Tumgik
#नागपूर महानगरपालिका
airnews-arngbad · 5 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
ग्रीन फ्युचर आणि नेट झीरो अर्थात हिरवं भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. री इन्व्हेस्ट २०२४ या जागतिक नवीकरणीय उर्जा गुंतवणुकदार संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज गुजरातच्या गांधीनगर इथं बोलत होते. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर झालेल्या पॅरिस कराराचं लक्ष्य भारतानं ठरलेल्या कालमर्यादेच्या आधी नऊ वर्ष पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजनच्या क्षेत्रात जगात सर्वात पुढे राहण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. या संमेलनात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि नॉर्वे या देशांसह जगभरातल्या अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून, भुज ते अहमदाबाद या देशातल्या पहिल्या वंदे भारत मेट्रोला ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आठ हजार रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते होत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान राज्यातल्या तीन नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करणार आहेत. यामध्ये पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
****
देशभरात आज ईद - ए - मिलाद - उन - नबी उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं, त्यांनी समाजात दया, मानवतेचा प्रसार केला असं सांगून राष्ट्रपतींनी मुस्लीम समुदायाला पवित्र कुराणातली शिकवण आत्मसात करण्याचं आवाहन केलं.
देशातला सद्भाव आणि एकजूट नेहमी कायम रहावी आणि सर्वत्र आनंद आणि समृद्धी नांदावी, अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही ईद निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला हा सण त्यांच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण करुन देतो, असं राज्यपालांनी आपल्या  याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, ईद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी आज, तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
****
आज आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस पाळला जात आहे. पृथ्वीभोवती असलेल्या ओझोन वायुच्या मुलायम कवचामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पृथ्वीचं आणि तिच्यावरच्या सजीवसृष्टीचं रक्षण होतं. मानव वापरत असलेल्या अनेक रासायनिक पदार्थांमुळे ओझोन थराचं अत्यंत नुकसान होतं, असं मानलं जातं. माँट्रियल प्रोटोकॉल-वातावरण संरक्षणासाठी पुढे पडणारी पावलं, हा या वर्षीच्या या दिनाचा विषय आहे.
****
स्पर्धा परिक्षांना होणारा विलंब आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष यातून मार्ग काढणं अत्यावश्यक असल्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ मागितला आहे. एका पत्रातून पवार यांनी ही मागणी केली आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिल्याची माहिती पवार यांनी आपल्या समाजमाध्यमावरुन दिली आहे.
****
दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची उद्या सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातील विविध विसर्जन विहिरी आणि कृत्रिम तलावांची पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला.
लातूर इथं गणपती विसर्जनाच्या अनुषंगानं, जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षीततेच्या दृष्टीनं शहरातल्या विसर्जन मार्गावर वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे.
****
उद्या साजरा होणार्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधून 'मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा ७५ मिनिटांचा नाट्य माहितीपट आज सह्याद्री वाहिनीवर दुपारी २ वाजता प्रसारीत होणार आहे.
****
0 notes
mhlivenews · 2 years
Text
विभाजन विभीषिका दिनामुळे देशाच्या अखंडत���चे महत्त्व समजेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विभाजन विभीषिका दिनामुळे देशाच्या अखंडतेचे महत्त्व समजेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 14: भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जात असतानाच 75 वर्षापूर्वी देशाच्या विभाजनामुळे झालेल्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट हा दिवस देशात विभाजन विभीषिका दिन म्हणून पाळला जात असून या माध्यमातून देशाच्या अखंडतेचे महत्त्व आपल्याला समजेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. नागपूर महानगरपालिका, अखिल भारतीय सिंधी समाज व…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
विभाजन विभीषिका दिनामुळे देशाच्या अखंडतेचे महत्त्व समजेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विभाजन विभीषिका दिनामुळे देशाच्या अखंडतेचे महत्त्व समजेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 14: भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जात असतानाच 75 वर्षापूर्वी देशाच्या विभाजनामुळे झालेल्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट हा दिवस देशात विभाजन विभीषिका दिन म्हणून पाळला जात असून या माध्यमातून देशाच्या अखंडतेचे महत्त्व आपल्याला समजेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. नागपूर महानगरपालिका, अखिल भारतीय सिंधी समाज व…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Nagpur OBC : नागपुरात भाजपकडून ओबीसी उमेदवारांची चाचपणी, 30 पेक्षा जास्त जागा ओबीसींसाठी राखीव
Nagpur OBC : नागपुरात भाजपकडून ओबीसी उमेदवारांची चाचपणी, 30 पेक्षा जास्त जागा ओबीसींसाठी राखीव
Nagpur OBC : नागपुरात भाजपकडून ओबीसी उमेदवारांची चाचपणी, 30 पेक्षा जास्त जागा ओबीसींसाठी राखीव नागपूर महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार कसे निवडून येतील? याची रणनीती भाजपकडून आखली जात आहेत, अशी माहिती भाजपचे अविनाश ठाकरे यांनी दिली. नागपूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलीय. नागपूर शहरात 30 पेक्षा जास्त जागा ओबीसींसाठी राखीव (OBC Reservation)…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी
मुंबई, दि. 16 : बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
Covid Victims : सेतू केंद्रावर अर्ज करा, पैसे ऑनलाईन खात्यात जमा होईल – विभागीय आयुक्त
#Covid Victims : सेतू केंद्रावर अर्ज करा, पैसे ऑनलाईन खात्यात जमा होईल – विभागीय आयुक्त #Nagpur #Covid19 #CovidVictims #Maharashtra
