Tumgik
#दुसरी चाचणी
nandedlive · 1 year
Text
राज्यात अजूनही पावणेदोन कोटी नागरिक निरक्षर
Tumblr media
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या शिक्षण संचालनालयाने (योजना) जिल्हानिहाय निरक्षरांची यादी जाहीर केली आहे. नवतंत्रज्ञानाच्या जमान्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे प्रयोग होत आहेत. देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू असताना त्याच देशात ५ कोटींहून अधिक लोक निरक्षर असून त्यात महाराष्ट्रातीलच पावणेदोन कोटी लोकांचा समावेश आहे. या लोकांना आता काहीही करून २०२७ पर्यंत साक्षर केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक १० व्यक्तींसाठी एक स्वयंसेवक नेमला जाणार आहे. या अगोदर राज्यातच नव्हे, तर देशभर सारक्षता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला देशात चांगले यश आले होते. मात्र, त्यातूनही अनेकजण शिक्षणाविना राहिले होते. ही संख्या अजूनही मोठी आहे. या निरक्षरांना साक्षर करण्याची मोहीम पुन्हा हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सध्या सगळीकडे अ‍ँड्रॉईड मोबाईल आहेत. त्यामुळे निरक्षरांना साक्षर करणे अधिक सोपे आहे. त्यामुळे या निरक्षरांना साक्षर करण्यात येणार असून, १० निरक्षरांसाठी एक स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अंगणवाडी सेविकांपासून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, नेहरू युवा केंद्रातील तरुणांना (किमान आठवी उत्तीर्ण) स्वयंसेवक म्हणून काम करता येणार आहे. राज्यात निरक्षरांची संख्या मोठी आहे. हा आकडा १ कोटी ६३ लाखांवर आहे. यात पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त १० लाख ६७ हजार ८२३ लोक निरक्षर असल्याची बाब समोर आली आहे. नाशिक, सोलापूर, अहमदनगर, पालघर, जळगाव, मुंबई, नांदेड, ठाणे अशा ९ जिल्ह्यात मिळून ७३ लाख ६१ लाख ४६० निरक्षर नागरिक आहेत. हीदेखील चिंताजनक बाब आहे. राज्यात सातत्याने साक्षरतेसाठी मोहिमा राबविल्या जातात. साक्षर झाल्याचा दावाही केला जातो. मात्र, प्रत्यक्षात अजूनही राज्यात निरक्षरांची संख्या पावणेदोन कोटी असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, या सर्वांनाच आता साक्षर केले जाणार आहे. यामध्ये महिला, मुली, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, बांधकाम कामगार, मजुरांना प्राधान्याने साक्षर केले जाणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळा भरण्यापूर्वी एक तास व शाळा सुटल्यानंतर एक तास या कालावधीत निरक्षरांनादेखील स्वयंसेवक शिकवू शकणार आहेत. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांवरही त्यांना मोफत शिकवले जाईल, असे आदेशात नमूद केले आहे. थेट मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण विशेष बाब म्हणजे निरक्षरांमधील अनेकांना अक्षर ओळख नाही, पण अ‍ॅन्ड्राईड मोबाईल हाताळता येतो. त्यामुळे त्यांना मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. सुरुवातीला १५ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकांना शिकवले जाणार आहे. त्यामुळे याचा निरक्षरांना थेट फायदा होणार आहे. निरक्षरांच्या १ वर्षात २ चाचण्या पुण्यातील महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे निरक्षरांच्या एका वर्षात दोन चाचण्या होतील. दिवाळीत पहिली स्तर मापन चाचणी परीक्षा तर फेब्रुवारीत दुसरी चाचणी होईल. दोन्ही चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होणा-यांना पुढे पाचवी, आठवी, दहावी व बारावीच्या परीक्षेला बसता येणार आहे. त्यामुळे निरक्षरांसाठी ही एक मोठी संधी म्हणून पाहिले जात आहे. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
भारत आणि ऑस्ट्रेलियातील संबंध हे परस्पर विश्वास आणि आदरावर आधारित-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सिडनी इथं प्रतिपादन
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचं काम आजपासून देशभरातल्या बँकांमध्ये सुरू.
लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या नागरी सेवा परिक्षांचे निकाल घोषित, महाराष्ट्रातून करिश्मा संखे प्रथम.
पंढरपूर मंदिराच्या ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या तसंच अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या ३६८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला शासनाची मान्यता.
आणि
ड्रेनेज सफाईसाठी औरंगाबाद महानगरपालिकेचा रोबोटिक यंत्र वापरण्याचा निर्णय.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया संबंध हे परस्पर विश्वास आणि आदरावर आधारलेले असून यामध्ये ऑस्ट्रेलियातल्या भारतीय समुदायाचं मोठं योगदान आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आपल्या ऑस्ट्रेलिया भेटीत ते आज ऑस्ट्रेलियातल्या भारतीय समुदायाशी बोलत होते. मोठं भौगोलिक अंतर आणि भिन्न जीवनशैली असूनही योग आणि क्रिकेट अशा बाबींनी या दोन देशांतल्या लोकांना जोडून ठेवलं आहे, असं ते म्हणाले. गेल्या नऊ वर्ष��ंत भारतानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बन शहरात भारताचा नवा वाणिज्य दूतावास सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सिडनी इथं झालेल्या या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते. सिडनीच्या एका उपनगरी भागाला ‘लिटल इंडिया’ हे नाव देण्यात येत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या आधी पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.
