#पाठवला-
Explore tagged Tumblr posts
survivetoread · 6 months ago
Note
नमस्कार! मी आता तीन महिन्यांपासून मराठी शिकत आहे (तुमच्या langblrने मला खूप मदत केलं आहे). मला मराठी वाचायचं practice करून नवा शब्द शिकायचा आहे, पण मला वाटतं की योग्य पुस्तकं मिळणं अवघड आहे. तुम्ही नवीन मराठी शिकणारांसाठी काही पुस्तकं suggest करू शकता का?
In the likely case my Marathi was confusing, I’m looking for book suggestions (or any literature) to practice reading Devanagari and grow my vocabulary. Thanks!
हा निरोप वाचून मला खूप खूप आनंद झाला. तीन महिन्यांत तुम्ही इतकी प्रगती केली! कौतुकाची गोष्ट झाली ती तर.
मराठी साहित्य जगाची माहिती माझ्याकडे कमीच आहे. 😓 पण मी जितकी पुस्तके वाचली आहेत (सर्व २.२५ पुस्तके 😅) , त्यांच्यातून मला रत्नाकर मतकरी यांच्या गोष्टी सर्वात सोप्या वाटल्या.
तुमच्यासाठी त्या योग्य आहेत की नाही हे मी सांगू शकत नाही, पण मी "Read With STR" प्रकल्पात त्या गोष्टी वाचल्या होत्या. येथे पाहा:
मला हा निरोप पाठवला याचे खूप खूप आभार. असले निरोप पाहून मला प्रोत्साहन मिळतं.
वाचत राहा आणि वाचत राहा!
4 notes · View notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २२ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २२ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप - अधिवेशन यशस्वी झाल्याचा सरकारचा दावा • गेल्या दोन वर्षांत मराठवाड्यात सात प्रकल्प पूर्ण करून ३८ दशलक्ष घनमीटर पाणी साठा निर्माण केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती • राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, गृह तसंच ऊर्जा खातं मुख्यमंत्र्यांकडे, अजित पवार यांना अर्थ तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक उपक्रम विभाग • मस्साजोग हत्या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारावर कारवाईची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही आणि • तूळजापूरचा पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ यांना जाहीर
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्चपासून मुंबई इथं होणार होणार आहे. अधिवेशन कालावधीत विधानसभेत १३ विधेयकं संमत तर १५ विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली. तर विधानपरिषदेत चार विधेयकं संमत झाली, तर चार विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली. चार विधेयकं शिफारशीशिवाय विधानसभेकडे परत पाठवण्यात आली तसंच एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. दरम्यान, हिवाळी अधिवेशन यशस्वी झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरीही, ठरवलेलं कामकाज पूर्ण झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
या अधिवेशनात सरकारने जनतेच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले तसंच विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ते काल नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. विदर्भ तसंच मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र अशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचा आरोप पटोले यांनी केला. शेतकरी, कष्टकरी, ��संच उद्योगधंद्यांसाठी कोणताही निर्णय सरकारनं घेतला नसल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.
विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उत्तर दिलं. गेल्या दोन वर्षांत मराठवाड्यात सात प्रकल्प पूर्ण करून ३८ दशलक्ष घनमीटर पाणी साठा निर्माण केला. मराठवाड्यात ११ सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली, कृष्णा मराठवाडा उपसा जलसिंचन योजनेलाही निधी पुरवल्याचं सांगताना, पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासंदर्भात कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा आराखडा नव्याने केंद्राकडे पाठवला असून, त्यासंदर्भात पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले, संपूर्ण याचा आराखडा तयार करून केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे. आता केंद्र सरकारचा नवीन मिशन ज्यावेळेस त्या ठिकाणी तयार होईल, त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही त्याचा पाठपुरा करू. आणि आता जे काही आपण जलजीवन मिशनचे अंतर्गत नेटवर्क तयार केलं, त्याच नेटवर्कचा उपयोग करून त्याला जे काही सोल नेटवर्क तयार करायचा ग्रेडच्या रूपानं तयार करण्याकरता केंद्र सरकारची मदत घेऊन ही मराठवाडा ग्रीड आपल्याला कशी पूर्ण करता येईल याचा देखील प्रयत्न आपण करू. उद्योग क्षेत्राबद्दल बोलतांना, गेल्या अडीच वर्षात मराठवाड्यात ३४ मोठे प्रकल्प आले, ७२ हजार ८३९ कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन सुमारे दीड लाखावर प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लातूर इथल्या रेल्वे बोगी कार��ान्यातून वंदे भारत रेल्वेच्या डब्यांची निर्मिती होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. टोयोटा किर्लोस्कर प्रकल्प कर्नाटकातून ऑरिक सिटीत आला, त्यामुळे १३ हजार लोकांना थेट रोजगार मिळाल्याचं सांगत, छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही दोन शहरं उद्योजकांचा आकर्षण बिंदू ठरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले… महाराष्ट्राज नेक्स्ट इंडस्ट्रियल मॅग्नेट इज छत्रपती संभाजीनगर अँड जालना. आज डीएमआयसीमध्ये आपण जो ऑरिक सिटी तयार केली, शेंद्रा बिडकीन या ज्या एमआयडीसी तयार केल्या, जागा शिल्लक नाही इतकी मागणी आहे. कारण समृद्धी महामार्गामुळे थेट पोर्ट कनेक्टिव्हिटी त्याला मिळालेली आहे आणि जालन्याला आपण ड्रायफ्रूट देखील करतो आहोत. याच्यामुळे अशी इकोसिस्टीम त्या ठिकाणी तयार झाली आहे की त्यातलं मराठवाड्याच्या विकासाकरता एक मोठं दालन या ठिकाणी उभं राहीलं.
