#प्रसंगाचा
Explore tagged Tumblr posts
Text
वैद्यकीय ईच्छापत्र अर्थात मृत्युपत्र
आज दिनांक 8मार्च 2017 रोजी मी माधव संताजी अटकोरे वय 72 वर्ष,राहणार तथागत नगर,तरोडा खुर्द,मालेगाव रोडवर नादेड माझे वैद्यकीय इच्छापत्र अर्थात म्रुत्युपत्र स्वखुशीने ,कोणताही दबाव अथवा नशापाणी न घेता लिहून देतो कि,मी जर कोणत्याही अपघाताने किवा शारीरिक व्याधीने मेन्दूम्रत झालो तर मला दुरूस्त करण्यासाठी,वाचविण्याच्या ईच्छेपोटी उपचारादरम्यान पैसे खर्च करू नका कारण मेन्दूम्रत व्यक्ती दुरूस्त होण्याची शक्यताच नसते . अशा जीवनाच्या अन्तिम प्रसंगी दुख अथवा विलाप न करता स्वताच्या मनावर ताबा ठेवा.आणि विनाकारण नातेवाईक आणि मित्राना बोलावून नाहक त्रास देऊ नका.कारण अशा अवस्थेत जगण्याची शक्यताच नसते हे समजून घेऊन येणार्या प्रसंगाचा सामना करण्याचे साहस दाखवा. मेन्दूम्रत अवस्थेत डॉक्ट���ांच्या सल्ल्यानुसार माझे अवयव काढून घेण्याची सुचना डॉक्टराना द्या ज्यामुळे कोणत्यातरी गरजू रुग्णाचा जीव वाचविण्याच्या उपयोगी पडतील. मेन्दूम्रत अथवा नैसर्गिक म्रुत्युनतर माझे अवयव दान करण्यासाठी मी हे वचनपत्र भरून देतील आहे त्याचा आपण आदर करून माझ्यावरील प्रेम दाखवावे. म्रुत्युनतर मला गरम पाण्याने आन्घोळ घालू नका ,स्मशानभूमीत नेण्यासाठी तिरडी सजवू नका ,नातेवाईकांना बोलावून त्रास देऊ नका.कोणताही विधी करू नका कारण तुम्ही काहीही केले तरी मी जीवन्त होणार नाही हे सत्य मनाला पटवून द्या. माझ्या म्रुत्युनतर संपत्तीचे वाटप हा मुद्दाच नाही कारण माझ्या नावाने संपत्ती जमा करण्यासाठी मी कधीच प्रयत्न केला नाही.खुप कष्ट केले .ईमान कधीच विकले नाही.पत्रकारीता करताना पैसे हडप करण्याचे अनेक प्रसंग आले परंतु कोणाला जाचक ठरून पैसे कमविणे मला कधीच पटले नाही म्हणून मी आज जरी कफल्लक असलो तरी मनाने पुर्ण पणे समाधानी आहे . जगताना कमी गरजा ठेवून समाधानाने जगलो.जीवनात लबाडी केलीच असेल तर ती फक्त उपाशीपोटी असतानाच केली . मुलांनाही असेच ईमानदारीने जगण्याचा सस्कार दिला .म्हणून माझी मुले आज अतिशय चांगल्या पध्दतीने जीवन जगत आहे त्याचेही समाधान आहे. मी जर वयाच्या 72 वर्षात मरण पावलो तर एकच काम करा माझ्या वया इतके वृक्षारोपण करून त्याची जोपासना करा.झाडे मोठी होतील. ती फुले ,फळे ,सावली देतील आणि पर्यावरणाला सहाय्यक बनतील .माझी पुण्य तिथी वगैरे करण्यासाठी पैसे खर्च करू नका त्यामूळे काहीही साध्य होणार नाही. मी हे वैद्यकीय इच्छापत्र पुर्ण समाधानाने लिहून देत आहे .यासाठी दोन साक्षीदार देत आहे .एक भिमराव ईरबाजी तरटे आणि दुसरे लक्ष्मण चोखाजी जाधव …. Read the full article
0 notes
Text
Rohit Sharma: हाथ तो छोडो यार…रोहितची पाकिस्तानी चाहत्यांमध्ये क्रेझ, पाहा मजेशीर प्रसंगाचा video
Rohit Sharma: हाथ तो छोडो यार…रोहितची पाकिस्तानी चाहत्यांमध्ये क्रेझ, पाहा मजेशीर प्रसंगाचा video
Rohit Sharma: हाथ तो छोडो यार…रोहितची पाकिस्तानी चाहत्यांमध्ये क्रेझ, पाहा मजेशीर प्रसंगाचा video टीम इंडियाला रविवारी पाकिस्तानविरुद्ध पाच विकेटने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर रोहित शर्मा पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसला. या प्रसंगी एक मजेशीर प्रसंग घडला, जो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. टीम इंडियाला रविवारी पाकिस्तानविरुद्ध पाच विकेटने पराभव स्वीकारावा लागला. या…
View On WordPress
#rohit#sharma:#Video#क्रिकेट#क्रीडा#क्रेझ#खेळ बातम्या#चाहत्यांमध्ये#छोडो#टेनिस#तो#पाकिस्तानी#पाहा#प्रसंगाचा#भारत लाईव्ह मीडिया#मजेशीर#मराठी खेळ अपडेट्स#यार…रोहितची#राष्ट्रीय खेळ बातम्या#स्पोर्ट्स#स्पोर्ट्स अपडेट मराठी#हाथ#हॉकी
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 November 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गामधला नागपूर ते शिर्डी हा टप्पा पूर्ण झाला असून, लवकरच त्याचं लोकार्पण होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होते. जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या कारवाईत कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्याचा विकास करणं हे आमचं प्राधान्य असून, सुरु असलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर असून ते गोसिखुर्द प्रकल्पाची हवाई तसंच थेट पाहणी करणार आहेत. त्यानंतर भंडारा शहरातल्या विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
****
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान सुरु आहे. विधानसभेच्या एकूण ६८ जागांसाठी २४ महिलांसह ४१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.
****
सध्या सुरु असलेल्या खरीप विपणन हंगाम खरेदी कार्यक्रमाचा लाभ १३ लाख ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना यापूर्वीच मिळाला आहे. त्याची किमान आधारभुत किंमत ४७ हजार ६४४ कोटी रुपये असल्याचं, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे सांगितलं आहे.