Covid Victims : नागपूर दि. 8 : कोरोना महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बाधिताच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह निधी देण्याच्या शासनाच्या निर्णयाची उदयापासून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा व महानगरपालिका यंत्रणेला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी आज एका उच्चस्तरीय बैठकीत दिले. नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करावे. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांनी सेतू केंद्राची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
makrandsaraf · 4 years
Photo
Tumblr media
सनातन संस्थांचे खूप खूप आभार. आमचा देव आहे .... तो काही पळून गेला नाही..... तो कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन सर्वांची मदत करतो हे दाखवून दिले. धन्यवाद नागपूर महानगरपालिका. धन्यवाद..... आदरणीय फडणवीसजी... तुमच्या शिवाय शक्य नाही. https://www.instagram.com/p/CAIb7LFjCmfwVa_Ta2rdLp-wzWzO37746YDCGg0/?igshid=1qpa9izd3muqy
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी दोन हजार ७६६ कोटी रुपयांच्या कामांना सरकारची मंजूरी
मराठवाडा आणि विदर्भातल्या सर्व १९ जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
देशासह राज्यात हर घर तिरंगा अभियानाला उत्साहात सुरुवात
आणि
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे पुरस्कार जाहीर तर, साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या कवी नर्मद पुरस्काराचे मानकरी
****
देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता राष्ट्रपतींचं हे भाषण आकाशवाणीवरून प्रसारित होईल. यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज सायंकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी प्रसारित केलं जाणार आहे. राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री साडे नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे.
****
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी दोन हजार ७६६ कोटी रुपयांच्या सुमारे दोन हजार कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. काल झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ही मंजुरी देतानाच, या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यावेळी आपत्ती विषयक विविध आराखड्यांना देखीलमंजुरी देण्यात आली.
****
पशुपालन आणि दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व १९ जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या प्रकल्पासाठी १४९ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.
यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील करणं, शासकीय तसंच खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापकांना ठोक मानधन देणं, मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करणं, तसंच नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ३६ हजार ९६४ कोटी खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल जळगाव इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातल्या विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानाला कालपासून प्रारंभ झाला.
मुंबई महानगरपालिकेत प्रभाग स्तरावर ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. महानगरपालिका मुख्यालय ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत निघालेल्या तिरंगा यात्रेत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सहभागी झाले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही ठिकठिकाणच्या तिरंगा यात्रांमध्ये सहभाग नोंदवला. नागपूर इथं काल घेतलेल्या तिरंगा मॅरेथॉनमध्ये नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथंही काल महानगरपालिकेच्या वतीनं तिरंगा यात्रा कढण्यात आली. शहरातल्या क्रांती चौक ते संत एकनाथ रंगमंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सैनिकी गणवेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. वेरूळ इथं काल शालेय विद्यार्थ्यांनी शंभर फूट लांबीच्या तिरंग्यासह प्रभातफेरी काढली.
****
हर घर तिरंगा अभियानांतर्गत काल लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वज फडकावून या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर काल तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.
हिंगोली इथं नगर परिषदेचे मुख्यधिकारी अरविंद मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'तिरंगा यात्रा' काढण्यात आली. विविध कार्यालयातले अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचं वितरणही करण्यात आलं.
मराठवाडा विभागातल्या हर घर तिरंगा मोहिमेविषयीची माहिती श्रोत्यांना आज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी आकाशवाणीवरच्या प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकता येईल.
****
देशाच्या स्वातंत्र्य दिनी नवी दिल्ली इथं मुख्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या ढासला ग्रामपंचायतीचे सरपंच राम पाटील आणि त्यांच्या पत्नी वर्षाराणी पाटील यांना, तसंच परतूर तालुक्यातले रमेश भापकर आणि त्यांच्या पत्नी पूजा भापकर या दाम्पत्यांना निमंत्रण मिळालं आहे. राम पाटील यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...
मला जवळपास १४ वर्ष याठिकाणी होत आहेत, मी तिथं जास्तीत जास्त शासनाच्या योजना असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, सार्वजनिक लाभाच्या योजना असतील, प्रत्येक योजनेचा लाभ दिला. किंवा प्रत्येक लाभ घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या कामाची दखल घेत माझी याठिकाणी निवड करण्यात आली.
****
निवासी डॉक्टरांची संघटना - एफ ओ आर डी ए नं पुकारलेलं देशव्यापी आंदोलन काल मागे घेतलं. कोलकाता इथं एका निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काल देशभरात ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं. संघटनेच्या प्रतिनिधींनी काल नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
मुंबईतल्या विविध रुग्णालयांमधल्या निवासी डॉक्टरांनी काल आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीमधल्या निवासी डॉक्टरांनी मेणबत्ती मोर्चा काढून निषेध नोंदवला.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या या वर्षीच्या विविध पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, तर आरती अंकलीकर-टिकेकर यांना भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यासह विविध सहा जीवनगौरव पुरस्कार तसंच १२ गटांत सांस्कृतिक पुरस्कार काल जाहीर करण्यात आले.