दरम्यान, महाराष्ट्राला प्रगत, समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहोरात्र काम करेल, अशी ग्वाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विधान परिषदेत नियम २५९ आणि २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. मराठवाडा आणि विदर्भात औद्योगिक विकास आणि सिंचनावर भर देणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यात १२ जानेवारी पर्यंत सोयबीनची खरेदी सुरू ठेवणार असून, गरज पडली तर यात वाढ करण्यात येईल, अशी ग्वाही देखील शिंदे यांनी यावेळी दिली. राज्यात कापूस खरेदी केंद्रातून आतापर्यंत ३८ लाख १० हजार क्विंटल कापूस खरेदी झाल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं. गृह तसंच ऊर्जा खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि उत्पादन शुल्क खातं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक उपक्रम विभाग देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे विभागून देण्यात आली आहे. महसूल - चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण - हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण - चंद्रकांत पाटील, स्वच्छता आणि पाणीपुरवठा - गुलाबराव पाटील, महिला आणि बालकल्याण - अदिती तटकरे, कृषी - माणिकराव कोकाटे, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण - प्रकाश आबिटकर, ग्रामीण विकास - जयकुमार गोरे, शालेय शिक्षण - दादा भुसे, मृदा आणि जलसंधारण - संजय राठोड, उद्योग आणि मराठी भाषा - उदय सामंत, पर्यटन - शंभुराज देसाई, बंदरे आणि मत्स्यव्यवसाय - नितेश राणे, क्रीडा तसंच वक्फ - दत्ता भरणे तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलं आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता - मंगलप्रभात लोढा, पणन आणि राजशिष्टाचार - जयकुमार रावल, आदिवासी विकास - अशोक उईके, पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्रालय - शंभूराज देसाई, तर आशिष शेलार हे माहिती आणि तंत्रज्ञान, सांस्कृतिक खात्याचे मंत्री असतील. मराठवाड्यातल्या मंत्र्यांना मिळालेली खाती याप्रमाणे… पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि पशू संवर्धन, धनंजय मुंडे यांना अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अतुल सावे यांच्याकडे बहुजन विकास, नवीकरणीय ऊर्जा आणि दुग्धविकास, संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय, बाबासाहेब पाटील यांना सहकार खातं देण्यात आलं आहे. तर मेघना बोर्डीकर या महिला बालकल्याण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, ऊर्जा, आदी खात्यांच्या राज्यमंत्री म्हणून काम पाहतील.
मस्साजोग हत्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पवार यांनी काल मस्साजोग इथं मृत सरपंच संतोष देशमुख यां��्या कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणात जे जे दोषी आढळून येतील ��्यांना फाशीची शिक्षा होईल, असं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल मस्साजोग इथं देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. शरद पवार यांनी परभणी इथंही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून परिसराची पाहणी केली. परभणी इथं आंदोलनादरम्यान दगावलेले सोमनाथ सूर्यवंशी तसंच रिपब्लिकन सेनेचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची पवार यांनी भेट घेऊन, त्यांचं सांत्वन केलं.
पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ यांना जाहीर झाला आहे. तुळजापूर इथल्या हिरकणी पुरस्कार संयोजक समितीनं काल ही घोषणा केली. येत्या १२ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते तुळजापूर इथं हा पुरस्कार ममता सपकाळ यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.
निवडणुकीदरम्यान नागरिकांच्या सहभागासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारतीय माहिती सेवेतले अधिकारी संतोष अजमेरा यांना २०२४ चा आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. डोमिनिकन रिपब्लिक इथं हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
१९ वर्षाखालील महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत बांग्लादेश दरम्यान सुरु झाला आहे. बांग्लादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. जिल्ह्यात नांदेड, लोहा, मुदखेड आणि देगलूर पाठोपाठ आयएसओ मानांकन मिळवणारी बिलोली ही पाचवी पंचायत समिती ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते काल समितीला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं.
परभणी इथल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ काल आंबेडकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जालना बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हिंगोली आणि कळमनुरी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं निदर्शन करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ केलेल्या आंदोलनात शहा यांच्या राजीनाम्याची मागणी झाली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने काल ध्यान दिनाचं औचित्य साधून ध्यानधारणेविषयी जागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. योग अभ्यासक अनंत पंडित यांनी ध्यानसाधनेमुळे एकाग्रता वाढून तणाव कमी ��ोतो असं सांगत, ध्यानाचं महत्त्व विशद केलं. या वेळी उपस्थित विद्यार्थी-शिक्षक-पालक यांनी ध्यानधारणेची प्रात्यक्षिकं केली.
रोटरी इंटरनॅशलच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात महाएक्सपो प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यात विविध स्टॉल्ससह देहदान चळवळीची माहिती देणारं दालनंही आहे.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४४
शुभदाने स्वाधीन केलेल्या पिशवीतून सामान बाहेर काढून ठेवीत मनोरमा म्हणाली, "शुभदा, तूं येशील म्हणून मी चहा करायची थांबले होते! घरी पिऊन आली असलीस तरी माझ्याबरोबर पुन: घेशील ना?" "तुला कंपनी देण्यासाठी घेईन अर्धा कप;--पण तोपर्यंत मी एकदां सुहासिनी मॅडमना बघून येऊं कां? ह्यांच्या तोंडून ती भयानक बातमी ऐकल्यापासून जिवाला चैन नाहींये!" शुभदाला बेडरूमचं दार उघडून देऊन मनोरमा कीचनकडे वळली. शुभदाने दारातूनच डोकावून बेडकडे बघितलं तर अंगावर व्यवस्थित घातलेल्या पांघरुणाखाली सुहासिनीमॅडमचं शरीर दिसतच नव्हतं! दिसत होता तो फक्त त्यांचा निद्रिस्त शांत चेहरा आणि त्याभोंवतीची दाट शुभ्र केसांची महिरप! भूतकाळातील अनेक आठवणी मनांत दाटल्यामुळे शुभदा जागींच खिळल्यागत ऊभी राहून बघत असतांना नकळत तिचे डोळे भरून आले आणि हलक्या हाताने बेडरूमचं दार लावून ती परत फिरली. तिची चाहूल जाणवून मनोरमा म्हणाली, "कीचनमधेच ये, शुभदा!" साश्रू डोळ्यांनी विमनस्कपणे बसलेल्या शुभदापुढे चहाचा कप ठेवीत मनोरमा म्हणाली, "भाऊसाहेब त्यांच्या परीने ह्यांना 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'साठी देणग्या गोळा करायला मदत करीत असतात. त्यातूनच माझी सुहासिनीची ओळख झाली! पण तुझी तिच्याशी ओळख कशी?"
