#पडून
Explore tagged Tumblr posts
Text
खेळता-खेळता पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
खेळता-खेळता पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
खेळता-खेळता पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात डोंगरगाव येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीत पडून एका दीड वर्षाचा मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रियांशु मेहर असे या चिमुकल्याचे नाव आहे. प्रियांशु घरात खेळता खेळता पाण्याच्या टाकी जवळ कधी गेला हे कोणालाच कळले नाही. पाण्याच्या टाकीत पडल्यावर आजूबाजूस त्याची हाक आणि आरडा-ओरड रडणे…
View On WordPress
0 notes
Text
अल्पवयीन गर्लफ्रेण्डसह अनिकेत पळाला, पोलिसांनी शोधून काढलं, ट्रेनने येताना संशयास्पद मृत्यू
Thane Youth Train Death: भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील मृतक अनिकेत जाधव आणि शहापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होतं. हायलाइट्स: पोलिसांच्या ताब्यात असताना प्रियकराचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन अंमलदार निंलबीत ठाणे शहापूर येथील धक्कादायक घटना Lipiप्रियकर प्रेयसी ताब्यात बॉयफ्रेंडचा मृत्यू ठाणे (शहापूर) : २४…
View On WordPress
#boyfriend dies after falling from train#Boyfriend dies infront of girlfriend#thane crime news#thane police#Washind News#ट्रेनने येताना संशयास्पद मृत्यू#ठाणे क्राइम बातम्या#ठाणे पोलीस#प्रियकर प्रेयसी ताब्यात बॉयफ्रेंडचा मृत्यू#प्रियकराचा रेल्वेतून पडून मृत्यू
0 notes
Text
चित्रपटांविषयी
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्��ार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा ���र्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
याच सुमारास ��ग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहि��े व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्श��ांचे चित्रपट)
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय ��ूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल वि��य हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 04 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये सा�� हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मात्र यापैकी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवारी निवडणूक रिंगणात कायम राहतात, हे आज सायंकाळनंतरच स्पष्ट होईल. राज्यात मराठवाड्यातल्या ४६ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या खालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात ९८, तर बीड विधानसभा मतदार संघात ९० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहिम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येकी सहा, तर शिवडी आणि कुडाळमध्ये प्रत्येकी सात उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांची आज काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचं कन्हेरे यांनी जाहीर केलं.
मराठा आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणताही उमेदवार उभा राहणार नसल्याचं ते म्हणाले. कालपासून झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगें पाटील यांनी आज सकाळी वार्ताहरांशी बोलताना हा निर्णय जाहीर केला.
नागपूर इथं आ�� केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपच्या तीन निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन होणार आहे. यात दक्षिण नागपूर इथं मोहन मते यांच्या, पूर्व नागपूर इथं कृष्णा खोपडे यांच्या आणि मध्य नागपूर मतदारसंघातील प्रवीण दटके यांच्या कार्यालयांचा समावेश आहे. त्यानंतर उमेदवारांसाठी गडकरी यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
महायुतीच्या प्रचाराला कालपासून प्रारंभ झाला. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईत कुर्ला इथं शिवसेना - महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ काल पहिली प्रचार सभा घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांनाही आजपासून प्रारंभ होत आहे. पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी ठाण्यात होणार आहे.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून, ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना, २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.
जळगाव इथं रूशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शहरातल्या चिमुकले श्रीराम मंदिरात १ हजार १५१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर आजपासून १४व्या हॉकी इंडिया ज्येष्ठ पुरूष राष्ट्रीय स्पर्धेला सुरुवात होत आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ३१ संघ आठ गटांमध्ये सहभागी होणार आहेत. सुरूवातीला उत्तर प्रदेशचा सामना केरळ तर कर्नाटकचा सामना उत्तराखंडशी होणार आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी ही माहिती दिली.
परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात चाटोरी परिसरातील नागरिकांनी भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसहित 'कृतज्ञता सोहळा' आयोजित करून दिवाळी साजरी केली. गावातील २५ सैनिकांचा यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह सन्मान करण्यात आला.
दिवाळी सुट्टीसाठी रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी 7435 विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नांदेड येथून प्रवाशांसाठी या विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. रेल्वेच्या या सुविधेबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
हवामान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्यापासून सर्वत्र हवामान सूर्यप्रकाशयुक्त कोरडं राहील.