****
आयुर्वेद व्��यासपीठच्या रजत जयंती वर्षानिमित्त केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने तीन दिवसीय 'आयुर्वेद पर्व' आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन नागपूर इथं करण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन झालं. आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
****
माध्यमिक शालान्त आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा म्हणजेच इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये खासगीरित्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नमुना १७ च्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी आता अतिविलंब शुल्कासह १४ ते २५ नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येतील, असं शिक्षण विभागानं कळवलं आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प इथं ताडोबा भवन उभारण्यात येणार असून, याबाबतचा आराखडा तयार करण्यात यावा असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुंबईत ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाबतच्या बैठकीत ते काल बोलत होते. या व्याघ्र प्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या सोयी सुविधा उत्कृष्ट प्रतीच्या असणं आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या आणि सभोवतालच्या क्षेत्रात पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात मराठवाड्याच्या हक्काचं, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील पाणी फेब्रुवारी २०२४ पर्यंत आणणार असून या पाण्याचं जलपूजनही करणार असल्याचा निर्धार उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. ते काल उस्मानाबाद इथं जिल्ह्यातल्या विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
दरम्यान, वारकरी संप्रदायानं शेतकऱ्यांमध्ये आत्मबल वाढवण्याचे प्रयत्न करावे, तसंच प्रत्येक प्रसंगाचा स्वीकार करण्यासाठी प्रबोधन करावं, असं आवाहन पालकमंत्री सावंत यांनी केलं आहे. उस्मानाबाद तालुक्यातल्या वडगाव इथं वारकरी साहित्य परिषदेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त ११ गावांना पुरस्कार तसंच भजनी साहित्याचं वितरण सावंत यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यातलं पर्यटन स्थळ असलेल्या म्हैसमाळकडे जाणाऱ्या खुलताबाद ते म्हैसमाळ रस्त्याचं काम विनाविलंब करण्याची सूचना खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठव��ं आहे. पायाभूत सुविधा नसल्यामुळे चांगल्या पर्यटन स्थळाची दुर्दशा होत असल्याचं, खासदार जलील यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
नाशिक महानगरपालिकेच्या ६९ शाळा आता स्मार्ट होणार असून, येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या संदर्भातल्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत ७० कोटी रुपये खर्च करून शाळांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या संदर्भात माहिती देण्यात आली. स्मार्ट स्कूल अंतर्गत ६५६ स्मार्ट क्लास, ६९ संगणक प्रयोग शाळा, तर ६९ मुख्याध्यापक कक्ष अत्याधुनिक करण्यात येणार आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या पाकिस्तान आणि इंग्लंड संघादरम्यान होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपान्त्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा सात गडी राखून, तर इंग्लंडनं भारताचा दहा गडी राखून पराभव केला होता.
//**********//
0 notes
Text
पाकिस्तानमध्ये क्रिझवर परत फिरत असताना बॅटर फ्री हिटवर धावबाद झाला. पहा | क्रिकेट बातम्या
पाकिस्तानमध्ये क्रिझवर परत फिरत असताना बॅटर फ्री हिटवर धावबाद झाला. पहा | क्रिकेट बातम्या
रोहेल नाझीर फ्री हिटवर धावबाद झाला धावबाद होणे हा क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी बाद होण्याचा सर्वात हृदयद्रावक मार्ग आहे आणि जेव्हा तो फ्री हिटवर होतो तेव्हा ते आणखीनच दुखावले जाते. पाकिस्तानी क्रिकेटपटू रोहेल नजीर सोमवारी मुलतानमधील राष्ट्रीय T20 चषक सामन्यादरम्यान त्याला या प्रसंगाचा सामना करावा लागला कारण त्याने त्याच्या आळशी धावण्याचे पैसे दिले. रोहेलच्या नॉर्दर्न (पाकिस्तान) आणि खैबर पख्तुनख्वा…
View On WordPress
0 notes
Text
"कोकणातील पूरग्रस्तांसाठी 200 कोटींचे विशेष पॅकेज द्या"
“कोकणातील पूरग्रस्तांसाठी 200 कोटींचे विशेष पॅकेज द्या”
कणकवली – “संपूर्ण कोकणात नुकतीच उद्भवलेली भयानक पूरस्थिती आणि महाप्रलायामुळे मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांची खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे कोकणातील जनतेला फार कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. या भयानक परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन स्तरावरून सक्षम अभ्यासगट नेमून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या संकटातून जनतेला दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई…
View On WordPress
0 notes
Text
Mumbai Police: 'अपने हाथ धोले'; करोनावरील मुंबई पोलिसांचा 'हा' खास संदेश पाहिलात का? - based on a scene from the film agneepath mumbai police gave a special message to the people to create awareness about corona
Mumbai Police: ‘अपने हाथ धोले’; करोनावरील मुंबई पोलिसांचा ‘हा’ खास संदेश पाहिलात का? – based on a scene from the film agneepath mumbai police gave a special message to the people to create awareness about corona
हायलाइट्स: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जनजागृतीवर भर देत मुंबई पोलिसांनी नागरिकांना एक खास संदेश दिला आहे. मास्कचा वापर, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीवर शासनानं भर दिला आहे. त्यांपैकी हात धुण्याबाबत पोलिसांनी हा संदेश दिला आहे. यासाठी पोलिसांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ या प्रसिद्ध चित्रपटातील प्रसंगाचा कल्पकतेने वापर केला आहे. मुंबई: राज्यात कोरोनाचा…
View On WordPress
0 notes
Photo
आषाढी वारीवर करोनाचे सावट;ईतिहासात पहिल्यांदाच असा प्रसंग बघन्यास मिळाला पण विट्ठलाची भक्ति कमी पडु देनार नाही.मी माझे सहकारी आणि तुमच्या आशिर्वादाने चित्रवारी रूपाने ऊन,वारा,पाऊस व वादळ याची पर्वा न करता विट्ठलाचे व वारीचे भित्तिचित्र साकारतोय तळजाई पुणे येथे मा.सुभाष जगताप यांच्या प्रयत्नातुन..येथे येउन साक्षीदार व्हा या प्रसंगाचा ..जय जय रामकृष्ण हरी 🙏 supporting artist: @yogillustrations @deego_graffiti_sfc Pic: @shotbysachinkawankar #vari #varkari #pandharpur #vitthal #art #artistsoninstagram #ilivesimply #spreadlove #spreadheart #artforall #streetart #streetartpune #pune #punekar #aanandwari #pandurang #nileshartist (at Taljai) https://www.instagram.com/p/CBJMmfBBnZ-/?igshid=iomskmgogd1j
#vari#varkari#pandharpur#vitthal#art#artistsoninstagram#ilivesimply#spreadlove#spreadheart#artforall#streetart#streetartpune#pune#punekar#aanandwari#pandurang#nileshartist
0 notes
Text
सीता अशोक – एक ‘राम’कहाणी
लहानपणापासून मला एक कुतूहल होते की रामायणात सीता अशोकवाटिकेत नुसत्याच उंचच उंच वाढणाऱ्या अशोकाच्या झाडाखाली का बसली असेल? आपण झाडाखाली तर सावलीसाठी, आरामासाठी बसतो, मग....?! याशिवाय कालिदासाच्या ‘मालविकाग्निमित्र’ नाटकात असा उल्लेख आहे की एखाद्या रमणीचा ‘लत्ताप्रहार’ झाल्याशिवाय अशोकाला फुले येत नाहीत (फारच रसिक हं!). मला तर अशोकाला कधी फुलंच आलेली दिसली नव्हती! हे गौडबंगाल मनात ठेऊन वर्षानुवर्षे अशीच पळाली आणि आता म्हातारपणी (प्रौढपणी म्हणूया लागलंस तर आपण!) का होईना माझा लहानपणचा प्रश्न अचानक एकदाचा सुटला. त्यानिमित्ताने ही सीता अशोकाची ‘राम’कहाणी.
