#ठरल्यानंतर
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी, छत्रपती संभाजीनगर - जालना इथल्या राज्य लॉजिस्टिक हबचा समावेश
छत्रपती संभाजीनगर इथं मंजूर पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी २३ लाख रुपये कर्ज देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
अल्पसंख्यांक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - मार्टी स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
देशाची करप्रणाली प्रगती आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारी असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन, वित्त विधेयक लोकसभेत मंजूर
आणि
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम लढतीपूर्वी अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटनं केली निवृत्ती जाहीर
****
महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण- २०२४ ला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेनं केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टीक धोरण तयार करण्यात आलं अस���न, यामुळे  सुमारे  पाच लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर - जालना राज्य लॉजिस्टिक हब आणि नांदेड - देगलूर प्रादेशिक लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहे.
लहान शहरांमधल्या पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. याअंतर्गत केंद्राच्या अमृत-दोन योजनेत छत्रपती संभाजीनगर इथं मंजूर पाणी पुरवठा प्रकल्पातल्या महानगरपालिकेच्या हिश्श्याच्या ८२२ कोटी २३ लाख रुपये कर्ज देण्यास मंजूरी देण्यात आली.
राज्यात अल्पसंख्यंकांच्या उन्नती करता टार्टी, बार्टी, महाज्योतीच्या धरतीवर मार्टी अर्थात अल्पसंख्यांक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. या संस्थेसाठी एकूण ११ पदं निर्माण केली जातील, तसंच सहा कोटी २५ लाख रुपये प्रशासनिक खर्चासाठीही मंत्रीमंडळानं मान्यता दिली.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन करण्यासाठी महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पाला देखील मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. यामुळे पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
विविध प्रकल्पांमुळे बेघर झालेल्या प्रकल्प बाधितांना घरं देण्यासाठी विविध नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
राज्य परिवहन महामंडळातल्या कामगार संघटनांच्या कृती समितीनं उद्या नऊ ऑगस्ट पासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल कृती समितीची बैठक घेतली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्य शासन अजून दोन हजार नविन बस घेण्याबाबत सकारात्मक असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या जनतेला पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी सध्याच्या जलप्रकल्पांची क्षमतावाढ करणं गरजेचं असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. हिंगोली, बीड, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतल्या जलसंपदा विभागाशी संबंधित प्रलंबित योजनांच्या संदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून एका प्रकल्पातलं अतिरिक्त पाणी दुसऱ्या प्रकल्पात नेण्याचं नियोजन करावं, असे निर्देश त्यांनी दिले. या जिल्ह्यांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करून पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्याची कार्यवाही गतीनं करण्याची सूचनाही पवार यांनी केली.
****
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एक ���ोटी ४० लाख अर्ज प्राप्त झाले असून, त्यातले एक कोटी २५ लाख अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या काल नांदेड इथं बोलत होत्या. अधिकाधिक महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
**
बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीन लाख ५२ हजार ८८० महिलांनी या योजनेमध्ये अर्ज दाखल केले असून, त्यातल्या जवळपास ९४ टक्के अर्जांची छाननी करून मोबाईलद्वारे स्वीकृती संदेश देण्यात आले आहेत. तर, परभणी जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ५७ हजार २३५ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी दोन लाख २६ हजार ९४१ अर्ज पात्र ठरले आहेत.
****
भारतीय रिझर्व्ह बँक -आरबीआयनं, विविध कृषी पूरक व्यवसायांसाठी कमी व्याजदरात अल्पावधीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. यानुसार, शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदरानं, तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाईल. विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात अतिरिक्त तीन टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. हे अल्प मुदतीचं कर्ज मिळवण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे.
****
करासंबंधीचे कायदे आणि प्रक्रियांचं सुलभीकरण करून त्याद्वारे देशाची प्रगती आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा दृष्टिकोन असल्याची ग्वाही, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली. लोकसभेत काल अर्थ विधेयक २०२४ वरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. सरकारनं गेल्या दशकात कर रचनेत आमूलाग्र बदल केले असून, करांमध्ये भरमसाठ वाढ न करता यात सुलभीकरण आणल्यानं पारदर्शकता वाढली असल्याचं त्या म्हणाल्या. मध्यमवर्गावरचं कराचं ओझं वाढल्याचे दावे त्यांनी फेटाळून लावले. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला तसंच, छोट्या व्यावसायिकांनाही मोठा फायदा झाल्याचं अर्थमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
दरम्यान, या उत्तरानंतर लोकसभेत वित्त विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झालं.