0 notes
Text
Money in Mind & Mind in Money
तुम्हाला किती पैसे मिळतात,त्यातील किती पैशांची बचत करायची,कुठे किती गुंतवणूक करायची ,भविष्यात किती पैसे लागतील याचा तुम्ही विचार करता का? करत असाल तर अभिनंदन, करत नसाल तर असा विचार करायला सुरुवात करा. असा विचार करून कोणती कृती करायची याची माहिती तुम्हाला त्या विषयातील तज्ञ येथे देत राहतील. मी त्या विषयातील तज्ञ नाही, मी मनातील भावना आणि विचार यांचा अभ्यासक आहे. मनातील भावना कशा निर्माण होतात, त्रासदायक भावना कशा बदलता येतात, भावनांचा आपल्या वागण्यावर कसा परिणाम होतो याची माहिती मी देऊ शकतो. पैसा,धन याविषयी देखील तुमच्या मनात ज्या भावना असतात त्यानुसार तुमचे वागणे होत असते. पैशांची बचत, गुंतवणूक, पैसे कोणत्या गोष्टींसाठी वापरायचे अशा अनेक गोष्टीविषयी प्रत्येकाच्या मनातील भावना वेगळी असू शकते, त्यानुसार प्रायोरिटी, प्राधान्य क्रम बदलतात. तुमचे व्यक्तिमत्व,संस्कार, तुमची आर्थिक धोका पत्करण्याची तयारी, तुम्ही भविष्याचा विचार कसा करता, आणि याविषयीच्या तुमच्या भावना कशा महत्वाच्या असतात याची चर्चा आपण येथे करणार आहोत.
भविष्याचा विचार अवश्य करायला हवा, त्यासाठी आवश्यक बचत आणि गुंतवणूक करायला हवी. पण एखादा माणूस सतत हाच विचार करत राहिला तर तो वर्तमान क्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. असा आनंद घ्यायचा असेल तर विचार करणे आणि मनात आपोआप विचार येणे यातील फरक समजायला हवा.तुम्हाला हा फरक समजतो का? मन विचारात असते त्यावेळी तुम्ही विचार करत असतं किंवा मनात विचार येत असतात. पैशविषयी विचार करायला हवा पण त्याबद्दल आपोआप कोणते विचार मनात अधिक येत राहतात याबद्दल सजगता विकसित करायला हवी. ती काशी विकसित करायची याची माहिती तुम्हाला येथे मिळेल.
पैसे खर्च करून तुम्ही एखादा आनंददायी अनुभव विकत घेतला असेल पण त्यावेळी यासाठी इतका खर्च झाला आहे हाच विचार मनात येत राहिला आणि त्यावर तुम्ही विचार करत राहिलात तर खर्च केलेले पैसे वाया गेलेले असतात कारण असे विचार असताना आनंद अनुभवता येत नाही. भरकटणारे मन आनंदी नसते असे जगभरातील संशोधनात स्पष्ट होत आहेच पण तुम्हीही त्याचा अनुभव घेऊ शकता. कोणताही सुखद अनुभव घेताना लक्ष वर्तमान क्षणात कसे ठेवायचे या विषयी आपण येथे चर्चा करू. मात्र केवळ चर्चा पुरेशी नाही, त्यानुसार तुम्ही लक्ष दे��्याचा सराव करायला हवा.
माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, किंवा मला आत्ता जसे पैसे मिळत आहेत तसे ते भविष्यात मिळतील का असे त्रासदायक विचार बहुसंख्य माणसांच्या मनात येत असतात. मग असे विचार येऊ नयेत म्हणून ड्रिंक, डान्स, सेक्स किंवा मन दुसरीकडे वळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण सतत असे विचारांपासून पळून जाणे योग्य नसते, त्याचे अनेक दुष्परिणाम होत राहतात,मन दुसरीकडे वळवले तरी अबोध मनात ते विचार राहतात. त्यामुळे जाणीव होत नाही, जागृत मनाला समजत नाही असा मानसिक तणाव कायम राहतो. अशा तणावामुळे अनेक शारीरिक आजार होतात. ते कमी करायचे, टाळायचे असतील तर सतत व्यस्त न राहता काहीवेळ काहीही न करता शांत बसायचे. त्यावेळी अज्ञ मनात जे काही आहे त्यानुसार जागृत मनात विचार येतात. या आपोआप येत राहणाऱ्या विचारांच्या आणि भावनांच्या लाटाना सामोरे जाण्याचे कौशल्य विकसित करता येते. हे कौशल्य कसे विकसित करायचे याची माहिती तुम्हाला येथे मिळत राहील.