त्याचं असं झालं, अणुशक्तीनगर मध्ये राहायला आल्यानंतर मला एकदा जाणकार हौशी मंडळीनी आयोजित केलेल्या, झाडांची नुसतीच ओळखच नव्हे तर पूरक माहिती ही देणाऱ्या ‘नेचर वॉक’ मध्ये सामील होण्याची संधी मिळाली. नेहमीच्या सोनमोहर, शिरीष, शंकासूर याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे पाम्स, कदंब, सुलतान चाफा, कैलासपती, हिजगळ, नांद्रूक यांची माहिती घेत, ती नावं शोधून कागदावर त्यांच्यासमोर खुणा करत माझा वेळ आनंदाने जात होता. मी माझ्या कागदात डोकं घालून नोंदी करत असतानाच माहितगाराने “.........आणि हा सीता अशोक आणि ही याची सुंदर फुले......” असे म्हटल्याबरोबर मी चमकून माझ्या तंद्रीतून बाहेर पडले. समोर एक मध्यम उंचीचे, डेरेदार झाड उभे होते, त्याच्या गर्द हिरव्या दाट पानांमधून लाल-नारिंगी रंगाचे फुलांचे अतिशय सुंदर झुबके लक्ष वेधून घेत होते. त्याची अजून काही माहिती मिळण्याअगोदरच मला कळून चुकले की हा�� तो क्षण आहे....ज्यात ध्यानीमनी नसताना माझ्या लहानपणच्या शंकेचे अचानक निरसन झाले होते. एखादं कोडं सुटल्यानंतर जसं मनाला शांत शांत आणि सुटकाही झाल्यासारखं वाटतं, तसं माझं झालं होतं.
या झाडाच्या शांत, सोज्वळ सौंदर्याने मला त्याच्याविषयी अजून जाणून घेण्यासाठी उद्युक्त केले. सीता अशोकाचे शास्त्रीय नाव Saraca asoca असून त्याचा सामावेश Fabaceae वर्गातील Caesalpiniodeae या उपवर्गात होतो. आपण सर्वसाधारणपणे ज्या झाडांना अशोक म्हणतो त्यांना ‘खोटा अशोक’ असंही म्हणतात, आणि त्यातही दोन प्रकार आहेत, एक डेरेदार वाढणारे (जर मला हे झाड आधीच पहायला मिळाले असते तर कदाचित मला सीतेची काहीच काळजी वाटली नसती, पण तरी माझा फुलांबाबतचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला असता!) आणि दुसरे जे आपण नेहमी पाहतो ते उंचच उंच वाढणारे अशोक. ही दोन्ही झाडे Annonaceae या सीताफळाच्या वर्गातील असून त्यांची नावे अनुक्रमे Polyalthia longifolia आणि Polyalthia longifolia var. pendula अशी आहेत. सीता अशोकाच्या आणि खोट्या अशोकाच्या पानांमध्ये बरेच साम्य असले तरी फुलांमध्ये मात्र फारच फरक असतो. खोट्या अशोकाची फुले लहानसर, हिरवट रंगाची असून सहजासहजी दिसून येत नाहीत. तसेच सीता अशोकाची फळे रुंद शेंगेसारखी असून त्यात अनेक बिया असतात तर खोट्या अशोकाची फळे हिरवट, लहान, गोलाकार असून त्यात एकच बी असते.
सीता अशोकाचे झाड ‘पर्जन्य वृक्ष’ (विषुववृत्तीय घनदाट जंगलांच्या वर्षभर पाऊस असणाऱ्या प्रदेशातील) प्रकारातले असून, भारतीय उपखंडाबरोबर नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया या देशांत प्रामुख्याने आढळते. हे सदाहरित झाड ३ ते १० मी. (कधी कधी जास्तही) उंचीचे असून नवीन पाने कोवळी, जांभळट रंगाची असतात. आपल्याला ज्या रंगीत पाकळ्या वाटतात त्या खरं तर पाकळ्या नाहीत, पाकळ्यांसारखे रंगीत असणारे निदलपुंज आहे. याची नळीसारखी फुले ४ लंबगोलाकार पाकळ्यांमध्ये उघडतात. या फुलांतून अनेक लांब, लाल-पांढरे पुंकेसर बाहेर येतात आणि फुलांच्या झुबक्याला केसाळ स्वरुप देतात. फुले आधी भडक पिवळ्या-नारिंगी रंगाची असतात आणि वाळण्याअगोदर लाल-शेंदरी होतात. चकचकीत गर्द हिरव्या पानांच्या बेचक्या-बेचक्यात अशा रंगीत फुलांचे गच्च झुबके अतिशय आकर्षक दिसतात. फुले सुवासिक असून फेब्रुवारी ते एप्रिल या ��ाळात त्यांना बहर येतो.
‘अ’ ‘शोक’ म्हणजे ‘दुखः नसणारे’ किंवा ‘दुखः न देणारे’ झाड अशी याची ख्याती असून संस्कृत भाषेत याला १५ पेक्षा जास्त नावे आहेत, जसे, अपशोक, चित्रशोक, हेमपुष्प, मधुपुष्प, पिंडीपुष्प, कामुक, कनकेली, रक्तपल्लव, विशोक, चित्र, विचित्र, आंगनप्रिय, ताम्रपल्लव इत्यादी. इतर भारतीय भाषांत सीता अशोक (हिंदी), अशोक (मराठी, आसामी, काश्मिरी), ओशोक (बंगाली), अशोका (ओरिया), अचन्ने (कानडी), असोगम (तमिळ), अशोकम (मल्याळम), अशोकामू, वंजुलामू (तेलुगु) या नावांनी तर गुजरातीत ‘आसोपालव’ हया नावाने ओळखले जाते. अशोकाच्या झाडाला उत्तर प्रदेशच्या ‘राज्यवृक्षाचा’ मान मिळाला असून फुलांना ओरिसाचे ‘राज्यफूल’ म्हणून निवडले गेले आहे.