****
राज्यसभेच्या नऊ राज्यांमधल्या १२ जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं काल अधिसुचना जारी केली. महाराष्ट्रात, खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यामुळे दोन जागांवर पो��निवडणूक होणार आहे. या सर्व जागांसाठी या महिन्याच्या १४ तारखेला अधिसूचना जारी केली जाणार आहे. २२ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २६ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. या निवपणुकीसाठी तीन सप्टेंबरला मतदान होणार आहे.
****
कुस्तीपटू विनेश फोगाटनं निवृत्ती जाहीर केली आहे. समाजमाध्यमांवरील संदेशा�� तिनं आपला निर्णय जाहीर केला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत काल अंतिम लढतीपूर्वी अपात्र ठरल्यानंतर विनेशनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अपात्रतेच्या निर्णयाविरोधात तिनं क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. आपल्याला संयुक्त रौप्य पदक मिळावं, अशी मागणी विनेशननं लवादाकडं केली आहे.
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेकपटू नीरज चोप्रा अंतिम फेरीत खेळणार आहे. तर, पुरुष हॉकी संघाची कांस्यपदकासाठी स्पेनविरुद्ध लढत होणार आहे. पुरुष कुस्ती स्पर्धेत अमन शेरावत ५७ किलो वजनीगटात खेळेल तर, महिलांच्या ५७ किलो वजनीगटात अंशू भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. काल झालेल्या भारोत्तोलन स्पर्धेत मीराबाई चानू चौथ्या क्रमांकावर राहिली. तर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे अकराव्या क्रमांकावर राहिला.
****
मराठवाड्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. ठाण्याचे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड हे आता छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अधीक्षक असतील. पुण्याचे पोलिस उपायुक्त विजय मगर यांची लातूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी, अमरावतीचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बीडच्या पोलिस अधीक्षक पदी, तर नांदेडचे अपर पोलिस अधीक्षक अविनाशकुमार यांची नांदेडच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. 
****
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा मनसे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यात जाहीर झालेली ही पहिलीच उमेदवारी असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज ठाकरे काल नांदेडकडे रवाना झाले.
****
पर्यटन विकास प्रक्रियेत स्थानिकांना सहभागी करुन त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी क्षमता बांधणीवर भर द्यावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. पर्यटन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. या मुद्यांचा विचार करून, पर्यटन विभागाने आराखडा तयार करावा, असं त्यांनी सांगितलं. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत अजिंठा आणि वेरुळ लेणी परिसरात पर्यटन सुविधांचा विकास तसंच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या, क्षयरोगमुक्त असलेल्या ८६ ग्रामपंचायतींचा काल गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावेळी, संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या दृष्टीनं जिल्ह्यातल्या आरोग्य संस्थांना मार्गदर्शन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या चेलीपुरा भागातल्या अजिंठा दूध डेअरीत विना परवाना दुग्��जन्य पदार्थ निर्मिती होत असल्याचं आढळून आल्यानं डेअरी चालकावर ��ारवाई करण्यात आली. अस्वच्छ वातावरणात होत असलेल्या निर्मितीसंदर्भात दुग्धजन्य पदार्थांचे नमुनेही घेण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री केलेल्या या कारवाईत सहा कॅन मध्ये १४९ किलो दही, १९ किलो पनीर, ४९ किलो एसएमपी पावडर जप्त करण्यात आली.
****
सुधारित फौजदारी कायद्यांविषयी माहिती देणाऱ्या मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचं काल नांदेड जिल्हा आणि सत्र न्यायालयात उद्घाटन झालं. कायद्यांची माहिती सोप्या भाषेत देणारं हे प्रदर्शन आज ही सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं असणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातल्या सातशे वीस गावात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासह स्वच्छतेची विविध कामं पूर्ण झाली आहेत. आता पुढच्या टप्प्यात नियमित जनजागृती करण्यात येणार असून यासाठी दोन ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभांचं आयोजन केलं जाणार आहे.
****
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
शेअर मार्केटमध्ये बुडालेल्या मुलाचा साखरपुडा झटपट उरकला कारण.. , पीडित तरुणी म्हणतेय की
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या पुण्यात समोर आलेले असून लग्न ठरल्यानंतर साखरपुडा उरकला आणि त्यानंतर लग्नासाठी अवघे काही दिवस बाकी असतानाच मुलाचे आणि मुलीचे भांडण झाले मात्र प्रकरण इतक्यावर न थांबता या प्रकरणातील पीडित तरुणीने होणाऱ्या पतीने आपल्याकडून पाच लाख बावीस हजार रुपये ऑनलाईन घेतल्याचा धक्कादायक खुलासा केलेला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी मंगळवारी तक्रार दाखल करण्यात आलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 2 years ago
Text
'राज्य सरकारची 'हर घर मल' योजना!'
मडगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल हे “हर घर जल’ देण्यास सपशेल अपयशी ठरल्यानंतर आता “हर घर मल’ची योजना राबवीत आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. सांकवाळ येथील रहिवाशांनी सांडपाणी वाहून नेणारा पाण्याचा टँकर पकडल्याच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेस अध्यक्षांनी भाजप सरकारकडून कोणतीही आशा नसल्यामुळे लोकांनीच आता सतर्क राहण्याचे आवाहन केले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
Pushpa 2 | ज्याठिकाणी झाल्या तब्बल 178 हत्या; त्याच खतरनाक जागेवर होणार 'पुष्पा 2'ची शूटिंग - Marathi News | Pushpa 2 shooting location maoists odisha malkangiri district allu arjun rashmika mandanna
Tumblr media
पुष्पाचा पहिला भाग हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने सीक्वेलसाठी दुप्पट फी आकारली आहे. ‘पुष्पा : द रूल’साठी त्याने तब्बल 85 कोटी रुपये स्वीकारल्याचं कळतंय. हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला एक नवीन रेकॉर्ड बनला आहे.
Tumblr media
Pushpa 2 Image Credit source: Instagram मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा : द रूल’ या सीक्वेलची सध्या जोरदार चर्चा आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्य���त आला. त्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता दुसऱ्या भागात काहीतरी हटके दाखवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. यासाठी चित्रपटातील काही सीन्सचं शूटिंग खतरनाक लोकेशन्सवर करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी जवळपास 178 हत्या झाल्या आहेत, त्या ठिकाणी ही शूटिंग होणार असल्याचं कळतंय. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
गुजरातमध्ये विजयाचा दावा फोल ठरल्यानंतर भगवंत मान म्हणाले, ‘कोहलीही रोज शतक ठोकत नाही’
गुजरातमध्ये विजयाचा दावा फोल ठरल्यानंतर भगवंत मान म्हणाले, ‘कोहलीही रोज शतक ठोकत नाही’
गुजरातमध्ये विजयाचा दावा फोल ठरल्यानंतर भगवंत मान म्हणाले, ‘कोहलीही रोज शतक ठोकत नाही’ नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘अजेंडा आज तक’मध्ये गुजरात निवडणुकीतील दाव्यांबाबत सांगितले की, कोहलीसुद्धा दररोज शतक झळकावत नाही. आम्ही काँग्रेससारखे मैदान सोडत नाही तर मेहनत करतो. पंजाबमधून आमची एंट्री गुजरातमध्ये झाली असून आम्ही गोव्यात आहोत. आता आम आदमी पक्षही राष्ट्रीय पक्ष बनला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
सय्यद किरमानी यांना वाटते की विराट कोहलीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतावे आणि तेथे काही धावा करून आत्मविश्वास मिळवावा- 'देशांतर्गत क्रिकेटमध्ये फॉर्म मिळवा, मग तुम्ही टीम इंडियामध्ये फिट आहात की नाही याचा विचार कराल', विराट कोहलीबद्दल माजी यष्टिरक्षक म्हणाला.
सय्यद किरमानी यांना वाटते की विराट कोहलीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतावे आणि तेथे काही धावा करून आत्मविश्वास मिळवावा- ‘देशांतर्गत क्रिकेटमध्ये फॉर्म मिळवा, मग तुम्ही टीम इंडियामध्ये फिट आहात की नाही याचा विचार कराल’, विराट कोहलीबद्दल माजी यष्टिरक्षक म्हणाला.