****
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचं काम आज देशभरातल्या बँकांमध्ये सुरू झालं. बदलल्या जाणाऱ्या नोटांचा दैनंदिन हिशोब ठेवण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं सगळ्या बँकांना दिले आहेत. याशिवाय दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेचा हिशोबही ठेवला जाणार आहे. केंद्र सरकारनं २०१६ मध्ये नोटबंदी केल्यानंतर नव्यानं चलनात आणलेल्या या नोटा, चलनातून मागे घेत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं गेल्या शुक्रवारी केली होती.
****
लोकसेवा आयोगानं २०२२ च्या नागरी सेवा परीक्षांचे निकाल आज घोषित केले. यामध्ये इशिता किशोरनं देशातून प्रथम, गरिमा लोहियानं द्वितीय तर उमा हरातीनं तृतीय क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्रातून करिश्मा संखे हिनं पहिला क्रमांक मिळवला असून, ती देशात पंचविसाव्या क्रमांकावर आहे.
या परीक्षेत एकूण नऊशे तेहतीस उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी तीनशे पंचेचाळीस उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील तर ९९ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आहेत. दोनशे त्रेसष्ट इतर मागासवर्गीय, एकशे चोपन्न अनुसूचित जातीचे आणि बहात्तर उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातले आहेत.
****
लोकसभेचे माजी अध्यक्ष तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
****
खोकल्यासाठीची द्रव औषधं, अर्थात कफ सिरपच्या निर्यातदारांनी कफ सिरप निर्यातीची परवानगी घेण्याआधी, त्यांच्या उत्पादनांची चाचणी सरकारी प्रयोगशाळांमध्ये करणं आवश्यक आहे, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. येत्या एक जूनपासून प्रयोगशाळांकडून तपासणी आणि विश्लेषण प्रमाणपत्र मिळाल्यावरच कफ सिरपच्या निर्यातीला निर्यातदारांना परवानगी दिली जाईल, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
आपत्तीची जोखीम कमी करण्यासाठी कार्यरत जी - ट्वेंटी कार्यगटाची दुसरी बैठक आज मुंबईत सुरू झाली. या बैठकीचा उद्देश सर्जनशील निधी यंत्रणेची तपासणी करणे आणि संधी ओळखून विशिष्ट समुदायांवरील आपत्तीचा प्रभाव कमी करणे हा आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि २० देशांतील सदस्य उपस्थित राहणार आहेत.
****
पंढरपूर मंदिराच्या ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या तसंच अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या ३६८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला आज शासनानं मान्यता दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या मोठ्या गर्दीच्या मंदिरांचं डिजिटल मॅपिंग करावं, म्हणजे भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. पंढरपूर शहरातल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागानं तातडीनं १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेला वितरीत करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
यावर्षी ‘हरित वारी स्वच्छ वारी’ या संकल्पनेवर आषाढी वारीचं नियोजन करण्यात येणार असून, महिला वारकऱ्यांना मूलभूत तसंच आरोग्य सुविधा पुरवणार असल्याची माहिती सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. यासंदर्भात आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पालखी मार्गावर गेल्या वर्षी दहा हजार वृक्ष लागवड केली होती, यावर्षीही तशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मार्गावर जागोजागी प्लॅस्टिक संकलन केंद्रं उभारणार असल्याची, तसंच महिला वारकऱ्यांना हिरकणी कक्षही उपलब्ध करून देणार असल्याची माहिती स्वामी यांनी यावेळी दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ इथे ‘वंडर केव्हज’ या कार्यक्रमाचं येत्या सत्तावीस तारखेला आयोजन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीनं साजरा होत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव, या अंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. हा उत्सव म्हणजे आपला समृद्ध इतिहास आणि संस्कृती, तसंच स्वातंत्र्यलढा आणि त्यातले शूरवीर, यांना समर्पित केलेली मोहीम आहे. या कार्यक्रमात हेरिटेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला शिबीर, पोवाडा गायन, प्रश्नमंजुषा आणि नृत्यनाटिका असे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
��्रेनेज लाईन मधला गाळ कचरा काढण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका आता रोबोटिक स्कॅव्हेंजर इक्विपमेंट हे आधुनिक यंत्र वापरणार आहे. महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत यांच्यासमोर आज या यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. हे यंत्र ड्रेनेजमधला गाळ काढण्याचं काम मानवविरहित पद्धतीनं करतं, यामुळे ड्रेनेजमधल्या विषारी वायूमुळे होणारी जीवितहानी टाळता येईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. केरळमधल्या चार अभियंता युवकांनी जेनरोबोटीक्स या त्यांच्या स्टार्टअप उद्योगातून हे यंत्र तयार केलं आहे.
शहरातल्या सलीम अली सरोवर परिसरात ड्रेनेज पाईप दुरुस्त करताना चार मजुरांचा आठ मे रोजी मृत्यू झाला होता, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम.वेंकटेशन यांनी आज मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहीर करण्यात आलेल्या दहा लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वेंकटेशन यांच्या हस्ते त्या कुटुंबांना देण्यात आले.
****
इचलकरंजी शहरातील कबनूर इथल्या आमीन फटाका गोदामात आज मोठा स्फोट झाला. या स्फोटात गोदामाचे मालक परवेज मुजावर यांचा मृत्यू झाला. या स्फोटाचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत ऐकू आल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या चांदशैली घाटात पिकअप वाहन उलटून तीन जण ठार झाले, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. पिकअप वाहन तळोद्यावरुन धडगावकडे जाताना आज सकाळी ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ आज सकाळी सातच्या सुमारास झालेल्या बस आणि कंटेनरच्या अपघातातील मृतांचा आकडा नऊवर पोहचला आहे. या अपघातात २३ जण जखमी झाले आहेत.