थोड्या कालावधीत भरपूर पैसे मिळायला हवेत असा विचार बरेच जण करत असतात. आर्थिक फसवणूक याच विचाराला बळी पडून होत असते. असे फसवणूक करणारे एक मोहजाल निर्माण करतात त्यामुळे तार्किक विचार करणारा मेंदूचा भाग काहीकाळ कामच करत नाही.अशा वेळी भावनांची सजगता असेल तर हा लोभ टाळता येतो. एक वर्षात दुप्पट पैसे करून देणारी व्यक्ती खोटे दावे करते आहे,तिने काही वेळा असे पैसे दिले तरीही या व्यवहारात फसवणूक होऊ शकते हा विचार करणे सजगता असेल तरच शक्य होते.अशी भावनांची सजगता कशी विकसित करायची हे आपण येथे पाहू.
अशी फसवणूक होऊ शकते या विचाराने काही माणसे कुठेही गुंतवणूक करायला घाबरतात. काहीजण तर येणाऱ्या पैशांची बचत करणे सोडाच, न आलेला पैसा ही आधीच खर्च करून टाकतात. आज वापरा नंतर पैसे द्या अशा अनेक जाहिराती आपल्याला सतत दिसत असतात. खिशात पैसे नसले तरीही खूप शॉपिंग करता येते. अशी क्रेडिट कार्ड सतत वापरण्याची मानसिकता का निर्माण होते, त्याचे कोणते फायदे आणि तोटे आहेत, समृद्धी वाढवण्यासाठी अशी मानसिकता कशी धोकादायक असते, याचाही विचार आपण येथे करूया. शॉपिंग करणे हे देखील एक व्यसन आहे, ते केले नाही की अस्वस्थ वाटू लागते यामागे मेंदूतील काही रसायने कारणीभूत असतात, त्यावर कसे नियंत्रण ठेवायचे हे देखील तुम्ही समजून घेऊ शकता.
माणसाचा मेंदू आळशी असतो, त्यामुळे तो फास्ट थिंकिंग करतो. त्यानुसार मनात येणाऱ्या विचारांचा प्रभाव माणसाच्या पूर्ण विचार प्रक्रियेवर राहतो. गुंतवणूक करताना कितीही तांत्रिक विश्लेषण केलेले असले तरीही निर्णय घेताना माणसे या फास्ट थिंकिंग नुसारच निर्णय घेतात. या विषयावर अनेक वर्षे संशोधन करून डॉ डनियल केनहमन यांनी थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्यासारखे अनेक जण बिहेवियर इकॉनॉमी म्हणजे आर्थिक व्यवहारांची मानसिकता आणि वर्तन या नवीन विषयात काम करत आहेत. त्यांचे निष्कर्ष आपण येथे सोप्या भाषेत समजून घेऊ, त्यासाठी नियमितपणे येथे भेटत राहू.
#financial planner in pune#financail advisor#financial consultants#certified financial planner#money management
0 notes
Text
पडून उठू शकणे ह्यात भले आहे तुझे
दर्पणाला दर्पण दाखवत आहे मीप्रतिकृती ह्या समाजाची समजावतआहे मी जशी दाखववली जाते तशी मुळीच नाही तीदुनियाचे रंग तुला पण समजावतआहे मी पडून उठू शकणे ह्यात भले आहे तुझेमार्गाशी मैत्री करून घे ��वगत करतआहे मी खोल राहिली आहे जखम भरली जी माझ्या मनातहसून रोजच तीचे ही मनोरंजन करीत आहे मी हे जीवन आहे धावत आहे पळत आहेमाझे मात्र एक जागी बस रोखूनठेवत आहे मी तुटलो आहे अनेकदा पण खंडीतकधी झालो नाहीसूर्याच्या…
0 notes
Text
ढगांची गर्दी
अजूनही बघतो मी आकाशकाळया ढगांनी तिथे गर्दी केली तिरीप सूर्याची होती तिथेकुणास ठाव ती कोणी नेली । आगिसम तापणारा तो सूर्यशोधतो गर्मी त्याची कुठे गेली । गार होऊन तो पहुडला असेलधराही सोबत कशी शांत झाली । रात्रीच पडून गेले चार टपोरे थेंबगंध मातीचा सांगतो तीही ओली ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
गुरुद्वारा चौकातील पादचारी उड्डाणपुल धोकादायक ; खड्डा पडला
नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा चौकात बनविण्यात आलेला दक्षीण ते उत्तर असा पायी उड्डाणपुल आज घडीमध्ये अत्यंत घातक झाला आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने त्या पुलातील पदचारी रस्त्यावर खड्डे पडून लोखंड बाहेर आले आहे. यामुळे काही घातपात झाला तर त्याचा जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुरूद्वारा चौरस्ता येथून दक्षीण-उत्तर हा रस्ता पार करण्यासाठी एक उड्डाणपु�� तयार करण्यात आला. जेणे करून श्री.