"आमची जयू ८ वीत असतांना सुहासिनी मॅडम तिच्या क्लासटीचर होत्या. सायन्स विषयही त्याच शिकवायच्या. शिक्षणाचा प्रात्यक्षिक भाग म्हणून त्या हौसेनं स्टडी टुर काढीत! अशाच एका टुरनंतर त्यांनी 'भेटायला या' म्हणून निरोप पाठवला!" शुभदा भूतकाळाच्या आठवणी जागवीत सांगू लागली, "पण ह्यांना कुठे ऑफिसच्या कामांतून वेळ मिळायला! चार दिवस वाट बघून शेवटी मी एकटीच भेटायला गेले. पहिल्याच भेटीत त्या जयूचं वनस्पतींबद्दलचं कुतूहल आणि निरीक्षण यांबाबत भरभरून बोलल्या! जयूचे इतर छंद आणि आवडींची आस्थेनं चौकशी केली! जयू ९ वीत गेल्यावरही त्यांनी तिच्या प्रगतीमधे रस घेतल्याने आमच्या भेटी होत राहिल्या, ओळख वाढत गेली!" "मीसुद्धां अनेकांकडून तिच्या जीव ओतून शिकवण्याबद्दल ऐकलं आहे!" मनोरमा म्हणाली, "बाहेर पडली तर अजूनही तिचे जुने विद्यार्थी मोठ्या आदराने तिला भेटतात!" "पांच वर्षांपूर्वी जयू आली होती तेव्हां कपड्यांच्या दुकानांत ��म्ही खरेदी करीत असतांना तिने अचानक मॅडमना ओझरतं पाहिलं आणि धांवतच जाऊन त्यांना गांठलं! तिथंच त्यांच्या पायां पडली तेव्हां "अग, बबली तूं?" म्हणतांना मॅडमना केवढा आनंद झाला होता! खरेदी राहिली बाजूला आणि त्यांच्या गप्पा संपेनात, तेव्हां 'एकदां आरामांत गप्पा मारायला घरी ये' म्हणाल्या होत्या! पण जेमतेम दोन आठवड्यांच्या मुक्कामामुळे जयूला नाहींच जमलं! परत जातांना ती 'मॅडमना पुन: भेटतां आलं नाही' म्हणून जाम हळहळली होती!कारण पुढे ज्या वनस्पतींविषयक संशोधनक्षेत्रांत जयूने स्कॉलरशिप मिळवून डाॅक्टरेट केली, त्यातली तिची रुची आणि कल ओळखून मॅडमनी तिला प्रोत्साहन दिलं! आपल्या करीअरचा पाया घालण्याचं श्रेय ती नेहमी मॅडमनाच देते!"
"जयूचं टोपण नांव 'बबली' असल्याचं मला आजच समजलं!" मनोरमा कौतुकाने म्हणाली. "जयू लहान असतांना आम्ही भाड्याच्या जागेत रहात होतो तिथे शेजारी शर्मा कुटुंब होतं! त्यांच्या घरांत समवयस्क लहान मुलं असल्याने जयू तिथे रमायची!शर्मा मंडळीनीच तिला 'बबली' म्हणायला सुरुवात केली. तिच्या 'बबली' या टोपणनांवाचं सुहासिनी मॅडमना केवढं अप्रूप!'किती वेगळं आणि गोड आहे' म्हणायच्या आणि कौतुकाने हंसायच्या!" "नांवाप्रमाणे सतत हंसत असायची!" खेदाने मान हलवीत मनोरमा म्हणाली, "पण आज ही काय वेळ आली बघ तिच्यावर!" "विषय निघाला, म्हणून विचारतेय्--" काहीशी चांचरत शुभदा म्हणाली, "मॅडमचा आत्महत्येचा प्रयत्न ऐनवेळी कुणी हाणून पाडला?" "सकाळी भाऊसाहेब नेहमीप्रमाणे शुक्रवारच्पा गप्पांच्या बैठकीला गेल्यावर सुहासिनीने 'जगण्यांत रस न उरल्याने मी स्वतःहून आयुष्य संपवीत आहे. याबाबत इतर कुणालाही दोष देऊं नये!' अशा आशयाची चिठ्ठी लिहून बेडवर ठेवली! त्यानंतर ती जीव देण्यासाठी बेडरूमच्या खिडकीतून उडी मारणार होती. पण आठव्या मजल्यावरून खाली बघितल्यावर तिला बहुधा भोंवळ आली आणि ती आंतल्या बाजूला पडली! तो आवाज ऐकून खालच्या फ्लॅटमधले घाबरून चौकशी करायला धांवत आले. शेजारी कुणाकडे तरी डुप्लिकेट चावी होती ती वापरून फ्लॅटचा दरवाजा उघडला तर सुहासिनी बेडरूममधे, खिडकीखाली बेशुद्ध अवस्थेमधे पडलेली आढळली! तेवढ्यांत शेजारी बेडवर तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी कुणीतरी वाचली आणि एकच हलकल्लोळ उडाला!" सगळी हकीकत नुसती ऐकतांना थरकांप उडालेल्या शुभदाने स्वत:ला सावरण्यासाठी बाजूच्या खुर्चीचा आधार घेतला! "नशीब बलवत्तर म्हणून सुहासिनी वाचली आ��े, शुभदा! अगदी सुखरूप आहे!" म्हणत मनोरमाने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला! तेवढ्यांत दरवाजाचं लॅच उघडल्याचा आवाज आला! पोलीस चौकीतील काम निपटून मनोहर भोसले भाऊसाहेबांना सोबत घेऊन परतले होते. शुभदाला उद्देशून भोसले म्हणाले, "अनंतरावांशी माझं वाटेतच बोलणं झालं! ते आणि आणखी कांही मित्र १०-१५ मिनिटांत पोहोचतीलच!"