राज्य गुजराती साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना जाहीर झाला आहे. येत्या २४ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात २०२३-२४ च्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या उर्वरित २२ कोटी तीन लाख रुपयांचं वितरण विमा कंपनीने कोणतंही कारण न देता ३१ ऑगस्टच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या वर्षासाठी एकूण ४०० कोटी २४ लाख रुपये पीकविमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ३७८ कोटी २१ लाख रुपयांचं वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आलं आहे.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना काल संध्याकाळी हवाई रुग्णवाहिकेतून हैदराबाद इथं हलवण्यात आलं. त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आल्यानं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. काल त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसंच त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी शहरापासून जवळच असलेल्या सुकापुर वाडी गावाला रस्ता नसल्यानं इथल्या नागरिकांनी काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या दालनात विद्यार्थ्यांसह शाळा भरवली. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नसल्याचा पवित्रा या सर्वांनी घेतल्यानं, काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ५० लाख ८२ हजार रुपये किमतीचा गुटख्यासह एकूण ७० लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल काल जप्त केला. बीडहून निघालेला हा ट्रक जालना-अंबड मार्गावरील लालवाडी शिवाराततून जालन्याकडे येत असताना पोलिसांनी ही कारवाई करत, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
****
विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी काल लातूर इथं मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, गृहरक्षक दल, अग्निशमन दल तसेच जिल्हा शोध आणि बचाव पथकातल्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.
****
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा १२ वा स्मृतीदिन आज पाळण्यात येत आहे. यानिमित्तानं विविध वैद्यकीय संघटना आणि विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
marathinewslive · 3 years
Text
राज्यातल्या 'या' महापालिकेची आर्थिक स्थिती गंभीर, तब्बल ८ हजार कर्मचारी वेतनाविना
राज्यातल्या ‘या’ महापालिकेची आर्थिक स्थिती गंभीर, तब्बल ८ हजार कर्मचारी वेतनाविना
नागपूर : स्टेशनरी घोटाळा, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती यांमुळे नागपूर महापालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, जानेवारीचे तेरा दिवस होऊनही सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. सर्वसाधारणपणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते. मात्र, यंदा अर्धा महिना होऊनही ते झालेले नाही. सेवानिवृत्तांचे पेन्शनही झाले नसल्याने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vicharbhaskar · 5 years
Text
सरकार कोणतेही असो ,उपायांची अंमलबजावणी करण्यातच महाराष्ट्राचे हित
          सरकार कोणतेही असो ,उपायांची अंमलबजावणी करण्यातच महाराष्ट्राचे हित
         महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून आजतागायत न सुटलेल्या प्रश्नांचे आव्हान सर्व पक्षांसमोर उभे आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असोत , पुढील गोष्टींची पूर्तता झाली तरच महाराष्ट्राचे भविष्य उजळणार आहे. महाराष्ट्राचा कायापालट घडवून आणणाऱ्या या गोष्टींची अंमलबजावणी करण्यातच महाराष्ट्राचे हीत आहे.
१ . सरकारी प्रशासकीय कार्यालये वेगवान करायला हवीत. प्रशासनामधील शिथिलता चीड आणणारी आहे , पैसे देऊनही जनतेची कामे होत नाहीत ही वास्तवता आहे.
२ . आरटीओ , चॅरिटी कमिशन , बंद पडलेली महामंडळे , न्यायालयीन गलथान प्रशासकीय व्यवस्था यांना नवे स्वरूप देऊन अधिक गतिमान करावे लागतील.
३ . खोट्या जाहिराती देऊन प्रसार माध्यमामार्फत करोडो रुपयाची लूटमार करणाऱ्या जाहिराती सरकारने तपासणीसाठी नवी व्यवस्था करावी लागेल व controller of advertisement यांची नेमणूक करावी लागणार आहे किंवा स्वतंत्र खाते काढावे लागणार आहे.
४ . शिक्षणसम्राटांच्या मनाला येईल तेवढ्या देणग्या घेण्याच्या प्रवृत्तीला आळा घालावा लागेल . शिक्षणसम्राटांना दिलेल्या सवलती व त्यांनी केलेल्या अफाट नाफाखोरीला लगाम घालून योग्य त्या विद्याथ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यायला हवे. शिक्षणसम्राटांच्या मक्तेदारीमुळे शिक्षण सर्वसामान्य माणसांच्या कुवतीच्या पलीकडे गेले आहे. शिक्षणसम्राटांची मक्तेदारी संपवायला हवी.
५ . महाराष्ट्रातील अनेक देवालयांमध्ये प्रचंड दानधर्म होऊन संपत्ती निर्माण होते . ती संपत्ती त्या तीर्थक्षेत्र विकासासाठी वापरून उत्पन्न सत्कारणी कसे लागेल यावर खास उपाय शोधून काढावेत.