सचखंड हजुर साहिब आणि गुरूद्वारा लंगर साहिब येथे येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना त्याचा फायदा व्हावा. परंतू ज्यावेळेस हा पुल तयार करण्यात आला. ��्यावेळेस या कामाच्या दर्जावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण शासनाचे काम होते आणि त्याच हिशोबाने ते झाले पण. पण या उड्डाणपुलाचा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी काही एक उपयोग झाला नाही. वर्षभरातून हजारो, लाखोंच्या संख्येत भाविक नांदेडला येतात. बऱ्याच सणांच्यावेळेस हल्ला-महल्ला ही निवडणुक निघते, काही वेळेस नगर किर्तन काढले जाते. त्यावेळी या पुलावर जास्त संख्येत लोकांनी उभे राहु नये म्हणून पोलीसांनाच मेहनत घ्यावी लागते. तरी पण तर काही लोक जातातच. काही वर तर काही पुलाच्या खाली अशा पध्दतीने या पुलाचा उपयोग झाला. जून महिन्यात उसंत घेतलेल्या पावसाने जुलै महिना मात्र धुवून काढला.त्यामुळे सततधार पाऊस आणि कामाचा दर्जा या दोघांची जोड जमली नाही आणि या उड्डाणपुलावर आता खड्डा पडला आहे. सततधार पाऊस कधी थांबेल याचाही काही नेम नाही. म्हणजे पाऊस आणि पुलाच्या कामाचा दर्जा याला जोडून विचार केला तर भविष्यात या पुलामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोणाचा घात पातपण होवू शकतो अशा प्रकारचे अनेक पुल खाली पडले आणि त्यामुळे लोकांना आपले जीव गमवावे लागले अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर असतांना आता तरी प्रशासनाने हा पुल काढून घ्यावा आणि लोकांना भविष्यातील अपघातापासून वाचवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Read the full article
0 notes
Text
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू बीड शहरात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरक्शा रईसोद्दीन कुरेशी असे या मयत चिमुकलीचे नाव आहे. दरक्शा खेळता खेळता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडली. बीडच्या झमझम कॉलनी येथे रईसोद्दीन कुरेशी यांची मुलगी दरक्शा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खेळता खेळता पडली आणि तिचा मृत्यू…
View On WordPress
0 notes
Text
भरधाव वाहनाच्या धडकेत अभियांत्रिकीचा विद्यार्थी ठार, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको..
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : शहरात शिक्षणासाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्याचा एका वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील संदीप फाउंडेशनसमोर हा अपघात झाला. वेलपुला पुरनावमशी वेलपुला आनंद (वय २२, रा. चिंतल, आंध्र पदेश) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलपुला हा संदीप फाउंडेशन संकुलाच्या गेट नं. २ ने बाहेर पडून रस्त्याच्या पलीकडे…
View On WordPress
#engineering student died#nashik police news#nashik road accident#Nashik Road Accident Cases#road accident news#Student Protest#त्र्यंबक पोलिस ठाणे#नाशिक अपघात#नाशिकरोड#संदीप फाउंडेशन संकुल
0 notes
Text
सरांडी येथे विहिरीत विजेचा शॉक लागून चार जणांचा मृत्यू, पाचवा व्यक्ती कसा वाचला?
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्य विधानसभा निवडणुकीतले उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. येत्या २० तारखेला २८८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात नऊ मतदार संघासाठी ४३७ उमेदवारांपैकी ३९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. जालना जिल्ह्यात २९६, बीड जिल्ह्यात ३७७, परभणी जिल्ह्यात दी़डशे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. लातूर जिल्ह्यात १९३, धाराशीव जिल्ह्यात १६४ उमेदरावांचे अर्ज वैध ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात १८७ तर नांदेड जिल्ह्यात ४६० उमेदवारी अर्ज पात्र ठरले.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे ३६ तर महाविकास आघाडीचे २६ उमेदवार बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. महायुतीच्या मोर्शी, आष्टी, श्रीरामपूर, दिंडोरी, देवळाली, अणूशक्तीनगर, मानखुर्द इथल्या उमेदवारांनी परस्परांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीत परंडा, पंढरपूर, दिग्रस, धारावी, मानखुर्द, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि लोहा या आठ जागांवर परस्परांविरोधात उमेदवार उभे आहेत. त्यामुळे, उद्या ��ोमवारी अर्ज मागं घेण्यात आल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या या पत्रात म्हटलं आहे.
भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचे अपेक्षित परिणाम होत असून देशाची संरक्षण निर्यात २०२९-३० पर्यंत ५० हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पासष्ठाव्या स्थापना दिवस समारंभात काल त्यांनी ही माहिती दिली. विकसित भारत हा दृष्टिकोन साकार करण्यासाठी देशात आयात होणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाचा स्वदेशात विकास करण्याचं आवाहन संरक्षणमंत्र्यानी भारतीय तरुणांना यावेळी केलं. आयआयटी कानपूरसारख्या संस्था शैक्षणिक इंजिनं असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात ती भारताला गतिशीलता प्रदान करू शकतात असं राजनाथ सिंह म्हणाले.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुंबईत सुरू तिसरा कसोटी क्रिकेट सामना आज तिसऱ्या दिवशी अतिशय रंगतदार अवस्थ आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा भारतानं १४७ धावांचं लक्ष्य असताना सात बाद १२० धावा केल्या आहेत. ऋषभ पंतनं यात ६४ धावा केल्या आहेत. झीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवर बाद झाला. भारतानं पहिल्या डावात २६३ तर न्यूझीलंडनं २३५ धावा केल्या आहेत. तीन कसोटी सामन्यांची ही मालिका न्यूझीलंडनं या पूर्वीच दोन-शून्य अशी जिंकली आहे.
लद्दाखमध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप - एनएलएसटी उभारण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पाचं नेतृत्व बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स - आयआयए चे संचालक प्राध्यापक अन्नपूर्णी सुब्रमण्यम करत आहेत. सूर्यावरील वैज्ञानिक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठीच्या या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली असून हा प्रकल्प अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आयआयए नुसार, या दुर्बिणीमध्ये दोन मीटरचे प्रतिक्षेपक बसवलेले असतील. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्यावर होत असलेल्या हालचाली समजून घेण्यास आणि संशोधन करण्यास म���त होईल.
दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला आज २० वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी पूर्वीची डीडी-मेट्रो ही वाहिनी अहोरात्र वृत्त वाहिनीमध्ये रुपां��रित करण्यात आली होती. दूरदर्शनच्या ३१ प्रादेशिक वृत्त वाहिन्या असून समाज माध्यमांवरही डीडी न्यूज अतिशय प्रभावीपणे सक्रिय आहे.
श्रीनगरमधील खानयार भागात सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींत तीन दहशतवाद्यांना ठार केलं. सुरक्षा दलांनी काल लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उस्मान याला एका चकमकीत ठार केलं आहे.
0 notes
Text
धुळे शहरात मुसळधार पाऊस; झाडे पडून चारचाकी गाडीचे नुकसान
: धुळ्यात सकाळपासून ढगाळ वातावरण झाले आहे. यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. धुळे शहरात अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले होते. आज अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरात गारवा…
View On WordPress
0 notes
Text
Psalms 41 3. The LORD will strengthen him upon the bed of languishing: thou wilt make all his bed in his sickness. तो माणूस जेव्हा आजारी पडून अंथरुणावर असेल तेव्हा परमेश्वर त्याला शक्ती देईल. तो आजारात अंथरुणावर पडला तरी परमेश्वर त्याला बरे करील.
0 notes
Text
धूम मेट 8.0
साधारण दीड एक तास झाला असेल, गाडी थांबली आणि तो लगेच जागा झाला. ” कुठंल स्टेशन .. ? ” सूरज” नाशिक आलय वाटत.” रोशनी” अच्छा … थांब उठून गोदामातेच्या त्रंबकेश्वराच्या पाया पडून घेतो. जायला कधी वेळ तर मिळत नाही. ” तो उठतच म्हणाला. ” हो..! तिला त्याच्या बोलण्यावर खूप हसायला येत होत. आजही त्याच्यातलं लहान मुलं जिवंत होत. नाहीतर मूल मोठी झाली कि त्यांच्यातला गोंडस पणा – सालस पणा कालांतराने हरवून…
View On WordPress
0 notes