विराट कोहलीचा खराब फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय असून सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही क्रिकेट तज्ज्ञ कोहलीचे समर्थन करत आहेत तर काहीजण अश्विनला वगळले असेल तर कोहलीलाच प्राधान्य का दिले जात आहे, असे म्हणत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत अपयशी ठरल्यानंतर त्याच्यावर ट���क���ची झोड उठली आहे. त्याला 2 सामन्यात केवळ 20 धावा करता आल्या. आता भारताचा माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी याने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
लग्न ठरल्यानंतर अश्लील मेसेज पाठवणे हा भावी जोडीदाराच्या विनयशीलतेचा अपमान नाही : कोर्ट
लग्न ठरल्यानंतर अश्लील मेसेज पाठवणे हा भावी जोडीदाराच्या विनयशीलतेचा अपमान नाही : कोर्ट
मुंबई : ज्या महिलेसोबत विवाह होणार आहे, तिला ‘अश्लील संदेश’ (obscene messages) पाठवणे हे तिच्या विनयशीलतेचा अपमान (insulting modesty) करणारे आहे, असे म्हणण्याचे कारण नाही. प्रत्यक्ष लग्न सोहळ्यापूर्वी केलेल्या अशा मेसेजच्या माध्यमातून ती महिला आपल्या भावना समजून घेण्याइतपत मनाच्या जवळ आहे, हे सांगण्याचा तो एक मार्ग असू शकतो. परंतु तिला ते आवडत नसेल, तर ती आपली नाराजी उघड करु शकते. त्यानंतर तो अशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
आक्रोश शेतकऱ्यांचा : बैठक निष्फळ ठरल्यानंतर तणावात भर
आक्रोश शेतकऱ्यांचा : बैठक निष्फळ ठरल्यानंतर तणावात भर
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीतीन केंद्रीय कृषी कायद्यांवरून मोदी सरकार आणि शेतकऱ्यांच्या संघटनांदरम्यानची वाटाघाटीची शुक्रवारी झालेली आठवी फेरीही निष्फळ ठरली. कृषी कायदे रद्द करणार नसल्याचा निर्धार या बैठकीत मोदी सरकारने स्पष्टपणे बोलून दाखविला, तर कायदे रद्द करण्याव्यतिरिक्त कोणतीही चर्चा करण्यास तयार नसल्याचे आंदोलकांच्या नेत्यांनी स्पष्ट केले. आता चर्चेची नववी फेरी १५ जानेव���री रोजी होणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
असमर्थ ठरल्यानंतर काही वेळा प्रमाणपत्र गरजेचं; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना नाव न घेता टोला मंदिरं मात्र डेंजर झोन आहेत का? | #AmrutaFadnavis #UddhavThackeray #TempleReopening #Tweet http://www.headlinemarathi.com/maharashtra-news/amruta-fadanvis-hits-out-cm-uddhav-thackeray-over-reopening-temples/?feed_id=13716&_unique_id=5f86adf5b011c
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 January 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १० जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि. ****
·      देशात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण; पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लस.
·      राज्यात कोविडबळींची संख्या ५० हजारांवर; मराठवाड्यात नव्या दोनशे तीन रुग्णांची नोंद.
·      भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांचं फायर सुरक्षा ऑडिट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
·      मयत शेतकऱ्याच्या नावे पीककर्ज प्रकरणी हिंगोली जिल्ह्यात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल.
·      कृषी - जलसंधारणाच्या उत्कृष्ट कामांसाठी उस्मानाबाद जिल्ह्याला ३ कोटी रुपये प्रोत्साहन निधी.
आणि
·      तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या उपाहारापर्यंत चार बाद १८२ धावा.
****
देशात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष कोविड लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका बैठकीत देशातली कोविड परिस्थिती आणि लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला, या आढावा बैठकीतच १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या फळीत आघाडीवर राहून काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचं प्राधान्यानं लसीकरण केलं जाईल. त्यानंतरच्या टप्प्यात पन्नास वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. इतर विकारांनी त्रस्त असलेल्या पन्नास वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांनाही या टप्प्यात लस दिली जाईल. परवा शुक्रवारी देशभरात या लसीकरणाची घेतलेली रंगीत तालीम यशस्वी ठरल्यानंतर हा प्रत्यक्ष लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, भारतात तयार करण्यात आलेल्या दोन्ही कोविड लसींसह मानवतेचं रक्षण करण्यास भारत तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सोळाव्या आंतरराष्ट्रीय अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचं उदघाटन करताना ते काल बोलत होते.
****
राज्यात कोविडबळींची संख्या ५० हजारावर पोहोचली आहे. काल राज्यात ५७ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २७ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात काल ३ हजार ५८१ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या १९ लाख ६५ हजार ५५६ झाली आहे. राज्यात काल २ हजार ४०१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले, कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १८ लाख ६१ हजार ४०० झाली असून, राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५२ हजार ९६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या दोनशे तीन रुग्णांची नोंद झाली. मृत रुग्णांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर नांदेड जिल्ह्यातल्या एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे ४० कोविडग्रस्त आढळले, नांदेड जिल्ह्यात ४४, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी ३०, लातूर २८, जालना २०, परभणी ९, तर हिंगोली जिल्ह्यात काल नवीन दोन कोविड बाधितांची नोंद झाली.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविड प्रतिबंधाविषयक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. नांदेडच्या महापौर मोहिनी येवनकर यांनी या मोहिमेत सहभागी होत, नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.      
****
राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं फायर सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड चालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत बोलत होते. या रुग्णालयातल्या नवजात विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागून दहा बालकांचा मृत्यू झाला. मृत बालकांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची सूचना, गृहमंत्री तसंच आरोग्य मंत्र्यांना केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, ही समिती शासनाला तीन दिवसांत अहवाल सादर करेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन या दुर्घटनेची माहिती घेतल्यानंतर टोपे बोलत होते. आगीच्या कारणांची माहिती घेऊन भविष्यात असं घडणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. विदर्भातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांची बैठक घेऊन, अशी घटना घडू नये, याची सर्वतोपरी काळजी घेण्याची सूचना देशमुख यांनी केली.