 ६ . वकील , डॉक्टर , आर्किटेक्ट , इंजिनिअर , आर्थिक व इतर सहकार , सी. एई. मंडळी महाराष्ट्रामध्ये करोडो रुपयांची फी वसूल करून टॅक्स भरत नाहीत व साध्या पावत्या ही देत नाहीत यावर नियंत्रण करता आले तर करोडो रुपयांचा निधी सरकारी तिजोरीत जमा होऊ शकतो.
 ७ . न्यायालयीन दिरंगाईबाबत ठोस निर्णय घ्यायला लागतील . समाजाचा फुकट वेळ खाणारा , करोडो रुपयांचा ( पेप - productive ) खर्च करायला लावणाऱ्या तारीख पे तारीख म्हणत सामान्य नागरिकांचा खिसा खाली करणारा जीवघेणा प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबित आहे . वर्षानुवर्ष कोर्टाचे हेलपाटे घालणाऱ्या जनतेला जराही दिलासा केंद्रसरकारला व राज्यसरकारलाही आजतागायत देता आला नाही . त्यामुळे वकील सामान्य जनतेची कायदेशीर लूट करीत आहेत व हे मुकाटपणे सोसण्याऐवजी कोणताही पर्याय सामान्य जनतेपुढे नाही.
८ . सरकारी कार्यालये , निमसरकारी कार्यालये , महामंडळे , न्यायालये येथील प्रशासनासाठी संगणकाचा वापर अद्याप सुरू झालेला नाही तो सुरु करायला हवा.
९ . ग्रामपंचायतीपासून ते मेट्रोसिटी पर्यंत बांधकामाच्या परवानग्या सुलभ करून मर्यादित कालावधीत मंजूर करण्याची सक्ती करणे आवश्यक म्हणजे अनधिकृत बांधकामे होणार नाही.
 १० . क्रिकेटवर सर्रास चाललेले अब्जावधी रुपयांचे सट्टे कसे थांबवणार , त्याऐवजी सट्टे बाजारांना रीतसर मंजुरी देऊन उत्पादन का वाढवू नये. यावर विचार करावा.
११ . नको असलेली महामंडळे तात्काळ बंद करायला हवीत. व ज्या त्या खात्यातील मंत्र्यांना ही महामंडळे चालवावी लागतील अशी व्यवस्था करायला हवी.
१२ . कोणत्याही राज्यापेक्षा ज्यादा काळा पैसा हा महाराष्ट्रात विशेषतः पुणे , मुंबई , नागपूरमध्ये आहे , किंबहुना परदेशी पैसा एवढा काळा पैसा महाराष्ट्रात आहे . राजकीय , पुढारी सरकारी , नोकर व्यापारी , बिल्डर , डेव्हलपर , जमीन माफिया , वाळू माफिया , तेल माफिया , अंमलीपदार्थ विकणारे , चोरटी आयात करणारे , एक्ससाईज सेल्सटॅक्स , इनकमटॅक्स बुडवणारे लोक शोधून त्याच्याकडील काळा पैसा मूलभूत सुविधा सोडवण्याकरता कसा वळवता येईल यावर सखोल विचार करावा व निर्णय घ्यावेत. साखर सम्राट , शिक्षण सम्राट , बिल्डर्स , कंत्राटदार मोठे मोठे कारखानदार यांच्याकडे ही मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे , त्याचाही उपयोग सदर सामाजिक कार्याकरता कसा कर��ा येईल याचा नावीन्यपूर्ण विचार जनतेसमोर मांडावा.
१३ . महाराष्ट्रीयन जनतेमध्ये सामाजिक बेशिस्तता मोठ्या प्रमाणात आहेत. त्यासाठी कडक कायदे व दंडात्मक कारवाई करावी. उदा. रस्त्यावर धुंकणे , लघवी करणे , शौचास बसणे , सिगारेट ओढणे , नाक शिंकरणे अशा गोष्टींसाठी जबर दंड वसूल करावा.
१४ . महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटंबांना तसेच दुष्काळी तालुक्यांना कार्पोरेट सेक्टरमधील कंपन्यांनी दत्तक घ्यावे. सरकारी योजनेंतर्गतचा पैसा कार्पोरेट सेक्टरमार्फत खर्च करावा , तो पैसा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वापरला जावा , म्हणजे  भ्रष्ट्राचाराचा प्रश्न येणार नाही ,
 १५ . पाण्याचा गैरवापर हा दखलपात्र गुन्हा करावा व त्यासाठी जलनीती कायदा करायला हवा.
१६ . कोणत्याही प्रगतिशील देशाची प्रगती झपाट्याने व्हावी अशी अपेक्षा असेल तर सिमेंट , वीजनिर्मिती , रस्ते या तिन्ही गोष्टींची सर्वात मोठी गरज असते . या तिन्ही गोष्टींचे नीट नियोजन झाल्यास महागाई थांबेल , उत्पादनात वाढ होईल.
१७ . वास्तविक भारतास फार मोठा समुद्रकिनारा आहे. त्यात तेलही मिळत आहे . अरब राष्ट्रांनी अडविण्यापूर्वी तेलासाठी खणणे चालू केले असते व नैसर्गिक संपत्तीचा शोध , व्यवस्थित वापर , जपवणूक केली असती तर आज पेट्रोलजन्य वस्तू , खते महागली नसती.