****
खुलताबाद तालुक्यातल्या वेरूळ इथल्या डमडम तलावामध्ये बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. संकेत बम्हणावत आणि आयुष नागलोद अशी मृत युवकांची नावं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
SL vs AUS: पदार्पणाच्या कसोटीत कामिंदू मेंडिसने अर्धशतक ठोकले, दिनेश चंडिमलचे 13वे कसोटी 100 श्रीलंकेच्या ड्रायव्हिंग सीटवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका ड्रायव्हिंग सीटवर
SL vs AUS: पदार्पणाच्या कसोटीत कामिंदू मेंडिसने अर्धशतक ठोकले, दिनेश चंडिमलचे 13वे कसोटी 100 श्रीलंकेच्या ड्रायव्हिंग सीटवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका ड्रायव्हिंग सीटवर
दिनेश चंडीमलने नाबाद 118 धावा केल्या आणि कामिंडू मेंडिसने पहिल्या कसोटीत अर्धशतक ठोकले. यामुळे रविवारी 10 जुलै 2022 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध गॉलमधील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेला ड्रायव्हिंग सीटवर बसण्यास मदत झाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने पहिल्या डावात 149 षटकांत 6 बाद 431 धावा केल्या होत्या. चंडिमलशिवाय रमेश मेंडिसने नाबाद ७२ धावा केल्या. श्रीलंकेने 67 धावांची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
बेअरस्टोने लीड्समध्ये विशेष विक्रम केला, या प्रकरणात इंग्लंडच्या अनेक महान खेळाडूंना पराभूत केले
बेअरस्टोने लीड्समध्ये विशेष विक्रम केला, या प्रकरणात इंग्लंडच्या अनेक महान खेळाडूंना पराभूत केले
जॉनी बेअरस्टो इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड लीड्स: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्स येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात 329 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 6 गडी गमावून 264 धावा केल्या होत्या. यादरम्यान जॉनी बेअरस्टोने संघासाठी शतक झळकावले. या नाबाद शतकामुळे…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका: ऑली रॉबिन्सनने मॅथ्यू पॉट्सच्या जागी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका विरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी इलेव्हनचे नाव घेतले | क्रिकेट बातम्या
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका: ऑली रॉबिन्सनने मॅथ्यू पॉट्सच्या जागी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका विरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी इलेव्हनचे नाव घेतले | क्रिकेट बातम्या
ऑली रॉबिन्सनचा फाइल फोटो.© एएफपी अमिराती ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघाने बुधवारी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. ऑली रॉबिन्सन प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला मॅथ्यू पॉट्स लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीतील एकमेव बदल. दुसरी कसोटी 25 ऑगस्टपासून होणार आहे. इंग्लंडच्या बाउन्सबॅकेबिलिटीची चाचणी एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samarthnews · 3 years
Text
‘प्रलय’या पारंपरिक क्षेपणास्त्राची दुसरी उड्डाण चाचणी यशस्वीपणे 
  नवी दिल्ली, : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ने 23 डिसेंबर 2021 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून स्वदेशी बनावटीच्या पृष्ठभागावरुन पृष्ठभागावर मारा करणाऱ्या पारंपरिक ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची दुसरी उड्डाण चाचणी यशस्वीरीत्या घेतली. प्रथमच, सलग दोन दिवस बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या सलग दोन उड्डाण चाचण्या यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत. उड्डाण चाचणीने मोहिमेची सर्व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
फाईव्ह-जी अवतरण्यासाठी...
Tumblr media
फाईव्ह-जी स्पेक्ट्रमच्या लिलावात दूरसंचार उद्योगातील कंपन्यांचा सहभाग उत्साह वाढविणारा होता. सरकारी खजिन्यात अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम आली. दूरसंचार सेवा प्रदात्या कंपन्या आता फाईव्ह-जी सेवांच्या शुभारंभासाठी गुंतवणूक, आधारभूत संरचना याबरोबरीनेच जागतिक निकषांनुसार उपकरणे प्रस्थापित करीत आहेत. सरकारने आधी म्हटले होते की, भारत ऑक्टोबरपर्यंत फाईव्ह-जी सेवा सुरू करेल. दरम्यान दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरसंचार सेवा प्रदात्या कंपन्यांना फाईव्ह-जी सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर दूरसंचार सेवा प्रदात्या कंपन्यांना मुदतीपूर्वीच लाँचिंग करण्यासाठी तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. स्पेक्ट्रम वितरणाची घोषणा करण्यापूर्वीच भारत फाईव्ह-जीच्या स्थापनेच्या तयारीत गुंतला होता. कोलकाता येथे एअरटेलने गेल्या वर्षी नोकिया कंपनीबरोबर करार करून कमी आवृत्ती असलेल्या ७०० मेगाहटर््झ बँडमध्ये फाईव्ह-जी चाचणी घेतली होती. ७०० मेगाहटर््झ बँडमध्ये भारतातील ही पहिलीच फाईव्ह-जी चाचणी होती. हैदराबादमध्येही एअरटेलने अशीच चाचणी घेतली. यावर्षी मे महिन्यात व्होडाफोनने पुण्यात ६ जीबीपीएसची सर्वोच्च गती प्राप्त करण्यासाठी हाय फ्रीक्वेन्सी मिड