हाच या लोकांचा खरा पिंड? जादूच्या दुनियेत जसं काहीतरी एका क्षणी असतं, तेच दुसऱ्या क्षणी नसतं तसं तर हे फसवं जग नाही ना?
“काश्मीर का मौसम मुंबई के फॅशन कि तरह होता है; कब बदल जाये पता नहीं चलता. समझे?” आमचा ड्रायव्हर जावेद आम्हाला सांगत होता, ते कदाचित या अर्थीही लागू पडत असावं.
Tumblr media
श्रीनगर वरून आम्ही निघालो होतो जाताजाता जावेद गाडीच्या समोरच्या काचेतून मान किंचित खाली वाकवत काहीतरी पाहत बोलला,  ** **
“ये जो सामने देख रहे हो ना? ये बड़ा वाला पेड़; इसे चिनारका पेड़ बोलते है.”
“जो ‘मोहब्बतें’ मूवी मै पत्ते उड़ते है ना? वो इसी पेड़ के होते है.”
“ये पेड़ काटने को अभी गवर्नमेंट का बैन है. सजा होती है; हाँ.”
मला त्या झाडाची पानं हवी होती. सुदैवाने मिळाली.
...........
१० ऑगस्ट, २०१८. झोजिला पास, काश्मीर.
Tumblr media
एव्हाना निसर्गातली स्थित्यंतरं स्पष्ट जाणवायला लागली होती. पर्वतांचे आकार वाढत चालले होते आणि त्यांच्यावरची झाडं आता कमी होत होती. ठिसूळ दगडांचे अजस्त्र पर्वत, त्यांच्यावर नजर फिरवताना छाती दडपून जाईल एवढे भव्य. अशाच एका मोठ्या पर्वताच्या पायथ्याशी आम्ही चहासाठी थांबलेलो होतो. एरवी घाई करणारा जावेद सुद्धा निवांत होता. चहा येईपर्यंत आम्ही डोंगराच्या मंद चढावावर जायचा प्रयत्न केला. वर एक मेंढपाळ आपल्या बकऱ्यामेंढ्या घेऊन जवळजवळ बर्फापर्यंत गेला होता. चित्रविचित्र आकाराचे असंख्य दगड होते, दगडांमध्ये कोणता तरी धातू नक्की असावा त्याशिवाय ते चमकत नसावेत. बराच वेळ थांबल्यानंतर जावेदची हाक आलीच. आम्ही पुढे निघालो.
...........
१० ऑगस्ट, २०१८. कारगिल युद्ध स्मारक, द्रास, काश्मीर.
Tumblr media
युद्धस्य कथा: रम्या:
कुठे बनतात अशी माणसं? बलिदान, शहीद होणं ऐकायला किती छान वाटतं पण वेळ आलीच तर आम्ही काय करु? कसे वागू? आम्हाला खरंच किंमत कळते या त्यागाची कि त्यांनासुद्धा त्याचा पगार मिळतो, बऱ्याचश्या सवलती मिळतात असं म्हणून फक्त सोडून देतो आपण? झेंड्यासाठी जीव देणाऱ्या या सैनिकांना काय वाटत असेल जेव्हा ते सुटीवर घरी येतात आणि गलिच्छ राजकारणाने बरबटलेली वर्तमानपत्रं पाहतात? “हिटलर सारखा देश चालवला पाहिजे” असं जेव्हा नाक्यावरचे  विद्वान एकमेकांना म्हणतात तेव्हा काय वाटत असेल त्या महापुरुषांना ज्यांनी रक्त आटवलंय आणि सांडलंय या लोकशाहीसाठी?
द्रास च्या त्या कारगील युद्ध स्मारकातून बाहेर पडताना, कमानीवर एक ओळ लिहिली होती.
‘When you go home, tell them of us and say, ‘For their tomorrow, we gave our today.’
'जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा जाऊन सांगा, तुमच्या भविष्यासाठी आम्ही आमचा वर्तमान दिलाय.'
आजूबाजूच्या हिमालयाइतकाच उत्तुंग पराक्रमाची आठवण म्हणून एक त्रिकोणी दगड मी चालता चालता उचलला. ‘टायगर हिल’
...........
११ ऑगस्ट, २०१८. लेह-लडाख.