१८ . आज मोठ्या प्रमाणावर जंगले आणि झाडे तोडली जात आहेत , कोळसा भरपूर वापरला जात आहे. त्याचे नियोजन व्यवस्थित झाले नाही तर आजची औष्णिक केन्द्रे २५ वर्षांनी बंद पडली तर दोष कोणाला द्यायचा ? त्यासाठी नवीन कोळसा खाणीही पाहणे जरूरीचे आहे.
१९ . शिक्षणाच्या बाबतीतही केवळ पदवीधरांची बेरोजगार फौज वाढवण्याऐवजी वास्तविक ज्यायोगे नोकऱ्या मिळणे शक्य आहे अशा कोर्सेसची संख्या वाढवली तर सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न निकाली लागण्यास मदत होईल.
 २० . शहर वाढीसाठी अत्यावश्यक अशा मूलभूत सुविधा उदा . पाणी , ड्रेनेज , कचरा निर्मुलन , विद्युत निर्मिती , वाहतूक असे अनेक प्रश्न विचारात न घेता दिल्या गेलेल्या बांधकाम परवानग्या याचा विचार होणे आवश्यक आहे.
२१ . अमेरिकेमध्ये वृध्द , अपंग यांना खास वागणूक दिली जाते. आजारपणामध्ये , अपघातामध्ये तातडीची सेवा उपलब्ध असते तशी तातडीची सेवा आपल्याकडे उपलब्ध नाही. पैशाच्या मागे लागलेल्या तरुण पिढीने सर्वच अर्थाने वृद्धांना निराधार केले आहे. पुष्कळ वृद्धांच्याकडे पैसा असूनही सुख नाही , अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वृद्धांची समस्या अधिक गंभीर बनत चाललेली आहे. वृध्दांच्या शारिरीक व मानसिक सुरक्षिततेसाठी सेवा उपलब्ध करणे गरजेचे आहे .
 २२ . आज दवाखाने हे कत्तलखाने झाले आहेत , तेथे पैशाची अक्षरशः लूटमार चालू आहे. सर्वांच्या फी ला कुठलाही मापदंड नाही. ऑपरेशनला हो कुठलाही मापदंड नाही , याशिवाय अमाप खोली भाडे घेऊनही उत्तम सेवा उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे . यावर कडक कायदे झाले पाहिजेत.
२३ . नियोजनबद्ध शहरवाढ न झाल्यामुळे रस्ते अरुंद राहिले , वाहतूक वाढली यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला . सार्वजनिक वाहतूक अतिशय चांगली असणे आवश्यक आहे.
२४ . शहारातील घरांचा प्रश्न सुटत नाही , घरांच्या किंमती जनतेच्या आवाक्यात येत नाही. बिल्डर्सने कुवतीपेक्षा अनेक पट जमिनी घेऊन ठेवल्या आहेत व त्या वर्षानुवर्ष पडून आहेत. त्यांना कालबद्ध कार्यक्रम देऊन गृह निर्माणाला वेग आणता येईल. मुदतीत काम करणाऱ्या बिल्डर्सला प्रोत्साहन द्यावे. किंवा त्या अतिरिक्त जमिनी परत घेऊन घराचा प्रश्न सोडवता येईल. समाविष्ट गावामध्ये संपूर्ण मूलभूत सुविधा असलेले विकसित भूखंड तयार करून कालबद्ध विकास साधणे शक्य आहे.
२५ . मुंबई , ठाणे , मुंब्रा , कल्याण , पुणे व इतर ( नाशिक , नागपूर , कोल्हापूर , सोलापूर ) अशा महत्त्वाच्या शहरात अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत व ती बांधकामे कित्येक वर्ष वापरातही आहेत . अशा बांधकाम करणाऱ्या बिल्डर , आर्किटेक्ट , स्टक्चरल इंजिनिअर व परवानगी देणारे अधिकारी या सर्वांना जबरदस्त दंड बसवून ती रक्कम राज्यामध्ये विकासासाठी वापरता येईल किंवा झोपडपट्टी निर्मुलनासाठी वापरता येईल. बिगर परवाना सदनिकेत राहणाऱ्या रहिवाश्यांनासुद्धा पाणीपट्टी व घरपट्टी दुप्पट किंवा तिप्पट लावून पाच वर्ष दंडात्मक कारवाई करावी म्हणजे यापुढे कोणीही अनधिकृत बांधकामात राहण्यास धजावणार नाहीत. अनधिकृत बांधकामाचे मुख्य कारण बेकायदेशीर बांधकाम परवानग्या हे आहे तेव्हा ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत बांधकाम परवानग्या सोप्या कशा होतील व वेळेत बांधकाम परवाने कशी होतील यावर विचार करावा लागणार आहे.
२६ . ग्रामपंचायतीपासून ते कार्पोरेशन लेव्हलपर्यंत बांधकामाची क्लिष्ट परवाना पद्धत तसेच अर्बन सीलिंगमुळे गृहनिर्माण व्यवसाय सोपा होण्याऐवजी अधिक क्लिष्ट झाला , त्यामुळे बेकायदा बांधकामाचा ब्रम्हराक्षस आज उभा राहिला आहे.