****
राज्यात बर्ड फ्ल्यूबाबत गैरसमज तसंच अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असं आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केलं आहे. राज्यात मुंबई, ठाणे, दापोली, बीड तसंच परभणी इथं काही ��क्षी दगावल्याचं आढळून आलं असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास, ४८ ते ७२ तास लागू शकतात, असं मंत्री केदार यांनी सांगितलं. नागरिकांनी काही समस्या असल्यास, पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दुरध्वनी क्रमांक १८०० २३ ३० ४१८ वर त्वरीत संपर्क करुन त्याची माहिती द्यावी, असंही केदार यांनी सांगितलं आहे.
****
गुटखा विक्री हा अजामीनपात्र गुन्हा मानत, या प्रकरणी १० वर्ष शिक्षेच्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. राज्य सरकारनं २०१२ पासून राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी तसंच इतर तत्सम पदार्थांचं उत्पादन, वाहतूक, साठा, वितरण आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या बाबतच्या दंडात्मक तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काही व्यापाऱ्यांनी आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या तरतुदी कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे यापुढे गुटखा विक्री प्रकरणी १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.
****
पुण्याच्या नातू फौंडेशनचे ग्रामीण विकास आणि सामाजिक सेवेसाठीचे पुरस्कार काल पुण्यात प्रदान करण्यात आले. महादेव बळवंत नातू पुरस्कार औरंगाबाद इथले डॉ दिवाकर कुलकर्णी यांना तर ‘सेवाव्रती कार्यकर्ता’ पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या यमगरवाडी इथले सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह, असं नातू पुरस्काराचं तर २५ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं सेवाव्रती पुरस्काराचं स्वरुप आहे. पद्मभूषण डॉ अशोक कुकडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
हिंगोली जिल्ह्यात युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून मयत शेतकऱ्याच्या नावावर पीककर्ज उचलल्या प्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वसमत तालुक्यातल्या सेंदुरसना इथले कणीराम नामदेव राठोड यांचं ४ जून २००५ रोजी निधन झालेलं आहे, मात्र त्यांचं  बनावट आधारकार्ड, तसंच पॅनकार्ड तयार करून, युनियन बँकेच्या व्यवस्थापकाने  १९ नोव्हेंबर २०१८ रोजी १ लाख ५ हजार रुपये कर्ज दिलं, माहिती अधिकार कार्यकर्त्यानं पाठपुरावा केल्यानं हे प्रकरण समोर आलं. या प्रकरणी युनियन बँक व्यवस्थापक, बँकेचा कर्ज वितरण व्यवस्थापक, रोखपाल, बँक खाते तपासनीस, खाते उघडतानाचे दोन साक्षीदार, मुद्रांक विक्रेता, सेंदुरसनाचे तलाठी, मंडळ अधिकारी, दुय्यम निबंधक नोंदणी अधिकारी, बनावट आधारकार्ड तयार करुन देणारी तसंच बनावट पॅनकार्ड तयार करून देणारी व्यक्ती अशा १३ जणांविरोधात फसवणुकीचा ��ुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या कृषी आणि जलसंधारणाच्या कामांची विशेष नोंद घेत, नीति आयोगानं जिल्ह्याला तीन कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. महत्त्वकांक्षी जिल्ह्यांच्या विकास कार्यक्रमांतर्गत अशा प्रकारचा प्रोत्साहनपर निधी मिळवणारा उस्मानाबाद हा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा ठरल्याने पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२० मध्ये जिल्ह्याने शेती आणि जलस्त्रोतांचं विकासात्मक काम उत्तमरित्या केल्याचं निरीक्षण नीति आयोगानं नोंदवलं आहे.
****
सुधारित कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा उदय ठरू शकतात, असं मत शेतकरी संघटनेनं नांदेड जिल्ह्यात घेतलेल्या चर्चासत्रातून व्यक्त झालं आहे. काल हदगाव इथं झालेल्या या चर्चासत्रात अनेक वक्त्यांनी, हे कायदे केंद्र सरकारने आवश्यक ते बदल करून लागू करावेत अशी भूमिका मांडली. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे ऊंचेगावकर यांनी हे चर्चासत्र बोलावलं होतं.