डोंगरांचे आकार एव्हाना पूर्णतः बदलले होते. त्यात तळहातावर मावतील अश्या आकाराच्या अब्जावधी दगडांनी बनलेले पर्वत होते. तर काही पर्वत वाळूचे मोठमोठाले ढिगारे वाटावेत तसे दिसत होते. काही पर्वतांच्या शिखरांवर बर्फ अजूनही होता तर काहींचा पूर्ण वितळलेला होता. दर दोन डोंगरांपलीकडून एखाद्या कपारीतून पाण्याचा प्रवाह झिरपत होता. शांत. संथ. खाली वाहणाऱ्या नदीला तो जाऊन मिळत होता. तिला दोन पावलं पुढे घेऊन जात होता.
बऱ्याच तासांच्या प्रवासानंतर लेह आलं. गाडीतून उतरलं कि जड झालेले श्वास जाणवत होते. अगदी रस्ता ओलांडताना सुद्धा थकायला होत होतं. राज्य बदललेलं नव्हतं पण माणसं, भाषा, धर्म आणि आजूबाजूचं वातावरण चांगलंच बदललेलं होतं. काहीही न करता आलेला थकवा जाणार नव्हताच किंबहुना काही केलं तर वाढणारच होता. फार विचार न करता आम्ही सरळ झोपी गेलो.
...........
११ ऑगस्ट, २०१८. फोर्ट रोड, लेह.
“च्यायला, हा कसला ड्राय डे? आपल्याकडे ड्रायडे ला ड्रिंक्स नाही मिळत. आणि इथे..”
“ड्रिंक्सचं सोड रे, नॉन वेज बंद नको असायला हवं होतं”
“हो ना यार, चिकन मोमो तरी ऍटलीस्ट”
“….”
“बरं, खायला काहीतरी साधंसं घेऊयात, मला ते तिबेटियन फ्लॅट नूडल्स नाही जमले फारसे.”
“हं”
“लोकं बाकी छान आहेत लडाखची; आपल्याला आवडली. उगाच काही कटकट नाही. लोकांना फसवणं नाहीं. निमूटपणे आपा��लं काम करतात. विचारलं तेवढंच बोलतात. टुरिझम वाढलंय, एवढी लोकं येतायत पण नीट बोलतात; उद्धटपणा नाही, तुमच्या पुण्यासारख्या”
“आवडली ना? छान. घरी घेऊन जा मग त्यांना”
...........
१३ ऑगस्ट, २०१८. श्योक नदी पात्र, नुब्रा.
Tumblr media
“किती वर्षं लागत असतील नाही या दगडांचे वाटोळ्या आकाराचे गोटे व्हायला? कित्येक वर्ष बर्फाखाली, पाण्याखाली रगडून निघत असतील. काय काय घरंगळत जात असेल यांच्यावरून. बर्फ, पाणी आणि अजून खूप सारी मोठी दगडं सुद्धा.
दगडं पण बघ ना, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या टेक्शचरची. हा प्रवाहच बघ किती मोठा आहे; ज्याच्या मधोमध आपण उभे आहोत. कितीतरी वर्ष लागली असतील फक्त हा प्रवाह बनायला आणि मग या दगडांचे गोटे.
बरं, आता या गोट्यांचं काय होणार पुढे? हे असेच राहतील कि झिजून झिजून छोटे होत होत वाळू बनून जातील?”
“...”
“आपण खूप लहान आहोत रे या सगळ्यांपुढे, खूप लहान”
...........
१४ ऑगस्ट, २०१८. पॅंगाँग तलाव.
भलाथोरला तलाव, भोवती शिखरावर बर्फ असणारे पर्वत. जोरजोरात वाहणारा अतिथंड वारा. त्यात पडणारा पाऊस. तो पाऊस अक्षरश: झोंबत होता. तलावात कमीतकमी पाय ओले करावेत असं वाटत होतं. पण थंडीत बूट काढायची हिंमत होत नव्हती. तरीही पाण्यात हात बुडवून पहिलाच. पाणी बर्फाइतकं थंड होतं. हात चोळतच आम्ही गाडीत येऊन बसलो. तेव्हा कुठे बरं वाटलं.
थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी अजून बरेचसे पर्यटक होते, काही छोट्या टपऱ्या होत्या, तिथे गेलो. गेल्यावर कळलं आजूबाजूला फार मराठी लोकं आहेत. कोण कोणाला फोटो काढायला सांगतंय,कोण हाका मारतंय. क्षणभर आपण महाबळेश्वरला आलोय असं वाटलं.
...........
१५ ऑगस्ट, २०१८. चांगला ��ास.