२७ . ज्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातील न वापरलेल्या जमिनी परत घेण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे , त्याबरहुकूम बिल्डर्सकडे पडलेल्या अगणित जमिनी वेळेत बांधकाम केले नसल्यास सिलिंगमधून मुक्त केल्याची कारवाई रद्दबातल करावी व बिल्डर्सनी सुरू केलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची बंधने त्यांच्यावर घालावीत तसेच अनेक आमिषे दाखवून जाहिरात केलेल्या सुखसोयी या प्रकल्पाच्या अगोदर , किमान बरोबर सुरु करण्याचा आग्रह सरकारने धरला पाहिजे असे मला वाटते . बांधकाम परवानग्या गतिमान करायला हवेत.
२८ . अनधिकृत बांधकामाबाबत ठोस निर्णय घ्यायला हव्यात. मुंबईतील १५ , ००० पडायला आलेल्या चाळी तातडीने स्थलांतरित करायला हव्यात.
२९ . मोठी शहरे बकाल होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मोठी शहरे विस्तारीत करण्यापेक्षा नव्या स्मार्ट सिटीज डेव्हलप करायला हव्यात. तसेच नवीन छोटी छोटी शहरे डेव्हलप करायला हवीत. अवाढव्य महानगरपालिका निर्माण करण्याऐवजी छोट्या छोट्या शहरपालिका तयार करून स्पर्धात्मकरित्या उत्तम शहरपालिका तयार केल्या असत्या , पण ते न करता केवळ कार्पोरेशन हद्दीचा पसारा वाढविणे म्हणजे विकास करणे असा चुकीचा समज करून घेऊन राजकर्त्यांनी स्वतःची व जनतेची प्रचंड फसवणूक केलेली आहे . याचे उत्तम उदाहरण पुणे महानगरपालिका , ठाणे , मुंबई , मुंबरा नगरपालिका व नुकतीच विकसित केलेली नवी मुंबई.
३० . महाराष्ट्रातील बेस्ट लेड कार्पोरेशनची जमीन , रेल्वेची जमिन , कॅनोल च्या बाजूची कमांड एरिया ची जमीन , बायोडीजेल करता दिलेली - जमीन , पवनऊर्जेसाठी दिलेली जमीन परत ताब्यात घ्या व तेथे जंगले निर्माण करा .
३१ . उद्योगाइतकेच किंवा त्यापेक्षा जास्त महत्व कृषिक्षेत्राला द्यायला हवी , पाण्याच्या समतोल वाटपासाठी व वापरासाठी अत्यंत मर्यादित ऊस शेती करायला हवी. जिरायत असो की बागायत असो , शेतीला १०० टक्के अनुदानाने ठिंबक सिंचन उपलब्ध करून घ्यायला हवेत .
३२ . आजारी व बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागी कुशल कामगार निर्मितीची विद्यापीठे , महाविद्यालये किंवा माध्यमिक शाळा सुरू कराव्या लागणार आहेत. तसेच उसाशिवाय इतर कृषी मालाचे इतर प्रक्रिया उद्याग सुरु करावे लागतील.
३३ . दुष्काळी ग्रामीण भागात उदयोग निर्मितीसाठी परदेशी कंपन्यांना १०० टक्के अन���दान देऊन निमंत्रित करायला हवेत.
३४ . कृषिमाल साठविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षमतेएवढ्या खाजगी वा सामुदायिक शीतगृहाची व साध्या गोदामांची भरपूर अनुदान देवून निर्मिती करावी लागेल तसेच ही गोदामे व शीतगृहे झटपट व स्वस्त कशी होती यासाठी संशोधन केंद्र काढावी लागणार आहेत  
३५ . कृषिमाल उत्पादनांपैकी केवळ साठवण नसल्यामुळे ४० % कृषीमाल हा वाया जातो , त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतापासून ते थेट मेट्रो सिटीपर्यंत शीतगृहांची साखळी होणे अत्यंत आवश्यक आहे .
३६ . अपुऱ्या पाटबंधारे योजना ( कालव्यासह ) चे काम खाजगी पैशातून पूर्ण करावे लागणार आहेत.
३७ . नद्या , नाले , कालवे यांच्या वरून प्रवाहाला समांतर असे फ्लायओव्हर बांधून वाहतुकीचा प्रश्न सोडवायला हवा . जंगलांच्या वाढीसाठी टेकडी धरणाची कल्पना प्रत्यक्षात उतरवायला हवी.  
३८ . पाण्याची उपलब्धता , पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी किमान समान पाणी वाटप , यासंबंधी ठोस आणि कडक पावले उचलायला हवीत .
३९ . अपूर्ण योजनांसाठी भांडवलाची तरतूद , शक्यतो नव्या पाटबंधारे योजनांचे खाजगीकरण करणे आवश्यक आहे ,
४० . हायड्रोपॉवर ही सर्वात स्वस्त असल्यामुळे महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या धरणावर व धबधब्यावर जेथे मिळतील तेथे नैसर्गिक अथवा कृत्रिम धबधबे निर्माण करून स्वस्त वीज निर्माण करणे शक्य आहे.
४१ . औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी योग्य ते इंधन निर्माण करण्यासाठी इंधन निर्मितीचे संशोधन करणे आवश्यक आहे .