या झाडाचा आवाका धार्मिक ते शृंगारिक असा विस्तीर्ण असून अनेक दंतकथा, लोककथा, साहित्य, कविता, शिल्पकला याच्याशी निगडीत आहेत. हे झाड अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले गेले आहे. राजप्रासाद, मंदिरे, मठ यांच्या आवारात पावित्र्याचे प्रतिक आणि सुशोभीकरण यासाठी अशोकाची झाडे लावली जातात. बौद्ध धर्मात असे मानले जाते की गौतम बुद्धाचा जन्म अशोकाच्या झाडाखाली झाला होता, त्यामुळे बौद्ध मठांच्या आवारात ही झाडे दिसतात. जैन धर्मात असा विश्वास आहे की महावीर जिथे जिथे जात तिथे तिथे अशोकाचे झाड उगवत असे. अशोकाच्या झाडाखाली बसल्याने दुखः आणि वेदना कमी होतात म्हणून महावीरांनी अशोकाच्या झाडाखाली तप करून सर्वसंगपरित्याग केला होता. त्यामुळे अशोकाचे झाड जैन धर्मातील आठ पवित्र चिन्हांपैकी एक मानले जाते.
भारतातील बंगाल, ओरिसा, त्रिपुरा या राज्यात चैत्र शुद्ध अष्टमीला ‘अशोकअष्टमी’ भक्तिभावाने साजरी केली जाते. फक्त अशोकअष्टमीचे व्रत केले तरी पूर्ण चैत्री नवरात्राचे व्रत केल्याचे पुण्य मिळते असे म्हणतात. हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार, रावणाला आदिशक्तीचे संरक्षण असल्याने श्रीरामांना त्याला नमवणे शक्य होत नव्हते. तेव्हा हताश झालेल्या श्रीरामांना बिभीषणाने अशोकअष्टमीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सलग सात दिवस मनोभावे शिव आणि शक्तीची आराधना केली, तेव्हा आठव्या दिवशी प्रसन्न होऊन शिव-शक्तीने त्यांना इष्टवर दिला. असे म्हणतात की, आठव्या दिवशी श्रीरामांनी, दु:खापासून मुक्ती मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी शिव-शक्तीची मिरवणूक काढली होती. त्या दिवशीची आठवण म्हणून आजही ओरिसातील भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिरात अशोकअष्टमीला भव्य रथयात्रा काढली जाते. जगन्नाथपुरीतील रथयात्रे इतकेच याचेही महत्त्व आहे. त्रिपुरातील उनाकोटी येथे भाविक अशोकअष्टमीला मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन डोंगरांत कोरलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींची पूजा करतात. या दिवशी बंगाल मध्ये ‘मुलांचे आणि जावयांचे’ आयुष्य वृद्धिंगत व्हावे म्हणून ‘अशोककलिका प्राशन’ हा समारोह करतात.
हिंदू मंदिर संस्कृतीत अशोकाच्या झाडाला ओठंगून उभ्या असलेल्या ‘यक्षिणी’चे शिल्प नेहमी दिसते आणि तिला सृजनतेचे प्रतिक मानले जाते (कदाचित रमणीचा लत्ताप्रहार आणि अशोकाला फुले येणे यातही ही सृजनताच अपेक्षित असेल). असे म्हणतात की कामदेवाचे धनुष्य हे ऊसाच्या कांडीचे असून त्याचे बाण पाच प्रकारच्या सुगंधित फुलांनी शृंगारलेले आहेत. यातील अशोकाची फुले ‘कामवशते’चे प्रतिक मानली जातात. (सहज जाता जाता माहितीसाठी : इत�� चार फुलांत, पांढरी आणि निळी कमळे; मल्लिका म्हणजे जाई-जुई, मोगऱ्याच्या जातीची फुले; आणि आम्र-मंजिरी यांचा सामावेश होतो). रामायणातील अशोकवाटिकेत सीता याच झाडाखाली बसली होती आणि तिला आदर दाखवण्यासाठी अशोकाची फांदी हलकेच खाली झुकली होती. हनुमान- सीतेची भेट आणि रामाची खूण असलेली अंगठी सीतेला देण्याच्या प्रसंगाचा हाच वृक्ष साक्षीदार होता.
इतिहासातील प्रसिद्ध चक्रवर्तीन सम्राट अशोकाची आई, शुभद्रांगी (जनपद कल्याणी) हिला राजप्रासादातील नियमानुसार तिचे पती बिन्दुसार यांजपासून दूर ठेवण्यात आले होते. एकदाचे जेव्हा तिला आपल्या पतीला भेटता आले आणि त्यांना पुत्र झाला, तेव्हा तिने ‘आता माझे दु:ख नष्ट झाले’ असे उद्गार काढले होते. त्यावरूनच नवजात बालकाचे नाव ‘अशोक’ ठेवण्यात आले. स्वतः सम्राट अशोकाला ‘दु:ख न देणाऱ्या’ झाडापासून ठेवलेले आपले नाव अतिशय प्रिय होते. कलिंग विजयानंतर त्याच्यासारख्या सम्राटाचे जे हृदयपरिवर्तन झाले आणि उर्वरित काळात त्याने जसा शांती आणि अहिंसेचा पुरस्कार केला, अशाप्रकारचे दुसरे उदाहरण जगाच्या इतिहासात नाही. अशा सम्राट अशोकाने जागोजागी उभारलेले ‘अशोक स्तंभ’, त्यावर कोरलेल्या धार्मिक (विशेष करून बौद्ध) सूचना आणि नियम, त्यावर नियमितपणे आढळणारे ‘अशोक चिन्ह’ आणि ‘अशोक चक्र’ अतिशय प्रसिद्ध आहेत. अशोक चिन्ह भारताचे राजकीय प्रतिक असून सर्व सरकारी कागदपत्रांवर तसेच भारतीय चलनावर (नाणी आणि नोटा) ते अंकित असते. अशोक चक्र धर्मचक्र, कालचक्र आणि गतिमानता यांचे प्रतिक असून त्याला आपल्या राष्ट्रध्वजात मानाचे आणि महत्त्वाचे मधले स्थान प्राप्त झाले आहे. याशिवाय अशोक चक्र पदक भारताचा सैन्य पुरस्कार असून शांती काळात दाखवलेल्या अतुलनीय कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात येतो.
अशोकाच्या झाडाची दु:ख कमी करण्याची ख्याती ही विशेषतः स्त्रियांचे दु:ख कमी करण्यासाठीची आहे. आयुर्वेदातील अशोकाच्या झाडाच्या सालीपासून तयार केलेले ‘अशोकारिष्ट’ हे गर्भाशयाच्या आणि मासिक पाळीच्या तक्रारी दूर करण्याचे अतिशय प्रभावी औषध आहे. तसेच फुलांचा अर्क अतिसारावर उपयोगी आहे. मुळव्याध, पट्टकृमी, त्वचारोग, रक्तविकार, मूतखडा, गुढघेदुखी इत्यादी अनेक रोगविकारांवर अशोकाची साल/पाने/फुले/बिया उपयुक्त आहेत. अजूनही या झाडाच्या औषधी गुणधर्मांवर संशोधन सुरु आहे. पण चिंतेची बाब म्हणजे हे झाड याच्या अनिर्बंध वापरामुळे आता ‘असुरक्षित प्रजाती’ म्हणून घोषित केले गेले आहे.