****
परभणी जिल्ह्याने जलजीवन मिशन अंतर्गत, चालू आर्थि��� वर्षासाठी निर्धारित नळजोडणीचे उद्दीष्ट शंभर टक्के पूर्ण करून मराठवाड्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. या योजनेत ग्रामीण भागात प्रत्येक कुटूंबाला शुध्द पेयजल नळाद्वारे पुरवलं जातं. चालू वर्षासाठी परभणी जिल्ह्याला ग्रामीण भागात ६८ हजार ६०४ नळजोडणीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं, हे उद्दीष्ट शंभर टक्के पूर्ण केल्याबद्दल परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या बिंदगीहाळ सारख्या ग्रामीण भागातल्या महिलांनी एकत्र येऊन स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकीन निर्मिती सुरू केली आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी भेट देऊन प्रत्यक्ष प्रकल्पाची पाहणी केली. मार्गदर्शक सूचना करून प्रशासन पूर्णपणे पाठीशी असल्याची खात्री त्यांना दिली. तसेच नाविन्यपूर्ण योजनेतून अर्थसहाय्य करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. सॅनिटरी नॅपकीन याचे विपणन करण्याची विविध स्तरावर चर्चासत्र व व्यापाऱ्यांशी संवाद साधून जिल्हा विक्री केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोयल यांनी म्हटलं आहे.
अरूण समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर
****
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीनं पहिला ‘सावित्रीची लेक’ पुरस्कार काल परभणीत प्रदान करण्यात आला. शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ��्रशस्तीपत्र, मानपत्र तसंच सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
माध्यम क्षेत्रातली बदलती आव्हानं पेलण्यासाठी पत्रकारांनी सज्ज राहावं, असं खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं पत्रकार सन्मान सोहळ्यात बोलत होते. यावेळी माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड यांनी नागरिकांना कोविड संसर्गापासून बचावासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी, नागरिकांनी गर्दी टाळण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. नामविस्तार वर्धापन दिनाच्या नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यंदा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नामविस्तार दिनानिमित्त जाहीर कार्यक्रम, सभा, संदेशफेऱ्या आदी कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
प्रसिद्ध गायक सुधीर दातार यांचं काल पुण्यात निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. स्वरानंद संस्थेच्या आपली आवड तसंच मंतरलेल्या चैत्रबनात या कार्यक्रमांतून दातार यांनी गायलेली गाणी रसिकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या पश्चात प्रसिद्ध गायिका पत्नी शैला दातार, गायिका कन्या शिल्पा पुणतांबेकर, तबलावादक पुत्र हृषीकेश असा परिवार आहे.
****
भंडारा इथल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचं तातडीने फायर ऑडीट करून घेण्याची सूचना, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केली आहे. काल जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडून वीज उपकरणांसह वीज वाहक यंत्रणेची पाहणी करून घेत, आवश्यक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे.
****
लातूर इथल्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयात ११ वी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या १५ गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं टॅब देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅब देणार असल्याची घोषणा, टाळेबंदीच्या काळात पालक विद्यार्थी मेळाव्यात केली होती.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिकेत सिडनी इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात उपाहारापर्यंत चार बाद १८२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत २७० धावांची आघाडी घेतली आहे. त्याआधी काल भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात आला.
****
बीड जिल्ह्यातल्या केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी काल रे��ापूर ते लोखंडी सावरगाव मार्गाच्या कामाचा आढावा घेतला. या मार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच पथकराची वसुली, स्थानिक नागरिकांना मासिक पासची सवलत, वळण रस्त्याची समस्या, अपघातप्रवण रस्ते या आणि अन्य समस्यांचं तातडीनं निराकरण करण्याचे निर्देश आमदार मुंदडा यांनी दिले.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
“…तर मी माफी मागतो” ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप ठरल्यानंतर आमिर खानचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
“…तर मी माफी मागतो” ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप ठरल्यानंतर आमिर खानचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
“…तर मी माफी मागतो” ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप ठरल्यानंतर आमिर खानचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत त्यानंतर आता त्याने सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतंच त्याचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे ४ वर्षांनी आमिर खान हा मोठ्या पडद्यावर झळकला. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
IND vs SL - "घरी बसलेला शमी, मला चकित करतो...": रवी शास्त्री भारताच्या आशिया कप विरुद्ध श्रीलंका पराभवानंतर | क्रिकेट बातम्या
IND vs SL – “घरी बसलेला शमी, मला चकित करतो…”: रवी शास्त्री भारताच्या आशिया कप विरुद्ध श्रीलंका पराभवानंतर | क्रिकेट बातम्या
लागोपाठच्या दोन सामन्यांमध्ये, भारत आशिया चषक स्पर्धेतील चांगली धावसंख्या राखण्यात अपयशी ठरला आणि महाद्वीपीय स्पर्धेच्या सुपर 4 स्टेजमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध 181/7चा बचाव करण्यात अपयशी ठरल्यानंतर, मंगळवारी रात्री श्रीलंकेविरुद्ध 173/8चा बचाव करताना ते पुन्हा गडबडले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या भुवनेश्वर कुमार 19व्या षटकात 19 धावा दिल्या.…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
हा क्रिकेटचा दहशतवाद आहे तो देशांतर्गत दादागिरी आहे, विजय शंकरच्या खराब फॉर्मने क्रमांक 3 वर फलंदाजी केल्याने नेटिझन्स नाराज
हा क्रिकेटचा दहशतवाद आहे तो देशांतर्गत दादागिरी आहे, विजय शंकरच्या खराब फॉर्मने क्रमांक 3 वर फलंदाजी केल्याने नेटिझन्स नाराज
2 एप्रिलच्या रात्री गुजरात टायटन्स (GT) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 10 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) चा 14 धावांनी पराभव केला. मात्र, त्यांचा अष्टपैलू विजय शंकरचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. विजय शंकरने 20 चेंडूत केवळ 13 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विजय शंकर मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरल्यानंतर पुन्हा चर्चेचा विषय ठरला. विजय शंकरचा सातत्याने खराब…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
राम मंदिरासाठी ‘हे’ म्हणतात ही वेळ अशुभ !