बँड स्पेक्ट्रमची चाचणी घेतली, तर जिओने आपल्या स्वत:च्या उपकरणांद्वारे ४२० एमबीपीएस डाऊनलोड आणि ४१२ एमबीपीएस अपलोड एवढी गती प्राप्त करण्यात यश मिळविले. टेलिकॉम कंपन्या प्राथमिक स्तरावर काही प्रमुख शहरांमध्येच फाईव्ह-जी सेवा उपलब्ध करून देण्याचा विचार करीत आहेत. अर्थात फाईव्ह-जीसाठी पायाभूत संरचना उभारताना कमीत कमी ७० टक्के टेलिकॉम टॉवर फायबराईज्ड करण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे झाले तरच या सेवेचा पूर्णांशाने वापर करता येणे शक्य आहे. सध्या सुमारे ३३ टक्के टॉवर फायबराईज्ड आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमधील शहरांत फायबरयुक्त टॉवर्सची संख्या खूपच कमी आहे. टॉवर्सचे फायबरायजेशन केल्यानंतर कंपन्यांना चांगला वेग देण्यासाठी मदत मिळणार आहे. फाईव्ह-जीच्या यशस्वितेसाठी टॉवर फायबरयुक्त करणे हाच प्रमुख घटक आहे. भविष्यातील रेडिओ अ‍ॅक्सेस नेटवर्क, ट्रान्समिशन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नेटवर्क यासाठी ३० अब्ज डॉलरची विशेषत्वाने गरज भासणार आहे. अर्थात, सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि पुढाकारामुळे देशांतर्गत दूरसंचार निर्माण क्षमता अधिक सुदृढ झाली आहे. दूरसंचार क्षेत्राने हायस्पीड नेटवर्कची सातत्याने वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी फायबर आणि वायरलेस सुविधांबरोबरच आपल्या नेटवर्क क्षमतांचा विस्तार सुरूच ठेवला आहे. इंटरनेटचा वापर वाढविणे आणि अनुकूल नियामकीय वातावरण यामुळे दूरसंचार क्षेत्रात वेगाने वाढ झाली आहे. टेलिकॉम कंपन्यांना आता फाईव्ह-जीसाठी विश्वसनीय डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे लागेल. ऑप्टिकल फायबर आणि अन्य सेमी-कंडक्टरवर आधारित उपकरणांचीही गरज भासेल. तसे पाहायला गेल्यास भारताने उपकरणांची निर्मिती आणि उत्पादन क्षमता मजबूत प्रमाणात वाढविली आहे. बाजारात चीन, दक्षिण कोरिया आणि इंडोनेशिया येथे तयार होणा-या स्वस्त उपकरणांची मुळातच खूप गर्दी आहे. ही आयात केलेली स्वस्त उपकरणे आत्मनिर्भर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेलसाठी भारताला आपली बौद्धिक संपदा वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रचंड खर्च केल्यास अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास करणारा आणि दीर्घकालीन लाभ वाढविणारा ठरेल. फाईव्ह-जीच्या संपूर्ण क्रियान्वयनासाठी पायाभूत संरचनेव्यतिरिक्त अन्य अनेक बाबतीत चिंता आहेत आणि त्यांचे निराकरण होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, देशांतर्गत फाईव्ह-जी आय आणि जागतिक ३जीपीपी निकष प्रतिकूल असणे. फाईव्ह-जी आय हैदराबाद आणि मद्रास टेलिकम्युनिकेशन्स स्टँडर्डस डेव्हलपमेन्ट सोसायटी आणि सेंटर ऑफ एक्सलेन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे, जो फाईव्ह-जीचा निकष आहे आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागात नेटवर्क सुलभरीत्या तो पोहोचवू शकेल. त्या तुलनेत फाईव्ह-जी हे जागतिक मानक असून, ते ३ जीपीपीने तयार केले आहे. फाईव्ह-जीआय इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियनद्वारा (आयटीयू) डिसेंबर २०२१ च्या करारांतर्गत फाईव्ह-जी नि��षांसोबत विलीन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आणखी एक मुद्दा असा की, दूरसंचार कंपन्या लो मोबिलिटी लार्ज सेल (एलएमएलसी) तंत्रज्ञानाने संचालित फाईव्ह-जीआयच्या माध्यमातून चांगल्या कव्हरेजचा लाभ उठवू शकतील. एलएमएलसी तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटी आणि रेंज वाढविण्यास मदत करते. त्यासाठी ऑपरेटर कंपनीला काही किलोमीटर अंतरावर बेस स्टेशन स्थापित करण्याची गरज भासत नाही आणि अतिरिक्त गुंतवणूक न करताच दुर्गम आणि ग्रामीण भागांत मोबाईल कनेक्टिव्हिटी देणे सोपे होते. दुसरीकडे, जर सरकारने फाईव्ह-जीआय लागू करण्यास अनुमती दिली, तर सरकारच्या अशा निर्णयामुळे दूरसंचार कंपन्यांना खूपच नुकसान सहन करावे लागू शकते. कारण कंपन्यांनी ग्लोबल फाईव्ह-जी सोबत आपल्या नेटवर्कच्या विकासात मोठी रक्कम गुंतविली आहे. अशा स्थितीत आपली उपकरणे आणि नेटवर्क फाईव्ह-जीआय ला अनुकूल करण्यासाठी त्यांना स्वतंत्रपणे आणखी गुंतवणूक करावी लागेल. -महेश कोळी, संगणक अभियंता Read the full article
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१६ डिसेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
१९७१ मध्ये भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या युद्ध विजयाच्या स्मरणार्थ आज देशभरात सर्वत्र विजय दिन साजरा केला जात आहे. विजय दिनाच्या पूर्वसंध्येला काल, नवी दिल्लीत सेना भवन इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच लष्कर प्रमुख मनोज पांडे उपस्थित होते. १९७१ च्या युद्धात भारतीय लष्कराने दाखवलेलं शौर्य देश कधीही विसरणार नाही, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
अनुसूचित जमाती आदेशाशी संबंधित दुसरी घटना दुरुस्ती विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. शिवसेना खासदार विनायक राउत यांनी या विधेयकावरील चर्चेत धनगर आरक्षणाच्या मुद्द्याकडे सभागृहांचं लक्ष वेधलं, तसंच मराठा आरक्षणाची देखील ��ागणी केली.