आयुष्यात आज पहिल्यांदा स्नोफॉल पहिला. आजूबाजूला साचलेला बर्फ उचलून त्याचा हाताने गोळा करताना हात थंड पडले पण मज्जा आली. पटकन आरोहीची आठवण झाली. आरोही म्हणजे माझी भाची. ‘काश्मीरला येताना कालाखट्टा ची एक बाटली घेऊन यायची आणि तिथे हवे तेवढे बर्फाचे गोळे बनवुन खायचे’ हे तिचं खूप जुनं स्वप्न. मनातल्यामनात हसतच मी तिथल्या त्या झोपडीवजा हॉटेलात गेलो. बऱ्यापैकी गर्दी होती आत. बाहेरच्या थंडीमुळे आतली उब हवीहवीशी वाटत होती. आत चहा झाला नसता तरच नवल.
चहाचे पैसे देऊन आम्ही बाहेर पडलो. जॅकेट वर जमा झालेले बर्फाचे छोटे छोटे कण झटकून गाडीत बसलो. आणि परत रस्त्याला लागलो.
अजून काही तासांनी आम्ही लेहला पोहोचणार होतो. मग तिथून उद्या पहाटेच पुढल्या ठिकाणी निघणार होतो. नेक्स्ट डेस्टिनेशन. मनाली.
...........
१६ ऑगस्ट, २०१८. लेह आणि मनालीच्या मध्ये कुठेतरी.
भलताच वळणदार रस्ता आहे. ठिकठिकाणी दरड कोसळली आहे; ती हटवण्याचं काम चाललंय. हिमाचल प्रदेश टुरिझम ची ती बस, हळूहळू घाटातून पुढे चाललीये. हा प्रवास खूप थकवणारा आहे. बसच्या खिडकीतून खाली पाहिलं कि दरीच्या एकदम टोकावरून जाणारी बस ची चाकं दिसतायत. म्हणून खिडकी बाहेर पहायची तशी हिंमत होत नव्हती. आम्ही बसल्या बसल्या झोपा काढत होतो.
......
“टोंटी मिनिट ब्रेक फॉर टी, ओन्ली टोंटी मिनिट” बसचा क्लिनर ओरडून सांगत होता (बस मधल्या फिरंगींसाठी इंग्रजी).
बस मधली माणसं उतरत होती चहा पिऊन येऊन गाडीत परत झोपत होती. थोड्या थोड्या अंतराने चहासाठी थांबणं चालूच होतं. कदाचित, प्रवाशांपेक्षा ड्रायव्हरला त्याची जास्त गरज होती.
......
“कंटाळा आला राव आता, किती वेळ झाला च्यायला तोच डोंगर दिसतोय. हा डोंगराभोवती गोल गोल बस फिरवतोय कि काय?”
“.....”
“ए, उठ ए. किती झोपणार आहेस”
Tumblr media
१७ ऑगस्ट, २०१८. ���नाली.
दुसऱ्या दिवशी दुपारी, साधारण तीन वाजता मनाली आलं. जांभया देत हळूहळू सगळेजण बसमधून खाली उतरले.
...........
१९ ऑगस्ट, २०१८. मनाली.
मनाली खरंच सुंदर आहे. गेल्या दहा बारा दिवसापासून भटकणारे आम्ही इथे जरा विसावलोय. उशिरा उठतोय, हॉटेल मध्ये बॅग्स ठेऊन इकडे तिकडे भटकतोय. इथल्या शेजारच्याच, मॅक्स नावाच्या एका राजबिंड्या कुत्र्याशी चांगलीच मैत्री झालीये. तो रात्रीच्या जेवणाच्या वेळेस आमच्या सोबतच असतो. मनालीत येऊन खूप दिवसांनी बटर चिकन खाल्लं. खूप बरं वाटलं. अधूनमधून घरची आठवण सुद्धा येतेय, खासकरून जेवताना. घरी गेल्यावर पहिल्यांदा मासे खायचे हे आम्ही तिघांनी नक्की केलं.
सगळ्याबाजूनी डोंगरांनी वेढलेलं मनाली शहर आपल्याच मस्तीत जगतंय. वज्रेश्वरीला, आमच्या गावी, अबोलीची पुष्कळ झाड आहेत, मागच्या अंगणात. तशीच इथल्या  अंगणात गुलाबाची झाड आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर बरीच फुलं सुद्धा आहेत. सिनेमा मध्ये पाहिलेल्या, पाठीवर सफरचंदाच्या टोपल्या घेऊन फिरणाऱ्या सुंदर बायका इथे खरंच दिसतायत. इतक्या सुंदर ठिकाणच्या मुली सुंदर नसत्या तरच नवल.