२२ जून २०२३
0 notes
mhadalottery2023 · 8 months ago
Text
म्हाडाची पाच हजार घरांची लॉटरी? वांद्रे रेक्लमेशन, आदर्शनगर, अभ्युदयनगर येथे घरे
मुंबई: आर्थिक���ृष्ट्या अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या धर्तीवर वांद्रे रेक्लेमेशन, आदर्शनगर (वरळी) आणि अभ्युदयनगर (काळा चौकी) या वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. . आणि विकास एजन्सी. या पुनर्विकासामुळे म्हाडाला 300 चौरस फुटांची 5000 घरे मिळणार असून सर्वसाधारण विक्रीतून 9000 कोटी रुपयांचा महसूल मिळणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
जालना लोकसभा कुठल्याही पक्षाच्या पाठबळाविना लढा, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला
मुंबई : आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झालीय. आता आरक्षण मिळवण्याचा भाग आहे असं आम्ही मानतो, म्हणून जरांगे पाटलांनी येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून स्वतंत्रपणे लढवले पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; पाठवला बरनॉल
https://bharatlive.news/?p=124168 चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; पाठवला बरनॉल
पुढारी ऑनलाईन ...
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' तुझी पाठीमागील बाजू.., ' जिममधील महिलेला अश्लील मेसेज पाठवून म्हणाला की.
महाराष्ट्रात अनेक शहरात युनीसेक्स जिम सुरू झालेल्या असून सोबत व्यायाम करत असल्याने अनेक विचित्र प्रकार देखील समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथे अशीच एक घटना समोर आलेली असून कांचनवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या व्हाट्सअप नंबरवर अश्लील मेसेज करून तिच्यासोबत विनयभंग करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. आरोपी व्यक्ती याने महिलेचा जिममधील फोटो तिच्या व्हाट्सअप नंबरवर पाठवला आणि ‘ मला तू अशा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
' तुझी पाठीमागील बाजू.., ' जिममधील महिलेला अश्लील मेसेज पाठवून म्हणाला की.
महाराष्ट्रात अनेक शहरात युनीसेक्स जिम सुरू झालेल्या असून सोबत व्यायाम करत असल्याने अनेक विचित्र प्रकार देखील समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथे अशीच एक घटना समोर आलेली असून कांचनवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या व्हाट्सअप नंबरवर अश्लील मेसेज करून तिच्यासोबत विनयभंग करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. आरोपी व्यक्ती याने महिलेचा जिममधील फोटो तिच्या व्हाट्सअप नंबरवर पाठवला आणि ‘ मला तू अशा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
निवडणूक आयोगाचा अश्विनी जगताप यांना दणका!
Tumblr media
चिंचवड | पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार (Bjp) अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने मोठा दणका दिलाय. अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना पेड न्यूज (Paid News) प्रकरणी नोटीस धाडली आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना पैसे देऊन बातमी प्रकाशित करण्यावरून नोटीस बजावण्यात आली आहे. पोट निवडणूकीच्या रणधुमाळीत आयोगातर्फे चालू घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समिती अर्थात एमसीएमसी नेमण्यात आली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने अश्विनी जगताप यांचं लेखी उत्तर मागवलं आहे. 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला अश्विनी जगताप यांनी खुलासादेखील पाठवला आहे. दरम्यान, मतदार संघातील पोट निवडणूक जाहीर झाल्यापासून सुमारे 43 लाख रुपयांची रोकड, चार लाख 97 हजार 625 रुपये किंमतीचे मद्य आणि 94 हजार 750 रुपयांचा 3  किलो 584 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप-अधिवेशन यशस्वी झाल्याचा सरकारचा दावा
मस्साजोग हत्या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारावर कारवाईची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
तूळजापूरचा पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ यांना जाहीर
आणि
१९ वर्षाखालील महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्चपासून मुंबई इथं होणार होणार आहे. दरम्यान, नियोजित सर्व कामं पूर्ण झाल्यानं, हिवाळी अधिवेशन यशस्वी झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरीही, ठरवलेलं कामकाज पूर्ण झाल्याचं, शिंदे यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
कमी कालावधी असला तरीसुद्धा सरकारने ठरवलेलं कामकाज वेगाने केलेलं कामकाज पूर्ण झालं. सतरा विधेयकं मंजूर झाली. या विधेयकांमध्ये अनेक महत्वाची विधेयकं जसं कारागृह सुधारणा, प्राचीन स्मारके आणि इतरही महत्वाची विधेयकं देखील मंजूर झालेली आहेत. पुरवणी मागण्या मंजूर झाल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या. ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या, लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, बळीराजाला सवलत असेल, इतरही काही योजना आहेत, ह्या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते, ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली.
महाराष्ट्राला प्रगत, समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहोरात्र काम करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत दिली. विधानपरिषदेत मांडण्यात आलेल्या नियम २५९ आणि २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे ��ोलत होते. मराठवाडा आणि विदर्भातील औद्योगिक विकास आणि सिंचनावर भर देणार असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. मुंबई इथले इंदूमिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक ६ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणार असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात १२ जानेवारी पर्यंत सोयबीनची खरेदी सुरू ठेवणार असून गरज पडली तर यात वाढ करण्यात येईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यात कापूस खरेदी केंद्रातून आतापर्यंत ३८ लाख १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. गेल्या दोन वर्षांत मराठवाड्यात सात प्रकल्प पूर्ण करून ३८ दशलक्ष घनमीटर पाणी साठा निर्माण केला. मराठवाड्यात ११ सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली, कृष्णा मराठवाडा उपसा जलसिंचन योजनेलाही निधी पुरवल्याचं सांगताना, पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासंदर्भात कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा आराखडा नव्याने केंद्राकडे पाठवला असून, त्यासंदर्भात पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले –
संपूर्ण याचा आराखडा तयार करून केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे. आता केंद्र सरकारचं नवीन मिशन ज्यावेळेस त्या ठिकाणी तयार होईल, त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही त्याचा पाठपुरावा करू. आणि आता जे काही आपण जलजीवन मिशनचे अंतर्गत नेटवर्क तयार केलं, त्याच नेटवर्कचा उपयोग करून त्याला जे काही जोड नेटवर्क तयार करायचा ग्रेडच्या रूपानं तयार करण्याकरता केंद्र सरकारची मदत घेऊन ही मराठवाडा ग्रीड आपल्याला कशी पूर्ण करता येईल याचा देखील प्रयत्न आपण करू.