४२ . पवन ऊर्जा व सौर ऊर्जेला चालना देताना निरनिराळ्या तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अभूतपूर्व सवलती द्यायला हव्यात.
४३ . अणुऊर्जा निर्मितीसाठी येणारे अडथळे तात्काळ दूर करावेत.
४४ . साखर कारखाने , बंद पडू शकणारे ( आजारी ) , बंद पडलेले साखर कारखाने व ऊस उत्पादन याबाबत निश्चित धोरण ठरविणे व त्याची अंमलबजावणी करणे , विशेषतः उसासाठी लागणाऱ्या पाण्याचे पुनर्नियोजन करणे आवश्यक आहे .
४५ . ग्रामीण दष्काळी भागात उदयोग निर्मितीसाठी परदेशी कंपन्यांना १०० % अनुदान देऊन निमंत्रित करायला हवे.
४६ . नद्या बारमाही वाहतील अशी व्यवस्था करायला हवी , त्यासाठी नदीपात्राशेजारी प्रत्येक २० किलोमीटर अंतरावर महाप्रचंड जलसाठे बॅलेंसिंग टॅकच्या स्वरुपात करायला हवेत .
 ४७ . जंगलेवाढीसाठी टेकडी धरणाची कल्पना प्रत्यक्षात उतरवायला हवी.
 ४८ . गारपीट , अतिवृष्टी , अवकाळी पाऊस यांपासून पीक संरक्षण करण्याकरिता स्वस्त पॉलीहाऊसची नितांत गरज आहे , म्हणजे १०० % पीक हाताशी येऊ शकेल.
५०  . शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून , शेतकऱ्यांना पेन्शन ऐवजी पगाराची व्यवस्था करायला हवी , तो पगार त्यांच्या उत्पादन मालाच्या विक्रीतून वसूल करा , म्हणजे शेतकऱ्यांना दरमाही १ तारखेला पगार हातात मिळेल , अशी व्यवस्था करायला हवी.
५० . परदेशी गुंतवणूक खेड्याकडे वळवायला हवी.
५१ . संपूर्ण शेतीला १०० % अनुदानाचे ड्रीप बसवा , पाणी प्रश्न आपोआपच सुटेल , आजारपण कमी होईल , स्वच्छता वाढेल , स्थलांतरे कमी होतील .
५२ . पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आजतागायत सुटला नाही , त्यामुळे ग्रामीण जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वेळ आणि पैसा प्रमाणाबाहेर खर्च करावा लागतो . त्याची निश्चित योजना सरकारने मांडावी .
५३ . कोरडवाह जमिनींना एका पिकासाठी पाण्याची हमी नाही त्यामुळे जिराईत शेतकरी प्रगती करू शकला नाही. किमान एका पिकाच्या पाण्याची हमी हवीच , कोरडवाहू शेतकऱ्यांना किमान एका पिकासाठी पाणी दिले असते तर तेलबिया , डाळी यांचा प्रश्न पुष्कळसा मार्गी लागला असता . तेव्हा चारमाही , आठमाही , बारमाही अशा निरनिराळ्या पाणी देण्याच्या पाळ्या ठरवल्या असत्या तर ��ज खाद्यतेले व डाळी आयात करण्याची नामुष्की सरकारवर आली नसती.
५४ . ऊस पिकाला दिले गेलेले अनावश्यक महत्त्वामुळे उपलब्ध ९० % पाणी ३ % शेतकऱ्यांना हमखास दिले जाते व अनावश्यक साखर उत्पादित केली जाते. त्याचे दुष्परिणाम ९० % जनतेला सोसावे लागतात. ऊस शेती बंद करून मक्यापासून साखर तयार करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे.
जुन्या फॅक्टरीज , साखर कारखाने हे कुशल कामगार केंद्र निर्मितीसाठी  वापरायला हव्यात .ऊस उत्पादनास व साखर उद्योगाला दिलेले अधिक महत्त्व कमी करण्याचे साहस एकाही राजकीय पुढाऱ्याकडे आज नाही व तोच पाणी प्रश्नाचा मूळ मुद्दा आहे. हे कोणतेही राजकीय नेतृत्व लक्षात घेण्यास तयार नाही.
५५ . कृषी उत्पादन बाजार समित्यांऐवजी खाजगी व्यापाऱ्यांची स्पर्धा शेतकन्यांना अधिक फायद्याची ठरली असती.
५६ . शेतमाल , भाजीपाला , फळे यांच्या किमतीमधील चढ - उतारासाठी किमती संतुलित राखणारी गोदामे बांधली गेली असती तर हा शेतमालाच्या भावाचा चढ - उतार होणे टळले असते व हे आजतागायत कोणाही राजकीय पुढाऱ्याला समजलेले नाही.
५७ . ग्रामपंचायतीमध्ये सुनियोजित घरे बांधून दमदार खेडे वसाहत करण्याचा प्रयत्न केला जात नाही . खेड्यांचे आखीव रेखीव नियोजन करायला हवे.
५८ . शाळा , दवाखाने , सार्वजनिक वाहतूक , बँका यांचा विस्तार खेडेगावापर्यंत व्हायला हवा. 