****
अग्नी पाच या ��ण्विक शास्त्रस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल ओडिशा मध्ल्या डॉक्टर अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र उच्चतम पातळीवरून पाच हजार किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे.
****
राज्यात १८ हजार ३३१ पोलिसांची भरती करण्यात येत असून या भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या मोहिमेत आतापर्यंत १४ लाख ४७ हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
****
हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात विविध ११ क्षेत्रांमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा राज्य शासनाबरोबर सामंजस्य करार केला आहे. नवीकरणीय ऊर्जा, माध्यमे आणि मनोरंजन, ग्रामीण आर्थिक विकास, सायबर सुरक्षा, व्यावसायिक ऑटोमोबाईल्स, बॅंकिंग - फायनान्स, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, उत्पादन आणि नव तंत्रज्ञान या क्षेत्रात हा उद्योग समूह गुंतवणूक करणार आहे.
****
ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या सिंगल विंडो पोर्टलचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात विकासाची मोठी संधी असून या क्षेत्रात ठरवलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योगस्नेही धोरणावर भर देण्यात येत असल्याचं फडणवीस म्हणाले.
//*********//
0 notes
loksutra · 3 years
Text
Pak vs Aus: बाबर आझमने केएल राहुलची बरोबरी केली, चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला पाकिस्ताननेही इंग्लंडशी बरोबरी केली पाकिस्ताननेही विक्रम केला
Pak vs Aus: बाबर आझमने केएल राहुलची बरोबरी केली, चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला पाकिस्ताननेही इंग्लंडशी बरोबरी केली पाकिस्ताननेही विक्रम केला
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया कराची कसोटी सामना: बाबर आझमने दुस-या डावात 10 तासांच्या 425 चेंडूंच्या खेळीत 21 चौकार आणि 1 षटकार ठोकला. कराची येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कारकिर्दीतील सर्वोत्तम १९६ धावा केल्या. यष्टिरक्षक मोहम्मद रिझवाननेही दुसऱ्या डावात शतक झळकावले. या दोघांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
IND vs SL: पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेची धावसंख्या ८६/६, बुमराह-शमीची दमदार कामगिरी
IND vs SL: पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेची धावसंख्या ८६/६, बुमराह-शमीची दमदार कामगिरी
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील शेवटचा सामना बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. डे-नाईट कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने 6 गडी गमावून 86 धावा केल्या आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी केली. याआधी टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 252 धावा केल्या होत्या. भारताकडून श्रेयस अय्यरने ९२ धावांची शानदार खेळी केली. श्रीलंकेसाठी पहिल्या डावात कुसल…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
राम मंदिराचे मुख्य पुजारी यांचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह सुदैवाने त्यांची ही दुसरी चाचणी निगेटिव्ह आलेली आहे | #RamMandir #Pujari #CoronaNegative http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/ayodhya-ram-mandir-chief-priest-tests-negative-for-covid-19/?feed_id=5623&_unique_id=5f2a63e72ce9f
0 notes
karmadlive · 5 years
Text
कोरोनानंतर चीनमध्ये आला हंता विषाणू; एकाचा मृत्यू, 32 जणांची चाचणी
Tumblr media Tumblr media
मुंबई |  चीनमधल्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेला आहे. कोरोनाने हजारो जणांचे प्राण घेतले आहेत. आणखी हे संकट जात नाही तोवरच चीनमधून दुसरी धक्कादायक बातमी आली आहे. चीनमधल्या यूनाना प्रांतातून एका व्यक्तीचा हंता विषाणूने मृत्यू झाला आहे.
चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. हे वृत्त वाचल्यानंतर नेटकऱ्यांच्या आणि वाचकांच्या…
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
आता घरच्या घरी स्वतः करा कोरोना टेस्ट, पंधरा मिनिटांत रिपोर्ट तयार......!
आता घरच्या घरी स्वतः करा कोरोना टेस्ट, पंधरा मिनिटांत रिपोर्ट तयार……!