मनाली हे इतर कुठल्याही हिल स्टेशन सारखं आहे अस आम्हाला बरेच जण बोलले होते पण आमचा अनुभव वेगळा होता. कदाचित आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आलो नव्हतो म्हणून असेल. काहीही असो, मनाली मध्ये आम्ही रमलोय.
...........
२१ ऑगस्ट, २०१८. मनाली.
Tumblr media
मनालीतला तिसरा दिवस. आजूबाजूचं फिरून झालंय. घरच्यांसाठी काही छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यात. पण इथल्या नेचर पार्कमधुन पाय निघत नाहीएत. नेचर पार्क असावं तर असं. कुंपण घातलेलं एक जंगलच. उंचच उंच वाढलेली देवदार ची झाडं. अधून मधून दिसणारी काही छोटी-मोठी दगडं, बऱ्याचश्या दगडांवर शेवाळ आलंय. पण या शेवाळावरून पाय घसरत नाहीत. उलट ते छान मऊमऊ आहे. या जंगलातून एक पायवाट गेलीये. जंगलाच्या डाव्या बाजूला मनाल्सु नदी वाहतेय. तिथल्या थंड शांततेत सारखी आपली आठवण करून देतेय. जमिनीवर देवदार वृक्षाची फळ पडली आहेत त्यांना देवदार वृक्षाचा विशिष्ठ असा सुरेख वास आहे. हा वास हॉटेलात, देवळात आणि बऱ्याच ठिकाणी येत होता, हाउसबोटीत सुद्धा. कारण इथे सगळीकडे देवदारचीच लाकडं वापरली होती.** **
पार्कात खूप निरनिराळ्या प्रकारची माणसं दिसत होती. बरेचसे पर्यटक होते, स्थानिक बायका त्यांच्या पारंपरिक वेशात काहीतरी शोधत होत्या. विचारल्यावर कळलं कि त्या मशरूम शोधत होत्या. गोल हिमाचल पद्धतीची टोपी घातलेले लोक जाताना दिसत होते. कॉलेज ला जाणारी काही जोडपी सुद्धा एकांत शोधत तिथे आली होती. तो एकांत त्यांना तिथे मिळत होता. प्रत्येकाला प्रत्येकाचा निवांत वेळ मिळावा एवढं मोठं पार्क होतं ते. मला सुद्धा मिळाला, पण पहिल्या दिवसाचा पुरला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो आणि तोही पुरला नाही म्हणून तिसऱ्या दिवशी सुद्धा गेलो. तिथे बसून मी पुस्तक वाचलं, डायरीत थोडंफार लिहिलं आणि चक्क एका मोठ्या दगडावर झोपलो सुद्धा.
तिथे ठेवलेले खुप पक्षी पाहिले. त्यातला सर्वात आवडला तो म्हणजे ‘चकोर पक्षी’. मी जेव्हा जेव्हा तिथे गेलो तेव्हा तेव्हा त्याला भेटून आलो. हाच पक्षी पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी आहे हे नंतर कळलं.
शेवटच्या दिवशी गेलो तेव्हा तिथे एका भोजपुरी गाण्याचं शूटिंग सुरु होतं. लांब केस मोकळे सोडलेली एक सुंदर मुलगी फुलाफुलांच्या झोपाळ्यावर बसून झोके घेत होती. आजूबाजूला बरेच फिरंगी जमा झाले होते आणि गमतीनं शूट पाहत होते, फोटो काढत होते.
ती माझी शेवटची फेरी होती त्या पार्कातली, एवढ्या सुंदर ठिकाणाची दगडाव्यतिरिक्त काहीतरी आठवण मला हवी होती. मी देवदारच्या एका पडलेल्या अजस्त्र वृक्षाजवळ गेलो, त्या लाकडाचे काही तुकडे उचलले. मला परत त्या पार्कात जायचं होतं. ते तुकडे ��ंजळीत घेऊन त्यांचा वास घेतला कि मी तिथे अलगद जाऊन पोहोचणार होतो. मी माझ्यासाठी ट्रिप वरुन आणलेली ती सर्वात मौल्यवान गोष्ट होती.
त्या पार्कने मला काय दिलं हे शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. हा आमच्या ट्रिप चा शेवट होता. आणि तो शेवट खरंच सुंदर झाला.