अशा ह्या सीता अशोकाने धर्म, काम, साहित्य, शिल्प, सौंदर्य, औषधी अशा विविध पातळ्यांवर आपली छाप सोडूनही सामान्य जनमानसात तो अनोळखी, अप्रसिद्धच राहिला आहे असं वाटतं. कदाचित असा विरागी संन्यस्तपणा त्यालाच शोभून दिसतो म्हणून त्याच्याच नशिबात असे आले असावे!
सीता अशोकाविषयी ही माहिती मिळवताना मला राहून राहून जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘प्रवासी’ गोष्टीची आठवण येत होती. त्यात एके ठिकाणी त्यांनी असे म्हटले आहे की, ‘ज्ञानाचा क्षण हा स्थिर, नेमका ठरलेला असतो’. खरंच, असं नसतं तर, मी इतकी वर्षे प्रवास केल्यानंतरही, झाडाझुडूपांविषयी नेहमी माहिती विचारूनही याने मला नेहमीच हुलकावणी दिली. अर्थात, आता तरी याची ओळख झाली, हे ही नसे थोडके!
मला वाटते, सीता अशोकाची ही ‘राम’कहाणी मारुतीच्या शेपटासारखी फारच लांबत चालली, त्यामुळे आता आवरते घेणे श्रेयस्कर!
(खोटया अशोकाच्या परिभाषिक नामकरण विषयक अचूक माहितीसाठी, श्री. प्रशांत आवळे व डॉ. सी. के. साळूंखे (भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई), सीता अशोकाच्या कानडी नावासाठी सौ. वैशाली बडचीकर कुलकर्णी, बहारीन आणि लेख वाचून योग्य ठिकाणी चपखल शब्द सुचवण्यासाठी श्री. अशोक झामनानी यांचे मन:पूर्वक आभार!)
डॉ. सरिता शर्मा भावे
4 notes
·
View notes
Text
"आजचा हत्तीसारखा मुख्यमंत्री अजित दादांनी फोन केल्यावर लगेच हलतो"
“आजचा हत्तीसारखा मुख्यमंत्री अजित दादांनी फोन केल्यावर लगेच हलतो”
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कायर्क्रमात संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी अजित पवारांची स्तुती करताना त्यांनी अनुभवलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘अजित दादांनी फोन केल्यावर आजचा हत्तीसारखा मुख्यमंत्री लगबगीने हलायला लागतो आणि हे खरे आहे आम्ही पहिले आहे.’
सदर कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड राष्ट्रवादी कांग्रेसचे…
View On WordPress
0 notes
Text
IND vs AUS: ४७ हजार प्रेक्षकांनी अनुभवला सुपर ओव्हरचा थरार, समोर आला अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
IND vs AUS: ४७ हजार प्रेक्षकांनी अनुभवला सुपर ओव्हरचा थरार, समोर आला अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
IND vs AUS: ४७ हजार प्रेक्षकांनी अनुभवला सुपर ओव्हरचा थरार, समोर आला अंगावर काटा आणणारा व्हिडीओ IND Vs AUS Match DY Patil Stadium video मुंबईच्या डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर ४७ हजार प्रेक्षकांनी सुपर ओव्हरचा थरार अनुभवला. या प्रसंगाचा व्हिडीओ BCCI ने ट्विटरवर शेअर केला आहे. प्रेक्षकांच्या एवढ्या मोठ्या पाठिंब्याच्या बळावरच भारतीय महिला संघाने अशक्य वाटणारे काम करून दाखवले आहे. २०२२ मधील…
View On WordPress
#४७#aus#ind#अंगावर#अनुभवला#आणणारा#आला#ओव्हरचा#काटा;#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#थरार;#प्रेक्षकांनी#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#विश्व#व्हिडीओ#समोर#सुपर#स्पोर्ट्स बातम्या#हजार
0 notes
Text
Video: ना सेल्फी ना ऑटोग्राफ! चाहत्यानं हिसकावली एनर्जी ड्रिंक, पाकिस्तानी खेळाडू अवाक्
Video: ना सेल्फी ना ऑटोग्राफ! चाहत्यानं हिसकावली एनर्जी ड्रिंक, पाकिस्तानी खेळाडू अवाक्
Video: ना सेल्फी ना ऑटोग्राफ! चाहत्यानं हिसकावली एनर्जी ड्रिंक, पाकिस्तानी खेळाडू अवाक् Shadab Khan & Haris Rauf during Pak vs Ned match: पाकिस्तानी खेळाडू शादाब खान आणि हॅरिस रौफ यांच्या हातातून एका प्रेक्षकाने एनर्जी ड्रिंक्सच्या बाटल्या हिसकावल्या आहेत. या मजेशीर प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील शेवटच्या वनडे सामन्यातील आहे. Shadab Khan &…
View On WordPress
#Video#अवाक्#एनर्जी#ऑटोग्राफ!#क्रिकेट#क्रीडा#खेळ बातम्या#खेळाडू#चाहत्यानं#टेनिस#ड्रिंक#ना&8230;!#पाकिस्तानी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी खेळ अपडेट्स#राष्ट्रीय खेळ बातम्या#सेल्फी#स्पोर्ट्स#स्पोर्ट्स अपडेट मराठी#हिसकावली#हॉकी
0 notes
Text
खाजगी आयुष्यातील 'त्या' एका प्रसंगाने Malaika Arora च्या अंगावर काटा
खाजगी आयुष्यातील ‘त्या’ एका प्रसंगाने Malaika Arora च्या अंगावर काटा
खाजगी आयुष्यातील ‘त्या’ एका प्रसंगाने Malaika Arora च्या अंगावर काटा ‘तो सीन आणि सर्वत्र फक्त रक्त…’ खासगी आयुष्यात ‘त्या’ प्रसंगाचा सामना केल्यानंतर मलायका म्हणते… ‘तो सीन आणि सर्वत्र फक्त रक्त…’ खासगी आयुष्यात ‘त्या’ प्रसंगाचा सामना केल्यानंतर मलायका म्हणते… Go to Source
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 April 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि. ****
· राज्यात दोन हजार पाचशे मेगावॅट क्षमतेचा अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
· राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
· अतिरिक्त उसाचं गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम संपलेल्या कारखान्यांची कापणी यंत्र ताब्यात घेण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना
· संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित वेळापत्रकाच्या एक दिवस आधीच संस्थगित
· विक्रांत युद्ध नौका बचावासाठी गोळा केलेला पैसा हडप केल्याप्रकरणी मुलासह भाजप नेते किरिट सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल
· राज्यात १२८ तर मराठवाड्यात बीड जिल्ह्यात दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
आणि
· नांदेडचे बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणाची गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल, चौकशी पथकाच्या तपासाचा नियमित आढावा घेणार