मुंबई दि.४ – सध्या कोरोनाची चाचणी (Corona test) दोन पध्दतीने केली जाते. एक म्हणजे RT-PCR TEST आणि दुसरी म्हणजे रॅपिड अँटीज�� टेस्ट Rapid antigen test. या दोन्ही टेस्ट तज्ज्ञांमार्फत किंवा प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत केल्या जातात .पण या चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या भल्यामोठ्या रांगा अन् त्याचे रिपोर्ट येण्यास लागणारा वेळ या त्रासातून आता मुक्तता होणार आहे. कारण आता घरच्या घरी स्वत:ची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Text
अमिताभ बच्चन यांना लवकरच डिस्चार्ज.... दुसरी चाचणी निगेटिव्ह
अमिताभ बच्चन यांना लवकरच डिस्चार्ज…. दुसरी चाचणी निगेटिव्ह
मुंबई :बिग बी अमिताभ बच्चन यांना लवकरच नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांची दुसरी कोरोना चाचणी आता निगेटिव्ह आली असून त्यांना लवकरच घरी जाता येणार आहे. १२ जूलैला  बिग बी आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ते नानावटी रुग्णालयात दाखल झाले होते. यानंतर आराध्या आणि ऐश्वर्या बच्चन यांनाही संसर्ग झाला होता मात्र सध्या त्यांच्यावर होम क्वारंनटाईनमध्येच उपचार सुरु आहेत.…
View On WordPress
0 notes
bharatiyamedia-blog · 5 years
Text
9 July 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/yyacdb55 चालू घडामोडी (9 जुलै 2019) बाह्य़ग्रहाची वातावरणीय रचना उलगडण्यात यश : पृथ्वी व नेपच्यून यांच्या मधल्या ग्रहांच्या आकाराच्या आपल्या ग्रहमालेबाहेरील दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एका ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. त्यातून या ग्रहाचे स्वरूप व त्याची निर्मिती यावर प्रकाश पडणार आहे. अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेच्या स्पिटझर व हबल दुर्बीणींनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. अशा प्रकारचा एकही ग्रह आपल्या सौरमालेत नाही, पण या प्रकारचे ग्रह इतर ताऱ्यांभोवती दिसून येतात असे नासाने म्हटले आहे. तर ग्लिस 3470 बी (जीजे 3470 बी) हा ग्रह पृथ्वी व नेपच्यूनच्या मधल्या आकाराचा असून त्याचा खडकाळ गाभा हा हायड्रोजन व हेलियमच्या वातावरणात गुरफटलेला आहे. या ग्रहाचे वजन पृथ्वीपेक्षा जास्त तर नेपच्यूनपेक्षा कमीआहे. असे अनेक ग्रह नासाच्या केप्लर दुर्बीणीने शोधून काढले आहेत. तसेच 2018 मध्ये या केपलर दुर्बीणीचे काम बंद झाले आहे. आपल्या दीर्घिकेतील 80 टक्के ग्रह हे या वस्तुमानाच्या टप्प्यात येतात. खगोलशास्त्रज्ञांच्या मते या ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. जीजे 3470 बी या ग्रहाच्या वातावरणाचे घटक उलगडताना या ग्रहाचे स्वरूप व मूळ याबाबतही माहिती मिळत आहे. ग्रहांची निर्मिती कशी होते यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे. हा ग्रह ताऱ्याच्या अगदी जवळून प्रदक्षिणा घालत असून तो गुरूच्या पेक्षा 318 पट जड आहे. हबल व स्पिटझर दुर्बीणींनी जी 3470 बी या ग्रहाच्या माध्यमातून प्रथमच वातावरणाचा अभ्यास केला आहे. यात ग्रहाची बारा अधिक्रमणे व 20 ग्रहणे तपासण्यात आली होती. कुठल्याही ग्रहाची वर्णपंक्तीय वैशिष्टय़े प्रथमच शोधण्याची ही पहिली वेळ आहे. तेजस एक्स्प्रेस ठरणार देशातील पहिली खाजगीरित्या चालणारी रेल्वे : केंद्र सरकारने मोठ्याप्रमाणात विरोध असुनही अखेर रेल्वेच्या खासगीकरणाकडे पाऊल टाकले आहे. दिल्ली आणि लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार आहे. तसेच रेल्वेने 100 दिवसांचे धोरण निश्चित करत सुरूवातीस दोन खासगी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रेल्वे विभागास संघटनांचा विरोध देखील सहन करावा लागत आहे. तर रेल्वे विभाग दिल्ली- लखनऊ व्यतिरिक्त दुसऱ्या 500 किलोमीटर अंतराच्या मार्गची देखील निवड करत आहे. या मार्गावर दुसरी खासगी रेल्वे चालवली जाणार आहे. तेजस एक्स्प्रेसला चालवले जाण्याची घोषणा 2016 मध्ये करण्यात आली होती. मात्र नव्या वेळापत्रकाबरोबर या रेल्वेला अशातच आणल्या गेले आहे. अनेक दिवसांपासून दिल्ली-लखनऊ रेल्वेची प्रतिक्षा होती. ही रेल्वे आता उत्तर प्रदेशमधील आनंदनगर रेल्वे स्थानकावर उभा आहे. जिला ओपन बिडींग प्रोसेसनंतर खासगी चालकाकडो सोपवले जाईल. भारताचं घातक अस्त्र ‘नाग’ दिवसाच नाही आता अंधारातही उडवणार शत्रूचा रणगाडा : नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश होईल. रविवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या. रविवारी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा नाग क्षेपणास्त्र डागून चाचणी घेण्यात आली. तिन्ही चाचण्या यशस्वी ठरल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर नाग क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात समावेश होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या नाग क्षेपणास्त्रांची 524 कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावाला डीएसीने मागच्यावर्षीच मंजुरी दिली आहे. नाग ही तिसऱ्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. क्षेपणास्त्र वाहून नेणारे वाहनही या सिस्टिममध्ये आहे. तसेच दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी सुद्धा शत्रू देशाचे रणगाडे उद्धवस्त करण्याची नागमध्ये क्षमता आहे. नागच्या समावेशाने भारतीय लष्कराची हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे. 1980 च्या दशकात भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाच क्षेपणास्त्र विकसित करण्याची योजना बनवण्यात आली होती. नाग त्यापैकी एक आहे. अग्नि, पृथ्वी आणि आकाश ही क्षेपणास्त्र सुद्धा याच कार्यक्रमातंर्गत विकसित करण्यात आलीआहेत. राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख : टीम इंडियाच्या भविष्यासाठी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड केली आहे. बीसीसीआय बंगळुरुमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा कायापालट करण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तरुण खेळाडूंना क्रिकेटचे योग्य धडे मिळावेत यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. तर 19 वर्षाखालील संघातील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना तयार करण्याचं मोठं काम राहुल द्रविडच्या खांद्यांवर असणार आहे. याचसोबत राहुल द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदाची नेमणूकीचे अधिकारही देण्यात आले आहेत. हिमा दासने दोन सुवर्ण पदाकांवर कोरले नाव : भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला आहे. हिमा दिस हिने चार दिवसांत भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. तर पाच जुलै रोजी हिमा दासने 200 मीटरमध्ये सुवर्णपद जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिमाने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. पोलंड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत हिमा दिसने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. कुट्नो एथलेटिक्स मीट प्रकारात हिमाने सुवर्ण पदक पटकावले आहे. हिमा दासने 23.77 सेंकदामध्ये 200 मीटर अंतर पार करत विजयी कामगिरी केली आहे. वीके विस्मयाने 24.06 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत दुसरे स्थानपटकावले आहे. दिनविशेष : शिवणयंत्राचे संशोधक ‘एलियास होव‘ यांचा जन्म 9 जुलै 1819 मध्ये झाला होता. सन 1873 मध्ये 9 जुलै रोजी मुंबई शेअर बाजार सुरू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म 9 जुलै 1921 मध्ये झाला होता. सन 1951 मध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली. सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती 9 जुलै 2011 मध्ये झाली. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 January 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि. ****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा.. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ या वर संपर्क करा..