��ाम मंदिरासाठी ‘हे’ म्हणतात ही वेळ अशुभ !
मुंबई : राम मंदिराच्या  पायाभरणीचा मुहूर्त ५ ऑगस्ट ठरल्यानंतर यालाच धरुन अनेक प्रतिक्रिया आल्या. काहींनी या निर्णयाचे कौतुक केलेलं दिसत आहे तर काहींनी यावर आक्षेप घेतलेला आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती मंदिर उभारणीसाठीची वेळ ही अशुभ असल्याचं म्हटलं आहे. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, “आम्हाला कोणतेही पद नको किंवा राम मंदिराचे विश्वस्थही व्हायचे नाहीये. आमची इतकीच इच्छा आहे की, मंदिराचं…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 November 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक –२६ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** राज्यातल्या राज��ीय पेचावर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार ** शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा ** राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे संसदेतही पडसाद; दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प आणि ** विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नऊ सिंचन प्रकल्पांची चौकशी बंद करण्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा निर्णय **** राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सकाळी साडेदहा वाजता निर्णय देणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे, या याचिकेवर काल दुसऱ्या दिवशी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सत्ता स्थापनेसंदर्भात राज्यपालांशी झालेल्या पत्रव्यवहारांचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले, यामध्ये अजित पवार यांनी दिलेलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची स्वाक्षरी असलेल्या पत्राचाही समावेश आहे. न्यायालयानं या सरकारला तात्काळ बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकिल कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी सुनावणी दरम्यान केली आहे. काल सुनावणीनंतर न्यायालयानं आपला निर्णय आज सकाळी साडेदहा वाजेपर्यंत राखून ठेवला आहे. **** शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल आपल्याकडे १६२ आमदारांचं संख्याबळ असल्याचं सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे सदनात ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत, त्यामुळे ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर शिवसेनेला तत्काळ सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्यात यावं, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त विधीमंडळ गटनेते जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या स्वाक्षरीने सादर झालेल्या या निवेदनासोबत या तिन्ही पक्षांच्या १६२ आमदारांच्या स्वाक्षरीची यादी जोडण्यात आली आहे. **** राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे पडसाद काल संसदेतही उमटले. राज्यसभेत काँग्रेस, डावे पक्ष तसंच इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या मुद्यावरुन दिलेले स्थगन प्रस्ताव सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावले, त्यानंतर विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे गदारोळ वाढत गेल्य���नं, सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत, आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित केलं. लोकसभेतही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रकरणी जोरदार घोषणाबाजी करत फलक झळकावले. अध्यक्षांच्या मनाईनंतरही फलक झळकावणारे हिबी एडन आणि टी एन प्रतापन या दोन खासदारांना अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मार्शलद्वारे सदनाबाहेर काढलं. त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं, सदनाचं कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, अजित पवार यांनी मात्र काल उपमुख्यमंत्री पदाचा अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य सचिव तसंच अर्थ सचिवांशी चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी ५ हजार ३८० कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. **** संविधान दिवस आज सर्वत्र साजरा केला जाणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीनं तयार केलेलं संविधान, २६ नोव्हेंबर १९४९ ला संसदेने स्वीकारलं होतं, या घटनेला ७० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल आज सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांची एक संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद या बैठकीला संबोधित करणार आहेत. या बैठकीमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा प्रकल्प, यवतमाळ जिल्ह्यातला बेंबळा प्रकल्प, यासह एकूण नऊ प्रकल्पांच्या कामात अनियमितता असल्याच्या आरोपांवरून, लाचलुचपत विभागामार्फत ही चौकशी सुरू होती. भविष्यात शासनानं किंवा न्यायालयानं आदेश दिल्यास, चौकशी पुन्हा सुरू केली जाईल, असं याबाबत जारी पत्रात म्हटलं आहे. या सर्व नऊ प्रकरणांचा २०१३च्या सिंचन घोटाळ्याशी संबंध नसल्याचा खुलासाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केला आहे. चौकशी बंद करण्याच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षानं टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी, भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणं पाठिशी घालणं, हाच भाजपचा सत्यनिष्ठेचा मार्ग असल्याची उपरोधिक टीका एका ट्वीट संदेशातून केली आहे, मात्र ही प्रकरणं पुराव्याअभावी बंद केली असून, त्या प्रकरणांशी अजित पवार यांचा संबंध नसल्याचं विभागाचे महासंचालक परमवीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. **** अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपूंजी असल्याचं सांगत, शिवसेनेच्या वतीनं काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात शासकी�� कार्यालयांवर मोर्चे काढले. जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी यासंदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना एक निवेदन सादर केलं. **** राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या परिसरात चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सातारा जिल्ह्यात कराड इथं जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. **** यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आणि महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त नांदेड इथं काल महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचं व्याख्यान झालं. जो नेता साधन सुचितेचा आग्रह न धरता, त्यावर न चालता, राजकारणात पदस्थ होतो, त्याचे कौतुक करणारा समाज निर्माण झाला आहे, असं ते यावेळी म्हणाले. प्राचार्य जगदीश कदम यांचंही काल नांदेड इथं व्याख्यान झालं. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत वारसा निर्माण केला, तो आजच्या काळात जोपासला जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. **** औरंगाबाद इथल्या कृषी तंत्र विद्यालयाच्या मैदानावर मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीनं २९ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान सहाव्या महाॲग्रो कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक वसंत देशमुख यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या प्रदर्शनात शेती, शेतीपूरक उद्योगांशी संबंधित विषयांवर नामवंतांचं मार्गदर्शन आणि शेती पीक प्रात्याक्षिकाचा अभिनव उपक्रम असणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या दहा प्रगतशील शेतकऱ्यांना बॅरिस्टर जवाहरलाल गांधी शेतकरी पुरस्कारनं गौरवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. **** लातूर जिल्ह्यातल्या शिरुर अनंतपाळ पंचायत समितीमधल्या कनिष्ठ लेखा अधिकारी मुख्तार मणियार याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी काल रंगेहात पडकण्यात आलं. प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या कर्मचार्याला प्रवास भत्ता फरक देयकाची तपासणी करुन स्वाक्षरी करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. **** औरंगाबादचं लोकसंपर्क कार्यालय- फिल्ड आऊटरिच ब्युरोच्यावतीनं जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातल्या वरूड बुद्रुक इथं आज संविधान दिवस आणि एकवेळ उपयोगात येणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी या विषयावर विशेष प्रचार कार्यक्रम आणि रॅ��ी काढण्यात येणार आहे. नांदेड इथं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय संविधान रॅली काढणार आहे. सकाळी नऊ वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून ही रॅली सुरू होईल. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सकाळी अकरा वाजता संविधान उद्देशिकेचं सामूहिकपणे वाचन होणार आहे. **** नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड न्यायालयाच्या नूतन इमारतीचं भुमिपूजन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर सोनवणे यांच्या हस्ते काल झालं. **** उस्मानाबादचे उगवते क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर आणि अभिषेक पवार यांची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित कुचबिहार ट्रॉफी अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. **** परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या कृषी पदविकेच्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासूनची शिष्यवृत्ती देण्याची मागणी कुलसचिव रणजीत पाटील यांच्याकडे शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीनं निवेदनाद्वारे केली आहे. **** नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यात काल जिल्हा परिषदेतर्फे सशक्ते विद्यार्थी अभियान राबवण्यात आलं. जिल्हाा परिषद मुख्ये कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत उपस्थित बालकांना लोह आणि ब-जीवनसत्व युक्त औषध- गोळ्या देण्याात आल्याफ. ****
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती
भारतीय संघाला आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचे  विजेतेपद मिळवून देण्यास अपयशी ठरल्यानंतर आता विराट कोहलीने  एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर विराट पुढील मालिकेत खेळणार नाही असे वृत्त समोर आले होते. भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. एका महिन्याच्या या मालिकेत भारत वनडे, टी-20 आणि कसोटी…
View On WordPress
0 notes