****
राज्यात दोन हजार पाचशे मेगावॅट क्षमतेचं अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. यासाठी महानिर्मिती आणि राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ- एन पी टी सी यांची संयुक्त कंपनी स्थापन करण्याचं ठरवण्यात आलं आहे. या दोन्ही संस्थांची यात प्रत्येकी पन्नास टक्के गुंतवणूक असेल. ही संयुक्त कंपनी राज्यात सौर ऊर्जा पार्क विकसित करेल. त्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागास राज्य सुकाणू अभिकरण म्हणून घोषित करण्यात आलं आहे. राज्यात सध्या नऊ हजार तीनशे पाच मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून, दोन हजार १२३ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होत आहेत.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यातल्या विकास कामांचा, योजनांचा आढावा घेतला. जनहिताच्या योजना, पायाभूत सुविधांच्या ��ामांना अभियान म्हणून वेग दिला जावा, अशी सूचना त्यांनी केली. सर्वसामान्य माणसाला दिलासा द्या, तसंच जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधांच्या विकासाची कामं वेगानं पूर्णत्वाला न्या, असं त्यांनी सांगितलं. या बैठकीत मान्सूनपूर्व कामांचा आढावा त्यांनी घेतला. पूर, अतिवृष्टी तसंच दरड कोसळणं अशा आपत्तीच्या प्रसंगाचा सामना करण्यासाठी, योग्य ती पुर्वतयारी आणि उपाययोजना राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील, याची काळजी घ्यावी, पाण्याच्या ठिकाणांपर्यंत पोहचण्यासाठी, शाळेपर्यंत पोहचण्यासाठी जिथं पूल नाहीत तिथं साकव बांधून, महिला तसंच विद्यार्थ्यांना जाण्या येण्याची सुविधा निर्माण होईल याकडे लक्ष देण्याची सूचनाही, ठाकरे यांनी केली.
दरम्यान, आगामी काळातील टंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या मान्यतेचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठानं काल यासंदर्भातल्या याचिकांवर निर्णय देताना, संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेशही सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्तीवेतन, उपदान देण्याचे आदेशही न्यायालयानं महामंडळाला दिले आहेत. न्यायालयाची दिशाभूल करू नका अशा शब्दात एसटी कामगारांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनाही न्यायालयानं फटकारलं. विलीनकरणाची मागणी मान्य झाली नसली तरी इतर मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना रुजू करून घ्यायला तयार असल्याची माहिती राज्य सरकारनं न्यायालयात दिली.
दरम्यान, येत्या २२ तारखेनंतर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फ आणि सेवासमाप्तीची कारवाई करणार असल्याचं परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले...
गेले पाच महिने हा जो काही संप चालू होता. कर्मचाऱ्यांचं देखील प्रचंड मोठं नुकसान झालं आहे, एसटीचं देखील नुकसान झालं आहे. पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना मी विनंती करतो की, हायकोर्टानं जे निर्देश दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपण कामावरती रुजू व्हावं. आणि एसटी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसाठी पूर्ववत पदावर यावी. २२ तारखेनंतर जर कोणी आलं नाही, तर आम्ही असं समजू की, या कर्मचाऱ्यांना नोकरीची गरज नाही. आणि त्याच्यामुळे जे कर्मचारी आम्ही निलंबित करत होतो, निलंबितच्या नंतर बडतर्फ करत होतो आणि सेवा समाप्त करत होतो. ही कारवाई २२ तारखेच्या नंतर ��ालू राहील.
****
राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या अतिरिक्त उसाचं गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम संपलेल्या कारखान्यांची कापणी यंत्र ताब्यात घेण्याच्या सूचना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. या संदर्भात काल एका बैठकीत ते बोलत होते. ताब्यात घेतलेली कापणी यंत्र गळीत हंगाम सुरु असणाऱ्या साखर कारखान्यांना भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. साखर आयुक्तांनी या संदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं सूचना द्याव्यात. शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या अतिरिक्त उसाचं गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं, अशा सूचनाही पवार यांनी केल्या. पुढल्या वर्षीही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पुढील गळीत हंगामाचेसुध्दा योग्य ते नियोजन करावं असं पवार म्हणाले.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज काल, निय��जित वेळापत्रकाच्या एक दिवस आधीच, संस्थगित झालं. या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचं कामकाज आज संपणार होतं. लोकसभेत २७ बैठकांच्या माध्यमातून १२९ टक्के कामकाज झाल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. या अधिवेशनात २३ विधेयकं मंजूर झाली आणि जनहिताचे ४७६ विषय उपस्थित झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
राज्यसभेत कामकाज सुरू होताच सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी अधिवेशन संपवत असल्याचं जाहीर केलं.
****
सुपर मार्केट किंवा मॉल दुकानांमध्ये सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात सुधारणा करण्यासंदर्भात नागरिकांनी २९ जून २०२२ पर्यंत हरकती किंवा सूचना पाठवण्याचं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलं आहे. या हरकती किंवा सूचना विभागाच्या संकेतस्थळावर २९ जून या तारखेच्या आत पाठवायच्या आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरिट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या विरोधात मुंबईतल्या ट्राँबे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्याविरुद्ध विक्रांत युद्ध नौका वाचवण्यासाठी गोळा केलेले पैसे हडप करुन ५७ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपावरुन दाखल झालेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे आरोप तथ्यहीन असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. या आधीही संजय राऊत यांनी असे आरोप केले होते, ज्यात कसलंही तथ्य नसल्याचं निष्पन्न झालं आहे, असं ते म्हणाले.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १२८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७४ हजार ८१८ झाली आहे. या संसर्गानं काल सहा रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक ��ाख ४७ हजार ८०६ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १५९ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २६ हजार १८४ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के आहे.