1 note · View note
rebel-bulletin · 3 years ago
Text
सुसाईड नोट बायकोला पाठवून हिंगणघाटवरून आत्महत्या करण्यासाठी नागपुरात आला | अन् पोलीस आल्यावर वेगळंच घडलं!
सुसाईड नोट बायकोला पाठवून हिंगणघाटवरून आत्महत्या करण्यासाठी नागपुरात आला | अन् पोलीस आल्यावर वेगळंच घडलं!
नागपूर : बत्तीस वर्षांचा तरुण. घरी आईवडील-बायको. सुखाचा संसार. पण, घरगुती भांडणात तो पिसला गेला. एकीकडं बायको तर दुसरीकडं आईवडील. मग, जीवन नकोसे झाले. त्याने आत्महत्या करणार असल्याचे बायकोला व्हॉट्सअपवर पाठविले आणि आत्महत्या करण्यासाठी हिंगणघाटवरून नागपूरला आला. पण, पोलिसांची एंट्री झाल्यावर वेगळचं घडलं. (सुसाईड नोट) एकीकडं बायको, दुसरीकडं आईवडील गणेश (वय 32-नाव बदललेलं) हा वर्धा जिल्ह्यातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
#Covid19 #BreakTheChain #Lock-Down #Maharashtra #maharashtralockdown महाराष्ट्रात १ जूनपर्यंत 'कडक लॉकडाउन' वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
#Covid19 #BreakTheChain #Lock-Down #Maharashtra #maharashtralockdown महाराष्ट्रात १ जूनपर्यंत ‘कडक लॉकडाउन’ वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला असून जागतिक महामारी करोनाचं भीषण स्वरूप अजूनही बदललेलं नाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेत अधिकृत जाहीर करतील अशी माहिती दिली होती. १ जूनपर्यंत ‘कडक लॉकडाउन’ वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कायम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
naaradpr · 5 years ago
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media
Dr. Aneel Kashi Murarka & Team Ample Missiion distribute milk to the needy on Maha Shivaratri On the occasion Maha Shivaratri, team Ample Missiion, that is into a lot of philanthropic work, distributed flavored milk bottles to the needy in the areas of Goregaon & Malad in Mumbai. “Every year, during Maha Shivaratri, so many litres of milk is offered to the Gods in our country. We, at Ample Missiion, thought the better of it. We wanted to help people who are deprived. And their expression of gratitude was priceless! We all felt so blessed,” shared Dr.Aneel Kashi Murarka, Founder – Ample Missiion.
डॉ. अनिल काशी मुरारका और एम्पल मिशन टीम ने शिवरात्रि पर जरूरतमंदों को किया दूध वितरित महाशिवरात्रि के शुभ अवसर पर टीम एम्पल मिशन ने  मुंबई के गोरेगांव और मलाड के क्षेत्रों में जरूरतमंदों को अलग अलग फ्लेवर में दूध की बोतलें वितरित की। टीम एम्पल मिशन ऐसे परोपकारी कार्य करती रहती हैं। “हर साल महा शिवरात्रि के दौरान हमारे देश में देवताओं को प्रसाद के रूप में कई लीटर दूध चढ़ाया जाता है। लेकिन हमारी टीम ने कुछ अलग सोचा। हम उन लोगों की मदद करना चाहते थे जो जरुरतमंद हैं।  उनको खुश देखकर हम अपने आप को धन्य महसूस कर रहे थे। “डॉ.अनिल काशी मुरारका, संस्थापक - एम्पल मिशन ने इस बात को साझा किया।
डॉ. अनिल काशी मुरारका आणि टीम अँपल मिशनने महाशिवरात्रीचे औचित्य साधून गरजूंना दूध वितरित केले महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर भारताच्या अनेक शहरात हजारो लिटर दुधाची नासधूस होते, हे दुर्दैवी चित्र जवळपास प्रत्येक शहरांमध्ये अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते.  परंतु यावर्षी मात्र हे चित्र बदललेलं दिसले. टीम 'अँपल मिशन' जी अनेक सामाजिक आणि परोपकारी कार्यात कार्यरत आहे, यावेळी  मुंबईतील गोरेगाव आणि मालाड परिसरातील गरजू लोकांना वेगवेगळ्या चवीच्या दुधाच्या बाटल्यांचे  वाटप केले. अँपल मिशनचे संस्थापक डॉ. अनील काशी मुरारका सांगतात की, "प्रत्येक वर्षी, महाशिवरात्री दरम्यान, आपल्या देशात देवाला अनेक लिटर दूध अर्पीत केले जाते आम्ही, 'अँपल मिशन' द्वारे त्यापेक्षा काही वेगळे आणि चांगले करण्याचे ठरविले आहे, आम्हाला त्या वंचित लोकांना मदत करायची होती. आणि त्याबदल्यात त्यांनी  व्यक्त केलेली  कृतज्ञतेची भा��ना अमूल्य होती.  आम्ही या सर्वांचे खूप आभारी आहोत.”