उद्योग क्षेत्राबद्दल बोलतांना, गेल्या अडीच वर्षात मराठवाड्यात ३४ मोठे प्रकल्प आले, ७२ हजार ८३९ कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन सुमारे दीड लाखांवर प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. टोयोटा किर्लोस्कर प्रकल्प कर्नाटकातून ऑरिक सिटीत आला, त्यामुळे १३ हजार लोकांना थेट रोजगार मिळाल्याचं सांगत, छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही दोन शहरं महाराष्ट्रात उद्योजकांचा आकर्षण बिंदू ठरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
महाराष्ट्राज्‌ नेक्स्ट इंडस्ट्रियल मॅग्नेट इज छत्रपती संभाजीनगर अँड जालना. आज डीएमआयसीमध्ये आपण जो ऑरिक सिटी तयार केली, शेंद्रा बिडकीन या ज्या एमआयडीसी तयार केल्या, जागा शिल्लक उरली नाही इतकी मागणी आहे. कारण समृद्धी महामार्गामुळे थेट पोर्ट कनेक्टिव्हिटी त्याला मिळालेली आहे आणि जालन्याला आपण ड्रायफ्रूट देखील करतो आहोत. याच्यामुळे अशी इकोसिस्टीम त्या ठिकाणी तयार झाली आहे की त्यातनं मराठवाड्याच्या विकासाकरता एक मोठं दालन या ठिकाणी उभं राहीलं.
लातूर इथल्या रेल्वे बोगी कारखान्यातून वंदे भारत रेल्वेच्या डब्यांची निर्मिती होणार असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं –
मागच्या लक्षकाळात लातूरला कोर्स फॅक्टरी आपण तयार केली. वंदे भारत ट्रेन ही लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये तयार होणार आहे. त्याची घोषणा देखील आपल्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे काम आपण करतो आहोत.
****
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहांच्या एकवीस सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष असतील.
****
मस्साजोग हत्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पवार यांनी आज मस्साजोग इथं मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणात जे जे दोषी आढळून येतील त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही पवार यांनी पीडित देशमुख कुटुंबीयांना दिली.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोग गावात देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. या हत्येमागे सूत्रधार कोण, हे मुळात जाऊन शोधणं गरजेचे आहे, असं मत पवार यांनी व्यक्त केलं. शरद पवार यांनी परभणी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून परिसराची पाहणी केली. या आंदोलनादरम्यान दगावलेले सोमनाथ सूर्यवंशी तसंच रिपब्लिकन सेनेचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची पवार यांनी भेट घेऊन, त्यांचं सांत्वन केलं.
****
पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ यांना जाहीर करण्यात आला आहे. तुळजापूर इथल्या हिरकणी पुरस्कार संयोजक समितीनं आज ही घोषणा केली. येत्या १२ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते तुळजापूर इथं हा पुरस्कार सपकाळ यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
निवडणुकीदरम्यान नागरिकांच्या सहभागासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारतीय माहिती सेवा अधिकारी संतोष अजमेरा यांना २०२४ चा आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. डोमिनिकन रिपब्लिक इथं हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
****
१९ वर्षाखालील महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा चार खेळाडू राखून पराभव केला. मलेशियात क्वालालांपूर इथं उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची बांगलादेश संघासोबत लढत होईल.
****
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. बिलोली पंचायत समिती आयएसओ मानांकन मिळवणारी जिल्ह्यातील पाचवी पंचायत समिती ठरली आहे. यापूर्वी नांदेड, लोहा, मुदखेड आणि देगलूर पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते ��मितीला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले.
****
परभणी इथल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ आज आंबेडकरी संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या जालना बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातल्या मुख्य बाजारपेठेतली बहुतांश दुकानं दिवसभर बंद राहिली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. बंदमुळे शहरातल्या मुख्य चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं निदर्शन करण्यात आली. हिंगोली आणि कळमनुरी इथं डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने घोषणा देत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या वतीने आज ध्यान दिनाचं औचित्य साधून ध्यानधारणेविषयी जागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. योग अभ्यासक अनंत पंडित यांनी ध्यानसाधनेमुळे एकाग्रता वाढून तणाव कमी होतो असं सांगत, ध्यानाचं महत्त्व विशद केलं. या वेळी उपस्थित विद्यार्थी-शिक्षक-पालक यांनी ध्यानधारणेची प्रात्यक्षिकं केली.
****
रोटरी इंटरनॅशलच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात महाएक्सपो प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात विविध स्टॉल्ससह देहदान चळवळीचं महत्त्व विशद करण्यासाठी स्वतंत्र स्टॉल रोटरीच्या वतीने उभारण्यात आला आहे. प्रदर्शनातून मिळणारी रक्कम जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या १५ हजार विद्यार्थींनीच्या आरोग्य तपासणी साठी तसंच ४० गावांमध्ये स्मशानभूमी उभारण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
दुबईत तुरुंगात असलेल्या सुनेच्या हत्येचा प्लॅनिंग : राजस्थानमधील व्यापारी पिता-पुत्राने मुंबईच्या शार्प शूटरला सुपारी दिली, उदयपूरमध्ये एसओजीने पकडले
दुबईत तुरुंगात असलेल्या सुनेच्या हत्येचा प्लॅनिंग : राजस्थानमधील व्यापारी पिता-पुत्राने मुंबईच्या शार्प शूटरला सुपारी दिली, उदयपूरमध्ये एसओजीने पकडले
उदयपूर32 मिनिटांपूर्वी अजमेर एसओजीच्या माहितीवरून उदयपूर पोलिसांच्या विशेष पथकाने दोन शार्प शूटर्सना पकडले आहे. कारागृहात बंदिस्त कैदी फैजलला मारण्याच्या इराद्याने हे दोन्ही हल्लेखोर फिरत होते. मुंबई आणि दुबईमध्ये काचेचा व्यवसाय करणाऱ्या पिता-पुत्रांनी फैसलला सुपारी दिल्याचे दोघांनी सांगितले आहे. हे पिता-पुत्र फैसलचे सासरे आणि मेहुणे आहेत. फैजल त्याच्या मुलीपासून विभक्त झाला आहे. फैजल याने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
drmangeshacharya · 4 years ago
Text
म्यानमारची सत्ता पुनश्च सैन्याच्या हातात!