****
मराठवाड्यात काल बीड जिल्ह्यात दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
नांदेडचे बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्याकांडाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, या हत्या प्रकरणी स्थापन विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा ते नियमित आढावा घेणार असल्याचं, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यांची काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासोबत या विषयावर बैठक झाली. गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा आढावा घेतला. बियाणी यांची हत्या अतिशय गंभीर असून, त्यांचे मारेकरी कोण आणि या हत्येचा हेतू काय, याचा लवकरात लवकर उलगडा झाला पाहिजे, हीच सरकारची भूमिका असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
दरम्यान, या हत्येची केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या पाच तारखेला नांदेडमध्ये बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उद्यापासून होट्टल सांस्कृतिक आणि पर्यटन महोत्सव-२०२२चं आयोजन करण्यात आलं आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून, खासदार प्रतापतराव पाटील चिखलीकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. देगलूर शहरापासून आठ किमी अंतरावरील होट्टल सिद्धेश्वर मंदिर हे चालुक्य शैलीचं कोरीव लेणी असलेलं मंदिर आहे. हा मराठवाड्याचा समृद्ध वारसा पुढे आणण्यासाठी तसचं या भागातल्या लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून नवनवीन साधणं उपलब्ध व्हावीत, या दृष्टीनं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या अटकेच्या मागणीसाठी मुंबईत तसंच राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. आयएनएस विक्रांत जहाजाला वाचवण्याच्या नावाखाली सोमय्या यांनी आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपावरुन या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. औरंगाबाद इथंही कार्यकर्त्यांनी क्रांतीचौकात आंदोलन केलं. सोमय्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे तसंच अन्य पदाधिकाऱ्यांनी क्रांतीचौक पोल���स ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
****
महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे इतर मागासवर्गाचं आरक्षण गेल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्या काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. हे आरक्षण मिळावं यासाठी आपण ज्योतीबाला साकडं घातल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
0 notes
Text
अन् खाकी वर्दीतल्या महिला पोलिस ढसाढसा रडू लागल्या, वाचा नेमकं काय घडलं...?
अन् खाकी वर्दीतल्या महिला पोलिस ढसाढसा रडू लागल्या, वाचा नेमकं काय घडलं…?
अन् खाकी वर्दीतल्या महिला पोलिस ढसाढसा रडू लागल्या, वाचा नेमकं काय घडलं…? औरंगाबाद : शिक्षकांची बदली झाली म्हणून विद्यार्थी भावूक झाल्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात आपण पाहतो. मात्र औरंगाबादमध्ये एका महिला पोलीस निरीक्षकाची बदली झाल्याने निरोप देताना अख्य पोलीस ठाणं भावूक झालं, तर काही महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाल्याने त्या ढसाढसा रडल्या. याच भावूक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 August 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३१ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि. ****
· देशाला प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन; बीडच्या रॉकी श्वानाच्या कार्याचा पंतप्रधानाकडूने गौरव.
· सरकारी नोकरीची तीस वर्ष आणि वयाची ५० ते ५५ वर्ष पूर्ण केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आढावा घेण्याचे कार्मिक मंत्रालयाचे आदेश.
· इलेक्ट्रानिक माध्यमाद्वारे व्यवहार केलेल्या नागरिकांकडून वसूल केलेले शुल्क त्वरीत परत करण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या बँकांना सूचना.
· राज्यातल्या टाळेबंदीमध्ये सवलती देण्यासंदर्भातली नियमावली आज जाहीर होण्याची शक्यता.
· राज्यात काल १६ हजार ४०८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद २९६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
· मराठवाड्यात २८ बाधितांचा मृत्यू, तर नव्या १ हजार ३२३ रुग्णांची नोंद.
आणि
· जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्ण पदक.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना देशाला प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचं आवाहन केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते काल नागरिकांशी संवाद साधत होते. या मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला पंधरावा भाग काल प्रसारित झाला. स्वावलंबी भारतासाठी प्रत्येक क्षेत्रात वृद्धी दर वाढवणं आणि देशाचा विकास आवश्यक असल्याचं ते म्हणाले. देशाच्या समस्या निवारण करण्यासाठी तरुण पिढीची क्षमता आणि कल्पकता यांचा उपयोग करून घ्यायला हवा असंही पंतप्रधान म्हणाले. देशातल्या मुलांना नवनवीन खेळणी कशी मिळू शकतील, खेळणी उत्पादन करण्यामध्ये भारत एक मोठं केंद्र कसं बनू शकेल, यावर विचार सुरु असल्याचं ते म्हणाले.
कोरोना विषाणूच्या संकटातही शेतकरी बांधवांनी आपली क्षमता सिद्ध केली असं सांगून त्यांनी यावर्षी शेती उत्पादनात झालेल्या वाढीबद्दल शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं. आपल्या देशाच्या ऋतुमानानुसार आणि प्रदेशांनुसार पिकांची माहिती देणारा ‘भारतीय कृषी कोष’ तयार करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये श्वानांची भूमिका महत्वाची असते असं सांगून पंतप्रधानांनी, बीड पोलिसांनी आपला साथीदार श्वान ‘रॉकी’ याला संपूर्ण सन्मानानं अखेरचा निरोप दिला होता, या भावूक प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले –
कुछ दिन पहले ही आपने शायद टीव्ही पर एक बडा भाऊक करनेवाला दृश्य देखा होगा। जिसमें बीड पुलिस अपने साथी डॉग रॉकी को पुरे सम्मान के साथ आखरी बिदाई दे रहे थे। रॉकी ने तिनसौ से जादा केसों को सुलझाने मे पुलिस की मदत की थी। डॉग की डिझास्टर मॅनेजमेंट और रेस्क्यू मिशन्स में भी बहोत बडी भूमिका होती है।
****
सरकारी नोकरीची तीस वर्ष आणि वयाची ५० ते ५५ वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंतच्या सेवेचा आढावा घेण्याचे आदेश कार्मिक मंत्रालयानं सर्व सरकारी विभागांना दिले आहेत. यातील अकार्यक्षम आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांना जनहिताच्या दृष्टीने मूदतपूर्व निवृत्त करण्यात येईल, असं कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटलं आहे. सेवेतील ३० वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ५० ते ५५ वर्ष वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जनहिताच्या दृष्टीने सरकार कधीही निवृत्त करु शकतं, असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची नोटीस देणं बंधनकारक असून, त्यांना निवृत्तीवेतन मिळतच राहणार आहे. या सर्व आढाव्यांच्या नोंदीविषयी एक रजिस्टर तयार करण्याची सूचना या आदेशात करण्यात आली आहे.
****
१ जानेवारी २०२० नंतर इलेक्ट्रानिक माध्यमाद्वारे व्यवहार केलेल्या नागरिकांकडून वसुल केलेले शुल्क त्वरीत परत करण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयानं बँकांना दिले आहेत. यापुढे इलेक्ट्रानिक माध्यमातून केल्या जाणाऱ्या कोणत्याही व्यवहारांवर शुल्क आकारू नये, असे निर्देशही मंत्रालयानं दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं गेल्या वर्षी ३० डिसेंबरला अधिसूचना जारी केली होती.