0 notes
kavitadatir · 3 years ago
Text
आज्जीची गोधडी । पत्र पाचवं
आज्जीची गोधडी । पत्र ५ // प्रत्येक मागच्या पिढीला वाटतं की नव्या पिढीनं आमच्यासारखं जगावं. त्यासाठी ते नव्या पिढीला इतका त्रास देतात की, नव्या पिढीला प्रयत्न न केल्याचा गिल्ट येत राहतो. // #म #मराठी #रिम #ब्लॉग #शब्दखेळ #पत्र #पुस्तक #goshtacretions #blog
प्रिय आज्जी, इथलं वातावरण अजून काही फार बदललेलं नाही. अजूनही ‘फिगर आउट’बद्दल चेष्टा चालू आहेच. तुला पत्र लिहिल्यावर एखादा दिवस जरा मोकळं वाटलं पण मम्��ी पप्पांची ‘होतकरू मुलांच्या यशोगाथा’ ही कॅसेट काही दोन तीन दिवसात संपली नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी तर मम्मी म्हणाली की, ‘आम्ही तुमच्या वयाला तुमच्यासारखा फिगर आउट वगैरे करायला वेळ घेतला असता, तर आमचे संसार कसे झाले असते काय माहीत!’ वैताग आलाय गं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
healthandfitness146 · 6 years ago
Text
परिकथेपासून ते अडल्ट फिल्म्सपर्यंतचा सनीचा प्रवास पुन्हा उलगडणार…
परिकथेपासून ते अडल्ट फिल्म्सपर्यंतचा सनीचा प्रवास पुन्हा उलगडणार…
पॉर्नस्टार झाल्यानंतर सनीचं बदललेलं आयुष्य, तिच्या कुटुंबाला कराव्या लागणाऱ्या अडचणींचा सामना असे अनेक चढउतार यात पाहायला मिळणार आहेत.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2MEj48o
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मुंबईकरांनो,उद्या या तीन रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक;वाचा लोकलचं बदललेलं वेळापत्रक!
मुंबईकरांनो,उद्या या तीन रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक;वाचा लोकलचं बदललेलं वेळापत्रक!
मुंबईकरांनो,उद्या या तीन रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक;वाचा लोकलचं बदललेलं वेळापत्रक! Mumbai Local Mega Block : मुंबईत उद्या तीन रेल्वे लाईनवर रुळांच्या कामासाठी मेगाब्लॉक जारी करण्यात आला आहे. त्यामुळं लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. Mumbai Local Mega Block : मुंबईत उद्या तीन रेल्वे लाईनवर रुळांच्या कामासाठी मेगाब्लॉक जारी करण्यात आला आहे. त्यामुळं लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला…
View On WordPress
0 notes
thanevarta-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
इंदिरानगर झोपडपट्टीला नविन रूप देण्याच्या प्रयत्नाचं लोकप्रतिनिधींकडून कौतुक इंदिरानगरची झोपडपट्टी आता वेगळं रूप घेत असून तेथील नागरिकांना ती आकर्षिक करायला लागली आहे. या झोपडपट्टीचं बदललेलं रंगरूप बघून पालकमंत्रीही भारावून गेले होते.
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
अजित पवारांचं नेतेमंडळींना आवाहन; म्हणाले, “राज्यातलं बदललेलं वातावरण मला स्वत:ला पटत नाही”!
अजित पवारांचं नेतेमंडळींना आवाहन; म्हणाले, “राज्यातलं बदललेलं वातावरण मला स्वत:ला पटत नाही”!
अजित पवारांचं नेतेमंडळींना आवाहन; म्हणाले, “राज्यातलं बदललेलं वातावरण मला स्वत:ला पटत नाही”! गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक गोष्टींवरून राजकीय वातावरण ढवळून निघताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे त्या वादाला रोज नवनवीन फोडणी देखील मिळत आहे. नुकतीच ईडीनं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना केलेली अटक आणि त्यापाठोपाठ मुंबई महानगर…
View On WordPress
0 notes