****
·      वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत ओबीसींना २७ टक्के, तर आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
·      राष्ट्रव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत दीडशे कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पार
·      आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोविड प्रतिबंधासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी
·      कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन न केल्यास, निर्बंध अधिक कठोर करण्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा
·      राज्यात कोविडचे नवे ४० हजार ९२५ रुग्ण; मराठवाड्यात ४९३ रुग्णांची नोंद तर एकाचा मृत्यू
·      परभणी जिल्ह्यात १५ ते १८ वर्ष वयोगटाच्या लसीकरणासाठी उद्यापासून ११ जानेवारीपर्यंत विशेष मोहीम
·      औरंगाबाद शहरात येत्या सोमवारपासून पाच कोविड केंद्र पुन्हा सुरु करण्यात येणार
·      तुळजापूर इथं एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न करणार- उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे यांचं आश्वासन
आणि
·      ‘राष्ट्रीय जल पुरस्कार-२०२०’ जाहीर; महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार
****
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा - नीट पीजी मध्ये इतर मागासवर्गीय - ओबीसींना २७ टक्के, आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याला, सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. सध्याच्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये, म्हणून ओबीसी ���णि आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण कायम ठेवण्यात येत आहे, तसंच पांडेय समितीच्या शिफारशी पुढील वर्षापासून लागू करण्यास मंजुरी देत असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटासाठी वार्षिक ८ लाख रुपये उत्पनाच्या मुद्द्यावर येत्या मार्च मध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.  
****
राष्ट्रव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतानं काल दीडशे कोटी लसीकरणाचा टप्पा पार करुन इतिहास घडवला आहे. कोविड लसीकरण सुरू झाल्यानंतर वर्षभरापेक्षाही कमी काळात देशानं हे उद्दिष्ट गाठलं आहे. गेल्या वर्षी १६ जानेवारीला सुरु झालेल्या या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ९० टक्के पात्र नागरिकांना लसीची पहिली, तर ६५ टक्के पात्र नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे. विश्वातल्या या सर्वात मोठ्या लसीकरण अभियानात गेल्या वर्षी २१ ऑक्टोबरला २७९ दिवसातच, देशानं कोविड लसीच्या १०० कोटी मात्रा देण्याचं उद्दिष्ट साध्य केलं होतं.
दरम्यान, दीडशे कोटी लसीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन करत, या यशाचं श्रेय देशातले शास्त्रज्ञ, आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी, लस निर्माते यांना दिलं आहे.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गतीशील नेतृत्व आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न यांच्या बळावर, दीडशे कोटी मात्रांचा ऐतिहासिक टप्पा पार केला असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोविड प्रतिबंधासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारतात येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस गृहविलगीकरण तर आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक असून, भारताबाहेर जाणाऱ्या प्रवाशांनी ७२ तासांतल्या आरटीपीसीआरचा बाधित नसल्याचा अहवाल तसंच हा अहवाल खरा असल्याचं प्रतिज्ञापत्र, सादर करणं बंधनकारक आहे. योग्य सामाजिक अंतर, मास्कचा वापर, यासह इतर नियमांचाही यात उल्लेख करण्यात आला आहे. ब्रिटनसह सर्व युरोपीय देश, दक्षिण आफ्रिका, चीन, न्यूझीलंड, हाँगकाँग, कझाकस्थान, केनिया आदी १९ देशांमध��न येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत.