डॉ. मंगेश गोविंदराव आचार्य
राज्यशास्त्र विभाग प्रमुख
जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम
मो. नं. ८५५०९७१३१०
 
म्यानमारमध्ये १० वर्षांपूर्वी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारण्यात आलेली होती. परंतु म्यानमारची सत्ता पुन्हा सैनिकी व्यवस्थेकडे गेलेली आहे. देशाचे सर्वोच्च नेते आंग सॅन सू की आणि अध्यक्ष यू विन मिंट यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केल्यानंतर म्यानमार सैन्याने म्यानमारवर आपली सत्ता काबीज केली असून अटकेनंतर लष्करी मालकीच्या टीव्ही चॅनल मायावाडीने देशात वर्षभर आपत्कालीन परिस्थिती राहणार असल्याची घोषणा केली. म्यानमारची राजधानी राजधानी नेपेटा आणि मुख्य यॅंगॉन मधील सैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत. बख्तरबंद वाहने येथे गस्त घालत आहेत आणि बर्‍याच शहरांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल��ल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाची सत्ता आता संरक्षण सेवा प्रमुख सेनापती मिंग ऑंग हिलिंग यांच्या ताब्यात असून देशाचे पहिले उपराष्ट्रपती माइंट स्वे हे कार्यवाहक अध्यक्ष असतील लष्कराचे प्रमुख म्हणूनही त्यांना पदभार सोपवण्यात आला आहे. देशातील स्थिरता धोक्यात आल्याने हा निर्णय घेतल्याचे सैन्याने म्हटले आहे. कुठल्याही निषेधाला चिरडण्यासाठी सैन्य रस्त्यावर उतरले असून फोन लाईन्स बंद करण्यात आल्या आहेत. सैनिकी कारवाईमुळे राजधानी नेपिताशी संपर्क तुटल्याने परिस्थिती बिघडली आहे. येनगॉनमधील स्थानिकांनी येत्या काही दिवसांत एटीएमसमोर रोख रकमेची कमतरता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. म्यानमार बँकिंग असोसिएशनच्या म्हणण्यानुसार बँकांनी काही काळासाठी सर्व आर्थिक सेवा बंद केल्या आहेत.
आणीबाणीनंतर निवडणुका घेण्यात येतील असे म्यानमारच्या सैन्याने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगात सुधारणा करून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांचा आढावाही घेण्यात येईल. ८ नोव्हेंबर २०२० रोजी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेल्या घोटाळ्याचा पुनरुच्चार सैन्याने यावेळी केला. या निवडणुकीत नॅशनल लीग फॉर डेमॉक्रेसी पार्टीने ८३ टक्के जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासूनच सैन्य आणि सरकार यांच्यात तणाव निर्माण झाला होता. संसदेच्या नव्या अधिवेशनापूर्वी सैन्याने संविधान संपुष्टात आणण्याचा आणि निवडणुकीत मतदानाच्या घोटाळ्याच्या तक्रारीवर कारवाई न केल्यास सेना कारवाई करणार असल्याचा इशारा सैन्याने दिला होता.
म्यानमारचे नेते आंग सॅन सू की राजकीय पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी (एनएलडी) यांनी देशातील जनतेला लष्करी बंडखोरीचा विरोध करण्याचे व हुकूमशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. पक्षाच्या प्रमुखांनी आंग सॅन सू की फेसबुक पेजवर म्हटले आहे की लष्कराच्या कृती अन्यायकारक आणि मतदारांच्या इच्छेनुसार आणि घटनेच्या विरोधात आहेत. मात्र, हा निरोप कोणी पाठवला हे कळू शकले नाही. बर्‍याच काळापासून नजरकैदेत राहिलेल��या आंग सॅन सू की यांच्यावर २०११ पर्यंत सैन्याने राज्य केले आहे. देशात लोकशाही आणण्यासाठी आंग सॅन सू की यांनी कित्येक वर्षे संघर्ष केला. यावेळी त्याला बराच काळ नजरकैदेत राहावे लागले. लोकशाही आल्यानंतर संसदेत सैन्याच्या प्रतिनिधींसाठी निश्चित कोटा निश्चित करण्यात आला होता. घटनेत अशी तरतूद होती की सू कधीही अध्यक्षीय निवडणूक लढवू शकत नाही.
ऑंग सॅन सू ची म्यानमारच्या स्वातंत्र्याचा नायक जनरल ऑंग सानची यांच्या कन्या आहे. १९४८ मध्ये ब्रिटीश राज्यापासून स्वातंत्र्यापूर्वी जनरल ऑंग सॅनची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सू ची दोन वर्षांची होती. म्यानमारच्या लष्करी राज्यकर्त्यांना आव्हान देणारी मानवाधिकारांसाठी लढा देणारी महिला म्हणून सु की यांना जगभर पाहिले जाते. १९९१ मध्ये अटकेत असताना सु ची यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. १९८९  ते २०१० या काळात सु ची यांनी जवळपास १५ वर्षे नजरकैदेत घालविली. नोव्हेंबर २०१५ मध्ये सू ची यांच्या नेतृत्वात नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पार्टीने एकतर्फी निवडणुका जिंकल्या.