५९ . शेतमजुरांचा घरांचा प्रश्न , ऊस तोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांना दवाखाने , शाळा यांचे वाचून वंचित राहावे लागते.
६० . नव्या जगामध्ये खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. तथापि त्याचा विस्तार फक्त शहरापुरता मर्यादित आहे. शहरी भागातच सर्व किंमती खेळाच्या , पैसे मिळवणाऱ्या खेळांच्या सुविधा व मूलभूत सोयी आहेत. उदा. क्रिकेट , टेनिस , स्कूनर , जलतरण इ . ग्रामीण भागातील सशक्त व निरोगी मुलांना या प्रवाहात सामील केले पाहिजे. खेडेगावातून सचिन तेंडूलकर , पेस , मिल्खा सिंग असे खेळाडू जेव्हा तयार होतील तेव्हा खऱ्या अर्थाने भारत खेळांमध्ये जगात सर्वश्रेष्ठ होईल. ह्या मुलांमध्ये शारीरिक चापल्य व कष्ट करण्याची तयारी शहरी मुलांपेक्षा अधिक असते. शहरातील मुलांसाठी खेळ म्हणजे करमणूक असते. ग्रामीण मुलांसाठी ते करिअर बनू शकते. या व अशा अनेक नावीन्यपूर्ण कल्पना घेऊन त्या राबवून महाराष्ट्राला प्रगतिपथावर आणणे शक्य आहे.
                                                                        -भास्करराव म्हस्के
0 notes
mhlivenews · 2 years
Text
केंद्र शासनाच्या स्वनिधी महोत्सवात तीन महानगरपालिका, एका नगरपरिषदेची निवड
केंद्र शासनाच्या स्वनिधी महोत्सवात तीन महानगरपालिका, एका नगरपरिषदेची निवड
मुंबई, दि. 13: भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त देशात ‘आजादी का अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येत असून, यानिमित्त 1 ते 31 जुलै या कालावधीत केंद्र शासनामार्फत स्वनिधी महोत्सव देशातील 75 शहरांमध्ये साजरा करण्यात येत आहे. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली या तीन महानगरपालिका आणि अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगरपरिषदेची निवड करण्यात आली आहे. या चारही स्थानिक…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
केंद्र शासनाच्या स्वनिधी महोत्सवात तीन महानगरपालिका, एका नगरपरिषदेची निवड
केंद्र शासनाच्या स्वनिधी महोत्सवात तीन महानगरपालिका, एका नगरपरिषदेची निवड
मुंबई, दि. 13: भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त देशात ‘आजादी का अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येत असून, यानिमित्त 1 ते 31 जुलै या कालावधीत केंद्र शासनामार्फत स्वनिधी महोत्सव देशातील 75 शहरांमध्ये साजरा करण्यात येत आहे. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली या तीन महानगरपालिका आणि अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगरपरिषदेची निवड करण्यात आली आहे. या चारही स्थानिक…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
मुंबई-ठाणे पालिकांवर प्रशासक; मंत्रिमंडळाचा निर्णय ; मार्चमध्ये नगरसेवकांची राजवट संपुष्टात
मुंबई-ठाणे पालिकांवर प्रशासक; मंत्रिमंडळाचा निर्णय ; मार्चमध्ये नगरसेवकांची राजवट संपुष्टात
मुंबई-ठाणे पालिकांवर प्रशासक; मंत्रिमंडळाचा निर्णय ; मार्चमध्ये नगरसेवकांची राजवट संपुष्टात मंत्रिमंडळाचा निर्णय ; मार्चमध्ये नगरसेवकांची राजवट संपुष्टात मुंबई : मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे अशा १० महानगरपालिकांची मुदत मार्च ते एप्रिल दरम्यान संपणार असल्याने, तसेच त्या मुदतीत निवडणूक होणार नसल्याने या महानगरपालिकांवर प्रशासकांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात बदल…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी मुदतवाढ
अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी मुदतवाढ
मुंबई : राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या पाच महानगर क्षेत्रांत राबविण्यात येत असलेल्या इ. अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (FCFS) प्रवेश फेरीमधील प्रवेशासाठी २१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. अशी माहिती शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिली आहे. कोणीही विद्यार्थी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years
Photo
Tumblr media
आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न लवकरच सोडवू- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नागपूर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांतर्गत असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या कचरा टाकण्यासंबंधितच्या व अन्य समस्या तेथील स्थानिक नागरीक व प्रशासनाशी चर्चा करून लवकरच सोडवणार असून राज्यातील इतर शहरातील असे प्रश्नही सोडविण्यासाठी समिती स्थापन करु, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.
0 notes
abhihasabe · 4 years
Text
नागपूर महानगरपालिका भरती 2020.
नागपूर महानगरपालिका भरती 2020.
[ad_1]
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020
NMC Bharti 2020 : नागपूर महानगरपालिका भरती 2020 ने तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी- आयुष, स्टाफ नर्स, एएनएम, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीएच तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय या पदांसाठी पूर्ण भरण्यासाठी रिक्त पदांची भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना या संकेतस्थळावर http://www.nmcnagpur.gov.inवर ऑफलाइन अर्ज करण्याचे निर्देश आहेत. सप्टेंबर…
View On WordPress
0 notes