रुपे कार्ड, भीम-यूपीआई, यूपीआई क्यू आर कोड आणि भीम-यूपीआई क्यू आर कोडच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना बँकांनी कोणतेही शुल्क आकारू नये असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं चौथ्या टप्प्यात टाळेबंदी शिथिलीकरणाची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्या सवलती देता येतील याबाबत निर्णय घेण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक उच्च स्तरीय बैठक झाली. या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजयकुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ प्रशासकीय तसंच पोलीस अधिकारी उपस्थित होते. याबाबतची नियमावली आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
****
केंद्र सरकारनं ३० सप्टेंबरपर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंदच राहणार असल्याचं सांगितल्यामुळे या काळात पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ���ता येतील, असा प्रश्न राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं ३० सप्टेंबरपर्यंत या परिक्षा घेण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. राज्यात पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सहा सदस्यांची समिती नेमण्यात आली असून, ही समिती आज अहवाल सादर करणार आहे.
****
कोरोना विषाणूचे रुग्ण शोधणं, त्यांच्या चाचण्या आणि उपचारांमध्ये राज्य सरकारच्या अग्रेसर भूमिकेमुळे गेल्या महिनाभरात या संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. या संसर्गाबद्दल जागृती करणं, सज्जता बाळगणं यावर सरकारनं लक्ष केंद्रित केलं असल्याचं त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. या विषाणू चाचणीसाठी ४०० प्रयोगशाळा कार्यरत असून, दररोज ५० हजार चाचण्या होत आहेत, असं त्यांनी नमूद केलं. गेल्या महिनाभरापासून निर्बंध उठवण्यात येत असल्यामुळे या विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात काल १६ हजार ४०८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्ण संख्या सात लाख ८० हजार ६८९ झाली आहे. काल २९६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २४ हजार ३९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल सात हजार ६९० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत पाच लाख ६२ हजार ४०१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ९३ हजार ५२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १ हजार ३२३ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर २३९ रुग्णांची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी २६५ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३०१ रुग्णांची भर पडली. बीड जिल्ह्यातली पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ९४ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २०७ रुग्णांची नोंद झाली. जालना जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ११६ रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर ६४ जण बाधित आढळले. तर हिंगोली जिल्ह्यात काल आणखी ३७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
पुणे जिल्ह्यात काल ३ हजार ८५६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ७३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईत काल १ हजार २३७ रुग्णांची नोंद झाली, तर ३० जणांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात १ हजार १७० नवे रुग्ण, तर सहा मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात १ हजार ३१३, सातारा ४८९, सांगली २९७, पालघर २७४ चंद्रपूर २७०, सिंधुदुर्ग १५६, अमरावती १०६, वाशिम ३५, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी १२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
वैद्यकीय प्रवेशाचं ७०-३० हे प्रमाण त्वरीत रद्द करावं अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाविद्यालयांची संख्या आणि विद्यार्थी प्रवेश क��षमता यांचा विचार केला तर मराठवाड्याच्या वाट्याला कमी जागा येत असल्याचं ते म्हणाले.
****
जालना नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या १६ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमीपूजन काल पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती होती. जालना शहराच्या विकासाठी आपण कटीबद्ध असून, शहरातली सर्व विकास कामं दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षा टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.
****
लातूर शहरातल्या नागरीकांनी घरगुती गणेशाचं घरीच विसर्जन करावं, असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केलं आहे. गणेश विसर्जनासंबंधी महानगरपालिकेनं जारी केलेल्या नियमांबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
ज्या नागरिकांना घरी गणेश विसर्जन करणे अशक्य आहे, त्यांनी आपल्या मूर्ती महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रात आणून द्याव्यात. मूर्ती देत असतांना श्रीगणेशाला अर्पण केलेले फुले, दुर्वा आणि निर्माल्य स्वतंत्रपणे एकत्रित करून द्यावं, निर्माल्य देण्यासाठी कॅरीबॅगचा वापर करू नये शक्यतो टाकाऊ कागदामध्ये ते एकत्र करून संकलन केंद्रावर दिले तर पर्यावरणाच्या रक्षणाला हातभार लावता येऊ शकेल.
अरूण समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी, लातूर.
****
हजरत इमाम हुसैन यांचा बलिदान दिवस मुहर्रम काल सर्वत्र शांततेत आणि श्रद्धेनं साजरा झाला. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभर मोजक्याच ठिकाणी ताजिया मिरवणूक काढायला न्यायालयानं परवानगी दिली होती.
औरंगाबाद शहरात मुहर्रम निमित्त १३० सवाऱ्या बसवण्यात आल्या होत्या. काल अत्यंत साध्या पद्धतीनं या सर्व सवाऱ्या उठवण्यात आल्या.
नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातल्या कोकलगाव इथं मुहर्रम सणानिमित्त सवारी काढणाऱ्या २० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांनी प्रशासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
****
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं प्रथमच सुवर्ण पदक जिंकलं आहे. स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं या ऑनलाइन स्पर्धेत भारत आणि रशियाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं आहे. कोविड-19 साथीमुळे ही स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली.
प्रारंभी रशियाला विजेता घोषित करण्यात आलं होतं. मात्र अंतिम सामन्यात भारताचे दोन खेळाडू ���िहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी सर्व्हरसोबत जोडणी म��ळत नसल्याने वेळ गमावला. भारताने याबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर फेरतपासणी करण्यात आली. त्यानंतर भारत आणि रशिया या दोन्ही देशांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काल लातूर इथल्या मराठवाडा मेट्रो कोच निर्मिती कारखान्यास भेट दिली. यावेळी त्यांनी कामाचा आढावा घेतला. कारखाना उभारणीचं ८० टक्के काम पूर्ण झालं असून, यावेळी निदर्शनास आलेल्या बाबींचा सविस्तर आढावा लवकरच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासमोर ठेवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या कवठा या गावातल्या महिलांनी गावात दारु बंद करण्याची मागणी केली आहे. या मागणीचं निवेदन ग्रामस्थ आणि महिलांनी काल पोलीस उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांना दिलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पीक कापणी अहवालावर अचूक नोंद घेतल्याची खात्री करूनच स्वाक्षऱ्या कराव्यात, असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. जिल्ह्यात पीक विम्याच्या अनुषंगाने मुगाचे पीक कापणी प्रयोग सुरू झाले असून, या प्रयोगाच्यावेळी शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहावं असं ते म्हणाले. यातून निष्पन्न झालेल्या उत्पन्नाच्या आधारे पीक विमा मिळणार असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना ही सूचना केली.
****
औरंगाबाद शहरातल्या उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या अकरावीच्या प्रवेशाची पहिली यादी काल जाहीर झाली. या यादीत आठ हजार ७३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती शिक्षण उपसंचालक मधुकर देशमुख यांनी दिली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत ऑनलाईन माहिती उपलब्ध करुन द्यावी, तसंच प्रवेश प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन करावं, असं त्यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात किनवटनजिक मौजे पाटोदा फाटा इथं दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर आदीलाबाद इथं उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
0 notes