म्यानमारच्या इतिहासातील २५ वर्षातील ही पहिली निवडणूक होती ज्यात लोकांनी उघडपणे भाग घेतला. म्यानमारची राज्यघटना त्याला अध्यक्ष होण्यापासून प्रतिबंधित करते कारण त्याची मुले परदेशी नागरिक आहेत. पण ७५ वर्षांची सू की म्यानमारचा सर्वोच्च नेता म्हणून पाहिली जाते. म्यानमारचे राज्य सल्लागार बनल्यापासून म्यानमारच्या अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिमांवर आंग सॅन सू की यांच्यावर टीका झाली होती. २०१७ मध्ये राखीन प्रांतातील पोलिस कारवाई टाळण्यासाठी लाखो रोहिंग्या मुस्लिमांनी शेजारच्या देश बांगलादेशात आश्रय घेतला. त्यानंतर सू ची च्या आंतरराष्ट्रीय समर्थकांनी बलात्कार खून आणि संभाव्य हत्याकांड रोखण्यासाठी माईटी सेनचा निषेध केला नाही किंवा अत्याचारांची कदर केली नाही. काही लोकांचा असा तर्क आहे की बहुधा पारंपारिक देशात शासन करण्याचा प्रयत्न करणारी ती हुशार राजकारणी आहे. ज्यांचा इतिहास खूपच जटिल आहे.  सु ची यांनी सन २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांची आंतरराष्ट्रीय कीर्ती संपुष्टात आली. तथापि आंग सॅन सू की म्यानमारमधील द लेडी ही पदवी प्राप्त झाली आहे. बहुसंख्य बौद्ध लोकांमध्ये अजूनही ती खूप लोकप्रिय आहे. रोहिंग्या समाजाबद्दल मात्र सन सु ची कठोर भूमिका दिसून आली.
म्यानमारच्या परस्थिती बाबत भारतासह अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. म्यानमारच्या परिस्थितीवर  भारताने बारीक लक्ष ठेवले असून म्यानमारमधील लष्करी उठावास वोरोध आणि शेजारील देशातील लोकशाही प्रस्थापनेस नेहमीच पाठिंबा दर्शविला असून म्यानमारमधील लष्करी उठाव आणि वरिष्ठ नेत्यांच्या अटकेबाबत भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. १६०० कि.मी. लांबीचा किनारा भारत आणि म्यानमार दरम्यान आहे. दोन्ही देशांमध्ये दीर्घ काळापासून चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. चीनला लागून अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपूर आणि नागालँडमधील घुसखोरी वाढवायची आहे. युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीजनुसार चीन म्यानमारच्या बंडखोरांना शस्त्रे देऊन भडकवित असतो. दुसरीकडे भारत म्यानमारमधील लोकशाहीचा समर्थक आहे. अशा परिस्थितीत म्यानमारचे  सैन्य चीनकडे झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्यानमारमधील लष्करी बंड थांबवून ऑंग सॅन सू की यांच्यासह देशातील सर्वोच्च नेत्यांच्या अटकेतून सुटका न केल्यास आणि देशात लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी योग्य पावले उचलली गेली नाहीत तर अमेरिकेकडून कठोर पाऊले उचलले जातील असे व्हाईटचे प्रेस सचिव जेन साकी यांनी स्पष्ट केले आहे.  म्यानमारच्या सैन्याने देशात प्रस्थापित लोकशाही बिघडवण्यासाठी पावले उचलली आहेत. म्यानमारच्या लोकशाही संस्थांना अमेरिका कणखर पाठिंबा दर्शविते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन म्हणाले की, “आम्ही लोकशाही प्रक्रियेअंतर्गत ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीला पाठींबा देतो तसेच म्यानमारच्या सैन्यदलाला सर्व सरकारी अधिकारी व नेते सोडण्याची आणि देशातील जनतेच्या निर्णयाचा आदर करण्यास सांगितले आहे. म्यानमारच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाने सैन्यात निवडणुकीत घोटाळे असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. ८ नोव्हेंबर रोजी म्यानमारमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत ऑंग सॅन सू की नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसीने नेत्रदीपक विजय मिळवला. सु ची च्या पक्षाने  ४७६ पैकी ३९६ जागा जिंकल्या तर सैन्य समर्थित संघटना एकता व विकास पक्षाने केवळ ३३ जागा जिंकल्या.
म्यानमारच्या परिस्थिती संदर्भात संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. जनरल सेक्रेटरी अँटोनियो गुटेरेस यांनीही सु ची  आणि इतर नेत्यांना म्यानमार सैन्याने ताब्यात घेतल्याचा निषेध केला आहे. सु ची  यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत असताना ऑस्ट्रेलियन परराष्ट्रमंत्री मारिज पेने म्हणाले की नोव्हेंबर २०२० च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रीय विधानसभेच्या शांततेत पुनर्रचनेचे जोरदार समर्थन करतो. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनीही म्यानमारमधील सत्तापरिवर्तनाचा निषेध केला आहे. जनतेच्या मताचा आदर केला पाहिजे असे ट्विट जॉन्सन यांनी केले आहे. बांगलादेशने सुद्धा म्यानमारमध्ये शांतता पुनर्संचयित करण्याची मागणी केली आहे. ताज्या घडामोडींचा रोहिंग्यांच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेवर परिणाम होणार नाही. अशी अशा बांगला देशाला आहे. बाग्लादेशांच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशी आशा व्यक्त केली की म्यानमारमध्ये लवकरच लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होईल. त्याचबरोबर अ‍ॅम्नेस्टी इंटरनेशनलने ऑंग सॅन सू ची आणि इतर नेत्यांना त्वरित मुक्त करण्याची मागणी केली आहे.  
म्यानमारमधील लोकशाही सुधारणांना मर्यादा आल्या आहेत असे सांगून जगभरातील सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी सैनिकी राजवटीचा निषेध केला आहे. सध्याच्या म्यानमारला लोकशाही देश म्हणून हा मोठा धक्का असून मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि सैन्यावर टीका करणार्‍यांवर प्राणघातक हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती  ह्यूमन राइट्स वॉचच्या कायदेशीर सल्लागार लिंडा लखधीर  यांनी बोलून दाखविली. सैन्यदलाच्या सैन्याच्या विद्रोहच्या भीतीने लष्कराने म्यानमारमध्ये एक वर्षाची आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. यापूर्वीही म्यानमारच्या सैन्याने आंग सान सू की यांना ताब्यात घेतले आहे.