****
कोरोनाविषयक निर्बंध न पाळणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल व्हायला हवेत, तसंच निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असा इशारा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते काल जालन्यात बोलत होते. राज्यात लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, परवा १० तारखेपासून पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. ज्या ठिकाणी संसर्ग दर २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती असेल, त्या ठिकाणच्या शाळा स्थानिक प्रशासनाकडून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. चित्रपटगृहं, नाट्यगृह, तसंच धार्मिक स्थळांबाबत गरज भासली तर निर्बंध लावले जातील, मात्र या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्याची आवश्यकता टोपे यांनी व्यक्त केली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४० हजार ९२५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६८ लाख ३४ हजार २२२ झाली आहे. काल २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ६१४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ७ दशांश टक्के झाला आहे. काल १४ हजार २५६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख ४७ हजार ४१० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९५ पूर्णांक ८० शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १ लाख ४१ हजार ४९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, राज्यात काल ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
मराठवाड्यात काल ४९३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल १८३ नवे रुग्ण आढळले. यात शहरातल्या १५१, तर ग्रामीण भागातल्या ३२ रुग्णांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ८०, लातूर ७७, नांदेड ७४, परभणी २९, जालना २३, बीड १६, तर हिंगोली जिल्ह्यात काल ११ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
परभणी जिल्ह्यात उद्यापासून ११ जानेवारीपर्यंत प्रत्येक शालेय मुला - मुलींचं लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या १५ ते १८ वयोगटातील एक लाख एक हजार आठशे पाच मुला मुलींचं लसीकरण या कालावधीमध्ये करण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या सौजन्यातून काल राबवण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत ते बोलत होते. लसीकरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढून संक्रमणाला अटकाव होतो, असं चव्हाण यांनी सांगितलं.
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात येत्या सोमवारपासून पाच कोविड केंद्र पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे ही केंद्रं बंद करण्यात आली होती. गृहविलगीकरणातले रुग्ण आणि नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिका मुख्यालयात वॉर रुम तयार करण्यात आली आहे. यात दहा डॉक्टर सेवा देणार असून, ते दिवसातून दोन वेळा रुग्णांची चौकशी करणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्यातल्या १५ते १८ वयोगटातल्या ३० टक्के मुला मुलींचं लसीकरण झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी दिली आहे. नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं दिसली तर, जवळच्या केंद्रावर जावून तपासणी करुन घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी  केलं आहे.
****
एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर येऊन एसटी सुरू करावी, त्यानंतर आपण त्यांच्याशी तात्काळ चर्चा करू आणि कारवाईबाबतचा निर्णय घेऊ, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वीही एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याचे घोषित केलं होतं, मात्र तरीही कर्मचारी रुजू झाले नाहीत. त्यामुळे सध्या तरी कारवाई मागे घेतली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद या रेल्वेमार्गासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून रेल्वे मार्ग उभारावा या मागणीसाठी, भारतीय जनता पक्षाचे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात, परिवहन मंत्री परब यांना काल निवेदन देण्यात आलं. उस्मानाबाद बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध देण्यात यावा, ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
****
राज्य परिवहन महामंडळ -एसटीच्या परभणी विभागातून संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ६० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. याशिवाय १४ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली असून, १३ कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.
****
तुळजापूरच्या विकासाबरोबरच तालुक्याचा औद्योगिक विकास करण्���ासाठी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एमआयडीसी स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती, राज्याच्या उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्या काल तुळजापूर इथं बोलत होत्या. एमआयडीसी स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग विभागाचे मंत्री आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही तटकरे यांनी दिली.
****
‘राष्ट्रीय जल पुरस्कार-२०२०’ काल जाहीर झाले. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकावला असून, महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. जलव्यवस्थापनात उत्कृष्ट कार्यासाठी गैर शासकीय संस्थांमधून औरंगाबाद इथल्या ग्रामविकास संस्थेला, तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या श्रेणीमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातल्या सुर्डी ग्रामपंचयातीनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. जनतेमध्ये जलजागृतीसंदर्भात उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल सकाळ वृत्तपत्र समूहाच्या ‘ॲग्रोवन’ वृत्तपत्रास, सर्वोत्कृष्ट वृत्तपत्राचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या गुन्हे सिद्धतेचं प्रमाण गेल्या वर्षात ८४ टक्के राहिलं आहे. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी औरंगाबाद शहराच्या गुन्ह्यांबाबत वार्षिक अहवालासंदर्भात, काल वार्ताहर परिषदेत माहिती दिली. शहरात व्यसनाधीनता तसंच सायबर गुन्ह्यात वाढ झाली असल्याचं, त्यांनी सांगितलं. जामीनावर सुटलेल्या आरोपींकडून पुन्हा गुन्हा घडण्याची शक्यता पाहता शहरात प्रिव्हेन्शन सेल - दक्षता कक्ष सुरु करण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
****
बीड नगरपरिषदेच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या बचतगटाच्या मॉलचं उद्घाटन भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते काल झालं. या मॉल मध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, हस्तकला, शोभेच्या वस्तुंसह इतर विविध उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
****
हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तसंच आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. वसंतराव देशमुख यांचं काल हृदयविकारच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी कळमनुरी तालुक्यात नांदापूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना सुधाकर तोरणे यांचं काल नाशिक इथं निधन झालं, त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज नाशिक इथं अंत्यसंस्कार होणार आहेत
****
शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी अजून दोन जणांना नाशिक मधून अटक केली. या दोघांनी उमेदवारांकडून एकेक लाख रुपये घेऊन त्यांना उत्तीर्ण केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. राज्य परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या चौकशीत ही माहिती पुढे आली आहे.
****
मुस्लिम महिलांची मानहानी करणाऱ्या ॲपच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी औरंगाबाद इथल्या विधिज्ञ आसमां शेख यांनी केली आहे. त्या काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या प्रकरणात काही लोकांना अटक झाली आहे. मात्र, मुख्य सूत्रधारला अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी शेख यांनी केली.
****
0 notes