निवडणुकीत घोटाळ्याच्या तक्रारी आल्यानंतर म्यानमारच्या सैन्य दलाने शनिवारी आपल्या लष्करप्रमुखाने एका सामूहिक बंडखोरीची धमकी दिली असल्यास नकार दिलेला आहे. प्रसार माध्यमांनी त्यांच्या मुद्द्याचा चुकीचा अर्थ काढला आहे असे म्यानमारच्या सैन्याकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या आठवड्यात म्यानमारमध्ये तणाव निर्माण झाला होता. नोव्हेंबरमध्ये लष्कराच्या घोटाळ्याच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्यास सैन्य दलाच्या एका प्रवक्त्याने अफवा उठवल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्यानमार कमांडर-इन चीफ सीनियर जनरल मिल ऑंग लैंग यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेत म्हटले होते की, 'देशात कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे न केल्यास संविधान रद्द केले जाऊ शकते'. त्यांच्या या वक्��व्यानंतर म्यानमारमधील राजकारण तापले होते. म्यानमारच्या संसदेचे पहिले अधिवेशन सोमवारी होणार होते परंतु तसे झाले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत आंग सॅन सू कीच्या पक्षाला एनएलडीला ८० % मते मिळाली होती. रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहार केल्याचा आरोप असूनही आंग सान सू ची च्या सरकारला ही मते मिळाली होती.  
म्यानमार मध्ये भविष्यात काय घडू शकते यावर विचार केल्यास लष्कराला जास्त फायदा होताना दिसत नाही. तरीही सैन्याने हे पाऊल का उचलले याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या आशिया रिसर्च इन्स्टिट्यूटशी संबंधित जेरार्ड मॅकअथी म्हणतात,"सध्याची व्यवस्था म्यानमारच्या लष्करासाठी अत्यंत फायदेशीर आहे. व्यापारी हितसंबंध आणि राजकारण यात पूर्ण स्वायत्तता आहे, मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक तेथे आहे सर्व काही सैन्याच्या हाती आहे." पुढच्या निवडणुकीत विरोधी पक्ष युएसडीपीला अधिक चांगले व मजबूत करण्यासाठी सैन्य हे करीत असल्याचे यातून स्पष्ट होते. त्याचबरोबर ह्युमन राईट वॉचचे फिल रॉबर्टसन यांचा असा विश्वास आहे की लष्कराच्या अशा हालचालीमुळे म्यानमार पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर विलग होईल. दुसरीकडे, यामुळे देशामध्येही संताप निर्माण होईल. ते म्हणतात, "मला वाटत नाही की म्यानमारची जनता ही व्यवस्था सहज स्वीकारेल. लोकांना पुन्हा सैनिकी सत्तेच्या भविष्याकडे वाटचाल करायची नाही. देशातील ��ोक आंग सॅन सू की यांना कणखर नेतृत्वाच्या रूपात पाठींबा द्यायला पाहिजे."
म्यानमारमधील लोकशाही पद्धतीने निवडले गेलेले सरकार बरखास्त करून आणि सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेने आता दक्षिण आशियाई देशावर नवीन निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर म्यानमारमध्ये आणीबाणी लागू करण्यात चीनचा हात असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच चीनचे परराष्ट्रमंत्री यांग यी यांनी 'लष्करी पुनरुज्जीवन' साठी म्यानमारच्या लष्करप्रमुखांना थाप दिली होती आणि दोन्ही देशांचे भाऊ असल्याचे वर्णन केले होते. चीन पक्षीय राजवटीचे हुकुमशाही मान्य करतो. आतापर्यंतच्या घडामोडींवर चीन शांत आहे आणि म्यानमारला मित्र म्हणत सर्व बाजूंनी करारावर येण्याचे आवाहन केले आहे. म्यानमारचा एक तृतीयांश व्यापार हा चीनशी आहे. जो अमेरिकेपेक्षा १० पट जास्त आहे. म्यानमारमध्ये चीनची गुंतवणूक २०.५ अब्ज डॉलर्स (१.५७ लाख कोटी रुपये) आहे. चीनचे  म्यानमार मधील हितसंबंध लक्षात घेता म्यानमारमधील सैन्याच्या कारवाईला चीनची फूस असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. मंगेश गोविंदराव आचार्य
राज्यशास्त्र विभाग प्रमुख
जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम
मो. नं. ८५५०९७१३१०
 
 
Tumblr media
1 note · View note
karmadlive · 2 years ago
Text
बिबट्याचा तरुणावर हल्ला; सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथील घटना
सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे रविवारी रात्री आठ वाजता एका तरुणाचा मृतदेह शेतात आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृतदेहाची अवस्था पाहून या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
रॅगिंग केल्याप्रकरणी सहा विद्यार्थ्यांवर कारवाई
रॅगिंग केल्याप्रकरणी सहा विद्यार्थ्यांवर कारवाई
आम्हाला दिल्ली सेंट्रल कमिटी कडून एक ईमेल आला त्यामध्ये लिहिलं होतं की तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये रॅगिंग झाली आहेत्यासंबंधीचा एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी पाठवला ते पाहून आम्ही तपासणी केली आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही कारवाई केलीत्यामध्ये सिनिअर विध्यार्थ्यांना कडून फर्स्ट इयरच्या मुलांची रॅगिंग घेताना दिसून येत आहेत्यावरून आम्ही त्यावर कारवाई केली : डॉ. राज गज���ियेअँटी रॅगिंग कमिटीच्या सूचनेनुसार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
डीपीएस मथुरा रोड येथे अल्पवयीन विद्यार्थ्याने बॉम्बचा खोटा ई-मेल पाठवला
https://bharatlive.news/?p=96049 डीपीएस मथुरा रोड येथे अल्पवयीन विद्यार्थ्याने बॉम्बचा खोटा ई-मेल ...
0 notes
kokannow · 2 years ago
Text
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सुबुद्धी दे!
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सुबुद्धी दे!
कणकवली भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचे सरस्वती देवीला आवाहन छगन भुजबळ यांना सरस्वती देवीचा पाठवला फोटो कणकवली : विद्येची देवता मानली जात असणाऱ्या सरस्वती देवी बद्दल अनुद्गार काढणाऱ्या �� या अनुषंगाने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांना कणकवली भाजपच्या वतीने सरस्वती देवीचा फोटो सरस्वती पूजनाचे औचित्य साधून पोस्टाद्वारे त्यांच्या पत्त्यावर पाठवण्यात आला.…
Tumblr media
View On WordPress
0 notes